✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 11/04/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती* 💥 ठळक घडामोडी :- १२४१ - मोंगोल सरदार बाटु खान याने हंगेरीचा राजा बेला चौथा यास मोहीच्या लढाईत पराभूत केले. 💥 जन्म :- १९०४ - के.एल्. सैगल, हिंदी भाषा पार्श्वगायक 💥 मृत्यु :- १६१२ - इमॅन्युएल फान मेटरेन, फ्लेमिश इतिहासकार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - पिंपरी-चिंचवडला मिळणार नवे पोलीस आयुक्तालय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय* ----------------------------------------------------- 2⃣ *झारखंड - सिमडेगा जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी* ----------------------------------------------------- 3⃣ *अहमदनगर : शिवसैनिक हत्या प्रकरण - भाजपा अामदार शिवाजी कर्डिले यांच्या कोठडीत 12 एप्रिलपर्यंत वाढ, तर आणखी २२ जणांना न्यायालयीन कोठडी* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : राज्य कर्मचा-यांचा सरकारला इशारा, सातवा वेतन आयोग लागू करा, अन्यथा आंदोलन करु.* ----------------------------------------------------- 5⃣ *रत्नागिरी - बँक अॉफ इंडियाच्या कडवई (ता. संगमेश्वर) शाखेत ५१ लाखांचा सोनेतारण घोटाळा, चार वर्षे खोटे सोने ठेवले गहाण.* ----------------------------------------------------- 6⃣ *गोल्ड कोस्ट - भारताच्या हीना सिद्धूने महिला नेमबाजीच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक* ----------------------------------------------------- 7⃣ *आशिया कप - यूएईमध्ये 13 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणार सामने, भारत पाकसहीत 6 संघ होणार सहभागी* ----------------------------------------------------- *आय पी एल मध्ये चेन्नईचा कोलकाता संघावर मात* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *गड-किल्ले इतिहासाचे मूक साक्षीदार (जनशक्ती)* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.ejanshakti.com/गड-किल्ले-इतिहासाचे-मूक-स/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हाव पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्वाच्या शहरांशी तसेच शेजारील आंध्र प्रदेश राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे. परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ आहे. शिर्डी साईबाबायांचा जन्म पाथरी येथला आहे.संत नामदेव महाराज (नर्सी) व संत जनाबाई (गंगाखेड) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूवी परभणीत होते ञिधारा हे पवीञ ठिकाण येथे आहे.ञिधारेला ओँकारनाथ भगवान नामे सिध्दपुरुषाचे मंदिर आहे.त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली. आता ते हिगोली जिल्हयात गेले आहे. परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= वेळ कसा घालावयाचा याचा सामान्य माणसे विचार करतात, तर बुद्धिमान त्या वेळेचा सदुपयोग करतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राला किती कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे?* 👉🏼 ७२० कि. मी. *२) रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते?* 👉🏼 कुलाबा *३) महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखल्या जातो?* 👉🏼 सोलापूर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रवीण कोडम, अहमदनगर संपादक, सा.मनपद्मशाली 👤 रामदास वाघमारे, औरंगाबाद संपादक, जीवन गौरव मासिक 👤 सुरेश द्विदेवार 👤 साईनाथ हवालदार 👤 देविदास बसवदे, शिक्षक नेते, 👤 विनोद चिलकेवार 👤 माधव गंटोड 👤 संजय नागरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *राजकारण* राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकते आपल्याच माणसाचा जीव घेऊ शकते अडथळा बनणाराचा आपलेच काढतात काटा काटा काढून थोड्या मोकळ्या होतात वाटा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *"जो घाबरतो तो वाया जातो. पाण्यात पडल्यावर जो संयम ठेवत नाही, तो शेवटी गटांगळ्या खातो." 'बी' पेरलं की लगेचंच त्याचं झाड तयार होऊन त्याची फळं खायला मिळावीत, एवढा उतावीळपणा असणारी काही माणसं पाहायला मिळतात. पण असं होत नाही, उलट असं न झाल्याचं दुःखं मात्र नक्की होत असतं. म्हणून कोणत्याही कामात माणसानं संयम राखणं आवश्यक आहे. दुःखं कितीही मोठं असलं तरी 'काळ' हा त्यावर इलाज आहे. पण त्यासाठी काही वेळ जाऊ देण्याची वाट मात्र पहावी लागते. तेवढी वेळ जाऊ देण्याइतका संयम माणसाला ठेवावा लागतो. दुःखात व्यसनाच्या आहारी जाणे किंवा आत्महत्या करून घेणे, या गोष्टी माणसाच्या हातून घडतात.* *याबरोबरच कामात प्रचंड घाई करणारी माणसंसुद्धा पाहायला मिळतात. 'अति घाई, संकटात नेई' असं रस्त्यावरील फलकांवर वाचायलाही मिळते. विशाल वटवृक्षाची सुरुवात एका छोट्याशा कोंबापासून होते. जर हे "उगवलेलं कोंब मध्यातच वाळून गेलं तर ते वाया जातं. त्याप्रमाणं 'उतावीळ' माणसाची बुद्धी वाया जाणारीच समजावी. "कोंब वाळल्यावर जसं त्याचा वटवृक्ष बनणार नाही हे आपल्याला कळतं, तसं उतावीळपणा केल्यानं काम पूर्ण होणार नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे.* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखादा चांगला विचार तुमच्या जीवनात खूप काही चांगली प्रेरणा देते आणि जीवनच बदलून टाकते.त्या एका चांगल्या विचारामुळेच तुमचा जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक मजबूत बनतो.तुम्ही भूतकाळ विसरून येणा-या भविष्याची अधिक चांगली अपेक्षा कराल.तुम्हाला काहीतरी नवे करण्याची इच्छा निर्माण होते आणि तुमच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करते. पण एखादा वाईट विचार जर केलात तर तुम्ही तुमच्या जीवनात अपमान, मानहानी, जीवनात निरुत्साह निर्माण करुन तुमच्या जीवनाला अधोगतीकडे नेल्याशिवाय राहत नाही.म्हणून जीवन आनंदी,सुखी,समाधानी जगायचे असेल तर दररोज एक चांगला विचार संतांचा, विचारवंतांचा किंवा ज्यांनी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरीत केले त्यांना कधीही विसरु नका.कारण ते तुमच्या जीवनाचे खरे प्रेरणास्थान आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे* - अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= बुद्धीचा योग्य वापर एक राजा कुशल प्रशासक होता. प्रजेचे सुख- दु:ख जाणून घेण्यासाठी तो साधारण वेशभूषा करून फिरत होता. एक दिवस जेंव्हा तो नगरातून जात होता तेंव्हा त्याला काही घोडेस्वार आपल्याकडे येताना दिसले, ते चोर असून आपल्याला लुटण्यासाठी येत आहेत असे राजाने हेरले. धाडसी राजा आता घाबरून जाण्याऐवजी लढण्यासाठी तयार झाला. त्याचवेळी त्याच्या घोड्याचा पाय खड्ड्यात अडकला. घोडा थोडासाही इकडे तिकडे हळू शकत नव्हता आणि चोर तर जवळ आले होते. तेवढ्यात तेथे काही तरुण आले. परिस्थिती ओळखून त्यांनी चोरांवर प्रतिहल्ला केला व हाकलून लावले. राजा यामुळे खुश झाला. त्याने त्या तरुणांना आपली ओळख दिली व बक्षीस म्हणून काही ना काही मागण्यास सांगितले. एका तरुणाने धन मागितले, दुसऱ्याने घर, तिसऱ्याने शेती, चौथ्याने सरपंचपद, पाचव्याने गावापर्यंत रस्ता बनवून मागितला आणि सहाव्याने म्हंटले, "महाराज ! मला काही देण्यापेक्षा तुम्हीच माझ्या घराचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी माझ्या घरी वर्षातून दोन वेळा यावे." राजाने सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या व सहाव्या तरुणाला घरी येण्याचे वचन दिले. राजा त्याच्या घरी गेला तेंव्हा त्याचे घर खूप जीर्ण झाले होते. राजाला ते पाहवले नाही ते त्याने बांधून देण्याची आज्ञा केली. तसेच येण्याजाण्यासाठी चांगला रस्ता करून दिला. राजा हा पाहुणा म्हणून येत असल्याने त्याचा गावातील गावातील सन्मान वाढला. प्रतिष्ठा वाढली, राजाच्या जवळचा असल्याने राजदरबारी त्याचे म्हणणे मांडता येवू लागले. राजाने प्रत्येक वेळी त्याला काही ना काही वस्तू भेट दिल्याने त्याची श्रीमंती वाढत गेली. त्याच्या अक्कल हुशारीने तो गावातील प्रतिष्ठित नागरिक बनला. तात्पर्य- योग्य संधी मिळेल तेंव्हा बुद्धीचा वापर योग्य पद्धतीने केल्यास चांगले लाभ पदरात पडून घेता येतात. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment