✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/04/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९४ - युझनेटवर सर्वप्रथम व्यापारिक स्पॅम ईमेल पाठवण्यात आली. १९९७ - भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा. 💥 जन्म :- १९१०: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे 💥 मृत्यू :- २३८ - गॉर्डियन पहिला, रोमन सम्राट. २३८ - गॉर्डियन दुसरा, रोमन युवराज *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - नाणार प्रकल्प होणारच, सौदी अरेबियातील अरामको कंपनीशी सामंजस्य करार, रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला केंद्राचा हिरवा कंदिल* ----------------------------------------------------- 2⃣ *जम्मू काश्मीर - कुलगाम येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक जवान शहीद, दोन जखमी* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या वेतनात वाढ करण्यास कॅबिनेटची मंजुरीस, ही वाढ 1 जानेवारी 2016 च्या वेतनापासून लागू असेल* ----------------------------------------------------- 4⃣ *हिंगोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन.* ----------------------------------------------------- 5⃣ *अकोल्यामध्ये काल 41.4 अंश सेल्सिअस सर्वोच्च तापमानाची नोंद* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली : 2 एप्रिलला भारत बंदमुळे घेण्यात न आलेली सीबीएसईची परीक्षा आता 27 एप्रिलला घेण्यात येणार आहे.* ----------------------------------------------------- 7⃣ *राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीत भारताला आणखी एक सुवर्ण पदक, महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात श्रेयसी सिंहला सुवर्ण पदक.* ----------------------------------------------------- *IPL - कावेरी पाणी वाटपावरुन गेले काही दिवस तामिळनाडूतील वातावरण तापलेलं आहे. त्यामुळेच चेन्नईतील सामने इतरत्र खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतल्याचं वृत्त एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. * ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व ( लोकपत्र )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://elokpatra.com/मातृभाषेतील-शिक्षणाचे-मह/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *यवतमाळ* ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे यवतमाळ जिल्हा असे नामकरण करण्यात आले. जिल्ह्याच्या सीमा : उत्तर दिशा - वर्धा जिल्हा व अमरावती जिल्हा,पूर्व दिशा - चंद्रपूर जिल्हा,दक्षिण दिशा - आंध्र प्रदेश राज्य व नांदेड जिल्हापश्चिम दिशा - हिंगोली जिल्हा व वाशीम जिल्हा आहे. हवामान व भौगोलिक : जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते तर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९६५ मि.मी आहे. जिल्ह्याचा सुमारे २१ % भाग (२८५० चौ.कि.मी.) हा वनक्षेत्रात मोडतो. लोकजीवन : जिल्ह्याचे क्षेत्रफळ १३,५८४ चौ.कि.मी. आहे जे महाराष्ट्राच्या ४.४ % इतके आहे, तर लोकसंख्या २७,७५,४५७ (सन २०११) आहे. जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. कुणबी, माळी, बंजारा, आंध, गोंड, परधान, आणि कोलाम या काही प्रमुख जमाती जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषा बोलल्या जातात. जिल्ह्यातील धरणं : यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा नदी वरील बेंबळा धरण, अरूणावती नदी वरील अरूणावती धरण व पुस नदी वरील पुस धरण हे मोठे व प्रमुख धरणं आहेत. यापैकी बेंबळा धरण हे सर्वात मोठे धरण आहे. जिल्ह्यातील व्यवसाय : जिल्ह्यात हातविणकाम (हँडलूम), विडी, कागद, साखर, जिनिंग-स्पिनिंग व तेल उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाची पिके- कापूस, ज्वारी, भुईमूग, तूर-डाळ. जिल्ह्याला कापूस, लाकूड, चुनखडी, कोळसा व संत्री या वस्तूंद्वारे महसूल मिळतो. जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. तेथून लाकूड, बांबू, तेंदू, आपटा, हिरडा व मोह या उपयोगी वस्तू मिळतात यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, राळेगाव, उमरखेड, दारव्हा व नेर ही महत्त्वाची व्यापार केंद्रे आहेत. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे : घंटीबाबा जत्रा (दिग्रस), रंगनाथ स्वामी जत्रा (वणी), इतर जत्रेची ठिकाणे- कळंब, घाटंजी जवळच्या अंजी येथील नृसिंह मंदिर, वणी, तपोणा, पुसद, महागाव, कळंब येथील चिंतामणी मंदिर, रंगनाथ स्वामींचे मंदिर(वणी) इत्यादी. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्याकुट्यातून जातो. जो या काट्या-कुट्याना भितो त्याची प्रगती कधीच होत नाही.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉 गोदावरी नदी *२) राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉 भोगावती *३) गंगापूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?* 👉 नाशिक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 मनोज दातार 👤 गजानन कुरेवाड, चिकना 👤 बालाजी चुनुपवार, येवती 👤 उमेश पोवाडे 👤 कलीमोद्दीन शेख 👤 मिनाज सय्यद 👤 आकाश वाघमारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *भूमिका* मी कोण? स्वतः स्वतःची ओळख पटायला पाहिजे स्वतःची भूमिका अगदी स्पष्ट वाटायला पाहिजे भूमिका स्पष्ट असल्या शिवाय तुम्ही ठाम राहू शकत नाही तुमचे कोणतेच स्वप्न पूर्ण झालेले तुम्ही पाहू शकत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आयुष्यात महत्वाच्या काही कामांच्या बाबतीत आळस करणारी माणसं दोन प्रकारे विचार करतात. एक, 'आयुष्य आणखी खूप शिल्लक आहे, करू कधीतरी.' आणि दोन, 'आयुष्य राहिलंच किती? कधीही संपून जाईल. आता कुठं वेळ राहिला?' अशी निमित्त करून असा विचार करणारे लोक अंगावर जबाबदारी पडू देत नाहीत. आयुष्य 'खूप बाकी आहे' म्हणणारा, शेवटच्या क्षणाला काम हातात घेईल तर कसं पूर्ण करेल? आणि 'आयुष्य राहिलंच किती' म्हणणारा कामाला सुरुवातच करणार नाही, तर तेही पूर्ण होणार कधी? आणि यांना मदत तरी कोण करणार?* *म्हणून, माणसानं 'काम करत राहिलं पाहिजे. जोपर्यंत मरण प्रत्यक्ष येत नाही, तोपर्यंत आयुष्य बाकी आहे किंवा संपलं आहे, असं म्हणत कुणी 'शांत' राहू नये. मरणाविषयी माणसानं 'अविचारी'पणा करू नये. "एका माणसानं नदीच्या पलीकडील तीरावर जाण्यासाठी पाण्यातून जाताना 'बुडू नये म्हणून' कमरेला भोपळा बांधण्याऐवजी दगड बांधून घेतले आणि नदीच्या मध्यभागी गेल्यावर बुडू लागला तेंव्हा 'धावा हो धावा' असं म्हणू लागला. परंतु त्यानं जाणीवपूर्वक 'दगड' बांधून घेतल्यामुळे अशावेळी कोण धावणार? त्याच्याच कमरेला दगड बांधलेले आहेत म्हटल्यावर कोण पाण्यात उडी घालील?" पाण्यात तरायचं असेल तर भोपळे बांधले पाहिजेत, दगड नाही. अशा पद्धतीने दगड बांधले तर आपलाच घात होईल.* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे एखाद्या रोगाला नष्ट करण्यासाठी एखाद्या चांगल्या औषधाची मात्रा काही ठराविक कालावधीत द्यावी लागते तेव्हा तो रोग नष्ट होतो.त्याचप्रमाणे एखाद्या माणसाच्या अंगी काही वाईट विचारांची प्रवृत्ती बळावलेली असते ती लवकर नष्ट होत नाही.अशा प्रवृत्ती असणा-या लोकांवर सातत्याने चांगल्या विचारांची मात्रा पुन्हा पुन्हा देत राहिली तर काही काळानंतर का होईना त्यांच्या अंगी असलेल्या वाईट प्रवृत्तींना हळूहळू प्रतिबंध घालता येतो आणि सत्प्रवृत्तीकडे नेता येते हे तितकेच खरे आहे. सुरवातीला अवघड जाईल पण नंतर मात्र आपोआपच सन्मार्गाला लागेल. त्याची त्याला चूक लक्षात येते तेव्हा वाईट विचार करण्याची प्रवृत्ती सुद्धा कमी व्हायला लागते. त्याचे त्यालाच कळून चुकते की,आपण आपल्या जीवनात हे काय करुन बसलो आहोत. मग पुन्हा तो त्या वाटेकडे जाणार नाही.वेळ लागेल पण सुधारणा नक्कीच होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आधी शिदोरी मग जेजुरी* - आधी भोजन मग देवपूजा. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मविश्वास* एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते. असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते.अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो.वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ ५ लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता.अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती. तात्पर्य- आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment