मैत्रिणी..... दुःख वाटून घेणाऱ्या सुख वाटत जाणाऱ्या सल्ला देणाऱ्या सल्ला घेणाऱ्या खूप दूर असल्या तरी खूप जवळ असणाऱ्या आपआपल्या संसारात मग्न असल्या तरी मनाने आपल्याशी सतत संलग्न असणाऱ्या स्वतःचे भरले डोळे लपवून आपले अश्रु पुसणार्या. शाबासकीची पहीली थाप पाठीवर देणाऱ्या . खूप सुखात आहे ग मी म्हणून हळूच डोळे पुसणार्या. मैत्रिणी आयुष्याला मिळालेलं एक वरदान. जागेपणीचं स्वप्न छान पुस्तकातलं मोरपीस जपणारं पान. सप्तरंग उधळणारी इंद्रधनूची कमान मनातल्या फुलपाखराची इवली भिरभिर हळूवार हात पुसतात डोळ्यातले नीर उपसून काढतात हृदयात घुसलेला तीर मैत्रिणी गातात नाचतात खाऊ घालतात प्रेमाने चटणी भाकरी ते गुलाबजाम. त्या सुगरण असोत नसोत. प्रत्येक घास वाटतो अमृताहून गोड. मैत्रित नसतो भेदभाव गरीबी श्रीमंती लहान थोर शहर गाव. मैत्री असते एक सरीता या हृदयापासून त्या हृदयापर्यंत वहाणारी. ,, मैत्री.... माझ्या सगळ्या मैत्रिणीसाठी समर्पित...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment