*महाराष्ट्र दिनानिमीत्त काव्य*
महाराष्ट्र आहे माझा
पराक्रमाची खाण
त्यातच आहे जीव माझा
तोच माझा अभिमान ..
वार झेलले कित्येकांनी
आपल्या छातीवरती...
असेच वीर जन्मले या
महाराष्ट्राच्या भुमीवरती..
महाराष्ट्र आहे माझी शान
साधूसंताची भूमी महान
अभिमानाने गातो आम्ही
शिवरायांचे गुणगाण....
पुण्यभूमीत महाराष्ट्राचा
कृष्णा कोयना गोदावरी
संगम आहे नद्यांचा...
गंगा ,जमूना कावेरी..
सह्याद्रीच्या कडेकपारीत
घुमतो पराक्रमाचा आवाज
शिवरायांचे मावळे आम्ही
महाराष्ट्राचा ताज...
〰〰〰〰〰〰
✍प्रमिलाताई सेनकुडे
हदगाव (जिल्हा नांदेड)
No comments:
Post a Comment