✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/04/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २०१० - रशियातील स्मोलेन्स्क शहरातील विमानतळावर उतरत असताना झालेल्या विमान दुर्घटनेत पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व इतर अनेक उच्चाधिकार्यांसह ९७ व्यक्ती ठार. 💥 जन्म :- १८९४ - घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती. १९०७ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार. १९३१ - किशोरी आमोणकर, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका. 💥 मृत्यू :- २०१३ - रॉबर्ट एडवर्डस् *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी 9-10 एप्रिलला सकाळी 11 वाजता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहणार बंद.* ----------------------------------------------------- 2⃣ *कावेरी पाणी प्रश्न : सुप्रीम कोर्टात सुनावणी 3 मे रोजी होणार, याप्रकरणी केंद्र सरकार सुद्धा ड्राफ्ट फाईल करणार.* ----------------------------------------------------- 3⃣ *नागपूर कारागृहातील गोदामाला आग, घटनास्थळी पाच अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल.* ----------------------------------------------------- 4⃣ *नंदुरबार- वेतन निश्चितीसाठी शिक्षकांकडून आठ हजारांची लाच घेताना वेतन परिक्षक ज्ञानदेव कचरे यांना रंगेहात अटक. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगरः भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी* ----------------------------------------------------- 6⃣ *हिंगोली : मार्च एन्डनंतर बाजारपेठेत हळदीच्या खरेदीस सुरूवात, पहिल्याच दिवशी झाली 10 हजार पोत्याची आवक.* ----------------------------------------------------- 7⃣ *Commonwealth Games 2018 : भारताला मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक ; सायना ठरली विजयाची शिल्पकार* ----------------------------------------------------- *आय पी एल बातमी - कोलकातां नाइट रायडर्सने यंदाच्या आयपीएल सत्रात विजयी सलामी देताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ४ बळींनी केला पराभव* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सैनिक देशाचा खरा संरक्षक ( जनशक्ती )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.ejanshakti.com/सैनिक-देशाचा-खरा-संरक्षक/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= जालना जिल्हा हा स्वतंत्र भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आहे. तसेच मराठवाडा विभागात उत्तर दिशेस स्थित आहे. जिल्ह्याचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्थान म्हणजे १९०१ उत्तर ते २,१०३ उत्तर अक्षवृत्तीय व ७,५०४ पुर्व ते ७,६०४ पुर्व रेखावृत्तीय. जालना जिल्हा हा पूर्वी निझाम राज्याचा भाग होता. नंतर मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर औरंगाबाद जिल्ह्यामधील एक जालना तालुकाझाला. जालना जिल्ह्यातील जनतेने मराठवाडा मुक्ती संग्रामामध्येमहत्त्वाची भूमिका पार पाडली होती. जनार्दन मामा नागापूरकर यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहूती दिलेली आहे. हा जिल्हा संकरित बियाणे-प्रक्रिया सारख्या कृषि-आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेंजो शीतल हे संकरित बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५०-७५० मि.मी. इतके आहे. अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरीनदीच्या खोऱ्यात येतो. जिल्ह्याची ७५% जमिनीवर खरीप पिके निघतात, तर त्यांतली ४०% रब्बी पिकांखाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये,कापूस ही प्रमुख पिके आहेत. जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते महत्त्वाचे हातमाग व यंत्रमाग द्वारे कापड बनविण्याचे केंद्र आहे. बिडीचेही कारखाने आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतात विद्यार्थी दिन कधी साजरा करण्यात येतो?* 👉 ७ नोव्हेंबर *२) भारतात शिक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो?* 👉 ११ नोव्हेंबर *३) भारतात बालदिन कधी साजरा केल्या जातो?* 👉 १४ नोव्हेंबर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागेश एल. तांबोळी 👤 सुभाष बोडके 👤 लक्ष्मण येवतीवाड 👤 श्रीनिवास चव्हाण 👤 श्यामानंद लिंगमपल्ले 👤 तुळशीराम सिरमलवार, सहशिक्षक 👤 सचिन पवळे 👤 डॉ. शेख MWH, नांदेड 👤 शिवराज वडजे, सहशिक्षक 👤 बालाजी मुपडे 👤 नंदकिशोर बारडकर, सहशिक्षक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *घोर* लोकाच कसं होईल याचाच घोर असतो दुस-याचाच विचार करायचा जोर असतो जगाचा विचार करण्यात घालतात सगळा वेळ स्वतः च्या आयुष्याचा अशात बसत नाही मेळ शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.* *आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्-भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काही लोक जेव्हा आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्यासमोर तुमची स्तुती करतात,तेव्हा तुम्ही समजून घ्या की,तुमच्याकडे त्याचे काहीतरी काम आहे.जे की तुमच्याकडून त्यांना करुन घ्यायचे आहे.तुम्ही तेव्हा त्यांच्या स्तुतीसुमनाने हुरळून जाऊ नका.कारण तुमच्या स्वभावात तो गुण नाही.खरच त्याची निकड आहे हे का पडताळून पहा.योग्य वाटत असेल तर तुम्ही तुमच्या अंत: करणातून जरुर मदत करा.परंतू तो म्हणत आहे म्हणून आपण केले पाहिजे असा विचार सोडून द्या.अशी माणसे आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही टोकापर्यंत जाऊ शकतात.एखाद्यावेळी तुम्हाला संकटात टाकून ते निघून जातात आणि आपण पश्चातापात किंवा एखाद्या संकटात अडकतो.असे करण्यापेक्षा त्यांच्या स्तुतीसुमनांना बळी न पडता आपण स्वत: तुमच्या मनाला खरे वाटत असेल तर मदत करा अन्यथा अशा लोकांना मदत नाही केली तरी काही आपले वाईट होणार नाही.पण अशी माणसे जर आपण एकदा ओळखायला लागली की,भविष्यात होणारे संभाव्य धोके निश्चितपणे टळू शकतील आणि समाधानाने जीवन जगता येईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. 📲 9421839590/8087917063. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अडला हरी गाढवाचे पाय धरी* - एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= भूदान चळवळीच्या काळातील ही गोष्ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्यांची पदयात्रा सुरु होती. आपल्या काही शिष्यांसह विनोबाजी मीराजींच्या आश्रमात थांबले होते. अल्पशा विश्रांतीनंतर त्यांची पदयात्रा पुन्हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्हती. त्यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्यामुळे त्यांना खुर्चीत बसवून नेण्यात येत होते. मध्ये मध्ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्हा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्ही काय करत होता असे त्या व्यक्तीने विचारले. विनोबाजी म्हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्ट आली. जेव्हा आपल्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट आली जेव्हा आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.'' तात्पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment