*🌹जीवन विचार🌹* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ✍माणसाच्या जीवनात चढउतार हा असतोच.प्रत्येक सजीव जीवन जगत असतो आणि त्याचा अंतही हा अटळ असतोच.जीवनात माणसाला दु:ख , संकटे येणारच ती आली नाहीत तर ते जगणं पण एकतर्फी होऊन जाईल.व अशा एकतर्फी जीवनाची वाटचाल करताना माणूस हताश व निराश होणार व आयुष्याची व आयुष्यात येणाऱ्या माणसांची ओळख पण होणार नाही व किंमत पण कळनार नाही ,प्रत्येक श्वासासोबत क्षणक्षण आयुष्यपण संपत आहे. जगण्यातला हा क्षण अस्ताकडे झुकु लागला आहे. या हर्षमय चंद्राचा प्रकाश समोर दिसत असतांना सहज सिंहावलोकन म्हणुन संपलेल्या आयुष्यावर नजर टाकली, आयुष्याचा मागोवा घेत असताना मन खिन्न होऊन विचारमग्न झाले, अन् खुप अस्वस्थ झाले कारण आयुष्य बरंच संपलं होतं.संपलेल्या आयुष्यात काय मिळवलं ह्याचा मनाला पडलेला प्रश्न अगदी नंदादिपातला ज्योतीसारखा प्रज्वलीत होऊन प्रकाशमय झाला होता???? हेच का ते जीवन? इतके दिवस जे जगले ते व्यर्थच का ?? हा विचार मनाला शिवून गेला.आणि संपलेल्या आयुष्यात आपण कितपत ? माणूसपण जपले ? सामाजिक हित कितपत जोपासले ?आजपर्यंत कितपत सामाजिक कार्य केले आणि पुढील आयुष्यात आणखीही सामाजिक हिताचे कार्य हे आणि अशा अनेक प्रश्नांची श्रृंखला ध्यानीमनी ठासत माणसानी माणसाशी माणसासम वागणे हा एकच विचार रुजलेला स्मरणार्थ राहीला, काही माणसं मरत-मरत जगत असतात.काही माणसं जगत-जगत मरत असतात. डोळयांना धुसर अंधारी पण आली पण त्या अंधारल्या वाटेतही काही पाऊलखुणा शाबुत दिसत होत्या.मी हताशपणे अधाशपणे न्याहाळल्याही त्या तेव्हा त्या पाऊलामध्ये मला तुमची छबी दिसली व माझा अस्वस्थपणा शांत झाला कारण जरी आयुष्य बरंच संपलं असलं तरी जगणंही बरंच बाकी आहे हा विचार पक्का झाला होता व मी गमावलेल्या आयुष्यात तुमच्यासारख्या माणसांना कमावलं होतं. माझ्यासाठी तुमचं अस्तित्व अनमोल आहे.ह्याच मला लौकिक आहे.शेवटी काय तर 'माणसाच जीवन म्हणजे नियतीचं हास्य होय आणि माणसाचं मरण म्हणजे नियतीच रुदन होय.' 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 💐शब्दांकन💐 ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.( हदगाव) http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment