✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/01/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९५६ - देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकुम. त्यांचेच एकत्रित स्वरुपात आयुर्विमा महामंडळ झाले. १९६६ - इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी. १९९६ - ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड. तसेच प्रसिद्ध मल्याळी लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड २००७ - सरदार सरोवर धरणावरील साडेचौदाशे मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केला. 💥 जन्म :- १८९२ - चिंतामण विनायक जोशी, विनोदी लेखक व पाली भाषेचे अभ्यासक. १९०६ - मास्टर विनायक, मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते. 💥 मृत्यू :- १९०५ - देबेन्द्रनाथ टागोर, भारतीय तत्त्वज्ञानी. १९५१ - अमृतलाल विठ्ठल ठक्कर, महात्मा गांधींचे अनुयायी. १९६० - दादासाहेब तोरणे, मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक. १९९० - रजनीश, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जी एस टी मध्ये पेट्रोल-डिझेलबाबत कोणताही निर्णय नाही, सामान्यांची निराशा* ----------------------------------------------------- 2⃣ *29 वस्तूंवरील कर माफ तर 49 वस्तूंवरील कर कपात, जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित व रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडलेला पद्मावत' सिनेमा सर्व राज्यांमध्ये होणार प्रदर्शित, सुप्रीम कोर्टाचा निर्णय* ----------------------------------------------------- 4⃣ *एमपीएससीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ; २२ जानेवारीपर्यंत भरता येणार आनलाईन अर्ज* ----------------------------------------------------- 5⃣ *रहस्यमय 'राक्षस' या मराठी चित्रपटाचा टीजर लाँच, 23 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित* ----------------------------------------------------- 6⃣ *उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या 16 वर्षांखालील सब ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या महाराष्ट्र संघात तेजस मंगेश चव्हाण याची निवड* ----------------------------------------------------- 7⃣ *वर्षभर 'विराट' कामगिरी करणा-या विराट कोहलीला ICC चा प्रतिष्ठेचा 'क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हमें तो लूट लिया* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_7.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *चिंतामण विनायक जोशी* *चिंतामण विनायक जोशी* (जानेवारी १९, १८९२:पुणे, महाराष्ट्र - नोव्हेंबर २१, १९६३:पुणे) हे विनोदी साहित्याकररि प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते. त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते तसेच आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्राचे त्यांनी काही काळ संपादनही केले होते. सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी हे देखील जोश्यांच्याच घराण्यातले होते. त्यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङ्मय असले तरी ते व्यावहारिक जीवनात धीरगंभीर प्रवृत्तीचे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता, त्यामुळे ते दु:खी असत. दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकरांनी, गुंड्याभाऊचे बाळ कर्वे यांनी केले होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतातर्फे राष्ट्रकुलस्पर्धेत कोणत्या कुस्तीपटूने सुवर्णपदक पटकाविले?* 👉 सुशीलकुमार *२) देशातील पहिला हरीत रेल्वेमार्ग कोणता?* 👉 रामेश्वरम-मनामदुराई *३) दतमहात्म्य' हा सात हजा ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉 वासुदेव बळवंत फडके *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अजय कोंडलवाडे, सहशिक्षक, बिलोली 👤 अजय परगेवार उमरेकर 👤 माधव चपळे 👤 शिवशंकर स्वामी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *गाजरं* बारा महिने कोणी खात नाही बाजरं दाखवून काय होणार लाल लाल गाजरं पहायला मिळण्या पेक्षा खायला मिळालं पाहिजे बारा महिने कोणी काही खात नाही कळालं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मनुष्याने आपल्या जीवनात परिस्थिती वेगवेगळी रूपे घेऊन आपली परीक्षा घेत असते.त्या परीक्षेत जीवनात कधी दु:खाचे,कधी सुखाचे तर कधी न सुटणारेही अवघड प्रश्न येतात आणि त्याच्या मानसिकतेनुसार, अनुभवानुसार सोडविण्याचा प्रयत्न करतात.जर समजा प्रयत्न नाहीच केला तर जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होता येत नाही.जर व्हायचेच असेल तर समोर येणा-या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्याची मानसिकता तयार करावी लागेल आणि न घाबरता ,न डगमगता मन संयमीत ठेऊन सदविवेक बुध्दीने सारासार विचार करून धैर्याने आणि हिंमतीने हाताळायला शिकले तरच जीवनाच्या ख-या परीक्षेत यशस्वी होता येईल हे तितकेच सत्य आहे. ©व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 💕🌱💕🌱💕🌱💕🌱💕🌱💕 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कुर्हाडीचा दांडा गोतास काळ* - आपलाच माणूस आपल्या नुकसानीस कारण होणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका गाढवाची गोष्ट* एक धोबी आपल्या गाढवाकडून दिवसभर ओझी वाहण्याचे काम करून घेई आणि रात्री तो त्याला गावाबाहेर चरायला सोडून देई. रात्रभर गवत, नाही तर कुणा ना कुणाच्या शेतातली धान्याची रोपे पोटभर खाऊन झाल्यावर पहाटे पहाटे ते गाढव आपल्या घरी जाई. या रात्रीच्या भ्रमंतीत त्याची एका कोल्ह्याशी ओळख झाली. एके रात्री पुनवेचे पिटूर चांदणे पडले असताना ते गाढव म्हणाले, 'कोल्होबा, या चांदण्यांमुळे मन कसे प्रफुल्लित झाले आहे. मी थोडा वेळ गाऊ का?' कोल्हा म्हणाला, 'मामा, तुम्ही आणि गाणार? म्हणजे प्रलयच धडकला म्हणायचा!' 'का रे, मला गाण्याची माहिती नाही, असे का तुला वाटते?' असा प्रश्न विचारून ते गाढव स्वर किती, सप्तके किती व राग किती वगैरे माहिती देऊन त्या कोल्ह्याला म्हणाले, 'आता तरी माझ्या रागदारीच्या ज्ञानाबद्दल तुझ्या मनात संशय उरला नाही ना? कोल्हा म्हणाला, 'नुसते ज्ञान असणे वेगळे आणि गाण्याचा आवाज वेगळा. त्यातून कुणी, कुठे व कसे वागायचे याबद्दल मार्गदर्शक असे काही नियम आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर या जगात सुरळीतपणे जगण्याची इच्छा असेल, तर खोकला झालेल्याने व जो झोपाळू आहे त्याने चोरी करण्याच्या फंदात पडू नये व रोगग्रस्ताने जिभेचे चोचले पुरवू नयेत. खोकला झालेला जर कोणी चोरी करायला गेला आणि चोरी करता करता त्याला खोकला आला, तर ज्याप्रमाणे घरमालकाकडून मार खाण्याचा त्याच्यावर प्रसंग येईल, त्याचप्रमाणे तुम्ही जर या रात्रीच्या वेळी गाऊ लागलात, तर ज्याच्या शेतातली कोवळी कणसे आपण चोरून खात आहोत, तो शेतकरी जागा होईल आणि आपल्या दोघांनाही चोप देईल.' गाढव म्हणाले, 'कोल्होबा, तू अगदीच अरसिक कसा रे? तो स्मशानात राहणारा रुक्ष मनोवृत्तीचा शंकर जर त्या रावणाने सुकवलेल्या स्नायूंपासून तयार केलेल्या तंतुवाद्यातून रागदारीचे मधुर स्वर काढताच त्याच्यावर प्रसन्न झाला, तर माझे गोड गाणे ऐकून त्या शेताची रखवाली करणारा माणूस मला मारणे शक्य आहे का? उलट तो माझा सन्मानच करील.' हा आपले ऐकण्याचे लक्षण दिसत नाहीसे पाहून तो कोल्होबा त्या शेताच्या कुंपणाबाहेर पडून दूर उभा राहिला आणि त्या गाढवाने टिपेत गायला प्रारंभ केला. त्याबरोबर त्या शेताच्या जाग्या झालेल्या राखणदाराने त्याला बेदम मार दिला. त्या माराने ते गाढव मूच्र्छा येऊन जमिनीवर कोसळताच त्या राखणदाराने त्याच्या गळय़ात दोरखंडाने एक उखळ बांधले. एवढे करून तो पहारेकरी आपल्या झोपडीत जाताच शुध्दीवर आलेले ते गाढव गळय़ात बांधण्यात आलेल्या उखळासह कसेबसे घराकडे जाऊलागले, तेव्हा दूर उभा राहिलेला कोल्हा त्याला म्हणाला, 'गाढवमामा, तुमचा दिव्य गायनावर बेहद्द खूष होऊन त्या पहारेकर्याने तुमच्या सन्मानार्थ हा 'भव्य मणी' तुमच्या गळय़ात बांधला का?' पण लाजेने चूर झालेले ते गाढव एकही शब्द न बोलता निघून गेले. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment