✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/02/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले. २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी. २००४ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार. 💥 जन्म :- १८८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार. १९०४ - बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी १९१० - जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता. १९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९५ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार २००३ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर - मायकेल पी. अँडरसन, डेव्हिड ब्राउन, कल्पना चावला, लॉरेल क्लार्क, रिक डी. हसबंड, विली मॅककूल, इलान रमोन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- उपनगरीय रेल्वे-मेट्रोच्या डब्यांची लातूरमध्ये निर्मिती, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची माहिती* ----------------------------------------------------- 2⃣ *बिहार - पाटणा येथील फतुहा येथे गंगा नदीत बोट उलटून 5 जणांचा मृत्यू, 15 जण करत होते प्रवास, कुटुंबियांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा बिहार सरकारने घेतला निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *वॉशिंग्टन : ज्यांच्याकडे चांगलं शिक्षण आणि ज्यांची चांगली वर्तणूक आहे, अशांना 12 वर्ष अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिपादन* ----------------------------------------------------- 4⃣ *उत्तर भारतात भूकंपाचा धक्का, दिल्ली-एनसीआर, जम्मू-श्रीनगरमध्ये जाणवले भूकंपाचे हादरे.* ----------------------------------------------------- 5⃣ *कोल्हापूर - आंबाबाई मंदिराचा 80 कोटींचा विकास आराखडा मंजूर* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी लाँच केला 'खेलो इंडिया' स्कूल गेम्स कार्यक्रम* ----------------------------------------------------- 7⃣ *पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीझ राजाने भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचे केले कौतुक.* ----------------------------------------------------- विशेष बातमी :- *आज केंद्रीय अर्थसंकल्प होणार सादर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *नासा येवतीकर* या blog ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://goo.gl/A2cY7L आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कल्पना चावला (मार्च १७ इ.स. १९६२:कर्नाल, हरयाणा -- फेब्रुवारी १ इ.स. २००३:टेक्सासवर अंतराळात) ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. कल्पना चावला यांचा जन्म १ जुलै 1962 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीप ला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेरच्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्यपण एक रांगोळीच आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?* वाघ *2) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?* मोर *3) भारताचा राष्ट्रीय फुल कोणते ?* कमळ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विठ्ठल चिंचोलकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 शिवानंद सूर्यवंशी 👤 शेख एम. बी. केंद्रप्रमुख, नांदेड 👤 कवी गजेंद्र ढवळापुरीकर, औरंगाबाद 👤 सादिक शेख 👤 अतुल भुसारे 👤 शिवम पडोळे 👤 शिवराज रंगावार 👤 राजेश हाक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छ* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *कर्म* दोष देतात लोक नेहमी फक्त धर्माला पण दोष असतो तो आपल्या वाईट कर्माला वाईट कर्माचा परिणाम कधीही वाईट असतो चांगले काम करत रहा परिणाम राईट असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपल्या लहानपणचं गावं लहान होतं. शंभर-दोनशे उंब-यांचं.. तिथं मरीआईचं आणि मारूतीचं अशी दोन मंदिरं होती. गावात बहुतेक शेतकरी, कामकरी, कष्टकरी. गावात कधी वासूदेव यायचा; पोतराज, बहुरूपी, गारूडी, नंदीबैलवाला, जोगतिणी यायच्या; जादूगार, अस्वलं-माकडं घेऊन येणारे, कसरतपटू येत. शिवाय डोंबारी..डोक्यावर लाल फेटा, पांढरा मळकट शर्ट, खाली धोतर, जुन्या फाटक्या चपला आणि गळ्यात ढोल अडकवून तो वाजवणारा कर्ता पुरूष, त्याची बायको आणि मुलांचा गोतावळा. नवरा-बायको सफाईने गुणिले(×) आकाराचे दोन दोन खांब मातीत घट्ट पुरायचे आणि त्यांना जोडणारा दणकट दोरखंड.* *मग त्याची मुलगी हातात पाच-सहा फूट लांब काठी घेऊन दोरखंडावर एका टोकाला उभी रहायची. खाली तिचा ढोलकर बाप, आई लोकगीत म्हणत असे आणि लहान भावंडं मातीत खेळत असत. डोंबा-याच्या वाद्यातून येणारा आवाज आसमंत भारून टाकायचा. त्याच्या दिशेने मग गावातील आबालवृद्ध गोळा व्हायचे. मग ती दोरखंडावर उभी असलेली मुलगी हातांतली काठी आडवी करीत, आपला तोल सांभाळत, खांबाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जायची. ती दोराच्या मध्ये जेव्हा यायची तेव्हा तिचा तोल जाऊन ती खाली पडणार की काय असे वाटायचे. प्रेक्षकांची ह्रदयं त्या दृश्यानं क्षणभर थांबल्याचा भास व्हायचा. पण दोरावरची मुलगी वाकबगार. तिचा बाप मग प्रेक्षकांतून तबक फिरवायचा.* *"जसं ती मुलगी काठीच्या आधाराने तोल सांभाळते, संसारात आपण स्वत:ला असं सांभाळत गेलो की आयुष्याचं सार्थक झालं असं समजलं जातं."* ••●🌷‼ *रामकृष्णहरी* ‼🌷●•• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्ही केलेला एक चांगला विचार तुम्हाला तर आनंद देतोच आणि त्या तुमच्या आनंदाबरोबरच इतरांनाही तुमच्या चांगल्या विचारांमुळे आनंद आणि प्रेरणा मिळते.म्हणजे तुम्ही केवळ तुमच्या आनंदी जीवनाचा विचार करत नाही तर इतरांच्याही आनंदी जीवनाचा विचार करत आहात हे लक्षात असू द्या. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही* - मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= घोडा आणि नदी एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल". मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत." उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या.... 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment