✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/01/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९५६ - बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा. २००१ - मध्य प्रदेश सरकारचा शास्त्रीय नृत्यासाठीचा कालिदास सन्मान रोहिणी भाटे यांना जाहीर. अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एम.जी.ताकवले यांना जाहीर. 💥 जन्म :- १८९५ - विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ. १९०५ - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ. १९०६ - शकुंतला परांजपे, भारतीय समाजसेविका. 💥 मृत्यू :- २००० - सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जीएसटी परिषदेच्या 18 जानेवारीला होणा-या बैठकीत जीएसटीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा समावेश करण्यावर चर्चा होण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 2⃣ *हज यात्रेचं अनुदान यंदापासूनच बंद, केंद्र सरकारचा निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला न्यायाधीश बी एच लोया यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला देण्याचे निर्देश दिले.* ----------------------------------------------------- 4⃣ *भारताच्या अंडर 19 च्या संघाने पापुआ न्यू गिनियावर (PNG) 10 विकेट्स राखून मोठा विजय.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे : विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे निधन.* ----------------------------------------------------- 6⃣ *तिस-या कसोटीसाठी दुखापतग्रस्त वुद्धीमान सहाच्या जागी दिनेश कार्तिकची निवड.* ----------------------------------------------------- 7⃣ *सेंच्युरियन कसोटी -दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २५८ धावांवर आटोपला, भारतासमोर विजयासाठी २८७ धावांचे आव्हान* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *साहित्यसेवा हेच खरे काम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शकुंतलाबाई परांजपे* शकुंतलाबाई परांजपे या महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून गणितात अधिस्नातक पदवी मिळवली होती. जन्म- १७ जानेवारी १९०६ पुणे मृत्यू- ३ मे २००० जोडीदार - युरा स्लेप्टझॉफ अपत्ये सई परांजपे पुरस्कारपद्मभूषण(१९९१) *व्यक्तिगत माहिती* रँग्लर परांजपे हे त्यांचे वडील होते. सई परांजपे ही त्यांची कन्या आहे. शकुंतलाबाई परांजपे या लेखिकाही होत्या. यांनी काही पुस्तके आणि नाटकेही लिहिली आहेत. *शकुंतलाबाई परांजपे यांनी लिहिलेली पुस्तके* अरे संसार संसार, काही आंबट काही गोड, दुभंग, निवडक शकुंतला परांजपे (संपादन - विनया खडपेकर), भिल्लिणीची बोरे *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतातील पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना कोठे झाली?* 👉 पुणे *२) आयसीसी क्रमवारीत रोहित शर्मा कितव्या स्थानावर आहे?* 👉 पाचव्या *३) आयसीसी क्रमवारीत प्रथम स्थानावर कोणता खेळाडू आहे?* 👉 विराट कोहली *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 जयप्रकाश भैरवाड, धर्माबाद 👤 शेखर घुंगरवार 👤 सचिन पाटील पार्डीकर 👤 धम्मपाल कांबळे 👤 यश चेलमेल 👤 राम घंटे 👤 मन्मथ भुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *संगत* ज्यांची असते सदा असंगाशी संग ते होतात नेहमी असंगाने तंग तंग व्हायचे नसेल तर संगत चांगली करा आनंदी रहायचा हा मार्ग आहे खरा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *या पृथ्वीतलावर पर्वत, नद्या , स्थावर-जंगम आहे तोवर लोकसमूहात रामायणाची कीर्ती गाजत राहणार आहे.. या शब्दांत महर्षि वाल्मिकींनी रामायण कथेची कालातीत स्थिरता कोरून ठेवली आहे. या भूतलावरील प्रत्येक मानवी वृत्ती व प्रवृत्तीचं प्रातिनिधिक रूप या महाकाव्यात रंगविलं आहे. आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सेवक, आदर्श राजा अशा आदर्शांचा प्रतिनिधी म्हणून श्रीरामाचं चरित्र आपल्यापुढं येतं. संतानी, भक्तांनी, कवींनी त्याला देवत्वाला पोहोचवलं आहे.* *रामायणातील अगतिकता नि वेदनांच्या आंतरिक संघर्षाच्या तळाशी पोहचल्याशिवाय श्रीरामाच्या मानव ते 'मर्यादा पुरूषोत्तम प्रभूराम' या देवत्वरूपाशी तादात्म्य पावताच येणार नाही. गदिमांनी गीतरामायणात प्रभूरामाच्या जीवनपटाचा माणूस म्हणून सारांश मांडताना अतिशय उत्कटतेने वलयांकित केलेले-* *'दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा* *पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.'* *हे श्रीरामाचं रूप आधिक यथार्थ वाटतं..* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांचे मन आणि बुद्धी सक्षम असतील तर त्यांनी करत असलेले विचारही सक्षम असतात कारण की,अशा विचारांमुळे स्वत:च्या जीवनाबरोबर इतराच्यांही जीवनाचा सकारात्मक विचार करायला तो तयार असतो.त्याच्या मनात इतरांबद्दल वाईट भावना कधीच येत नाहीत.पण ज्यांचे मन आणि बुद्धी जर सक्षम नसतील तर ते मन आणि बुद्धी वाईट विचार करायला लागते.त्यातस्वत:चे आणि इतरांचे चांगले होत आहे की वाईट होत आहे ह्याचा विचारही त्याच्या मनाला आणि बुध्दीला स्पर्श करत नाही. अशावेळी भरकटलेल्या मनाला आणि बुध्दीला आपल्या वशमध्ये ठेवण्यासाठी शांत आणि संयमी वृत्ती जोपासायला हवी.हा स्वभाव जर विकसित केला आणि जोपासला तर आपले मन आणि विचार सकारात्मक दृष्टिकोनाच्या मार्गाने मार्गक्रमण करत आहेत असे समजावे. अशामुळे स्वत:चे आणि इतरांचेही कल्याण होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कामापुरता मामा* - गरजेपुरते गोड बोलणारा ; मतलबी माणूस. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *घामाचा पैसा* धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्या दिवशी आईकडून घेतला तिसर्या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.' स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment