✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 20/04/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले. 💥 जन्म :- ७८८: आदि शंकराचार्य यांचा जन्म. 💥 मृत्यू :- १९९९: रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *98 व्या मराठी नाट्यसंंमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार, 13,14 आणि 15 जूनला मुंबईत होणार नाट्य संमेलन* ----------------------------------------------------- 2⃣ *उद्यापर्यंत संपुष्टात येईल देशातील रोख टंचाई - एसबीआय प्रमुखांची माहिती* ----------------------------------------------------- 3⃣ *नांदेड : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहा येथील तीन राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचे केले भूमिपूजन* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणे- मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर. 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन.* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक-मुंबई विमानसेवेला पुन्हा एकदा सुरूवात. यआजपासून वेळापत्रकानुसार नियमित सेवा सुरू होणार. ओझरहून सकाळी 6.5 वाजता मुंबईच्या दिशेने उड्डाण होणार.* ----------------------------------------------------- 6⃣ *बुलडाण्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, यंदा पाऊस सर्वसाधारण राहणार असल्याचे भाकीत.* ----------------------------------------------------- 7⃣ *IPL 2018- पंजाबने हैद्राबाद ला 15 धावांनी नमविले* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सरकारी शाळेत हाऊसफुल्ल पाटी ( सकाळ )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.google.co.in/amp/amp.esakal.com/saptarang/house-full-slate-public-school-22282?source=images आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *वाशिम* हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय वाशीम शहर आहे. ही वाकाटकांचीराजधानी होती. वाशीम शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म आहे. जिल्ह्यातील मुख्य पिके- सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर व कापूस ही आहेत. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- श्री संत अमरदास बाबा मंदिर ऋषीवट (रिसोड),श्री पिंगळाशी देवी(रिसोड),श्री सितला मंदिर (रिसोड),आप्पास्वामी मंदिर (रिसोड),बालाजी मंदिर (वाशीम), श्रीक्षेत्र पोहरादेवी, पद्मतीर्थ शिवमंदिर, अंतरीक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर, नृसिंह सरस्वती मंदिर (करंजा), सखाराम महाराज मंदिर (लोणी), चामुंडा देवी *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर कोण होते?* 👉 वर्धमान महावीर *२) वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला?* 👉 कुंडलपूर *३) वर्धमान महावीर यांचा जन्म कधी झाला?* 👉 इ. स. पू. ५९९ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विलास इंगळे, 👤 साईनाथ मुलकोड, येवती 👤 दिलीप सहस्त्रबुद्धे 👤 अक्षय निरावार 👤 रमेश हातोडे 👤 छाया पुयड 👤 स्वप्नील सूर्यवंशी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *वाटणारे* इथे वाटणारा पेक्षा जास्त लाटणारे आहेत बोटावर मोजता येईल एवढे वाटणारे आहेत लाटणारा पेक्षा जास्त आनंदी वाटणारे असतात उगीच रडत कुढत सदा लाटणारे बसतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रत्येक व्यक्तिची एक स्वतंत्र ओळख असते. त्याची स्वत:ची एक प्रकृती असते. त्याचं अवतीभवतीचे वातावरण वेगळे असते. त्याची आर्थिक व शैक्षणिक पार्श्वभूमी निराळी असते. त्याच्यावर झालेले संस्कार भिन्न असतात. एकाच पर्यावरणात राहिलेले व एकाच माता-पित्याच्या पोटी जन्माला आलेली भावंडसुद्धा सारख्या विचारांची नसतात.* *कारण प्रत्येक व्यक्तिचं भावविश्व वेगळं असतं. त्याची भावनिक व मानसिक गरज भिन्न असते. अंगभूत संवेदनशिलताही वेगळी असते. एखादा प्रसंग बघितला अथवा घडलेला असला तर त्यावरील प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी असते. कारण प्रत्येकाचा त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वतंत्र असतो.* ••●⚡‼ *रामकृष्णहरी* ‼⚡●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखादे सकस बियाणे जमिनीत टाकले तर त्या बियाणापासून सकस धान्य उपजले जाते हा विश्र्वास बियाणे टाकणा-या शेतक-याला जसे माहित असते. त्याचप्रमाणे एखादा चांगला विचार चारचौघांमध्ये जर रुजला तर त्याच विचारांचे इतरही जनमानसात विचार रुजून एक सशक्त चांगल्या विचारांची पिढी निर्माण होऊन एक चांगला सशक्त समाज नक्कीच निर्माण होऊ शकेल असा चांगला विचार करणा-या विचारवंताला माहित असतो.तो देण्याचा स्वातंत्र्याने प्रयत्न करतो.परंतु एखादा वाईट विचार हा संपूर्ण समाजाला तळागाळापर्यंत पोहचला तर एक चांगली सशक्त पिढी विनाशाकडे नक्कीच जाऊ शकेल.त्यापेक्षा केव्हाही चांगल्या विचारांची कास धरुन आपले जीवन व सामाजिक जीवन समृद्ध करण्यास सहाय्य करावे.यापेक्षा अन्य महामंत्र कोणताच नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🌾🌱🌾🌱🌾🌱🌾🌱🌾🌱 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आधी बुद्धि जाते नंतर लक्ष्मी जाते* - अगोदरच आचरण बिघडते नंतर दशा बदलते. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *जाणीव* बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे." *तात्पर्य-दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते,कदर केली जाते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment