*निलगगनाची साथ*
इवल्याशा विश्वात माझ्या
तुझा आहे अफाट पसारा
शांत निळाईत पसरुनी
तुच या जगाचा निवारा
तुझी निलगगनाची सोबत मला
माया ममतेची साथ मिळेल
वास्तविक जीवनातील
आयुष्याची मिळकत कळेल
डोळ्यांत अश्रूंची सोबत
घेते तुझ्यापर्यंत भरारी
परतताना माघारी यावी
नेत्रांना या नवी करारी
निलगगनाची साथ तुझी
शांत निळाईत रंगलेली
जगावेगळी नाती माझी
स्वच्छंदपणे वसलेली.
〰〰〰〰〰〰
*✍ प्रमिला सेनकुडे*
*हदगाव जि.नांदेड.*
No comments:
Post a Comment