✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/04/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६८: नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले. १९९०: लता मंगेशकर यांना 💥 जन्म :- १९२६: अॅमवे कंपनी चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस १९३३: डावखुरे मंदगती गोलंदाज बापू नाडकर्णी १९७३: भारतीय संचालक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलती 💥 मृत्यू :- २०००: कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी २०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई- राज्यातील शासकीय नोक-यांमध्ये आणि शिक्षणात अनाथ मुलांना 1% समांतर आरक्षण देण्याचे फडणवीस सरकारचे निर्देश* ----------------------------------------------------- 2⃣ *सीबीएसई पेपरफुटी प्रकरण- पकडलेल्या सर्व आरोपींना दिल्ली कोर्टाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कस्टडी.* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली: अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; 10 दिवसांत पुढील निर्णय घेणार.* ----------------------------------------------------- 4⃣ *इराकमध्ये मारल्या गेलेल्या 38 जणांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मोदींकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर* ----------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली: सीबीएसईची दहावीची गणिताची फेरपरीक्षा होणार नाही, विद्यार्थ्यांना दिलासा* ----------------------------------------------------- 6⃣ *आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवर टीडीपी खासदारांचा राज्यसभेत गदारोळ; गदारोळामुळे दिवसभराचे कामकाज स्थगित* ----------------------------------------------------- 7⃣ *सन 1970 सालानंतर ऑस्ट्रेलियालाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सर्वात मोठा विजय, मायदेशात पहिला कसोटी मालिका विजय साकारला.* ----------------------------------------------------- *दुःखद निधन :- नेल्सन मंडेला यांची घटस्फोटित पत्नी विनी मंडेला यांचे निधन.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *टॉयलेट नॉट टू लेट* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.ejanshakti.com/टॉयलेट-नॉट-टू-लेट/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कंधारचा किल्ला हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हयातील कंधार या तालुक्याच्या गावी असलेला एक भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणार्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले. इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळजिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली. परंतु नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला. त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच इ.स. १३३६ सालातील आहे. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९०च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. धनबुरुजावर अंबारी नावाची तोफ आहे. मलिक अंबर या प्रसिद्ध कारभार्यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचाही शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या कारकीर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले. औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे. हा किल्ला १५ एकरात असून त्याच्या भोवती खंदक आहे. रष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. किल्ल्यावर एक टेहळणी बुरूज असून अनेक तोफा अजून चांगल्या स्थितीत आहेत. कंधारचे पूर्वीचे नाव पंचालपुरी असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला अशी आख्यायिका आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?* 👉 शेकरू *२) औरंगाबादला किती दरवाज्याचे शहर म्हणून ओळखल्या जाते?* 👉 ५२ *३) जागतिक चिमणी दिवस म्हणून कधी साजरा केल्या जातो?* 👉 २० मार्च *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रताप रायघोळ, नांदेड 👤 सुधाकर पाटील 👤 माधव हणमंते, पत्रकार, धर्माबाद 👤 गणेश कोकुलवार, नांदेड 👤 अंकुश शिंगाडे, लेखक, नागपूर 👤 श्रीकांत गोडबोले 👤 आशा प्रदीप कसबे 👤 शंकर भोजराज, जारीकोट 👤 शिवाजी भोसले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *चिड* दुस-याला फसवता फसवता आपण स्वतः ही फसतो दुस-याला फसवून आपणच घोड्यावर बसतो दुस-याला फसवतांना कोणाचीच भिड नसते स्वतःला फसवले म्हणून स्वतः चीच चिड असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *गरीब माणसाला घरापासून दूर राहून पोटाच्या चार घासासाठी प्रचंड मरमर करावी लागते. पण पैशावाल्याच्या बाबतीत हे होत नाही. "एका बसल्या ठिकाणी त्याचा व्यापार चालतो. त्याला घर सोडून कुठेही जावं लागत नाही." गरीबाला एका वस्तूसाठी पैशाअभावी कुढत मरावं लागतं. शेवटपर्यंत ती वस्तू मिळेलच असं होतं नाही. पण "श्रीमंताला मात्र पाहिजे असणारी कोणतीही वस्तू रानावनातच काय या पृथ्वीतलावर कुठंही असली तरी पैशाच्या जोरावर मिळवणं सोपं असतं आणि वस्तू कोणतीही असू द्या, कितीही अनमोल असू द्या, कितीही महत्वाची असू द्या, शक्यतो जास्तीचे पैसे देऊन मिळवता येणार नाही, इतकी ती अवघड नसतेच." थोडे जास्त पैसे देऊन अति मौल्यवान वस्तुसुद्धा पैश्यावाल्याला सहज मिळवता येते.* *म्हणून, पैसा माणसाच्या आयुष्यात यासाठी महत्वाचा आहे. पैसा वाईट मार्गाने कमवायचा तर नाहीच, पण चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवून तो वाईट मार्गावर खर्च सुद्धा नाही करायचा. चांगल्या मार्गाने कमावलेला खूप पैसा 'आनंदी आणि सुखकर आयुष्य' जगण्यासाठी खर्च करायचा आहे. पैशाचा लोभ नाही आणि तिरस्कारही नाही. त्याची हाव नको आणि त्याच्याविषयी विरक्ती नको. पैसा कमवताना आनंदाने कमवायचा तसाच तो खर्च करतानासुद्धा जीवनात आनंदच असला पाहिजे. एवढा सुंदर असा 'मध्यम मार्ग' संतानी आपल्याला दिला आहे..* ••●🌱‼ *रामकृष्णहरी* ‼🌱●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जेव्हा आपली परिस्थिती नाजुक असते तेव्हा कोणताही प्रसंग आपल्याला आभाळाएवढा मोठा झाल्यासारखा वाटतो.त्या प्रसंगाला किंवा संकटाला बाजूला कसे दूर करावे काही सुचत नाही आणि कुणाची मदत घ्यावी तर अशावेळी मदतीला कोणी धावूनही येत नाही.सारे जण दूरुनच पाहतात. अशावेळी आपली बुद्धीही चालत नाही आणि एक करायला गेलो तर दुसरेच काही होऊन बसते.एखाद्या पाशात/जाळ्यात अडकलेल्या हरिणासारखी अवस्था होऊन जाते.संकटं येतात ती आपली परीक्षा पाहण्यासाठीच ! पण अशावेळी न डगमगता,न घाबरता,मनाची चलबिचल अवस्था न होता,शांत चित्ताने विचार करुन त्यावर कसा तोडगा काढता येईल याचा विचार करायला शिकावे नक्कीच काही ना काहीतरी मार्ग सापडतो. संकटं ही आपल्या जीवनात आव्हानं म्हणूनच येतात तशी आपण आव्हानं म्हणूनच स्वीकारली आणि त्याला प्रतिकार केला तर ती आपल्यापासून दूरही जातात.पण अशावेळी आपल्या जीवन जगण्यातला आत्मविश्वास गमावून बसू नये.जर का आपला आपण आत्मविश्वास गमावला तर जीवन जगणे कठीण जाईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590 🌀💠🌀💠🌀💠🌀💠🌀💠🌀 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अति तिथे माती* - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मनियंत्रणाचे महत्त्व* एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले,''जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते. *तात्पर्य :- ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment