*🌺उपक्रम🌺* (दि.०१ - ०१- २०२१) *✍ एका शब्दाचे अनेक अर्थ.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) अक्षर - पूर्ण उच्चाराचा वर्ण, अविनाशी* *२) आस - इच्छा, गाडीच्या चाकांचा कणा* *३) अरी - शत्रू , चांभाराचे शिवण्याचे साधन* *४) अभंग - न फुटलेला , काव्यरचनेचा एक प्रकार* *५) अढी - आंबे पिकायला घालणे , पायावर पाय टाकून बसणे* *६) कर्क - एक असाध्य रोग, खेकडा, एक रास* *७) कोट - किल्ला , सैन्याचा व्यूह , अंगरख्याचा प्रकार , संख्या* *८) कर - हात , किरण , सरकारी सारा* *९) खल - दुष्ट , कुटण्याचे साधन , चर्चा* *१०) दर्प - वास , गर्व* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि.प.प्रा. शाळा गोजेगाव. ता.हदगाव जि.नांदेड.
*🌺उपक्रम🌺* *✍काही महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ.* http://www.pramilasenkude.blogspot.com *तारू - जहाज ,गलबत* *तेधवा - तेव्हा* *दुर्धर - कठीण* *नवनीत - लोणी* *बेअदबी - अपमान* *राजघाट - कारकीर्द* *शिरस्ता - प्रघात* *शर - बाण* *सांकव - पूल* *संपादन - मिळवणे* *स्तब्ध - न हालता ,न बोलता स्थिर* *सत्वर - लवकर* *सोपा - घराची ओसरी* *क्षीण - अशक्त* *क्षीर - दूध* *क्षुधा - भूक* *क्षेम - कल्याण* *क्षोभ - क्रोध, राग* *ज्ञाता- जाणणारा* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड. जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.
*🌺उपक्रम🌺* *✍काही महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ.* http://www.pramilasenkude.blogspot.com *भ्रमर - भुंगा* *भ्रूतट - भुवई* *मलूल - निस्तेज* *मनसुबा - बेत , विचार* *मिष - निमित्त* *मंथन - घुसळणे* *रव - आवाज* *रिपू - शत्रू* *राई - दाट झाडी* *लकेर - धून, गाण्यातील तान* *लवलेश - थोडेसुद्धा* *लेणे - दागिना, अलंकार* *लटके - खोटे खोटे* *वसन - वस्त्र* *विकल्प - शंका* *विहंग - पक्षी* *विस्मय - आश्चर्य* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.
फुलोरा - काव्यरचना उपक्रम दि. २८/१२/२०२० *सोबत* सोबत एकमेकांची असावी सोबत तुझी असावी सोबत माझी असावी सोबत तुझी नी माझी असावी सोबत असताना सारं काही सोबत सुखदुःख वाटून घ्यावं सोबत नसतानाही मग, समजुनी सोबत सुखदुःख जाणून घ्याव सोबत आपली जीवनाची सोबत आपली प्रेमाची सोबत आपली आयुष्याची सोबत आपली मायेची सोबत राहून आपण सोबत जगून घेऊ छान सोबत अशी ही आपली सोबत आपण ठेवू छान सोबत असताना मग सोबत आले काटे वाटे जरी सोबत रुततील कितीतरी सोबत असताना न वाटे तरी सोबत असताना दुःखाची सोबत नसताना मनीची सोबत घेऊन वेदना तुझ्या सोबत असताना त्या सुखाची सोबत तुझी असताना मला सोबत आठवणीतील मन सोबत तुझी असावी अशीच सोबत राहून हूरहूररती मन सोबत राहून तुझे मी सोबत ठेवून तुझे मी सोबत मनी स्वप्न माझे सोबत घेऊन वसे मी सोबत तुझी सख्या गड्या सोबत तुझी असावी कायमची सोबत तुझी नवखी न वाटावी सोबत तुझी वाटावी कायमची सोबत राहून एकमेकांच्या सोबत अडचणी समजून घेऊ सोबत राहून काढून मार्ग सोबत अशीच उमजून घेऊ सोबत घेऊन हातात हात सोबत चालू जीवनात सोबत देऊ आपण साथ सोबत राहू आयुष्यात सोबत राहून मग आपण सोबत राहण्याचे देऊ वचन सोबत आनंदाने राहू आपण सोबत वचनाचे करू पालन 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि नांदेड.
*🌺उपक्रम🌺* *✍काही महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ.* http://www.pramilasenkude.blogspot.com *उन्माद - कैफ ,धुंदी* *ओशाळणे - लाजणे* *अंतरिक्ष - अवकाश* *कलिका - कळी* *कासार - तलाव* *कंटक - काटा* *क्रौर्य - निर्दयता ,क्रूरता* *ख्याती- प्रसिद्धी* *गराडा - वेढा* *गवसणी - आच्छादन* *गोप - गवळी* *गोपनारी - गवळण* *घबाड - खूप द्रव्य* *घर्म - घाम* *जरा - म्हातारपण* *जुजबी - कामचलाऊ* *जू - जोखड* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.
*उपक्रम - काही महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ* http://www.pramilasenkude.blogspot.com *अहर्निश - रात्रंदिवस* *अन्योन्य - एकमेकांस* *अवघी - सगळी ,संपूर्ण* *अवशेष -उरलेले भाग* *अभिवादन - नमस्कार* *अधीर - उत्सुक* *अंगुली - बोट* *अणकुचीदार - टोकदार* *अविरत - सतत* *आगळ -अडसर* *आर्जव - विनंती* *आलाप - सूर* *आपत्ती - संकट* *आगळे - निराळे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जि.नांदेड.
*🌹जीवन विचार🌹* 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰 मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या श्रद्धा , भावना ह्या जीवनाचा आधार आहे.जीवनात श्रद्धेला अतिशय महत्त्व आहे.एखाद्या व्यक्तीवर किंवा तत्वावर जेव्हा आपला विश्वास असतो, तेव्हा त्याला विश्वासाची श्रद्धा संबोधली जाते. आपले जीवन जगत असताना आपल्या जीवनाला दातृत्वाचं अंग असाव, सेवेचं भान ,ज्ञानाच ककंण, सामर्थ्याचा कवच, त्यागाच बळ, सौजन्याच अधिष्ठान आणि *सत्याचा आधार असावा.* आपल्या जीवनातला *मी*पण जेव्हा नाहीसा होईल, आपला अहंकार जेव्हा नष्ट होईल, आपल्यातील लोभ आणि मोहाचा डोंगर कोसळून पडेल, अज्ञानाचा अंधार निघून जाईल तेव्हा आपले जीवन खरे सार्थकी लागले म्हणावे लागेल. मनुष्याच्या श्रद्धेला पुराव्याची गरज नाही.चांगल्या कर्माची, भलेपणाची , मांगल्याची विश्वास ठेवण्याची वृत्ती त्याने जोपासली पाहिजे.नव्हे ती वृत्ती त्याच्याकडे असतेच परंतु त्याची जोपासना करणे गरजेचे आहे. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *〰〰〰〰〰〰〰* *✍शब्दांकन/ संकलन* प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड .
1) मानवी शरीराचे तापमान साधारणता किती सेंटीग्रेड असते? 1) 37 अंश ✅ 2) 36 अंश 3) 35 अंश 4) 38 अंश 2) मानवी शरीरात लहान आतड्याची लांबी किती मीटर असते? 1) 5 ते 7 2) 6 ते 8✅ 3) 7 ते 9 4) 8 ते10 3) शरीराचे संतुलन मेंदूच्या कोणत्या भागामुळे होते? 1) प्रमस्तिष्क 2) मस्तिष्कस्तंभ 3) पश्चमस्तिष्क 4) अनुमस्तिष्क✅ 4) कांदे कापताना कोणता वायू बाहेर पडतो? 1) अमोनिया✅ 2) पोटॕशिअम 3) फाॕस्फरस 4) सल्फरडायऑक्साईड 5) कोणत्या इंद्रियात पित्ताची निर्मिती होते? 1) स्वादुपिंड 2) यकृत✅ 3)जठर 4)लहान आतडे 6) कोणत्या जीवनसत्वा अभावी रातांधळेपणा येतो? 1) ड 2) क 3) अ ✅ 4) ब 7) गव्हात कोणते प्रथिन असते? 1) लॕक्टोज 2) ग्लुकोटेनिन ✅ 3) लायसिन 4) हिस्टीडीन 8) खालीलपैकी कोणत्या पदार्थात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते? 1) मासे 2) फळ व भाज्या 3) दूध 4) अंडी✅ 9) सकाळच्या सूर्यकिरणांमुळे त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? 1) अ 2) ई 3) क 4) ड ✅ 10) मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्रे आहेत? 1) 46 ✅ 2 ) 23 3) 33 4) 12 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सहशिक्षिका)
*✍उपक्रम - सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे*📚 〰️〰️〰️〰️〰️〰️ 1) भीमा नदी कोणत्या पर्वतात उगम पावते? उत्तर - सह्याद्री 2) ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी'कोठे लिहिली? उत्तर - नेवासे 3) महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी ? उत्तर - कोयना 4) महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाच्या खाणी एकवटलेल्या आहेत? उत्तर - वर्धा नदी 5) काजूच्या उत्पादनात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? उत्तर - सिंधुदुर्ग 6) चलनी नोटाचा कारखाना कोठे आहे? उत्तर - नाशिक 7) महाराष्ट्रात एकूण लोहमार्ग किती? उत्तर - आठ 8) महाराष्ट्रात निलगिरी वृक्षापासून कागद कोठे बनविला जातो? उत्तर - इगतपुरी 9) 'वसईचा भुईकोट' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर - ठाणे 10) महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोठे आहे? उत्तर- कोल्हापूर. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍संकलन श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि प प्रा शा गोजेगाव ता हदगाव जि नांदेड.
*✍उपक्रम - सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे*📚 〰️〰️〰️〰️〰️〰️ 1) भीमा नदी कोणत्या पर्वतात उगम पावते? उत्तर - सह्याद्री 2) ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी'कोठे लिहिली? उत्तर - नेवासे 3) महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी ? उत्तर - कोयना 4) महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाच्या खाणी एकवटलेल्या आहेत? उत्तर - वर्धा नदी http://www.pramilasenkude.blogspot.com 5) काजूच्या उत्पादनात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? उत्तर - सिंधुदुर्ग 6) चलनी नोटाचा कारखाना कोठे आहे? उत्तर - नाशिक 7) महाराष्ट्रात एकूण लोहमार्ग किती? उत्तर - आठ 8) महाराष्ट्रात निलगिरी वृक्षापासून कागद कोठे बनविला जातो? उत्तर - इगतपुरी 9) 'वसईचा भुईकोट' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर - ठाणे 10) महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोठे आहे? उत्तर- कोल्हापूर. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍संकलन श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि प प्रा शा गोजेगाव ता हदगाव जि नांदेड.
*उपक्रम - काही महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ* http://www.pramilasenkude.blogspot.com *अहर्निश - रात्रंदिवस* *अन्योन्य - एकमेकांस* *अवघी - सगळी ,संपूर्ण* *अवशेष -उरलेले भाग* *अभिवादन - नमस्कार* *अधीर - उत्सुक* *अंगुली - बोट* *अणकुचीदार - टोकदार* *अविरत - सतत* *आगळ -अडसर* *आर्जव - विनंती* *आलाप - सूर* *आपत्ती - संकट* *आगळे - निराळे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जि.नांदेड.
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* *इयत्ता - पहिली /दुसरी* दिनांक २३आॕगस्ट 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - समजून घेऊन वाचूया, लिहूया.* *परिच्छेद क्रमांक - ३ वाचून प्रश्नांची उत्तरे लिहूया,वाचूया.* *एका तळ्यात दोन बेडूक होते. एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली. वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला! दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले.* *प्रश्न १) तळ्यात किती बेडूक होते?* *उत्तर* *प्रश्न २)*बेडकांना पाण्यात काय दिसले?* *उत्तर -* *प्रश्न ३) वेलीचा छानदार काय तयार झाला?* *उत्तर -* *प्रश्न ४) बेडकांनी खांबांना काय बांधली?* *उत्तर* *प्रश्न ५) झोके कोण घेऊ लागली?* *उत्तर* *-------------------------* *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*गणपती बाप्पा मोरया* बाप्पाचा आगमनाने आनंद सर्वत्र हो झाला गणपती बाप्पा मोरया जयघोष निनादू लागला तुमच्या स्वागताची मी तयारी केली आहे भारी तुमच्या येण्याने बाप्पा शोभा आली माझ्या घरी मुषकावर स्वार होऊन आले बाप्पा तुम्ही घरी तुमच्या आवडीचा केला नैवेद्य मोदक लाडू भारी मनोभावे पुजते बाप्पा मी तुमची सजलेली मुर्ती तुमच्यामुळे मिळते आम्हा जगण्यासाठीची स्फूर्ती श्रीगणेशा करून कोणत्याही कामाची होते सुरूवात भक्तास तारुणी तुम्ही संकटावरही करता मात 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिला सेनकुडे ता.हदगाव.
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* *इयत्ता - पहिली /दुसरी* दिनांक २१ आॕगस्ट 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - समजून घेऊन वाचूया, लिहूया. (नमुना- परिच्छेद क्रमांक -१)* *पाऊस म्हणाला, " मी आधी होतो पाणी. नदी समुद्रात खेळत होतो. उन्हाळा आला आणि कडक ऊन पडले. मला चटके बसले. मी हलका झालो. वाफ होऊन आपोआप वरवर जाऊ लागलो! अगदी धुरासारखा ! "* *प्रश्न - १) नदी- समुद्रात कोण खेळत होते?* *उत्तर - नदी - समुद्रात पाणी खेळत होते.* *प्रश्न २) कडक ऊन केव्हा पडले?* *उत्तर - कडक ऊन उन्हाळा आला तेव्हा पडले.* *प्रश्न ३) वाफ कशासारखी दिसते?* *उत्तर - वाफ धुरासारखी दिसते.* ☘☘☘☘☘☘☘ *(परिच्छेद क्रमांक - २ वाचून प्रश्नांची उत्तरे लिहूया.)* *आबा घराभोवतीच्या बागेत काम करत होते. बागेत तुळस, दुर्वा ,सब्जा ,* *गवतीचहा, आले, अडुळसा होते, तर दारात बेलाचे मोठे झाड होते. फुलझाडांपेक्षा उपयोगी अशा झाडांचीच गर्दी झाली होती.* *प्रश्न १) आबा कोठे काम करत होते?* *उत्तर-----------------------* *प्रश्न २)बागेत काय होते?* *उत्तर ----------------------* *प्रश्न ३) बेलाचे झाड कोठे होते?* *उत्तर ---------------------* ☘☘☘☘☘☘☘ *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* *इयत्ता - पहिली /दुसरी* दिनांक २० आॕगस्ट 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - वाक्ये लिहूया,वाक्ये वाचूया.✍* *१)सीमा नियमित अभ्यास करते.* *२)माधव नियमित व्यायाम करतो.* *३)अमित नियमित अभ्यास करतो.* *४)नजमा नियमित अभ्यास करते.* *५)मुले नियमित व्यायाम करतात.* *६) मुली नियमित व्यायाम करतात.* *७)मुले नियमित अभ्यास करतात.* *८) मुली नियमित अभ्यास करतात.* *-------------------------* *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय -मराठी* *इयत्ता - पहिली /दुसरी* दिनांक १९ आॕगस्ट 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - वाक्ये बनवूया,वाक्ये वाचूया, वाक्ये लिहूया.* *स्वाध्यायकार्ड* *---------------------------* *सुरेश* *उठतो* *सकाळी* *मधु* *जेवतो* *लवकर* *लता* *उठते* *नजमा* *जेवते* ---------------------------------- *१)सुरेश सकाळी लवकर उठतो.* *२)मधु सकाळी लवकर उठते.* *३)लता सकाळी लवकर उठते.* *४)नजमा सकाळी लवकर उठते.* *५)सुरेश सकाळी लवकर जेवतो.* *६)मधु सकाळी लवकर जेवते.* *७)लता सकाळी लवकर जेवते.* *८)नजमा सकाळी लवकर जेवते.* *-------------------------* *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*सण पोळ्याचा* श्रावण महिन्याच्या सरत्या शेवटी पिठोरी अमावस्येला, सण पोळ्याचा हो आला चला सजवूया बैलाला.... जगाचा पोशिंदा शेतकरी त्यास सर्जा राजाची साथ, साथ देतो तो आयुष्याला, खरा जन्माचा हा साथीदार काळ्या मातीतून उगवतो माणिक मोत्याच रे दान भरवितो तू सगळ्यांचे पोट तुझ्याचमुळे मिळते जीवनदान कवड्या, घुंगराची माळ कसे शोभे तुझ्या गळा डोकी गोंडे झुंबर बांधून सजवू रंगवु या बाशिंग अंगावर शोभे छानदार झुली, हलवीत डौलाने मान, सर्जा राजाची जोडी मिरवणुका निघती सगळीकडी बैल सजविलेले येता दारी घरची लक्ष्मी पूजा करी खाऊ घाली पुरणपोळी आनंदाने आरती ओवाळी शेतकरीराजा होई मग भावुक तुझे उपकार कधी फिटे ना आयुष्यात,तुझ्यामुळे मिळे आम्हा दोन वेळ पोटभर घास 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे* *ता.हदगाव जिल्हा नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* दिनांक १८आॕगस्ट 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - आता मी लिहिणार✍, आता मी वाचणार.📚* *पोळा* *भारत माझा देश आहे.* *माझा भारत देश कृषिप्रधान देश आहे.* *आज आपण पोळा ह्या सणाविषयी थोडक्यात माहिती लिहूया. वाचूया.* *पोळा हा बैलांचा सण आहे.* *दरवर्षी श्रावण महिन्याच्या सरते शेवटी पिठोरी अमावस्येला पोळा हा सण येतो.* *या दिवशी बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढतात.* *बैलाच्या गळ्यात कवड्या व घुंगरू माळांची माळ,अंगावर झुली घालतात.* *पोळा या दिवशी बैलांची पूजा करतात.* *बैलांना खायला पुरणपोळी देतात.* *पोळ्याचा सण बैलांच्या विश्रांतीचा सण असतो.* *ज्यांच्या घरी बैल नाही ते आपल्या घरी मातीची बैल आणून पूजा करतात.* *ग्रामीण भागात पोळा हा सण अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरा करतात.* *पोळ्याच्या दिवशी घरोघरी दरवाज्याला आंब्याच्या पानाची तोरणे बांधतात.* *हा सण शेतकरी मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*प्रायश्चित्त* चुका होतात प्रत्येकाकडूनच माफ करण्यास मन मोठ लागते प्रायश्चित्ताने मिटून जाते सारं फक्त योग्य वेळ यावी लागते माणूस असतो चुकीचाच पुतळा जो काम करतो तोच चुकतो बिनकामी माणसास नसते काही चुकातूनच माणूस घडत राही चुकांवर पांघरून टाकू नये धैर्य द्यावे चुका मान्य करायचे प्रायश्चित करावे मग त्याचे मनास समाधान मिळेल त्याचे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
*गुरुमाऊली ️चित्र चारोळीकट्टा स्पर्धेसाठी* 1) *आगमनाने पावसाच्या* *तनमन माझे हरपले* *बेभान झाले मी आज* *धुंदीत तुझा रे नहाले* 2) *अलगद आभाळातून* *येती पावसाच्या सरी* *छत्रीसह चिंब भिजते मी* *मन नाचे तव मनमयुरी* 3) *घन बरसती पाऊस धारा* *छत्रीसवे नाचे मनमयुरा* *साद देई माझ्या रे मना* *अंगी झोंबे रे गार वारा* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे* *ता. हदगाव, जी.नांदेड*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* दिनांक १७ आॕगस्ट 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *व्यवस्थितपणा* *व्यवस्थितपणा म्हणजेच सुंदरता.* *कोणतेही काम वेळच्या वेळेस करणे, कोणतीही वस्तू नीट जागेवर ठेवणे, पैशांचा व्यवस्थित हिशेब ठेवणे, दिलेल्या शब्दाप्रमाणे वागणे, तिकिटे रांगेत नीट उभे राहून घेणे, रांगेमध्ये उभे राहून बसमध्ये शिरणे, घरातील कामे करताना व्यवस्थित नीट काळजीपूर्वक करणे, सकाळी झोपेतून उठल्यानंतर अंथरुणाची घडी नीट घालने, दात घासण्यासाठी घेतलेला ब्रश परत त्याच जागेवर ठेवणे, अंघोळ झाल्यानंतर अंग पुसलेला टॉवेल , (कापड) दोरीवर वाळत टाकने, अभ्यास करण्यासाठी घेतलेले साहित्य व्यवस्थित ठेवणे, जेवण करताना ताटात उष्टे अन्न न सोडणे, व जेवण झाल्यावर ताट उचलून ठेवणे, घर झाडून झाले की केरसुनी, (झाडू) जागेवर ठेवणे, बाहेरून आल्यानंतर पायातील वाहने , चपला जोडीने व्यवस्थित ठेवणे............. अशा कितीतरी शेकडो गोष्टी व्यवस्थितपणात येतात.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन* *प्रमिला सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* दिनांक १६ आॕगस्ट 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - आता मी लिहिणार✍, आता मी वाचणार* *१) पावसाची झिमझिम कमी झाली.* *२) पिंपळाच्या झाडापाशी माझे लहानसे घर आहे.* *३) आजीबाई झोपडीत राहात होती.* *४) झोपडीमागे बोरीचे झाड होते.* *५) बोराच्या झाडाला बोरे खूप लागली होती.* *६) बोरे पाहून आजीला आनंद होई.* *७) झाडाची बोरे पाहून मुले गोळा होत होती.* *८) मुलांची गंमत आजी पाहू लागली.* *८) आजी झोपडीत गुपचुप लपून बसली.* *९) मुलं आजीला शोधत होती.* *१०) आजी मग खो खो हसली.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* दिनांक १४ आॕगस्ट 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (५)*🌺 *शेवटी ' त्र ' असणारे शब्द* *मित्र , मात्र , चित्र , पत्र ,यात्रा , कुत्रा ,जत्रा , रात्र ,चैत्र ,मंत्री ,तंत्र ,खात्री ,चरित्र ,पत्रा , सत्र , गोत्र , तंत्र , सूत्र , नेत्र , विचित्र ,सन्मित्र ,शस्त्र ,पित्र ,पुत्र ,स्तोत्र ,गोमूत्र ,पवित्र , पात्र ,छत्र , शस्त्र, क्षेत्र , ,शास्त्र , भित्रा ,चित्रा, मानपत्र, सन्मानपत्र , सुपुत्र, कुरुक्षेत्र, बालमित्र* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* दिनांक १३ आॕगस्ट 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - शब्द वाचूया, शब्द लिहूया.*✍ *🌺शब्दटोपली क्र. (४)🌺* *तीर्थ ,सर्व ,वर्ण ,गर्व ,वर्णन ,पर्व ,पार्सल ,वर्ग, पार्थ ,वर्ष ,जनार्दन,सूर्य ,दर्या ,दुर्वा ,गर्दी ,तृप्ती ,मनीआर्डर, स्वस्थ ,रेल्वे स्टेशन, प्रश्न ,प्रयत्न ,प्रत्येक, स्वप्न, अर्धा ,पूर्व ,प्रवास ,प्रकार ,प्रकाश, प्रगती, ,प्रसाद ,प्राणी ,प्रेमळ ,प्रयत्न ,सूर्यास्त, प्रणव, प्रल्हाद, प्रेक्षक, प्रमिला, प्रगती, प्रशांती, प्रस्तुत, पर्याय,ऊर्जा,पर्यावरण,पर्यटन, पर्जन्यमान, निसर्ग, विद्यार्थी,प्रजा, प्रदेश, प्रवेश, प्रलय , प्रखर, प्रथम, प्रेरणा* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - गनिमी कावा शत्रूवर मात करण्यासाठी केला गनिमी कावा शिवबांनी विश्वास होता त्यांच्या मनी जिंकायचे शत्रुस नेहमीनेहमी स्वराज्याचे हित जोपासले रयतेसंगे नाते त्यांनी जडले रयतेच्या सुखासाठी त्यांनी जीवनभरआयुष्य आपुले वेचले शिकवण होती आई जिजाऊँची ताकद होती तलवारीची शपथ घेतली स्वराज्य हिताची रयतेच्या सुख आणि शांतीची 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
*कविता - गोकुळातील दहीहंडी* गोकुळात रंगला सोहळा बालकान्हा हा जन्मला नंदलाल यशोदामाईस हो आनंद साऱ्या गोकुळा झाला यशोदा नंदन हा भारी खोड्या करतो घरोघरी वृंदावनी रचतो रासलीला यशोदेचा हा नंदलाला गोकुळाष्टमी बघा आलिया दहीहंडी वरवर चढूया थरावरी थर मिळून लावूया गाणी आनंदाने गाऊया गोपी संगे कान्हा खेळतो रंगात रंगुनी नाचतो गातो सवंगड्यांसह दहीहंडी तो गोकुळात फोडतो सण कृष्ण जन्माष्टमीचा गाणी गातात सुवासिनी कान्हा यशोदा, देवकीचा पाळणा झुलतो यशोदांगणी 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* दिनांक १२ आॕगस्ट 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (२)🌺* *वसंत ,पिंपळ ,पिंगट, चांगला, रंग, संकट ,पसंत ,मुंगी ,चंदन, चांदणी, गंगा, चंदन ,भिंत ,वंदन, मंदिर ,संदेश, पितांबर, तांबडा ,तोंडली, कोंबडा, उंची, थंडी ,चिंट्या ,संक्रांत ,मंत्र चंद्र ,स्वतंत्र ,सोंगट्या, बांगड्या ,संध्याकाळ ,संतुष्ट, केंद्र ,वृंदावन ,हेमंत ,अंगण, संत्री ,पांढरा, मकरंद ,चंदन ,अभिनंदन, रघुनंदन, सुंदर, पंचमी, नंदादीप.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*कविता - आकाश* आकाश एक पोकळी जीला ना सुरुवात ना अंत दृश्य फ़क्त नजरेच्या टप्यात पूर्ण विश्वाला व्यापलेली ढगांनी अच्छादलेलं आभाळ आपण नजरेत सामावू शकतो पण त्या पलीकडचं अस्तीत्व बघायला नेत्र वेगळे पाहिजे आकाशाच घटा घटात सामावन हे काही ठरवून नसतंच मुळी पण प्रत्येक घटाला मात्र वाटते हे आकाश फक्त माझंच आहे क्षितिजा पर्यंत दिसणार आकाश पण कधीही न संपणार क्षितिज पृथ्वीच्याशेवटच्या टोकावरून सुध्दा दूर दूर दिसणार हे क्षितिज आकाशाशी प्रत्येकाच नात असावं स्वतः ला ही आकाशातच पहावं आकाशाला स्वतः मध्ये सामावून घ्यावं आणि आपणही मग आकाशच व्हावं! आकाशच व्हावं! ~~~~~~~~~~~~~ प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* दिनांक ११ आॕगस्ट ---------------------------------- http://www.pramilasenkude.blogspot.com 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *📚उपक्रम - शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (१)*🌺 *पिवळ्या, मोठ्या,पाकळ्या, चकल्या,चिमण्या, आत्या, अभ्यास, टेकड्या, सौख्य ,लाह्या, कल्याण, इवल्याशा, शिष्य, माझ्या, व्यवहार, जोड्या,पोळ्या, कळ्या, चिमुकल्या, गोजिर्या, सावळ्या, पहिल्या ,पाट्या, इतक्यात ,एखाद्या ,चांगल्या, अरण्य, पणत्या, चकत्या,लावण्या ,गोण्या, साड्या , विद्या ,ध्यास, अभ्यासिका, सावल्या, बादल्या, व्यापारी, टोपल्या, मोजक्या,पुढच्या ,शक्य ,भाज्या, राज्य ,तुमच्या,वाद्य.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - आठवणीचे पक्षी एकदा काय बघा गंमत झाली आठवणीचे पक्षी स्वप्नी आली आकाशी पक्षी बोलू लागली ढगाला खाली ये म्हणू लागली ढग येताना मग झाले काय ढगाला लागला विजेचा पाय वीज कडाडली अशी मग पिल बसली आईच्या कुशी आकाशी विहंगनारे दिसती पक्षी अंगावर त्यांच्या असे सुंदर नक्षी विज कडाडता ढगा आले रडू पाऊस जोरात लागला पडू सृष्टी झाली हिरवी हिरवीगार पाऊस पडताच जोरदार तरुवर हिरव्या मोत्याची जाळे पाण्याचे साचे अंगणी तळे झाडावर आले सुंदर पक्षी मुसळधार पावसाचे सर्व साक्षी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - गणित* दिनांक ८ आॕगस्ट 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *संख्याची विस्तारित रुपे लिहा.* *उदा.नमुना वाचन* *३२५ = ३०० + २० +५* *(३२५ म्हणजे ३ शतक २ दशक व ५ एकक)* *५९८ = ५०० + ९०+ ८* *३८ = ३० + ८* *४५ = ४०+ ५* *२८८ = २००+ ८०+ ८* *२७ = २०+ ७* *२०४ = २०० + ० + ४* *९० = ९० + ०* *४४७ = ४०० + ४०+ ७* *६०१ = ६०० + ० + १* *५५५ = ५०० + ५०+ ५* *३९ = ३० + ९* *२११ = २००+ १०+ १* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*कविता - तारेवरची कसरत* आज जमाना खूप बदलला आहे पूर्वी सारखा जीवनातला साधेपणा जवळपास लयास जात आलेला आहे आधुनिक तेच्या नावाखाली खर्च वाढला आहे नौकरी व्यवसाय शेती सर्वच क्षेत्रात स्पर्धा ही अगदी टोकाला जात आहे माणसे सतत मानसिक तणावात राहत आहे जणू जगण्यातला आनंद हरवला आहे आपला शेजारी प्रगती करीत आहे हे पाहवत नाही कुणाला त्याचा मत्सर हेवा दावा ह्यातच जीवन सम्पत आहे खर सुख जणू गायब होताना दिसत आहे महागाईच्या झळा सर्वाना बसत आहे कितीही कमवा ते कमीच पडत आहे म्हणून तुम्ही कुणाला एकांती विचारा तो म्हणेल संसार ही तारेवरची कसरत आहे ~~~~~~~~~~~~~ *✍प्रमिलाताई सेनकुडे
*क्रांती* पोटात भुकेची आग पीळती आतली आतडी पण त्यावर करुनी मात गरजले क्रांती कारक जोरात पावला गणिक पेटते निखारे होऊन धावले त्यावरी ना घरादाराचा केला विचार धावले क्रांतिकारक जोरात पायात लोह दंडाची शृंखला ना कारागृहाची मनी भीती भारत मातेच्या मुक्तीचा ध्यास धडपडती क्रांती कारक जोरात आईला समजावती रडू नकोस तू देशासाठी देऊ आम्ही हे प्राण सरणावरी जरी पेटलो आम्ही त्या ज्वालातून उगवेल पुन्हा *क्रांती* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
*कविता - आमच्यासारखे आम्हीच* ना कुणावरही रुसू ना कुणालाही हसू आमच्यासारखे आम्हीच फक्त असू आणि दिसू ना कुणाशी स्पर्धा करू ना कुणाचा हेवा करू सर्वांशी आम्ही मात्र सौख्य व्यवहार करू ना कुणाच्या भावना दुखवू ना कुणाची अवहेलना करू ना कुणाचा तिरस्कार करू सर्वांवर आम्ही प्रेमच करू 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*कविता - पैसा* पैसा माध्यम जगण्याचं जगण्या साठी साधन घेण्याचं नैतिकतें नी कमावून जीवन आपलं सुखी समृद्ध करण्याचं पण हे सारं माणूस विसरला पैशाचे मागे वेड्या सारख धावत सुटला खूप सारा पैसा जमवू लागला अन यातून वाम मार्गाला लागला अनैतिकता येथे पावन झाली लबाडी चोरी रीश्वत खोरी वाढली राजवाड्या सारखी घरे बांधली पण माणसे मनाने कंगाल झाली माहीत आहे पैसा सोबत येत नाही तरीही माणसाची हाव कमी होत नाही तेंव्हा एक विनवणी दादा ताई माई पैशा पेक्षा माणुसकी ही श्रेष्ठ रे भाई 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
कविता - पैसा पैसा मिळवण्यासाठी माणूस लालची झाला ,भरभरून कमवायला लागला तेव्हा माणूस मात्र माणुसकीच विसरून गेला पैसा मिळवण्यासाठी माणूस काही करण्याची तयारी ठेवतो कारस्थानाचा विळख्यात तो स्वतः पैशाच्या लालसेपायी पूर्णतः फसतो भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा त्याला काही पचत नाही आणि पैसा बोलू लागतो तेव्हा त्याला ही गोष्ट सांगितलेली रुजत नाही अरे कधी समजेल तुला हे मानवा, क्षणभंगुर आहे हे जीवन आपले,सोडून दे आता तरी लालसा नाही येणार रे तुझ्यासोबत वरती हे पैसा मेहनत व कष्टाची कमाई करून तरी बघ माणसा! हव्यास आणि लालचीपणा सोडून तरी बघ, पाप-पुण्याचा हिशेब आहे इथेच, अनुभव तुला येईल इथेच. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - गणित* दिनांक ८ आॕगस्ट 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *संख्याची विस्तारित रुपे लिहा.* *उदा.नमुना वाचन* *३२५ = ३०० + २० +५* *(३२५ म्हणजे ३ शतक २ दशक व ५ एकक)* *५९८ = ५०० + ९०+ ८* *३८ = ३० + ८* *४५ = ४०+ ५* *२८८ = २००+ ८०+ ८* *२७ = २०+ ७* *२०४ = २०० + ० + ४* *९० = ९० + ०* *४४७ = ४०० + ४०+ ७* *६०१ = ६०० + ० + १* *५५५ = ५०० + ५०+ ५* *३९ = ३० + ९* *२११ = २००+ १०+ १* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.* *ता.हदगाव जि.नांदेड.*
गुरुमाऊली चित्र चारोळी स्पर्धेसाठी 1) सण नारळी पुनवेचा चल जोडी न साजरा करू, समिंदराची पूजा आपण सजूनधजून आनंदाने करू 2) चल ग पारू बिगीबिगी मी दर्याचा राजा तू ग राणी ताट पूजेचे हातात घेऊनी पूजा दर्याची करू दोघे मिळुनी 3) सण नारळी पौर्णिमेचा आला कोळी बांधवास आनंद झाला नटूनथटून निघाले बघा जोडीदार दर्यास जाता मनी हर्ष झाला 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे* *ता. हदगाव जि. नांदेड.*
कविता - आसवांचा पूर सुखाची आस कधी ना बाळगली आसवांचा पूर वाहिला तरी ना थांबली वेदनांना मी माझ्या जाणून घेते घाव मनाचे माझ्या सोसून घेते काळजात भाव जेव्हा दाटते तेव्हा नेत्रास समजावून सांगते जगण्याची ओढ कधी न होती विचार मनास कधी न स्पर्शती वेदनांना मीच माझ्या जाणते अबोलत्या मनासही मीच बोलते 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
कविता - समाधान आयुष्यात काही वेळा अडचणी भरपूर येतात पण त्यावर मात करून समाधान मानावे लागते दिवसामागून दिवस सरत असतात, रोज नवं काहीतरी जीवनात शिकवीत असतात आनंद त्यात शोधावे लागतात भविष्याचा विचार करावा लागते, आयुष्याला नवे वळण द्यावे लागते, अडचणी भरपूर असल्या तरी स्वीकारावे लागते जीवनात संकटे येतील जातील संकटांना घाबरायचे नसते संघर्ष करण्याची,संकटांना झेलण्याची हिम्मत ठेवायची असते 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - इंग्रजी* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *Dwellings ( living places) Of birds and animals* *पक्षी व प्राण्यांची निवासस्थाने* *bear - den* *bird - nest* *bee - hive* *dog - kennel* *lion - den* *owl - tree / barn* *sheep - pen* *spider - web* *cow - byre* *horse - stable* *mouse - hole* *pig - sty* *snail - shell* *tiger - lair* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - भाषेची श्रीमंती लिहूनी नित्य नियमाने सकस भाषेची श्रीमंती शब्दात वाढवूया माय मराठीचा अभिजात गोडवा सर्वजण सदा मुखात ठेवूया कथा, कविता साहित्याचा समृद्ध विचारांचा ठेवा वाढवूया माधुर्य,आपलेपणा मराठीचा लिखाणातून आपल्या दाखवूया मराठी भाषा आहे वात्सल्याची खाण, मराठी भाषा आहे आमची शान, मनामनात आहे आम्हा मराठी भाषेचा अभिमान अमृताहुनी गोड आहे मायमराठी शब्दशब्दास स्वतंत्र अर्थ देनारी भाषेची श्रीमंती लाभलेली ही माझी मराठी भाषा मराठी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
कविता - मन माझे........ तुझी आठवण मज येता मन माझे खूप दाटून येते अश्रुंच्या पावसात भिजुनी माझं काळीज भरून येते मनी माझ्या भावगीत फुलते धुक्यातुनी कोकिळा गाणं गाते रात्रीच्या अंतरंगात मन माझे आपसुकच अंतरंगी डोलते नेत्रात पाहुनी भाव आनंदाचे मन माझे कौमुदित नहाते स्वप्नरंग माझ्या मनीचे मग स्वरास्वरात भावचकोर होते रात्रीच्या काळोख्या गर्भात उद्याची पहाट तव उजाडते निशाचर मनी हर्षलेल्या या स्वप्नास मी पूर्णविराम देते 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- दिनांक ६ आॕगस्ट *📚वाचा. वहीत लिहा.*✍ *🌺वाक्प्रचार व अर्थ🌺* *सतीचे वाण घेणे - अतिशय अवघड काम अंगावर घेणे* *सोनेरी अक्षरात नोंदणे - अतिशय मौल्यवान शब्द वापरून नोंदणे* *हातघाईवर येणे - उतावीळ होणे* *शिष्टाई करणे - मध्यस्थी करणे* *शिकस्त करणे - प्रयत्न करणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ🌺* *जन्मा आला हेला पाणी वाहता मेला - आयुष्यात काहीही काम न करणाऱ्याचा जन्म फुकट* *चिंती परी ते येई घरा - दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले की ते आपल्यावरच उलटणे* *हा सूर्य हा जयद्रथ - प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे* *सत्तेपुढे शहाणपण नाही - ज्याच्याजवळ अधिकाराचे बळ आहे तो वाटेल ते करू शकतो* *〰️〰️〰️〰️〰️〰️〰️* *🙏धन्यवाद🙏* *भेटूया आणखी एका नवीन उपक्रमासह.....* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*सोहळा* पाऊस डिजिटल विशेषांकाचा सोहळा हा असा हर्षआनंदाचा सारे मिळून साजरा करूया गौरव मराठीचे शिलेदारांचा पावसाच्या गंध प्रेमाचा असा इंद्रधनुच्या सप्तरंगात स्पर्शावा विशेषांकाचा हर्ष आनंद मनात गंधित करून अनुभवता यावा आसुसलेली असते सृष्टी नक्षत्राच्या पावसासाठी परी सुगंध दरवळतो सारीकडे धरतीवर येता पावसाच्या सरी असा हा आठवणींचा सोहळा पाऊस विशेषांकाच्या रूपाने आ. राहुल सरांच्या मेहनतीने व सर्व ताईं,दादांच्या सहकार्याने 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.* *©️मराठीचे शिलेदार समूह.
कविता - असावे घर असे घर तुझे नी माझे त्यात सुगंध प्रीतीचा असावा ओलावा मायेचा दिसावा आनंद त्यात दरवळावा चंद्रसूर्य सुद्धा लाजेल असा संसार असावा फुलासारखा फुलून मग टवटवीत असा दिसावा जीवनभर संगतीत राहून एक एक पान साठवावे आयुष्याच्या आठवणीचे गुज मनी घेऊन ठेवावे घर तुझेनी माझे असे असावे सुंदर नात्यांची गुंफण जसे संस्काराच्या जडणघडणीत सजवून वसलेले असावे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
कविता - उत्सुकता कोरोनाचा हा आजार जाईल तरी कधी? शाळा उघडून विद्यार्थ्यासोबत राहण्याची उत्सुकता मला लागली आहे ते आनंदाचे दिवस येईल तरी कधी? मुलांसोबत हसून खेळून राहण्याचे दिवस येतील तरी कधी? आणि हा कठीण काळ संपेल तरी कधी? हीच उत्सुकता मला लागली आहे... ऑनलाईन चे शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचत नाही, पूर्वीसारखे दिवस कधी येतील हे काही सांगता येत नाही असा हा कठीण काळ कधी संपतो माहित नाही 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*मोबाईल* आता टपाल नाही तार नाही नाही दुसरे कुठले संदेश वहन निरोप मिळण्या काही दिवस लागायचे आता अगदी क्षणात बटन दाबल्या बरोबर जमाना जलद गतीचा निघाला थोडं थांबायला कुणाला नाही वेळ सुबत्ता समृद्धी वाढली सगळीकडे लाखोंचे व्यवहार होती याची दाबून कळ प्रियकर अन प्रेयसीचा प्रेम विरह याच्या मुळे झाला आहे खूप कमी रात्र न दिवस येते आता बोलता व्हीडीओ कॉल ने वाढली जवळीक फेसबुक, वॉट्सअप्प, ट्यूटर, मॅसेज गुगल, युट्युब, पेटीएम, बँक मनी गॅलरी, शब्द कोष जणू काही अलिबाबाची गुहा ही लहान असो थोर असो पुढारी महिला असो पुरुष असो कुणी कामगार प्रत्येकाच्या हाताची शान बनला आहे अहो तो दुसरा कुणी नसून मोबाईल आहे..... ~~~~~~~~~~~~~ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- दिनांक ४ आॕगस्ट *📚वाचा. वहीत लिहा*✍ *🌺वाक्प्रचार व अर्थ🌺* *योगक्षेम चालविणे - उपजीविका चालविणे* *ललाटरेषा उजळणे - भाग्य उजळणे* *वीरश्री संचारणे - खूप शौर्य येणे* *वर्दळीवर येणे - भांडणास तयार होणे* *वरवंटा फिरविणे - वस्तूचा विध्वंस करणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ🌺* *राईचा पर्वत करणे - मूळ गोष्ट छोटी असून तिचा विपर्यास करून सांगणे* *लंकेत सोन्याच्या विटा - दुसरीकडे असलेल्या चांगल्या गोष्टीचा आपणास उपयोग नसणे* *शेजी देईल काय ?आणि मन धायेल काय? - शेजारणीने एखाद्या पदार्थ सढळ हाताने करून दिला तरी मनाची तृप्ती होऊ शकत नाही* *शेंडी तुटो वा पारंबी तुटो - दृढनिश्चय करणे* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*गुरुमाऊली चिञकाव्य स्पर्धा* *कविता - बंध मैत्रीचे* बंध मैत्रीचे असतात असे पडत्या पाऊसात छञी धरून गप्पा करतात एकमेकांशी आनंदाने दिलखुलास मनभरुन मैत्रीच्या नात्यास नसतो जातीपातीचा कसलाही गंध, तिथे असतो फक्त मायेचा प्रेमाचा ओलाव्याचा सुगंध बंध मैत्रीचे असतात खरे निस्वार्थी आणि प्रेमळ मनातील गुपितं उघड करुन सांगणारे नाते निर्मळ बंध मैत्रीचे बेधुंद असते वादळ वाऱ्यातला झोका नाते असते ते रक्ता पलीकडचे नसतो तिथे कसलाही धोका मैत्री म्हणजे आनंदाचा झरा, आनंदाने गगनास भिडणारा दोन मनास जोडणारा तो असतो सांकव खरा मैत्री म्हणजे जीवास जीव देणारा मायेचा जीवन धागा असले दूर कितीतरी परी काळजात असते त्यांच्या जागा मैत्रीचा बंधनाचे नाते अतुट अंतःकरणातील तो असतो एक कप्पा, जिथं होतात मनमोकळ्या वाटेतही गप्पा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे* *ता.हदगाव जिल्हा नांदेड.*
कविता - राखी भाऊ बहिणीचे नाते असे अतूट बंधन धागे धागे असते हे प्रेमाचे नसते नाते हे स्वार्थाचे पावित्र्याच्या या बंधनास जपूया आपण सर्वजण सण रक्षाबंधनाचा करुया गोडवा वाढवूया मिळून बहिणीची माया असते आईसम ती सांभाळते भावासाठी ती आपला जीव ओवाळून टाकते सासीरवाशीण बहीण वाट पाहते भावाची डोळे येतात भरुन तिचे अशी असते उब मायेची डोळ्यातून वाहती धारा बंधू घेतो मायेने जवळी नात्यातील हा बंध सारा बहिण भावास ओवाळी प्रेम आणि जिव्हाळ्याची राही काळजात साठवण सण राखीचा येता मग येती माहेराची आठवण 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
कविता - हवास तू काळजाचा थांगपत्ता लागत नाही हृदयाचे घाव मला आता सोसत नाही रंगबिरंगी या फुलांचे गंध सांगू कशी? सुगंध तूझ्या प्रीतीचा दाखवू कशी? हवास तू मला, माझा आधार बनून ,काळजाच्या पडणाऱ्या स्वप्न दुनियेत राहून तुझ्या संगतीने मी माझे जीवन गाणे गायीन, स्वप्न मी माझे रंगवत जाईन सांग काय असे गुन्हा त्या काळजाचा घाव सारे सोसुनी जीवन जगण्याचा? 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- दिनांक २ आॕगस्ट *📚वाचा. वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ🌺* *बाळकडू पाजणे - मूलभूत शिक्षण देणे* *बतावणी करणे - सोंग करणे* *भिकेचे डोहाळे लागणे - दरिद्री पणाने वागणे* *मनचे मांडे मनात खाणे - कल्पनेच्या जगात वावरणे* *मनात विकल्प येणे - मन व्दिधा होणेे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ🌺* *बडा घर पोकळ वासा - दिसण्यात श्रीमंत पण प्रत्यक्षात तिचा अभाव* *बावळी मुद्रा देवळी निद्रा - दिसण्यात बावळा पण व्यवहारात चतुर* *भुकेला कोंडा निजेला धोंडा - अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनांन गरज भागविण्यास माणूस राजी होतो* *भिकेची हंडी शिंक्यास चढत नाही - भीक मागून माणूस श्रीमंत होऊ शकत नाही* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* दिनांक ३१ जुलै 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. व वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ🌺* *धर्मावर सोमवार - पदरचे काही एक न घालता पुण्य पदरी पाडून घेणे.* *धारातीर्थी पडणे - शूराचे मरण येणे.* *धरम धक्का बसणे - कार्य सफल न होता व्यर्थ हेलपाटे करावे लागणे.* *धिंडवडे काढणे - फजिती करणे.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ🌺* *न कर्त्याचा वार शनिवार - ज्याला आपले काम करायचे नसेल तर तो सबबी सांगत राहतो.* *नवी विटी नवे राज्य - सगळीच परिस्थिती नवीन असणे.* *पाचामुखी परमेश्वर - सगळे बोलतात ती गोष्ट खरी मानावी.* *पदरी पडले पवित्र झाले - कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली तिला नावे ठेवू नये.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - तपस्या जीवन प्रत्येकाचे नसते सुखी संकट आणि संघर्षाचे असते भोग भोगावे लागतात त्यांच्या खडतर आयुष्यात दुःख असते जरी दुःख आणि कष्ट असले तरी संघर्ष ते मात्र करतात जीवनाची तपस्या असली तरी जीवन आनंदात जगतात आयुष्यात मोठे संकट आले तरी, प्राण पणाला लावून दूर त्याला सारतात, जीवनाच्या कठीण तपस्यात मार्ग काढतात. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* दिनांक ३० जुलै 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. व वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ🌺* *टक्के टोणपे खाणे - चांगल्या-वाईट अनुभवाने शहाणे होणे* *टिवल्या बावल्या करणे - कसातरी वेळ घालविणे.* *टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे* *ठगबाजी करणे - फसविणे* *ठाण मांडून बसणे - निश्चय करणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ🌺* *तेरड्याचा रंग तीन दिवस - गोष्टीचा ताजेपणा वा नवेपणा अगदी कमी वेळ टिकणे* *थोरा घराचे श्वान त्याला सर्व देती मान - मोठ्या माणसाचा आश्रय हा प्रभावी ठरतो* *दे माय धरणी ठाय - पुरेपुरे होणे.* *दुधाने तोंड भाजले की ताक पण फुंकून प्यावे लागते - एखाद्या बाबतीत अद्दल घडली की माणूस प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगतो* *दैव देते आणि कर्म नेते - दैवामुळे आपला उत्कर्ष होतो, पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------दिनांक २९ जुलै *वाचा. वहीत लिहा.* *वाक्प्रचार व अर्थ* *झुरनीला लागणे - शरीराच्या किंवा मनाच्या व्यथेने झिजणे* *झळ लागणे -परिणाम भोगावा लागणे* *झोपेत असणे - काहीही कल्पना नसणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ🌺* *टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येतं नाही - श्रम केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही* *डोळ्यात केर आणि कानात फुंकर - रोग एक आणि उपाय निराळाच* *ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागला - वाईट माणसाच्या संगतीने चांगला मनुष्यही बिघडतो* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.* *ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - सुखाची सावली किती कष्टात जीवन त्यांनी काढले किती श्रमाचे भार त्यांनी सोसले उन्हातान्हाची त्यांनी नाही केली परवा जीवनास त्यांनी दिला आमच्या गारवा आई -वडील माझे सुखाची सावली तेच माझे पंढरीची विठू माऊली आयुष्याचा सार आई -वडील माझे सुखदुःखाचा आधार तेच माझे आई-वडील माझे वात्सल्याचा झरा तप्त उन्हातील माझ्या मंद गार वारा आई -वडील माझे सुखाची सावली तेच माझे पंढरीची विठूमाऊली क्षणोक्षणी येती प्रेमाचीआठवण भाव काळजातले तव फुलविती अंतरंगातील दुःखास मग होती स्पर्शुनी जाती मायेची साठवण आई वडील माझे सुखाची सावली तेच माझे पंढरीची विठूमाउली रानावनात स्वतः जाऊनी मग धडे शिक्षणाचे दिले आम्हास दुःख सोसुनी स्वतः माञ सुखाची सावली दिली आम्हास आई-वडील माझे सुखाची सावली तेच माझे पंढरीची विठू माऊली 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
गुरुमाऊली चित्र चारोळी कट्टा स्पर्धेसाठी 1) स्नेहाने तुझ्या नेत्रात पाहतांना कधी हरवले कळलेच नाही तुझ्या बासुरीच्या सुराने मग प्रेमधुंद मी झाले कळलेच नाही 2) डोळ्यात पाहिले,कौमुदित नाहले तुझ्या भावस्पर्शाने तृप्त कर कृष्णा स्वप्नरंग मनीचे स्वरा स्वरात पाहले अंतरंगातील वलयास तृप्त कर तृष्णा 3) प्रीतीचे बोल तुझे अबोल राधे ऐकू येतात काळजात मला शब्द तुझ्या त्या ओठातले सूर बासरीचे सांगतात मला 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे* *ता. हदगाव जि. नांदेड.*
कविता - सावर रे घन निळ्या निळ्या आकाशात पावसाचे थेंब थेंब बरसती तव सावर रे माझ्या मना ओथंबूनी मन माझे जाती बळीराजाचा आहे तुझ्यावर विश्वास, तूच आहेस त्याचा जगण्याचा श्वास आणि ध्यास तुझ्या आगमनाचे करतो स्वागत रूप तुझे किती रे पावसा कधी अंतःकरण सुखावते तर कधी पुरात कुणाचे मग आयुष्य सारे संपते थैमान घालती पावसाचे पाणी आभाळ गर्जूनी भयभीत करती तुफान वादळ वारा सुटून मग प्राणीजीवन विस्कळीत करती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* दि.२७ जुलै ---------------------------------- http://www.pramilasenkude.blogspot.com 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *वाचा. वहीत लिहा.* *वाक्प्रचार व अर्थ - (च)* *चकार शब्द न काढणे - काहीही न बोलणे* *चतुर्भुज करणे - अटक करणे* *चंग बांधणे - निश्चय करणे* *चौपदरी घेणे - हाती झोळी घेण्याचा प्रसंग येणे* *चांदी उडणे - नाश होणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *म्हणी व अर्थ - (च)* *चोराची पावले चोरालाच ठाऊक - वाईट माणसांनाच वाईट माणसाची लक्षणे कळतात.* *चढेल तो पडेल - गर्विष्ट माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही* *चालत्या गाडीला खीळ - व्यवस्थित चालणाऱ्या कामात अडचण निर्माण करणे* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - श्रावणसरी येती श्रावणसरी श्रावणसरी ऊन-पावसाचा खेळ खेळती प्रतिबिंब दिसे इंद्रधनुचे नभात सप्तरंगी कमान घेऊन संगती येती श्रावणसरी श्रावणसरी ओलीचिंब होई रानमाती नदी-नाले,तळे तुडुंब भरती गीत समृद्धीचं मग गाती येती श्रावणसरी श्रावणसरी सासुरवाशीण वाट पाहती झोके बांधू झाडावरती नागोबाच गाणं गाती येती श्रावणसरी श्रावणसरी मन नाचे माझे मोरा परी बहिण भावास बांधूनी राखी रक्षाबंधनाचा सण साजरा करी येती श्रावणसरी श्रावणसरी हर्ष तनमनी माझ्या दाटती ओल्या काळजात धून वाजती सौदामिनी बिन वाजवती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
कविता - सौदामिनी पृथ्वीच्या अंतरंगात खोलवर उकळणारा लाव्हा आहे उष्णतेची लाट पोटात घेऊन उफाळणारा प्रलयकार आहे संकटे जशीजशी अग्रेसर होतात अनेक संकटं निर्माण होतात सौदामिनी बनून लढत राहतात त्याच्यांशी दोन हात करावे लागतात धोका नाहीसा व्हावा म्हणून लढत जात असतो आम्ही त्याला संपविण्याच्या नादात पर्यावरणाचे रक्षण करत नाही आम्ही जपूया पर्यावरणास, लावून झाडे भूगर्भातील उष्णता होईल कमी प्राणीजीवन सर्व सुरक्षित होईल प्रदूषणमुक्त होण्याची मिळेल हमी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *वाचा. वहीत लिहा.* दि.२५ जुलै *वाक्प्रचार व अर्थ - (घ)* *घडा भरणे -,शेवटचा परिणाम भोगण्याची वेळ येणे* *घरावर तुळशीपत्र ठेवणे - घरादाराची अशा सोडणे* *घर-घर होणे --एकच विचार परत परत येणे* *घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे* *घोडे पुढे ढकलणे - स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे* *म्हणी व अर्थ - (घ)* *घोडा मैदान जवळ आहे - कसोटीची वेळ जवळच आहे.* *घर फिरले म्हणजे घराचे वासे फिरतात - वाईट दिवस एकदा आले की मग आपले म्हणणारे लोक सुद्धा मदत करीत नाहीत* *घटका पाणी पिते , घड्याळ टोले खाते - वेगवेगळ्या माणसांना* *आपल्या कर्मानुसार सुख दुःख भोगावे लागते* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
गुरुमाऊली चित्र चारोळी स्पर्धा 1) सुख दुःखाच्या वाटेवर एकमेकांची साथ देऊ आयुष्यातील संकटांना दोघे मिळून तोंड देऊ 2) साथ तुझी मला मिळावी जीवन सुखाचे आपण जगावे माझी साथ तुला मिळावी हेच मागणे आपले असावे 3) जीवनातील सुखदुःखात तुझीच साथ हवी मला त्यावर मात करण्यासाठी तुझीच प्रीत हवी मला 4) घाम गाळून, कष्ट करून जीवन आपण जगु आयुष्यातील अडचणी दोघे मिळून सोडवू 5) डोळ्यातल्या पाण्याला आपण स्वतः पुसून घेऊ हृदयातल्या वेदनेला आनंदाचे रूप देऊ 6) कष्ट किती केले तरी वेदना जीवास होत नाही खांद्यावर ठेवुनी डोकं तुझ्या दुःख मजला बोचत नाही 7) साथ तुझ्या प्रेमाची असू दे मला अशी जवळ तुझ्या बसुनी निवांत राहू दे अशी 8) दोघं मिळून कष्ट करू संसार सुखाचा थाटवु ऊन सावल्यांचा खेळ हा असा आनंदाने घालवू ९) दुःख वेचिता वेचिता सुखही मी वेचीले तुझ्या सोबतीने मग स्वप्न सुखाचे पाहिले 10) कितीही वेदना झाकले तरी कळते मला काळजातल दुःख आयुष्य जगायचं ठरवल मी वाटू सोबतीने एकमेकांच सुखदुःख 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे* *ता.हदगाव जि. नांदेड.*
कविता - समानता स्त्री - पुरुष समानता फक्त म्हणायलाच आहे बंधनात बांधून तिला सार काही सोसण्यासाठी आहे घरातलं हव-नको ते सारं काही मग तीनच बघायचं धाकटयांना प्रेम, आणि थोरल्यांचा आदर करायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तीनच राबराब राबायचं पै - पाहुण्यांचं स्वागतही मग माञ तीनच करायचं घरादाराची मानमर्यादा तीनच सार सांभाळायच अगदी जीवावर बेतल तरी कपाळाच कुंकू जपायचं पुरुष कितीही पतीत असला तरी तोच नेहमी वर असतो समानतेच्या नावाखाली मात्र स्त्रीजन्मअग्निदिव्यासम असतो. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. वहीत लिहा.✍* *वाक्प्रचार व अर्थ - (ग)* *गहजब होणे - बोभाटा होणे* *गगन ठेंगणे होणे - खूप आनंद होणे* *गळ्याला तात लागणे - प्राणघातक संकटात सापडणे* *गुळणी फोडणे - स्पष्ट शब्दात सांगणे* *गळ्यात धोंड पडणे - जबाबदारी अंगावर येणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *म्हणी व अर्थ - (ग)* *गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली - एखादी गोष्ट सिद्धीस गेली तर ठीक नाही तरी नुकसान नाही.* *गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी - गरिबीमुळे आपण काही करू शकत नसलो तरी गोड बोलणं शक्य असल्यास गोड तरी बोलावे* *गरजवंताला अक्कल नसते - गरजेमुळे अडणार्याला दुसऱ्याचे निमूटपणे ऐकून घ्यावे लागते* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - अर्पण जीवनात माझ्या सुखदुःखात तुझीच साथ हवी मला अर्पण करून माझे जीवन स्वप्नातही तुझेच प्रेम हवे मला तुझ्या त्या मधुर वाणीमुळे तुझ्या त्या स्मितहास्यामुळे दुःख मी माझे विसरून जाते मग जगण्यावर मी मात करते तुझी आठवण येताच मला मन माझे गहीवरुन येते तुझ्या त्या अबोल प्रीतीमुळे मग मीच मला सावरते 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. व वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ - (ख)*🌺 *🔹खळीस येणे - हट्ट धरून बसणे* *🔸खडे चारणे - पराभव करणे* *🔹खो घालणे - विघ्न निर्माण करणे* *🔸खिळवून ठेवणे - स्थिर करून ठेवणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ - (ख)*🌺 *🔹खर्चणाराचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते - काम करणारास झीज सोसणारेच नुकसान होते. काही न करणाराचे निष्कारण पोट दुखते.* *🔸खायला काळ भुईला भार - निरूपयोगी मनुष्य* *🔹खाई त्याला खवखवे - जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते* *🔸खोट्याच्या कपाळी गोटा - खोटेपणा अथवा वाईट काम करणाऱ्या माणसाचे नुकसान होते* *🔹खऱ्याला मरण नाही - खरे कधी लपत नाही ते कधी तरी उघडकीस येते* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ - (क)*🌺 *🔹कंठशोष करणे - ओरडून गळा सुकविणे.* *🔸कंठस्नान घालणे - ठार मारणे.* *🔹कोंबडे झुंजविणे - भांडण लावून देऊन मजा पाहणे.* *🔸कान लांब होणे - अक्कल कमी होणे.* *🔹कुंपणाने शेत खाणे - विश्वासू माणसाने घात करणे.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ - (क)*🌺 *🔹कुडी तशी पुडी - देहाप्रमाणे आहार.* *🔸काडी चोर तो माडी चोर - क्षुल्लक अपराध केलेल्या माणसाचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे.* *🔹काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही - थोड्याशा अधिकाराने जे काम होते ते पुष्कळशा पैशाने होत नाही.* *🔸कोरड्या बरोबर ओले जळते - ज्याची काही चूक नाही असा माणूस चूक असणाऱ्या बरोबर निष्कारण गुन्हेगार धरला जातो.* *🔹कधी गाडीवर नाव कधी नावेवर गाडी - सर्वांचे दिवस येतात समान स्थिती कधीच राहत नाही.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
गुरुमाऊली चारोळी कट्टा शब्द चारोळी स्पर्धा - यशाची चांदी चमकते 1) अपयश या शब्दातच यशाची चांदी चमकते सोसावे लागतात कष्ट तेव्हाच यश झळकते 2) यश नेहमी लांब राहत कळत नाही माणसाला यशाची चांदी चमकते तेव्हा केलेल्या प्रयत्नाला 3) समर्थन माझ्या विचारांचं जेव्हा मीच मला विचारतो यशाची चांदी चमकते तेव्हा क्षितिज गाठायचंच म्हणतो 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे* *ता. हदगाव जि. नांदेड.*
कविता - नवचेतना नवचेतना ठेवून अंगी जसा, अंतःकरणात तरंग उठावा डोह मनाचा नितळसा असा स्पष्ट खोल तळाशी दिसावा थोपवून नेत्रातील अश्रू पापण्यासही व्हावे जड काळजास करुनी कठोर स्वप्न असे का? अवघड आठवणीतल्या सागरतळाशी मन अचानक गुंता करती अलगद सोडविता यावा गुंता अवघड स्वप्न साकार करती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ - (क)*🌺 *🔹कळस होणे - शिखर गाठणे* *🔸करार मदार करणे - आपसात एखादी गोष्ट ठरविणे* *🔹करुणा भाकणे - दयेची याचना करणे* *🔸काट्याचा नायटा करणे - क्षुल्लक कारणावरून अनर्थ ओढवणे* *🔹काळावर नजर ठेवणे - भविष्यकाळ जाणून घेणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ - (क)*🌺 *🔸केळीवर नारळी अन् घर चंद्रमौळी - अत्यंत गरीब स्थिती असणे* *🔹काकडीची चोरी फाशीची शिक्षा - अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे.* *🔸कुठे जाशी भोगा तर तुझ्यापुढे उभा -* *जे संकट येऊ नये अशी आपली मनोमन इच्छा असते तेच संकट पुढे येणे* *🔹कर नाही त्याला डर कशाला - जर आपण एखादी गोष्ट केली नाही तर त्याबद्दल भीती बाळगण्याची काही गरज नाही* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.
कविता - दूरदृष्टी माणसाच्या वागण्याची रीत इथे कशी आहे बघा न्यारी खर्याला असते पुराव्याची गरज अन् खोट्याचा तोलअसतो भारी दूरदृष्टी ठेवून करावी कामे स्वार्थाची परिभाषा नसावी मनी सत्याचाही दिवस उगवतो हीच आशा ठेवून जगावे जीवनी श्वास अन् निःविश्वास निरर्थक भासू लागे मजला जरीही, काळजाचा स्पंदनास न भेदावे दुःख मजला तरीही 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा.व वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ*🌺 *🔹इकडचा डोंगर तिकडे करणे - फार मोठे काम करणे.* *🔸उदक सोडणे - अशा सोडणे* *🔹उचल बांगडी करणे - जबरदस्तीने हलविणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ*🌺 *🔹इकडे आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती* *🔸ओळखीचा चोर जीवे न सोडी - ओळखीचा शत्रु हा अनोळखी शत्रु पेक्षा भयंकर असतो* *🔹एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पहातो विडी - दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता, स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚वाचा. वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ - (अ)*🌺 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔸अंकित करणे - पूर्ण ताब्यात घेणे* *🔹आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे - कष्टाशिवाय चैन करणे* *🔸अभय देणे - सुरक्षितपणाची हमी देणे* *🔹अंतर्धान पावणे - गुप्त होणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ (अ)*🌺 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹आलिया भोगासी असावे सादर - आपल्या कर्मात जे काही लिहिले आहे त्यानुसार भोगावे लागते. म्हणून त्याला कुरकुरू नये* *🔸आपले दात आणि आपले ओठ - शिक्षा करणारे आपणच आणि ज्याला शिक्षा करावयाची तोही आपल्यातलाच अशी अडचणीची परिस्थिती* *🔹आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ? - जे मुळातच नाही त्याची थोडीदेखील अपेक्षा करणे व्यर्थ होय.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*कविता - परिवर्तन* अज्ञानाचा करून नायनाट उगवून ज्ञानमय पहाट परिवर्तन असे घडवून आणले फुले दांपत्य स्त्रीशिक्षणास झिजले शिक्षणा वाचून नाही उद्धार शिक्षण हेच प्रगतीचे द्वार संघर्ष त्यांनी करून जीवनभर शिक्षणाचे महत्व सांगितले वारंवार शिक्षण हे सत्य चिरंतन जाणले घराघरातून ज्ञानदीप उजळवीले ध्येय ठेवून सदा सुनिश्चित भविष्यातील सुजान घडविले 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
*सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी* ---------------------------------- http://www.pramilasenkude.blogspot.com 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *📚वाचा वहीत लिहा.✍* *🌺वाक्प्रचार व अर्थ - (अ)*🌺 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹अंतरीचा तळीराम गार होणे - मनातील इच्छा पूर्ण होणे.* *🔸असंगाशी संग होणे - वाईट माणसाशी संबंध येणे.* *🔹अनुग्रहण करणे - उपदेश करणे* *🔸अंकित करणे - पूर्ण ताब्यात घेणे* *🔹अमर होणे - कायमची कीर्ती प्राप्त होणे.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺म्हणी व अर्थ - (अ)🌺* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹आजा मेला नातू झाला - एखादे नुकसान व्हावे आणि त्याच बरोबर दुसऱ्याची फायद्याची गोष्ट होणे.* *🔸आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी - गरज असलेल्या माणसाला मदत न करता ज्याला गरज नाही त्याला मदत करणे.* *🔹आगीतून फुफाट्यात पडणे - लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे.* *🔸अर्थीदान महापुण्य - गरजू माणसाला दान दिल्याने पुण्य मिळते* *🔹आपला हात जगन्नाथ - मनुष्याचा उत्कर्ष त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.* *ता.हदगाव जि.नांदेड.*
*🌺सुट्टीतील - उपक्रम* *विषय - मराठी🌺* ---------------------------------- *📚वाचा. व वहीत लिहा.✍* *वाक्प्रचार व त्याचा अर्थ -(अ)* *〰️〰️〰️〰️〰️〰️〰️* *🔹१)अग्निदिव्य करणे - फार मोठ्या संकटातून बाहेर पडणे.* *🔸२)अटकेवर झेंडा लावणे - खूप पराक्रम करणे* *🔹३)अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे* *🔸४)अळंटळं करणे - टाळाटाळ करणे* *🔹५)अक्कल पुढे धावणे - बुद्धीचा भलताच उपयोग करणे.* *〰️〰️〰️〰️〰️〰️〰️* *म्हणी व त्याचा अर्थ - (अ)* *🔹१)अडली गाय फटके खाय - एखादा माणूस अडचणीत सापडला की मग त्याला हैराण केले जाते.* *🔸२)असेल त्या दिवशी दिवाळी,नसेल त्या दिवशी शिमगा - अनुकूलता असताना चैन आणि नसेल तेव्हा उपास काढण्याची पाळी.* *🔹३)अगं अगं म्हशी, मला का नेशी ? - चूक आपण करावयाची व आपली चूक मान्य न करता दुसऱ्याचे शिरावर मारून मोकळे व्हायचे* *🔸४)अळी मिळी गुप चिळी - आपले रहस्य उघडे पडू नये म्हणून गप्प बसणे* *🔹५)आपल्याच पोळीवर तूप ओढणे - फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
* कविता - मृत्युपत्र* स्वतः घेऊन स्वतः भोवती जगणे इतके सोपे नाही संपत्तीसाठी नाती तुटती वाटते तितके सोपे नाही भाऊ भावाचा वैरी इथे हत्या करण्यास तयार होतो करून ठेवलेल्या मृत्युपत्राचा लालसा त्याच्या मनात शिरतो आईवडील जिवंत असताना जिव्हाळा त्यांचा एकमेकात असतो,नंतर मात्र क्षणाक्षणाला किंकाळी अन् दहशतीचा वनवा असतो संपत्तीच्या लालसेपायी कसलीही खंत त्यांना वाटत नाही, माणूस माणसाचा जीव घेतो, ही लाज त्यांना वाटत नाही जमीन- जूमल्याचा वाद इथे साधेपणाने मिटता मिटत नाही कोर्टकचेरीची चढून पायरी मग प्रश्न लढल्याशिवाय सुटत नाही असा प्रश्न इस्टेटीचा जीवनात उभा कोणी निर्माण करू नये गरजेपुरती असावी संपत्ती जास्त हव्यास कोणी करू नये 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*सुट्टीतील उपक्रम* *विषय - मराठी* ---------------------------------- *📚वाचा. व वहीत लिहा.✍* *🌻शब्दसमूहाबद्दल किंवा अनेक शब्दांबद्दल एक शब्द*🌻 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे - अतुलनीय* *🔸धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण - अन्नछत्र ,सदावर्त* *🔹ज्याचा विसर पडणार नाही असा - अविस्मरणीय* *🔸स्वतः लिहिलेले स्वतःचे चरित्र - आत्मवृत्त ,आत्मचरित्र* *🔹जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे - आभास* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺आलंकारिक शब्द🌺* *🔹काडी पहिलवान - हडकुळा माणूस* *🔸चालता काळ - वैभवाचा काळ* *🔹गर्भश्रीमंत - जन्मापासून श्रीमंत* *🔸कळीचा नारद - कळ लावणारा* *🔹उंटावरचा शहाणा - मूर्खपणाचा सल्ला देणारा* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
चित्रचारोळी - स्पर्धेकरिता 1) निळ्या निळ्या आभाळात तारा कसा लुकलुकतो तुझे पाऊल पडता खाली जीव माझा झूरझुर झुरतो. 2) तुला हसतांना पाहतांना तुझ्या हस्यावर वेडा मी झालो पाऊल पडता जमिनीवर तुझे तुझ्या नजरेत कैद मी झालो. 3) जीवनातील सुखदुःखात तुझीच साथ ,अशीच मला लाभू दे पावलोपावली तुझं हे प्रेम असंच मला आयुष्यभर लाभू दे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड.
*कविता - आनंदाचा झरा* अंगणी काढता सुंदर रांगोळी अंगण दिसते सुंदर प्रातःकाळी आनंदाचा झरा वाहती, अशा सुंदर पहाट सोनसकाळी कृष्णतुळस दारात अंगणी प्राजक्ताचा गंध भोवताली सुसंस्कृत सदनाचे प्रतीक जसे गृहलक्ष्मीचे हर्षित सौख्य असे नातं जडतं अंगणी असं जन्म जन्मांतरीचे पहिलं पाऊल, पडत इथ बालपणाच फुलत अंगण बागडन्याच सरती बालपण,होता मोठे अंगणी हिरवा मंडप छान माता पिता करती इथे मग आनंदाने लेकीचे कन्यादान रुसण्या बागडन्याचे दिवस जाती, मनात झुलतो मग अंगणीचा झोका, हृदयात माझ्या हेलकावणारा ठोका 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*उपक्रम -विषय - मराठी* ---------------------------------- *📚वाचा.वहीत लिहा.✍* *🌻शब्दसमूहाबद्दल किंवा अनेक शब्दांबद्दल एक शब्द🌻* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹नाणी पाडण्याचा कारखाना - टाकसाळ* *🔸जाणून घेण्याची इच्छा असणारा - जिज्ञासु* *🔹सैन्याची केलेली कोड्यासारखी रचना - चक्रव्यूह* *🔸तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश - द्वीपकल्प* *🔹दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा - कनवाळू* *🌺आलंकारिक शब्द🌺* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹अकरावा रुद्र - अतिशय तापट माणूस* *🔸गंडांतर - भितीदायक संकट* *🔹कूपमंडूक - संकुचित वृत्तीचा* *🔸बृहस्पति - बुद्धिमान* *🔹अष्टपैलू - सर्वगुणसंपन्न* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव*
कविता - तारांबळ बिगी बिगी निघाली ती उपाशी पोटी घरातूनी डोईवर गाठोड घेऊनी चालती माळरानातूनी बाळ पाठीशी बांधुनी लगबग चालती ती तारांबळ तिच्या जीवाची वेदना असे गरिबीची पोट भराया निघती ती ना ऊन ,ना पाऊस बघती किती कष्ट सोसुनी ती मुलांचा जीव जपती ना थकनार कधीही ती ना हरणार कधीही ती राब राब राबूनी बाळासाठी जीव तिचा ओतणार ती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
*उपक्रम -विषय - मराठी* ---------------------------------- *📚वाचा.व वहीत लिहा.✍* *🌻शब्दसमूहाबद्दल किंवा अनेक शब्दांबद्दल एक शब्द*🌻 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹आधी जन्मलेला - अग्रज* *🔸अग्नीची पूजा करणारा - अग्निपूजक* *🔹ज्याला कोणीही शत्रू नाही असा - अजातशत्रू* *🔸कोणीही जिंकू शकत नाही असा - अजिंक्य* *🔹विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे केलेले गैरकृत्य - अतिक्रमण* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺आलंकारिक शब्द🌺* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹मायेचा पूत - पराक्रमी मनुष्य , मायाळू* *🔸रामबाण औषध - अचूक गुणकारी* *🔹स्मशानवैराग्य - तात्कालिक वैराग्य* *🔸ओ🔓नामा - सुरुवात , प्रारंभ* *🔹पांढरा कावळा - निसर्गात नसलेली वस्तू* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.
कविता - दर्याचा राजा इवलेसे सुंदर विश्व माझे सागरी उसळत्या लाटा शांत निळाईत रंगलेला समुद्रकाठच्या पहाट वाटा वास्तव्याच्या आयुष्यातला संकटाचा सामना करणारा मी तुझ्या विश्वात बागडणारा आकाशाची साथ असणारा मी जगावेगळे नाते असे आपले डोळ्यात अश्रू सोबत घेऊन मी तुझा अफाट पसारा पाहत सागरा दर्याचा राजा आहे मी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.
*उपक्रम -विषय - मराठी* *📚वाचा.व वहीत लिहा.✍* ---------------------------------- *🌻श🔶ब्दसमूहाबद्दल किंवा अनेक शब्दांबद्दल एक शब्द🌻* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे - अनुपम,निरूपण* *🔸कार्यात गढून गेलेला - कार्यमग्न, कार्यरत* *🔹शिकारीसाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला सुरक्षित उंच माळा - मचाण* *🔸विशिष्ट ध्येय गाठण्याची जबरदस्त इच्छा असणारा - महत्त्वाकांक्षी* *🔹कायम टिकणारे - शाश्वत* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺आलंकारिक शब्द🌺* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹खडाष्टक - जोरदार भांडण* *🔸मृगजळ - केवळ आभास* *🔹चौदावे रत्न - मार* *🔸अंधेर नगरी - अव्यवस्थितपणाचा कारभार* *🔹घोरपड - चिकाटी धरणारा* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे
चारोळी - स्पर्धेकरिता जग हे बंदी शाळा 1) जीवनाचे अर्घ्य तुला तेव्हाच मी दिले होते जग हे बंदी शाळा आहे तेव्हाच मला कळले होते. 2) मनातील भावना ओठाशी येतात भावनांचे हिंदोळे मनी झुलतात जग हे बंदिशाळा आहे म्हणून नयनधारा आपोआप वाहतात 3) आठवणींचा गहिवर होताच मन माझं पाणावत....... जग हे बंदी शाळा आहे हेच नजरेनं तुला खुणावतं...... 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे
कविता - आयुष्याचा मध्यबिंदू काळजाच्या अंतरंगात माझ्या दडलंय खुप काही तुझ्या सहवासाने मी अनुभवलंय खूप काही तुझी आयुष्यभराची साथ ही आयुष्यभराचा मध्यबिंदू म्हणून जीवनात राहून गेली हीच खंत मनात मज राहिली नयनातूनी अश्रू ओसंडले तरीही तुझेच स्वप्न पडले तळहातावर किती जपले तरी जगण्याचे स्वप्न माझे दुभंगले.... 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.
*उपक्रम -विषय - मराठी* ---------------------------------- *📚वाचा. व वहीत लिहा.✍* *🌻शब्दसमूहाबद्दल किंवा अनेक शब्दांबद्दल एक शब्द.🌻* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹आकाशातील तार्यांचा पट्टा - आकाशगंगा* *🔸एकाच वेळी अनेक गोष्टींत लक्ष ठेवणारा - अष्टावधानी* *🔹रोग्यांची शुश्रुषा करणारी - परिचारिका* *🔸हाताने केलेली खाणाखुणांची भाषा - करपल्लवी* *🔹कमळाप्रमाणे डोळे असणारी - कमलाक्षी, कमलनयना* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🌺आलंकारिक शब्द🌺* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔹त्रिशंकू - धड ना इकडे, धड ना तिकडे* *🔸वामनमूर्ती - ठेंगू किंवा बुटका माणूस* *🔹भगीरथ प्रयत्न - आटोकाट प्रयत्न* *🔸कर्दनकाळ - भीती निर्माण करणारा* *🔹बोकेसंन्यासी - ढोंगी मनुष्य* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन /लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.
कविता - श्वास माझा रीत आभाळ, सुंदर पहाट जगण्याची जाणीव आहे जीवनातील उणीव आहे माझी ती सखी श्वास माझा नदीचा किनारा, सागरी लाटा प्रीतीचा पसारा, नयनी साठा माझी अभिलाषा,तिचा प्रतिसाद माझ्या नाद, तिचा आवाज मोहक फुलांची माळ जशी सुरेख माझी सखी तशी माझं काव्य तिचा साज जिवलग माझी सखी अशी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*उपक्रम - विषय -मराठी* ---------------------------------- *✍वाचा.व वहीत लिहा.📚* *🔹शब्दसमूहाबद्दल एक शब्द🔹* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *आकाशात गमन करणारा - खग, खेचर* *आकाशाचा भेद करणारे - गगनभेदी* *तांब्याच्या पत्रयावर लिहिलेला लेख - ताम्रलेख* *हळूहळू घडून येणारा बदल - उत्क्रांती* *कोणत्याही क्षेत्रात एकाएकी होणारा मोठा बदल - क्रांती* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *🔸आलंकारिक शब्द🔸* *गोगलगाय - गरीब निरूपद्रवी मनुष्य* *अकरावा रुद्र - अतिशय तापट माणूस* *मृगजळ - केवळ आभास* *पर्वणी - अतिशय दुर्मिळ योग* *अकलेचा खंदक - अत्यंत मूर्ख माणूस* ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन* *प्रमिलाताई सेनकुडे.
कविता- जांगडगुत्ता भावनांचा जांगडगुत्ता होतो जेव्हा बांध सुटता अश्रूंचा तेव्हा तेव्हा अश्रूंची ही जेव्हा माळ सरकते नयनातुनी तेव्हा धारा ओघळते बांध सुटताच नयनातील मनमुराद त्या उसळतील जणू टपोरे हे दवबिंदूचे थेंब ओघळते अलगद गालावरून हळूच थबकते अश्रूंचे हे माळेतील मोती विरती पुन्हा परत कधीच न दिसती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे
कविता - मन पाखरू वृक्षांनी किती मुकुट घातले डोईवर सोनेरी अन् चंदेरी कुरणावर रानात पसरला जसा गुलाल भडक चौफेरी हिरवे हिरवेगार सुंदर हे शेत मन पाखरू होऊन पिंगा घाली चहूकडे, झाडावरील भुंगे फिरती इकडेतिकडे किती सुंदर अचल फुलपाखरे इकडून तिकडे उडती सारे नयनास भावते रंग तयांचे तर्हेतर्हेचे कितीतरी साजिरे पिवळे ,तांबूस ऊन संपताच पाखरे झाडावरती होती गोळा सांजसमयी पिलास भेटण्यास आतुरती मग मायेचा लळा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.
*उपक्रम - प्रश्नमंजुषा* *आजची विज्ञान विषयावरील प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.* ---------------------------------- http://testmoz.com/4260580 ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- *टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत लिहून ठेवावे.* 📚📚📚📚📚📚 *वाचा. व वहित लिहा.* *आलंकारिक शब्द* *🔸सुळावरची पोळी - जीव धोक्यात घालणारे काम* *🔹वाटाण्याच्या अक्षता - नकार* *🔸गुरुकिल्ली - मर्म ,रहस्य* *🔹पाताळयंत्री - कारस्थान करणारा* *🔸सव्यसाची - उलटसुलट काम करणारा* ---------------------------------- *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे.जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.*
*कविता- चिखलमाती* व्याकुळ होई भुकेने खायला अन्न मिळेना गरिबीची जाणीव कुणास का? कळेना.. कुणास हवी झोपडी भू असे निवारा घेऊनी झोप सुखाने चिखलमातीचा पसारा गो राही उपाशी वासरे चाटती पान्हा भांडे राही रिकामे घरात नसे दाना धावत्या वाटेच्या कडेला आसवे घेई विसावा झोपडीतला गरिबीला थाट स्वप्नीही नसावा.. आटती रक्त नसा नसांतून तरी कष्टतात हातपाय बलदंड बाहूतनी घाम गाळुनी श्रमतेही काया 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*चित्र चारोळी - स्पर्धेसाठी* 1) लखलखती दुर्बीण घेऊन हाती कणाकणाने शहानिशा करी उभी राहुनी वरी ताठ ती ज्ञानबिंदू ने तर्कही करी 2) विज्ञानाची धरुनि कास अवकाशाचा करिते ती अभ्यास सत्यधारित ज्ञान हे सांगते तिचे स्वीकारा विज्ञान आणि तंत्रज्ञानास 3) आत्मविश्वासाचे लेवून पंख घेत आहे ती उत्तुंग भरारी प्रगतीपथावर नेऊनी स्वतःस दावीते नारीशक्तीची करारी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे
गुरुवर्य गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर प्रत्येकाच्या मनातील पावित्र्यांचा मांगल्य जागवणाराअपूर्णातून पूर्णत्वास नेणारा गुरु एक आदर गुरु म्हणजे ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणारा, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारा समाजाच्या कल्याणाचा पालनहार गुरु म्हणजे यशाची वाटचाल दाखविणारा, शिष्याच्या मनातील संवेदना जोपासणारा, मूल्यांची रुजवण करून ध्येयपूर्तीकडे वळवणारा गुरु म्हणजे भावी कर्तव्यदक्ष नागरिक निर्माण करणारा, संस्काराची आणि ज्ञानाची शिदोरी घेऊन विद्यार्थी घडविणारा एक शिल्पकार गुरु म्हणजे संकटात नेहमीच शिष्यास तारणारा, आत्मकल्याणाचा मार्ग दाखविणारा, निष्काम कर्मयोगी मातीच्या गोळ्यास आकार देऊन विद्यार्थ्यांची प्रगती साधणारा गुरु म्हणजे आधारस्तंभ देशाचा विद्यार्थ्यास मार्गदर्शन करुनी, ज्ञानाचा प्रकाश देऊनी देश घडविणारा एक दीपस्तंभ गुरु म्हणजे माणुसकीची,सर्वधर्म समभावाची शिकवण देणारा, भावी पिढी घडविणारा,एक कल्याणकार 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.
कविता - क्षणोक्षणी देवा तुझा महिमा अगाध आहे क्षणोक्षणी नाम तुझे मनात आहे पंढरीचा विठ्ठल उभा तू विटेवरी तुझ्याच नामस्मरणाने तल्लीन होतात भक्त वारकरी देवा तुझे अवतार अनेक आहेत दृष्ट जनांचा करुनी संहार तू भक्तासाठी धावून येतोस तू तुझे या सृष्टीवर उपकार अनंत आहेत देवा तुझी लीला अपरंपार आहे तुझ्या अदृश्य शक्तीचा पगडा आम्हावरी आहे , सारे तुझ्या भक्तीत होतात तल्लीन, करूनि तुझ्या नामाचा गजर अखंड दीप जळो हृदयी माझ्या तुझ्याच नामाचा, महिमा तुझी अगाध आहे, शांती रक्षणा नांदो विश्वात, असू दे कृपा आम्हावरी तुझीच देवा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.
कविता - टिपूस माझा देह जळून जाऊन त्या देहाच्या धुराचा आकाशी ढग तरी व्हावा,अन् त्या ढगातील पाऊस टिपूस टिपूस तुझ्याच अंगणात पडावा बरसलेल्या पावसाचा थेंबाने अंगणातील मातीतल्या ओलाव्यातून निस्वार्थी प्रेमाचा गंध यावा, मग त्या धुराचा मज पश्चाताप न व्हावा भिजलेल्या तुझ्या या देहाचा हळुवार स्पर्श मज व्हावा जळून गेलेल्या चितेचा मग विसर तुजला पडावा... 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
शुर शिवबा राजे राजे तुमच्या धाडसाचे ,कर्तृत्वाचे गुणगानाचे गाऊन पोवाडे मिळवितो आम्ही सन्मान सगळीकडे शुर शिवबा राजे तुम्ही जन्मास यावे एकदागडे विश्वास होता तुमच्या नेहमी मनी शत्रुस जिंकायचे तुम्ही गनिमी काव्यानी नेहमी नेहमी स्वराज्याची शपथ घेऊन रयतेच्या सुखासाठी झिजलात तुम्ही ताकद होती तुमच्यात तलवारीची शिकवण होती तुम्हास आऊसाहेबांची शुर शिवबा राजे आहात तुम्ही कर्तुत्ववान मराठी अस्मितेच्या महाराष्ट्राची शान 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे.
*उपक्रम - सामान्यज्ञान* *प्रश्नमंजुषा* *online test* आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. ---------------------------------- http://testmoz.com/4191192 ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- *टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत लिहून ठेवावे.* 📚📚📚📚📚📚 *वाचा व लिहा.* *🌺आलंकारिक शब्द🌺* *🔸नवकोट नारायण - खूप श्रीमंत* *🔹पांढरा परीस - लबाड* *🔸अळवावरचे पाणी - फार काळ न टिकणारे* *🔹टोळभैरव - कामात नासाडी करणारे लोकं* *🔸लंबकर्ण - बेअकली* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे.जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - पांढरा परीस (लबाड) पांढऱ्या परीसापरी खोटी प्रतिष्ठा न जपण्या बरी, आत कोंडीता भावना द्वेष ,मत्सर , राग ,लोभ प्रेम, हेवा ,माया ,ममता सल पोखरीतो मना द्वेष मनात साठता, भग्न करी मनास प्रसन्नता मिळत नाही काळजास जिवंतपणी नाही मिळत सुख त्यास चिंता करित संपतो असा माणूस पांढरा परीस जगणे असे सोडून द्यावे, करुनी सत्कर्म जीवन सार्थकी लावावे, ऐसे जीवन आपुले जगावे प्रत्येक हृदयात मिळवावी जागा निर्माण करावा ओलावा मायेचा गुज मनाचे सांगता सोडून द्यावा हेवा ओठी आणावा भाव प्रेमाचा.... 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
कविता - प्राण्यांची शाळा जंगलात भरली प्राण्यांची शाळा सारे प्राणी झाले गोळा माकड आली उड्या मारत मारत हत्ती आला डुलत डुलत खारुताई आली झाडावरून हरिण आले धावून धावून बगळा कोकीळ सारे जमले तुणंतुण घेऊन नाचू लागले तास खेळाचा सुरू झाला मोर पिसारा फुलवू लागला असा सर्वांचा जमला मेळा जंगलात भरली प्राण्यांची शाळा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.
*उपक्रम - प्रश्नमंजुषा- विषय- मराठी (व्याकरण)* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.* ---------------------------------- http://bpegm.in/wazirx.php?id=365&user=133 ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- *टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत लिहून ठेवावे.* 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे.जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - हेळसांड तुले पाहून आज मले लय बरं वाटलं, हेळसांड मह्या जीवाची होत होती हेच तुले सांगावसं वाटलं तुले पाहून आज मले लय बरं वाटलं, मनामंदी मह्या जे होतं ते आज तुले सांगावसं वाटलं तुले पाहून आज मले लय बरं वाटलं, मनातलं प्रेम मह्या डोयामधी आटलं हेच तुले सांगावसं वाटलं तुले पाहून आज मले लय बरं वाटलं, आजुबाजू देखता पोटातलं सार काही मह्या हेच तुले सांगावसं वाटलं तुले पाहून आज मले लय बर वाटलं......... 〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
*महाराष्ट्र शिक्षक पॅनल* *शिक्षक परिचय* ••••••••★★★•••••••• *MSP प्रमुख - शिक्षक परिचय* 🔹नाव - श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे 🔹शाळा व पत्ता - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोजेगाव. तालुका हदगाव जिल्हा नांदेड. 🔹शैक्षणिक पात्रता - बी.ए. डी.एड. 🔹नेमणूक दिनांक - 19 _ 11_ 2001 🔹वाढदिवस दिनांक - 29 मे 🔹लेखन - काव्यलेखन, चारोळी लेखन, कथालेखन, विविध विषयावरील तसेच प्रासंगिक लेखाचे लेखन. (वृत्तपत्रे, मासिके, विशेषांक) इत्यादीमध्ये लेखनप्रसार. तसेच एक काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. आणि आणखी एक काव्यसंग्रह (पद्य), तसेच (गद्य) या भागावरील लेखनाचे दोन पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. 🔹तंत्रज्ञान - ब्लॉगस्पॉटच्या, युट्युब, च्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम प्रसारित करणे. 🔹शिक्षक संघटना पद - 1) म. रा. प्राथमिक शिक्षक महिला आघाडी संघ जिल्हासरचिटणीस नांदेड. 2) काव्यप्रेमी शिक्षकमंच जिल्हाअध्यक्षा नांदेड. 3) जिजाऊ ब्रिगेड कार्याध्यक्षा ता.हदगाव जि.नांदेड. 🔹पुरस्कार - गुरुगौरव आदर्श शिक्षिका पुरस्कार यासह अन्य (25) पुरस्कार प्राप्त. 🔹सामाजिक कार्य - दरवर्षी आईची पुण्यतिथी एका गरज असलेल्या शाळेस डिजिटल करण्यासाठी 10,000 (दहा हजार)रुपये आर्थिक योगदान देऊन साजरी करणे. तसेच दरवर्षी भव्य शालेय लेझीम स्पर्धेसाठी 10, 000 (दहा हजार) रुपये देणे. तसेच अनाथाश्रमास मदत करणे,शाळा रंगरंगोटीसाठी मदत करणे, गरजू विद्यार्थ्यांना व अन्य गरजूंना मदत करणे. 🔹विशेष प्राविण्य - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (शिक्षणाची वारी) , मातृभाषा सुलभक. 🔹MSP कार्य - शैक्षणिक विविध उपक्रम 🔹मोबाईल नंबर - 9403046894 ••••••••★★★•••••••• *दीपक चामे* *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* मो. 8149488888 ▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*शब्द चारोळी स्पर्धेसाठी* *शब्द - हिरवळ दाटे चोहीकडे* १) रिमझिम पावसाच्या सरीचे होते आगमन वरुण राजाचे बहरती मग राने सारी हिरवळ दाटे चोहीकडे. 2 ) आषाढघन आषाढघन येतीगडे मृग जलधारेने मग बरसतीलगडे रानास गारपण येईल गडे मग हिरवळ दाटे चोहीकडे 3) नद्या, नाले, धरणे भरतील हिरवे पर्वत ,डोंगर चोहिकडे पक्षी आनंदाने गातील सुस्वर हिरवळ दाटे चोहीकडे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.* *ता.हदगाव जि. नांदेड.*
नैराश्य नैराश्य घेऊन जीवनात कधीच न जगाव माणसानं होऊन व्यक्त दिलखुलास, बोलून मनमोकळे जगून घ्याव माणसानं प्रश्न आपल्या जीवनातले असले जरी सोपे अवघड तरी, देऊनी उत्तर, करुनी संघर्ष जगून घ्याव माणसानं अश्रू डोळ्यातुन ओघळणारे पुसून जगाव माणसानं धुमसणारे दुःख मनातलं सांगून जगाव माणसानं जेव्हा हार होते तेव्हा यशाचं महत्व जाणून घ्याव माणसानं जिंकण्यासाठी कधीकधी मग हारुन जगाव माणसानं वाट्यास आलेल्या दुःखासही थोडस हसून घ्यावं माणसानं मृत्यू जरी अटळ सत्य तरी मागे चांगले काहीतरी उरून जगाव माणसांन 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.
*उपक्रम - सामान्यज्ञान* *प्रश्नमंजुषा* *दिनांक - 27 जून 2020 वार - शनिवार* *आजची प्रश्नमंजुषा विषय - गणित पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.* ---------------------------------- http://testmoz.com/4067778 --------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- *टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत लिहून ठेवावे.* 📚📚📚📚📚📚 *✍वाचा. व वहीत लिहा📚* *🔹आलंकारिक शब्द🔹* *🔸ताटाखालचे मांजर - दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा* *🔹दगडावरची रेघ - कधीही न बदलणारे* *🔸पाताळयंत्री - कारस्थान करणारा* *🔹खुशालचेंडू - चैनीखोर माणूस* *🔸वाहती गंगा - आलेली संधी* ---------------------------------- *✍संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे.
*आकर्षण* किती मौज दिसे पहा तरी जेव्हा विमान उडते आकाशी आकर्षण हे त्याचे बघण्याचे मनास देती हर्ष लहरी जाऊन विमानातून कधीतरी डोंगर,राने, ओहळ, तटिनी आणि खोल खोल दरी पहावे कुठे सागर लहरी आकाशातील ग्रह नक्षत्रांच्या घ्याव्या भेटी मग, अपूर्व शोभा ही गगनीची जाऊन पहावी विमानात बसुनी सर्वांनी. किती मौज दिसे पहा तरी जेव्हा विमान उडते आकाशी 〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
लेख.... *समाज क्रांतिकारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज* *" सामाजिक कार्याची अखंड* *अहोरात्र घेतली पणती हाती* *अस्पृश्योद्धार कार्य करुनी,* *स्त्रीशिक्षणास दिली गती.”* सर्व सद्गुणांचा उपासक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे हे त्यांचे वडील. यशवंतराव जयसिंगराव घाटगे हे त्यांचे मूळ नाव होते. पुढे यशवंतराव हे योगायोगाने छत्रपती झाले. कोल्हापूरच्या महाराणीसाहेबांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि त्यांचे नामकरण शाहू छत्रपती असे केले. छत्रपती शाहू महाराज हे गोरगरिबांचे, दीनदलितांचे राजा होते, विद्वानांचे चाहते होते, कलावंतांचे ञाते होते, समाजसुधारकांचे दाता होते, शिक्षणाचे भोक्ते होते, स्थिर चित्ताने धोरण आखणारे होते. शाहू महाराज हे केवळ सामाजिक सुधारक नसून ते राजकीय सुधारकही होते. धोरणी आणि मुत्सद्दी होते. दूरदर्शी व खऱ्या लोकशाहीचे ते जनक होते. उच्चवर्णीय समाजाच्या गुलामगिरीतून गरीबांना मुक्त करणारे सत्ताधीश होते. शाहू महाराजांचे धैर्य , उत्साह व शक्ती अमर्याद होती. समाजातील प्रस्थापितांशी समरस होण्यापेक्षा समाजातील अपंगांशी, दलितांशी आणि पददलितांशी ते समरस होत. दलित व पददलित समाज यांची अनेक बंधनातून मुक्तता करणे हेच त्यांच्या जीवनातील एकमेव ध्येय होते.' मानवी जीवनाविषयी अत्यंत सहानुभूती' हे शाहू महाराजांचे ब्रीदवाक्य होते. खरोखर ते एक महान सामाजिक पुरुष होते. छत्रपती शाहू महाराजांचे मन हे संवेदनशील होते. त्यांच्या न्यायाच्या जाणिवा प्रगल्भ होत्या. अन्यायाला, शोषणाला बळी पडलेल्या लोकांविषयी त्यांना सहानुभूती होती. शाहू महाराजांचे अंतःकरण त्यांच्या विकासासाठी तिळतिळ तुटत होते. छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे भावनिक पातळीवरचे वेगळेपण तर होतेच, पण दीनदुबळ्यांना माणसात आणण्याचे मार्गही त्यांना दिसत होते.2 एप्रिल 1894 साली त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेतली होती. आणि आपल्या सत्तेचा उपयोग गोरगरिबांना व्हावा यासाठी त्यांनी आयुष्यभर जिवाचे रान केले. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले, शिवाय स्त्रियांच्या नैसर्गिक हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदेही अमलात आणून स्त्रियांची समाजाकडून आणि कुटुंबाकडून होणारी पिळवणूक थांबविण्याचा मोठा प्रयत्न केला.स्त्री जातीच्या संरक्षणाचे कायदे करून त्यांनी स्त्रीमुक्ती चळवळीस हातभार लावला.बहुजन समाजाचा विकास केला. तळागळातील लोकांना मायेचा स्पर्श दिला. बहुजन समाजासाठी न्यायावर आधारलेला सृष्टीची निर्मिती करून त्यांनी एक नवीन समाज उभा केला. थोडक्यात सांगायचे म्हणजे शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे बहुजन उद्धाराचे कार्यपरंपरा समर्थपणे पुढे नेली. शिक्षण हीच त्यांनी सर्व सामाजिक सुधारणांची व प्रगतीची जननी मानली. देशाची प्रगती करावयाची असेल तर शिक्षण म्हणजेच विद्या घेणे महत्त्वाचे आहे. " शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे". असे त्यांचे ठाम मत होते. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे त्यांचे मत होते. समाजातील मागासलेल्या वर्गाची बौद्धिक गुलामगिरी नष्ट होण्यास त्यास किमान प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या सुधारणेचा त्यांनी जोरकस पुरस्कार केला.छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील मागासलेल्या वर्गांना प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. समाज समृद्ध व बलवान करण्यासाठी बहुजन समाजातून उत्तम शेतकरी, उत्तम व्यापारी, उत्तम उद्योगपती, उत्तम सैनिक निर्माण झाले पाहिजेत आणि त्यासाठी शिक्षणगंगेचे पाट खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेच्या दारापर्यंत नेले पाहिजे असे शाहू महाराजांना वाटत होते. सामान्य माणसांना प्राथमिक शिक्षणाच्या बळावर गरुड झेप घेता यावी म्हणून ते धडपडत होते. ग्रामीण भागातील मुलांना प्राथमिक शिक्षणानंतरचे माध्यमिक व उच्च शिक्षणाचे फायदे मिळावेत म्हणून त्यांनी ठीकठिकाणी वसतिगृह स्थापन केले. शिक्षणाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच त्यामागील त्यांचा मुख्य हेतू होता. प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारास महाराजांनी जे कार्य केले याला तोड नाही. *'ज्योतीबासवे रचिला पाया l शाहू झालासे कळस'll* असेच गौरवाने म्हणावे लागेल. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराजांनी प्रजेच्या उत्कर्षासाठी अनेक नवनवीन कायदे केले. दळणवळणात सुधारणा व्हावी यासाठी महाराजांनी अनेक रस्ते बांधले, पूल बांधले, छत्रपती शाहू महाराजांना कुस्त्यांची, नाटकाचीही फार आवड होती. म्हणून त्यांनी कुस्त्यांचे आखाडे निर्माण केले. महाराजांचा उदारपणा सर्वश्रुत असल्याने अनेक नाटक कंपन्या महाराजांच्या आश्रयाला गेल्या. महाराज अनेक ठिकाणी या कंपन्यांच्या प्रयोगाची व्यवस्थाही स्वखर्चातून करत. महाराजांनी 'राधानगरी' धरणाची निर्मिती केली., वेठबिगारी पद्धत बंद केली. आपले राज्य आदर्श असावे, तळागाळातील लोकांवर अन्याय होऊ नये यासाठी महाराज नेहमीच दक्ष असत .रयतेचा राजा म्हणजे काय हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज.अशा या महान लोकोत्तर व्यक्तीमत्वास त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 👏👏🙏🙏💐💐 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे (सहशिक्षिका) ता.हदगाव जि.नांदेड.
*उपक्रम - सामान्यज्ञान* *प्रश्नमंजुषा* *दिनांक - 26 जून 2020 वार -शुक्रवार* *आजची प्रश्नमंजुषा विषयः मराठी (व्याकरण) पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.* ---------------------------------- http://testmoz.com/4056180 ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- *टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत लिहून ठेवावे.* 📚📚📚📚📚📚 *✍वाचा. व वहीत लिहा.*📚 *आलंकारिक शब्द* *अक्षरशत्रू - निरक्षर ,अडाणी* *कळसुत्री बाहुले - दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा* *चर्पटपंजरी - निरर्थक बडबड* *भाकडकथा - बाष्कळ गोष्टी* *सांबाचा अवतार-अत्यंत भोळा माणूस* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ---------------------------------- *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे
*उपक्रम - सामान्यज्ञान* *प्रश्नमंजुषा* *दिनांक - 25 जून 2020 गुरूवार* *आजची सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.* ---------------------------------- http://testmoz.com/4053486 ---------------------------------- *ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- *टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत लिहून ठेवावे.* 📚📚📚📚📚📚 *✍वाचा. व वहीत लिहा.📚* *🔸आलंकारिक शब्द🔸* *मेषपात्र - बावळट* *गाजरपारखी - कसलीही पारख नसलेला, मूर्ख* *अरण्यरुदन - ज्याचा उपयोग नाही असे कृत्य* *कर्णाचा अवतार - उदार मनुष्य* *कूपमंडूक - संकुचित वृत्तीचा* *〰️〰️〰️〰️〰️〰️〰️* *✍संकलन* *प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.*
वेसण जीवापाड जपून आई बांधते मुलास वेसण उच्चशिक्षित व्हावी त्याने हीच प्रार्थना करते मनोमन स्वतः राहून ती उपाशी घास मुलास भरविते लहानपणीपासूनच ती त्यावर चांगले संस्कार करिते बाळासाठीची तिची तगमग वेड जीवास लावते जीवापल्याड जपुनी त्यास सुजान नागरिक बनविते वेसण ठेवून मनास इच्छा ती सावरते पोराबाळासाठी मात्र आयुष्य ती झिजविते. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
वेसण सांग ताई ? सांग दादा ? वेसण कुठवर घालू मी अंधश्रद्धेत गुरफटलेल्यांना आवर कुठवर घालू मी सांग ताई ? सांग दादा? वेसण कुठवर घालू मी अज्ञानाचा कळस चढविणाऱ्याना ज्ञानाचा प्रवाहात कुठंवर आणू मी सांग ताई ? सांग दादा ? वेसण कुठवर घालू मी रुढी परंपरेने चाललेल्या प्रथेला सावर कुठंवर घालू मी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
*आषाढघन* आषाढघन आषाढघन येती मनालाही आनंद मिळून रानीवनी जाती बरसून तापलेल्या धरतीस सुख देती आषाढघन आषाढघन येती मृगाच्या जलधारेने बरसुनी रानास गारपण देऊनी इंद्रधनुष्यासही खुणावती आषाढघन आषाढघन येती सारेजण शेतकामाची मग भराभर सुरुवात करती बळीराजा अंतःकरणी सुखावती आषाढघन आषाढघन येती प्रेमपाखरेही बेधुंद होऊन तुझ्यासमवेत गाणी गाती मोर पिसारा फुलवूनी नाचती आषाढघन आषाढघन येती आषाढघन आषाढघन येती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे.*
चित्र चारोळ्या..... 1) लहानपणीची मैत्री, मोठेपणीही जपू जातीभेद विसरून सारे एकतेन राहू २) हातात हात घेउन आईचा निघाल्या दोघी मैत्रिणी घराकडे निरागस चेहरे त्यांचे नजरा मात्र एकमेकीकडे 3) तुझ्या माझ्या मैत्रीचे प्रतीक आहे एकतेचे शिकवण सर्वधर्मसमभावची जोपासुया एकात्मतेची 〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे.*
ग्रहण कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडुनी, बळीराजाची होते हानी ग्रहण हे त्याच्या मागचे सुटणार का कधी ?कोण जाणी? मेहनत इतकी करुनी जगण्यास नसते त्यास अन्नपाणी जगाच्या या पोशिंद्याची किती? केविलवाणी ही कहानी घाम गाळूनी ,कष्ट करूनी शेतात राबराब राबतो डोंगर कर्जाचा घेऊन मरण यातनेत तो जगतो कधी येईल पीक पाणी मिळेल या पोटास भाकर चटणी हाती पडेल का पैका नानी का? होईल व्यापाऱ्यांची मनमानी झोपडीपाशी बसुनी, विचार तो करतो, प्रश्न मनाला भेडसावणारे डोळ्यात अश्रू आणून , दुःखाने वर पाहत आकाशास सांगतो 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
*बा तू होतास तेव्हा !* बा तू होतास तेव्हा ! सुरू झाली माझी शाळा बा तुझ्यामुळेच मला लागला शाळेचा लळा बा तू गेला अन् संपलं सारं काही आता कुणापुढे हट्ट करू मज उरले ना काही ना राहिली मायची सावली ना राहिले बा तुझे छत्र स्पदंनातील वेदनांनी मग भरून येतात माझे नेत्र 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*दिव्यता* देशाच्या सन्मानासाठी समाजाच्या कल्याणासाठी ज्ञानाचा मंत्र आपण जपू शिक्षणाची दिव्यता जाणून घेऊ अज्ञान हाच ओळखून दुर्गुण नको त्याची पुन्हा गुणगुण ज्ञान हाच श्रेष्ठ सद्गुण त्यातच आहे मानवी कल्याण ज्ञान मिळवून साधूया प्रगती मिळेल विकासास गती धरावी कास शिक्षणाची हाती होईल मग मानवाची उन्नती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे.*
वास्तवता अंतरंगातील भावना ओठापर्यंत येतात,परंतु वास्तवताचं भान ठेवून हळूच त्या निघून जातात.... भावनांचे हिंदोळे, मनी झुलतात नाद माझ्या अंतरीचा कानी तुझ्या ते सांगतात ..... व्यक्त करेन भावना, परंतु साद तुझी असावी, मुकेपणाच्या भावनांची ओंजळ मग सावरता यावी..... नात्यातील जिव्हाळा असाच कायम राहावा, नयनातील अश्रुंना आधार तुझा असावा.... 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
झुळूक मी मनी आज भाव माझ्या आले झुळूक मी व्हावे वाऱ्यासंगे गडद धुक्यातून जावे अन् राहावे तृणपात्याचा दवबिंदूसंगे मनी आज भाव माझ्या आले रात्रीच्या अंतरंगी डोलावे स्वप्नरंग मनीचे मनी पहावे अंधारातही हर्षुन जावे मनी आज भाव माझ्या आले हिरव्यागच्च तरुवर जावे गाणं कोकिळेचे गावे अन् स्वरास्वरात भावचकोर व्हावे मनी आज भाव माझ्या आले मनी आज भाव माझ्या आले 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
स्पर्धेसाठी चारोळी विषय: वाऱ्यावर हलते रान 1) सुगंध मातीचा घेऊनी वाऱ्यावर हलते रान आकाशातील टपोरे थेंब सृष्टीचे सुरेल गायील गाणं 2) चिंब पावसाच्या सरीने मन माझे भिजून जाते वाऱ्यावर हलते रान भान माझे हरपून जाते 3) रखरखत्या उन्हातही वाऱ्यावर हलते रान गूज मनीचे सांगून व्यथा अंतरीची जाण 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे
*येती पावसाच्या सरी* येती पावसाच्या सरीवर सरी आनंदून जाईल धरती सारी येती पावसाच्या सरीवर सरी वाहती नद्या-नाल्या दूथरी बोलू लागती पशु-पक्षी सारी चोही बाजू हिरवळ पसरी येती पावसाच्या सरीवर सरी रान दिसती हिरवी हिरवी ओल्या मातीतल्या गंधातुनी सुगंध पसरी मंद-मंद वाऱ्यातूनी येती पावसाच्या सरीवर सरी पोरं खेळती बागडती पाण्यातही भिजती, नाचती अंगणात आनंदाने सारी येती पावसाच्या सरीवर सरी मोर नाचती पिसारे फुलवुनी झाडी,वेली रानमाळातुनी फुल बहरती रंगारंगातुनी येती पावसाच्या सरीवर सरी पेरणी करती मग शेतकरी पिके डोलारती रान सारी नांदेल मग लक्ष्मी घरीदारी येती पावसाच्या सरीवर सरी आनंदून जाईल धरती सारी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
मेघ दाटले जगण्या स्वस्थ आणि शांत जीवन करावे पर्यावरणाचे रक्षण घ्यावी शुद्ध आणि स्वच्छ हवा सुखी जीवनाचा हाच मंत्र असावा नका तोडू वृक्ष आणि जंगले मग दाटतील मेघ नभातले पृथ्वीचे संतुलन राखता येईल तरच मानवी जीवन जपता येईल मेघ दाटले उंच नभातले बरसल्या मग पाऊस सरी हिरव्या शालूने धरती सजली न्हाऊन निघाल्या झाडी वेली पानाफुलांच्या भरजरीचा दिसतो कसा हिरवा साज पाहुनी मज मला कळेना सृष्टीचा हा नवा साज 〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
*बेधुंद क्षण* घाव वेदनेचे सोसून घे आता...... उदासलेल्या वाटेवर चालून घे आता..... बेधुंद क्षण ते, जपुन ठेव आता...... नाते अपुलेच आपुल्या मनाशी जोडून घे आता.......... उजाडलेल्या दिसाचा संदेश ऐक आता...... तळपत्या सूर्याचे दाह सोस आता...... संवेदना मनीची जपून ठेव आता...... जगणे ते चकोराचे सोडून दे आता..... खोल सागराच्या अंतरीस जाण आता..... निःशब्द किनाऱ्याशी बोलून घे आता...... स्तब्ध तुझ्या मनातील भाव ओळखून जगत रहा, तू आता..... 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
नीरव शांतता गडद अंधार्या रात्री चमकतो काजवा लखलखणारा नीरव शांतता भासे चोहीकडे उजेड पडे त्याचा न्यारा रात्र संपता जाईल कुठे? प्रश्न हा मजला पडे देह त्याचा चिमुकला नजरेस माझ्या न पडे चढुनी डोंगर घ्यावा शोध अफाट त्या रानीवनी...... रात्र संपता चमकेल का?तो गडद अंधारातूनी........ लखलखणारे रूप त्याचे अंधारातही भारी शोभणारे टिपून घ्यावे प्रसंग सारे निसर्गसौंदर्य हे रेखाटणारे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
नीरव शांतता गडद अंधार्या रात्री चमकतो काजवा लखलखणारा नीरव शांतता भासे चोहीकडे उजेड पडे त्याचा न्यारा रात्र संपता जाईल कुठे? प्रश्न हा मजला पडे देह त्याचा चिमुकला नजरेस माझ्या न पडे चढुनी डोंगर घ्यावा शोध अफाट त्या रानीवनी...... रात्र संपता चमकेल का?तो गडद अंधारातूनी........ लखलखणारे रूप त्याचे अंधारातही भारी शोभणारे टिपून घ्यावे प्रसंग सारे निसर्गसौंदर्य हे रेखाटणारे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
हुरहुर पशु,पक्षी,प्राणी, माणसही जीवन हे सगळेच जगत असतात मेल्यावरही पुरतात आणि जळतात पण मरूनही काही कायम उरतात निस्वार्थीपणाचा संकल्प मनात ठेवून जनसेवे जीवन आपुले झिजवितात मानवी कल्याण जे साधतात तेची जगी स्मरणात राहतात चांगली वागणूक, चांगला विचार सोडून खऱ्या अर्थाने जे जातात आपण मागे काहीतरी केल्याची हुरहुर जनास देऊन जातात. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
चित्र चारोळी - स्पर्धेकरिता (दि.१४-०६-२०२०) 1) कसे फेडू उपकार तुझे सागरा मुक्तपणे मी जगण्यास शिकले दुःखास देऊन हुलकावणी मी सागर किनारी हसण्यास शिकले 2) सागराच्या उसळती लाटा नभी पावसाच्या बरसतील धारा हसत खेळत चालत पायवाटा छत्री होईल मग सहारा 3) सागर किनारी जाऊनी मनाला भिजावंसं वाटतं मग भावनांना शब्दरूपी छत्रीत बसवावसं वाटतं. 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
*ऐनेमहाल* मुलगी आहे म्हणून कोणी दूर नका सारू तिला ऐनेमहाल नका बांधू तिच्यासाठी, पण जन्मास येऊ द्या तिला मोठेपणी होईन ती मोठी हुशार आणि शिक्षणही घेईल फार बनेन हो तुमचा सर्वांचा आधार प्रेमाने सांभाळेल सर्व घरदार जबाबदारी पूर्णत्वास ती नेईन दिलेले कार्य जिद्दीने सांभाळेन स्वकर्तृत्वाची ठेवून ती जाणं स्वीकारेल सर्व ती आव्हान झेप उंच उंच घेऊन ती कष्टाने यशाची शिखरं गाठेन आई- वडीलास ठेवून सुखाने ऐनेमहाल ती त्यांच्यासाठी बांधेन 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*नामशेष* हरवली होती नीज डोळ्यांची नामशेष उरले स्वप्न ते फक्त अंतरीतून साचून शल्य सारी नीनादूनी होतं होते मी मुक्त नयनांचे गुपित हे सारे काळजातले कंपन असते आसुसलेल्या दोन जीवांच्या हृदयातले ते स्पंदन असते तिळतिळ सारखं तुटत असत मन गाभारा बोलत असते जग हे सारे विसरून स्वप्न नेत्रीचे फुलत असते 〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
*लक्षवेधी* रूप धरतीचे पाहुनी झुरतो दूर गगनीचा चंद्र बिचारा लक्षवेधी चांदण्या पाहतात सृष्टीचा सुंदर साज सारा रजनी विखुरले टिपूर चांदणे आकाशी प्रकाशला मंडप जसा वसुंधरेचा फुले पिसारा गगनी दुमदुमला नाद जसा दूर हिरवळ त्या डोंगरकपारी वाहत जाते सरिता वळणावरी जलगंगेचा हा शांत किनारा सुगंध पसरवितो धुंदीत वारा जोडूनी कर अधीरतेने मन हर्षाने फुलत असतं निसर्गाचे हे सौंदर्य पाहुनी क्षणोक्षणी सुखावत असत. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
संस्कारमूर्ती परमपुज्य साने गुरुजी ( जन्म - २४- १२- १८९९) ( मृत्यू - ११-०६- १९५०) 'खरा तो एकची धर्म l जगाला प्रेम अर्पावे'l हे गोड गाणे पूज्य साने गुरुजींनी लिहिलेले आहे. या गीतातून गुरुजींनी जगाला संदेश दिला आहे तो किती अर्थपूर्ण आहे! हे आचरणात आणल्यावरच जाणवेल. आपण साऱ्यांनी गुरुजींच्या संस्कार पथावरून वाटचाल केली तर आपले आयुष्य उजळून जाईल. 'मेणबत्तीप्रमाणे जळावे आणि दुसर्याला प्रकाश देत स्वतः जळून जावे;' जीवनाचे असे वेगळे ध्येय मानून प्रत्यक्षात असेच जीवन जगलेले परमपुज्य साने गुरुजी म्हणजे माणुसकीचा धर्म जोपासणारा एक थोर संतपुरुष होय. पूज्य सानेगुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या पालगड येथे २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. त्यांची आई यशोदाबाई यांनी त्यांच्यावर उच्च जीवन मूल्यांचे संस्कार केले. आपल्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त करताना श्याम म्हणतो ' आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारी तीच'. माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु ,आई कल्पतरु . तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले. प्रेमळपणे बघायला, प्रेमळपणे बोलायला, तिनेच मला शिकवले. मनुष्यावरच नव्हे तर गाई गुरांवर, फुलपाखरांवर ,झाडा झाडांवर, प्रेम करायला तिने ते मला शिकवले. आईचे प्रेम जेथे असेल, ती झोपडी राजराजेश्वरचा ऐश्वर्याला ही लाजवील, हे प्रेम जेथे नाही ,ते महाल व दीवानाखाने म्हणजे स्मशाने होत. एवढं उत्कट प्रेम गुरुजींच्या हृदयात आईविषयी होते. आईच्या बोलण्यातून श्यामच्या मनाला संस्काररुपी शिकवण मिळत होती. समाजाची कामे करणारी माणसे देवाला प्रिय असतात. कोणी हीन - दिन,कोणी श्रेष्ठ-कनिष्ठ नसतो, सगळेच समान असतात, अशा संस्कारांनी गुरुजी घडले होते. खादीचा कुर्ता व धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी अशी त्यांची साधी वेशभूषा असे. साधी राहणी उच्च विचारसरणी असलेले व सर्वांवर भरभरून प्रेम करणारे साने गुरुजी म्हणजे मातृप्रेमाचा मंगलमय साक्षात्कारच. आईच्या प्रेमाची किंमत गुरुजीच्या मनाला समजलेली होती म्हणूनच आई आणि आई स्वरूप माऊलीच्या प्रेमावर अपार भक्ती करणार्या साने गुरुजीची तीन दैवत फार प्रिय होती. जन्म देणारी जन्मदाती आई, आपले पालन पोषण करणारी धरणीमाता आणि जन्मभूमी म्हणजे राष्ट्रमाता. या दैवतावर गुरुजींचे आतोनात प्रेम व भक्ती होती. पूज्य साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वात किती व्यक्तिरेखा दडलेल्या होत्या ते ईश्वरालाच ठाऊक. गुरुजी लेखक होते, कवी, शिक्षक आणि सेवाभावी कार्यकर्ते होते. लोकसाहित्याचे संग्राहक होते. किसान मजुरांच्या चळवळीचे संघटक, प्रभावी वक्ते, दीन -दलितांचे अश्रू पुसणारे जिवलग, आंतर भारतीय प्रवक्ते या रूपात गुरुजी सर्वत्र समाजात वावरले. “ एक परार्धांश गांधी, एक परार्धांश रवींद्रनाथ, एक परार्धांश रामकृष्ण ही गुरुजींची आदर्शवत आहेत. गांधीजींची सेवावृत्ती, रवींद्रनाथ टागोरांची कवी वृत्ती आणि रामकृष्णांची भक्ती असे मिश्रण माझ्यात आहे. हात सेवेत राबवावेत, ओठ एखादे गोड गाणे गुणगुणत असावे, आणि भक्तीने सर्वांविषयीच्या प्रेमाने हृदय भरलेले असावे. ह्या तीन माझ्या क्षुधा आहेत.ह्या तीन वृत्ती समाधान पावल्या की मी समाधानी राहीन असे गुरूजी म्हनत असे. गुरुजींनी जे कार्य स्वीकारले त्या कार्याला उदात्ततेचे स्वरूप होते. दुसऱ्यासाठी काहीतरी करत राहण्यासाठी सदैव तत्पर असायचे. त्यासाठी ते तन -मनाने अपार कष्ट करायचे. आपल्याजवळ जे जे आहे ते सर्वस्वी दुसऱ्याला देऊन टाकण्याची वृत्ती गुरुजींच्या ठायी होती. *'उक्ती आणि कृती'* यात कधीच फरक पडू द्यायचा नसतो. ही शिकवण गुरुजींनी आपल्या वागणुकीतून दिली आहे.दीन दुबळ्यांनविषयी अपार करुणा बाळगणारे मन सर्वांनाच लाभावे म्हणजे जगातील दुःखे आपण कमी करू,शकतो, असा विश्वास साने गुरुजींनी दाखविलेल्या 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' या ओळीवरून यावा आणि आपल्याही मनाला निश्चितपणाने वाटत राहील की, गुरुजी चा सात्विक प्रेमाचा धर्म आपणही अंगीकारला पाहिजे. अशा या महान मायेच्या करुणासागर आत्म्यास व क्रांतिकारी गुरुजीस कोटी कोटी वंदन. 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
कोनाडा पोटाच्या भुकेपायी व्याकूळ पिले पाहती मायची वाट घरट्यात पंखात कधी आणिन दाना मग होईल कधी चिवचिवाट सांजसकाळ चिव चिव होती घरट्यात गजबज दिसती उन्ह,पाणी, गारव्यात दिसे माय पिलास कवेत घेऊन बसे झाडावरचा हा कोनाडा असे काडी काडी बांधून घरटा दिसे येता-जाता न्याहळत ती पिलांसाठी जीव ओतीत असे 〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
प्रज्ञाशोध परीक्षा पुणे जिल्हा 1) पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा कोणत्या वर्षी पासून सुरू झाली आहे? 1) 1995 2) 1996 3) 1997 ✅ 4) 1998 2 ) पुणे नागरी संकुल हे राज्यातील कितव्या क्रमांकाचे नागरी संकुल आहे? 1) पहिल्या 2) दुसऱ्या ✅ 3) चौथ्या 4) आठव्या 3) ' विक्रम' हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोणत्या गावी आहे? 1) भीमाशंकर 2) सासवड 3) आर्वी ✅ 4) राजगुरुनगर 4) राष्ट्रकूट, राजवटीत पुणे या गावाचा कोणत्या नावाने उल्लेख केला जाई? 1) पुण्य 2) पुणेरी 3) पुणे 4) पुनवडी ✅ 5) पुणे जिल्ह्यात पौंड येथे कोणते धरण आहे? 1) जायकवाडी धरण 2) भाक्रानांगल धरण 3) मुळशी धरण ✅ 4) राधानगरी धरण 〰️〰️〰️〰️〰️〰️ संकलन प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
आतुरता दोन नात्यातील संगम असा मनामनातील साधलेला संवाद जसा सहवासात झालेली आत्मीयता तुझ्या येण्याने लागलेली ती आतुरता हृदयात आहे फुललेली एकता प्रीतीची अशीच असते सांगता काही क्षणात जोडलेले प्रेमाचे बंधन माळेतील फुलात फुल जसे ठेवले गुंफून सुखदुःखात एकमेका दिलेली ती साथ अनेक संकटे आली असता करुनी मात असाच असतो प्रीतीचा या मिलाप बांधलेल्या दोन जीवांचा संसाररूप 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
शब्द चारोळी स्पर्धा चारोळ्या 1) मनात दाटलेल्या आठवणीचा भाव कसा मी व्यक्त करू जगणे कठीण झाले आता सांग कसा मी तुला विसरू 2) या जगात स्वतःच स्वतःला सावरायचं असतं, जगणे झाले कठीण तरीही, सोबत कोणी नाही म्हणून रडत बसायचं नसतं. 3) तडकलेच जर ह्रुदय कधी असंख्य यातना होतील मनी जगणे कठीण झाले तरी मज उमजतील भाव आंतरमनी 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
मोत्याचं दान नभा नभा कधी बरसशील तू कडक उन्हाच्या लाहीलाहीने तप्त झालेल्या या धरतीला कधी विसावा देशील तू मनालाही आनंद मिळतो तुझ्या त्या थेंबथेंब येण्याने कासावीस झालेला जीव थंडगार होतो पावसाने लवकर पेरणी कराया रानी बळीराजा वाट बघतोया नभांगणी शेतातील कामाची सुरुवात होते तुझ्या प्रत्येक सरींनी बी - बियाणांची करून पेरणी भरतील मग कणसात दाणी मोत्याचं दान तू देवूनी बळीस पोटासाठी घास मिळेल प्रत्येकास 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
*रोज एक लेख लिहिण्याचा अनुभव* *"साहित्याच्या भूमिवर मी* *पेरली शब्दांची बिजं,* *रोज एक लेख लिहूनी* *फुलवली शब्दांची बाग”* लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की, त्याचं सोनं होतं असं म्हणतात. तसंच आपल्या जीवनाला शब्दांचा स्पर्श झाला की त्याचेही शब्दरूपी सोन होईल. आणि असा परीस मला साहित्य रूपातून आदरणीय येवतीकर सरांच्या रूपाने मिळाला आहे. साहित्य सेवक असलेले येवतीकर सर त्यांचे अनेक लेख, इ बुक, पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. दुसऱ्यांच्या भल्यासाठी झिजाव कसं? दुसऱ्यांना मोठे कसे करावे ? प्रामाणिकपणे आपण आपले काम कसे करावं. हे सर्व त्यांच्या मध्ये असलेले आदर्श गुण पाहायला मिळतात.असे साहित्याची आवड असणारे नासा सरांचे खूप खूप अभिनंदन. *'नादर साहित्य' लिहीत* असलेले नासा सर. साहित्य सेवक समूह तयार करून नासा सरांनी आमच्यासारख्या नवशिक्यांना लेखनाची संधी उपलब्ध करून दिली. रोज एक नवा लेखाचा विषय देऊन सर्व साहित्यिकांना प्रेरित करून प्रोत्साहन देऊन लिहिण्यास प्रवृत्त करत होते. ते पण दहा ते पाच या वेळेतच. म्हणजे बघा वेळेचेसुद्धा पालन करून वक्तशीरपणा सुट्टीच्या काळातही ठेवला. खरं तर लाॕकडाऊन सुरू होता. आपला वेळ कसा जाईल घरातल्या घरातच राहून किती कंटाळवाणे होऊ ही कल्पनाच न केलेली बरी. परंतु अशा या परिस्थितीत नासा सरांनी लेखणीचे कार्य सुरू ठेवले माझ्यासारख्या सर्वांना प्रवृत्त केले. मी हा समूह जॉईन केला तेव्हा पाच लेख पूर्ण झाले होते. त्यानंतर मी समूहात आले. पहिल्याच आठवड्यात माझा फक्त एकच लेख लिहिला गेला. परंतु त्यानंतरच्या आठवड्यापासून मी सतत आज पर्यंत *(41)* लेख लिहिले. माझ्या लेखनिस बहर मिळाली ते सरां मुळेच.माणसाला आवड असली की सवड मिळते आणि सवड काढून मी रोज (प्रत्येक आठवड्यात) सात लेख लिहायचे आणि आठवड्याचे मानकरी व्हायचे ही पर्वणी माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली. उद्या कोणता विषय मिळेल हे ही मी स्वतःच्या मनाला विचारत असे. मी शब्दांच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचले. माझ्या जीवनाचा हा शब्दकमळांचा मळा फुललेला पाहून माझ्या मनाच्या गाभार्यात शब्दांच्या अंतरंगातील अर्थ सौंदर्याचा सुगंध सुटला आहे. माझं मन त्या शब्द सुगंधाने धुंद झालेलं आहे. आता त्या शब्दांशी माझी मैत्री जमली आहे. ही शब्दांची मैत्री कधीच न तुटावी आणि हा साहित्याचा समूह कधीच न बंद व्हावा .असे मला मनोमन वाटते. शब्दाचे हे दालन कधीच न संपावे, व बहरलेल्या लेखणीचे सामर्थ्य त्यातून फुलावे.व मला साहित्य सेवेची सदैव पुजा करण्यात यावी.हीच आशा मनी ठेवून ह्या फुलवलेल्या शब्दमळ्याचे दालन सर्व वाचकप्रेमींना वाचण्यासाठी मिळावे हीच सदिच्छा. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे
अश्रू नजर जरी तु लपवलीस तरीही मज दिसतात नेत्रातील तुझ्या ते अश्रू अबोल प्रित तुझीही सांग कसा मी विसरू वेदना झाकतेस तू मनातल्या तरीही त्या समजतात मला दुःख तुझ्या त्या काळजातले घाव तुझ्या त्या हृदयातले सोसुनी सांगतात मला अबोल तुझ्या ह्या प्रीतीचे भाव मज मनी उमलतात विरहाचे तू देऊनी दान सतत वाहे अश्रू नयनातून हाच संदर्भ मिळे प्रीतीतून 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे
*बेरोजगारी एक भीषण समस्या* आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशात बहुसंख्य लोकांचे पोट शेतीवर अवलंबून आहे. पण आजही बहुतांशी लोक अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करतात. ती पूर्णता बेभरवशाची आहे. अपुरे उत्पन्न तेही निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेले. त्यामुळे शेती वरील माणसे ही बेकारीच्या झुंडीत सामील होताना आज आपल्याला पाहायला मिळते. आज यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. एक यंत्र अनेक माणसाचे काम करते. त्यामुळेही बेकारीत भर पडलेली पाहायला मिळते. बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो त्याला आणखी एक कारण आहे.लोकसंख्यावाढ. या लोकसंख्येच्या वाढीमुळे आपल्यासमोर बेकारीचा प्रश्न उभा राहिलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली तरीसुद्धा आपल्या देशातील सामान्य माणूस हा सामान्यच राहिलेला आहे. जनसामान्यांच्या अन्न,वस्त्र ,निवारा, शिक्षण, आरोग्य या प्राथमिक गरजा सुद्धा भागत नाही,आणि त्यातून दारिद्र्याला आमंत्रण मिळते. व बेरोजगारीचे प्रमाण वाढतच जाते. हाताला काम नाही पोटाला भाकर नाही. अशा परिस्थितीत माणूस आपले जीवन असहाय्यपणे जगतो. अशा बेकारीमुळे कितीजण आत्महत्या करतात. तर काहीजण बायकामुलांना स्वतःला जाळून घेताना दिसतात. चोऱ्या, दरोडे यांच्यात वाढ झालेली आज दिसत आहे. बेरोजगार तरुण आपसुकच गुन्हेगारीकडे वळत आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे आज रोजगार पुरवणे अशक्य झाले आहे. उद्योग जगतात नवीन बदलांचे वारे वाहतात. जुने उद्योग मोडून पडतात. त्यामुळे आणखी माणसे बेकार बनतात. काळ बदलतो लोकांच्या आवडीनिवडी बदलतात जीवनशैली बदलते. राहणीमानात फरक पडतो. त्यामुळे आधीच्या जीवनशैलीच्या अनुरूप असलेले उद्योगधंदे बंद पडतात. जुनी उद्योग बंद पडत असल्यामुळे येथील कामगार बेकार होतात. त्यांच्या रोजगारीच्या वाटा बंद होतात. पण अशा बेकार, बेरोजगार झालेल्या लोकांनी हताश न होता, आपले धैर्य खचू न देता स्वतःचे मनोबल वाढून नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजे. काळानुसार बदललेल्या जीवनशैलीच्या गरजांचा वेध घेतला पाहिजे म्हणजे की शक्ति तिथे कामाला येईल. बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. एक यंत्र अनेक माणसाचे जरी काम करीत असले तरी यंत्रांनी उद्योगाची नवीन दालने उघडून दिली आहेत. हेही मानवाने लक्षात घ्यायला हवे. या यंत्राची निर्मिती, सुट्या भागांची निर्मिती दुरुस्ती ,देखभाल यासाठी माणसाची गरज लागणारच. म्हणून या यंत्रांना आपत्ती न मानता आपल्यासाठी रोजगाराची वाट निर्माण करून देणारे मार्गदर्शकच मानली पाहिजे. बेरोजगारी कमी करायचे असेल तर आपण शेतीची पारंपारिक पद्धत सोडून दिली पाहिजे. तसेच शेतीला पूरक व शेतीवर आधारित असे उद्योग अंगीकारले पाहिजेत. आणि आपल्यामध्ये आळस असता कामा नये.आपल्यात असणारा आळस हा एक बेकारी उत्पन्न करण्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. आपण मुंगी सारखे उद्योगी असणे आवश्यक आहे. 'देगा हरी पलंगावरी' असे तर कधी होणार नाही. माणसाने स्वतः श्रम केले पाहिजेत. बेरोजगारी कमी करण्यासाठी आळसाला दूर लोटले पाहिजे. संतांनीही श्रमाचे महत्व वेळोवेळी सांगितलेले आहे. 'आराम हराम आहे, तर कामात राम आहे'. हे ध्यानात घेऊन श्रम केले पाहिजेत. बेकारी ,बेरोजगार नाहीशी करण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे शिक्षण. परंतु असे शिक्षण जे व्यक्तीला जीवनाभिमुख करणारे स्वावलंबी बनवणारे केवळ पुस्तकी , परीक्षार्थी न राहता उद्योगशील, यांत्रिकीकरणाची माहिती, असे व्यावसायिक शिक्षण घेणे आवश्यक आहे. “व्यवसाय शिक्षण घ्यावे l बेकारीला दूर करावे ll श्रमप्रतिष्ठालाही जपावे l स्वावलंबनाचा मार्ग खरा ll या उक्तीप्रमाणे युवा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःला एका विशिष्ट व्यवसाय करता येईल का, करायला हवा. व त्या अनुषंगाने व्यवसाय शिक्षण घ्यावे. कारण यात स्वतःच्या बुद्धीला वाव आहे. कर्तुत्वाला महत्व आहे. व्यवस्थितपणे व्यवसाय केल्यास आर्थिक प्राप्ती भरपूर प्रमाणात होते. व अल्पावधीतच आपल्या व्यवसायात अनेक बेरोजगारांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देता येतो. व अशाप्रकारे व्यवसायिक शिक्षणाला महत्त्व देऊन बेरोजगारी कमी करता येईल. बेरोजगारीच्या समस्येवर अशा वेगवेगळ्याप्रकारे उपायोजना करून या योजना तातडीने अमलात आणले पाहिजे. जर बेकारीच्या समस्येवर सर्वंकष योजना तातडीने अमलात आणली नाही तर, भविष्यकालीन तरुण पिढी व्यसनाधीन व गुन्हेगारी प्रवृत्तीची निर्माण होईल. व देशात अराजक परिस्थिती निर्माण होईल. म्हणूनच बेकारीची समस्या समाजाला गर्तेत नेणारी आहे, बेरोजगारीचे हे थैमान थांबविण्यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. बेकारीच्या समस्याची जाणीव शासनाला व पर्यायाने समाजाला होणे अत्यावश्यक आहे. बेरोजगारीचे प्रमाण अधिकाधिक वाढले तर देशाची प्रगती होणे केवळ अशक्य होईल. बेरोजगारीचे हे थैमान कमी करण्यासाठी आळस दूर लोटून श्रम केले पाहिजे, शिक्षणाला महत्व दिले पाहिजे, व्यवसायिक शिक्षण घेतले पाहिजे, उद्योगशील राहून छोटे मोठे उद्योगधंदे केले पाहिजे. व बेरोजगारीची ही भीषण समस्या कमी केली पाहिजे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
रेशिमगाठी डोळ्यातल्या पाण्याला स्वतः पुसून घ्यावे हृदयातल्या वेदनेला स्वतः साठवून ठेवावे स्वतः चा स्वतःवर मात्र विश्वास ठेवावा रेशीमगाठी बांधल्या जरी सुटू न द्यावे एकटेपणातच मन रमवावे आणि जगावे सावलीच्या सोबतीने एकट्यानेच चालावे कुणाच्या मदतीची अपेक्षा का करावी कुणाच्या आधाराची अपेक्षा का धरावी जीवन जगताना स्वतःच स्वतः सावरावे स्वतःचा तोल मात्र ढळू न द्यावे प्रयत्न आणि आत्मविश्वासाने जगावे बांधलेल्या रेशीमगाठी सुटू न द्यावे 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे
*अवयवदान हे सर्वश्रेष्ठदान* एका व्यक्तीची संपत्ती विनामोबदला दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची होण्याच्या प्रक्रियेस दान म्हणतात. जे जे आपल्याजवळ आहे , ते,ते दुसऱ्यास देऊन टाकन हे पुण्यप्रद कार्य असतं. महारथी कर्णाची दानशूरता हे सर्वांना ठाऊकच आहे. खरंतर दानास धार्मिक आणि सामाजिक महत्त्व असतं. भूदान, अन्नदान ,नेत्रदान, रक्तदान, ज्ञानदान, अवयवदान आणि देहदान हे असे दानाचे अनेक प्रकार आहेत. परोपकाराच्या निर्मळ भावनेतून जे दान दिले जाते त्यास सत्पात्री दान असे म्हणतात. या सर्व दानाच्या पाठीमागे धार्मिक आणि सामाजिक विचारांची बैठक असते. जेव्हा जीवनाचा अंश म्हणजे नेत्रदान, त्वचादान, किडनी दान असे आपले अवयव दान आपण दुसऱ्यांना देतो तेव्हाच आपले खरेखुरे दान होते. असे दान देणे म्हणजे खरोखर स्वतःसाठी काही प्राप्त करणे होय. वास्तविक परमेश्वर प्रत्येकाचा अंतकरणात आहे. तो प्रत्येक मानवाच्या हृदयात वास करतो. म्हणून माणसाने आपले स्वरूप ओळखावे व या जगावर प्रेम करावे, भेदाभेद करू नये, निर्मळ मनाने जनसेवा करावी. सत्कृत्य करीत रहावे. कारण प्रत्येक सकृत्य हे दानधर्म होय. अवयव दान जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवाचे शरीर क्षणभंगूर आहे. मृत्यू हा अटळ आहे. माणसाच्या जीवनाचं सार दोनच शब्दात सांगता येईल 'आला आणि गेला' मानवाच्या या उंबरठ्यावर यमराज येऊन केव्हा बोलवेल हे सांगता येत नाही. कारण मरण अटळ आहे. मृत्युनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयव रुपी जिवंत राहायचे असेल तर अवयव दान करणे फार महत्त्वाचे आहे. अवयव दान ही काळाची गरज आहे.आपल्या समाजात अवयव दानाविषयी म्हणावी तेवढी जनजागृती झालेली नाही. अवयवदान काय असते? हे सुद्धा काही लोकांना माहीत नाही.अवयवदानाचे ज्ञान हे केवळ नेत्र, किंवा किडनी पुरत मर्यादित नसून शरीराचे सुमारे दहा विविध अवयव आपण दान करू शकतो. त्यासाठी त्याची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. अवयवदानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. माणसाच्या अंगी प्रबळ इच्छाशक्ती असेल तरच अवयवदान शक्य आहे. मानवाने आपल्या मृत्युनंतर जर अवयव दान केले तर कुणालातरी जीवनदान मिळू शकते. म्हणून अवयवदान हे सर्वश्रेष्ठ आहे. जागतिक स्तरावर १३ ऑगस्ट जागतिक 'अवयवदान' दिन साजरा केला जातो. आपल्या मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन आपण फुलवायचे असा विचार केला तर आपण नक्कीच एक चांगले कार्य केले म्हणून समाधानी राहू. व अशा चांगल्या कार्याचे समाजात प्रबोधन व जनजागृती होईल. अवयव दान करायचे झाले असल्यास आपल्याला आरोग्य विभागमध्ये जाऊन एक फॉर्म भरून द्यावा लागतो. असा अर्ज केल्यानंतर आपल्या मृत्यूनंतर ज्या अवयवाचे दान करायचे आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करून आपले संमती पत्र द्यावे लागते. त्यानंतरच अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण होते. २६ऑगस्ट ते १ सप्टेंबर हा 'आय डोनेशन' आठवडा म्हणून साजरा केला जातो. नेत्रदान म्हणजे डोळे डोनेट करणे. त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे फार गरजेचे आहे. नेत्रदान करतानी पूर्ण डोळ्याचे दान केले जात नाही तर डोळ्याचे कॉर्निया चे डोनेट होते ते ट्रान्सपरंट असते. नेत्रदान विषयी काही अंधविश्वास दूर करायला पाहिजे. नेत्रदान ही एक समाजसेवा आहे. ते स्वेच्छेने केलेले कार्य आहे. जर एखादी व्यक्ती आपले 'नेत्रदान' करण्यास इच्छुक असेल तर मृत्यूनंतर त्याचे डोळे काढले जातात. परंतु जर ती व्यक्ती वयस्क असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे डोळे कमजोर असेल, मोतीबिंदू सारखा आजार असेल तर अशा व्यक्तीचे डोळे उपयोगात पडत नाही. नेत्रदान करताना त्या व्यक्तीचे डोळे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असावेत. जर अशा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर चार ते सहा तासाच्या आतच डोळे काढून घ्यायला हवे. आणि नेत्रदान केलेले डोळे तीन ते चार दिवसाच्या आत उपयोगात आणायला हवे. नेत्रदान हे ऐच्छिक स्वरूपाचे असते त्यासाठी कुठलीही जबरदस्ती नसते. आणि हे नेत्रदान करण्यासाठी वयाचे कुठलेही बंधन नाही. तसेच कायद्याचे बंधन नाही. योग्य नियमाचे पालन करून रीतसर अर्ज भरून आपण हे नेत्रदान करू शकतो. आणि एका नेत्रहीन व्यक्तीस नेत्रदान देऊन हे जग दाखवू शकतो. ह्या नटलेल्या सृष्टीचे सौंदर्य दाखवू शकतो. म्हणून प्रत्येकाने एकच संकल्प करावा आपल्या मृत्यूनंतर आपले अवयवदान , नेत्रदान करावे. ही परोपकाराची वृत्ती व मानवतेची प्रतिष्ठा जोपासावी.माणसाने मरावे परी किर्तीरुपी उरावे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे.
*शाश्वती* दिलखुलास व्यक्त होऊन बोलून जगावं माणसानं जगण्याची शाश्वती नसतानाही मनमुराद जगावं माणसांन धुमसणारे दुःख मनातलं सांगून जगावं माणसानं अश्रु डोळ्यातले ओघळणारे पुसून जगाव माणसानं यश मिळाले नाही तरी जीत मानुनी जगाव माणसानं हरुनही जिंकता येतं जीवनाच हे गमक जाणाव माणसांन वाट्यास आलेले सुख-दुःख जाणुनी हसून जगावं माणसांन शेवटी मृत्यू हे अटळ आहे हे सत्य जाणून जगावं माणसांन ✍प्रमिलाताई सेनकुडे.
*नेमीची येतो पावसाळा* धो-धो पाऊस बरसला मुसळधार काळ्या नभातुनी कधी बरसतो डोंगरमाथ्यावरी तर कधी स्पर्शतो गुलाब पाकळ्यातुनी *'नेमीची येतो मग पावसाळा'* असे आपण म्हणत असलो तरी, नित्यनेमाने आपण पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतोच. पाऊस येण्यापूर्वी सारी धरती अगदी तापून निघालेली असते. दरवर्षी पावसाचे आगमन होत असते. प्रत्येक वेळी तो नवीन नव्या रंगरूपात येतो. इंद्रधनुष्याच्या सप्तरंगाची सूर छेडीत येतो तो पाऊसच. प्रत्येकाला आपल्या तारूण्यातला पाऊस ओलाचिंब करतोच असे नाही. कोणाला हा पाऊस कसा वाटेल हे सांगता येत नाही. ' एकदाचा घृणा देऊन जाते शतदा शतदा तुझे पाऊसरुपी प्रतिबिंब आघात करून जाते.' असा हा पाऊस प्रत्येक वेळी नुतन संदर्भ नव्या रंगरूपात घेऊन येतो. या पावसाला सुद्धा भेदाभेद असतोच कधी कोणाला पाऊस आवडणारा असतो, तर कधी नाचणारा, साजिरा गोजिरा, धरणीला ओल देणारा हा पाऊस, तर कधी तन आणि मन भिजवणारा ओलाचिंब पाऊस, असतो तर सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांना सुखविनारा हा पाऊस असतो... पाऊस हा सर्वांना हवाहवासा वाटतो. दरवर्षी पावसाचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले जाते. हा पाऊस जसा माणसाचे मन प्रफुल्लित करतो, तसेच माणसाचे जीवननही फुलवितो. खरंतर माणसाच जीवनच खऱ्या अर्थाने या पावसावर अवलंबून असते. पाऊस हा खरोखरच आपला जीवनदाता आहे. पण केव्हा केव्हा त्याचा रोषही तापदायक असतो. कधी हा पाऊस ओल्या दुष्काळ घेऊन येतो, तर कधी कोरड्या दुष्काळाने येतो. कधी हा पाऊस धो - धो पडत असतो तर कधी हा रिमझिम रिमझिम बरसत असतो. कोणास हा पाऊस म्हणजे मरगळ वाटेल तर काहींना हा पाऊस हिरवी शाल पांघरून जीवन फुलविणारा, शेत पिकवणारा, जीवन गाणे गाणारा वाटेल. असा हा पाऊस म्हणजे निसर्गाचे भावपूर्ण मुद्राच जणू! अवघ्या सृष्टीला हिरवेगार सुख अंगभर लपेटून घ्यायला लावणारा हा पाऊस आपल्या जिवाभावाचा सखा सोबतीच आहे. हा पाऊस अनेक रुपात भेटतो आहे. पाऊस हा माणसाचा पोशिंदा आहे, सुखदाता आणि कठोर शास्ताही ! तो कसाही असला तरी पाऊस हा सर्वांना प्रिय असतो. “आला पाऊस, गेला पाऊस, राने ओली झाली रे l मुरली वाजे ,महिमा गाजे , मनमोहन वनमाली रे l " असा हा पाऊस सुखदायी,आनंददायी सृष्टीचे सौभाग्य आहे, चैतन्यरुपी जीवन फुलविणारा हा पाऊस खरोखरच आपला जीवनदाता आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे
चित्र चारोळी स्पर्धेकरिता 1) माई तू वात्सल्याचा वाहणारा अखंड झरा माई तू जीवन फुलवणारा सुंदर पिसारा माई तू सुखदुःखतला एकमेव सहारा माई तू नवजात शिशुचा संस्काररुपी मनोरा. 2) डोईवर ओझे तोंडाला मास्क बाळास घेऊन निघाली कामास लगबगीने पायी चालत जाती संसार सुखाचा हीच आस 3) मायेच्या कुशीत निजले निवांत प्रेमाचा निर्झर आहेस तू झरा कधी न भासली कशाचीच भ्रांत तुझ्याच कुशीतला वात्सल्य खरा.
धोंड्या धोंड्या तू बोलतोयस खूप काही पण ते मला समजेलच असे नाही जरी मी समजलो तरी दुसरच काही धोंड्या जे तू कधी सांगितलंच नाही धोंड्या माझ्याकडे ज्याचं उत्तर आहे असा प्रश्न तुझ्याकडे पडलेला नाही धोंड्या मला हवे असलेल्या प्रश्नांची कैफियत तुझ्याकडे असेलच असे नाही धोंड्या मला तुला काही खूपसं सांगावसं वाटतं, पण मनातील भाव मनातच राहून जातं . धोंड्या मी बोलावं म्हणून तुलाही ते कान लावून ऐकावसं वाटतं... धोंड्या असं वागणं मला तुझ उमजलं नाही, तुला काय हवं ते मला तरी समजलं नाही. पण माझ्या आवडीनिवडीच तुला काहीच पडलेलं नाही. 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
*जतन करूया पर्यावरणाचे* *“झाडे तोडून करू नका,* *निसर्गाचे प्रदूषण* *झाडे लावा, झाडे जगवा* *जतन करा पर्यावरण”* आज धकाधकीच्या जीवनात माणूस कसा त्रस्त होऊन गेलाय. घड्याळ्याच्या काट्यात माणसाने आपले जीवन बंदिस्त केले. माणसाचा स्वभाव काही विचित्र आहे. आजचा माणुस हा यंत्रयुगाच्या आणि विज्ञानयुगाच्या जाळ्यात अडकला आहे. आपले घर आणि आपला परिसर यांचा किती परस्परसंबंध असतो ही जाणीव ठेवून माणसाने पर्यावरणाचे हित जोपासले पाहिजे. मुंगीपासून गरुडापर्यंत सर्वजण धरतीची प्रकृती सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात; पण माणूस मात्र आपल्या बुद्धिमत्तेने आणि कार्यशक्तीने पर्यावरणाचा तोल बिघडवून टाकत आहे. मानवाचे हे बेजबाबदार वागणे एक दिवस खूप धोकादायक ठरेल. पर्यावरणाचा ह्रास करणाऱ्या या अविचारी माणसाला जागे करण्याकरता 'वसुंधरा दिन' व 'पर्यावरण दिन' पाळायला सुरुवात केली आहे. आजकाल पर्यावरण जपण्याची जाणीव निर्माण झाली आहे. त्यासाठी कायदे नियम केले गेले आहेत. पण ते सर्वचजण आचरणात आणीत नाही. निसर्ग हा मानवाचे प्रेरणास्थान राहिलेला आहेे. या निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहे, निसर्गाने माणसाला मुबलक दिलेली हवा आणि पाणी यांचा योग्य उपयोग माणसाने योग्य चांगल्या प्रकारे केला पाहिजे. उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग करून पर्यावरणाचे जतन केले पाहिजे. कारखान्यातील दूषित पाण्याबद्दल ची जबाबदारी पार पाडणे; ओला कचरा कोरडा कचरा यांची विल्हेवाट लावून विभागणी करणे. सौरऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करणे. या लहानसहान पण फार महत्वाच्या गोष्टी करून ' विशुद्ध पर्यावरण' टिकवणे हे मानवाच्या हातात आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचे जतन केले पाहिजे. पर्यावरण जतनाची निष्ठा प्रत्येकात रुजली गेली पाहिजे. तेव्हाच प्रगतीपथाची वाटचाल सुरू होईल. निसर्गाचे सौंदर्य वर्णन करताना कवी भा. रा. तांबे यांनी अतिशय सुंदर सौंदर्य निसर्ग कवितेतून मांडले आहे. "हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे झोके घेते कसे , चहुकडे हिरवे गालीचे l सोनेरी ,मखमली ,रुपेरी पंख कितीकांचे रंग कितीवर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे l" आकाशातील बदलणारे नित्य रूप रंग पाहून कवीने सौंदर्य रेखाटले आहे. कवी, लेखक यांच्या वाणीला निसर्ग सौंदर्यामुळे भरती येते. या निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहे. निसर्ग माणसाची भूक भागवतो, तहान शमवीतो, सुगंधी फुलांनी त्याचे जीवन सुगंधित करतो, थकल्या भागलेल्यांना सावली देतो, मंद मधुर वायूलहरीचा परिहार करतो. निसर्ग मानवाला फळे,फुले ,सावली देतो. या निसर्गाचे आणि मानवाचे अतूट नाते आहे. माणूस पर्यावरणाशिवाय राहू शकत नाही. निसर्ग माणसाचा सखा सोबती आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.प्रत्येक माणसाने पर्यावरणाचा दृष्टिकोन ठेवून पर्यावरणाचे महत्त्व जाणून, पर्यावरण जागरूक नागरिक आता तरी व्हायला हवे. मानवाने सृष्टीचे सौंदर्य जोपासून पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍ लेखन प्रमिलाताई सेनकुडे
जगास या प्रेमाने जिंकुया ध्येय,चिकाटी,ह्दयी रुजवुया मायेच्या शांतीने मनास सजवूया दरवळेल सुगंध जीवनी तुमच्या जगास या प्रेमाने जिंकुया एकीची, शांतीची बाग फुलवूया नेकीची, प्रीतीची भाषा बोलूया जाळूया अहंकार मनातला जागवूया माणूस माणसातला जगास या प्रेमाने जिंकुया.. जीवन जगूया सन्मानाचे टाळुनी आचरण दहशतीचे ज्योत समतेची पेटवुया जगास या प्रेमाने जिंकूया तुटली इथे नाती जणू कोसळल्यात वाती जणू बोल प्रीतीचे बोलूया जगास या प्रेमाने जिंकू या ज्योत पेटवुया मानवतेची समानता आणि बंधूतेची आनंदाचे जीवन जगूया जगास या प्रेमाने जिंकू या देह आपला झिजऊनी कल्याण मानवाचे साधुया उच्चनीचतेच्या पाडूनी भिंती जगास या प्रेमाने जिंकूया.. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
आत्मनिर्भर बनू या 'स्वतः स्वतःची चांगल्या प्रकारे जबाबदारी घेऊन योग्य वर्तन करणे म्हणजे आत्मनिर्भरता होय.'प्रत्येक व्यक्तीने स्वहितासाठी व समाजहितासाठी विधायक कार्य करणे म्हणजे आत्मनिर्भरता होय. 'आत्मनिर्भरता म्हणजे स्वावलंबन होय', सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हाच एक प्राणी आहे कि ज्याला हात दिलेले आहेत तेही श्रम करण्यासाठी विश्राम करण्यासाठी नव्हे.इतर प्राण्यांना पाय तेवढे आहेत. हाताचा विश्राम, आळस हा आपल्याला परमेश्वराने दिलेल्या हाताचा अवमान आहे. हा अवमान होता कामा नये. म्हणून प्रत्येक व्यक्तीने श्रमाचा विश्राम, विसर, अवमान होउ देता कामा नये. त्यासाठी प्रत्येकांना स्वावलंबी असणे आवश्यक आहे. या स्वावलंबनातूनच आत्मनिर्भरता निर्माण होते. मानव हा समाजशील प्राणी आहे. विचारशील प्राणी आहे. आपल्या जीवनोपयोगीचे ज्ञान दुसऱ्याच्या मदतीशिवाय स्वतः मिळण्याची शक्ती तो स्वावलंबनातून प्राप्त करू शकतो. आणि आत्मनिर्भरतेने आपले जीवन जगण्यात समर्थ ठरतो. माणूस सहृदयी आहे असे आपण म्हणतो. दुसऱ्याचे सुखदुःख जाणता येणारे संवेदनशील हृदय माणसाला लाभले आहे. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणे आणि त्याच्या दुःखाने दुःखी होणे हे मनुष्याची लक्षण आहे. आणि सुखदुःखाच्या पलीकडे जाणे, हे महापुरुषाचे किंवा संतांचे लक्षण आहे. जोपर्यंत आपल्याच सुखाची चिंता असते, तोपर्यंत पशुता असते, जेथे दुसऱ्याच्या सुखाची चिंता सुरु होते, तेथे मानवतेची सुरुवात होते. माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही मानवतेची शिकवण अंगी ठेवून प्रत्येकाने मानवताधर्म बाळगावा. प्रत्येक मनुष्याने सामाजिक उत्तरदायित्व ओळखून निस्वार्थीपणे आपले जीवन जगावे. थोडक्यात सांगायचे म्हणजे सर्वार्थाने मीच माझ्या रक्षक आहे. व म्हणून मी माझे स्वहित व समाजहित जोपासून आत्मनिर्भर बनणार आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
भ्रष्टाचाराचा भस्मासुर आजच्या काळात भ्रष्टाचार हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. माणूस भ्रष्टाचारी का होतो? त्याच्या साऱ्या श्रद्धा निष्ठा का हरवतात? स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अमानवी कृत्य का करतो? मंदिराचा सुवर्णकळस घडवणारा कळसातील सोने चोरतो, तेव्हा त्याच्या आचरणाला काय म्हणावे? माणसाच्या या सार्या वृत्तीला एकच कारण आहे आणि ते म्हणजे 'माणसाची उपभोगवादी वृत्ती'! ही उपभोगवादी वृत्ती माणसाच्या अंगात जोपर्यंत आहे तोपर्यंत तो भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेला असेल. आजकाल भ्रष्टाचार हा गरीब-श्रीमंत सगळेच करताना दिसतात. सुव्यवस्था व सुविद्य माणसे आपली विद्वत्ता वापरून भ्रष्टाचार करतात. फार प्राचीन काळी भ्रष्टाचार नावाचा हा शब्द अस्तित्वात नव्हता. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचारी माणसाला अतिशय कमी लेखले जाई. भ्रष्ट आचरण करणाऱ्याला वाव नव्हता. पण आज सार्या नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला आहे. आज एकही असे क्षेत्र नाही तेथे भ्रष्टाचार होत नाही.आज भ्रष्टाचार या शब्दाचा समाजजीवनात सर्रास प्रयोग करण्यात येत आहे.भ्रष्टाचाराचा भस्मासुर सर्वत्र बोकाळला आहे. भ्रष्टाचाराची वाळवी आज समाज मनाला पोखरू लागली आहे. समाजातून मानवीय नीतिमूल्यांचा नाश होत असून आज समाजामध्ये लाच घेणे, खोटे बोलणे, फसगत करणे, चोरटा व्यापार करणे, आयकर चुकवणे, अफरातफर करणे, बळजोरी करणे इत्यादी अनैतिक मार्गाचा अवलंब होऊन या अनेकविधी भ्रष्टाचार भ्रष्टाचाररुपी प्राण्यांने संपूर्ण समाज डोंगर पोखरून काढलेला आहे. आज भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात माणूस अडकत चालला आहे. आता या भ्रष्टाचारातून माणसाची सुटका होणार तरी कधी? हा प्रश्न पुन्हा पुन्हा मनाला भेडसावत आहे. हा भ्रष्टाचाराचा भस्मासुर आपले उघड उघड आकांत तांडव करून समाजाला काळीमा फासण्याचे काम करत आहे. भ्रष्टाचाराचा ओघ अव्याहतपणे सुरूच आहे. या अव्याहतपणे चालणाऱ्या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला कधी पायमल्ली बसते? कधी आळा बसतो? असा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतो? 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
*प्रेरणा / प्रोत्साहन* मनुष्याच्या जीवनात ज्या काही विकासासाठी, तेजविकासासाठी घटना घडतात त्या त्यांचं जीवन गतिमान, प्रवाहित करण्यासाठी होतात. कोणत्याही प्रसंगानुसार घडलेल्या घटनेला माणसाने निराशा ओढवून माणसाच्या मनातल्या दुर्दम्य आशेला बळ मिळत नाही. आपल्या ध्येयपूर्तीच्या मार्गात येणाऱ्या बाधांमुळे निराशेला कधीही जवळ करु नये. याउलट जगाचा प्रवास करताना आलेल्या विविध अनुभवातून आपण प्रेरणा घेऊनच योग्य वाटचाल केली पाहिजे. हेच जीवनाचे वास्तव आहे. अनेक समस्यांवर मात करून आपण आपले कार्य त्यावर उपाय शोधून अविरतपणे चालू ठेवणे जीवनाची हीच खरी प्रेरणा आहे. मनुष्य एखाद्या घटनेत सकारात्मक विचार करण्याऐवजी नकारात्मक विचारांना अधिक प्राधान्य देतो त्यामुळे त्याच्या आशेचा अंकुर नष्ट होण्यास फारसा वेळ लागत नाही.त्यामुळे माणसाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले कार्य केले पाहिजे. या कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते. निसर्गाच्या सनिध्यातून आपल्याला ईश्वराच्या कर्तुत्व शक्तीचा आविष्कार पाहावयास मिळतो त्यातूनही व्यक्तीस प्रेरणा मिळत असते. कलेला प्राधान्य मिळत असते. जसे की रांगोळीची कल्पना माणसाला आकाशातील नक्षत्र यांवरून सुचली. निसर्गातून कविला कविता करण्याची प्रेरणा मिळाली. "हे सृष्टी म्हणजे अन्योक्ती आहे. दिसायला जरी सृष्टी असली तरी असायला देव असे" असे विनोबाजी भावे म्हणतात. मानवी जीवन हे कलेमुळे समृद्ध बनते. आणि ह्या कलेचे प्रोत्साहन त्याला सृष्टितून सतत मिळत असते. उदा. फुलपाखराच आयुष्य फक्त काही दिवसाच असतं तरीही ते अनेकांच्या आयुष्यात रंग भरतं आपल्यासारख्या माणसांना तर कित्येक वर्षाच आयुष्य लाभतं. मग या फुलपाखरा कडून आपण प्रेरणा घ्यायला हवी. दुसऱ्याने केलेल्या चांगल्या कार्याला आपण प्रेरणा द्यायला हवी. आपण दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्याच्या आयुष्यात आनंदाचे रंग-तरंग उमलतात. काहीतरी नव करण्याची उमेद मिळते. आपल्याकडून मिळालेली हीच प्रेरणा त्याच्या आयुष्यात नवसंजीवनीचे कार्य करते. म्हणून आपण प्रेरणा, प्रोत्साहन,उत्साह , हिम्मत, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची विचारसरणी ठेवली तर आपण तर समाधानी, आनंदी राहतोच परंतु दुसऱ्याच्या जीवनात आनंदाचे झरे निर्माण करता येतील. ही स्फुर्तीदायी प्रेरणा सर्वाना लाभो. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड
*☘शिवार☘* पहाटेचे हे ऊन कोवळे धरती वरती पडे तृणपात्यावर बसून दवबिंदू संगे खेळ गडे रानामधी गुरे चरती हर्षाने वाहती झरे रान फुलांचा गंध हा चहू दिशांनी दरवळे दाट हिरव्या झाडीत कोकिळेचे गोड गाणे जललहरी वाहत असता वायु सांगे मज तराणे शिवारात उभे राहुनी आनंदाने वाहती झरे पक्षीही किलबिल करती फुलपाखरू भिरभिरे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍काव्यलेखन श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
समूहगीत तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा ll धृ ll तपोवनातून तुझ्या उजळती, उपनिषदांची वाणी मातीमधुनी तुझ्या जन्मल्या, नवरत्नांच्या खाणी जययुग धर्माचा देशा, जय नव सूर्याच्या देशा ll१ll श्रमातून पिकलेली शेती, पहा डोलती धुंद, घामाच्या थेंबातून सांडे, हृदयातील आनंद, जय हरितक्रांतीच्या देशा, जय विश्वशांतीचा देशा ll२ll पहा झोपड्या कंगालांच्या, थरथरल्या भोवताली, अन्यायाला जाळीत उठल्या, झळकत लाख मशाली, जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा ll३ll तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा llधृll संकलित
*एकाग्रता* *'एकाग्र करी मन l तेणे होईल समाधान रे' l* हे ज्ञानेश्वर माऊलीचे सुवचन ऐकले की एकाग्रतेने किती समाधान लाभते हे जाणवते. आपल जीवन यशस्वी करायच असेल तर आपण मनापासून एकाग्रतेने काम केले पाहिजे. तरच आपलं जीवन यशस्वी होतं. ' सर्व जगाला विसरुन मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात'. एकाग्रता म्हणजे एकचित्तता. ही एकचित्ता आपल्याला आपल्या कामात यश मिळवून देते. आपल्या कामात द्विधा मनस्थिती असेल तर त्या कार्याचा नाश होतो. मननामुळे माणसाला एकाग्रता लाभते. तसेच आपल्या मनाचा एक दोष आहे तो म्हणजे चंचलता. माणसाचे मन हे चंचल असते. हे चंचल मन वाऱ्यासारखे धावत असते. या चंचलतेमुळेच मनात संकल्प ,विकल्प निर्माण होतात.हे स्वैर धावत सुटलेले मन सावरायचे असेल तर आपल्या मनाची सर्व शक्ती दृढपणे स्थिर करून एकाग्रता निर्माण करावी लागेल. तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. माणसाने आपल्या कामात इतके तन्मय व्हावे की समोर कोणी जरी आले तरी आपल्याला ते माहित होऊ नये. एकदा नेपोलियनला बिन साखरेचा चहा दिला.नेपोलियनने तो चहा चटकन पिऊन टाकला. तो आपल्या कामात इतका तन्मय होता की चहात साखर नाही हे त्यांना कळलेच नाही. अशी एकाग्रतेची ,तन्मयतेची, एकरूपता, एकचित्तता, तल्लीनता ची कितीतरी उदाहरणे आहेत. एकाग्रता साध्य करण्यासाठी मनुष्याच्या डोळ्यापुढे एक विधायक ध्येय साधना पाहिजे. आपण ध्येयधुंद होऊन कार्य केले तर जीवनाची यशश्री लाभते. म्हणून माणसाचे मन हे बुद्धीच्या अनुरोधाने चालणारे असावे. बुद्धीने सांगावे,मनाने करावे. मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असावे. तरच योग्य निर्णय घेता येते. एकदा द्रोणाचार्यांना आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायची होती. झाडावर एक पक्षी टांगला होता, आणि त्याच्या डोळ्याचा वेध करायचा होता. आचार्यांनी प्रत्येक शिष्याला जवळ बोलावून विचारले, " तुला काय दिसते?" सगळे म्हणाले झाड दिसते, पाने दिसतात, पक्षी दिसतो. परंतु एकटा अर्जुन म्हणाला, " मला फक्त डोळा दिसतो". अर्जुनाच्या या एकाग्रतेतमुळेच तो वीर धनुर्धर बनला. एक अद्वितीय धनुर्धर म्हणून अर्जुनाची ओळख आहे. “ध्यान, एकाग्रता ही एक सदैव सज्ज असणारी, उपयोगी व संकटात मुक्त करणारी फायदेशीर सवय आहे. एकाग्रता आपल्या जीवनातला एक परम आवश्यक गुण आहे. ”असे चार्लस् डिकन्स या विचारवंताचे मत आहे. म्हणून माणसाने आपला प्रत्येक क्षण आणि सर्व शक्ती कर्मातच उपयोगीली पाहिजे. अशी ध्यान आणि एकाग्रता ची सवय ठेवावी. एकग्रतेसाठी संयमाची अत्यंत आवश्यकता आहे. जीवनाचे स्वरूप उलगडायचे असेल तर व्यक्तीने आपले वळण संयमाकडे आहे की स्वच्छंदाकडे आहे हे जाणून घेतले पाहिजे. विनोबा भावे यांनी म्हटले आहे की " संयम ही जीवनाची किल्ली आहे". संयमाची ही जीवनाची किल्ली आपल्याजवळ असेल तर आपल्याला एकाग्रतेची सवय लागेल. आणि आपले मन एकाग्र झाल्यावर आपल्याला अशक्य असे एकही काम नाही. जर एकाग्रतेचा अभाव असेल तर आपले एकही काम यशस्वी होणार नाही. या एकाग्रतेच्या अभावामुळे आपली शक्ती विकेंद्रीत होऊन तिचा अपव्यय होतो. म्हणून जीवनात एकाग्रता, तन्मयता, एकरूपता , एकचीत्तता, परिमिततता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माणसाने एकाग्रतेने काम करावे तरच समाधान मिळते. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या सुवचनात म्हटले आहे *'एकाग्र करी मन l तेणे होईल समाधान रे l'* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जि. नांदेड.
स्वभाव प्रत्येक माणसाचा वेगळा असा खास एक स्वभाव असतो. त्या व्यक्तीने आपल्या जीवनातील केलेल्या कार्याच्या त्याच्या स्वभावावर छाप पडतं असते. माणसाच्या स्वभावावर त्याचे यश-अपयश अवलंबून असतं. प्रत्येक माणूस आपल्या स्वभावानुसार प्रत्येक प्रसंगाचं मूल्यांकन करीत असतो. परंतु अस म्हणतात 'माणसाच्या स्वभावाला काही औषध नसते.' माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही. कुत्र्याचे शेपूट जसे वाकडेच असते तसे माणसाच्या स्वभावाचे विचित्र आहे. काही माणसं नम्र असतात तर काही माणसाच्या अंगी नम्रता नसते. काही माणसं सदाचारी वर्तन करतात तर काही भ्रष्टाचारी वर्तन करतात. काही माणसं सज्जन वाटतात तर काही दुर्जन वाटतात. काहीजण शांत, संयमी, शिस्तप्रिय, विवेकी, सद्गुणी, नियमांचे काटेकोर पालन करणारे, नीटनेटकी, वक्तशीरपणा अंगी असलेले असतात, तर काही व्यक्ती हट्टी, रागीष्ट, उतावीळ, चिडखोर अशा स्वभावाची असतात. एकूणच माणसाच्या स्वभावाचं गणित नक्की काही मांडता येत नाही. 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न स्वभावाचे असते. प्रत्येकाचा स्वभाव एकमेकांच्या मध्ये मिसळेलच असे काही नाही. एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडतो तर एखाद्या व्यक्तीस एखाद्याचा स्वभाव आवडत नाही. प्रत्येक व्यक्तीचे मते भिन्न असते. अशा भिन्न व्यक्तीचा प्रवृत्तीचा माणूस तो आपल्या विचारानुसार आपल्या मतानुसार समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याशी जुळवून घ्यायचा की नाही ते तो व्यक्तिशः ठरवत असतो. खर तर माणसाच्या अंगी नम्रता हा गुण असणे आवश्यक आहे. सर्व सद्गुणांचा सुंदर पाया म्हणजे नम्रता होय. आपल्या स्वभावातील नम्रता ही आपल्या सर्व कार्यसिद्धि ची पहिली पायरी आहे. ज्या व्यक्तीचा स्वभाव नम्र असतो अशी व्यक्ती दुसऱ्याच्या हृदयात वास करते. दुसऱ्याचे मन नम्र व्यक्तीस जिंकता येते. आपले स्वतःचे जीवन आपल्याला सुखी, संपन्न ,आनंदी, निर्मळ, निर्भय, प्रफुल्लित, प्रसन्न ठेवायचे असेल तर आपल्या हृदयात आनंदाचा झरा फुलवायचा असेल तर आपला स्वभाव सुस्वभावी व नम्र असावा. तरच आपण आपला सूस्वभावाच्या बगीच्यात आनंदाने राहू, आपल्या मनात हा बगीचा फुलवू. त्यासाठी सद्गुणांची संपत्ती वाढवावी लागेल. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे
*कृती गीत* *पाच या अंकाचे गाणे* शिकूया सारे गोष्टी पाच छूम छूम छननन करूया नाच बदके,कावळे ,चिमणी ,पोपट कोकिळा मिळून पक्षी पाच छूम छूम छननन करूया नाच ll१ll कुत्रा ,मांजर ,घोडा, बकरी, गाय मिळूनी प्राणी पाच छूम छूम छननन करूया नाच ll२ll मोटर ,टांगा ,सायकल ,होडी , विमान मिेळूनी वाहने पाच छुम छुम छननन करूया नाच ll३ll गुलाब, झेंडू ,जाई, कणेरी, सदाफुले ही फुले पाच छूम छूम छननन करूया नाच ll४ll आंबा, पिंपळ, वड ,बाभूळ, अशोक मिळून झाडे पाच छूम छूम छननन करूया नाच ll५ll तर्जनी, मध्यमा,अनामिका, करंगळी,अंगुठा मिळूनी एका हाताची बोटे पाच छूम छूम छननन करूया नाच ll६ ll संकलित
*धैर्यासारखे बळ नाही.* कोणत्याही व्यक्ती जवळ धैर्य व चिकाटी असेल तरच तो आपल्या सर्व इच्छा यशस्वी करू शकतो. कारण धैर्य आहे तेथे विजय निश्चितच आहे. धैर्य हे माणसाच्या हातातील एक मोठे हत्यारच आहे. या धैर्याच्या जोरावर माणसाला समर्थपणे आपले जीवन जगता येते. 'धैर्य हे मनुष्याजवळ असणारे खरे शौर्य आहे.' असे ॲन्टोनियो या विचारवंताने म्हटले आहे. माणसावर एखादा कठीण प्रसंग ओढवला तर अशा संकटाला सामना करण्यासाठी आपल्याजवळ धैर्य, हिंमत असावी लागते . अशा संकटसमयी जर आपण हिम्मत ठेवली तर जीवनाची अर्धी लढाई आपण आधीच जिंकू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर आपण त्या व्यक्तीस खचून जाऊ न देता सांत्वनपर बोलून त्या व्यक्तीला हिम्मत द्यावी, त्याचे मनोबल वाढवावे, धैर्य वाढवावे. कारण माणसाच्या जीवनात धैर्यासारखे दुसरे बळ नाही. माणसाच्या दुबळेपणावर मात करण्याची शक्ती धैर्यामध्ये असते. दुबळ्या शरीरात शक्ती निर्माण करून प्राणवायू देत असते ते धैर्य होय. कोणत्याही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची वृत्ती म्हणजे धैर्य होय. परंतु या धैऱ्याचा अतिरेक होता कामा नये. जर अतिरेक झाला तर त्याला दुर्गुणाचे स्वरूप प्राप्त होते. परंतु याचा अर्थ असा होत नाही की माणसाने आपले धैर्य सोडून द्यावे. जीवनातील संकटांचा समुद्र पार करायचा असेल तर माणसाला धैर्या च्या जहाजातून प्रवास करावा लागतो. या धाडसाने केलेल्या प्रवासामुळे तो आपल्या जीवनाची नौका यशस्वीपणे पार करू शकतो. कारण ध्येयाच्या मार्गावरून जाताना धीरगंभीर व्यक्ती आपले धैर्य कधी गर्भगळीत होऊ देत नाही. ज्यांना आपल्या जीवनात काही ठोस करून दाखवायचे असते ते धैर्याने पावलं पुढे टाकीत असतात. अशी व्यक्ती धोका पत्करून संकटाचा सामना करून धैर्याने पुढे जात असते. अशा हिमतीने काम करण्याच्या मनोवृत्तीला धैर्य असे म्हणतात. अशा व्यक्तीचे धैर्य कोणी नष्ट करू शकत नाही. म्हणून माणसाने हिम्मत सोडायची नाही, धैर्याने राहायचे मग प्रसंग कोणताही असो. कारण 'ज्याच्यात हिम्मत आहे त्यालाच या जगात किंमत आहे'. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि. नांदेड.
*सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा* विषयः मराठी (व्याकरण) १) खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? मी दररोज शाळेत जातो १) , २) ? ३) .✅ ४) ! २) वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे? १) पूर्णविराम✅ २) अपूर्णविराम ३) अर्धविराम ४) स्वल्पविराम ३) दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्हे वापरावे? १) ' ' २) --✅ ३) " " ४) ; ४) खालील वाक्यातील काळ ओळखाः मुले शाळेत गेली आहेत. १) पूर्ण वर्तमानकाळ २) पूर्ण भूतकाळ✅ ३) अपूर्ण वर्तमानकाळ ४) पूर्ण भविष्यकाळ ५) ' मी आंबे खाल्ले होते' या वाक्याचे पूर्ण वर्तमानकाळी वाक्य खालीलपैकी कोणते? १) मी आंबे खाल्ले असतील. २) मी आंबे खातो. ३) मी आंबे खात आहे. ४) मी आंबे खाल्ले आहेत.✅ ६) 'अभियान' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? १) अभियान २) मोहीम✅ ३) आव्हान ४) अभिनव ७) ' चांदणे' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? १) कौमुदी २) तारका✅ ३) जोत्सना ४) चंद्रिका ८) 'आगंतुक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? १) अभिवादन २) अनपेक्षित ३) आमंत्रित✅ ४) सहेतुक ९) खालील पर्यायातील अशुद्ध शब्द कोणता? १) शरदचंद्र २) कोट्यधीश✅ ३) शारीरिक ४) आशीर्वाद १०) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? १) कनिष्ट २) कनीष्ठ ३) कनिषठ ४) कनिष्ठ✅ 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍ प्रमिलाताई सेनकुडे.
श्लोक मना सर्वदा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडूनी द्यावे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुचि शोधूनी पाहे मना त्वाची रे पूर्व संचिते केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोक चिंता नको रे विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी संकलित
पञलेखन नोकरीसाठी बाहेर गावी गेलेल्या मुलाचे वडीलास पञ श्री दि.२६-०५-२०२० तीर्थस्वरूप बाबास श्री साष्टांग नमस्कार. वि.वि.पत्र लिहिण्यास कारण की मी घरून निघालो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच शहरी पोहोचलो. माझ्या मित्राने अगोदरच रूम पाहून ठेवले असल्याकारणाने मला रूमवर जायला फारसा वेळ लागला नाही. माझा मित्र आनंद मला रेल्वे स्टेशनला घ्यायला आला होता. त्यानंतर आम्ही दोघे मिळून घरी पोहोचलो. तिथे गेल्यावर मी फ्रेश होऊन जेवण केले. त्या दिवशी मला मेस चा डब्बा खावा लागला. जेवण करता करता मला आईने बनवलेल्या स्वयंपाकाची फार आठवण आली. इतकी वर्षे तिच्या हातचे जेवण जेवून मला सवय झाली होती. बाबा त्यादिवशी मी आरामाच केला. दुसर्या दिवशी पहाटेच उठून नोकरीवर पहिला दिवस असल्याकारणाने जायचे होते. नोकरीचा पहिला दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आनंदाचा होता. मी तयारी केली आणि लगेच ऑटो रिक्षा बसून ऑफिसला गेलो. तिथे गेल्यावर मला सगळे नवीन नवीन वाटले. सर्वांची ओळख झाली. मी ही माझी ओळख करून दिली. मला नेमून दिलेले काम मी दिवसभर करून सायंकाळी रूम ला पोहोचलो. खूप थकून गेलो होतो. चहा घ्यावा वाटत होता. आईची खूप आठवण आली. ती मला वेळोवेळी चहा जेवण नाश्ता किती आनंदाने करत होती व देत होती.बर असो. त्यानंतर फ्रेश होऊन मी पायऱ्या उतरून खाली गेलो चहाच्या कॅन्टीन मध्ये जाऊन चहा घेतला. लगेच परतलो. मित्राने येता येताच मेस चा डब्बा आणला दोघे मिळून जेवण केलं. मला जेवण गेले नाही. कारण जी भाजी सकाळच्या डब्यात होती तीच भाजी संध्याकाळी सुद्धा आली होती. खूप दुःख वाटले. बरं असो. बाबा तुम्ही माझी काळजी करू नका. मला आता हळूहळू सवय होऊन जाईल. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या व आईच्या तब्येतीची काळजी घ्या. आईला म्हणावं माझी आठवण आली तर रडत जाऊ नकोस. लवकरच मी सुट्टी पाहून घरी तुम्हाला भेटायला येईल. तोपर्यंत असंच संभाषण करत राहू. आई बाबा मला तुमची खूप खूप आठवण येते. पुन्हा एकदा तुम्हा दोघांना नमस्कार. तुमचा लाडका मुलगा पवन 〰️〰️〰️〰️〰️〰
स्वागत गीत स्वागत तुमचे श्रेष्ठांनो ,स्वागत तुमचे रसिकांनो ,स्वागत तुमचे...... पुलकित होती ती मने आमची घडता दर्शन राष्ट्रभक्तीचे, स्वागत तुमचे...... स्वधर्मविन जरी नसे सामना, बंधू प्रितीची वसो भावना, गावच्या क्रीडांगणी, कसबस दिसावे शौर्याने , स्वागत तुमचे...... विदर्भाची ख्याती भुवनी, अतिभास्तववाद असे अग्रणी प्रतीक असे हे इयत्तानगरी परस्परांच्या सहकार्याने स्वागत तुमचे....संकलन/ लेखन प्रमिलाताई सेनकुडे ता हदगाव जि नांदेड.
आईवडिलाचे आपल्या लाडक्या मुलीस पञ दि.२५-०५-२०२० श्री प्रिय लाडलीस आई बाबाचा शुभ आशीर्वाद. तुझे पत्र मिळाले. पत्र वाचून फार फारआनंद झाला. तू लिहिलेल्या पत्रातील मजकुरातील शब्द आम्ही दोघांनी खूप खूप वेळेस वाचले. तुझे पत्र वाचून आमचे मन भारावून गेले. तू तिकडे तुझ्या संसारात रमलीस यातच आम्हा दोघांना खूप आनंद आहे. आपली मुलगी दिल्या घरी सुखी आहे, आनंदी आहे हीच आईवडिलांसाठी मोठी गोष्ट असते. आमच्या दोघांची तू काही काळजी करू नकोस. आम्ही इकडे आनंदात आहोत. तू तुझी व घरातील सर्व मंडळींची काळजी घेत जा. घरातील सर्वांना आनंदी ठेवण्याचे काम आता तुझे आहे. सर्वांचे सुखदुःख जाणणे व प्रेमाने राहणे हे काम आता तुझे आहे. कारण तू त्यांच्या घरची लक्ष्मी आहे, सून आहेस, व मुलगी सुद्धा आहेस. सासू-सासर्यांची सेवा करणे, व जावईबापूंना अगदी आनंदात ठेवून त्यांची सहचरणी म्हणून सोबत देणे हे तुझे कर्तव्य आहे. तू घेतलेल्या शिक्षणाचा फायदा घेऊन आपल्या संसाराला हातभार लावशील हीच अपेक्षा ठेवून आम्ही तुला जे उच्च शिक्षण दिले त्याचे सार्थक आम्हाला वाटेल व तुलाही आनंद मिळेल. बर असो. तू व तुझा परिवार सुखरूप, कुशलपूर्वक आहे. त्यातच आमचा आनंद आहे. तुझ्या घरच्या मंडळींना आमच्याकडून सप्रेम नमस्कार, तसेच जावईबापूंना व तुला अनेक शुभ आशीर्वाद. बेटा अधून मधून वेळात वेळ काढून पत्र लिहीत जा. व सर्व कुशल मंगल आहेत की नाही ते आम्हाला कळवत जा. आम्ही ख्यालीखुशाली तुला कळवत जातो. आमच्या दोघांची तब्येत चांगली आहे काही काळजी करू नकोस. तू पण तुझ्या व परिवारातील सर्वांच्या तब्येतीला जप. कारण आता कोरोना आजाराचे संकट आहे. हा आजार महाभयंकर असल्यामुळे आपण सर्वांनी व्यक्तिशः काळजी घेणे गरजेचे आहे. आवश्यक तेव्हाच बाहेर जा. नाहीतर घरीच रहा , सुरक्षित रहा, स्वतःस जपा. ठीक आहे बेटा. तुझी आठवण आम्हाला येते. व तुलाही आमची आठवण येते. आठवणीच्या मनातील कल्लोळ चालूच राहणार आहे. लवकरच हे कोरोणाचे संकट गेल्यावर मी तुला भेटायला येईल. काळजी घ्या, सुखरूप रहा, आनंदी राहा. कळावे तुझेच आईबाबा. प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जि. नांदेड.
*📚पत्रलेखन📚* *विषयः सासुरवाशीन मुलीचे आईवडीलास पञ.* (दि. 24- 05-2020) *श्री* तीर्थस्वरूप आई-बाबास चरणी श्रीसाष्टांग नमस्कार.वि.वि. पत्र लिहिण्यास कारण की आईबाबा मी बरेच दिवसा नंतर आपणास पत्र लिहीत आहे. क्षमा असावी. आईबाबा मला तुमची फार आठवण येते ग. तुम्ही खुशाल आहात ना! इकडे माझ्या सासरची सर्व मंडळी व मी कुशलपूर्वक आहे. ईश्वर कृपेने आई-बाबा तुम्ही पण कुशलपूर्वक असालच. आई बाबा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेत जा. वेळेवर जेवण करीत रहा. मी इकडे खूप आनंदात आहे. माझी काळजी करत जाऊ नका. माझ्या घरची मंडळी अतिशय चांगली आहे. माझे सासू-सासरे, व तुमचे जावई हे सर्व जण मला खूप लाडात ठेवतात. मी सासरी आहे की माहेरी आहे हा भास सुद्धा मला होऊ देत नाहीत. अगदी लाडाने मला वागवतात. आई तू बाबा ची काळजी घेत जा, त्यांना वेळेवर औषधी देत जा. बाबा तुम्ही आईची काळजी घेत जा. तुम्हाला माझी आठवण आली तर मनाला दुःख करून घेत जाऊ नका. मलाही तुमची फार आठवण येते. परंतु काय करावं मुलीचे लग्न झाल्यावर आपल्या घरी सासरी नांदायला प्रत्येक मुलगी जाते. तिचा जन्म ज्या घरात झाला , ती लहानाची मोठी जिथे झाली तिथेे तिचे सर्व लाड आई-वडिलांनी पुरवले तिला लहानाची मोठी करून शिक्षणाची जबाबदारी पूर्ण करून शेवटी तिला ते घर सोडून लग्न करून सासरी जावं लागतं. बरं असो. आई बाबा ही तर जगाची रीतच झाली. मी इकडे खुप आनंदात जरी असली तरी मला तुमच्या सर्वांची खुप आठवण येते. तुमच्या आठवणीचा कल्लोळ माझ्या हृदयात सारखा होत असतो. आपल्या चाळीतील मित्र-मैत्रिणींसोबत खेळणे, त्यांच्याशी गप्पागोष्टी करणे . त्यानंतर आई तू मला गरम गरम जेवायला देणे. माझे आवडते पदार्थ तू किती आनंदाने करत होती.बाबा माझ्यासाठी किती खाऊ आणीत होते. हे सर्व आठवले की मी बालविश्वात हरवून जाते ग आई! असो आई बाबा तुम्ही प्रेमाचा सागर आहात. आपल्या लाडक्या लेकीच्या मायेचा पाझर आहात. तुमच्या आठवणी हृदयात मी जपणार, घायाळ त्या मनावर पत्र लिहून फुंकर मी मारणार. *आईबाबा* *"राहून मी तुमच्या दूर सुद्धा*, *सदैव तुमच्यासोबत आहे,* *सासरमाहेर माझे एकच* *समजून मी खूप सुखी व आनंदात आहे."* कळावे तुमचीच लाडकी सोनु प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड.
चारोळी सहवास तुझा १) सहवास तुझा का हवाहवासा वाटतो तुझ्याविना जीव माञ कासावीस होतो. २) फुललेल्या मनात सहवास तुझा जपला अनवाणी पायात काटा रुतला. ३) सहवास तुझा सार काही सांगून गेला अंतरीचा भाव नजरेत टिपून गेला. ४)विवाहाचा बंधनात बांधून जातात.... सहवास तुझा माझा करून संसार सुखाचा करतात. ५) जीवनाची बाग तुझा सहवासाने सजवते नाही भेटला तरी तू मीच मला आठवते. 〰️〰️
बालविवाह रोखले गेले पाहिजे जेव्हा स्त्री आणि पुरुष धार्मिक विधीनुसार एकत्र येतात तेव्हा त्यास विवाह म्हणतात. दोन शरीरच नव्हे तर दोन मन एकत्र जोडणे म्हणजे विवाह असते. परंतु एकोणिसाव्या शतकात हिंदू समाजात एक वाईट प्रथा होती ती म्हणजे बालविवाह होय. जेव्हा दोन शरीर दोन मन अपरिपक्व अवस्थेतील असतात तेव्हा त्यांना विवाहाच्या बंधनात बांधणे म्हणजे बालविवाह होय. ही बालविवाहाची अनिष्ठ प्रथा मोडून काढण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी बंड पुकारले. पूर्वीच्या काळी या बालविवाह प्रथेचा इतका अतिरेक झाला होता की, मूल गर्भावस्थेत असतानाच त्यांचा विवाह करत असत. या प्रथेस 'पोटालाकुंकू 'लावणे असे म्हणत होते. परंतु गर्भावस्थेतील काही रोगामुळे ते मूल मृत्यू पावले तर संपूर्ण जन्मभर त्या स्त्रीला विधवेचे नरका प्रमाणे वाईट जीवन कंठावे लागत असे. अशा या वाईट प्रथेविरुद्ध स्वामी दयानंद सरस्वती यांनी बंड पुकारून लोकांना पेटविले की, शास्त्राच्या नियमानुसार स्त्री-पुरुषांचे योग्य वयातच लग्न करावे. नियमांचे पालन करूनच विवाह करण्यात यावा. आणि जे नियमभंग करतील ते जीवनात तर दुःखी होतातच पण त्याच बरोबर ते अनैतिकतेची गुन्हेगार ठरतात. स्वामीजींनी बालविवाहास विरोध करून शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले. स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य याला प्राधान्य देऊन राष्ट्राचा समाजाचा विकास कसा होईल हे समाजाला पटवून दिले.काही कारणामुळे स्त्रियांना खूपच कमी लेखले जात असे. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले. समाजातील अनिष्ट चालीरीती ,रुढी-परंपरा, वाईट प्रथा ,अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव या सर्व कारणांमुळे बालविवाह होतात. आजही आपण बघत आहोत समाजातील काही भागात बालविवाह होतात. हे बालविवाह रोखण्यासाठी समाज हा शिक्षित झाला पाहिजे. मानव प्राणी हा सतत समाजात वावरत असल्यामुळे तो समाजशील देखील आहे. म्हणून जर हा मानव निरक्षर असेल तर तो समाजाच्या नुकसानीला कारणीभूत ठरतो. आजचे युग हे विकासाच्या मार्गावर धावणार युग आहे, आधुनिक यांत्रिकीकरणाचे युग आहे. जुन्या ,चालीरीती,परंपरा यांचा नाश करून नवीन कल्पक समाजाची निर्मिती करण्याचे कार्य मानवाच्या हाती आहे .चांगले विचार, चांगले आचार, चांगले वर्तन हे शिक्षणाच्या माध्यमातून साध्य होत असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती साक्षर होणे काळाची गरज आहे. व्यक्ती साक्षर झाली म्हणजे ती नियमांचे'पालन करेल. नियमांचे पालन झालेले असल्या कारणाने बालविवाह होण्यास प्रतिबंध घालता येईल. 1978 च्या कायद्यानुसार मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यावरच विवाह करण्यात यावा. या कायद्यानुसारच समाजातील प्रत्येकाने याचे जाणीवपूर्वक पालन करून आपल्या मुला मुलीचे विवाह कायद्याच्या चौकटीतच राहून विवाह करून द्यावे तरच बालविवाह बंद होतील, रोखता येईल. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता .हदगाव जि. नांदेड
*प्राथमिक शिक्षणाचे महत्व* मानवी जीवन सुसंस्कारित करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षण म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे शिक्षण होय. शिक्षण ही एक पवित्र गंगा आहे. या पवित्र गंगेतून शिक्षणाचे पवित्र आपण राखले पाहिजे, जपले पाहिजे. मानवी जीवनात प्राथमिक शिक्षण ही माणसाची प्राथमिक गरज आहे. प्राथमिक शिक्षण यशस्वीपणे घेऊन कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाचे उद्दिष्ट गाठू शकते. कारण प्राथमिक शिक्षणाची पहिली पायरी सफलतापूर्वक पार केल्यामुळे व्यक्तीस आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येते. खरं तर शिक्षण हे जीवन विकासाचे साधन आहे. माणसाला माणूस बनवण्याचं शिक्षण एक माध्यम आहे. “आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच शिक्षण होय.” असे डाॕ.जॉन या विचारवंताचे मत आहे. कोणत्याही व्यक्तीचा प्राथमिक शिक्षणाशी जेवढा घनिष्ठ संबंध असतो तितका फारसा संबंध माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाशी येत नाही. प्राथमिक शिक्षणातून जे ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान अनंतकाल टिकून राहते. सदा स्मरणात राहते. प्राथमिक शिक्षणातूनच व्यक्तीची जडणघडण होते. व्यक्तीचा जीवनस्तर उंचावयाचा असेल तर प्राथमिक शिक्षणातून योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. शिक्षणामुळे चांगल्या वाईटाची कल्पना येते, भावनिक परिपक्वता येते. प्राथमिक शिक्षणाचा माध्यमातून बालकाचा भावनिक समतोल , सवयी आणि वृत्ती, बालकाचे शारीरिक, मानसिक आरोग्य, तसेच त्याच्यामध्ये असलेली सुयोग्य अभिरूची हे जाणून घेऊन त्यांच्या या विकासावर अधिक भर दिला जावा. प्राथमिक शिक्षणात लेखन-वाचन या ज्ञाना सोबतच वरील बाबींचा विचार अधिक प्रमाणात करण्यात यावा. तरच प्राथमिक शिक्षण यशस्वी होईल. विनोबा भावे यांनी म्हटले आहे 'यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.' कोणत्याही व्यक्तीचा यशाचा पाया म्हणजेच प्राथमिक शिक्षण होय. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा चौफेर विकास घडून येतो. सारा समाज ज्ञानी, स्वावलंबी झाला तरच समाजात शांतता, सुव्यवस्था व बंधुभावाचे वातावरण असेल, दिसेल. म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित होणे आवश्यक आहे. सामान्य माणसास शिक्षणापासून वंचित ठेवणे योग्य नाही.प्रत्येक व्यक्तीस शिक्षण मिळायलाच पाहिजे. या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षण महत्त्वाचे आहे. कारण शिक्षणामुळे व्यक्तीला समाजात विशिष्ट प्रकारचा दर्जा प्राप्त होतो. शिक्षणामुळे मानवी जीवन सुरक्षित व संस्कारशिल बनते. योग्य संस्कार आणि योग्य शिक्षण यांची सांगड घालून समाजबांधणीसाठी चारित्र्यसंपन्न नवीन पिढी निर्माण करता येणे हेच खरे शिक्षणाचे काम आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका ©️श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड.
*पाण्याची बचत, जलसंवर्धन* हवा पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी हे विविध रूपात मिळणारी प्रवाही संपत्ती आहे.पाणी हेच जीवन आहे. पाणी जीवनाश्यक असल्यामुळे पाण्याची टंचाईची समस्या सोडवण्यासाठी अग्रक्रम द्यावा लागतो. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. शेतीसाठी भरपूर पाणी लागते.भारतात खूप मोठा भाग पाण्यासाठी पावसावर अवलंबून आहे. पावसाचे पाणी सगळीकडे सारख्या प्रमाणात मिळत नाही. पावसाळी ऋतूतही अंतर्गत चढउतार आहेतच. विविध रुपात मिळणारी पाण्याची ही प्रवाह संपत्ती या जलचक्रामुळे दैनंदिन जीवनात सजीवांना पिण्यासाठी ,वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होते. तरी आपल्या या भारत देशात बऱ्याच भागात पाण्याची टंचाई भरपूर प्रमाणात आहे. बऱ्याच भागात पाण्याचे दुर्भिक्ष आपल्याला दिसते. पाण्याची गरज वाढण्याचे अनेक कारणे आहेत. भारतातील लोकसंख्या वाढ ही भरपूर प्रमाणात असल्यामुळे पाणी अधिकाधिक लागते. शेतीसाठी भरपूर पाणी लागतं.तसेच उद्योगधंद्यात कारखान्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी लागते. आज पाण्याची गरज ओळखून मानवी जीवनाला पाण्याची बचत करणे फार आवश्यक आहे. पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमकी गरज ओळखून पाण्याचा दुरुपयोग उधळपट्टी कमी करावी लागेल. जसे की आवश्यक असेल तरच नळ चालू करावा. विनाकारण नळाचे पाणी वाया जाऊ देऊ नये. दात घासताना आंघोळ करताना आवश्यक तेवढेच पाण्याचा वापर करावा. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी. अंघोळीसाठी शावर चा वापर न करता बादलीत पाणी घेऊन वापर करावा. मोरयातील सांडपाण्याचा वापर बागेतील झाडांसाठी करावा. छपरावरून पडणारे पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर करावा. किंवा घराच्या छपरावरील पावसाचे पाणी टाक्यात साठवुन पाणी रिचार्ज पीट च्या साह्याने पाणीसाठ्यात भरावे. सांगायचे तात्पर्य म्हणजे एवढेच की आपल्या दैनंदिन व्यवहारात सांडपाण्यावर जे पाणी लागते त्या सांडपाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया करून त्या पाण्याचा अन्य कामासाठी वापर करणे आवश्यक आहे. पाणीबचत आपल्याला कोणत्या मार्गाने मिळते हे सर्व उपाययोजना आपण करणे आवश्यक आहे. ' पाणी आडवा, पाणी जिरवा' लक्षात घेऊन आपल्याला पाणी अडवता येईल.जसे की अरुंद नाल्यावर छोटे बंधारे बांधून, पाणी अडवून हे पाणी जमिनीत जिरवता येईल. मातीचे बंधारे बांधून पाणी अडवता येईल व मातीत जिरवता येईल. पाण्याची बचत करण्यासाठी उद्योग-धंद्यात पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा. तसेच शेतीसाठी भरपूर प्रमाणात पाणी लागते यामध्ये कशी बचत करता येईल ते पाहावे व शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. शेतातील केर कचऱ्याचे आच्छादन करावे. म्हणजेच केरकचरा जमिनीवर पसरवावा त्यामुळे पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने होईल आणि पाण्याचा अपव्यय आपल्याला टाळता येईल. शेतजमिनीत पाणी साठवण्यासाठी खड्डे खोदले तर पाणी बचत करता येईल. बांधकाम करताना कोणत्या ऋतूत बांधकाम करावे हे ध्यानात ठेवून ज्यावेळी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल त्यावेळेस बांधकामाला सुरुवात करावी. उन्हाळ्यात पाणीटंचाई भीषण असते अशावेळी जर बांधकाम केले तर पाणी उपलब्ध होणे अवघड होते. अशा वेगळ्या उपाय योजना जर केले तर पाण्याचा अपव्यय टाळता येऊन पाण्याची बचत करता येते. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आपल्याला झाडे लावणे व जगविणे हे काम करणे फार आवश्यक आहे. जर आपण झाडे लावली तर पावसाचे पाणी भरपूर प्रमाणात पडेल. व हे पावसाचे वाहून जाणारे पाणी आपण विविध पद्धतींनी जमिनीत साठवून ठेवू शकतो. आभाळातून पडलेल्या पाण्याला आपण प्रयत्नपूर्वक जमिनीत जिरवले पाहिजे. आणि जलसंधारण वाढविले पाहिजे. यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. मग झरे ,विहिरी ,नद्या ,यांचे पाणी आटणार नाही. अशाप्रकारे पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने बहरू लागेल. म्हणून आपण सर्वांनी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. आणि पाण्याचा अपव्यय न करता पाण्याची बचत केली पाहिजे. तरच आपल्या पुढील भविष्यकाळातील पिढी सुखी समृद्ध व आनंदाचे आयुष्य जगेल. त्यासाठी आपल्याला पाणी बचतीच्या वेगवेगळ्या उपाययोजना आता करणे फार आवश्यक आहे. एक म्हण आहे माणसाने आपल्या जीवनात *'पाणी, नाणी, आणि वाणी याचा जपून वापर करावा.'* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सहशिक्षिका) ता.हदगाव जि.नांदेड. 〰️〰️〰️〰️〰️〰️
( 5) *'मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.'* *स्त्रीशिक्षण - काळाची गरज* *“विद्येविना गेले, वाया गेले पशू,* *स्वस्त नका बसू ,विद्या घेणे.”* या ओळीतून सावित्रीबाईने शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हे किती महत्वाचे आहे हे समजावून सांगितले. मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महात्मा फुले दांपत्य होय. अज्ञानरूपी अंधकाराला दूर करण्यासाठी शिक्षणासारखे दुसरे शास्त्र नाही. शिक्षणाने मनुष्याला सत्य व असत्याचा व अंतिम हिताचा विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. शिक्षण हे सुधारणेचे मूळ आहे. त्यातून स्वाभिमानाची जाणीव जागृती होते. त्यातल्या त्यात स्त्रियांना शिक्षण म्हणजे पुढे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण असे महात्मा ज्योतिराव यांचे मत होते. म्हणून महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले. १ जानेवारी १८४८ या दिवशी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. तत्कालीन ब्रिटिश भारतातील या देशातील तेही महाराष्ट्रातील व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.भारतातील ही पहिलीच मुलींची शाळा आहे. *सावित्रीबाई या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका!* जानेवारी महिन्यात या शाळेत सहा मुली होत्या. नंतर वर्षाखेरीस शाळेतील मुलींची संख्या ४५ होती. *“मानवाचे कर्तुत्व हे ईश्वरकृत नसून ते त्याच्या दीर्घकालीन अनुभवाने , दीर्घदर्शी प्रयत्नाने आणि तीव्र बुद्धिमत्तेने केलेल्या सुधारणेचे फलित होय."* प्रयत्नवाद आणि कर्तुत्वावरची अढळ निष्ठा व्यक्त सावित्रीबाईनी केली.असे पराकोटीचे परखड विचार सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी मांडले. स्त्री जीवनात विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे तिला सापडलेला शिक्षणाचा मार्ग. हा मार्ग महात्मा ज्योतिराव फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, आगरकर ,कर्वे आणि इतर अनेकांच्या प्रयत्नातून स्त्रियांना विद्यालयाची कवाडे उघडी झाली. आज एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कसोटीत स्त्री अग्रेसर आहे.ते केवळ शिक्षणानेच. पुरुषांपेक्षा स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे नाही. आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येते. पण काही ग्रामीण आदिवासी भागातील स्त्री अजूनही अशिक्षित आहे. शिक्षित करणे आवश्यक आहे. ती जर सुशिक्षित, सज्ञानी झाली तिचा फायदा कुटुंबास होतो. एक चांगली माता सांस्कृतिक शिक्षकापेक्षाही श्रेष्ठ असू शकते, हे स्त्री शिक्षणातून दिसते. म्हणून प्रत्येक स्त्री शिक्षित होणे महत्त्वाचे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू मनत असतं, “मुलांचे शिक्षण हे केवळ एका व्यक्तीचे शिक्षण आहे, परंतु मुलींचे शिक्षण हे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण आहे”. म्हणून स्त्रियांना शिक्षण देणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत मुलांचे संगोपन आणि संवर्धन असे दुहेरी कार्य आजच्या मातेकडून अपेक्षित असल्यामुळे तिला सर्व सुसूत्रता राखून कार्य करावयाचे असते. यावरून स्त्रीच्या शिक्षणाची महती लक्षात येते. म्हणून स्त्रियांना त्यांच्या जीवनातील कार्याची पूर्ती करण्यासाठी शिक्षण आवश्यक असते. *'स्त्री म्हणजे सृजनशील सामर्थ्य आणि करुणाजन्य शक्ती होय'.* स्त्रीही सृजनशील ,सामर्थ्यवान, करुणा जन्य असते. *'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धारी '.* या जगाचा उद्धार करायचा असेल तर स्ञियांना शिक्षण देणे फार महत्त्वाचे आहे. जर राष्ट्राचा विकास घडवायचा असेल तर मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घ्यायला हवा. स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. जीवनातील अंधार दूर करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने ज्ञानज्योत पेटवून आपले जीवन उजळावे, प्रज्वलित करावे. कारण स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षण ही काळाची गरज ओळखून स्त्रीने विद्या घ्यावी, सुशिक्षित बनावं, आपला नेभळट पणा सोडून धीट बनावं. एक आदर्श स्त्री, एक आदर्श पत्नी, आणि एक आदर्श माता म्हणून जगावं. त्यासाठी स्त्रीशिक्षण हे महत्त्वाचे आहे. तेव्हाच स्त्री ही समाज परिवर्तनाची देवता ठरेल. हे परिवर्तन आज हळूहळू बदलू पाहत आहे. आजची स्त्री अबला नाही ,तर सबला आहे. सक्षम बनली आहे.ती कर्तुत्ववान नारी झालेली आहे. आजच्या बदलत्या स्त्रीजीवनाच्या या काळानुसार स्त्री बदलू पाहत आहे. आजच्या युगातील स्त्री ही विचारी आहे. गेल्या शतकातील स्त्री आणि आजची स्त्री यात महदंतर आहे. आजच्या स्त्रीचा मार्ग विकासाकडे, प्रगतीकडे आणि वैभवाकडे जात आहे. स्त्री शिक्षणाची महती व्यक्त करताना माझ्या मते....... *"अंधारमय जीवनात ज्ञानदीप माझा उजळला, फुले सावित्रीबाई मुळे प्रकाश जीवनात झळकला.”* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ©️✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
इयत्ता पाचवी ते दहावीसाठी सुट्टीतील उपक्रम *प्रश्नमंजुषा इतिहास विशेष* दिनांक 20 मे 2020 बुधवार आजची इतिहास विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे ---------------------------------- https://testmoz.com/q/3457022 ---------------------------------- *संकलन :- श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* सहशिक्षिका ता. हदगाव जि. नांदेड 9403046894 ********************* *निर्मिती :- नासा येवतीकर* 9423625769 ---------------------------------- ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे. *टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
( 5) सहल सहल या शब्दातच आनंद दडलेला आहे. सह म्हणजे सोबत सर्वांच्या सोबत काढलेली ती म्हणजे सहल. खरं म्हणजे सहल काढण्याचा उद्देश असा असतो की एकमेकांच्या सोबत राहून दिलखुलासपणे गप्पा गोष्टी गाणी याचा मनमुराद आनंद लुटणे तसेच आपण ज्या प्रेक्षणीय स्थळाला भेट देणार आहोत त्या स्थळाची माहिती जाणून घेणे. आपल्या ज्ञानाची वृद्धिगत कक्षा वाढविणे. अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घेण्याची लालसा निर्माण होणे. ही ज्ञान प्राप्तीची लालसा आपल्याला सहलीतून प्राप्त होते. सहलीमुळे आपल्याला वेगळा आनंद मिळतो. मित्र मैत्रिणी सोबत खाण्याची मेजवानी करता येते. आपण जिथे जाऊ सहलीला तिथे आपल्याला वेगळ्या प्रकारचे ज्ञान प्राप्त होण्यास मदत होते. सहल म्हणजे नुसता आनंद नव्हे तर विविध माहिती जाणून घेण्याची बुद्धीला लागलेली भूक आहे. ही बुद्धीची भूक आपण मिटविण्यासाठी आपल्यामध्ये जिज्ञासा, चिकाटी वृत्ती, ज्ञानलालसा हे गुण असणे आवश्यक आहे. *संस्मरणीय सहल* आज पर्यंत मी अनेकदा सहलीला गेले आहे.दरवर्षी आमची शालेय सहल निघत असते. मात्र एवढ्या सहलीपैकी मला माझ्या कुटुंबा सोबत केलेली चांदण्या रात्रीची सहल मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. ह्या चांदण्या रात्रीचा सहलीचा विचार आम्ही बहीण भावाने मिळून मांडला होता. आणि हि आमची सहल एक आनंददायी , विलक्षण होती. आमच्या गावा जवळच्याच एका टेकडीवर जाण्याचे ठरले होते. घरातील आणि सर्व मंडळी मिळून निघालो. पौर्णिमेची रात्र होती. पौर्णिमेच्या रात्रीला सारे आसमंत तुडुंब चांदण्यांनी भरलेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते आभाळ निरभ्र होते. आजूबाजूला शेती होती. गावाबाहेर शांतता होती. लखलखीत चांदण्यांचा प्रकाश झळकत होता. सुखद असा हवेतला थंडगार गारवा जाणवतं होता . आजूबाजूला झाडे आणि आकाशातील चांदण्या असा सुंदरमय देखावा मनाला प्रसन्न करणारा होता. असा हा चांदण्या रात्रीच्या सहलीचा प्रवास अगदी आगळावेगळा होता. आम्ही यापूर्वी अनेक सहली काढल्या पुढेही काढू पण चांदण्या रात्रीचा तो सहलीचा प्रवास मनाला भावलेला होता.एक संस्मरणीय सहल म्हणून हा प्रवास जिवनात एक अविस्मरणीय, आनंददायी मनाला हर्ष करणारा होता. “आसमंतात दाटला चांदण्यांचा पसारा नभात दिसे चंद्र हा शुभ्र लख्ख पांढरा मधुमालतीचा पसरे हा गंध सारा पुनवेच्या सहलीचा आनंदच न्यारा.” 〰️〰️〰️〰️〰️〰️ ©️✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड
(5) लेख.... *प्रदूषण एक भीषण समस्या* परिसरातील अहितकारक बदलांना 'प्रदूषण 'असे म्हणतात. हे प्रदूषणाचे अहितकारक बदल आजच्या बुद्धिमान माणसाने स्वतः च्या समोर स्वतः हे प्रदूषणाचे संकट निर्माण केले आहे. प्रदूषणाचे हे संकट काही प्रमाणात कमी करता येईल. मर्यादा ठेवता येईल पण त्यासाठी पृथ्वीवरील प्रत्येक मानव जागरूक झाला पाहिजे. 'झाडे लावा, झाडे जगवा' ही मोहीम फक्त मोहीमच न राहता ते प्रत्यक्षात उतरून झाडे लावली पाहिजे आणि जगवलीच पाहिजे. पर्यावरणातील झाडे न कापता अधिकाधिक लावून जगवणे हे ध्येय ठेवले तरच प्रदूषणाची ही भीषण समस्या कमी करता येईल. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' झाडे हे आपल्याला सावली, फुले ,फळे देतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे व जगविणे आवश्यकच आहेत. हे जग निर्माण करताना परमेश्वराने माणूस व पर्यावरण यात सुंदर समतोल साधला आहे. निसर्ग व मानव एकमेकांना पूरक होते. परंतु औद्योगिक क्रांती झाली आणि हा सर्व समतोल बिघडला. प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत. त्यात प्रामुख्याने ध्वनिप्रदूषण वायुप्रदूषण , जलप्रदूषण हे जास्त प्रमाणावर निर्माण झालेली भीषण समस्या आहे. प्रदूषणाचा परिणाम होत असल्यामुळे वातावरण दूषित झालेले आहे. (वायू प्रदूषणामुळे होणारे परिणाम) माणसाची गती वाढली हवेचे प्रदूषण निर्माण झाले. हवेच्या प्रदूषणामुळे माणसाला श्वासोच्छवासला त्रास होतो. विविध आजार होतात. आकाशातील दूषित हवेचे ढग, पावसाळी ढगांवरही मात करतात. माणसाने गिरण्या कारखाने सुरू केले. आणि मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण , जल प्रदूषण निर्माण झाले. (जल प्रदूषण) कारखान्यामुळे दूषित पाणी नदीत सोडण्यात आले. नद्यांचे सारे पाणी दूषित झाले. या जलप्रदूषणामुळे माणसाला नाना प्रकारच्या आजाराला , रोगराईला आणि साथीच्या आजाराला बळी पडावे लागले. पाण्याची अवस्था किंवा त्यामधील घटक द्रव्य यांच्यामधील माणसाने अहितकारक बदल घडून आणून जलप्रदूषण निर्माण केले आहे. (ध्वनी प्रदूषण) वातावरणातील अनावश्यक, असुविधाजनक ,अप्रिय, प्रतिकूल यांच्या हानिकारक परिणाम होऊन ध्वनी प्रदूषण निर्माण झाले. माणसाने लावलेले विविध शोध स्वतःसाठी निर्माण केलेल्या अनेक गोष्टी ध्वनिक्षेपक, दूरचित्रवाणी अशा कितीतरी गोष्टी ध्वनिप्रदूषण निर्माण करीत आहेत. सतत मोठे मोठे आवाज कानावर पडल्याने कर्णबधिरता येण्याची मोठी शक्यता आहे. या ध्वनिप्रदूषणामुळे माणसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन मानसिक ताण निर्माण होतो, रक्तदाबावर ही विपरीत परिणाम होतो.पोट भरण्यासाठी पोटाच्या मागे लागलेला ग्रामीण समाज शहराकडे धावू लागला . त्यामुळे शहरातील झोपडपट्टी वाढली आणि प्रदूषणही वाढले. यांत्रिकीकरणाचा दुष्परिणामांच्या अनेक संकटापैकी वातावरणातील ओझोन वायू नष्ट होण्याचे संकट आता वसुधेवर कोसळले आहे.म्हणजे प्रदूषणाचा भस्मासुर माणसानेच निर्माण केला आहे. आणि आज तो माणसाच्या जीवावर उठला आहे. या सर्वच्या सर्व प्रदूषणामुळे वातावरणाचा तोल ढासळला असून तो समतोल ठेवण्याकरिता प्रदूषणावर नियंत्रण ठेवावयास तसेच प्रदूषण होणाऱ्या गोष्टींची दक्षता पाळावयास पाहिजे. त्यामुळे प्रदूषणास सहाय्य होते अशा व्यवस्थेवर प्रतिबंध घातले पाहिजे. कारण माणसासाठी प्रदूषण ही भीषण समस्या होऊन बसलेली आहे. ही समस्या नष्ट करायची असेल तर पर्यावरण विषयाच्या दृष्टिकोन लहानपणापासूनच मानवी मनावर बिंबवायला सुरुवात केली पाहिजे. कारण उद्याचा नागरिक हा पर्यावरण जागरूक नागरिक हवा, तरच मानवजातीची धडगत आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ लेखिका ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( सहशिक्षिका) ता. हदगाव जि. नांदेड.
इयत्ता पाचवी ते दहावीसाठी सुट्टीतील उपक्रम *प्रश्नमंजुषा विज्ञान विशेष* दिनांक 17 मे 2020 रविवार आजची विज्ञान विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे ---------------------------------- https://testmoz.com/q/3392728 ---------------------------------- *संकलन :- श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* सहशिक्षिका ता. हदगाव जि. नांदेड 9403046894 ********************* *निर्मिती :- नासा येवतीकर* 9423625769 ---------------------------------- ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे. 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
1) मानवी शरीराचे तापमान साधारणता किती सेंटीग्रेड असते? 1) 37 अंश ✅ 2) 36 अंश 3) 35 अंश 4) 38 अंश 2) मानवी शरीरात लहान आतड्याची लांबी किती मीटर असते? 1) 5 ते 7 2) 6 ते 8✅ 3) 7 ते 9 4) 8 ते10 3) शरीराचे संतुलन मेंदूच्या कोणत्या भागामुळे होते? 1) प्रमस्तिष्क 2) मस्तिष्कस्तंभ 3) पश्चमस्तिष्क 4) अनुमस्तिष्क✅ 4) कांदे कापताना कोणता वायू बाहेर पडतो? 1) अमोनिया✅ 2) पोटॕशिअम 3) फाॕस्फरस 4) सल्फरडायऑक्साईड 5) कोणत्या इंद्रियात पित्ताची निर्मिती होते? 1) स्वादुपिंड 2) यकृत✅ 3)जठर 4)लहान आतडे 6) कोणत्या जीवनसत्वा अभावी रातांधळेपणा येतो? 1) ड 2) क 3) अ ✅ 4) ब 7) गव्हात कोणते प्रथिन असते? 1) लॕक्टोज 2) ग्लुकोटेनिन ✅ 3) लायसिन 4) हिस्टीडीन 8) खालीलपैकी कोणत्या पदार्थात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते? 1) मासे 2) फळ व भाज्या 3) दूध 4) अंडी✅ 9) सकाळच्या सूर्यकिरणांमुळे त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? 1) अ 2) ई 3) क 4) ड ✅ 10) मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्रे आहेत? 1) 46 ✅ 2 ) 23 3) 33 4) 12 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सहशिक्षिका)
*📚Work from home📚* *शब्द वाचा.व वहीत लिहा.* *विषयः इंग्रजी* Rhyming Words.(रायमिंग वर्ड्स) (यमक जुळणारे शब्द) 🔸 But Cut Gut Hut बट कट गट हट परंतु ,कापणे, आतडे, झोपडी 🔸Seat Beat Heat Neat सीट बीट हिट नीट आसन , मारणे , तापवणे, छान 🔹Lea Sea Tea Pea लि सी टी पी कुरण ,समुद्र ,चहा ,वटाणा 🔸Last Past Fast Cast लास्ट पास्ट फास्ट कास्ट शेवटचा ,भूत ,जोराने ,जात 🔸Car Jar Far War कार जार फार वार गाडी ,भरणी, दूर ,युद्ध 🔹Fall Walll Call Tall *फाॕल वॉल कॉल टाॕल* *पडणे ,भिंत ,बोलावणे, उंच* 🔹Hay Bay Way Day *हे बे वे डे* *वाळलेले गवत, उपसागर , मार्ग ,दिवस* 🔸 *Bear Dear Mare Fear* *बिअर डियर मेअर फियर* *अस्वल , प्रिय , घोडी, भीती* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सह.शिक्षिका) ता.हदगाव जि.नांदेड. 〰️〰️〰️〰️〰️〰️ *घरीच रहा, सुरक्षित रहा.*
( 5) लेख समजदार नागरिक , सुजान नागरिक माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात वावरताना माणसाने थोरामोठ्यांचा आदर करणे , सर्वांशी मानसन्मानाने वागणे, लहानास न दुखावणे, सर्वांशी प्रमाणिकपणे वागणे या समजदारी च्या गोष्टी माणसांमध्ये असणे आवश्यक आहे. व्यक्ती आणि समाज जेव्हा विविध चांगल्या गुणांनी युक्त होतात तेव्हा समाजाचा विकास साधतो. याउलट सद्गुण लोप पावून दुर्गुण शिरले की समाजाचे पतन होते व प्रगती खुंटते. सुजान नागरिक म्हणजे ज्या गुणांमुळे, तत्त्वामुळे व्यक्ती समाज आणि विश्व यामध्ये परस्पर सुसंवाद साधून मानवाचा विकास होतो. असे सुजनात्व ज्या नागरिकामध्ये आहे तो नागरिक म्हणजे समजदार नागरिक होय. आपण जीवनात कसं वागावं? तर सर्वांशी चांगलं वागावं. हे समजणे म्हणजे समजदार नागरिकाचे लक्षण होय. नम्रता ,सौजन्य , सभ्यता, शिष्टाचार आणि आर्जवता ही जीवनमूल्ये ज्याच्या अंगी असते ती व्यक्ती समजदार व्यक्ती होय. सभ्यता आणि सौजन्य हे समजदारीचे दोन चक्षू आहेत. आपल्या जीवनात सर्वांशी मर्यादशील वागणं हे शिष्टाचार होय. ह्या शिष्टाचाराचे सुवर्णसूत्र ज्याच्यामध्ये आहे ती व्यक्ती सुजान नागरिक होय.सुजाणता म्हणजे सदाचाराचे वळण.ज्या परिसरात आपण वाढतो व वावरतो त्या परिसरातील सामाजिक एकसंघता बाळगणे व टिकून ठेवणे तसेच निसर्ग प्राणी पक्षी यांचे संरक्षण व जोपासना करण्यासाठी प्रेरित होणे व साऱ्याबद्दल प्रेम,आपुलकी निर्माण होणे म्हणजे सुजान नागरिक होय. आपला आत्मसन्मान जागृत ठेवून आत्मोद्धारासाठी प्रयत्नशील राहून आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनाची जबाबदारी चांगल्याप्रकारे पेलणे म्हणजे समजदार नागरिक होय. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि. नांदेड.
लेख (5) *वाचन* *'वाचन हे मनाचे अन्न आहे.'* माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची गरज भासते तशीच गरज आपल्या मेंदूला सुद्धा असते. आणि ती गरज वाचनाने समृद्ध होते. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आणि हे ज्ञान वाढविण्यासाठी म्हणजेच आपल्या ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत होण्यासाठी वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचनाने मनुष्य सुसंस्कारित होतो. वाचनाने माणसाच्या विचार करण्याची क्षमता प्रगल्भ होते. वाचनाने'मनुष्याची बुद्धी वृद्धिगत होते. वाचनाने विकास होतो. आपली जीवन समृद्धता, मेंदूची विचार करण्याची क्षमता वाढवायची असेल तर आपल्याला अधिकाधिक वाचन करणे आवश्यक आहे. वाचण्याची अधिकाधिक सवय लावून घेणे आवश्यक आहे. असं म्हणतात 'वाचनाचा लावा छंद ,त्यातच आहे खरा आनंद.'माणसाला खरोखर चा आनंद मिळवायचा असेल तर पुस्तक वाचणे फार आवश्यक आहे. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आपण 'वाचन प्रेरणा'दिवस म्हणून साजरा करतो. सर्वांना वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस साजरा करतात. ज्ञानवंत ,गुणवंत व्हायचे असेल तर वाचनाचा छंद लावून घेणे आवश्यक आहे. माणसाने नेहमी श्रीमंत होण्यापेक्षा ज्ञानवंत होणे व गुणवंत होण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाने किमान एक तास तरी वाचन करावे. आपण जे वाचन करत असतो ते वाचन आपण मन व मेंदू यांची स्थिरता कायम ठेवून वाचावे. असे वाचन केलेले कायम स्वरूपी स्मरणात राहते. नाहीतर भराभर वाचून साठत जाणारे ज्ञान हे फलहीन वृक्षाप्रमाणे असते. मानवी जीवनाचे सार ज्ञान आहे. हे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर वाचन करावेच लागेल. म्हणूनच मानवाच्या जीवनात पुस्तकांना , ग्रंथांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. मानवाला आपल्या ज्ञानाचे अमृत पाजून चिरंजीवी करण्याचे हे कार्य ग्रंथच करत असतात. वाचनामुळे आपले जीवन जगण्याचे सामर्थ्य वाढते व आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. वाचनामुळे आपल्या मनाची उदासीनता दूर होते. वाचनामुळे आपल्या भावभावनांना प्रतिसाद मिळतो. आणि आपल्या मनाचे उदात्तीकरण होते. मनात उद्भवणार्या शंकांचे निरसन वाचनामुळे होते. मनुष्य जीवन जगत असताना एकाकी राहू शकत नाही. त्याला कोणाचा तरी सहवास हवासा वाटतो. अशा एकाकी' सहवासात त्या व्यक्तीने पुस्तक वाचनाचा छंद जोपासला तर त्याच्या उर्वरित आयुष्याचा काळ चांगल्यारितीने व्यतीत होतो. पुस्तक वाचण्याच्या छंदामुळे त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. अधिकाधिक व्यापक गोष्टींची माहिती मिळते. मानवाच्या जीवनात वाचनास फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. माणसाला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र व निवारा याची जशी गरज असते.तसेच ज्ञान वृद्धींगत होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे फार महत्त्वाचे आहे. आपले परिपूर्ण जीवन जगायला शिकवणारी व्यक्तीमत्व विकासासाठी वाचन फार आवश्यक आहे. वाचन केल्याने ज्ञान प्राप्त होते. आणि ह्या ज्ञान प्राप्तीमुळे मनुष्य या विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो. ज्यांचे वाचन अधिकाधिक त्यांचे ज्ञान अधिक. माणसाला जगण्यासाठी अन्न जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्व मन ,मेंदूसाठी वाचनाचे आहे . म्हणूनच म्हणते *'वाचाल तर वाचाल'.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जि. नांदेड.
*📚Work from home📚* *विषय गणित* *१ शेकडा = १००* *पाव शेकडा = २५* *अर्धा शेकडा = ५०* *पाऊण शेकडा = ७५* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१ हजार =१०००* *पाव हजार =२५०* *अर्धा हजार = ५००* *पाऊण हजार = ७५०* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१ लक्ष = १,००,०००* *पाव लक्ष = २५,०००* *अर्धा लक्ष =५०,०००* *पाऊण लक्ष = ७५,०००* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *उदा. संख्याचे व्यावहारिक वाचन* *सव्वाचारशे = ४२५* *साडेचारशे = ४५०* *पावणेपाचशे = ४७५* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जि.नांदेड. 🌻🌻🌻🌻🌻🌻 *घरीच रहा, सुरक्षित रहा.*
*📚वाचा व वहीत लिहा.✍* *उपक्रम* *🍃 समानार्थी शब्द🍃* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *घर= गृह, गेह, भवन ,आलय, सदन ,धाम निकेतन* *वंदन = नमस्कार, प्रणाम,नमन* *गाय =गो ,धेनु ,गोमाता ,नंदिनी* *वर्षा = पाऊस,पावसाळा* *पक्षी = खग ,विहंग ,विहंगम, अंडज्* *वचक = धाक, दरारा* *पृथ्वी =अवनी ,वसुंधरा ,धरणीमाता ,अवनी धरा ,मही ,धरणी* *वत्स = वासरू,बालक* *धनुष्य =चाप, कोंदड, तिरकमठा* *वारा = वायू, वात, अनिल, तरूण,पवन* 📚📚📚📚📚📚 ➖➖➖➖➖➖ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* *जि प प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जिल्हा नांदेड.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *घरीच रहा, सुरक्षित रहा.*
लेख (5) निर्माण झालेली कुटुंब अवस्था आपल्या भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून एकत्र कुटुंब पद्धती नांदत आहे. परंतु ही एकत्र कुटुंब पद्धती बहुतांशी लोप पावत आहे. प्रत्येक मनुष्याला आपल्या कल्पनाविश्वात एक सुंदर कुटुंब असाव असं वाटतं. ज्यावेळी कल्पनाविश्व सत्यात उतरते त्यावेळी त्याची कुटुंबाची अवस्था हि त्याने पाहिलेल्या कल्पना विश्वातील कुटुंबासारखी कदाचित असेलही नसेलही. आजची परिस्थिती पाहता आपल्याला बहुतांशी विभक्त कुटुंब पद्धती दिसत आहे. संयुक्त कुटुंब हे फार मोजक्याच ठिकाणी आपल्याला बघावयास मिळते. प्रत्येकाची विचारसरणी, त्यांच्या अडीअडचणी व उद्भवणार्या बऱ्या-वाईट परिस्थितीचा विचार केला असता आजकाल विभक्त कुटुंब पद्धती जास्त अवलंबिली आहे. परंतु पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती दिसून येत होती. या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात आनंदी आनंद वाटायचा. या एकत्र कुटुंब पद्धतीत लहान मुलं ,मोठी माणसे ,आजी आजोबा, बहिण ,भाऊ , काका काकू, आई बाबा हे सर्वजण एकत्र राहत असल्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण तसेच सुखदुःखात आपली माणसे दिसत होती. प्रेम ,आपुलकी ,आणि जिव्हाळा या त्रिवेणी संगमावर कुटुंब आनंदाने वास करतो. अशावेळी आपलं कुटुंब आपलं घर आपल्याला मंदिरासारखंच वाटतं. या कुटुंब मंदिरातील माणसं देवासारखे वाटतात. मुलं फुलासारखी वाटतात. अशा या आनंददायी कुटुंबातून शांतता,समाधान आणि सुखाचा सुगंध येत असतो. म्हणूनच आम्हाला आमचं कुटुंब सुंदर असाव असं वाटतं. ज्या कुटुंबात आनंद वाटेल ते कुटुंब घराला घरपण देतात. याउलट आजची विपरीत परिस्थिती म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत 'हम दो हमारे दो' हेच पाहायला मिळते. घरात जास्त माणसांची वर्दळ या कुटुंब पद्धतीत नको वाटायला लागते. आपला छोटासा परिवार व आपण असे एवढ्यापुरतेच मर्यादित राहायला आवडते. त्यात नको आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना ना त्यांचा कुरवाळीत असलेला हात. या सर्व सुखापासून लहान मुलं फार पारखी होऊन जातात. आपल्या कुटुंबात आजी आजोबा काका काकू असावेत आपले लाड त्यांनी पुरवावेत असं लहान मुलांना फार वाटतं. परंतु हे सर्व एकत्र जमण्याचा प्रसंग या विभक्त कुटुंबात फार कमी अनुभवाला येतं. एखादा सण, उत्सव, लग्न प्रसंग अशा विविध प्रसंगी पाहायला मिळते. कुटुंबाच्या ह्या निर्माण झालेल्या दुरावस्था बदलत्या काळाप्रमाणे जरी बदल्या तरी कुठेतरी कुटुंब व कुटुंबातील नात्यांची जपणूक व्हायला हवी. आपापसात प्रेम ,जिव्हाळा, आपुलकी व नात्यातील एकोपा राहायला हवा, दिसायला हवा,असायला हवा. कारण आपली भारतीय संस्कृती ही एकत्र कुटुंब पद्धतीची आहे. ही आपली संस्कृती जपत जपत माणसाने जगावे आणि जगत जगत आपली संस्कृती जपावी. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि. नांदेड.
भीमा थोर तुझे उपकार शिक्षणाने केले तू सज्ञान कर्तुत्व आहे तुझे महान असे जगलास तू जीवन सदैव जगात राहील तुझीच शान उच्च शिक्षण घेऊन तू बुद्धिमत्तेची दिशा दाखवूनी घोर अंधारातून काढलेस तू भीमा थोर केले उपकार तू पंचशीलेचा निळा झेंडा घेतलास हातात तू जनसागराला देऊनी वेढा नसानसात भीमशक्ती जागवलीस तू इतिहास नवा घडविलास भारताचे संविधान लिहूनी जातीभेदाच्या आणि विषमतेच्या मोडल्यास शृंखला सार्या समानतेचा,संघटितपणाचा पसरविलास तू वारा क्रांती केली भीमा तू थेंबभर रक्त न वाहता वाहिल्या विचारधारा समतेच्या आणि न्यायाच्या आदर्श भीमा तुझा हा साऱ्या जगापुढे आहे कितीही लिहिले तरी शब्दही अधुरे आहे भीमा तू शिल्पकार घटनेचा संविधानाने हक्क दिला जगण्याचा अन् शिक्षणाचा उध्दारकर्ता झालास तू दलितांचा समतेने पुढारला तुझा अस्पृश्य समाज भीमा तुझ्यामुळेच आहे आज माझ्या लेखनीस मान भीमा थोर तुझे उपकार भीमा थोर तुझे उपकार भीमा थोर तुझे उपकार 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प. प्रा.शाळा गोजेगाव ता. हदगाव जि. नांदेड
लेख... मोबाईल सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल ही आजच्या काळाची गरज बनली आहे. संगणक, लॅपटॉप, मोबाईल हे माहिती तंत्रज्ञानाचे संप्रेषणाचे साधन आहेत. इंटरनेटचा वापर करून आपण मोबाईल, संगणकाद्वारेे आपणअनेक नवीन नवीन माहिती मिळू शकतो. संगणक ,मोबाईल, लॅपटॉप म्हणजे यंत्रयुगाने मानवाला दिलेला कल्पवृक्ष आहे. इंटरनेट प्रत्यक्षातील कल्पवृक्ष आहे. आजच्या जगात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मोबाईल हे वस्तू आवश्यक झालेली आहे. आपल्या मनात कोणत्या चिंता दुःख, सुख आनंदाच्या व इतर घडलेल्या घटना आपल्याला आपल्या नातेवाईकांना क्षणार्धात पोहोचण्यासाठी मोबाइल हे उत्तम साधन आहे. मोबाईल द्वारे आपण सर्व आवश्यक कामे करू शकतो तेही घर बसून. खरं तर मोबाईल ही फार आवश्यक गोष्ट आहे आणि महत्त्वाची सुद्धा आहे. जीवनाचे प्रत्येक तसेच व्यापाराचे प्रत्येक क्षेत्र मोबाईलशिवाय, संगणकाशिवाय अपूर्ण आहे. असे वाटते की आज मोबाईलचे अधिराज्य आले आहे. लहानापासून ते मोठ्यापर्यंतचा यांना मोबाईल ने वेडे लावलेले आहे. खरंतर मोबाईलचा योग्य आणि चांगलाच वापर केला पाहिजे. परंतु कोणी मोबाईलचा योग्य वापर करत नाही. मोबाईल वर असलेल्या विविध ॲप्स चा वापर प्रत्येक जण आपापल्या विचारसरणी नुसार करत असतो. मोबाईल द्वारे आपण अत्यावश्यक कामे एका क्षणात पार पाडू शकतो. व्हिडिओ कॉल करून आपण प्रत्यक्ष एकमेकांना बोलू शकतो. म्हणजे बघा मोबाईल हे किती महत्त्वाचे साधन आहे.मोबाईल या वस्तूचे सर्वात मोठे वैशिष्ट्य एक व्यक्ती जगातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीशी संपर्क प्रस्थापित करू शकते. ती व्यक्ती कुठेही असो . या मोबाईल मुळे आपण क्षणार्धात सहस्त्रावधी किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्याशी गप्पाही करू शकतो. आपले अनुभव आपली मते इतरांना कळवू शकतो किंवा आपल्या प्रश्नांची सोडवणूक सुद्धा करून घेऊ शकतो. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोबाईलचा किती मोठा वाटा आहे. काही तोटे विचारात घेतले तर फायद्याचे पारडे जडच आहे. म्हणून तंत्रज्ञानाने मोबाईलच्या माध्यमातून मानवाने जी प्रगती घडवून आणली ती मानवी जीवनाला खरोखरच लाभदायक आहे असं मला तरी वाटतं. कारण मोबाईल ही आजच्या काळाची गरज बनली आहे. मोबाईल ही अत्यावश्यक सेवा बनलेली आहे. आज प्रत्येकाजवळ मोबाईल आपल्याला दिसतो. मोबाईलचा वापर जवळजवळ शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंतची लोक करीत आहेत. माणसाला अन्न ,वस्त्र व निवारा या गरजा बरोबरच मोबाईलची ही गरज आजच्या युगात आहे. अगदी पाळण्यातल्या बाळापासून ते वयस्क असलेल्या व्यक्तीजवळ मोबाईल आपल्याला पाहायला मिळतो. काहीजण तर पाळण्यातल्या बाळाला मोबाईल वर गाणे लावून देतात , त्याच्या हातात मोबाईल देतात व त्यानंतर तो बाळ छान झोपतो. परंतु इतक्या लहान वयात लहान बालकास मोबाईल हातात दिला तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. ही विघातक सवय त्या बाळासाठी लहान वयापासून योग्य नाही. योग्य कामासाठी, चांगल्या व उपयुक्त माहितीसाठी , समज पूर्वक मोबाईलचा वापर करावा. मोबाईल ही आवश्यक सेवेसाठी वेळोवेळी चांगल्या कामासाठी वापरली जाणारी वस्तू आहे. आणि ह्या मोबाईलचा सर्वांनी उपयोग घ्यावा. चला तर मग “ विज्ञान-तंत्रज्ञानाची धरूया कासं, संगणक,मोबाईलचा वापर करूया खास.” 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जिल्हा नांदेड.
लेख... स्वच्छता हीच ईश्वर सेवा माणसाने जीवन जगत असताना जीवनाची सार्थकता जाणली पाहिजे. स्वच्छता ही आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे हे जाणून माणसाने वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतेची जपणूक केली पाहिजे. स्वच्छता हा आरोग्यसंपन्न जीवनाचा महामंत्र आहे. माणसाने स्वतः पासून स्वच्छता सुरू करावी व मग सामाजिक स्वच्छतेकडे वळावं. दीर्घायुष्य लाभण्यासाठी स्वच्छतेचा वसा घेणे फार आवश्यक आहे. स्वच्छता म्हणजे प्रसन्नता ,स्वच्छता म्हणजे आनंद, पवित्रता ,निर्मळता, सुंदरता. 'स्वच्छता म्हणजे परमेश्वर होय. ' गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे म्हणत असलेले संत गाडगे बाबा एक महान संत होऊन गेले. स्वच्छतेचा वसा उचलून जन माणसातील अंधकार दूर करण्यासाठी संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. संत गाडगेबाबांनी लोकांच्या मनातील अंधश्रद्धा बुरसटलेले विचार दारिद्र हे सर्व दूर करण्यासाठी प्रभावी माध्यम वापरून ते दूर करण्याचा अतोनात प्रयत्न केला आणि दिवसा गावातील रस्ते झाडून स्वच्छतेचा जणू वसा हाती घेतला. कारण आपलं जीवन अनमोल आहे. या अनमोल जीवनात आनंदाचे तरंग निर्माण करण्यातच खरा मर्म आहे. जीवनात स्वच्छता आचार विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे. संत गाडगेबाबा यांनी अखंड पन्नास वर्षे लोकांच्या पायाखालील रस्ते स्वच्छ करण्यासाठी घालवली. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाच्या मनातील द्वेषभाव दूर करण्यासाठी लोकांच्या मध्ये असलेलीअंधश्रद्धा दारिद्र्यता दूर करण्यासाठी कीर्तन हे प्रभावी माध्यम वापरले. स्वातंत्र्य ,स्वालंबन, स्वाध्याय आणि स्वाभिमान ही तर स्वच्छतेच्या पुस्तकातील पाने आहेत. आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घ्यायची असते. निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या आयुष्यात आपण आयुष्यभर स्वच्छतेचा विचार करायला हवा. आपला जीव ओतून आयुष्यभर जिवाची पर्वा न करता संत गाडगेबाबांनी जपलेला , आचारलेला स्वच्छतेचा जीवनमंञ आपल्यालाही आज आचारता येईल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनी स्वच्छतेचे स्फुल्लिंग निर्माण झाले तर आपल्या सुखी आणि संपन्न देशाचं भाग्य उजळायला वेळ लागणार नाही असं म्हणायला हरकत नाही. स्वच्छतेच्या ध्येयापर्यंत जायचे असेल तर घर, शाळा हे स्वच्छतेच्या संस्काराचे, सर्वात मोठे केंद्रबिंदू आहेत. त्यातून परिसरांत गावाच्या स्वच्छतेचा कृतिशील विचार रुजावा. कारण स्वच्छता ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता हा संस्कार आहे. स्वच्छतेचे बीज मुळापासून रुजायला हवे. प्रत्येकात भिनायला हवे. मोठ्यापासून ते लहानापर्यंत साऱ्यांनीच स्वच्छतेचे महत्व आंतरिकदृष्टीने समजावे. कारण, स्वच्छता ही जबरदस्ती नाही. एक जगण्याचे सूत्र आहे. म्हणूनच स्वच्छता ही ईश्वराचे दुसरे नाव आहे. या सजीव सृष्टीचे सौंदर्य खूलवायचे असेल तर स्वच्छतेचे महत्त्व समजावे. अन् अवघ्या समाजाचे पाऊल स्वच्छ क्षितिजाकडे वळावे. आणि ही सृष्टी मंगलमय, हिरवीगार, प्रदूषणमुक्त बनावी हेच आपले ध्येय.' ज्यांच्या अंगणात उमटेल स्वच्छतेचे पाऊल., नाही लागणार त्यांच्या घरी रोगराईची चाहूल' म्हणूनच सांगून गेले संत गाडगेबाबा ,'स्वच्छतेचा घेऊ वसा हाच निर्धार ठेवू जीवनाचा' ' स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे' गाडगेबाबांचा एकच मंत्र जाणूया आपण स्वच्छतेचे तंत्र. स्वच्छतेचे तंत्र जाणून आपण स्वतः आपल्या घरापासून, गावापासून, शहरापासून ते देशापर्यंत स्वच्छतेचा मंत्र ठेवून कार्य आपण करूया व, स्वच्छ निर्मळ, सुंदर भारत करुया. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता .हदगाव जी. नांदेड.
लेख..... अन्न हे पूर्णब्रह्म माणसाच्या जीवनात अन्न, वस्त्र व निवारा हे जगण्यासाठी चे मुख्य घटक आहेत. सजीवाला जिवंत राहण्यासाठी , पोट भरण्यासाठी अन्न खावे लागते. आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी माणूस काम करत असतो. केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी तो अनेक उद्योगधंदे करत असतो. या उद्योग धंद्यातून भरपूर पैसा कमवतो. व श्रीमंत होतो. धनसंचय केल्याने त्याच्याकडे भरपूर धनधान्य, अन्न असते. या धनधान्याच्या उपयोग तो भरपूर प्रमाणात करतो. समाजात तीन घटक आहेत श्रीमंत, मध्यम आणि गरीब. त्यापैकी श्रीमंत या पहिल्या घटकातील अवलोकन केले असता श्रीमंत माणसाचा जवळ असलेले पैसे तो अनेकदा वाजवी खर्चात उडवितो. हे पैसे उडवत असताना तो गरिबांचा विचारही करत नाही. लग्नप्रसंगी अवास्तव खर्च करतो. लग्न प्रसंगात किंवा अनेक कार्यक्रमात अन्नपदार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. अन्नपदार्थ पोटाला लागण्यापेक्षा नासाडीच जास्त करतो. अर्थातच काही मोजके अपवादात्मक श्रीमंत लोक याचा विचारही करत असतील .अन्नाची नासाडी होऊ नये अन्नाचा वापर व्यवस्थित व्हावा. व त्यानुसार त्यांचे योग्य नियोजन सुद्धा असू शकते.असते. समाजातील दुसरा घटक मध्यम स्वरूपाचा या मध्यम घटकातील लोकं आपले पोट भरण्यासाठी काही छोटे मोठे उद्योग धंदे करतात व छोटी-मोठी नोकरी सुद्धा करतात व आपला उदरनिर्वाह भागवतात. अन्नाचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी या घटकातील लोक आवर्जून घेतात. पोटाला लागेल तेवढेच अन्न खावे, पात्रात उष्टे अन्न टाकणार नाही , पडणार नाही हे सुद्धा काळजी घेतात. लग्न प्रसंगात व इतरही कार्यक्रमात आवाका पाहूनच खर्च करतात. अन्नपदार्थाची नासाडी होऊ नये तसेच सर्वांना पोटभर जेवण मिळेल याची काळजी घेतात. अतिशय भयानक परिस्थिती असलेला गरीब वर्ग.आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वन वन भटकतो. मोलमजुरी करून एक वेळच अन्न तरी मिळेल की नाही ही शाश्वती त्यांना नसते. हातावरचे पोट असणाऱ्यांची व्यथा फार भयानक असते. पुरेसे अन्न जेवायला मिळेल की नाही आपल्या मुलाबाळांना पोटभर अन्न देऊ शकतील की नाही ही अवघड बाब त्यांच्यासाठी असते. अन्न पोटाला पोटभर नाही मिळाले तर जगायचं कसं? हा प्रश्नही त्यांच्यासमोर असतो आणि भुकेने व्याकूळ होऊन मरण्याची वेळ त्यांच्यावर येते. दिवसभर काबाडकष्ट करून मिळवलेल्या पैशात आपली रोजीरोटी, उदरनिर्वाह ते चालवतात. पोटाला अन्न मिळावे म्हणून उन्हातानात, थंडीवाऱ्यात, पावसात आपल्या जिवाची पर्वा न करता काम करतात. भाकरीच्या चंद्राचा शोध घेतात, जेवणाची सोय करतात. आपल्या पोटाची खळगी अन्नाने भरतात आणि आपले जीवन कसेबसे जगतात. अशाप्रकारे अन्न हे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजते. अन्नापेक्षा मोठं कोणीच नाही.म्हणून कोणी किती जरी मोठा असेल आणि कितीही लहान असेल तरीही त्याला आपली पोटाची भूक भागविण्यासाठी अन्न खावेच लागते. म्हणून माणसाने अन्नाचा दुरुपयोग करू नये. अन्नाची नासाडी करू नये. जेवढे लागेल तेवढेच अन्न आपल्या पात्रात घ्यावे व आपले पोट भरावे. परमेश्वराने नेिसर्गात सूर्य,चंद्र वारा व चोवीस तासाची वेळ ही सर्वांना सारखीच दिली आहे. या निसर्गनियमाप्रमाणे माणसाने आपले जीवन जगावे. वेळोवेळी इतरांना मदत करावी. कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यावी. व ज्यांना जसे जमेल तसे इतरांना मदतीचा हात द्यावा. अन्नदान करावे. व जे उपाशीपोटी आहे त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या घासातला घास देण्याचा प्रयत्न करावा. याच अर्थ आपल्याजवळ जेवढे आहे त्यापैकी थोडेफार देऊन इतरांची पोट भरावे. आज निर्माण झालेल्या कोरोना या आजाराच्या वैश्विक संकटाचा विचार केला असता आजची परिस्थिती गरिबांसाठी हलाखीची निर्माण झालेली आहे. आजच्या निर्माण झालेल्या या संकटकाळात आपण सर्वांनी मिळून गरजूंपर्यंत गरज कशी पोहोचेल हा प्रयत्न करूया, भुकेल्यांना अन्न कसे मिळेल हा प्रयत्न केलेला अतिउत्तम राहील. हे उद्भवलेले कोरोना संकट मोठे आहे. परंतु या संकटाचापेक्षाही माणूस मोठा आहे. आणि या माणसाला वाचवण्यासाठी त्यांना योग्य प्रकारे सर्वतोपरी मदत करायला हवी. कारण माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची फार गरज असते. म्हणूनच म्हटले आहे ' अन्न हे पूर्णपरब्रम्ह आहे.' 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड.
लेख..... गुरुची महती, गुरु महिमा मानवी जीवन सुसंस्कारित करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. आज आपण अन्न, वस्त्र, निवारा यावर जगत असलो तरी, शिक्षण आपल्या जीवनाचा प्राणवायू आहे. ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचा सुंदर मिलाफ म्हणजे शिक्षण होय. हे मानवी जीवन सुरक्षित व संस्कारशील बनवण्याचे काम गुरु करतात. गुरु म्हणजे माणसाच्या रूपात एक परमात्माच आहे. हा गुरुरूपी परमात्मा शिक्षणातून संस्कार घडविण्याची कार्य करतो. जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे, जिथे ज्ञान आहे तिथे आत्मदर्शन आहे, आणि जिथे आत्मदर्शन आहे तिथेे सुख, समाधान आणि शांती नक्कीच आहे. जो आपल्याला ज्ञानाच्या गाभाऱ्यात घेऊन जातो आणि ज्ञानाशी एकरूप करून टाकतो त्यास आपण गुरु म्हणतो. जो सर्व भूतकाळ दाखवतो वर्तमान काळाची ओळख करून देतो भविष्यकाळाची दिशा सांगतो तो म्हणजे गुरु. गुरु म्हणजे ज्ञानाचा आगरच होय. आपल्या जीवनाचे भांडे जेवढे मोठे असेल त्या मानाने आपल्याला गुरूकडून ज्ञान घेता येते. गुरुहा बुद्धीने पाहिले तर माणसासारखा दिसते आणि हृदयाने पाहिले तर आपल्याला परमात्मा सारखा अनुभवते. शिक्षणातून संस्काराची गंगा आसेतु हिमालयापर्यंत पोहोचवायचे कार्य गुरु करतो. या जगात मानव हा सर्वश्रेष्ठ प्राणी मानला जातो. काही माणसे चांगले असतात तर काही वाईट असतात. चांगला आणि वाईट ठरवण्यासाठी आपल्याला शिक्षणाची गरज असते. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे , आणि या शिक्षणाच्या माध्यमातून चांगला संस्कार आणि शिक्षण यांची सांगड घालून देतो ते गुरु. माणसाच्या जीवनात प्रत्येकाला गुरु असणे आवश्यक असते. खरा गुरू स्वतः च सारं ज्ञान शिष्याला देत असतो. शिष्यापासून गुरु काही लपवून ठेवत नाही. गुरु तोच असतो जे आपल्या पुढे जाणाऱ्या शिष्याचे सदाही कौतुकच करत असतो. गुरूचा आनंद आपल्या शिष्याकडून पराजय होण्यातच असतो. खरा गुरू तोच जो आपल्या शिष्याच्या विजयातच आपला विजय मानत असतो. गुरु आणि शिष्य यांचे अतूट नाते असते. गुरु म्हणजे अनंत ज्ञानाची तळमळ असते. तर शिष्य म्हणजे ते ज्ञान ग्रहण करण्याचा उपासक असते. खरे बोलावे, नीतीने वागावे, राष्ट्रावर प्रेम करावे, आपापसात माया, ममता करावी हे सर्व गुरू आपल्याला शिकवते. आपली पहिली गुरु आपली आईच असते. त्यानंतर आपण शाळेत गेल्यावर शिक्षक म्हणजेच गुरु यांच्याकडून ज्ञान प्राप्त करतो. ज्यांच्या ज्यांच्या कडून आपणास काहीतरी शिकावयास मिळते ते सर्व आपले गुरु आहेत. शाळेतून घेतले जाणारे शिक्षण आपल्याला गुरूकडून प्राप्त होते. शिक्षणाचे ध्येय शिक्षणाचा उदात्त हेतू चांगला माणूस निर्माण करणे हेच असते. मानवी मनावर संस्कार घडवणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे विद्येचे दळण नव्हे, तर मनाला लावायचे ते एक वळण आहे. आणि हे वळण लावण्याचे काम गुरु करतात. माणसाला माणूसपण प्राप्त होण्यासाठी, योग्य गती , योग्य मती आणि त्यातून प्रगती साधण्यासाठी शिक्षणातून सुसंस्कार करण्याचे कार्य गुरु करतात. चांगला माणूस ज्ञानाने सुधारतो. आणि ही ज्ञानप्राप्ती करून समाजात चांगली . समाजबांधणी निर्माण करतो. गुरूचा महिमा अपार आहे. हा गुरु महिमा माझ्या स्वकाव्य निर्मितीतून मी खालील ओळीतून मांडलेला आहे. " चिखल मातीच्या गोळ्यास आकार तू देतोस ज्ञानदीपाची ज्योत पेटवून अंधकार दूर सारतोस शतशः नमन मी करिते गुरुवंदन करुनी आशीर्वाद मी घेते आयुष्यभर ऋणी राहूनी वंदन मी नित्यनेमाने करिते. गुरुवर्य आहे ज्ञानाचा भांडार अज्ञानाचा नाश करून होतील संहार घडवतील मनुष्यजीवना अपूर्ण जीवन आपले.... कर्तव्याचे बीजांकुरण करुनी पेटतील समाजमनाच्या उदरी ज्ञानार्जनाची शिदोरी वाटुनी वसतील शिष्यांच्या मनमंदिरी" गुरुमहिमा हा अपार असतो. गुरुहा आपल्याला सत्यसृष्टीत घेऊन जातो. आपल्या जीवनातील अंधकार दूर करतो. आपल्या जगण्याच्या दाही दिशा उजळून टाकतो. आपले जीवन सुंदर करतो. जीवनात कसं वागावं कसं राहावं कसं बोलावं कसं चालावं हे सर्व ज्ञान गुरूकडून मिळतं. अशा या अनंत ज्ञानाच्या तळमळीस मी वंदन करून शतशः नमन करते. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जि.नांदेड.
लेख..... जन्म आणि मृत्यू आत्मा आणि शरीराच्या संयुगाचे नाव 'जन्म'असून त्याच्या वियोगाला 'मृत्यू' असे म्हणतात.खरंतर माणूस जन्माला आला तेव्हाच मृत्यूही घेऊन येतो. माणसाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत तो कसा वागतो, जगतो त्यावरून त्याला मोक्ष प्राप्ती होते. परंतु मनुष्य कसा मरतो हे महत्त्वाचे नाही; पण तो आपले जीवन कसे जगतो हे महत्वाचे आहे. मनुष्याच्या स्वतःच्या सत्कर्म पुण्यधिक्याच्या बळावर त्याला मुक्ती प्राप्त होते. आपला जन्म म्हणजे कर्तव्याने भरलेला घडा आहे. माणूस स्वतःच्या जीवनात आपली कर्तव्य जितकी प्रामाणिक व योग्य प्रकारे पार पाडतो तितका तो आपल्या जन्माचे सार्थक करतो. कारण माणसाचं आयुष्य हे चैन नसून एक कर्तव्य आहे. व हे कर्तव्य तो जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे पार पाडतो. माणूस जीवन जगत असताना त्याच्या जीवनात अनेक संकटे येतात. ही जीवनात येणारी संकटे म्हणजे ते शाप नव्हेत तर त्याच्या जीवनात प्रथमता उद्भवणारी अडथळे होय. ही जीवनात उद्भवणारी संकटे म्हणजे त्याच्या उज्ज्वल भवितव्याची निदर्शक आहेत. माणसाचा जन्म,जीवन म्हणजे संग्राम आहे , यज्ञ आहे , सागर आहे.जखमांशिवाय संग्राम असत नाही.ज्वाळांशिवाय यज्ञ होत नाही . लाटांशिवाय सागर असत नाही. हे सर्वकाही हसतमुखानेच स्वीकारायला हवे.कारण जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे. माणूस जन्माला येतो व या जन्माला आलेल्या माणसाच्या जीवनाचं सार दोनच शब्दात सांगता येईल. ' आला आणि गेला .' काही माणसं मरत - मरत जगत असतात तर काही माणसं जगत - जगत मरत असतात.जन्मकाळाप्रमाणे मरणकाळ हा देखील एक आनंदसोहळा आहे. कारण शरीर पिंजऱ्यातून आत्म्याचा पक्षी मुक्त होऊन अनंतात विलीन होतो. हे सार जग नियतीच्या अंगा - खांद्यावर खेळत असतं. नियती कधी हसते , कधी रडते. माणसाचं जीवन म्हणजे नियतीचं हास्य होय.माणसाचं मरण म्हणजे नियतीचं रुदन होय. ' जीवन सरे मरण उरे ' हे सूत्र जगताना ध्यानात ठेवावं लागतं. 〰〰〰〰〰〰〰〰 लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव, जि. नांदेड.
लेख...... कर्माची पुण्याई, पापाचे फलित माणसाने दुसऱ्या बद्दल चांगला विचार करणे हे पुण्याचे काम आहे. व दुसऱ्या बद्दल वाईट विचार करणे म्हणजेच पापाचे भागीदार होय. इतरांच्या कल्याणात पुण्यकर्म असतं, व इतरांना दुःख देण्यात पापकर्म ठरतं. आपण स्वतः ठरवायचे आपण कसे वागायचे ते आणि आपल्या पदरात पुण्य पाडायचे का पाप पाडायचे ? हे ज्याच्या त्याच्या विचारांचा प्रश्न आहे. माणसाने सर्वांशी चांगले वागावे व आपल्या प्रमाणे योग्य प्रकारे वागावे. इतरांचे सुखदुःख हानि लाभ हे आपलेच आहे असे समजून वागणे श्रेष्ठ प्रकारचे असून पुण्य मिळवणे होय, याउलटचे वागणे जे आहे हे वर्तन वाईट आहे असे समजून पापकर्म होय. ज्या कर्मात आपण हृदय ओततो ते कर्म श्रेष्ठ होय. दुसऱ्यांच्या भल्यासाठी केलेले कर्म हे पुण्यकर्म समजाव. अशी कर्मफुल घेऊनच आपण समाजाच्या सेवेसाठी कार्यरत असाव. आणि ही सेवामय कर्मफुलांची उधळण जिवंत आहे तो पर्यंत करत राहावी. आणि पुण्याचे वाटेकरी व्हावे. ' कर्मे करावी चांगु' हा संत ज्ञानोबांचा विचार आपले जीवन जगत असताना सदैव ध्यानीमनी असावा. आपल्या हातून घडणारी कामेच चांगली आहे की वाईट आहेत हे पाहूनच विचार करून वर्तन करावे. ज्या चांगल्या कर्माने जगावर चांगले पडसाद उमटतात ते कर्म करणे म्हणजे पुण्य होय. आणि हानिकारक कर्म करणे म्हणजे पाप होय. जे कर्म केल्याने आपला आत्मा प्रसन्न राहतो म्हणजेच आपल्यामध्ये भीती, शंका ,लज्जा निर्माण होत नाही अशी कर्म म्हणजे पुण्य होय. जे आपल्या हृदयात सतत सलत राहते आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते शंका निर्माण होतात लाज वाटते अशा गोष्टी म्हणजे पाप करणे होय. हे पाप जरी प्रथमतः प्रातःकाला सारखे लखलखणारे चमकत असले तरी त्याचा शेवट मात्र रजनीसारखा काळोखरुपी असतो. पाप हे असे विघ्न आहे की ज्याने आपले साहस, धैर्य आपला मान ,सन्मान अगदी क्षणार्धातच नष्ट करते. आपल्या वाईट कर्माचा परिणाम वाईटच असतो. आणि चांगल्या कर्माचा परिणाम चांगलाच असतो. इतरांना सहकार्य करणे म्हणजे चांगले कर्म, व इतरांना मदत न करणे म्हणजे वाईट कर्म. एखादी म्हातारी व्यक्ती रस्त्यावर चक्कर येऊन पडली तर त्या व्यक्तीला हाताला धरून उठवून त्या व्यक्तीचीे मदत करणे म्हणजे पुण्यकर्म होय, उलट पडलेल्यांना तुडवत जाणे म्हणजे पाप कर्म होय. सत्याच्या बाजूने उभे राहून न्यायाची भूमिका मांडणे म्हणजे पुण्य होय, आणि अन्यायाशी तडजोड करणे म्हणजे पाप होय. 'पापाचा घडा भरला की तो फुटल्याशिवाय राहत नाही' असं म्हणतात म्हणूनच आपणच आपल्या पाप-पुण्याचे भागीदार असतो. आणि या आपल्या हातून घडून येणाऱ्या चांगल्या पुण्यरुपी कर्माला सेवेची किनार लाभली असेल तर पुणे कर्म चिरंजीव ठरतात. आणि अशा कर्मातच माणसाला अमरत्व प्राप्त होते. अशा या पुण्य कर्माच्या घड्याने आपले जीवन सार्थक होते. आणि पाप रुपी कर्माने आपले जीवन निरर्थक ठरते. आणि हे निरर्थक जीवनात आलेले पाप आपल्याला शांत राहू देत नाही समाधानी आयुष्य जगू देत नाही.आपल्याला सदैव दुःख वाटते. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचे मूळ कापले तर ते वृक्ष नष्ट होते, त्याचप्रमाणे पापाचा त्याग केल्याने दुःख नष्ट होते. आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येक जीव कर्म करण्यात स्वतंत्र आहे. जेव्हा तो पाप करतो तेव्हा तो ईश्वराच्या व्यवस्थेमध्ये पराधीन असल्यामुळे आपल्या पापाची फळे भोगतो. कारण प्रत्येकाला आपल्या कर्माचे पाप अथवा पुण्याचे फळ भोगावे लागते. आपल्या जीवनातील दुःख नष्ट करायचे असेल तर आपल्याला पुण्यकर्म घडून येईल असेच वर्तन करावे लागेल. आपले हे जीवन सार्थकी लावायचे असेल तर आपल्या हातून पुण्यकर्म घडायला हवे. या जगण्यावर ज्यांना अभिमान वाटतो या जगण्यावर ज्यांच प्रेम असेल त्यांनी आपल्या हातांच्या या कर्माच्या सामर्थ्यावर ही पुण्य कर्माची फुलं भरभरून वहावीत. व आपले जीवन चांगल्या पुण्य कर्माने अमरत्व ठेवावे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका..... श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हादगाव जिल्हा नांदेड.
लेख...... आनंद ,प्रसन्नता ,सुख माणसाने आनंदी वृत्ती ठेवून जगणे अतिशय महत्वाचे आहे. आनंदी वृत्ती ,समाधान ,सुख, शांती, प्रसन्नता ही फार मोठी आपली सौंदर्यवर्धक साधने आहेत. आपली आनंदी वृत्ती असणे म्हणजे आपल्यातील उत्साह व्दिगूणीत करणे होय. ही 'आनंदी वृत्ती आपल्या आरोग्याचा आधार आहे, तर औदासिन्य हे रोगाचे घर आहे' असे हेली बर्टन या विचारवंताने म्हटले आहे.आपल्या जीवनात उदासिनता ठेवायची नसेल तर आपण आनंदी, प्रसन्न राहायला हवे. आपल्या सुखाचे माहेरघर म्हणजे आनंदी वृत्ती होय. प्रसन्नता हे परमेश्वराने आपल्याला दिलेले औषध आहे आणि हे औषध आपण जर घेतले तर आपले जीवन सुखी समाधानी होईल. निसर्गात, सृष्टीत जिथे आपली नजर टाकू तिथे आपल्याला प्रसन्नता दिसेल. परंतु यासाठी आपल्याला स्वतःला प्रथमता प्रसन्न राहावे लागेल आणि इतरांना प्रसन्न ठेवावे लागेल. कारण खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो. आपल जीवन यशस्वी करायचं असेल तर आपल्याला आपले मन प्रसन्न, आनंदी असले पाहिजे. माणसाच्या मुखावर झळकणार निर्मळ हास्य माणसाचं मन जिंकून जातं, आणि ह्या अशा आनंदी व्यक्तीच्या आठवणी माणसाच्या मनात रेंगाळतात. स्वकष्टातून खरा आनंद निर्माण होतो. आणि मनुष्याचं जीवन सुखी करतो. मनुष्याने सदैव कामात व्यस्त राहिले पाहिजे. मनन ,चिंतन करीत राहिले पाहिजे.कारण जो मनन करु शकतो त्याला मनुष्य म्हणतात.आपल्याला मननामुळेच सर्व ज्ञान प्राप्त होते.मनन हा जसा मनाचा गुण आहे.त्याप्रमाणेच माणसाच्या जीवनात प्रसन्नता ही मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे.ज्या मानवात प्रसन्न वृत्ती आहे अशा प्रसन्न असणाऱ्या व्यक्तीची बुद्धी लवकर स्थिर होत असते.प्रसन्नतेमुळे आत्म्याला शक्ती मिळते.म्हणूनच कोणतेही कार्य हाती घेतले असता त्यात प्रसन्नता असले की ते कार्य हलके वाटते. प्रसन्नता ही माणसाच्या मनातून निर्माण होणारी क्रिया आहे.जसा दिव्यान दिवा लावता येतो तशी एका माणसाच्या मनातील प्रसन्नता अनेकांना हर्षउल्हासित करते.यशस्वी जीवनासाठी प्रथमतः आपले मन आनंदी व प्रसन्न असायला हवे.ज्याप्रमाणे पारिजातक आपल्या फुलांच्या पडलेल्या सडा सुगंधाने सुगंधीत करून दुसऱ्याला आनंदी करतो त्याप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरील झळकणार निर्मळ हास्य हे मन जिंकून घेत. म्हणूनच आपल्या जीवनातील जीवन जगण्यासाठीच ध्येयवाक्य असाव.' प्रसन्नतेचा एक एक क्षण पुरेसा,जोपासावा '. 〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.
लेख..... वेळ, काळ ,समय परमेश्वर एकावेळी एक क्षण देतो तर दुसरा क्षण देण्यापूर्वी तो पहिला क्षण काढून घेतो. म्हणजेच वेळ ही कधी कुणासाठी थांबत नसते. वेळ ही आपले कार्य निमुटपणे पार पाडत असते. 'वेळ कुठलीच शुभ नसते किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो असे दादा धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.' आणि खरच ते योग्य पण आहे. म्हणून माणसाने वेळीच जागे होऊन आपल्याला सोपवलेले काम योग्य करणे होय. कारण वेळ गमावणे म्हणजे शक्ती गमावणे होय. म्हणून वेळेचा सदुपयोग करून घेऊन आलेल्या संधीचे सोने करणे. कारण जेव्हा एखादी संधी आपल्याला येते ही वेळ पुन्हा येईलच असं काही नाही. कारण वेळ कधी कुणासाठी थांबत नाही. आपल्या हातून होणारे योग्य काम, कर्म हे आपण वेळेवरच पार पाडायला हवे. या साऱ्या जगाला व्यापून राहिलेला काळ हा कधी संपतच नाही. अनेकदा असं वाटतं की आज उद्यासाठी जगावं! पण काळाचा दगड डोक्यावर कोसळला की उद्याचा दिवस पाहायला मिळत नाही! कारण हा कठोर काळ म्हणजे साक्षात मृत्यू होय. आपण आपल्या जीवनाचं सुरेल गाणं गात असतो तेव्हा काळ आपल्या जीवन सतारीच्या तारा केव्हा तोडतो ते समजत नाही. कालच्या आठवणी मनात ठेवून उद्याच स्वागत करावं पण काळ उद्याच दर्शन घडू देईल की नाही सांगता येत नाही. " बळें लागला काळ हा पाठीलागी जीवा कर्मयोगें जनी जन्म माझा झाला परी शेवटी काळ मुखी निमाला महाथोर ते मृत्यूपंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे घडीने घडी काळ आयुष्य नेतो" ----- समर्थ माणसाचा जन्म झाला तेव्हा त्याचा मृत्यू अटळ झालेला असतो. जन्म आणि मृत्यू या दोन मधल्या अंतरातील वेळ म्हणजे आपल्या हातून घडून येणारी कर्म. आपण केलेले कर्मच आपल्याला मृत्यूनंतरही अनंत काळ जिवंत ठेवत असतात. या जगात किती आले किती गेले तरी आयुष्यातील वेळ कधी कुणासाठी थांबली नाही आणि थांबणारही नाही. म्हणून वेळीच जागे होऊन वेळेचा सदउपयोग घेणे योग्य होय.कारण क्षणक्षणाने आयुष्य संपत आहे......!!! 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( दि.05-05-2020) लेख..... मैत्री , मित्रता 'मैत्री म्हणजे ईश्वराने मनुष्याला दिलेले बक्षीस आहे'. ईश्वराने आपल्याला मैत्री स्वरूपात जे बक्षीस दिले त्याची जोपासना आपण निस्वार्थपणे करायला पाहिजे. कारण मैत्री जेव्हा निर्हेतुक असते तेव्हा ती दीर्घकाळ टिकते. मैत्रीत जर का स्वार्थ आला तर ती मैत्री संपण्याच्या दिशेने वाटचाल करत असते. म्हणून आपली मैत्री ही दीर्घकाळ टिकवायचे असेल तर आपल्यामध्ये निस्वार्थी भावना असणे आवश्यक आहे. असं म्हणतात ' या जगी सन्मित्ञाहून श्रेष्ठ संपत्ती नाही'. आपल्या मनामधील सर्वकाही सांगण्याची एकच जागा आहे ती म्हणजे आपला मित्र किंवा मैत्रीण आपल्या सुखदुःखात आणि आपल्या डोक्यावर कोसळलेल्या संकटातून मुक्त होण्यासाठी आपण घेतलेला आधार म्हणजे आपला मित्र ,मैत्रीण होय.' मैत्री म्हणजे सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार होय' असे स्पॅनिश या विचारवंताचे मत आहे. जेव्हा काही आपल्याजवळ सांगण्यासारख असतं तेव्हा आपण ते मित्रास, मैत्रीणीस सांगतो कारण दुःख वाटून घेतले की हलकं होतं आणि सुख वाटून घेतलं तर ते वाढत. आपल्या या जीवनात मैत्रीसारखी आनंद व उत्साह देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. आपल्या हृदयात अपार सेवा असली म्हणजे आपल्याला सर्वत्र मित्रच दिसतात. मैत्रीच्या या रोपट्याला नेहमी मायेचे,प्रेमरूपी पाण्याचे सिंचन देणे आवश्यक असते. आपला खरा मित्र ,मैत्रीण तोच किंवा तीचअसतो जे तोंडावर कटू बोलले तरी परंतु माघारी आपली स्तुती करतात,आपल्याबद्दल चांगले विचार प्रकट करतात. माणसाने मैत्रीवर नेहमी विश्वास दाखवावा, कारण विश्वास नसलेली मैत्री कधीही खुंटते. आपल्यामध्ये असलेली जी मैत्री आहे या मैत्रीला शञूरूप प्राप्त होणार नाही याची काळजी सदैव घ्यायला हवी. तेव्हा पेटलेल्या हृदयात शत्रुत्व निर्माण होता कामा नये. कारण अरण्य जाळणाऱ्या वणव्याचा वायु मित्र होतो, परंतु तोच वारा दिवा विझवून टाकतो म्हणजेच दिव्याचा शत्रू होतो. यासाठी आपला मित्र शत्रू होणार नाही याची सतत खबरदारी घेतली पाहिजे. कारण शञूत्व हा मैत्रीचा अंत असतो. मोराला पंख पसरून आनंदाने मोर पिसारा फुलवून नाचण्यासाठी जशी पावसाची गरज असते तशीच आपलं जीवन आनंदाने घालवण्यासाठी आपल्याला मित्राची मैत्रीणीची गरज असते. जेव्हा आपल्या बेचैन, ञस्त, अस्वस्थ , अशांत मनात विचारांचे काहूर निर्माण झालेले असते तेव्हा आपल्याला शांती, स्वास्थ्य देण्याचे काम आपले मित्रच, मैत्रीणच करत असतात. आपल्या जीवनात आनंदाची उधळण करीत असतात. म्हणून मैत्रीचा टिपून ठेवणारा हा टिपकागद आपण सदैव टिकवून ठेवला पाहिजे. ईश्वराने मनुष्याला दिलेल्या मैत्रीच्या या बक्षीस ला आपण सर्वांनी सदैव जपले पाहिजे. 〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे लेख...... राग , क्रोधाग्नी असं म्हणतात 'क्रोध ही दुर्बलतेची निशाणी आहे.' माणसाला दुर्बल करण्यासाठी राग ही एकमेव गोष्ट कारणीभूत आहे.या क्रोधाचा अग्नी प्रज्वलित झाला की माणूस दुर्बल होतो. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा या रागामुळे होणारे दुषपरिणाम काय होतील याचा सारासार विचार करणे आवश्यक आहे. कारण आपल्यामध्ये निर्माण झालेली क्रोधाग्नी ही आपण आपल्या न पटणाऱ्या गोष्टीच्या संदर्भात किंवा शत्रूच्या साठी प्रज्वलित करतो. आणि हे निर्माण झालेली क्रोधाग्नी ही ज्याच्यासाठी निर्माण केली त्याच्यापेक्षा जास्त आपल्यालाच जाळून भस्म करते. म्हणून आपल्याला स्वतः राग आला तर त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करणे गरजेचे आहे. या पृथ्वीतलावर, निसर्गामध्ये राग ही अशी एकमेव गोष्ट आहे जे माणसाला पशू बनवते, विकृत करते. म्हणून आपण क्रोध निर्माण झाला तर त्याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही कारणाने आपल्यामधील क्रोध उत्पन्न झाला तर त्याचा परिणाम अतिशय दुःखदायक, वेदनादायक व कठीण असतो. क्रोध हा एक प्रकारचा ज्वाला आहे. तो निर्माण झाला की आपल्यातील चांगले गुण किंवा आपल्यामध्ये असलेला विवेक नष्ट व्हायला वेळ लागत नाही. जेव्हा आपल्यामधील क्रोध निर्माण होतो तेव्हा आपली बुद्धी चालत नाही. आपण काय करत आहोत याचे भान आपल्याला स्वतःला राहत नाही. म्हणून आपण आपल्या रागाला कितपत आवर घालायचं हे आपल्याच आटोक्यातील बाब आहे. या क्रोधाचा अग्नी आपल्यामध्ये जेव्हा संचारतो तेव्हा आपण स्वतःवर अतिशय संयम ठेवायला हवा. शांत राहायला हवं. संयम आणि शांतता ठेवली तर आपल्या रागावर आळा बसेल. नियंत्रण राहील. नाहीतर म्हणतात ना 'अती राग आणि भिक माग, हे ही खरेच आहे. म्हणून शांतता आणि संयम ही आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. या गुरुकिल्ली ने आपल्या अविवेकी पणावर कुलूप बसेल. मानवी जीवनात सुख आणि समृद्धी निर्माण करायची असेल तर संयमाची आणि शांततेची नितांत आवश्यकता असते. कारण आपल्याला सुखी संपन्न आयुष्य जगायचं असेल तर संयम बाळगणे आवश्यक असते. नाहीतर आपल्यामधील क्रोध निर्माण झाला तर त्याचा दुष्परिणाम अतिशय वाईट होईल. आणि मग माणसाला पश्चाताप होते. हा पश्चाताप होऊ द्यायचा नसेल तर आपल्या मूर्खतेतेतून निर्माण झालेल्या या क्रोधाला संयमाचा आणि शांततेचा लगाम घालायला हवा. तेव्हाच आपल्याला सुखी आणि संपन्न जीवनाकडे जाता येतं. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे लेख..... आईची महती आई ! आई हा शब्द ऐकला की प्रत्येकाला आठवते ती आपली जन्मदात्री आई ! काळजाला भिडणारा शब्द म्हणजे आई! आईची महती एवढी मोठी असते की कितीही सांगा ती अधुरीच! " आईची ही माया, शब्दात होणे नाही आईची ही ममता, शाईही पुरणार नाही आईची ही महती,काव्याला पेलणार नाही आईचा हा जिव्हाळा, लेखणीला झेपणार नाही" आई हा शब्द फक्त दोन अक्षरांचा नाही. या दोन अक्षरात ईश्वराच्या आत्मा सामावलेला आहे. ,आ, म्हणजे 'आत्मा' आणि ' ई' म्हणजे 'ईश्वर' ईश्वर प्रत्येकाच्या घरात आईचा रुपाने वास करत असतो. सर्वजण आईच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. देवसुद्धा आईच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. कारण आईच्या कुशीत माया, ममता ,लळा ,जिव्हाळा आणि प्रेम यांचा खजिना असतो, म्हणूनच आईला वात्सल्याचा महासागर म्हटले जाते.आईचं बाळ कितीही मोठ झाल तरी तिला तो लहानच असतं. म्हणून दूर कामासाठी , नोकरीसाठी गेलेला मुलगा घरी परत आला की आई त्याच्या तोंडावरुन हात फिरवते.त्याला कुरवाळते. आणि आईच्या पाया पडण्यासाठी मुलाने माथा टेकला की आईचा ऊर भरून येते. व ती भरभरून आपल्या मुलाला आशीर्वाद देते. 'सदा सुखी राहा !'बाळ असं म्हणते. केवढी ती माया केवढे ते अफाट प्रेम. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस, भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्याव अस थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी पवित्र टाळी, आणी वेदनेनंतरची पहिली आरोळी. आई म्हणजे त्याग मुर्ती स्वतः उपाशी राहून आपल्या पिलास घास भरवते ती आई. खरंच ज्यांना आई असते ते किती नशिबवान असतात. एका कवीने म्हटले आहे ' स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' म्हणूनच जोपर्यंत आई आहे तोपर्यंत जीवनात रस आहे. कारण आईशिवाय मुलं म्हणजे उदास, भकास,भयानक आणि कुरूप जीवन. आईचा विरहाच वर्णन करताना कवी गोसावी म्हणतात "आई तु गेली अन् घरी रिकाम झालं गावातल्या एखाद्या उद्ध्वस्त वाड्या सारखं, आई तू होतीस तेव्हा घर भरून वाहत होतं खळखळणाऱ्या नदीसारख! " आयुष्यभर आपली काळजी घेणारी आपली आई ही एक त्यागाची मूर्ती आहे. तिचं वर्णन कितीही केलं तरी थोडंच आहे.लेखणीत सामावणार नाही. आई खरंच महान आहे. माझासाठी वंदनीय, पुजनीय आहे. आईची महती सांगताना मला घेले या कवीचा कवितेच्या ओळी पुन्हा पुन्हा म्हणावयास वाटते. "काय सांगू आई, तुला तुझी ग महती, तुझ्यासारखी नाही , कुणीच या जगती रामकृष्ण आले गेले , मीही पामर जाईल तुझ्या महतीचा डंका , सार्या जगात गाईल." पुन्हा एकदा मी माझ्या आईला भावपूर्ण वंदन अभिवादन करते व तिचा असाच आशीर्वाद मिळावा हीच इच्छा बाळगते. शेवटी एकच सांगाव असं वाटते की आपली काळजी घेणाऱ्या आईची आपण म्हातारपणी तिला जपल पाहिजे तिची काळजी घ्यावी. आपण सर्वांनी आप आपल्या आई-वडिलांची सेवा करावी. कारण ज्या मुलाच्या मागे आई-वडिलांचा आशीर्वाद असतो त्यांची संकटे आपोआप दूर होतात. म्हणून पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी आईवडिलांची सेवा करावी. हीच ईश्वर सेवा आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे लेख..... सत्य, सत्यनिष्ठता सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्य विचार सत्य आचार आणि सत्य उच्चार होय. सत्य आणि प्रामाणिकपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण नेहमी खरं बोलावं आणि प्रामाणिकपणान वागाव. आपण स्वतः प्रामाणिक आणि खरेपणाने वागलो तर या भूतलावरील एक अप्रामाणिक आणि खोटारडा माणूस कमी झाला असं म्हणावं. परंतु काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी खरे लपविण्यासाठी 'माझं तेच खरं' असं म्हणतात. पण ' खरं तेच माझं' अस म्हणणारी माणसं या जगी अल्पच आहेत. एका विचारवंताने म्हटले आहे 'कोण खरे ती गोष्ट महत्वाची नाही; परंतु खरे काय आहे ते महत्त्वाचे आहे.' 'कोण खरं बोलत कोण खोटं बोलतंय' हे महत्वाचं नाही. परंतु खरे काय हे महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनाची खरी गुणसंपदा ही आपल्या खरेपणात, प्रामाणिकपणात, वास्तविकतेत दडलेली आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात सत्याचा वापर करून आपले दैनंदिन जीवन तेजोमय, प्रसन्न, टवटवीत, हर्षउल्हासित करू इतके आपण सुखी होऊ. यशस्वी होऊ.आपण जितके सत्यवादी असू वास्तविक असू प्रामाणिक असू तितके समाजप्रिय असू. कारण समाज हा सत्याचा आदर करतो, प्रामाणिकपणाची कदर करतो. हे शाश्वत खरे आहे. म्हणून आपल्याला आपल्या गुणांची जाणीव जरी नसली तरी दोष मात्र आपले आपल्याला माहित असावेत. कारण माणसाला सत्य शिकवावे लागत नाही, मानवजातीला सत्य शिकवण्याची आवश्यकता नाही; त्याच्या खरेपणाची अनुभूती त्याला स्वतःला होत असते. म्हणून त्याने आपला स्वार्थ पणा सोडून निस्वार्थीपणे जीवन जगावं व आपला आदर्श प्रत्यक्षात कृतीद्वारा, आपल्या हातून घडणाऱ्या कर्मातून ,वाणीतुन इतरांना दाखवावा. सत्य हे आपल्या यशाचे मूळ आहे. सत्यनिष्ठेसाठी आपल्याला निर्भयतेची गरज असते आणि निर्भयतेसाठी स्वावलंबनाची गरज असते.नम्रता म्हणजे 'मी' पणाचा आत्यंतिक क्षय. निर्भयतेने प्रगती करून घेता येते व नम्रतेने बचाव होतो.आपण स्वतःस वाचवु शकतो. नम्रतेच्या कोंदनातच आपले अभय खुलून दिसते.आणि उदार वृत्ती वाढीस लागते."नम्रता म्हणजे लवचिकपणा. यामध्ये जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकाष्ठा आहे ". महात्मा गांधी नी म्हटलं आहे " सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्याने धुळीच्या कणापेक्षाही नम्र झाले पाहिजे. नम्रता ही अहिंसेची तेजस्वी मूर्ती आहे ". माणसाच्या अंगी नम्रता असेल तर तो सर्वांच्या ह्दयात राहतो. अशा नम्र व्यक्तीसच सत्य सापडते कारण अस म्हणतात 'पूर्ण नम्रता अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही.' जीवनात खरे यश मिळवण्यासाठी सत्य आणि प्रामाणिकपणा अंगी असणे आवश्यक आहे, गरजेचे आहे. 〰️〰️〰️〰️
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड लेख.... श्रमाचे महत्व “ केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे " कोणतीही गोष्ट आपण स्वतः आधी केली पाहिजे आपल्या अनेक प्रयत्नात आपला देव असतो आपले यश असते.हेच भाव आपण आपल्या अंतर्मनात ठेवावा अंतरीचा देव तेथेच जाणावा. ' प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे' आपण मनापासून प्रयत्न केले असता सर्व साध्य आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्याला श्रम करणे गरजेचे आहे. प्रयत्नाने आपल्या श्रमाचे सार्थक होते. कोणतीही गोष्ट करण्यासाठी श्रम हे करावेच लागते. 'दे गा हरी पलंगावरी असे कधीच घडत नाही'. आपण करीत असलेल्या श्रमात तल्लीनता असावी, त्यामध्ये एकरूप होता येईल अशी एकाग्रता असावी. श्रमाच्या पाठीमागे असलेल्या प्रेममय विचार केला असता जिथे प्रेममय श्रमान जीवन नटलेल असतं तिथं आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण होत असतात. आपलं जीवन हे जगण्यासाठी असतं. प्रेममय असतं. सुखमय असतं. श्रमाच्या माध्यमातून जीवनावर प्रेम करणं म्हणजेच जगण्याच्या गूढ अर्थाचा परिचय करून घेणे होय. आपण जेव्हा प्रेमान श्रम करतो तेव्हा आपल्या स्वतःशी आपण बांधील असतो. परंतु ' श्रमिक जीवन हे आरोग्यपूर्ण जीवन आहे'. ही कल्पना आज आपण हळूहळू विसरत चाललो आहे.' मानवाने शारीरिक श्रम हे करायलाच पाहिजे. श्रमातून सुख समृद्धी व समाधान लाभते. मानसिक श्रमातून क्रांती घडून येते. श्रमाने मानवाच्या जीवनात आनंदाची निर्मिती होते. श्रमाने मिळवलेल्या भाकरीची चव ही अमृतापेक्षा ही मधुर असते. कष्टाच्या भाकरीची गोडी न्यारीच असते. म्हणून श्रमाचे महात्म्य अतिशय पूजनीय आहे. ही सारी सृष्टी श्रमाच्या चैतन्याने भारावलेली आहे. प्रेमाचा मूर्त स्वरूप म्हणजे श्रम होय. प्रेमानं श्रम करणे म्हणजे जीव ओतून काहीतरी नवनिर्मितीचे काम करण होय. आणि हे नवनिर्मितीचे काम करायचे असेल तर आपल्याला श्रमाची सतार ही वाजवीच लागेल. सतारीच्या या स्वरातून श्रमाच्या माध्यमातून सारा आसमंत फुलवावा लागेल. श्रमाच्या या माध्यमातूनच आपण आपल्या जीवनाचा गुढ असा परिचय करून घेतला असाच अर्थ सार्थ होईल.
नशीब मनुष्य हा स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार आहे असं म्हणतात. आपल्या नशिबाला योग्य आकार देणे हे कार्य मानवाच्या शक्ती बाहेरचे नाही. जर मनुष्याने ठरवले तर तो करू शकतो. जर नाही ठरवले तर तो निष्क्रिय राहू शकतो, अथवा काहीच करू शकत नाही. मानवाला स्वतःचे भाग्य स्वतः उज्वल करायचे असेल तर त्याने आपल्या चारित्र्याचा, वर्तनाचा आपल्या हातून घडून येत असलेल्या कार्याचा आधार घ्यावा, नशिबाचा नवे. असं म्हणतात माणसाच्या मनगटातील ताकद संपली की तो नशिबाला दोष देत बसतो. परंतु हे योग्य नाही. मनुष्य हा स्वतःच्या भाग्याचा स्वतः शिल्पकार आहे. मग नशिबाला दोष का बर द्यावे? एखादा मनुष्य अडचणीत असला किंवा संकटात असला तर त्या मनुष्याला साथ देण्याचे धाडस अपवादात्मक सोडून इतर कोणी करत नाही. अंधारात त्याची पडछाया सुद्धा त्याची साथ सोडून देते, त्याचप्रमाणे एखादा माणूस दूर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेल्या मनुष्याचे पण त्याचे आप्तेष्टपण साथ सोडून देतात. आपले दैव हे समुद्राप्रमाणे खोल आणि विस्तृत आहे, पण आपल्या कर्तबगारीची भांडीच लहान आहेत. माणसाची कर्तबगारी अपुरी असली तर तर त्याचा उपयोग होत नाही. आपलं नशीब आपल्या सोबत हवं असेल तर आपली कर्तबगारी मोठी असायला हवी. कारण आपलं नशीब कर्तबगारीने वाढत असते, महानता प्राप्त होते. नशीब रज:कणाचा पर्वत बिंदूचा सिंधू बनवू शकतो. असे महान कन्फ्युशिअसने म्हटले आहे. याचा अर्थ असा की एखादा रज: कण सुद्धा पर्वताच्या छोट्याशा बिंदूच्या सिंधूत रूपांतर करू शकतो. कारण मनुष्य ठरवेल तर सर्व काही होत असते. आपणच आपल्या स्वतःच्या भाग्याचे शिल्पकार व्हायचे असेल तर आपल्या कर्मातील दोष जाणुन घेणे आवश्यक आहे. संकटात , अडचणीत सापडलेला मनुष्य आपल्या दैवाला दोष देतो; परंतु स्वतःच्या कर्माचे दोष तो जाणून घेत नाही. आपले दोष आपल्यातील उणीवा आपणच शोधून काढल्या पाहिजे व ते दूर केले पाहिजे. तरच आपण आपल्या भाग्याचे शिल्पकार होऊ. आपल्याला स्वतःला जिंकायचे असेल तर या सर्व बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे तरच आपण स्वतःला जिंकू शकतो. मग आपल्या सारखा दुसरा नशीबवान कोणी नाही असं समजायला हरकत नाही. माणसाच्या अंगी भेकडपणा असू नये. माणूस हा दैवावर विश्वास ठेवून राहतो. म्हणजे हा केवळ भेकडपणा आहे.माणसाच्या अंगी धाडशी प्रवृत्ती असणे आवश्यक आहे. कारण धाडसी लोकांना नशीब साथ देत असते. असे म्हणायला वावगे होणार नाही. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
वेदना बळीराजाचा 'जय जवान जय किसान' ही घोषणा फक्त शेतकरी म्हणून शेतकऱ्यांसाठी घोषणाच राहिली आहे. भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जातच वाढतो आणि मृत्यूनंतरही आपल्या मुलाबाळांवर कर्जाचा बोझा ठेवून जातो. अशा या माझ्या शेतकरी राजाच्या वेदना किती दुःखदायक आहे. ग्रामीण भागातील जीवनात तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेती ही सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असल्यामुळे कधी बरे कधी वाईट दिवस पहावे लागतात. निसर्गावरच जीवन अवलंबून आहे. "घणाचे घाव घालावे, गळावा घाम अंगाचा, यशोदेवी तयासाठी करी घे हार पुष्पांचा" या दोन ओळीतच श्रमाचे महत्त्व दडलेले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी माझा शेतकरी राजा मेहनत करतो आहे. मुलं चांगली शिकावी, मोठी व्हावी, मुलांनी मोठी शेती घ्यावी आधुनिक उपकरणाचा वापर करावा त्यांना चांगली नोकरी लागावी असे स्वप्न उराशी बाळगतो आहे.आणि त्याचे हे स्वप्न स्वप्नच राहते!!! ?? त्याच्या जीवनात अनेक अनेक अडचणी येतात हलाखीची परिस्थिती निर्माण होते. वेळेवर पाऊस पडत नाही पावसाची वाट बघावी लागते. एखाद्या वेळी पाऊस जास्त आला तर सारे वाहून जाते पाऊस नाही आला तर दुष्काळ पडतो. अशा अनेक परिस्थितीला तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत माझा शेतकरी राजा कष्ट करून सर्वांचे पोट भरतो. धन्य धन्य ह्या उभ्या जगाचा पोशिंद्यास.... 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
लेख...... स्त्री शिक्षण संत तुकडोजी महाराज म्हणतात - “ प्रल्हादाची कयाधु आई l छत्रपतीची जिजाबाई कौशल्या, देवकी आदीसर्वाही l वंदिल्या ग्रंथी" अशाप्रकारे माँसाहेबजिजाऊ मुळे शिवछत्रपती घडले. यशोदे मुळे श्रीकृष्ण घडले, या सर्व माता प्रमाणेच कार्य करण्यासाठी स्त्री शिक्षण महत्त्वाचे आहे. कुटुंबामध्ये स्त्री प्रथम मुलगी, नंतर पत्नी आणि नंतर माता अशा तीन महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असते. या सर्व भूमिका व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी, मुलांच्या संगोपनासोबतच संवर्धनाचे आणि कुटुंबाच्या विकासाचे कार्य पार पाडण्यासाठी स्त्रियांना शिक्षण मिळणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. भारतीय संस्कृतीत मुलांचे संगोपन आणि संवर्धन असे दुहेरी कार्य आजच्या मातेकडून अपेक्षित असल्यामुळे तिला सर्व सुसूत्रता राखून कार्य करावयाचे असते. असे म्हणतात, ' जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी' या जगाचा उद्धार करायवयाचा असेल तर तर प्रत्येक स्त्री शिक्षित होणे महत्त्वाचे आहे. कारण पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत असत, ' मुलांचे शिक्षण हे केवळ एका व्यक्तीचे शिक्षण आहे. परंतु मुलींचे शिक्षण हे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण आहे. म्हणून तिला शिक्षण घेणे आवश्यक आहे. स्त्री ह्या कोणतीही जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात म्हणूनच स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. पुरुषांपेक्षा स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. ग्रामीण स्तरापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत स्वतःच्या कुटुंबापासून तर राष्ट्रव्यापी व संघटनेपर्यंत कृषी कार्यापासून ते संशोधन कार्य पर्यंत अशा अनेक क्षेत्रात स्त्रिया ह्या पुरुषा बरोबरीने कार्य करत आहे.असे प्रत्ययास येते. म्हणूनच मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण असते. स्त्री म्हणजे सृजनशील सामर्थ्य आणि करुणाजन्य शक्ती होय'. 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
लेख........ "वाचाल तर वाचाल" जसे प्रकाशाच्या सहाय्यशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. आणि हे ज्ञान प्राप्त व्हायचे असेल तर आपल्याला पुस्तक वाचणे आवश्यक आहे. माणसाला जसे जगण्यासाठी अन्नाची गरज असते तसेच बुद्धीच्या कक्षा वाढविण्यासाठी,ज्ञानप्राप्तीसाठी वाचण्याची गरज असते कारण वाचन हे आपल्या मनाचे अन्न आहे. असं म्हणतात 'वाचाल तर वाचाल' ज्ञानाची, विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनु आहे. जर ही संपत्ती आपल्याला गोळा करायची असेल तर आपल्याला पुस्तक, ग्रंथ वाचन करावेच लागेल. मानवी जीवन हे जरी क्षणभंगुर असले तरी त्यातले काही क्षण आपल्या ज्ञानाचे अमृत पाजून चिरंजीव करण्याचे कार्य ग्रंथच, पुस्तकेच करत असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुची महती विषद केली आहे.' गुरु बिना ज्ञान नही' असे एका हिंदी संत कवीने म्हटले आहे. गुरु नंतर ग्रंथ हेच आपले गुरु आहे. ग्रंथाद्वारे आपल्याला ज्ञानप्राप्ती करता येते. कारण ज्ञान काट्यांना देखील फुल बनवून घेते, अज्ञान फुलांना देखील काटे बनवून घेते. दृष्टी बदलली तर सारे बदलून जाते. आणि ही दृष्टी बदलवायची असेल समदृष्टी करायची असेल ज्ञानी व्हायचे असेल तर वाचावेच लागेल आणि म्हणूनच मानवाच्या जीवनात ग्रंथांना फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आणि त्यामुळेच पुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ज्याची समदृष्टी झाली तो ज्ञानी झाला. पुस्तक वाचनामुळे माणसाला बहुश्रुतता प्राप्त होते. मनात उद्भवणार्या शंका निरसन ग्रंथच करत असतात. पुस्तक वाचनामुळे आपल्याला कसे जगावे याचे भान राहते. जीवन जगण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. व आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. ग्रंथांचे पुस्तकांचे वाचन केल्यामुळे माणसाच्या भावनांना प्रतिसाद प्राप्त होतो. आपल्या मनाचे उदात्तीकरण होते. त्यामुळेच मानवाच्या जीवनात ग्रंथांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. माणसाला वर्तमानातील परिस्थितीशी संघर्ष कसा करावा व भविष्यातील स्वप्ने कशी रंगवावी हे ग्रंथ शिकवतात. ग्रंथ वाचनामुळे माणसाला त्याच्या भूत भविष्य आणि वर्तमान जीवनात उत्तम प्रकारे लाभ घेता येतो. ग्रंथ हे आपले केवळ मित्र नाहीतर मार्गदर्शकही आहेत तसेच गुरु सुद्धा आहेत. पुस्तक वाचनामुळे माणसाचं मस्तक सुधारते आणि हे सुधारलेल मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही आणि कोणाचेही हस्तक होत नाही असे डाॕ. बाबासाहेब यांनी म्हटले आहे. पुस्तक वाचनामुळे माणूस सुसंस्कृत होतो.हा सुसंस्कृतपणाच त्याच्या यशाचा मार्ग असतो. ग्रंथ हा माणसाचा सर्वात मोठा आधार आहे. ग्रंथामुळे ज्ञान प्राप्त होते. आणि हे ज्ञान प्राप्त झाले की माणूस विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो. मानवाला सुखरूपी आकाशात सहज उडायचे असेल तर ग्रंथ, ज्ञान आणि कर्म हे जीवनाचे पंख असावे लागते. यामुळेच माणूस सुखात आनंदात राहू शकतो. आणि ज्ञानाच्या कक्षा वृंद्धिगत करायचा असेल तर 'ग्रंथ हेच गुरु' आहेत. म्हणून पुन्हा एकदा सांगावसं वाटतं ' वाचाल तर वाचाल'. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
*निसर्गाशी मैत्री* *माझी वसुंधरा* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *“ वाहील वारा हसेल आभाळ* *झाडा-फुलांचा करू सांभाळ* *ढग देतील पाणीच पाणी* *पक्षी गातील सुरेल गाणी "* निसर्ग हा मानवाचे प्रेरणास्थान आहे. निसर्गाचे व मानवाचे अतूट नाते आहे. निसर्ग हा मानव व इतर सजीव सृष्टी करता आणि सजीव सृष्टी निसर्ग करिता, दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. ' वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. माणूस हा निसर्गाचे लेकरू ना! निसर्गाच्या रम्य वातावरणात माणूस आश्रयस्थान घेतो. निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहे. निसर्ग मानवाची भूक भागवतो तहान शमवितो, मंद मधुर वायू लहरींनी श्रमाचा परिहार करतो, सुगंधी फुलांनी त्याचे जीवन सुगंधित करतो. पण सध्या या यंत्रयुगाच्या आणि विज्ञान युगाच्या जाळ्यात माणूस इतका अडकला आहे की, निसर्गाकडे तो दुर्लक्ष करत आहे. माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या तात्पुरत्या सुखासाठी निसर्गाचा गैरवापर करत आहे. पर्यावरणाला काळीमा फासण्याचे कार्य बुद्धिमान समजला जाणारा सृष्टीवरील मानव करत आहे. प्रदूषण निर्मिती करून आज जिकड पहावेे तिकडे प्रदूषण फोफावत चाललेले आहे. या प्रदूषणाचा पर्यावरणावर म्हणजेच निसर्गावर परिणाम होऊन या निसर्गाचा, पर्यावरणाचा तोल ढासळला जाऊ लागला आहे. पर्यायाने संतुलन बिघडलेले आहे. ही प्रदूषणाची गंभीर समस्या होऊन बसलेली आहे. तरीदेखील मानवाला आपली वनश्री आपले वैभव आहे हे त्याला समजून नाही राहिले. या सर्वाचा विपरीत परिणाम मानव प्राण्यावर होत आहे. हिरवेगार डोंगर लुटण्याचा लोभ माणसाला आवरेना, डोंगर उघडा बोडका करून माणूस आता अश्रू ढाळू लागला. पण या उघड्या डोंगराचा माथा झाकण्यासाठी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे हवीत. जमिनीची धूप थांबविण्यासाठी आणि भरपूर पाऊस पडावा यासाठी झाडांची आवश्यकता आहे. निसर्ग म्हणतो, ' अरे मित्रा मी तुझ्याच साठी जगत होतो ना! तुझ्यासाठी मरत होतो ना! निसर्ग माणसाला पावलोपावली शिकवत असतो आणि माणूस चुकला तर त्याला सजाही देतो. पण ही सजा तात्पुरती असते. माणसाला गर्व झाला की निसर्ग त्याला धडा शिकवतो. माणसाचे डोळे उघडताच पुन्हा तो आपल्या निसर्ग मिञाची सोबत घेऊन त्याचा पुन्हा जीवनसाथी बनतो. असे हे निसर्गाचे मानवाशी अतूट नाते आहे. निसर्ग हा माणसाचा महान गुरू, सखासोबती आहे. या प्रेरणेचे निसर्ग स्थान असलेल्या निसर्गाला आपण जपलेच पाहिजे. आपली सृष्टी हिरवीगार शाल पांघरून सजलेली, नटलेली असावी, दिसावी यासाठी आपण आपल्या निसर्गाला जपले पाहिजे. तेव्हा सर्वत्र झाडे न कापता ते अधिक प्रमाणात लावून जगवले पाहिजे.पाण्याची स्वच्छता राखली पाहिजे.वृक्ष वेलींवर पुञवत प्रेम केले पाहिजे.तेव्हा पर्यावरणाचा समतोल राखता येईल. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' हे उगाच नाही म्हटले संत तुकाराम महाराजांनी. 'आपली वनश्री आपण जपूया, वैभव तिचे राखूया' हाच मंत्र आपण जपला पाहिजे आणि कृतीत उतरवला पाहिजे. " लावू रोपटे होईल झाड पक्षी गातील पानाआड l येतील फळे बहरतील फुले झाडाखाली मग खेळतील मुले ताजी शुद्ध मिळेल हवा सुगंध फुलांचा घेऊन नवा. चला तर मग वसुंधरेच्या पोटी रुजवण बियांची करूया, निसर्गाशी घट्ट नाते आपले जुळवू या.... ☘☘☘☘☘☘ 👏👏👏👏👏👏👏 म्हणूनच म्हणावस वाटत 'इथे कर माझे जुळती, जिथे निसर्ग आहे माझा सोबती'.🙏🙏🙏🙏 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जिल्हा नांदेड.
सुट्टीउपक्रम - स्वंयअध्ययन उपक्रम - ४ आता मी लिहिणार साहित्य - आवश्यकता नाही. कृती - एखाद्या सोपा विषय घ्यावा व त्यावर आधारित चार-पाच वाक्यात माहिती लिहावी. नमुना विषय - १) माझा वाढदिवस. काल माझा वाढदिवस होता. बाबांनी मला नवे कपडे आणले. मी नवे कपडे घातले. आईने मला ओवाळले. वाढदिवसाला माझे मित्र आले होते. मी त्यांना खाऊ दिला. -------------------------------------------- विषय सूची- १) माझी आई २) माझी शाळा ३) माझा आवडता खेळ ४) माझे आवडते फुल. ५) माझे घर ६) दिवाळी ७) पावसाळा ८) सहल ९) माझी मैत्रीण १०) रक्षाबंधन टीपः दिलेल्या विषय सूचीतील विषय घेऊन विद्यार्थ्यांनी चार ते पाच वाक्यात माहिती लिहावी.सांगावी. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिला सेनकुडे
सुट्टीउपक्रम - स्वंयअध्ययन उपक्रम ३ - शब्दांची बाग साहित्य - पाठ्यपुस्तकातील पाठांमध्ये आलेल्या अक्षरांवर आधारित शब्दांची बाग व प्रश्न कार्ड ( प्रत्येक प्रश्न कार्डावर किमान पाच प्रश्न असावेत.) कृती - शब्दांच्या बागेतील शब्द विद्यार्थ्याने वाचावे. वाचावयास सांगावे. शब्द वाचून झाल्यावर पण प्रत्येक विद्यार्थ्याने प्रश्न कार्ड द्यावे. प्रश्न कार्डावरील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्याने त्यांची बाग पाहून लिहावीत. कार्ड बदलून सराव करावा. *शब्दांची बाग* -- ------------------------------------------------- आई पपई रस रपरप नळ नऊ घर फणस सण घसरगुंडी धन ऊस आण सई घणघण मान लहान आपण फसफस आला अननस आज दार माऊ बाजार जाऊ पसर हास अजय अहाहा अबब अमिता कसरत बस नमन बडबड झाकण तलवार तबला रमत-गमत हात काम उचल नाक चमचम सरबत घसर बगळा परकर गळा ------------------------------------------------ प्रश्न - १) ' ऊ ' ने शेवट होणारे शब्द लिहा. २) ' ण ' ने शेवट होणारे शब्द लिहा. ३) शरीराच्या अवयवांची नावे लिहा. ४) मुला मुलींची नावे लिहा. ५) फळांची नावे लिहा. ------------------------------------------- टीपः पाठ्यपुस्तकातील पाठातील शब्द घेऊन ' शब्दाची बाग' तयार करावी व सराव करावा. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिला सेनकुडे
सुट्टीउपक्रम - स्वंयअध्ययन उपक्रम २ - शब्द वाचूया, क्रमाने लावूया. साहित्य - वर्णमालेच्या गटानुसार शब्द असलेले शब्द कार्ड. कृती - विद्यार्थ्याने एक कार्ड घ्यावे. त्यावरील शब्द वाचावेत आणि लिहावेत. लिहिलेले शब्दवर्णमालेच्या क्रमाने पुन्हा लिहावेत. जसे - शब्द कार्ड १. खटारा ,घरटे ,गवत ,कमळ शब्द वर्णमालाक्रमाणे कमळ ,खटारा, गवत ,घरटे कार्ड बदलून सराव द्यावा. *नमुना कार्डे* १) चरखा जहाज झगा छत्री २) टपालपेटी ढग डब्बा ठसा ३) तबक दरवाजा धनुष्य थवा नळ ४) परात भटजी मगर फणस बदक 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिला सेनकुडे
सुट्टी उपक्रम - स्वयंअध्ययन उपक्रम १ - क्रम जुळवूया , क्रम लावूया. साहित्य - वर्णमालेतील गटानुसार अक्षर कार्ड किंवा वर्णमाला असलेले साहित्य कृती - विद्यार्थ्याने अक्षरकार्ड वर्णमालेतील अक्षरे वाचावीत. ती अक्षरे ती अक्षरे लिहावीत. लिहिलेली अक्षरे वर्णमालिका क्रमाने पुन्हा लिहावीत. जसे -- कार्ड- क ग घ ख क्रमाने जुळवून लिहिलेले क ख ग घ असा सराव करणे बदलून द्यावा. अक्षर कार्डाचे संच - अक्षर कार्डे १) अ आ इ ई - - ई आ इ अ २) उ ऊ ए ॲ - - ऊ ए ॲ उ ३) ऐ ओ आॕ औ अं अः आॕ ऐ ओ अः अं ४) क ख ग घ - घ क ख ग ५) च छ ज झ - ज छ झ च ६) ट ठ ड ढ ण - ण ड ठ ढ ट ७) त थ द ध न - न ध द थ त ८) प ब भ म - ब म भ प फ ९) य र ल व - व ल र य १०) श ष स ह - श ह ष स ११) ळ क्ष ज्ञ - ळ ज्ञ क्ष 〰️〰️〰️श्रीमती प्रमिला सेनकुडे
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/03/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● २००५ - सम्राट कनिष्क या एअर इंडियाच्या विमानावर बॉम्बहल्ला करून ३२९ प्रवासी व कर्मचाऱ्यांना मारल्याच्या आरोपातून रिपुदमनसिंग मलिक व अजायबसिंग बागरी यांची कॅनडाच्या न्यायालयाने सुटका केली. ● १९९२ : सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक प्रदान करण्यात आले. ● २००१ : नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान ● २००० : हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के. बिर्ला पुरस्कार’ जाहीर ● १९७६ : इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला. ● १९६६ : अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. ● १९४५ : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला. ● १९४३ : ’प्रभात’चा ’नई कहानी’ हा चित्रपट रिलीज झाला. ● १६४९ : शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले. ● १५२८ : फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला. [चैत्र शु. १४] 💥 जन्म :- ● १८७७ - मोहम्मद रझा शाह पेहलवी, इराणचा शहा. ●१९४१ - रॉबर्ट ग्वेई, कोटे दि'आयव्होरचा हुकुमशहा. राजपुतांच्या गृहिलोत वंशातील मेवाडचा राजा अमरसिंह. ● १९३६ : भास्कर चंदावरकर – संगीतकार (मृत्यू: २६ जुलै २००९) ● १९२१ : फहाद – सौदी अरेबियाचा राजा (मृत्यू: १ ऑगस्ट २००८) ● १९०१ : प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १२ जून १९८१) ● १७८९ : जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जुलै १८५४) ● १७५१ : जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ जून १८३६) ● १७५० : कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असुन तिने ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले आहेत. (मृत्यू: ९ जानेवारी १८४८) ● १६९३ : मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी (मृत्यू: २० मे १७६६) 💥 मृत्यू :- ● १९४५ - गणेश दामोदर सावरकर. ● २००७ : मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू (जन्म: ४ मे १९८४) ● १९९९ : कुमुदिनी पेडणेकर – गायिका ● १९९९ : कुमुदिनी रांगणेकर – इंग्रजी लेखकांची मराठी वाचकांना ओळख करुन देणार्या लेखिका (जन्म: ? ? ????) ● १९९० : वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म: २१ जुलै १९१०) ● १९४६ : ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (जन्म: १० ऑगस्ट १८५५) ● १९४५ : गणेश दामोदर तथा ‘बाबाराव’ सावरकर – कट्टर हिंदुत्त्ववादी आणि ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक (जन्म: १३ जून १८७९) *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने राज्यातील सिनेमागृहे, म्युझियम व नाट्यगृहे बंद ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 50 लाखांचं बनावट सॅनिटायझर जप्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबईच्या कमाल तापमानात आता वाढ; पारा ३७ अंशावर, राज्याचा विचार करता येत्या २४ ते २८ तासांत उत्तर कोकणासह मुंबईचे कमाल तापमान ३६ ते ३८ अंशाच्या घरात नोंदविण्यात येईल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 32 जण रुग्ण सापडले आहेत. यावेळी खबरदारीसाठी MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी; पोलीस खात्याने घेतला महत्त्वाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईः १९५६च्या दीक्षासोहळ्याप्रसंगी माजी उपमहापौर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांचे काल झाले निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयपीएल चे 13 वे सीझन लांबणीवर, 15 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माझा दोस्त* - विठ्ठल जाधव, शिरूर कासार जि. बीड 9421442995 संगणक माझा दोस्त मज ज्ञान देतो मस्त माउस खेळतो खेळ क्लीकने लावतो मेळ स्क्रिनवर दिसे कुत्रा सरचिंग करतो मित्रा करतो पेंटिंग भारी मजाच करतो सारी आता करीन शॉपिंग राहीन फुल्ल चार्जिंग जाऊ या का चंद्रावर मित्रा घेऊन बरोबर *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नारळाचा मूळ देश कोणत्या देशाला मानले जाते ?* इंडोनेशिया 2) *'महाराष्ट्राचे मँचेस्टर' असे कोणत्या शहराला म्हटले जाते ?* इचलकरंजी 3) *कोणता पक्षी उलट्या दिशेने चालू शकतो ?* इमू 4) *पाण्याबाहेर जगू शकणारा मासा कोणता ?* ईल 5) *'विधवा विवाह कायद्याचे जनक' कोणाला म्हटले जाते ?* ईश्वरचंद्र विद्यासागर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा. डॉ. सुरेश तेलंग, यशवंत महाविद्यालय, नांदेड 👤 अँड. कैलाश देशमुख गोरठेकर, उमरी 👤 अनिलकुमार जैस्वाल, कुपटी, माहूर 👤 अनिल कांबळे, लोहा 👤 कैलास एम. राखेवार, नांदेड 👤 शिवराज उर्फ बबलू भुसेवार, नांदेड 👤 शिवम भंडारे, येवती *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस कशासाठी काय कमावतो आहे, अन् नेमकं मोलाचं काय गमावून बसतो आहे; काहीच कळेनासं झालयं. आईबापाला म्हातारपणाची काठी म्हणून मुलगा हवा. मुलाला मेलेल्या आईची पेन्शन हवी; म्हणून मेल्यानंतरही अंगठ्यापुरती आई ठेवतो तो जिवंत. आईबापाचं घर हवं म्हणून मुलगा आई वडिलांना नारळपाण्यात विष देऊन मारतो. आईबापांच्या अंत्यसंस्कारासाठी वेळ नाहीय पोरांकडे. म्हणजे नेमकं काय करताहेत ही मुलं? देशाला महासत्ता बनवण्याच्या कार्यात गुंतली की काय? तर तसंही म्हणता येत नाही. एवढीशी निरागस मुलं आत्महत्या करताहेत. त्यांना एवढ्यात कोणी कंटाळून सोडलय?* *पालकांना हवे आहेत आपल्या मुलाला सगळ्या विषयात आऊट ऑफ मार्क. आई सारखा आभ्यासाचा लकडा पाठीमागे लावते म्हणून तिची हत्या करून मुलगा फरार होतो. त्याला कुठला अभ्यास कयायचा आहे माहीत नाही. आताची पिढी वरकरणी आहे खूप स्मार्ट पण मूल्यांचा तपास घ्यायला जाल, तर भेदरवून सोडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता या मुलांना देऊ शकत नाही निबंध लिहिण्याची सूचना. ते एक अवाक्षरही कागदावर कोरणार नाही. त्यांनी निबंध लिहू नये हेच बरे! यास देशकालपरिस्थीती जितकी कारणीभूत आहे तितके आपणही , सगळ्यांनीच हिरावून घेतलेत निबंधाचे हळुवार कल्पकविषय आजच्या पिढीकडून.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुप्रभात मित्रांनो, अवतार सिनेमातील एक गाणे आठवा, जिंदगी ये कैसी है,जैसे जियो वैसी है । त्यात राजेश खन्नानी जिंदगी जगण्याचे खूप छान मंत्र दिले आहेत. जीवनाचे गीत हे विविध चांगल्या छंदानी सजविले पाहिजे.आज युवापिढीला एका चांगल्या वाटाड्याची गरज आहे.उत्तम आदर्श त्यांच्यासमोर उभे करणे गरजेचे आहे. यशाची,संघर्षाची नशा त्यांना चढवेल अशा मद्याची मैफल त्याच्याभोवती पाहिजे. अनेक उच्चपदस्थ, उच्चभ्रू म्हणवले जाणारे प्रतिष्ठीत सुर्यास्ताबरोबर स्वत:ला काचेच्या पेल्यात बुडवतात. तरूण मुला-मुलींपुढे कुठले आदर्श आपण ठेवणार आहोत ? कोवळी, मिसरूड फुटलेली मुलं अलिकडे व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांना कुणीतरी थांबवलं पाहिजे. त्यांची शक्ती विधायक कार्यासाठी संघटित व्हायला हवी. जगाची दारं आज त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांनी त्या दारापर्यंत पोहोचायला हवं. खरं म्हणजे आनंद-दु:ख, यश-अपयश व्यक्त करण्याची अनेक माध्यमं आहेत. मदिराप्राशन, हे माध्यम उचित ठरू शकत नाही. प्रत्येकानं मात्र आवडीचा छंद जोपासण्याची धुंदी चढू द्यावी. श्रमण्यातून मिळालेल्या यशाचा कैफ काही औरच असतो. दुस-याच्या दु:खानं गुंगी जरूर यावी नि, ती सोडविण्याचा अंमलही असावा. प्रेमाचा वर्षाव करत झिंगावं त्यानं आप्त-मित्रांसह, आणि जगण्याची खरी... नशा.. चढू द्यावी...! अशोक कुमावत, नाशिक (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात.त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात.ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही. ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात.प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते. तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो.त्याचे कारणही तसेच असते. सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी,मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली,जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी, अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो. अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो.अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो. म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देतो तो देव* ही गोष्ट आहे विनोबा भावे यांची. विनोबाजी ना आई विनू म्हणायची, विष्णूच्या घरामागील परसामध्ये आंब्याची, फणसाची झाडे होती. झाडावरचा पिकलेला फणस काढून आईने कापला. त्यातील रसाळ गरे काढले. वेगवेगळ्या द्रोणांमध्ये भरून ठेवले. विनू पाहतच होता. रसाळ गऱ्यांचा पहिला द्रोन आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती. पण आईने त्यातले दोन द्रोन विनू च्या हातात दिले व शेजार्यांकडे पोहोचविण्यास सांगितले. विनूने दोन्ही घरी द्रोन नेऊन दिले. पण तो नाराज होऊन म्हणाला, " आपल्याच घरचे फळ नीआपल्याला मात्र सगळ्यात शेवटी." आई हसली आणि म्हणाली, " अरे आपल्या जवळ जे असतना त्या अगोदर इतरांना द्यावे आणि मग आपण घ्यावं. इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणे हे बरोबर नाही. लक्षात ठेव देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. देणे हा देवाचा उत्तम गुण आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणे हा राक्षसांचा दुर्गुण आहे. आता तूच ठरव तुला देव व्हायचं आहे, की राक्षस? " विनू ची समजूत पटली. त्याने आनंदाने गरे खायला सुरुवात केली. तात्पर्यः स्वतःसाठी तर सर्वजण जगतात परंतु इतरांसाठी ही जगून पहावं. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/03/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉक्टर : देव की दानव* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९९४ - लिनक्सची १.० आवृत्ती प्रकाशित. ● १९९८ - इराणमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. ● १९८८ : जपानमध्ये समुद्रांतर्गत रेल्वे वाहतुकीस प्रारंभ ● २०१० : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते ‘लोकसंस्कृती’चे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ पुण्यात देण्यात आला. ● २००१ : चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे हाती घेतली. त्या सिक्कीममधील आदिवासी समाजातील असून १९६४ च्या बॅचमधील आय. ए. एस. अधिकारी आहेत. ● २००१ : व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली. ● २००० : कलकत्ता येथील ’टेक्निशियन आय’ हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ● १९५४ : दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली. ● १९३१ : ’आलम आरा’ हा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 💥 जन्म :- ● १९६५ - आमिर खान, हिंदी चित्रपट अभिनेता. ● १९७४ : साधना घाणेकर ऊर्फ ’साधना सरगम’ – पार्श्वगायिका ● १९३३ : मायकेल केन – ब्रिटिश अभिनेता ● १९३१ : प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते (मृत्यू: १३ जानेवारी २०११) ● १८७९ : अल्बर्ट आइनस्टाईन – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-अमेरिकन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू: १८ एप्रिल१९५५) 💥 मृत्यू :- ● १८८३ - कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक. ● १८८३ कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक ● २०१० : गोविंद विनायक तथा ‘विंदा’ करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार.(जन्म: २३ ऑगस्ट १९१८) ● २००३ : कवी सुरेश भट (जन्म: १५ एप्रिल १९३२) ● १९९८ : दादा कोंडके – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक (जन्म: ८ ऑगस्ट १९३२) ● १९३२ : जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (जन्म: १२ जुलै १८५४) ● १८८३ : कार्ल मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते (जन्म: ५ मे १८१८) *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *काही बँका बुडित निघाल्यानंतर आता राज्य सरकार खडबडून जागं झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर यापुढे सर्व सार्वजनिक संस्थांनी आपले पैसे राष्ट्रीयकृत बँकामध्येच ठेवावेत असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई :- बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनसाठी शासनाकडुन २५ कोटींचा निधी तर स्थानिक शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी प्रत्येकी साडे बारा लाख प्रमाणे ५० लाख निधी देण्याची दर्शवली तयारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडून सर्व सरकारी डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या केल्या रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एअर इंडियाकडून इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, दक्षिण कोरिया, श्रीलंकेला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं ३० एप्रिलपर्यंत रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शासकीय निधीचा व्यवहार आता राष्ट्रीयीकृत बँकेतूनच ; १ एप्रिलपासून अंमलबजावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *जम्मू - काश्मीर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कोरोनामुळे यंदाच्या आयपीएलचं आयोजन लांबणीवर, 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा आता 15 एप्रिलपासून, तर भारत-दक्षिण आफ्रिका वन-डे मालिका रद्द, कोरोनाच्या भीतीने 100वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"हसत-खेळत"* - धिरज उत्तमराव चामे, अहमदपूर जि. लातूर 8369504498 हसत-खेळत जगायचं उगाच रडायचं नाही रागावर ताबा ठेवायचा पटकन चिडायचं नाही मन मोठं ठेवायचं स्वार्थी बनायचं नाही सत्याची बाजू घ्यायची लबाडी करायचं नाही सर्वांशी प्रेमाने बोलायचं गर्वात राहायचं नाही कष्ट करायचे खूप हार मानायचं नाही छंद जपायचे आपले आळस करायचं नाही बालपण मजेत जगायचं बागडायला विसरायचं नाही *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" संस्कार म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *संस्कृत वाङ्ममयातील पहिला ग्रंथ कोणता ?* ऋग्वेद 2) *'क्रिकेट' या शब्दाची पहिली नोंद कोणत्या शब्दकोषात झाली ?* ऑक्सफर्ड 3) *इंद्राच्या हत्तीचे नाव काय होते ?* ऐरावत 4) *जगातील सर्वात क्रियाशील ज्वालामुखी कोणता ?* एटना 5) *'कांगारुचा देश' असे कोणत्या देशाला म्हटले जाते ?* ऑस्ट्रेलिया *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. प्रशांत मुदकोंडवार 👤 विशाल यादव 👤 श्रावणी महादेव पाटील 👤 ओमकार नाईकनवरे 👤 डी. बी. पाटील होटाळकर 👤 आनंद जगताप 👤 विजय पवार 👤 वेदांत मनीष तारे 👤 धैर्यशील शशिकांत शिंदे 👤 प्रियांका जाधव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट, या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरून जावा. ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. सद्गुरूंकडून मिळालेले नाम ह्रदयापासून आणि भौतिकतेचा विसर पडून जर आपण घेत राहिलो, तर त्यापासून येणारी अनुभूती ईश्वरासमीप नेते.* *नामामुळे व्यक्तीच्या ठिकाणी निरलस, निर्भय वृत्ती वस्तीला येते. अशा व्यक्तीच्या प्रत्येक चलनवलनात फक्त आणि फक्त देव आणि देशप्रेमच लपलेले असते. येता-जाता, उठता-बसता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा अविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा भेद नाम्मोच्चाराने दूर होतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ज्याच्या मुखात नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. हेच वेदपुराणे, उपनिषदे, महाकाव्य यांनी वेगवेगळ्या शब्दांत सुगमतेने सांगितले आहे. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरीता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुप्रभात, मित्रांनो* *माणसानं कुंडीतल्या नाही, तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं* *कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं* *उंच उंच वाढत राहावं*.... *संघर्ष करत असताना घाबरू नका* *कारण संघर्षाच्या वेळीचं* *माणूस एकटा असतो* *यश मिळाल्यानंतर सगळी* *दुनिया तुमच्या सोबत असते*..! *यासाठी उंच स्वप्ने बघावी लागतात.* *आपले आयुष्य तसे सामान्यच आणि स्वप्नेही तशीच; पण असामान्य* *व्यक्तींची 'स्वप्ने' लोकविलक्षणच असतात. संत* *एकनाथांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की,'अजानवृक्षाची मुळी* *माझ्या गळ्याभोवती वेढली गेली आहे. '* *एकनाथांनी मग आळंदीला जाऊन ज्ञानदेवांची समाधी शोधून काढली. तिचा जिर्णोद्धार केला. इतकेच नव्हे,* *तर ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. तुकारामांच्या स्वप्नात* *संत नामदेव आले आणि त्यांनी आपली शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण करावी, असे तुकोबांना* *सुचविले. जिजाऊंनी शिवरायांच्या राज्याभिषेकाचे स्वप्न मनोमन पाहून शिवरायांना स्वराज्याचे* *तोरण बांधण्याची प्रेरणा दिली होती.* *स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी येथे खडकावर, ध्यानमग्न स्थितीत, दैदिप्यमान भारताचे स्वप्न पाहिले. 'देशवासियांच्या जाड्याभरड्या अन्नवस्त्राची तरी सोय व्हावयास हवी.' हे रामकृष्ण परमहंसांचे बोल त्यांच्या मनात गुंजत होते. बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धांचे मनही उपेक्षित लोकांसाठी तळमळत होते. स्वत:पलिकडे लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्यांची स्वप्ने भव्य-दिव्य असतात. संत कबीर यांनी प्रत्येक जीवाने सत्-चित् , आनंदरूप व्हावे, अशी आस बाळगली, तर तुकडोजी महाराजांनी भेदभावरहित सुखी भारताची आकांक्षा धरली.* *अशोक कुमावत, नाशिक* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणसाचे मन हे नेहमी उमलणा-या फुलाप्रमाणे प्रसन्न ठेवायला हवे.फुले ही स्वत: उमलतात ती दुस-यांच्या दु:खाला दूर करण्यासाठी.फुलांचे जीवन अल्पायुषी जरी असले तरी माणसांच्या मनावर जास्त काळ राज्य करुन जातात हे मात्र खरे आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आकाशात किती तारे आहेत बरे ?* एकदा गच्चीवर अकबर बादशहा आणि बिरबल गप्पा मारत होते. तेवढ्यात बादशहा बिरबलला म्हणाला, ''बिरबल, या आकाशात किती तारे असतील बरे?'' यावर बिरबलने जवळच उभ्या असलेल्या एका सेवकाला एक परातभर मोहर्या घेऊन येण्याचा हुकूम केला. सेवक जाताच आकाशाकडे पाहत बिरबल आपण जसे काही तारेच मोजीत आहेत, असे नाटक करू लागला. थोड्या वेळाने मोहर्या भरलेली परात आणून ती सेवकाने बिरबलाच्या पुढे ठेवली. मग तारे मोजण्याचे नाटक बंद करून ती परात बादशहापुढे ठेवीत तो म्हणाला, ''खाविंद, जेवढ्या मोहर्या या परातीत आहेत , बरोबर तेवढेच तारे या आकाशात आहेत. नेमके तारे किती आहेत, हे माहिती करून घ्यायचे असेल, तर या परातीतील एकेक मोहरी मोजीत, अशा सर्व परातभर मोहर्या मोजीत बसा, म्हणजे तुम्हाला तार्यांची संख्या समजेल. '' यावर बादशहा म्हणाला, ''बिरबल, त्याची काहीच गरज नाही. केवळ या मोहर्या मोजीत मला माझे उरलेले आयुष्य खर्च करायचे नाही. '' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/03/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जय जवान , जय किसान* https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_24.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९९७: मदार तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली 💥 जन्म :- ● १९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे 💥 मृत्यू :- ● १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री ● १८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सर्व केंद्रीय मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, घाबरण्याऐवजी काळजी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन, तर शासकीय कार्यक्रम रद्द करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्यसभेसाठी शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, भाजपकडून भागवत कराड तर दिग्गजांना बाजूला सारत काँग्रेसकडून राजीव सातव यांचं नाव निश्चित, चंद्रकांत खैरे, एकनाथ खडसे, संजय काकडेंची संधी हुकली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *देशात कोरोनाचे 73 तर महाराष्ट्रात 11 रुग्ण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती, आरोग्य खात्याकडून विशेष खबरदारी, राज्यातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नसल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जेरुसलेम : चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने घेतलेल्या बळींचा तसेच लागण झालेल्या रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत असून इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी जीवघेण्या कोरोना व्हायरसवर लस विकसित केल्याचा दावा केला आहे. लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यात शिवजयंती तिथीनुसार साजरी, मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण तर औरंगाबादेत राज ठाकरेंचं शिवरायांना अभिवादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कोरोनाचा हापूस आंब्यावर परिणाम, विमान वाहतूक बंद असल्यानं निर्यात बंद, शेतकरी चिंताग्रस्त, कोरोनामुळे शिर्डीत येणाऱ्या भक्तांची संख्या रोडावली, राज्यात अनेक यात्रा उत्सव रद्द, तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पालाही फटका, 70 टक्के बुकिंग परदेशी पर्यटकांकडून रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कोरोनामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यानचे पुढील दोन एकदिवसीय सामने प्रेक्षकांविना होणार, तर आयपीएलवरही कोरोनाचं सावट कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजा* - उत्तम सदाकाळ, जुन्नर, (पुणे) 9011016655 आजा आधाराचा वड आजा बळकट खोड दिशा देतो जगण्याला आजा संस्काराचे झाड आजा सांगतो कहाणी आजा गातो गोड गाणी मेळा जमतो मुलांचा रोज आजा भोवताली पाठी घेतो लेकरांना घोडा बनतो रे आजा हट्ट धरल्या लेकरांचे लाड पुरवितो आजा आजा असता घरात घर भरलेले वाटे तीर्थे सारी आजा ठाई देव आजामध्ये भेटे बदलत्या दुनियेत नसे किंमत नात्याला नातवांच्या हितासाठी जपा आपुल्या आजाला *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" अनेक वेळा चांगले क्षण, आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा कोणता ?* करबुडे 2) *भारताच्या मध्यभागातून कोणते वृत्त जाते ?* कर्कवृत्त 3) *जगातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ कोणता ?* ऋग्वेद 4) *कोणता रक्तगट सर्वांना चालतो ?* O+ 5) *कोणत्या वृक्षाला पन्नास वर्षांनी फळे येतात ?* ओक *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रेरणाताई वरपूडकर 👤 सुरज माने 👤 भगवान कांबळे, पत्रकार, धर्माबाद 👤 रुस्तुम शेख *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट, या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरून जावा. ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. सद्गुरूंकडून मिळालेले नाम ह्रदयापासून आणि भौतिकतेचा विसर पडून जर आपण घेत राहिलो, तर त्यापासून येणारी अनुभूती ईश्वरासमीप नेते.* *नामामुळे व्यक्तीच्या ठिकाणी निरलस, निर्भय वृत्ती वस्तीला येते. अशा व्यक्तीच्या प्रत्येक चलनवलनात फक्त आणि फक्त देव आणि देशप्रेमच लपलेले असते. येता-जाता, उठता-बसता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा अविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा भेद नाम्मोच्चाराने दूर होतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ज्याच्या मुखात नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. हेच वेदपुराणे, उपनिषदे, महाकाव्य यांनी वेगवेगळ्या शब्दांत सुगमतेने सांगितले आहे. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरीता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुप्रभात, मित्रांनो* *मला माणूस हवाय,मला माणूस* *हवाय।* *देताय ना शोधून ,नाही,राग मानू नका* *गर्दीत हरवलाय म्हणून म्हटलो.* *मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं...* *की त्याचा गंध मनाला... शरीराला प्रसन्न करून जातो..* *सहवासातील माणसाचं देखील असंच असतं...* *काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात...* *आपली होऊन जातात...* *तर काही कितीही सहवासात राहिली तरी आतून ओढ नसतेच...* *चेहरा बघण्यापेक्षा...* *नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं...* *शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल तर...* *त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाण वाटतं....* *शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते* *तर मनाची सुंदरता,* *टिकून राहाते शेवटपर्यंत...* *शरीराला वय असतं....* *मनाला ते कधीच नसतं...* *शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो...* *शरीर तर असतं निमित्तमात्र...* *माणसाच्या स्वभावात गोडवा...* *शालीनता...* *प्रामाणिकपणा...* *आणि विनयशीलता असेल...* *तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली...* *तरी ती हवीहवीशीच वाटते...* *म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही,* *देवघरातील समईच्या तेजापुढं* *आपण नतमस्तक होतो...* *आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर...* *त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!* *आपल्या आवडत्या माणसाचं...* *आपल्यासोबत असणं...* *ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...* *ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही...* *आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ?* *नशिबानं कधी भेटलीच...* *तर हळुवार जतन करून ठेवावीत...* *कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील...?* *माणूस बनुया,माणस जपुया,* *अशोक कुमावत, नाशिक* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात आपल्याला श्रीमंत व्हायचे असेल तर पहिल्यांदा प्रामाणिकपणा अंगी बाळगायला हवा.कारण प्रामाणिकपणा अंगी बाळगल्यामुळे आपणास खोटे बोलण्याची सवय लागत नाही, आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो,कुणीही आपल्याकडे संशयीत भावनेने पाहत नाही, नातेसंबंध,मित्र आणि इतरांमध्ये प्रामाणिकपणा असल्यामुळे विश्वासाचा पाया मजबूत होतो, आपल्या प्रामाणिकपणाची वेळोवेळी इतरांना प्रचिती आल्यामुळे आपल्याकडे वाईट नजरेने किंवा वेगळ्या विचाराने पहायची हिम्मत कुणी करणार नाही.एवढेच नाही तर आपल्या जीवनात जीवन जगण्याचा पाया मजबूत होतो तर प्रामाणिकपणे जीवन जगण्याचे ध्येय आपल्या जीवनात सातत्याने ठेवल्यामुळे आपल्याला कुणापुढे मान खाली करून माफी मागायची गरज नाही.जीवनात प्रामाणिकपणा असणे म्हणजे आपल्या ताठ मानेने स्वाभिमानाने जगण्याचे मंत्र शिकले आहे असे होईल. आपण इतरांच्या जगण्याकडे पाहिले आणि आपल्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीकडे पाहिले तर आपण फार श्रीमंत आहोत हे लक्षात येईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. 🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चूक कळली* एक होते तळे. त्यात होते बेडूक. बाजूला होते मैदान तेथे मुले खेळत. खेळ म्हणून तळ्यात दगड फेकत. पाणी उंच उडे. मुलांना गंमत वाटे. मुलांना आनंद होत होता. आणि ती आणखी पाण्यात दगड मारत होती. पण ती दगड बेडकांना लागत असे. मुलांचे पाण्यात दगड मारणे असे रोजच चालत असे. बेडूक घाबरून गेले. मग एकदा काय झाले पाण्यातून एक बेडूक पुढे आला. मुलांना विचारू लागला, " तुम्ही दगड का मारता?" मुले म्हणाली, " पाण्यात दगड मारणे हा आमचा खेळ आहे." आम्हाला त्यात आनंद वाटतो, आम्हाला खूप खूप मज्जा येते." बेडूक म्हणाला. " तुमचा खेळ होतो, पण आमचा जीव जातो". तुम्ही मारलेले दगड आम्हाला लागतात आणि आमच्या तील बेडकांना ती दगडं लागतात व आमचा जीव जातो. मुलांना हे ऐकून खूप वाईट वाटले. आपले चुकले हे मुलांना कळले. मुलांना आपली चूक कळली. त्या दिवशीपासून मुलांनी दगड पाण्यात मारणे हा खेळ सोडून दिला. तात्पर्यः आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही हि काळजी सर्वांनी घ्यायला हवी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/03/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मृत्यू : एक अटळ सत्य* http://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post_12.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *राष्ट्र दिन - मॉरिशियस* 💥 ठळक घडामोडी :- ● १९३० : ब्रिटीश सरकारने भारतात तयार केलेल्या मीठावर लादलेल्या कराविरुद्ध महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली. ● २००१ : राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ’यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला. ● १९९९ : सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला. ● १९९९ : चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड ’नाटो’ (NATO) मधे सामील झाले. ● १९९३ : मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी. ● १९९२ : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले. ● १९९१ : जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी ● १९६८ : मॉरिशस (इंग्लंडपासून) स्वतंत्र झाला. ● १९३० : ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली. ● १९१८ : रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली. ● १९१२ : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला. 💥 जन्म :- ● १८८१ - मुस्तफा कमाल अतातुर्क, तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष. ● १९१३ : यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (मृत्यू:२५ नोव्हेंबर १९८४) ● १९११ : दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर (जन्म: १२ ऑगस्ट १९७३) ● १८९१ : ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते ● १८२४ : गुस्ताव किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १७ आक्टोबर १८८७) 💥 मृत्यू :- ● १८८९ - योहानेस चौथा, इथियोपियाचा सम्राट. ● १९९९ - यहूदी मेनुहिन, अमेरिकन-ब्रिटीश संगीतकार. ● २००१ : रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक (जन्म: २५ मे १९२७) ● १९९९ : यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (जन्म: २२ एप्रिल १९१६) ● १९४२ : रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (जन्म: २३ सप्टेंबर १८६१) ● १९८० : सुप्रसिध्द तबलावादक वसंतराव आचरेकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : कोरोना व्हायरसने पुण्यापाठोपाठ आता मुंबईत एन्ट्री केली आहे. मुंबईत कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात येणार आहे. राज्यात कुठल्याही प्रकारचा मोठा समारंभ होणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार अनावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संपतराव सकाळे यांची बिनविरोध निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यातील कोरोना रुग्णांची प्रकृती स्थिर, नागरिकांनी घाबरू नये, जनजागृतीसाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घ्याव्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मोबाईल पब्जी गेमचा मुलांच्या मानसिकतेवर खरंच दुष्परिणाम होतोय का? मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला खुलासा करण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *20 एप्रिलपासून राज्यसरकारच्या मेगा नोकरभरतीला सुरुवात होण्याची शक्यता तर खासगी एजन्सीद्वारे नोकरभरती करण्यास आमदार रोहित पवार यांचा विरोध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयपीएलचे फक्त सामने आयोजित करावेत, तिकीट विक्री करु नये, कोरोनावरील आढावा बैठकीत राज्य सरकारची भूमिका, तर हॅन्ड वॉश-मास्कची विक्री रेशन दुकानातून करण्याची भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनुभवाकडून शिकावं* - अनिता दाणे जुंबाड, नांदेड. शिकता येत असेलं तर कुणाकडून ही शिकावं मुंग्याकडून शिकावा सांकव शिस्तीचा पालीकडून शिकावा ध्यास तत्वाला चिटकून राहण्याचा घर कसं सांभाळायचं शिकावं गोगलगायी कडून तसचं दप्तर कसं सांभाळायचं हेही शिकावं तिच्याचकडून शिकता येत असलं तर ते कुणाकडूनही शिकावं जगायचं कसं ते फक्त अनुभवाकडून शिकावं *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी ..... दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *हिमरू शालींकरिता महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते ?* औरंगाबाद 2) *मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर कोणते ?* औरंगाबाद 3) *'बावन्न दरवाजांचे शहर' असे कोणत्या शहराला म्हटले जाते ?* औरंगाबाद 4) *बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व अरबी समुद्र यांच्या संगमाच्या ठिकाणाला काय म्हणतात ?* कन्याकुमारी 5) *'सूर्याची कन्या' असे कोणत्या झाडाला संबोधतात ?* कपाशी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आ. राम विठ्ठल सातपुते सोलापूर विधानसभा 👤 शिवराम पेंडकर 👤 माधव पाटील दिग्रसकर 👤 आनंदा हंडावार 👤 मधुकर काठेवाडे 👤 विठ्ठल हिवराळे 👤 वसीम बाबू 👤 गणेश निकम 👤 श्रीकांत उर्फ पप्पू कांबळे 👤 अजय पार्टे 👤 रामलू लखमावाड, धर्माबाद 👤 दादाराव केंद्रे, वरीष्ठ पोलीस 👤 सचिन मुक्कावार 👤 स्वप्नील सुरेश देवकाते 👤 देवदास पिंगळे, लोकनेते 👤 शांताताई धुळे, औरंगाबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनेक उच्चपदस्थ, उच्चभ्रू म्हणवले जाणारे प्रतिष्टित सुर्यास्ताबरोबर स्वत:ला काचेच्या पेल्यात बुडवतात. तरूण मुला-मुलींपुढे कुठले आदर्श आपण ठेवणार आहोत ? कोवळी, मिसरूड फुटलेली मुलं अलिकडे व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांना कुणीतरी थांबवलं पाहिजे. त्यांची शक्ती विधायक कार्यासाठी संघटित व्हायला हवी. जगाची दारं आज त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांनी त्या दारापर्यंत पोहोचायला हवं.* *खरं म्हणजे आनंद-दु:ख, यश-अपयश व्यक्त करण्याची अनेक माध्यमं आहेत. मदिराप्राशन, हे माध्यम उचित ठरू शकत नाही. प्रत्येकानं मात्र आवडीचा छंद जोपासण्याची धुंदी चढू द्यावी. श्रमण्यातून मिळालेल्या यशाचा कैफ काही औरच असतो. दुस-याच्या दु:खानं गुंगी जरूर यावी नि, ती सोडविण्याचा अंमलही असावा. प्रेमाचा वर्षाव करत झिंगावं त्यानं आप्त-मित्रांसह, आणि जगण्याची खरी... नशा.. चढू द्यावी...!* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼ ★●•• 🔰🔰🌺🌺🔰🔰 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुप्रभात मित्रांनो, विलोक्य संगमे रांग पश्चिमायांविवास्वत:।कृतं कृष्ण मुखं प्राच्या न हि नार्यो विणेरश्येय।। निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षण करणं, त्यात मानवी कृती पाहणं, त्यावर मानवी भावना आरोपित करणं, याचा संस्कृत कवींना फार मोठा छंद होता. याचं एक उत्तम उदाहरण प्रस्तुत श्लोकात पाहायला मिळतं. सुर्यास्तसमयाचं वर्णनं, हा इथला विषय आहे सूर्य मावळला आहे. पश्चिम दिशेच्या बाहुपाशात त्यानं स्वतःला झोकून दिलं आहे. तिच्या गालावर जणू लाली पसरली आहे. पूर्व दिशेला साहजिकच अंधार पडू लागला आहे. ती काळी ठिक्कर पडत आहे. या नैसर्गिक स्तिथीवर कवीनं किती बहारदार रूपक बसवलं आहे! सूर्य हा प्रियकर. पूर्व दिशा ही दुसरी प्रियसी. दिवसा रंभी तो पूर्वीच्या प्रांगणात जातो. उत्साह आणि चैतन्य यांचं वातावरण सर्वत्र पसरतं. पूर्व दिशेला लालीचं लाली पसरते. तिच्या प्रीतीचीच ही लाली होय. प्रियेच्या प्रेमपाषा तो मशगुल होतो आणि मिलनाचा आनंद पुरेपूर उपभोगतो! रविराज या प्रेमभेटीनंतर कर्तव्यपालनासाठी नभ आक्रमू लागतो. पुर्वा ही प्रेयसी मातत्र एकटक त्याच्याकडे पाहत राहते. सूर्य पुढं पुढं जातो मध्य आल्यानंतर पश्चिमेच्या प्रांगणात प्रवेश करतो.पश्चिम क्षितिजवर आरूढ होतो.पश्चिमाही लालीनं रंगून जातो.पश्चिमेच्या क्षितिजावर मिलनाचा आनंदोत्सव सुरू होतो . "हा संगमे रागं" मिलनाचा रंग होय.आता सुर्यराज पूर्वेकडून दूर गेल्यामुळे पूर्वेला अंधार पडला आहे.काळिमा पसरला आहे. पश्चिमेला रंगोत्सव सुरू आहे.पूर्वेच मुख मात्र काळ ठिक्कर पडलं आहे. अशोक कुमावत, नाशिक (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हरिण व कोल्हा* एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.' तात्पर्यः 'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/03/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उन्हाळ्यात घेऊ या काळजी* http://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● २००७ - २००७च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन. ● २०११ - जपानजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप. यात आणि यानंतरच्या त्सुनामीमध्ये शेकडो ठार. ● १८८६ पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली .भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांना फ़िलाडेफ़िल्या विद्यापीठाची एस.डी. ही पदवी बहाल करण्यात आली ● २००१ : बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले. या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते. ● २००१ : कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली. ● १९९३ : उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार प्रदान. ● १८१८ : इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला. 💥 जन्म :- ● १९८५ : अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज ● १९१६ : हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २४ मे १९९५) ● १९१५ : विजय हजारे – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ डिसेंबर २००४) ● १९१२ : शं. गो. साठे – नाटककार ● १९८२ - हसन रझा, क्रिकेटपटू, वयाच्या १४व्या वर्षी कसोटीपटू झाला. 💥 मृत्यू :- ● १६८९: औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या संभाजीराजांची अतिशय हालहाल करुन हत्या करण्यात आली. ● पेनिसिलीनचे शोधक सर फ्लेमिंग पुण्यतिथी. ● २००६ : स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (जन्म: २० ऑगस्ट १९४१) ● १९९३ : शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते, (संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी [जन्माने ख्रिश्चन असूनही] २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली) (जन्म: २५ एप्रिल १९१८ – अहमदनगर) ● १९७० : अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (जन्म: १७ जुलै १८८९) ● १९६५ : गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. (जन्म: १२ डिसेंबर १८९२) ● १९५५ : अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (जन्म: ६ ऑगस्ट १८८१) *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलावली महत्त्वाची बैठक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मध्यप्रदेशात कमलनाथ सरकार अल्पमतात, 6 मंत्र्यांसह 20 आमदारांचा राजीनामा सुपूर्द तर ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपाकडून राज्यसभेवर जाण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची संध्याकाळी बैठक, उदयनराजे भोसले, रामदास आठवले यांच्यासह तिसरा उमेदवार ठरणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुण्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकार सतर्क, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन तर नाशिकच्या विपश्यना केंद्रातील शिबीरं अनिश्चित काळासाठी रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यभरात धुळवडीचा उत्साह, खासदार नवनीत राणांकडून मेळघाटात होळी साजरी, तर भिवंडीत कोळी बांधवांची 85 वर्षांची पारंपरिक होळी, मुंबईत धुलिवंदनाचा जल्लोष, ठिकठिकाणी होता पोलीस बंदोबस्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अलिबाबा ग्रुपचे जॅक मा बनले आशियातील सर्वात धनाढ्य व्यक्ती ; मुकेश अंबानी आले दुसऱ्या स्थानावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मेरी कोमचं टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट निश्चित; मेरीसह सात भारतीय बॉक्सर्सची ऑलिम्पिकमध्ये धडक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *👫 रविवार 👫* - संदीप ढाकणे, औरंगाबाद 7588512467 खुशीत आला रविवार धमाल घेऊन मजा करू आनंदाने साजरा रविवारला देऊ सजा || कसा झाला उशीर सांग एकदा मला रोज यायचे सोडून आठवडयाने आला || बांधू आता रविवारला जाणार नाही पळून कितीही रडला तरी नाही दयायचे सोडून || कसा आला तावडीत सोडव गाणित आवडीने धडा लिही चार पाने सुट्टी मिळेल सवडीने || नको बसू रडतपडत अभ्यास थोडा करत जा आता देतो सोडून तुला रोज भेटायला येत जा || ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" पुरुष नावाच्या दगडाला आकार देण्याचं काम स्त्री नावाचं कलाकार करत असतो "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *देशातील पहिले वैश्विक आण्विक ऊर्जा केंद्र कोठे उभारले जात आहे ?* बहादूरगड 2) *2011 च्या जनगणनेनुसार राज्यातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता ?* ठाणे 3) *आसाम राज्याचे पूर्वीचे नाव काय होते ?* कामरू 4) *महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता ?* औरंगाबाद 5) *'प्रत्येक वस्तू अतिसूक्ष्म कणांनी बनलेली असते' ही संकल्पना कोणी मांडली ?* कणाद ऋषी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विठ्ठल फुलारी, पत्रकार 👤 सचिन कावडे, पत्रकार 👤 महेंद्र पाटील 👤 अक्षय चिले 👤 किरण आचारी 👤 वैभव पांढरे 👤 प्रशिल सचिन जाधव 👤 अशोक बाजारे, संचालक भिमाशंकर पतसंस्था 👤 रिया राज गायकवाड 👤 सुयोग योगेश पायघन 👤 रुपाली युवराज सूर्यवंशी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अन्याय्य मार्गाने मिळवलेला पैसा स्वत:च्या आणि परिवाराच्या अध:पतनास कारणीभूत होतो. कितीही प्रयत्न केले तरी असला पैसा व्यक्तीला वाममार्गालाच नेतो. अनैतिक वर्तणूकीने काही काळ यशस्वी होत असल्याचा भास निर्माण झाला तरी पापाचे भूत पिच्छा सोडत नाही. पैसा मिळवू नये असे नाही. पैसा हे मानवाचे सहावे इंद्रिय आहे. त्याच्याशिवाय मूळही पाच इंद्रिय काम करणार नाहीत हे खरे आहे. प्रश्न पैसे मिळविण्याचा नाही, किती मिळवायचा हा आहे. जो पैसा मिळविताना माणुसकीची सारी तत्वे पायदळी तुडविली जातात आणि ज्या पैशाचा विनियोग माणसाच्या खरेदी-विक्रीत होतो, त्या पैशाला काय अर्थ आहे?* *ज्याप्रमाणे पैसा औषध विकत घेऊ शकतो; पण आरोग्य विकत घेऊ शकत नाही. पैसा सेवा विकत घेऊ शकला तरी माणूस विकत घेऊ शकत नाही. गैरमार्गाने आलेल्या संपत्तीला गैरमार्गाने जाण्यासाठीच पाय फुटतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. शेकडो वर्ष उलटली तरी आपण व्यास, वाल्मिकींना विसरलो नाही. राजघराण्यात जन्मल्यामुळे नव्हे, तर राजघराण्याचा त्याग केल्यामुळे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांची नावे घेतली जातात. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर यांची नावे प्रात:स्मरणीय झाली आहेत ती त्यांनी सांगितलेल्या माणुसकीच्या धर्मामुळे. आपले नाव जनतेच्या जीभेवर असावे असे वाटणे स्वाभाविक आहे त्यासाठी पैशांबरोबर आत्मियतेची गरज आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥* ●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुप्रभात हमित्रांनो, लासलगावी एका कवी संमेलनात पाडगावकरांना जवळून ऐकण्याचा, पाहण्याचा योग आला. काल त्यांचा जन्मदिवस त्या निमित्ताने आठवणी जाग्या झाल्या. मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं , सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं... तुम्ही म्हणाल, यात विशेष काय घडलं ?त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं...’किंवा इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन छेडणार जर होत आपण गीत नवे तर हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर धुंदपणी त्या अंधपणी त्या भान राहिले नाही हे पण इतुके आलो जवळ जवळ की.....’ किंवा हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे; तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे....मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे’ , नाहीतर, मी कुठे म्हणालो परी हवी,पण दिसायला जरा बरी हवी. असं म्हणणारे लोकप्रिय भावकवी मंगेश पाडगावकर . दहा मार्च १९२९ रोजी वेंगुर्ल्यात जन्मलेले मंगेश पाडगावकर हे अतिशय प्रतिभावंत कवी आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आईमुळे त्यांना कवितेची गोडी लागली. त्यांची आई त्यांना केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांच्या कविता त्यांच्या लहानपणी वाचून दाखवत असे आणि ते बाळकडू मिळालेल्या पाडगावकरांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच कविता लिहायला सुरुवात केली होती. त्यांच्या कविता मुख्यत्वेकरून प्रेम आणि निसर्ग याविषयीच्या असतात. हळुवार, स्वप्नील भाव त्यांच्या कवितेतून प्रकटतात. एकीकडे निसर्ग आणि प्रेमकविता लिहिणाऱ्या पाडगावकरांनी ‘सलाम’सारखी सामाजिक आणि राजकीय लांगुलचलनावर टीका करणारी कविता लिहिली आणि चक्क मिश्कील, झकास वात्रटिकासुद्धा लिहिल्या. कवितांबरोबरच त्यांनी बोलगाणी, गझल आणि भावगीतं हे प्रांत गाजवले. विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्याबरोबर त्यांचं छान ट्युनिंग जमलं आणि या तिघांनी गावोगावी दौरे करून जवळपास चार दशकं काव्यवाचनाचे कार्यक्रम केले आणि गावोगावच्या लोकांना कवितांचा भरभरून आनंद दिला. त्यांच्या कवितांना एक सुंदर नाद किंवा गेयता असे. कविता आणि गीतांखेरीज त्यांनी गद्यलेखनही केलं आहे. त्यांनी अनेक इंग्लिश पुस्तकांचे मराठी अनुवाद केले. बायबलसुद्धा मराठीत आणलं. शेक्सपिअरच्या ‘टेम्पिस्ट’ आणि ‘ज्युलियस सीझर’ नाटकांचे अनुवाद केले. कमला सुब्रह्मण्यम यांच्या महाभारत ग्रंथाचं दोन खंडी भाषांतर केलं. काही बालसाहित्यही लिहिलं आणि समीक्षापर लेखनही केलं. २०१० साली भरलेल्या विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्रभूषण पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ३० डिसेंबर २०१५ रोजी त्यांचं निधन झालं. अशोक कुमावत, नाशिक (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटे ही माणसांच्या जीवनात सशाच्या गतीने येतात नि कासवाच्या मंद गतीने हळुहळू जातात.पण त्यामधला जो काळ दुःखाचा आणि वेदना सहन करण्याचा आहे त्याला शांत आणि धैर्याने,हिंमतीने तोंड देऊन विजय मिळवतो तोच जीवनात यशस्वी होतो. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590. 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सिंह आणि चित्ता* जंगलातील राज्यकारभार फार वाढल्यामुळे सिंहाने प्रधान नेमण्यासाठी सभा बोलावली होती, त्याने आलेल्या प्रत्येकाची मुलाखत घेतली आणि कोल्ह्याची नेमणूक केली. सर्वांना ती पसंत पडली. सर्व पशु निघून गेले, चित्ता तेथेच बसून राहिला. सिंहाने त्याला विचारले, “ काय रे ,काय हवे तुला? ” चित्ता म्हणाला, “ महाराज, तुम्ही कोल्ह्याची नेमणूक केली,हे चांगलं नाही केलं. त्याला ना रंग, ना रूप, मी बघा कसा आहे! माझा रंग बघा, माझे डोळे कसे आहेत बघा, माझे शेपूट बघा. माझ्यावर अन्याय झाला आहे .” सिंह म्हणाला, “ तू बोललास ते बरं झालं. मी मुलाखत घेतली, ती प्रधानाच्या पदासाठी. हा बुद्धिमान असावा लागतो. रूप नसलं तरी चालतं, हे तुला समजत नाही. हे तू सिद्ध केलंस. मी हे आधीच ओळखलं, म्हणून तुला नेमलं नाही.” चित्त्याला हे पटले, तो मुकाट्याने तिथून निघून गेला. तात्पर्य: आपली कुवत व बुद्धिमत्ता कितपत आहे, हे समजून आपली चूक मान्य करणे यातच खरे शहाणपण आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/03/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *होळी आणि धुलिवंदन* https://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post_17.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *होळी* 💥 ठळक घडामोडी :- ● १९५९ - बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात. ● १९६७ - जोसेफ स्टालिनची मुलगी स्वेतलाना अलिलुयेवाने अमेरिकेला पळ काढला. ● १९५२ : पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन ● १९८२ : सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्वयोग. ● १९९२ : कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला ‘सरस्वती पुरस्कार’ उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला. ● १९९१ : युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने. ● १९४५ : अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले. 💥 जन्म :- ● १९२९ - डेसमंड हॉइट, गुयानाचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष. ● १९५६ : शशी थरूर – केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ ●१९५१ : उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक ● १९४३ : रॉबर्ट जेम्स ऊर्फ ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (मृत्यू: १७ जानेवारी २००८) ● १९३४ : युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर (मृत्यू: २७ मार्च १९६८) ● १९३० : डॉ. यु. म. पठाण – संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक ● १८९९ : ’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५) ● १८६३ : लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१) 💥 मृत्यू :- ● १८८८ - कैसर विल्हेम पहिला, जर्मनीचा सम्राट. ● १९७१ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक. ● १९७१ : के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक. ● २०१२ : जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक (जन्म: २४ फेब्रुवारी १९३९) ● २००० : उषा मराठे – खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (जन्म: २२ एप्रिल १९२९) ● १९९४ : देविका राणी – अभिनेत्री, पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कारांनी सन्मानित (जन्म: ३० मार्च १९०८) ● १९९२ : मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १६ ऑगस्ट १९१३) ● १९७१ : के. असिफ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक (जन्म: १४ जून १९२२) ● १९६९ : सर होर्मुसजी पेरोशॉ तथा ’होमी’ मोदी – उद्योगपती, प्रशासक व संसदपटू (जन्म: २३ सप्टेंबर १८८१) ● १८८८ : विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (जन्म: २२ मार्च १७९७) ● १८५१ : हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ ऑगस्ट १७७७) ● १६५० : संत तुकाराम यांचा वैकुंठवास *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 7 महिलांकडे आपले सोशल मीडिया अकाउंट स्वाधीन केले. यामध्ये सामाजितक कार्यकर्त्या मालविका अय्यर यांचाही समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरस झपाट्याने पसरतो आहे. ताज्या माहितीनुसार इराणमध्ये दिवसभरात कोरोनानं ४९ जणांचा बळी घेतला आहे. इटलीतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत असून इटलीत आतापर्यंत २०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केली अटक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली :- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्वातंत्र्य सेनानी राजकुमारी अमृत कौर यांना टाइमच्या ‘वुमन ऑफ द इयर’ यादीत स्थान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *येस बँक मधील 'सर्व खातेधारकाचे पैसे सुरक्षित, बँकेला वाचवण्यासाठी सरकार आणि आरबीआय एकत्र काम करत आहे' अर्थमंत्री निर्मला सीतारमण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *औरंगाबाद - महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांनी पर्यटन मंत्रिपदाची धुरा सांभाळताच अर्थसंकल्पात नेहमीच दुर्लक्षित राहणाऱ्या पर्यटन खात्यासाठी यंदा १४०० कोटी रुपयांची केली तरतूद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *स्पोर्ट डेस्क- महिला टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव झाला. मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 185 धावांचे टार्गेट दिले होते. हे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेला भारतीय संघ फक्त 99 धावांची मजल मारू शकला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *फुलपाखरू* - बाजीराव माधव केसराळीकर फुलपाखरू मी फुलपाखरू रंगीबेरंगी फुलपाखरू ॥ मऊ मखमली माझे अंग पाहुनी मजला मुले होती दंग अरे दिसताक्षणी मज पकडण्या तुम्ही धावता तुरुतुरु ॥ उडतो मी ह्या झाडावरुनी त्या झाडावर बागडतो मी दऱ्या ,खोऱ्या अन् डोंगर माथ्यावर अरे स्वच्छंद आहे माझे जगणे नका मजला तुम्ही कैद करु ॥ फुलपाखरु मी फुलपाखरु रंगीबेरंगी फुलपाखरु ॥ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनासारखी गोष्ट होत नसेल तर खचून जाऊ नका...आज तुमची वेळ नाही पण उद्या नक्कीच असेल* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राची आद्यशिक्षिका कोण ?* क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 2) *भारताची प्रथम महिला पंतप्रधान कोण ?* इंदिरा गांधी 3) *भारताची प्रथम महिला राष्ट्रपती कोण ?* प्रतिभाताई पाटील 4) *भारताची प्रथम महिला लोकसभा सभापती कोण ?* मीरा कुमार 5) *भारताची प्रथम महिला अर्थमंत्री कोण ?* निर्मला सीतारमन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवा वसमतकर, वसमत 👤 शिवाजी साखरे 👤 अरविंद फुलसिंग आडे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...? आहे....?...की.....?"* 😢 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 😢 😰😰😰😰😰😰😰😰😰 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुप्रभात मित्रांनो, उत्तमो नितीवक्त स्याद अधमो बहू भाषेत। न ध्वनिस्तादृक नाहक कांस्ये प्रजायते।। माणसाच्या बोलण्यावरून त्याची प्रतवारी ठरवणाऱ्या या श्लोकात कवी म्हणतो, उत्तम प्रतीचा माणूस फार बोलणारा असत नाही. फार बडबड करणारा हलक्या प्रतीचा असतो. काशाच्या (भांड्यातून) जेवढा आवाज निघतो तेवढा सोन्याच्या (भांड्यातून) निघत नाही. बोलण्याची क्षमता ही मनुष्यजातीला निसर्गानं दिलेली मोठी देणगी आहे. आपल्या मनीचे भाव, विचार दुसऱ्याला कळण हे बोलण्याचं मूलभूत प्रयोजन. भाषेचा शोध हा मानवी संस्कृतीच्या विकासातला महत्त्वाचा टप्पा आहे. कालक्रमानं भाषेचं प्रयोजन दळणवळणापुरतं मर्यादित न राहता मानवाच्या कलात्मक अविष्काराचं एक महत्त्वाचं साधन म्हणून भाषा विकसित झाली. भौतिक विश्वाच्या पलीकडचं, माणसाच्या प्रतिभेनं निर्मिलेलं विश्वही भाषा साकार करू लागली. अशा रीतीनं समृद्ध झालेल्या भाषासृष्टीत वावरणारा माणूस साहजिकच या समृद्धीचा आस्वाद घेऊ लागला. आपल्या भावभावना अधिक प्रभावीपणे मांडू लागला. मात्र हे करत असताना माणसाच्या कुवतीनुसार भाषेच्या प्रयोगाच्या दोन तऱ्हा निर्माण झाल्या. मोजक्याच, परंतु परिणामकारक भाषेत आपला विचार मांडण्याची एक तऱ्हा आणि जास्तीत जास्त शब्दसंपत्ती उधळून पाल्हाळ लावीत विचार व्यक्त करण्याची दुसरी तऱ्हा. पहिला प्रकर म्हणजेच मितभाषित्व, माणसाच्या परिपक्वतेचं लक्षण मानलं जातं, तर दुसरा प्रकार हे माणसाच्या बालिशपणाचं लक्षण मानलं जातं. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. कासं हा धातू सोन्यापेक्षा हलक्या प्रतीचा असतो, म्हणून काशाच्या भांड्यावर आघात केला तर मोठा आवाज होतो .सोन्याच्या भांड्यातून मात्र कमी आवाज निघतो. बोलण्याची वाफ दवडून शून्य कृती करणाऱ्या वाविचारापेक्षा हवं तेवढचं नेमकं बोलून वाचलेली शक्ती कृती करण्यासाठी वापरणारा मितभाषी केव्हाही ग्रेटच असतो. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक माणसाला एक हृदय असते आणि त्या हृदयात कठोर-मृदु भावना असतात.त्या भावना प्रसंगानुरुप व परिस्थितीनुरूप बदलतात.ज्या भावना परिस्थितीनुरूप किंवा प्रसंगानुरुप बदलतात त्यांचे हृदय मृदू असते.अशा परिस्थितीत ते इतरांच्या हृदयाचा किंवा भावनेचा विचार करतात कारण त्यांना कुणाचे मन दुखवायचे नसते किंवा त्यांना आपलेसे करुन जवळिकता साधून एक चांगले संबंध जोडायचे असतात.त्यांच्यासोबत संबंध चांगले जोडून आपुलकीचे नाते जोडून जीवन समृद्ध करायचे असते.अशा मृदू हृदयाची माणसे या जगात नव्वद टक्के पहायला मिळतात.तर दुसरीकडे कठोर हृदयाची माणसे मृदू हृदयाच्या माणसांच्या विरुद्ध वागताना पहायला मिळतात.त्यांना या जगाशी किंवा इतरांशी आपले काही देणेघेणे नाही,आपला काही संबंध नाही असे म्हणून तिरस्कार करतात.त्यांच्या हृदयात थोडादेखील मायेचा ओलावा नसतो.मी म्हणजे सर्वस्व आहे.चांगले कुणाचे व्हावे किंवा चांगले होऊ द्यावे असे कधीच वाटत नाही.केवळ त्यांच्या हृदयात इतरांना विरोध करणे, इतरांना मदतीच्याऐवजी त्रास देणे,स्वत:चेच भले व्हावे असा स्वार्थी विचार नेहमी करत असतात.अर्थात दुष्ट पवृत्ती पुरेपूर भरलेली असते.अशा माणसांना चांगल्या माणसांची संगत नको वाटते.अशा कठोर हृदयी माणसांचा सहवास मृदू हृदयी माणसांना नको असते.मग तुम्हीच ठरवून निर्णय चर्या किंवा तुम्हीच तुमच्या हृदयाचा शोध चर्या आपण कोणत्या हृदयाची आहोत.जर काही कमी जास्त प्रमाणात असेल तर त्या कठोर हृदयाचे रुपांतर मृदू हृदयात करुन माणूस म्हणून जीवन जगता येईल का याचाही विचार करायला संधी दर्या.नक्कीच हृदयपरिवर्तन होईल आणि जीवन सुखी व समृद्ध होण्यास मदत होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद : ९४२१८३९५९० 💔💞💔💞💔💞💔💞💔💞 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चतुर कोकरू* एका कुरणात मेंढ्यांचा कळप चरत होता. कळपाची राखण करण्यासाठी काही कुत्रे होते. चरता चरता एक कोकरू कळपाच्या मागे राहिले. कळप पुढे निघून गेला. तिथे एक लांडगा कळपावर नजर ठेवून होता. एक कोकरु कळपाच्या'मागे राहिल्याचे त्याने पाहिले आणि तो त्या कोकराच्या मागे लागला. कोकरू धावू लागले. आपण आता लांडग्याच्या तावडीतून सुटत नाही हे त्याच्या लक्षात आले. मग ते धावण्याचे सोडून हसत लांडग्याला म्हणाले, “ लांडगेदादा, आनंदाने हसत हसत मरावे असे मला वाटते. म्हणून तुम्ही थोड्यावेळ बासरी वाजवा म्हणजे मला खूप आनंद होईल.” लांडग्याने कोकराचे हे म्हणणे मान्य केले. त्याने बासरी वाजवायला सुरुवात केली. बासरीचा आवाज कळपातील कुत्र्यांच्या कानी पडताच ते तेथे धावून आले. धावून आलेले कुत्रे पाहताच,लांडगा बासरी फेकून देऊन पळून गेला. अशाप्रकारे चतुर कोकराने मोठ्या चतुराईने आपले प्राण वाचवले. तात्पर्य: प्रसंगी आपल्या चतुराईने बुद्धीचा वापर करून आपल्यावर आलेल्या संकटावर मात करून सुटका करावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*मुक्त मी......* प्रत्येकाच्या जीवनात आईची ममता असते जगण्याची उमेद देऊन पोराबाळांसाठी ती झिजते खडक भेदून चालण्याची हिम्मत तिच्यात आहे रूप तिचे निरनिराळे स्त्रीशक्ती ही अजरामरआहे नका समजू तिला अबला ति झाली आहे सबला करून अन्यायाचा प्रतिकार न्यायाचा बाजूने राहणार संकटास न डगमगता संघर्ष ती करते,धैर्य आणि साहसाने पुढे चालत ती सक्षम नारी म्हणून जगते दुःखावर मात करुनी स्वकर्तृत्वावर ती उभी राहते, अंधाऱ्या वाटेलाही ज्योत प्रकाशाची पेटविते स्त्री-पुरूष समानतेने जगण्याचा अधिकार आहे घेऊनी उत्तुंग भरारी ती प्रत्येक क्षेत्रात वावरत आहे सत्याचा मार्गाने चालून कठोर काळातही जगते नारीशक्ती कुठेच कमी नाही, जगास या दावते संकटास ठणकाऊनी आव्हान पेलूनी,कठोर काळासही सांगते मुक्त मी....जाहले मुक्त मी....जाहले... 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/03/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षक दिन - आल्बेनिया* 💥 ठळक घडामोडी :- ● १७७१ : हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली. ● १९८३ : नवी दिल्ली येथे सातव्या अलिप्त राष्ट्रपरिषदेस आजच्याच दिवशी सुरुवात झाली. ● २००९ : केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना. ● २००६ : लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले. ● १९३६ : दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्हाईनलँडमधे सैन्य घुसवले. ● १८७६ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले. ● २००५ - स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कुवैतच्या संसदेसमोर निदर्शने. 💥 जन्म :- ● १९३४ : नरी कॉँट्रॅक्टर, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९४२ : उमेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९५५ : अनुपम खेर – चित्रपट अभिनेता ● १९५२ : सर विवियन रिचर्ड्स – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू ● १९३४ : नरी कॉन्ट्रॅक्टर – भारताचा यष्टिरक्षक ● १९११ : सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ – नवी दिल्ली) ● १८४९ : ल्यूथर बरबँक – महान वनस्पतीतज्ञ (मृत्यू: ११ एप्रिल १९२६) ● १७९२ : सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक (मृत्यू: ११ मे १८७१) ● १५०८ : हुमायून – दुसरा मुघल सम्राट (मृत्यू: १७ जानेवारी १५५६) 💥 मृत्यू :- ● १९५२ : परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ. ● २०१२ : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (जन्म: ३ मार्च १९२६) ● २००० : प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक (जन्म: २९ आक्टोबर १९३१) ● १९९३ : इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (जन्म: २६ आक्टोबर १९००) ● १९६१ : गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, भारतरत्न (१९५७), मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कुमाँऊ परिषदेची स्थापना केली. (जन्म: १० सप्टेंबर १८८७) ● १९२२ : गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (जन्म: १५ ऑगस्ट १८६७) ● १६४७ : दादोजी कोंडदेव – छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू ● १९५२ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर, शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारीसाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी जाहीर, आमदार निधीत एक कोटीची वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पेट्रोल आणि डिझेल लीटरमागे एक रुपयाने महागणार, अर्थसंकल्पानंतर इंधनावर अतिरिक्त कर तर पुढील 2 वर्षांसाठीत मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचा दिलासा, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा, 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांनाही सवलत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *देशात कोरोना बाधितांची संख्या पोहोचली 31 वर, कोरोनामुळे अटारी बॉर्डरवर होणारा रिट्रीट सोहळा रद्द, दिल्लीतील नेमबाजी विश्वचषक, आयफा सोहळाही पुढे ढकलला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *येस बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, आरबीआयनं निर्बंध लादल्यानं खातेदार धास्तावले, तर कुणाचेही पैसे बुडणार नाहीत, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *गेल्या कित्येक दिवसांपासून ताटकळत असणाऱ्या थेट सरपंच निवड रद्द करण्याच्या कायद्यावर अखेर राज्यपालांनी केली स्वाक्षरी, या विधेयकावर स्वाक्षरी झाल्यामुळे राज्यातील १९ जिल्ह्यातील दीड हजार ग्रामपंचायतील सरपंचाची निवड थेट होण्याऐवजी ग्रामपंचायत सदस्यांमधून होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारलेल्या भारतीय महिला संघाचे केले अभिनंदन, सचिन तेंडुलकरने दिला मोलाचा सल्ला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी :- शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच होणार, फडणवीस सरकारचा निर्णय कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ग्रामीण महिला व महिला दिन* https://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *झाडदादा* - शीला अम्भुरे बिनगे, परतुर, जालना झाडदादा झाडदादा का रे तू उभा असा ? शिक्षा का केली कुणी कंटाळत नाही कसा ? ऊनपाऊस वारा थंड दुखत नाही का घसा? फळे फुले छाया देतो देण्याचा तुझा वसा. उमटवलास माझ्यावरी दातृत्वाचा गोड ठसा. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" परिवर्तन " हा निर्सगाचा नियम आहे, तो न घाबरता मान्य करावा.. संघर्ष करायला घाबरणे, ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत...* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण ?* नाशिकराव तिरपुडे 2) *हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला ?* इगोर सिकोसकी 3) *ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध कोणी लावला ?* जेम्स कुक , 1608 4) *महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी किती किमी आहे ?* 800 km 5) *भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या रकमेच्या नोटा हे प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचे ठरवले आहे ?* 10 रू *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भीमराव रेणके 👤 मनोज घोगरे 👤 अविनाश मोटकोलू *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काहीही विपरीत घडले की त्याबद्दल इतरांना जबाबदार धरण्याची एक सार्वत्रिक प्रवृत्ती असते. आपली चूक कबूल करण्याऐवजी त्याला इतर लोक कसे दोषी आहेत, हेच बहुतेक जण सांगत असतात. चूक कबूल करण्यात बहुतेकांना कमीपणा वाटतो. त्यामुळे आपले चूक असले, तरी ते योग्य आहे असाच हेका अनेकजण लावतात. सार्वजनिक पातळीवर तर हे चित्र आणखी गडद होते आणि समाजातील सर्वच वाईट गोष्टींसाठी शासन यंत्रणेला दोषी ठरविले जाते. जनकल्याणाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि बहुतेकदा अपेक्षाभंग होतो.* *देश आपल्यासाठी काय करणार यापेक्षा आपण देशासाठी काय करणार असे जाॅन. एफ. केनेडी यांनी म्हटले होते. 'मी साधा माणूस, मी काय करणार' असे उत्तर प्रत्येक जण देऊ शकतो. मात्र साधा माणूस खूप काही करू शकतो. सार्वत्रिक नियमांचे पालन करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, अफवा न पसरविणे अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. चांगला नागरिक बनण्याची सुरूवात घरापासून होते. सार्वजनिक नियमांचा आदर राखण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये विकसित केली तरी पुष्कळ. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, याची जाणीव न ठेवता मोठी माणसे गैरवर्तन करतात. त्यामुळे पुढील पिढीही तेच शिकते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुप्रभात, मित्रांनो साम्नैव यत्र सिद्धिर्न तत्र दण्डो बुधेन विनियोज्य: पित्रं यदि शर्करया शाम्यति कोsर्थ: पटोलेन।। माणसांनी परस्परांमधले संघर्ष शक्यतो समजुतीने सोडवावेत, असा संदेश देणाऱ्या वरील सुभाषितात कवी म्हणतो - जे काम सामोपचारानं होण्यासारखं आहे तिथं समजूतदार माणसानं शरीरबळाचा वापर करू नये. पित्ताचं शमन जर सारखेनं होत असेल, तर त्यासाठी परवर आणायची गरज नाही. राजनीती साम, दाम, दंड आणि भेद या चार खांबावर उभी असते. समाजनीतीलाही हीच चार तत्वं लागू पडतात माणसामाणसांतले संघर्ष सोडवण्याचे हे चार मार्ग असून, त्यांचा ज्या क्रमानं उल्लेख केला आहे त्याच क्रमानं उल्लेख प्रयोग करायचा असतो. वादविवाद किंवा संघर्ष निर्माण झाला, तर तो आधी सामोपचारानं मिटवायचा प्रयत्न करावा. सामोपचाराने प्रयत्न अयशस्वी ठरले तरच क्रमानं दाम, दंड आणि सगळेच उपचार व्यर्थ ठरले, तर शेवटी भेदाचा अवलंब करावा. पंडितजींच्या मुलानं प्रगतीपुस्तक घरी आणलं आणि त्यातले गणिताचे गुण पाहताच पंडितजींच्या मनात संघर्षाची ठिणगी पडली. त्यांच्या स्वभावक्रमानुसार त्याला दंड करण्यासाठी त्यांचा हात वळवळू लागला आणि त्याची मुलाच्या पाठीशी भेट झाल्यावरच ती वळवळ थांबली. खरं तर मुलाची गोड शब्दांत कानउघाडणी करून आणि स्वतः त्याच्या अभ्यासात लक्ष घालून म्हणजेच सामोपचाराने त्यांना हा प्रसंग हाताळता येऊ शकला असता. अशोक कुमावत, नाशिक (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या दैनंदिन जीवनात अनेक स्वभावाची, अनेक त-हेची माणसे भेटतात.त्यातली कधी चांगली तर कधी वाईटही वृत्तीची असू शकतात.तुम्ही जर चांगलीच माणसे भेटावीत असा अट्टाहास करत असाल तर ते चुकीचे आहे.चांगली माणसे कधी कधी आपल्याला जीवनाला चांगली दिशा देऊन जातात असे वाटत असेल तर ते काही अंशी चुकीचे होऊ शकेल.कारण चांगली माणसे कधीच तुमच्यातले दोष सांगत नाहीत, परंतु वाईट माणसे तुमच्यात असणारे काही दोष नक्कीच काढतात आणि निघून जातात.त्या माणसांना आपण वाईट म्हणतो.असेही म्हणणे चुकीचे ठरेल.अशीही माणसे जेव्हा आपल्यातल्या होणा-या आणि दडलेल्या चुकांना सुधारण्याची जणू संधी देऊन जातो हे लक्षात असू द्या. आपल्या जीवनात कोणी जरी आले त्याबद्दल वाईट वाटू देऊ नका.प्रत्येकामध्ये कोणता ना कोणता गुण दडलेला असतो त्याचे सूक्ष्म निरीक्षण करा आणि प्रत्यक्ष जीवनात सुधारणा करून चांगले जीवन जगायला शिका.मग कोणतेही माणसे तुमच्या जीवनात आली तरी त्यांच्याबाबतीत आपण संयमाची भूमिका घेऊन चांगले वाईट न म्हणता आपल्या जीवनात ती योग्यच आहेत असे मानत रहा.जग कसे जरी असले तरी तुम्ही मात्र चांगले जीवन जगण्यासाठी समर्थ राहा. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहाणा गं माझा राजा* मनू शाळेच्या पायऱ्या उतरत होता. अचानक त्याला मुसमुसण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिलं, तर पायरीच्या कडेला एक फुलपाखरू पडलं होतं. फुलपाखरू जखमी होतं. " अरे काय काय झालं तुला? " मनूनं विचारलं. " तो गणू दृष्ट आहे. त्यांना मला पकडले . माझे पंख फाटले”. “ अरे रे! " “ आता मी घरी कसा जाऊ? मला आई पाहिजे ना.?” “ कुठे आहे तुझं घर?” “ त्या सुर्यफुलाच्या शेतात.” “ चल. मी नेतो तुला तुझ्या घरी.” “ हळूचं हं ! " मनून फुलपाखराला हळूच ओंजळीत घेतलं आणि सूर्यफुलाच्या शेतात अलगद सोडलं. घरी गेल्यावर मनूनं आईला ही हकीकत सांगितली. आईन मनूला जवळ घेतलं. मनूचा लाड केला आणि म्हणाली, “ शहाणा ग माझा राजा तो.” तात्पर्य.. मुक्या प्राणिमात्रांची काळजी घ्यावी. कोणालाही आपला त्रास होणार नाही. आपल्यामुळे इजा पोहोचणार नाही ही दक्षता घ्यावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*📚उपक्रम📚* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *विषयः मराठी* *इयत्ताः दुसरी* *उपक्रमाचे नावः शब्दचक्र तयार करणे.व त्याशब्दांपासून अर्थपूर्ण वाक्ये तयार करणे.* *📚उद्दिष्टेः* विद्यार्थ्यांना एका शब्दांशी निगडीत अनेक शब्द माहिती होणे. व नवनिर्मीती आणि सर्जनशिलतेला वाव मिळणे. *✍कार्यवाही* सुरुवातीला फळ्यावर एक गोलाकार वर्तुळ काढून त्या गोलात एक शब्द देणे.त्यानंतर त्या शब्दांशी निगडीत असलेले शब्द विद्यार्थी स्वतःच्या मताने विचार करून लिहीतील.त्या लिहीलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण वाक्ये तयार करतील. असे प्रत्येक गोलात एक एक शब्द देणे किंवा त्यांच्याकडूनच शब्द विचारून घेणे व गोलात लिहीणे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अनेक शब्द लिहीता येतील व वाक्ये बनवता येईल. ह्या शब्दचक्राचा सराव तोंडी आणि लेखी स्वरूपात घेता येईल. *📚फलितः* अनेक नविन शब्दांची माहिती होईल. वैचारिक क्षमता वाढेल. विचार करून लिहील्याने लेखणाची आवड निर्माण होईल. अर्थपूर्ण वाक्ये लिहीण्याची सवय लागेल. 〰〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव. 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/03/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वांतत्र्य दिन - घाना* *अलामो दिन - टेक्सास* 💥 ठळक घडामोडी :- ● १९५३ : मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला. ● १८६९: दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली. ● २००० : शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब ● १९९९ : जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते उद्घाटन ● १९९८ : विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर ● १९९७ : स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड ● १९९२ : ’मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली. ● १९७५ : इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली. ● १९५३ : जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले. ● १९४० : रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली. ● १८४० : बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले ● १९६४ - कॉन्स्टन्टाईन दुसरा ग्रीसच्या राजेपदी. ● १९७५ - अल्जियर्सचा तह - ईराण व इराकने सीमाप्रश्नी संधी केली. 💥 जन्म :- ● १९५७ : अशोक पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९६५ : देवकी पंडीत – गायिका ● १९४९ : शौकत अजिझ – पाकिस्तानी राजकारणी ● १४७५ : मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४) 💥 मृत्यू :- ● १९९२ : प्रसिध्द कादंबरीकार रणजित देसाई. कर्तबगार प्रशासक स.गो.बर्वे. ● २००० : नारायण काशिनाथ लेले – कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती ● १९९९ : सतीश वागळे – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते ● १९८२: रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष ● १९८१ : गो. रा. परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक, नामवंत शास्त्रज्ञ, ’रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य ● १८९९ - व्हिक्टोरिया कैउलानी, हवाईची राजकुमारी. ● १९३२ - जॉन फिलिप सूसा, अमेरिकन संगीतकार. ● १९५० - आल्बेर लेब्रन, फ्रांसचा फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. ●१९५४ - पॉल, ग्रीसचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 30 वर, दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद, पंतप्रधान मोदींचा बेल्जियम दौरा रद्द तर घाबरुन न जाण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मास्क घातल्याशिवाय त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना नो एण्ट्री, साई मंदिरात स्वच्छतेवर भर, पंढरीत जनजागृती फलक लावले तर अंबाबाई मंदिरात भाविकांच्या हातावर सॅनिटायझर देणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दिल्लीतील निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना 20 मार्चला पहाटे फाशीची शिक्षा, पटियाला हाऊस कोर्टाचं डेथ वॉरंट, आरोपींसमोरचे सर्व पर्याय संपले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर तर कर्जाचा बोजाही वाढला, अहवालानुसार उद्योग, सेवा क्षेत्र, रोजगार अशा सर्वच आघाड्यांवर राज्याची घसरण झाली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांचं निलंबन, उर्वरित सत्रात सहभाग घेता येणार नाही, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय महिला संघाची पहिल्यांदाच टी 20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाशी 8 मार्चला होणार अंतिम मुकाबला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक महिला दिन विशेष* *तिला मदत ......?* https://b.sharechat.com/imxWyG1XB4?referrer=copiedLink लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आभाळाच्या शाळेत* - राजेंद्र अत्रे, जळगाव आभाळाच्या शाळेत ढग सारे आले। शिकत - शिकत हळू - हळू पेंगायला लागले। वारे गुरुजींचा तास सुरू झाला जेव्हा ... मैदानात आणले त्यांनी खेळायला तेव्हा। विजेरी शिट्टी फुंकून हुकुम त्यांनी दिला। गुद्दागुद्दी खेळायचा सुरू केला। खेळता - खेळता ढग खूप घामेघूम झाले। थेंब - थेंब अंगातून ओघळायला लागले। ढगांचा घाम आला खाली जमीनीवर। नाचायला लागली मुले रिमझिम तालावर॥ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जिवाभावाची, जिवलग, जीवाला जीव देणारी माणसं म्हणजे आयुष्यातील खरी संपत्ती, पैसा तर काय आज आहे उद्या नाही ....! "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आंध्रप्रदेशातील नृत्यशैली कोणती ?* कुचिपुडी 2) *जगातील पहिल्या स्वयंचलित गाडीचे निर्माते कोण ?* कार्ल बेंज 3) *मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करतात ?* कल्ले 4) *भारतातील पहिला लाटांवर आधारित विद्युत प्रकल्प कोणता ?* कांडला 5) *सापाच्या कातडीचा मृतपेशींच्या थराला काय म्हणतात ?* कात *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक पाटील दगडे, सरपंच, चिरली 👤 माधव रामू गोटमवाड, गुरुकुल इंग्लिश स्कूल कंधार, 8379848078 👤 सुरेश बावनखुळे, सहशिक्षक, माहूर 👤 मीनल आलेवार 👤 अविनाश गायकवाड 👤 कैलास वाघमारे 👤 राजू कांबळे 👤 दत्ताहरी शिवलिंग दुड्डे 👤 प्रकाश राजफोडे 👤 शेख झुबेर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.* *थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो सर्वस्या: सरितो वारि प्रयात्यायाति चाकरात देहनद्या: पुनस्त्वायुर्यात्येवायाति नो पुन:।। शरीर नाशवंत आहे हे सांगताना कवी म्हणतो ,सगळया नद्यांच पाणी वाहून जात आणि त्याच्या उगमाकडून (नवीन) पाणी येत राहत. देहनदीच आयुष्यरूपी पाणी मात्र वाहून जात, पुन्हा (नवीन पाणी) येत नाही. मनुष्यदेह हा कवींच्या ,संतांच्या चिंतनाचा विषय आहे. त्यावर अनेक रूपक केलेली आढळतात. कुणी देहाला देवाच देऊळ मानून त्यात आत्म्याच्या रुपात विठ्ठलाला पाहिलं, तर कुणी देहाची तिजोरी करून तिच्यात भक्तीचा ठेवा पहिला. प्राचीन तत्वचिंतकांनी देहाला रथाची उपमा दिली आणि आत्मा या रथाचा सारथी आहे, अस म्हटलं. या कवीन देहाला नदीच्या रुपात पाहिलं. पाणी वाहून नेणारी नदी आणि आयुष्य वाहून नेणारी देहरूपी नदी या दोघींमध्ये वाहत राहणार हे साम्य आहे. परंतु जलवाहिनी नदी चिरंतन असते. काळाच्या ओघात तिच पाणी सतत वाहत असत. जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येत, की प्रतिक्षणी तीच पाणी बदलत असत. पहिल पाणी वाहत वाहत सागराला जाऊन मिळत आणि त्याची जागा घ्यायला उगमाकडून नव ताज पाणी येत राहत. नदीची ही प्रवाहनित्यता तिला चिरतरुण बनवते. देहनदीच तस नसत. तीही काळाच्या ओघात वाहत असते .शैशव, तारुण्य, प्रौढत्व, वार्धक्य अशी ठिकाण घेत घेत अखेर ती काळसागराला मिळते .पण जसजशी पुढे वाहते तसतस मागे वाळवंट शिल्लक राहत .तिच्या खाणाखुणाही राहत नाहीत. काही नद्या मात्र मागे वाळवंटात आपल्या सत्कृत्यांची भव्य शिल्प कोरून उरतात. जीवन त्यांना कळले हो,समजून घ्या. अशोक कुमावत, नाशिक (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चंदन आणि संत यामध्ये खूप काही साम्य आहे.ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात राहिलो तर चंदनाचा सुगंध आपल्या अंगाभोवती असल्याचे किंवा अंगाला येत असल्याचे जाणवते व आपणच चंदन झालो आहोत असे वाटायला लागते.चंदन जेव्हा सहानेवर पाणी टाकून घासायला लागतो तेव्हा ते स्वत: झिजायला लागते आणि त्याचा गंध सर्वत्र दरवळायला लागते. चंदनाचा गुण जसा आहे तसाच संतांचाही आहे.संतांच्या सहवासात जर आपण राहिलो तर आपल्या जीवनातले सारे दुर्गूण नष्ट होण्यास मदत होते तर त्यांचा सहवास आपल्याला चंदनासारखा नेहमी हवासा वाटायला लागतो.संत हे स्वत: जगाच्या कल्याणासाठी अविरत आपला देह झिजवतात ते स्वत:साठी जगत नाहीत तर आपल्या ईश्वराप्रती प्रेम निर्माण व्हावे,आपण सन्मार्गाला लागावे,आपण मानवतेच्या दृष्टीने आपल्याकडून काहीतरी चांगले कर्म घडावे.आपल्यातला खरा माणूस जागा व्हावा.आपला जन्म इतरांच्या काही चांगल्या कारणी लागावा यासाठी नेहमी सांगत असतात झिजवत असतात.चंदन आणि संत हे दोघेही तितकेच मानवाच्या जीवनात महत्वाचे आहेत.म्हणून चंदन आणि संत यांच्यात साम्य आहे आणि यांचा सहवास नित्य राहिला तर नक्कीच आपले कल्याण होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संपर्क.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुणा ना व्यर्थ शिणवावे* एकदा महात्मा गांधींजीन कडे एक गृहस्थ आली होते. बोलता बोलता गांधींजींच्या लक्षात आले की त्या गृहस्थांच्या अंगातील सदऱ्याची बाही उसवली आहे. महात्मा गांधीजींनी त्यांच्या हे लक्षात आणून दिले. व त्या गृहस्थास हे लक्षात आल्यावर ते म्हणाले, " घरी गेल्यावर पत्नीकडून शिवून घेईन." यावर महात्मा गांधीजी म्हणाले, " एवढ्या साध्या गोष्टीसाठी कशाला त्यांना त्रास देता? " असे म्हणून महात्मा गांधींजींनी त्यांच्याकडे तो सदरा मागितला व सुई दोरा घेऊन स्वतः शिवून दिला. तात्पर्यः स्वतःची कामे स्वतः करावे. आपल्यामुळे कोणासही ञास होणार नाही, ही काळजी घ्यावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/03/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समता दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● १९३१ : महात्मा गांधीजीनी उभारलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला. ● २००० : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट – २) राष्ट्राला अर्पण ● १९९९ : ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणार्या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड ● १९९८ : नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणार्या, रशियाकडुन घेतलेल्या ’सिंधुरक्षक’ या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन ● १९९७ : ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्या टपाल तिकिटाचे प्रकाशन ● १९६६ : मैसूरचे माजी संस्थानिक जयचामराजेन्द्र वडियार यांचा बंगळूर येथील राजवाडा व त्यासभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत ● १९३३ : भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली. ● १९३१ : दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला. ● १६६६ : शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले. ● १८५१ : ’जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची (GSI) स्थापना ● १५५८ : फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला. ● १०४६ - पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे. ● २००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू. 💥 जन्म :- ● १५१२ : भूगोलतज्ज्ञ, गणित आणि नकाशा शास्त्राचे जनक जेरार्डस मर्केटर. रामकृष्ण परमहंस. ● १९१६ : बिजू पटनायक – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री (मृत्यू: १७ एप्रिल १९९७) ● १९१३ : गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: २१ जुलै २००९) ● १९०८ : सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते (मृत्यू: २ जून १९९०) ● १८९८ : चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जानेवारी १९७६) ● १५१२ : गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू: २ डिसेंबर १५९४) ● १९४२ - फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान. ● १९५९ - वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान. 💥 मृत्यू :- ● १९६८ : मराठीचे संशोधक नारायण गोविंद चाफेकर. ● १५३९ - नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी निगडीत शाळा सुरु करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय ठाकरे सरकारनं रद्द केल्याने, हा निर्णय एकतर्फी घेण्यात आल्याचा आरोप करत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन गावांमध्ये सरकारविरोधात आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांमधील मृत्यू दराचे प्रमाण 3.4 टक्के आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनने दिलेल्या माहितीनुसार मृत्यू दराचे प्रमाण वाढत असून जगात आतापर्यंत 3200 लोकांचा मृत्यू झाला आहे तर जगात 93 हजार पेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झाला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाविद्यालयीन शिक्षकांचं मुंबईत आंदोलन, आंदोलनामुळे बारावीच्या निकालासाठी उशीर होण्याची चिन्ह, शिक्षकांची शंभर टक्के अनुदानित शाळेतील वाढीव पदांची मान्यता देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मराठी चित्रपटांच्या तिकिटांवर असलेला १२ व १८ टक्के असा जीएसटी रद्द करावा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ललित कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील तेजस्विनी सोनवणे, सागर कांबळे, रतनकृष्ण शहा, दिनेश पांड्या या चार कलाकारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *येत्या 01 एप्रिलपासून पूर्वीप्रमाणेच सर्व आश्रमशाळांना बी पी एल दराने अन्नधान्य पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताचे माजी कसोटीवीर सुनील जोशी यांची बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली नियुक्ती.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला* http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एक होती कळी - एकनाथ आव्हाड, मुंबई एक होती कळी जराशी ती खुळी गुपचूप बसायची मुळीच नाही हसायची वारा आला बोलायला पाखरू आलं खेळायला तिला पडली भूल कळीचं झालं फूल फूल लागले डोलायला चुरचुरू डोलायला *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• _*प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्की असतं…*"_ *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *अंतर मोजण्याचे एकक कोणते ?* किलोमीटर 2) *देशातील पहिलं महिलांचं पोलिसस्थानक कोणते ?* कालिकत 3) *'भारतीय शेक्सपिअर' असे कोणाला म्हटले जाते ?* कालिदास 4) *भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण ?* एम. एस. स्वामिनाथन 5) *भारतातील सर्वात उंच मिनार कोणते ?* कुतूबमिनार *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माणिक आहेर, सहशिक्षक, नाशिक 👤 गंगाधर मदनूरकर, सहशिक्षक 👤 बाळू भगत 👤 अशोक कहाळेकर 👤 गंगाधर नुकूलवार, सहशिक्षक, 👤बालाजी तिप्रेसवार, उमरी 👤 रमेश मेरलवार, करखेली 👤 समाधान शिंदे, कवी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपले आयुष्य तसे सामान्यच आणि स्वप्नेही तशीच; पण असामान्य व्यक्तींची 'स्वप्ने' लोकविलक्षणच असतात. संत एकनाथांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की,'अजानवृक्षाची मुळी माझ्या गळ्याभोवती वेढली गेली आहे. ' एकनाथांनी मग आळंदीला जाऊन ज्ञानदेवांची समाधी शोधून काढली. तिचा जिर्णोद्धार केला. इतकेच नव्हे, तर ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. तुकारामांच्या स्वप्नात संत नामदेव आले आणि त्यांनी आपली शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण करावी, असे तुकोबांना सुचविले. जिजाऊंनी शिवरायांच्या राज्याभिषेकाचे स्वप्न मनोमन पाहून शिवरायांना स्वराज्याचे तोरण बांधण्याची प्रेरणा दिली होती.* *स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी येथे खडकावर, ध्यानमग्न स्थितीत, दैदिप्यमान भारताचे स्वप्न पाहिले. 'देशवासियांच्या जाड्याभरड्या अन्नवस्त्राची तरी सोय व्हावयास हवी.' हे रामकृष्ण परमहंसांचे बोल त्यांच्या मनात गुंजत होते. बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धांचे मनही उपेक्षित लोकांसाठी तळमळत होते. स्वत:पलिकडे लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्यांची स्वप्ने भव्य-दिव्य असतात. संत कबीर यांनी प्रत्येक जीवाने सत्-चित् , आनंदरूप व्हावे, अशी आस बाळगली, तर तुकडोजी महाराजांनी भेदभावरहित सुखी भारताची आकांक्षा धरली.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, केशवकुमारांची एक कविता आठवली एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे,वाऱ्यासवे पळाले पाण्यात पाहतांना, चोरुनिया क्षण, त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक। आपल्यातील भयभीत पणाला दूर करा ,कुठल्याही परिस्थितीत संकटांचा स्वीकार करायला शिका. स्वप्ने ती नसतात,जी झोपल्यावर पडतात,स्वप्ने ती असतात जी जागेपणी पडतात. कुठलंही स्वप्नं खूप मोठं नसतं आणि स्वप्नं पाहणारा लहान नसतो”. मोठी स्वप्नं फक्त तुमच्याच नाही तर इतर अनेकांच्या सकारात्मक बदल घडवून आणत असतात. त्यांना प्रेरित करत असतात. त्यामुळे मोठी स्वप्नं बघा, त्या दिशेने काम करा आणि इतरांना सुद्धा प्रेरणा द्या. कारण जगात काहीही अशक्य नाही!!! सर रॉजर बॅनिस्टर, चार मिनिटांपेक्षाही कमी वेळात एक मैल अंतर धावणारी जगातील पहिली व्यक्ती. १९५४मध्ये त्यांनी हा कारनामा केला होता. तोपर्यंत चार मिनिटांत एक मैल धावणे ही लोकांना अशक्य गोष्टच वाटत होती. त्यांना वाटायचे मानवी शरीराच्या मर्यादांमुळे कुठलाही माणूस एवढ्या वेगाने पळू शकत नाही. ही अशक्य अशी गोष्ट आहे. पण बॅनिस्टर यांनी सगळ्यांना खोटे ठरवले. त्यांनी स्वतःवर मेहनत घेतली. कठोर परिश्रम केले आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हे करू शकतो हा विश्वास कायम ठेवला. महान लोकांची हीच तर खासियत असते. ही माणसं म्हणजे त्या मेणबत्तीसारखी असतात, जी स्वतः जळून इतरांचं जीवन प्रकाशमान करत असते. त्यांच्या जीवनात आशेचा आणि प्रेरणेचा नवीन किरण जागवत असते. मग जर ते करू शकतात, तर तुम्हाला का नाही जमणार? जर तुम्ही स्वयंशिस्त, चिकाटी या गोष्टी आत्मसात केल्या, आयुष्यात नवनवीन आव्हानं स्वीकारत गेलात, चालढकल करणे थांबवले, तर तुमची स्वप्नं साकार करण्यापासून तुम्हाला कुणीही थांबवू शकणार नाही. आणि या प्रवासात तुम्ही अनेक लोकांच्या आयुष्यातील असा प्रकाशाचा किरण बनाल, ज्याच्यामुळे अनेकांना यश मिळवण्याच्या मार्गावर चालना मिळते. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी स्वप्ने स्वत:च्या बाबतीत पहाता त्यावेळी तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी खूप प्रयत्न करता आणि जिद्दीने पूर्ण करुन आनंदाने स्वीकारता तो तुमचा यशस्वी प्रयोग आहे.जसे तुम्ही तुमच्याबाबतीत दुसऱ्यांनी हस्तक्षेप करु नये असे वाटते आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न ही करता.असाही विचार इतरांच्या बाबतीत केला जावा अशी धारणा आपण जर मनात निर्माण केली तर इतरांचीही स्वप्ने पूर्णत्वास जातील.त्यांच्या बाबतीत मनात कोणताही वाईट विचार आणू द्यायचा नाही.कारण दुसऱ्यांनी देखील तुमच्याबाबतीत कोणताही वाईट विचार आणला नव्हता म्हणून तर तुमचे स्वप्न साकार झाले.जसे आपल्याबाबतीत चांगले चिंतितो तसे इतरांच्या बाबतीतही चांगलेच चिंतायला हवे तरच दोघांचेही त्यात समाधान आहे आणि दोघेही सुखासमाधानाने राहून जीवन जगू शकतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुशार गाढव* रामू मटकी व विटा बनवत असे. त्याने गाढव व कुञा आहे प्राणी पाळले होते. कुत्रा घराची राखण करीत असे. गाढव स्वतःच्या पाठीवरून माती ,विटा वाहून नेत असे. रामू माठ बाजारात घेऊन जाताना कुत्र्याला सोबत नेत असे. त्यामुळे गाढवाला कुत्र्याचा खूप राग येई. त्याला वाटायचं, " हा कुत्रा कधी एक पैशाचं काम करत नाही की एक मातीचं पोत उचलत नाही. सारखा मालकाला मस्का मारत इकडेतिकडे फिरत राहतो." एक दिवस कुत्रा गाढवा जवळ आला आणि म्हणाला, " मला तुझी मदत हवी आहे. काल रात्री आपल्या अंगणातल्या झाडामागे एक जंगली कोल्हा लपला होता. अंधारात लुकलुकणारे त्याचे डोळे मी पाहिले. मी त्याच्यावर भुंकलो सुद्धा ! पण तो अजिबात भ्यायला नाही. उलट नख दाखवत माझ्यावरच गुरगुरला....... हे जर मालकाला कळलं तर तो माझी चटणी करेल." " पण मी काय मदत करणार?" गाढव म्हणाले. " गाढवाच्या खिंकाळण्याला जंगलातली कोल्हे जाम घाबरतात. गाढवं ओरडू लागले की, कोल्हे स्वतःचा जीव घेऊन पळू लागतात, अस मी ऐकलंय. म्हणून आज रात्री कोल्हा आला की मी तुला इशारा करेन. मग तू त्याच्याजवळ जाऊन जोरात खिंकाळलास की तो घाबरून धूम पळून जाईल आणि मालक मला शाबासकी देईल." कुत्र्याची लबाडी गाढवाचा लक्षात आली. तो म्हणाला, " असं कसं? काम मी करणार आणि मालकाची शाबासकी तुला मिळणार?" हे ऐकून कुत्रा खाली मान घालून निघून गेला. तात्पर्यः कोणी आपणास कितीजरी मूर्ख समजले तरी आपला हुशारीपणा योग्य वेळ आली की समोरच्याला दाखवायचा असतो. मग समोरचा किती जरी हुशार असला तरी त्याला खाली मान घालायची वेळ येईल. आपण केलेल्या मेहनतीचा कामाची शाबासकी स्वतः मिळवायची असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/03/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *औद्योगिक सुरक्षा दिवस* 💥 ठळक घडामोडी :- ● १८६१ : अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले ● १९६१ : भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले. ● १९८४ : महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला. ● १९५१ : आशियायी सामन्यास प्रारंभ झाला. ● १९३० - दांडीयात्रेच्या सफलतेने प्रभावित भारतातील ब्रिटीश व्हाइसरॉय एडवर्ड फ्रेडरिक लिंडली वूड व महात्मा गांधींच्यात बैठक. भारतात देशी मिठाचा मुक्त वापर करू देण्याचा सरकारचा निर्णय तसेच दांडीयात्रेदरम्यान पकडललेल्या राजकैद्यांची मुक्तता करण्याचे आश्वासन. 💥 जन्म :- ● १९२२ - दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री. 💥 मृत्यू :- ● १९७१ : कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन. ● २००७ : सुनील कुमार महातो, भारतीय संसदसदस्य. ● २०११ : अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी. ● १९४८ : बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक. ● ११८१ : टोरिन थॅचर, भारतीय अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भारतात कोरोनाचा धोका वाढला, कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहावर, प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न, नाशिकमध्ये आढळलेल्या दुसऱ्या संशयितावर उपचार सुरु* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुस्लिम आरक्षणावरुन ठाकरे सरकारमध्ये दुमत, अध्यादेश काढणार असल्याचा मंत्री नवाब मलिकांचा दावा तर अद्याप निर्णय नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर, आतापर्यंत 7 लाखांहून अधिक कर्जखात्यात 4 हजार 807 कोटींची रक्कम जमा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणी पुनर्विचार याचिका फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कालपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ, जळगावात दहावीचा मराठीचा पेपर फुटला, परीक्षेत कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट, यवतमाळमध्ये भिंतीवर चढून कॉपी देण्यासाठी धडपड तर बीडमध्ये कॉपी पुरवण्यासाठी जीव धोक्यात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणेकरांना सार्वजनिक वाहतूकीकडे आकर्षित करण्यासाठी महापालिकेनं आणखी एक योजना आणलीय. PMPL बस मध्ये दहा रुपयात दिवसभर प्रवासाचा पास मिळणार, महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात त्याची घोषणा करण्यात आलीये. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *शंभर युनिट पर्यंत वीज मोफत देणे तसेच शेतकऱ्यांना दिवसा देखील चार तास वीज देण्याचे प्रस्तावित आहे, असे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधान परिषदेत सांगितले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शालांत परीक्षार्थींना शुभेच्छा* https://shopizen.page.link/ECzKbpKWAgvE6wio8 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मी अंधाराला घाबरत नाही* - बालाजी मदन इंगळे, औरंगाबाद 9881823833. गच्च काळोख सगळीकडे किर्रर्रर्र करती रातकिडे चालताना मी चाचरत नाही || मी अंधाराला घाबरत नाही… भुंकणे कुत्र्यांचे सुरू होते भूत गोष्टीतले समोर दिसते तरी छाती धडधडत नाही || मी अंधाराला घाबरत नाही… सारे दोस्त लपून बसतात घरामध्ये दडून बसतात मी बिनधास्त फिरत राही || मी अंधाराला घाबरत नाही… अंधार म्हणजे पृथ्वीची सावली त्यात आलीय भिती कसली मी भिऊन घरी बसत नाही || मी अंधाराला घाबरत नाही… *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणालाही नेहमीच दुःख होत नाही आणि कोणालाही नेहमीच सुख ही मिळत नाही "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आहाराचे मोजमाप कोणत्या एककात होते ?* कॅलरी 2) *भगवान बुद्धाचे निर्वाण स्थळ कोणते ?* कुशीनगर 3) *आग विझविण्यासाठी वापरला जाणारा वायू कोणता ?* CO2 4) *पृथ्वीच्या जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असलेला वायू कोणता ?* CO2 5) *उष्णता मोजण्याचे एकक कोणते ?* कॅलरी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मारोती छपरे, माध्य. शिक्षक 👤 मजहर सौदागर, सहशिक्षक 👤 साहेबराव पहिलवान, धर्माबाद 👤 अनिल गडाख 👤 ज्ञानेश्वर नाटकर 👤 कृष्णा सुधीर बुधावले 👤 गणेश राजपुरे 👤 राहुल जाधव 👤 कैवल्य धनराज पवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खूप हवे आहे. खूप गोष्टींचा हव्यास आहे. नाव पाहिजे. सन्मान पाहिजे. संपत्तीही हवीच आहे. समजा हे सर्व मिळाले तर त्यापेक्षा अधिक हवे आहे. पाहिजे ते मिळाले नाही तर स्वभाविकपणे निराशा आहे. मिळाले त्यापेक्षा अधिक मिळायला हवे होते. ते मिळाले नाही म्हणूनही निराशा आहे. अशा अवस्थेत,'ये सब मोह है, माया है' असे कोणी सांगतो. त्यातही दिलासा असतो. अखंड धडपड केल्यानंतरही कोल्ह्याला द्राक्ष मिळत नाहीत. त्याला कमालीची निराशा येते. त्या निराशेतून मुक्त होण्यासाठी मग तो त्या द्राक्षांनाच आंबट ठरवून मोकळा होतो. जे मिळत नाही ते 'आंबट' ठरवून मोकळे होणे काय किंवा त्याला 'मोह है, माया है' म्हणत बाद ठरविणे काय दोन्ही निराशेवर मात करण्यासाठी तेवढेच उपयोगी असतात.* *अशा ताणाच्या, निराशेच्या वेळी थोडासा 'भ्रम' किंवा थोडीशी 'भूल' माणसांना हवी असते का? ती 'देव' आणि 'धर्म' यातून मिळते का? म्हणून देवधर्माचे व्यापारी नाडवणूक, शोषण करतात. हे उघड सत्य आहे. धर्म ही 'अफूची गोळी' आहे, असे मार्क्स म्हणतो. ऑपरेशनची वेदना नको म्हणून त्या दरम्यान भूल दिली जाते. तेवढ्यापुरत्या का होईना वेदना सुसह्य होतात. 'जगणे ते मरणे' या दरम्यानच्या आयुष्याचे जे ऑपरेशन होत असते. त्यासाठी तर 'देव' आणि 'धर्म' या कल्पनांची आवश्यकता नसेल.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो सांगू तरी कसे मी भय कोवळे उन्हाचे, उसवून श्वास माझा, फसवून रात गेली. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, उठी उठी गोपाळा, अरुणोदय झाला, ही सकाळची,पहाटेची गाणी ऐकली की जीवनात पुन्हा खोलवर जाऊन यथेच्छ डुबाव वाटत. सुंदर सकाळ पुन्हा उगवल्याच्या आनंदाने असंख्य पक्ष्यांचा मंजुळ प्रभातराग वातावरणाला संगीतसाज चढवतो आहे. निरभ्र, निळ्याशार आभाळाच्या क्षितिजाशेजारच्या टोकावर धुक्याच्या पांढुरक्या रेघेने सीमारेख आखली आहे. पूर्वेकडचं तांबुडकं हळूहळू रूपेरी झाक घेऊ लागलंय आणि डोंगरांच्या निळ्या रांगा आपल्या मूळ रंगानिशी जाग्या होऊ लागल्या आहेत... ही वेळ मोठी वेगळीच असते. खरं तर ही जीवनासाठी घेऊन येणारा नवा दिवस साजरा करण्याची वेळ! पण त्या साजरेपणासाठी वेळ काढण्याएवढा निवांतपणा सगळ्यांकडे नसतो. आपण ज्याला ‘जागं होणं’ म्हणतो, ज्या किलबिलाटाला संगीत वगैरे म्हणतो, ते सारं, खरं म्हणजे नव्या दिवसासाठी जगण्याच्या धडपडीचीच एक सुरुवात असते. ती जाणीव मनाला शिवू न देता बाजूला ठेवून आपण त्याकडे पाहतो, म्हणून तीदेखील आपल्याला सुरम्य वगैरे वाटत असते... म्हणूनच, जगण्यासाठीचं ‘जीवन’ शोधण्यासाठी अज्ञाताच्या भरवशावर पिल्लांना फांदीवरच्या घरट्यात सोडून आकाशात भरारी घेणारी बगळ्यांची रांग पाहून आपल्याला आनंद होतो, कविताही सुचतात... पण या रांगेतल्या प्रत्येकाच्याच मनात, लवकरात लवकर अन्न शोधून पिल्लांच्या चोचीत घास भरविण्यासाठी घरी परतण्याचीच आस असते. झाडांच्या पानापानाआड किलबिलाट करून, मंजुळ स्वरात गाण्याचे आलाप आळवणारी चिमणी पाखरं, काही सदान् कदा केवळ प्रणयगीतेच गात बागडत नसतात... या सुरांनी जेव्हा आपल्या कानांना सुखाची आणि आनंदाची अनुभूती येते, तेव्हा त्यांच्या नजरा आणि चोची मात्र जगण्याचं आणि पिल्लांना जगविण्याचं साधन असलेल्या अन्नाच्या शोधातच भिरभिरत असतात! . आत्ता, क्षणापूर्वी, आभाळातून, अशीच एक बगळ्यांची माळ फुलली, बघता बघता क्षितिजावरच्या त्या पांढुरक्या रेषेत विरघळून गेली. तिथे बहुधा, पाणवठा असावा... आता ती माळ जमिनीवर मात्र अस्ताव्यस्त विसावेल. बकध्यान सुरू होईल... ...आणि पाण्यातले मासे, भयभरल्या नजरांनी पाण्यापलीकडे पाहत, स्वत:स वाचविण्याची पळापळ सुरू करतील! उजाडलेल्या नव्या दिवसाची संध्याकाळ पाहावयास मिळेल की नाही या भयाने!... सकाळ ही अशीच असते! नेहमीच! कुणी जगण्याचा आनंद साजरा करू लागतो, तेव्हा दुसरा कुणी जेमतेम जगण्याची धडपड सुरू करत असतो! तरीही आपण मात्र एकमेकांना म्हणतो, ‘शुभ सकाळ’! कारण आपण नेहमीच पहिल्या वर्गात स्वत:ला पाहत असतो! जगण्याचा आनंद साजरा करणाऱ्या वर्गात!... अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या मंदिरात जाऊन देवाला फुलांचा हार घालून प्रसाद म्हणून नारळ फोडण्यापेक्षा एखाद्या वाचनालयासाठी हार नारळासाठी लागणा-या पैशापेक्षा त्याच पैशातून एखादे पुस्तक घेऊन वाचकांसाठी वाचनालयास भेट दिली तर चारजण वाचण्यासाठी प्रवृत्त होतील आणि ज्ञान घेतील की,ज्यामुळे चांगले जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 📓📚📓📚📓📚📓📚📓 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आत्मपरीक्षणाची गरज* एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्य चकित होत होता. " तुमची प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंतयात्रेत नक्की सामिल व्हा. " सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट वाटल.पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण???? यासाठी प्रत्येकजण,शवपेटीच्या जवळ जाऊ,लागला. शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना. कारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता. शवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता, "या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः" कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता. तुमच आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही. दुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल? तुम्ही तेव्हाच मोठे होवू शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल.त्यासाठी तुम्हाला स्वतःला कष्ट,मेहनत, परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी लागेल. अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/03/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक वन्यजीव दिन* *हिनामात्सुरी - जपान* *शहीद दिन - मलावी* *मुक्ति दिन - बल्गेरिया*. 💥 ठळक घडामोडी :- ● १९३९: मुंबई येथे मोहनदास गांधी यांनी भारतात हुकूमशाही नियम निषेध उपास सुरु केला होता. ● १९२३: वेळ नियतकालिक प्रथमच प्रकाशित झाले होते. ● १९९१- रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले ● १८८५: अमेरिकन टेलिफोन व तार कंपनी न्यू यॉर्क मध्ये समाविष्ट झाले। ● २००५ : स्टीव्ह फॉसेट यांनी ’ग्लोबल फायर’ या मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता ६७ तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली. ● २००३ : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या ‘शरच्चंद्र चटोपाध्याय’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड ● १९९४ : जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ’ग्रॅमी पुरस्कार’ प्रदान ● १९७३ : ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. ● १९६६ : डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले. ● १९४३ : दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार ● १९३० : नाशिक येथील काळा राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला. ● १८८५ : अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली. ● १८६५ : हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली. ● १८४५ : फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले. इ. स. ७८ : शालिवाहन शकास प्रारंभ. 💥 जन्म :- ● १८३९- टेलिफोनचा जनक ग्रॅहॅम बेल यांचा जन्म ● १८६०- प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या डॉ. हापकीन यांचा जन्म ● १९२८- अख्तर हुसेन यांचा जन्म ● १९७७ : अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर ◆ १९७० : इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू ● १९६७ : शंकर महादेवन – गायक व संगीतकार ● १९५५ : जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते ● १९३९ : एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज ● १९२६ : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार ● १८४७ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश – अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक ● १८४५ : जी. कँटर – जर्मन गणितज्ञ ● १८३९ : जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक 💥 मृत्यू :- ● २००० : रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री. ● १९९५ : पं. निखिल घोष – तबलावादक ● १९८२ : रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर ● १९६५ : अमीरबाई कर्नाटकी – पार्श्वगायिका व अभिनेत्री ● १९१९ : नारायण हरी आपटे – कादंबरीकार ● १७०७ : औरंगजेब – सहावा मोगल सम्राट ● १७०३ : रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचं वर्चस्व, सर्व 21 जागांवर विजय मिळवत भाजपचा केला दारूण पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई महानगरपालिकेचा प्लास्टिक कारवाईचा पुन्हा धडाका, दोन दिवसांत 1028 किलो प्लास्टिक जप्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दिल्ली निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर, पुढील आदेश मिळेपर्यंत शिक्षेला स्थगिती, पटियाला हाऊस न्यायालयाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली आणि तेलंगणात दोघांना कोरोना व्हायरसची लागण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती, दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार, खासदार संभाजीराजे छत्रपतींचा इशारा, तर मंत्रीमंडळ उपसमितीवरुन अशोक चव्हाणांना हटवण्याची आंदोलकांची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली : केंद्र सरकारने होळीच्या आधी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर 53 रुपयांनी झाला स्वस्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा सात विकेट्सने पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* http://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *फुलपाखरू* रामकृष्ण पांडुरंग पाटील, 9408885775 फुलपाखरू फुलपाखरू गंमत तुझी रे भारी पान फुल वेली करत फिरतोस बाग सारी वेगवेगळ्या फुलांवर बसून तू आनंद घेई स्पर्श होताच तुला कसे रंग सोडुनी जाई मऊ मऊ पंख तुझे इवले इवले पाय पकडायला जाताच पटकन उडून जाय बारीक बारीक डोळे लुकलुक करत पाही रंगीबेरंगी रूप तुझे हे दुसऱ्या कुणा नाही *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *”आपलं दु:ख पाहुन कोणी हसले तरी चालेल, पण आपल हसणं बघुन कोणी दु:खी राहता कामा नये.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कोणत्या देशाच्या राष्ट्रध्वजावर AK-47 चे चित्र आहे ?* कांगो 2) *कोणार्क सुर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे ?* उडीसा 3) *अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ?* कोलंबस, इटालियन खलाशी 4) *नेपोलियनची जन्मभूमी कोणती ?* कारसिका 5) *जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता ?* कॅनडा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुरेश कटकमवार 👤 अनिल गड्डम 👤 गोविंद चव्हाण 👤 बालासाहेब इंगोले पाटील 👤 इरफान शेख 👤 जयश्री उमरीकर 👤 कैलास माधवराव गंगुलवार 👤 साईराज संकपाळ 👤 डॉ. नितीन हरकाळ 👤 गितेश गणपत पाटणे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुरूवात आहे म्हणजे शेवट आहे. उदय आहे म्हणजे अपरिहार्यपणे अस्तही आहेच आहे. झाड आहे म्हणून सावली आहे. तद्वतच जन्म आहे म्हणून मृत्यूही आहे. जन्मासोबतच 'मरण'ही जन्म घेते. त्या अर्थाने मरणाला काही स्वतंत्र अस्तित्व नाही. सयामी जुळे असतात. ते एकमेकांना चिटकूनच जन्माला येतात. तसे हे 'जगणे' आणि 'मरणे' म्हणजे दोन जुळे भाऊच. पण या जगण्याला त्याच्यासोबतच जन्माला आलेले हे मरण नको असते. त्याचे स्मरण ही नको असते. तरीही 'मरण' झाकता येत नाही की टाळता येत नाही.* *जगण्यासोबतच मरणाचे वास्तव सोबत असताना 'अमरत्वाची' अवास्तव आकांक्षाही असतेच आणि मग सुरू होते अमरत्वाची मरमर'. त्यात कोणीतरी सांगतो, माणूस मरत नसतोच. मरते ते शरीर. आत्मा तर अमर असतो. आता हा आत्मा वगैरे आपण पाहिलेला नसतो. तरीही गोष्ट सोयीची असल्यामुळे दिलासा देऊन जाते. मग अशा सोयीच्या गोष्टींचाही बाजार मांडला जातो. अशा तत्वज्ञानाला मागणी असते. त्यामुळे मालाचा उठाव असतो, म्हणून त्याचे निर्माते आणि वितरकही भरपूर आपसूकच तयार होतात. मग मृत्यूच्या भयाचा व्यापार धर्माच्या नावाने केला जातो आणि तो तेजीतही असतो.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो कुणीतरी बोलावतय हृदयातून म्हणून जाण्यात मजा आहे. कुणीतरी ऐकतय प्राणातून म्हणून गाण्यात मजा आहे. आपलं कुठलंही काम हे आतून म्हणजे मनापासून केलं पाहिजे तरच त्यात रंग भरतो.लोकांनी आपल्या कार्यक्रमाला गर्दी करावी असं प्रत्येक कलावंताला वाटत असतं. लोक नाही जमले तर कलावंत नाराज होऊन संयोजकांना खडे बोल सुनावतात. कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, सभागृहात पाहून मी गातोच कुठं, मी आत पाहूनच गातो. लोक किती होते किंवा होते की नव्हते, याने मला काय फरक पडतो ? खरा कलावंत आत पाहून आपली कला सादर करतो. गायक स्टुडिओत रेकाॅर्डिंग करतात तेव्हा कुठे श्रोते असतात ? आपली आई जेंव्हा जात्यावर गाणं म्हणायची, तेव्हा कोण होता तीचा श्रोता ? कुणाकडं पाहून, कोणाच्या समाधानासाठी ती गाणं म्हणायची ? कुणाच्या टाळीची तीला आपेक्षा होती ? कुमार गंधर्व जसे आत पाहून स्वत: साठी गायचे तशीच जात्यावर गाणारी प्रत्येक आई त्या चार भिंतीच्या आत आणि गडद अंधारात जे गाणं म्हणायची ते गाणंच तिच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा 'उजेड' होता. माणसानं त्या उजेडासाठी कविता म्हटली पाहिजे, गाणं गायलं पाहिजे. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हजार चुकीचे मार्ग स्वीकारण्यापेक्षा एक सत्याचा मार्ग स्वीकारला तर स्वत:च्या जीवनाचे कल्याण तर होईलच आणि त्याबरोबरच इतर लोक आपल्या जीवनाचे कल्याण होईल म्हणून तुमचे अनुयायी बनतील यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद : ९४२१८३९५९०. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आता मी छान दिसतो!* गणू फार आळशी मुलगा होता. त्याला तोंड धुण्याचा कंटाळा होता. त्याला अंघोळीच्या कंटाळा होता. त्याला कपडे बदलायच्या कंटाळा होता. एकदा गणू शाळेत निघाला, तेव्हा त्याची आई म्हणाली, “गणू जरा थांब, आरशात बघ! ” गणूला आरशात काय दिसले? तोंडावर पाण्याचे ओघळ! केस विस्कटलेले!! अंगातला सदरा मळलेला!!! गणू मनात म्हणाला, “ किती घाणेरडा दिसतो मी!” गणूला स्वतःचीच फार लाज वाटली. गणूने साबण लावून तोंड धुतले. स्वच्छ धुतलेले कपडे अंगात घातले. विस्कटलेले केस नीट फिरवले. मग तो आपल्या आईकडे गेला आणि म्हणाला, “ बघ आई, आता मी कसा छान दिसतो!” मी बघ किती छान कपडे घातले, किती छान केसाचा भांग केला. आता बघ आई मी किती छान दिसतो! तात्पर्य: आपण आपले स्वतःचे तन आणि मन स्वच्छ ठेवले पाहिजे. आपण स्वतः सदैव स्वच्छता अंगी बाळगली पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/03/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९७२- अमेरिकेचे ’पायोनिअर-१०’ यानाचे गुरुच्या दिशेने उड्डाण झाले 💥 जन्म :- ● १९३१ - सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह ● १९७७ - इंग्लिश क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस 💥 मृत्यू :- ● १५९८- संत मीराबाई. ● १९४९- सुप्रसिध्द कवयित्री, संयुक्त प्रांताच्या पहिल्या स्त्री गव्हर्नर सौ. सरोजिनी नायडू. ● १९८६- डॉ. काशिनाथ घाणेकर. ● १७००- छत्रपती राजाराम महाराज. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड, सामनाच्या पहिल्या महिला संपादक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 1988 मध्ये केली होती सामनाची सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : हिवाळ्यात देखील अवकाळी पाऊस झाल्यामुळे राज्यातील शेतकरी झाला हवालदिल, लातूर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. रेणापूर, शिरूर अनंतपाळ, उदगीर तालुक्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा काढणीला आलेल्या हरभरा पिकाचे नुकसान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्लीः हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)ने भारतीय सैन्यासाठी अत्याधुनिक 500 लढाऊ हेलिकॉप्टर बनवण्याच्या मेगा प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. 2027 पर्यंत हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर तयार होईल, अशी माहिती HALचे प्रमुख आर माधवन यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कर्जमाफीच्या यादीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून होणार पैसे जमा. 1 लाख 25 हजार 449 शेतकऱ्यांच्या खात्याचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी यांच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी 01 एप्रिल ते 30 जून 2020 याला कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती बार्टी कडून देण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *विरारच्या रसेल दिब्रिटो याने अवघ्या नऊ महिन्यांच्या तपश्चर्येनंतर ‘मुंबई-श्री’ या प्रतिष्ठेच्या किताबाला गवसणी घातली आहे. बॉडी वर्कशॉपच्या रसेलने विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या सुशील मुरकर आणि नीलेश दगडे यांचे आव्हान मोडून काढत ‘मुंबई-श्री’ किताबावर नाव कोरले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *यजमान न्यूझीलंड संघाचा दुसऱ्या कसोटी सामन्यातही विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु, भारताचा दुसरा डाव डाव १२४ धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी १३२ धावांचं आव्हान, तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने एकही गडी न गमावता ४६ धावांपर्यंत मजल मारली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेळेचे नियोजन* http://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चिऊताई* - राजेश जेठेवाड, नांदेड चिवचिव करत माझी चिऊताई फिरत होती इकडून तिकडे अन तिकडून इकडे उडत होती कुठे मिळेल पिल्लासाठी घास ती रानावनात शोधत होती सैरावैरा फिरून फिरून चिऊताई सारखी दमत होती दमून दमून ती पुन्हा आपल्या पिकांकडे जात होती कुठे ही मिळेना दानापाणी तवा डोळे भरून पिल्लांना पाहत होती *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• _* " एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात. पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. "*_ *🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *हत्तीरोगाचा प्रसार कोणत्या डासांमुळे होतो ?* क्युलेक्स मादी 2) *नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ?* खडकवासला 3) *क्षय ( T. B.) या रोगासाठी कोणती लस वापरतात ?* बीसीजी लस 4) *जगातील साखरेचे कोठार कोणते ?* क्युबा 5) *लीप वर्षात एकूण किती दिवस असतात ?* 366 दिवस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गणेश पाटील हतनुरे, पत्रकार 👤 योगेश जी काटे, पत्रकार 👤 चिं. साई दीपक गायकवाड 👤 अभिजित बाळकृष्ण ढगे 👤 मुकुंद मोहन जाधव 👤 शुभम भोसले 👤 एकनाथ कणसे 👤 अविनाश साबरे 👤 राजू तायडे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• लोकांनी आपल्या कार्यक्रमाला गर्दी करावी असं प्रत्येक कलावंताला वाटत असतं. लोक नाही जमले तर कलावंत नाराज होऊन संयोजकांना खडे बोल सुनावतात. कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, सभागृहात पाहून मी गातोच कुठं, मी आत पाहूनच गातो. लोक किती होते किंवा होते की नव्हते, याने मला काय फरक पडतो ? खरा कलावंत आत पाहून आपली कला सादर करतो. गायक स्टुडिओत रेकाॅर्डिंग करतात तेव्हा कुठे श्रोते असतात ?* *आपली आई जेंव्हा जात्यावर गाणं म्हणायची, तेव्हा कोण होता तीचा श्रोता ? कुणाकडं पाहून, कोणाच्या समाधानासाठी ती गाणं म्हणायची ? कुणाच्या टाळीची तीला आपेक्षा होती ? कुमार गंधर्व जसे आत पाहून स्वत: साठी गायचे तशीच जात्यावर गाणारी प्रत्येक आई त्या चार भिंतीच्या आत आणि गडद अंधारात जे गाणं म्हणायची ते गाणंच तिच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा 'उजेड' होता. माणसानं त्या उजेडासाठी कविता म्हटली पाहिजे, गाणं गायलं पाहिजे.* 🎪 *॥ रामकृष्णहरी ॥* 🎪 🎄🎄🎄🎄🎄🎄 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो दुःखाचे डोंगर चढून गेल्याशिवाय यशाची हिरवळ दिसत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते.ज्याने अपयश बघितले तोच पुढे यशाचा धनी होतो. अपयशातूनच मिळते दैदिप्यमान यश ही विलक्षण शौर्यकथा, इसवीसनापूर्वी पाचशे आठशेमध्ये घडली. रोमला, क्लुसियमच्या पोरसेना या राजाने वेढा घातला होता. त्यावेळी, म्युसियस नावाचा तरूण रोमन कैद केला गेला. कैद झाल्यावर, त्याने राजा पोरसेनाचा खून करण्याचा प्रयत्न केला. राजाला शंका होती की, त्याचे कोणी आणखी साथीदारही असतील. म्हणून त्याने म्युसियस, याचे हात जाळण्याचा हुकूम केला. अग्निकुंड पेटले, तेव्हा म्युसियस निर्भयतेने अग्निस्थंडिलापर्यंत आला. आणि त्याने शांतपणाने, आपला हात अग्नीच्या मुखावर धरला. जळत्या हाताची राख होत होती. राजा भयचकित् होऊन ते दृश्य पहात होता. आणि म्युसियस हसत होता. पोरसेना राजाच्या मनावर एवढा परिणाम झाला की, त्याने तरूण म्युसियसला मुक्त केलेच, पण रोमचा वेढाही उठवला. आता प्रश्न असा की, रोमला वेढा पडला, ते म्युसियसचे यश का अपयश? तो कैद झाला, तेव्हा त्याचे यश का अपयश? खुनाच्या प्रयत्नात तो धरला गेला, हे त्याचे यश का अपयश? त्याला हात जाळण्याची शिक्षा मिळाली, हे त्याचे यश का अपयश? हात जाळून बधत नाही असे पाहून त्याला संभाजीप्रमाणे सोलला असता तर? येथे विचारलेल्या पाच प्रश्नचिन्हांनंतर म्युसियसचे यश, इतिहासात नोंदले गेले. पण पूर्वीच्या पाच अपयशाच्या पायर्या नसत्या तर सहावी काही आकाशातून उगवली नसती! अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही जेव्हा एखाद्या नवीन ठिकाणी जाता तेव्हा तुम्हाला तिथे काहीतरी नवीन पहायला किंवा अनुभवायला मिळणार त्याबद्दलची उत्सुकता लागून राहते आणि काहीतरी तेथून तुम्ही घेऊन येता.त्याचप्रमाणे तिथल्या लोकांनाही तुमच्याकडून काहीतरी नवीन अपेक्षा असतातच अर्थात तुमच्याजवळही असे एखादे त्यांना देण्याइतपत ज्ञान किंवा अनुभव असायला हवे जे की,तुमच्या भेटीतून त्यांनाही आनंद आणि समाधान मिळायला हवे.अशा देवाणघेवाणीतून तुमचे आणि नवीन ठिकाणचे नातेसंबंध अधिक दृढ होतील.केवळ आपण स्वार्थ साधण्यापुरते जर संबंध किंवा जवळिकता निर्माण केली तर त्यात काही अर्थ राहणार नाही.ज्याप्रमाणे आपली घेण्याची वृत्ती आहे त्याचप्रमाणे इतरांना काहीतरी देण्याचीही वृत्ती जोपासायला हवी तरच जीवनाला अर्थ राहील. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🎋🥀🎋🥀🎋🥀🎋🥀🎋🥀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पैशात सुख शोधता येत नाही* एका नगरात एक व्यापारी राहत होता. तो राहत असलेल्या नगरमध्ये त्याचा व्यापार काहीच चालत नव्हता. कधीकधी तर दिवसभरातून एकही ग्राहक त्याच्याकडे यायचा नाही. त्याच्या कुटुंबाला कधीकधी उपाशी झोपावे लागत होते. अनेक दिवस असेच चालू राहिले आणि परिस्थितीही बदलली नाही. तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला दुसऱ्या नगरात जाऊन व्यापार करण्याचा सल्ला दिला. व्यापाऱ्याला मित्राचा सल्ला पटला. व्यापारी आपल्या पत्नी आणि मुलांना घरीच सोडून दुसऱ्या नगरात व्यापारासाठी गेला. नशिबाने त्याच्या मित्राचा सल्ला कामी आला आणि त्याला भरपूर फायदा होऊ लागला. तो अनेक दिवस दुसऱ्या शहरांमध्ये राहून व्यापार करू लागला. त्याने स्वतःच्या नगरात येऊन एक नवीन घर बांधले. पत्नी आणि मुलांना घेऊन नवीन घरात राहू लागला. तेव्हा पत्नी त्याला म्हणाली आता आपल्याकडे पर्याप्त धन जमा झाले आहे. यामध्ये आपण सुखी जीवन जगू शकतो. तुम्हाला आता इतर नगरांमध्ये जाऊन व्यापार करण्याची आवश्यकता नाही. मुलांनाही वेळ देण्याची आवश्यकता आहे. व्यापारी म्हणाला, मला आणखी धन कमावण्याची इच्छा आहे, ज्यामुळे तुम्हाला मी सर्व सुख-सुविधा देऊ शकेल, आपण जे दिवस पाहिले ते मला मुलांना परत दाखवायचे नाहीत. पत्नी म्हणाली, परंतु धन कमावण्यात जो वेळ निघून गेला आहे तो परत येणार नाही, आपण जीवनात सोबत राहण्याच्या आनंदापासून वंचित होत आहोत. व्यापारी म्हणाला, फक्त आणखी काही वर्ष व्यापार करू दे, आपण एवढे धन जमा करू की आपल्या पिढ्या सुखात जीवन व्यतीत करतील. व्यापारी पुन्हा व्यापार करण्यासाठी निघून गेला. काही वर्ष असेच निघून गेले. खूप धन जमा झाले. व्यापाऱ्याने पुन्हा नदीच्या काठावर एक सुदंर महाल बांधला. संपूर्ण कुटुंब त्या महालात राहू लागले. तो महाल एखाद्या स्वर्गाप्रमाणे होता. व्यापाऱ्याची मुलगी त्याला म्हणाली, बाबा आमचे सर्व बालपण निघून गेले परंतु आम्ही तुमच्यासोबत राहू शकलो नाहीत. आता आपल्याजवळ एवढे धन आहे की, पाच-सहा पिढ्या आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. आता तुम्ही आमच्या सोबतच राहा. व्यापारी म्हणाला, मुली आता मीही थकलो आहे आणि आता तुमच्यासोबत काहीकाळ व्यतीत करण्याची इच्छा आहे. मी उद्या फक्त दोन दिवसांसाठी शेजारच्या गावात जाऊन काही वसुली करायची आहे तेवढी करून येतो. त्यानंतर मी येथेच तुमच्यासोबत राहणार आहे. संपूर्ण कुटुंब आनंदी झाले. दुसऱ्या दिवशी व्यापारी शेजाऱ्याच्या गावात गेला आणि त्याच दिवशी मुसळधार पाऊस सुरु झाला आणि ज्या नदीच्या काठावर व्यापाऱ्याने महाल बांधला होता तो पुरामध्ये वाहून गेला. त्या पुरताच त्याचे संपूर्ण कुटुंब वाहून गेले. व्यापारी परत आल्यानंतर सर्वकाही नष्ट झालेले होते.व्यापारी हताश झाला.निर्बल झाला. त्याला काय करावे हे सूचेनासे झाले. *तात्पर्यः पैशात सुख शोधता येत नाही.त्यासाठी आपल्या कुटुंबाला वेळ द्या. पैसा कमावणे आवश्यक आहे परंतु काळासोबत नाते आणि एकमेकांमधील प्रेमासाठी आपल्या लोकांसोबत वेळ व्यतीत करणेही आवश्यक आहे. कारण धन कोणत्याही वेळी मेहनत करू कमावले जाऊ शकते परंतु जो काळ निघून गेला आहे तो परत येत नाही. वर्तमानात राहा, नात्यांच्या आनंदाचे सुख घ्या.आणि आपल्या लोकांना वेळ द्या.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/02/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९९६: क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला. ● २०००: शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला. ● २०१२:- ६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले 💥 जन्म :- ● १९४०-गोपीचंद हिंदुजा ,उद्योगपती ● १८९६ - मोरारजी देसाई, भारताचे माजी पंतप्रधान. ● १९८४: भारतीय हॉकी खेळाडू अॅडम सिंक्लेअर यांचा जन्म. 💥 मृत्यू :- ● १५९२: इटालियन संगीतकार अलेस्सांद्रो स्ट्रिजियो यांचे निधन. ● १९४०: इंग्लिश लेखक एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४७) ● १९४४: फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८६७) ● १९५६: फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष एल्पिडियो क्विरिनो यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८९०) *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : राज्यात येत्या १ मेपासून सिंगल युज डिस्पोजेबल अर्थात एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानपरिषदेत केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, छगन भुजबळांची विधानसभेत मागणी, विरोधकांकडून मागणीला समर्थन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जगाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या कचाट्यात, शेअर बाजारात गुंतवणुकदारांचे 5 लाख कोटी बुडाले, कोरोनाचा विळखा कमी झाला नाही तर सोनं 46 हजारांवर जाण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची मुदत आज संपणार असून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात येणार याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे, अॅन्टी करप्शन ब्युरोचे प्रुमख परमबीर सिंह मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होऊ शकतात.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : सध्या महाराष्ट्रात हवामान बदलाचे स्थित्यंतर पाहायला मिळत आहे. दोन दिवसानंतर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळू शकतात किंवा गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर करण्यात आला असून यावेळी भारताच्या संघात उमेश यादव आणि रवींद्र जडेजा दोन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक सुरुवात केली आहे. मुंबईकर पृथ्वी शॉने झळकावेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत २ बाद ८५ पर्यंत मजल मारली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेळ नाही मला* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_14.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नाजूक ते फुलपाखरू* सौ . वर्षा निलेश भोज, पुणे कुठून आणलेस सुंदर पंख पंखावरील छान छान रंग || फुलांवर बसशी जाऊन अलगद तुला पाहुन आवरेना हा मोद || वाटे मजला घेऊन कवेत तुला मीही तुझ्यासवे भेटेन प्रत्येक फुला || पाहशीस मज करून बारीक डोळे फुलांभोवती तु नेहमी आनंदाने खेळे|| नाजूक नि सुंदर त्या पंखांवरती वेगवेगळी नक्षी कोण रे काढती || तुला धरण्या काही छोटे उगाच भांडती काही तुझ्या इकडून तिकडे उडण्यास भाळती | स्वछंद जगण्याची देतोस तु शिकवण मस्त नि मजेत घालवतोस तुझे छोटेसे जीवन || वाटे सर्वांना फुलपाखरासम असावे जीवन स्वछंदी राहण्यासाठी मात्र स्वच्छ असावे मन || *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" श्वास व विश्वास दोन्हीं अदृश्य आहेत, परंतु दोघांत इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नाना पाटील यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते ?* क्रांतिसिंह 2) *झाडाची पाने कोणत्या घटकामुळे हिरवी दिसतात ?* क्लोरोफिल 3) *कोणत्या झाडापासून कात मिळते ?* खैर 4) *महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?* खोपोली 5) *खालसा या पंथाची स्थापना कोणी केली ?* गुरू गोविंदसिंग *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ओवी अभिजित लकडे 👤 योगेश व्हनमाने 👤 तेजस्विनी विजय शेटे 👤 अमितशेठ जावळेकर 👤 सुधाकर चव्हाण 👤 श्री व सौ पेटकुले ( लग्नाचा वाढदिवस ) 👤 अभिनव विजय घोलप 👤 श्रेया गजानन मोरे 👤 शिवाजी पंडीत *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने त्याच्या स्वार्थासाठी भिंतीचा वापर करायला सुरुवात केली. भिंतीची मूळ वैशिष्ट्ये संपुष्टात येऊन फक्त भेदासाठी भिंतीचा वापर सुरू केला गेला. माणूस सतत भिंत सोबत घेऊन फिरू लागला. एवढेच कशाला दर दोघांच्या मध्ये भिंत असतेच, इतकच मात्र तिचं अस्तित्व ढळढळीत असतं. सगळ्यात टणक आणि अभेद्य भिंती असतात जाती-पातीच्या, धर्माधर्माच्या. ह्या भिंती नष्ट व्हाव्यात म्हणून संतापासून समाजसुधारकांपर्यंत सगळ्यांनी निकराचे प्रयत्न केले. पण भिंती काही नष्ट झाल्या नाहीत. ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली; ती जगाला चमत्कार करून दाखविण्यासाठी तर नक्कीच नाही; तर चौदाशे वर्षाच्या चांगदेवाने आपल्या भोवती जी अहंकाराची भिंत उभी केली होती, तिचा भेद करण्यासाठी.* *मात्र, इथे आपण सोयीचे अर्थ लावून आपल्या अहंकाराला कुरवाळीत बसलो आठशे वर्षात तर आतोनात भिंती उभ्या राहिल्या. वर्तमान काळात तर त्या आणखीन घेर वाढवून भक्कम झाल्या आहेत. माणसाने उभ्या केलेल्या भिंतींखाली चिणून त्याचाच अंत होऊ शकतो. माणूस सतत एक दुस-यापासून परका होत जातोय. भिंत आभाळाला भिडून गेलीय. रक्ताची नातीगोतीही त्यातून सुटली नाही. तुम्ही जिथे काम करता, जिथे राहता, जिथे जिथे श्वास घेता. अशा सर्वच ठिकाणी भिंतीच भिंती. या भिंती भेदण्याचं एकमेव प्रभावी अस्त्र आहे, ते म्हणजे 'मानवता.' याचा वापर एका बाजूने नाही करता येणार; दोन्ही बाजूने केला तरच या भिंती भेदल्या जातील.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔷🔸🔹 🔶 🔷 🔸🔹🔶 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, काल राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण साजरा केला.डॉ.सी.व्ही.रामन यांच्या रामन इफेक्ट सादरीकरणानंतर तो दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. खर तर विज्ञान आणि अध्यात्म हे जर हातात हात घालून चालले तर नक्कीच सर्व काही चमत्कार घडतील. विज्ञानाचा शोध लागला, अंधारवाटा उजळल्या. बंदुकीचा शोध लागला, संरक्षणाचे साधन उपलब्ध झाले. रेडिओच्या शोधाने दूरपर्यंत संपर्क होऊ लागला. टेलिफोनच्या शोधाने हजारो मैलांपर्यत संवाद सुरू झाले. 'ज्ञान' हा मनुष्याचा डोळा आहे. ती त्याची दृष्टी आहे. तिने त्याला वाटेतील खाचखळगे दिसतात, काटेकुटे दिसतात. ते टाळून पुढे कसे जायचे हे त्याला समजते. पुढे शोध लागले, विज्ञानाने विलक्षण प्रगती केली. मग माणूस पुढील वाटचाल विज्ञानाच्या वेगवान वारूवर स्वार होऊन करू लागला. हा विज्ञानाचा वारू चौखुर उधळतोय, हे खरे आहे. पण या वारूला आत्मज्ञानाचा लगाम नसेल तर तो तसा उधळणारच. म्हणून.... 'विज्ञानाच्या घोड्याला आत्मज्ञानाचा लगाम घातला पाहिजे, तरच मनुष्य जीवनाची वाटचाल सुखकर होईल. विज्ञानाची कास धरा, अज्ञानाला दूर करा. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्य निवड.* मंगलसेन नावाचा राजा होता. त्याच्या दरबारात जगतराम नावाचा एक मंत्री होता . तो खूप म्हातारा झाला होता. एक दिवशी तो राजाला म्हणाला , महाराज मला आता सेवामुक्त वायचा आहे. असे त्यांनी विनंती केली. राजा म्हणाले , सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्यासारखे असणारे सेवाभावी, इमानदार आणि परोपकारी चे निवड करा, मंत्री जगतराम नी प्रत्येक गावा मध्ये दवंडी पिटवायला लावली. त्या दवंडी मध्ये ते म्हणाले," गुरुवारी राजमहल मध्ये मंत्री ची निवडणूक होणार आहे. सगळे तेथे उपस्थित राहिले पाहिजे. गुरुवार दिवस आला. निवडणुकीची वेळ अकरा वाजता होती. निवडणुकीच्या दिवशी अकरा वाजले. सगळेजण राजमहल मध्ये उपस्थित होते पण करमवीर आणि मंत्री जगतराम उपस्थित नव्हते. कारण जेव्हा मंत्री जगतराम चिखलाचा रस्त्यांनी येत होते तेव्हा त्यांच्या बैलगाडीचे एक चाक चिखलामध्ये फसला. ते खूप प्रयत्न करत होते पण त्यांच्याच बैलगाडीचे एक चाक निघतच नव्हता, तेव्हा करमवीर ला हे सगळे दृश्य दिसले. तेव्हा त्यांनी तो चाक आपल्या हाताने काढला. स्पेनचे पूर्ण वस्त्र खराब झाले होते. ते पळत पळतच राजमहल मध्ये गेले. सगळेजण त्यांच्याकडे पाहून हसत होते. कारण त्यांचे कपडे चिखलानी भरून गेले होते. पण राजा म्हणाले, मला माहित आहे की तुमचे कपडे का भरले. आणि म्हणून मी तुम्हाला माझ्या राज्याचा मंत्री बनवले. कारण तुम्ही एका म्हाताऱ्या व्यक्तीची मदत केली. आणि ते कोणी दुसरे नव्हते तर मंत्री जगत राज होते. आज पासून माझ्या राज्याचे मंत्री तुम्ही म्हणल्या जाईन. बोध: दुसऱ्याची मदत करणे आपले काम आहे त्यामुळे आपल्याला चांगले फळ मिळते .योग्य व्यक्तीची निवड केल्यास कार्य पारदर्शक आणि सुरळीत चालते.म्हणून चाचपणी करून योग्य निवड करावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/02/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय विज्ञान दिवस - भारत* 💥 ठळक घडामोडी :- ● २००२ - गुजरातमध्ये जातीय दंगली. ५५ मृत्यू. 💥 जन्म :- ● १९४७ - दिग्विजय सिंघ, भारतातील मध्यप्रदेश राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे नेते. ● १९४७ - विजय बहुगुणा, भारतातील उत्तराखंड राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ● १९५१ - करसन घावरी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९६९ - यू. श्रीनिवास, मेंडोलिन वादक, सप्टेंबर १३ २००३ रोजी त्यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला. ● १९७१ - परमजीत सिंघ, भारतीय खेळाडू, यांनी ४०० मीटर शर्यतीचा ३८ वर्षांचा मिल्खा सिंघ चा राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला. 💥 मृत्यू :- ● १९३६ - कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी. ● १९६३: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोल्हापूर : जुनी पेन्शन लागू करा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *यवतमाळ : जिल्हा परिषदेचे दोन कर्मचारी सेवेतून बडतर्फ. हेमंत निवल (विस्तार अधिकारी पंचायत) व महेश मंचलवार (ग्रामसेवक) अशी बडतर्फ कर्मचाऱ्यांची नावं आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सोलापूर जात पडताळणी समितीने भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय दिल्यानंतर आता आणखी एक वेगळीच माहिती समोर आली आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी आपला जातीचा दाखला हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. चालू मौसमातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान आहे ३८.४* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नागपूर येथील यशवंत स्टेडियममध्ये नवोत्साह 2020 शारीरिक प्रात्यक्षिक प्रदर्शन.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भीमा कोरेगावहिंसाचाराप्रकरणी दाखल ६४९ गुन्ह्यांपैकी ३४८ गुन्हे तर मराठा आरक्षण आंदोलनावेळी नोंदवलेल्या ५४८ गुन्ह्यांपैकी ४६० गुन्हे राज्य सरकारने घेतले मागे घेतले * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंड वर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला, या सामन्यात शेफालीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. शेफालीने सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ^श्रद्धा आणि अंधश्रद्धा* http://nasayeotikar.blogspot.com/2019/10/blog-post_31.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *।। माझा गणेश ।।* - सौ.आशा मदन तेलंगे ठाणे माझा गणेश येता घरी आनंद झाला मनी स्थानापन्न करण्यास त्यास सज्ज आम्ही मंडळी सारी दिव्यांची तोरणे बांधिली रांगोळ्या काढिल्या दारीं फुलांच्या सुंदर मखरात विराजमान तो पाटावरी पूजाअर्चा, अभिषेक, आरती सोपस्कार सारे नवस सायास करुनी देवास साकडे घालूया रे कुणी लहानथोर उचनीच भेदभाव नसे याच्या दारी विद्येचे दान हे मागा बाप्पासी मिळुनी सारे शाळकरी दीड,पाच, सात,दहा, दिवसांच्या मुक्कामानंतर निरोप देऊ बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर ये असे वचन दे आम्हाला *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" यशस्वी होण्यासाठी कार्यमग्नता ही मनुष्याच्या जीवनाची एक अटळ अशी अवस्था असते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आयोडीन या घटकाच्या अभावामुळे कोणता रोग होतो ?* गलगंड 2) *पक्ष्याचा राजा, विष्णूचे वाहन असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?* गरुड 3) *आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव कोणते ?* गागोदे , रायगड 4) *महाभारतातील अर्जुनाच्या धनुष्याचे नाव काय होते ?* गांडीव 5) *संत जनाबाईचे समाधीस्थळ कोणते ?* गंगाखेड, परभणी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ सुरेश येवतीकर, नांदेड 👤 चिं उत्कर्ष सुनील पल्लेवाद, नांदेड 👤 राजेश्वर भंडारे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 आनंद आनेमवाड, सहशिक्षक 👤 मारुती पाटील 👤 प्रशांत चिखलीकर, सहशिक्षक, लातूर 👤 शंकर गर्दसवार 👤 श्रीकांत आदमवाड, सहशिक्षक 👤 निर्मला सोनी, साहित्यिक, अमरावती 👤 मुरलीधर राजूरकर, सहशिक्षक *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्नेहाने वैर जात असेल तर उगीच युद्ध का करा आणि दूधसाखरेने रोग जात असेल, तर कडुनिंबाचा रस का घ्यावा असा संदेश देणारा एक श्र्लोक आहे. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीतून, गैरसमजातून झालेले भांडण विनाकारण लांबत जाते आणि मैत्रीचे रूपांतर वैरात होऊन जाते. गैरसमज किंवा मूळ कारण नाहीसे करण्याऐवजी उभय पक्षांकडून नवनवीन मुद्द्यांची भर पडत जाते आणि वैराचे झाड मोठे होते. इतके, की त्यात दोन्ही पक्ष नेस्तनाबूत होतात. संशयाला बळी पडणे ही सामान्य बाब असली, तरी संशय खरा मानून भांडण काढणे चांगले नाही.* *एक गोष्ट आहे. दोन सन्यासी मित्र असतात. मैत्री तब्बल तीस वर्षांची. एकमेकांच्या आनंदात न्हायले आणि दु:ख वाटून घेतले. दोघांत मिळून तीन मडकी होती. तेवढीच त्यांची संपत्ती. ती तिन्ही मडकी वाटून घ्यायचे ठरले. थोरल्या संन्याशाला मोठेपणा देण्यासाठी धाकटा म्हणाला,'तुम्ही दोन घ्या; मी एक घेतो.' मात्र त्यामुळे मोठा संतापला. म्हणाला,'मला काय भिकारी समजतोस ?' दोघांमध्ये यावरून कडाक्याचे भांडण झाले आणि त्याची परिणती तिन्ही मडके फुटण्यात झाली. म्हणून भांडण टाळायचा प्रयत्न व्हायला हवा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, आपण सहज एखाद्याविषयी बोलून जातो त्याच शेपूट नेहमी कुत्र्यासारख वाकडच असत. खर आहे आपण असे माणसाला त्याच्या स्वभावावरून आभूषण,अलंकार परिधान करून वर्णन करत असतो. एक कवी आपल्या श्लोकात वर्णन करताना म्हणतो, यश्च निंम्ब परशुता यश्चैनं मधुसर्पिषा याश्चैन गन्धमाल्याघै:सर्वस्य कटुरेव स: ।। काही जणांचे स्वभाव बदलत नाहीत हे एका दृष्टान्ताच्या आधारे स्पष्ट करतांना कवी म्हणतो, कडुलिंबाच्या झाडावर जो कुऱ्हाड चालवतो ,जो त्याच्या मुळाशी मद्य आणि तूप ओततो आणि जो गंध फुलमाळा वगैरेंनी त्यांची पूजा करतो त्या सगळ्यांनाच त्याच्या पानाफळाफुलांची चव कडूच लागते. हा श्लोक वाचल्यावर तुपात तळून साखरेत घोळल्यावरही आपल्या कडूपणाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कारल्याची आठवण येते. असे कडुलिंब आणि कारली बहुतेक सर्वांच्या संचिताचा भाग असतात शत्रू , मित्र , भक्त-सगळ्यांना एकाच तराजून तोलणारी ही मंडळी आपलं बाळकडू म्हातारपणापर्यंत जपतात. कडू रसाचा आविष्कार हाच त्यांच्या वांचिक आणि आंगिक अभिनयाचा ध्यास असतो. आयुष्य आनंदानं जगण्यासाठी आणि आनंद आजूबाजूला लुटण्यासाठी असतं, हे त्यांच्या गावीही नसत. कपाळावर आठयांचं जाळ आणि जिभेवर कडुलिंबाचा रस या थाटात त्यांचा सर्वत्र संचार असतो.कुणी साधं प्रामाणिकपणे जरी विचारले ,"काय म्हणता?" तरी काय म्हणू बोडकं? मेलो नाही अजून,जिवंत आहे. अस उत्तर देऊन बोलणाऱ्याचा हिरमुड करतात. जेवायला वाढू का? तरी त्यात काय विचारायचे?ही भाजी वाढू का? तरी मला शंभर प्रश्न विचारलेले आवडत नाही, काय वाढायचे ते मुकाट्याने वाढ.नाहीतर जेवण नको.इथपर्यंत बहाद्दरांची मजल जाते. म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.बदल हा निसर्ग नियम आहे,तो जो स्वीकारेल तो हा भावसागर तरुन जाईल. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा,अयोग्य दिशेने जाणारे पाऊल,आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते.तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वार्थ साधून वागणे* एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, ‘ते मांजर दिसले तर मारून टाकीन’ असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणार्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भिती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघूळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, ‘हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे.’ इतके बोलून तिने त्या वटवाघूळाला खाऊन टाकले. तात्पर्यः स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपल्या युक्तीने स्वतःचा फायदा करून घेतात.मग ते स्वतःच्या हितासाठी सर्व नियम गुंडाळून ठेवतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*गौरव मराठीचा* माय माझी मराठी मी तीच लेकरू किती करावी कौतुके माझ्या प्रेमळ मायेचे तिच्याच अंगा खांद्यावर मी वाढलो असे मराठी मायेच्या पदराखाली वाघिणीचे दूध असे तिच्या शब्दांचा रुबाब काय वाखानावा अक्षरा अक्षरात असे साखरेचा गोडवा दुसरी कुठलीच भाषा नाही इतुकी समृद्ध समास व्याकरण अलंकार यांनी नेहमी सज्ज कवी कुसुमाग्रज यांनी खूप नटविले या मायेला म्हणून मायेचा गौरव दिन त्यांच्या जन्म दिनाला । ~~~~~~~~~~~~~ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड.
*माय मराठीचा गोडवा* माऊलीची अवीट ज्ञानेश्वरी महाराष्ट्राच्या कणाकणात मराठमोळ्या मना मनात अन इथल्या साऱ्या साहित्यात तुकोबांच्या अभंगाची गोडी नामदेवांचे दोहे, नरहरी सोनार चोखोबा जनाईच्या ओव्या एकनाथी भारुड अन गौळणी आणिक कितीतरी हे संत महाराष्ट्र माझा संतांची भूमी माती इथली केली असे पावन ह्याच लहान थोर संतानी मनामनात पेरा गोड मराठी मनामनात रूजवा माझी महाराष्ट्राची भाषा मराठी आपुल्या तन मन अंतरंगात मराठी मराठी भाषेच्या उद्धारासाठी कित्येकांनी रचिल्या कथा ओवी अभंगातुनी गाऊनी गाथा अमृताहूंनही गोड जिंकून पैज मराठी भाषेचा हाअमुल्य साज ह्दयी दिप उजळूया श्वासाश्वासात जागूया माय मराठीची थोरवी सातासमुद्रापल्याड नेऊया जाऊनी मायबोलीला शरण गाऊनी मराठीची थोरवी शमवून तृष्णा विद्यार्जनाची जपती संस्कृती साहित्याची, काव्यवैभवाची अन् माधुर्याची मातीमातीतुनी उगवावी फुलाफुलातुनी फुलवावी मेघामेघातुनी बरसवावी ज्ञानकण वेचूनी माझी माय मराठी माय मराठी रूजवूया अभिमान मातृभूमिचा व्यथा,कथा,काव्य साहित्याचा उजळूया दाहीदिशा तुझ्या किर्तीचा शौर्याचा गाथांचा ध्येयपूर्ती अन् प्रगतीचा. 〰〰〰〰〰〰〰 ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. (ता.हदगाव जिल्हा नांदेड).
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/02/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक मराठी भाषा गौरव दिवस* 💥 ठळक घडामोडी :- ● २००२ - गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा सूड म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,००० हून अधिक व्यक्तींचे प्राण गेले. 💥 जन्म :- ● १९१२ - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. 💥 मृत्यू :- ● १८८७ - आनंदीबाई गोपाळराव जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. ● १९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यातील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचे विधेयक विधानपरिषदमध्ये मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अनियमितता आणि तक्रारीमुळे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले निर्देश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्रातल्या मोदी सरकारने घेतला आहे. अखेर कांद्यावरची निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. अमित शहांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली त्यानंतर रामविलास पासवान यांनी कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्याचा निर्णय जाहीर केलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोरोना व्हायरसचा कापूस उत्पादकांना मोठा फटका, कवडीमोल भावात कापसाची विक्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शहीद कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत तर हिंसाचारातील मृतकांना दोन लाखांची मदत : अरविंद केजरीवाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *रशियाच्या मारिया शारापोव्हाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसस्थानकांवर आज विशेष उपक्रम राबवला जाणार, संपूर्ण बसस्थानक आणि त्याचा परिसर स्वच्छ, सुशोभित करून आकर्षकरित्या रांगोळी काढण्यात येणार अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मराठी भाषा गौरव दिन* https://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_22.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मराठी भाषा गौरव दिन *।। आम्ही मराठी ।।* - नासा येवतीकर, ९४२३६२५७६९ आम्ही ऐकतो मराठी आम्ही बोलतो मराठी आम्ही वाचतो मराठी आम्ही लिहितो मराठी मराठी आमची मातृभाषा मराठी आमची बोलीभाषा मराठी आमची ज्ञानभाषा मराठी आमची राजभाषा मराठी आहे आमची शान मराठीचा जगात मान मराठीचा आम्हां अभिमान मराठी हेच आमचे स्वाभिमान तुकारामांची गाथा मराठी एकनाथांची भारुडे मराठी बहिणाबाईची कवने मराठी शाहिरांचा पोवाडा मराठी मनामनात दिसे मराठी घराघरांत बोले मराठी क्षणाक्षणात भेटे मराठी प्रत्येकांच्या हृदयात मराठी आम्ही मराठी तुम्ही मराठी आपण सर्वचजण मराठी *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कंजूष म्हणजे तो व्यक्ती, जो श्रीमंत म्हणून मरण्यासाठी आयुष्यभर गरिबीत जगतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मुळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते ?* ग्रीनिच 2) *पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर कोणता ?* ग्रामपंचायत 3) *शिखांचा पवित्र आद्यग्रंथ कोणता ?* गुरुग्रंथ साहेब 4) *हवेला वजन असते हे कोणी सिद्ध केले ?* गॅलिलिओ 5) *भारताची राष्ट्रीय नदी कोणती ?* गंगा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर मुटे, वर्धा 👤 श्यामल पाटील 👤 साई पांचाळ *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस शरीराने थकतो कारण शरीर काळाशी बांधलेले असते. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल. मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्विकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे. त्यामुळे बदलांचा हसतमुखाने स्विकार करा. स्वत:ला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.* *विन्स्टन चर्चिल म्हणतात, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तिला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.. प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टीकोन ही किरकोळ बाब वाटते. 'सकारात्मक दृष्टीकोन' हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टीकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,'जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दु:खी करू शकत नाही. तेव्हा आनंदी रहा... यशासाठी मधला मार्ग नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍂🍂🍂🍂🍂🍂 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, पाण्याची सतत धार एखाद्या कठीणातल्या कठीण खडकावर पडत राहिली तर त्यालाही नक्की फोडून काढते हा निसर्ग नियम आहे.ज्याच्या आयुष्यात या नियमाने शिरकाव केला तो जगप्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. काल एका महान कादंबरीकाराचा जन्म झाला त्या निमित्ताने सामान्य माणसाची लेखणी योग्य वयात आणि योग्य दिशेने वाटचाल करीत राहिली तर चमत्कार घडतो यासाठी त्यांचा किंचितसा मागोवा. २६ फेब्रुवारी १८०२ रोजी बेझान्सोनमध्ये जन्मलेला व्हिक्टर ह्युगो हा फ्रान्सचा श्रेष्ठ कवी, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध आहे. वयाच्या विसाव्या वर्षी त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. तसेच, वयाच्या तेविसाव्या वर्षी ‘हान्स ऑफ आईसलँड’ ही त्याची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. त्या काळातल्या त्याच्या कवितांवर रोमँटिसिझमचा प्रभाव होता. त्याच्या ‘क्रॉमवेल’ या संगीतिकेतूनही त्याचा प्रत्यय येतो.नोत्र-दाम-द-पारी (इंग्लिश ‘हंचबॅक ऑफ नोत्र-दाम’) या कादंबरीने तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. ११व्या लुईच्या राजवटीतल्या पॅरिसमध्ये घडणारं हे कथानक. क्वाझीमोदो या कुबड्याची आणि ईझ्मेराल्दा या जिप्सी सुंदरीची ही कहाणी चांगलीच लोकप्रिय ठरली आणि त्याची अनेक भाषांत भाषांतरं झाली. पुढे त्यावर अनेकांनी सिनेमे काढले. चार्ल्स लॉटन आणि मॉरीन ओ-हाराचा १९३९ साली आलेला सिनेमा लक्षणीय होता. ह्युगोने दरम्यान अनेक नाटकं लिहिली. दी किंग्स’ फूल हे त्या वेळचं त्याचं एक गाजलेलं नाटक! १८६२ साली प्रसिद्ध झालेली ‘लेस मिझराब्ल’ ही त्याची पुढची कादंबरी पुन्हा एकदा त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करून गेली.१९व्या शतकातल्या फ्रान्समधल्या गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर घडणारं हे कथानक. १९ वर्षं तुरुंगात काढून सुटून बाहेर आलेला जिआन वेल्जो पुढे एक मोठा उद्योगपती बनतो; पण त्याला जुन्या गुन्ह्याचं भूत सतावत असतं. तशात जावर्ट हा पोलीस इन्स्पेक्टर त्याच्या मागावर असतो. अखेर आपल्या मानलेल्या मुलीच्या म्हणजेच कोसेटच्या भल्यासाठी तो पोलिसांना शरण जातो, असं थोडक्यात कथासूत्र. यातली त्या काळाची वर्णनं भन्नाट होती. याही कादंबरीवर जगभर नाटकं आणि सिनेमे बनले. २२ मे १८८५ रोजी त्याचा पॅरिसमध्ये मृत्यू झाला. सलाम व्हिक्टर ह्युगो अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता* मदन आणि संजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. मदन मन लावून शिकायचा पण संजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना संजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण मदन मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता.पण संजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,”हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस.” आता संजय घाबरला. कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते. संजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून मदनने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली. इतकेच नाही तर संजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून संजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला. तात्पर्य- लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते. तसेच होणारे नुकसान टाळता येते.कामात एकाग्रता असेल तर सर्व व्यवस्थित होते. वर्तमानपत्रातून संग्रहित. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/02/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुक्ती दिन - कुवैत* 💥 ठळक घडामोडी :- ● १९२७- ख्रिस्ती धर्मातील गोवेकरांनी हिंदूधर्मात प्रवेश करणाच्या मोहिमेचा प्रारंभ केला ● १९७६- मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांनी मिळाला ● १९९५ - युनायटेड किंग्डमची सगळ्या जुनी गुंतवणुक बँक बेरिंग्स बँक कोसळली. काही दिवसांपूर्वी बँकेच्या एक अधिकारी निक लीसनने १.४ अब्ज डॉलरच्या पैजा हरल्यामुळे बँकेवर ही पाळी आली. 💥 जन्म :- ● १८६१ - फर्डिनांड, बल्गेरियाचा राजा. ● १८६१ - नादेझ्दा कॉन्स्तान्तिनोव्ह्ना कृप्स्काया, रशियन क्रांतीकारी, व्लादिमिर लेनिनची पत्नी. 💥 मृत्यू:- ● १९६६ - विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारी, मराठी लेखक, कवि. ● २००४ - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी तर रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. य़ा नियुक्त्या ठाकरे सरकारने केल्या रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी भूषण धर्माधिकारी यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *'दिशा' कायद्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत ; 10 दिवसात कायद्याचा मसुदा सादर करणार ; सूचना पाठवण्याचे गृहमंत्री सतेज पाटील यांचे लोकांना आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतूनच होणार, विधानसभेत विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची निर्णयावर टीका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *दिल्लीतल्या हिंसाचाराची केंद्राकडून गंभीर दखल, गृहमंत्री अमित शाह आणि अरविंद केजरीवाल यांच्यात बैठक, तर मौजपूरमध्ये दगडफेक आणि जाळपोळीत आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवा, डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानला सज्जड दम, तर तीन अब्ज डॉलर संरक्षण करारासह भारत-अमेरिकेत विविध करारांवर स्वाक्षऱ्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कल्याण क्रीडा महोत्सवातील स्केटिंग स्पर्धेत संतोष अॅकॅडमीचा डंका; 18 सुवर्णपदकांसह विजेतेपदाचा मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक पाऊल स्वच्छतेसाठी* http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_25.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुंदर माझे गाव* - श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे, हदगाव ( काव्यप्रेमी शिक्षकमंच जिल्हाअध्यक्षा नांदेड ) नयनरम्य गर्द हिरवी कोवळी फुटली पालवी पर्वतावर घनदाट झाडी वळणावरून जाते गाडी रस्ते आहेत झाडातले हिरव्यागच्च पहाडातले झरे पाण्याचे दिसती चोहीकडे वाहत जाती पसरे हिरवळ मखमली धरणी जणू शाल पांघरली तेथे सुंदर माझे गाव पंचक्रोशीत त्याचे नाव तेथून प्रवास करती प्रवाशी लाल एसटी हवीहवीशी दाट झाडातून गाडी पळती सारेच कसे सुंदर दिसती 〰〰〰〰〰〰〰 *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *न रुचणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढला श्वास घेता येत नाही...!* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?* चार्ल्स डार्विन 2) *अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ कोणते ?* चोंडी , अहमदनगर 3) *हवामहल कोणत्या शहरात आहे ?* जयपूर 4) *सक्तीची पहिली शिक्षणाची शाळा शाहू महाराजांनी कोठे काढली ?* चिपरीपेटा 5) *महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू कोण ?* गोपालकृष्ण गोखले *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सौ.विद्या पाटील, उपशिक्षिका, नांदगाव अध्यक्षा जायंट्स सहेली ग्रुप, नाशिक 👤 सौ.पारसेवार पी. एस. सहशिक्षिका जि.प.प्रा.शा. देवणेवाडी ता. लोहा 👤 शैलेश फडसे, मुख्याधिकारी 👤 घनश्याम बोरहाडे, साहित्यिक 👤 प्रदीप तळणीकर,पत्रकार, दै.सकाळ 👤 विलासराज भद्रे, साहित्यिक, नांदेड 👤 निलेश जोंधळे 👤 योगेश दरबस्तवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विज्ञानाचा शोध लागला, अंधारवाटा उजळल्या. बंदुकीचा शोध लागला, संरक्षणाचे साधन उपलब्ध झाले. रेडिओच्या शोधाने दूरपर्यंत संपर्क होऊ लागला. टेलिफोनच्या शोधाने हजारो मैलांपर्यत संवाद सुरू झाले. 'ज्ञान' हा मनुष्याचा डोळा आहे. ती त्याची दृष्टी आहे. तिने त्याला वाटेतील खाचखळगे दिसतात, काटेकुटे दिसतात. ते टाळून पुढे कसे जायचे हे त्याला समजते.* *पुढे शोध लागले, विज्ञानाने विलक्षण प्रगती केली. मग माणूस पुढील वाटचाल विज्ञानाच्या वेगवान वारूवर स्वार होऊन करू लागला. हा विज्ञानाचा वारू चौखुर उधळतोय, हे खरे आहे. पण या वारूला आत्मज्ञानाचा लगाम नसेल तर तो तसा उधळणारच. म्हणून....* *'विज्ञानाच्या घोड्याला आत्मज्ञानाचा लगाम घातला पाहिजे, तरच मनुष्य जीवनाची वाटचाल सुखकर होईल."* ♻ *॥ रामकृष्णहरी ॥* ♻ 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, संकटे रडणाऱ्याला भीक घालत नाहीत तर ती लढणाऱ्याला भिऊन पळून जातात अस म्हटल्या जात,ते अगदी खरे आहे.कधीच म्हणू नये दिवस आपले खराब आहेत, ठणकून सांगावे,काट्यांनी वेढलेला मी पण गुलाब आहे.आपण ईश्वरापाशी 'संकटे येऊ नयेत' अशी प्रार्थना करतो. संकटे माणसाला माणसासारखे वागायला लावतात. माणसे संकटातच परमेश्वराची आठवण काढतात. तेंव्हा अहंकार गळून पडतो. माणसे नम्रतेने, प्रामाणिकपणे वागू लागतात. आपल्या चूका शोधू लागतात. संकटेच सामर्थ्य वाढवीत असतात. प्रगती घडवीत असतात. आपण अडचणीत असताना सभोवतालच्या माणसाची खरी पारख होते. अडचणींमध्ये कुणी साथ दिली, साथ सोडून कोण गेले आणि अडचणीत कोणी आणले हेही कळते. त्यामुळे आपण हुशार बनतो, निर्भय बनतो, अनुभवी बनतो. जीवन यशस्वी करण्यास समर्थ होतो. संकटांमुळेच पाय जमिनीवर राहतात. *जगात जे नवीन शोध लागले त्यापैकी बहुतेक अडचणींमुळेच लागले. 'गरज ही शोधाची जननी आहे' असे आपण म्हणतो ते खरे आहे. कोणतीही परिस्थिती स्विकारण्याची मानसिक तयारी हवी. प्रतिकूलतेवर मात करून ते बदलण्याचे सामर्थ्य आपल्याकडे हवे. जगताना कोंडी, प्रश्न, अडचणी आणि संकटे आहेत म्हणूनच जीवन जगण्यात मजा आहे. पत्त्यांच्या खेळात हुकूमाची पाने हातात नसताना डाव जिंकणे आधिक आनंददायी असते. अंधारामुळे प्रकाशाचे खरे महत्व कळते. गरिबीमुळेच पैशाचे मूल्य समजते. दु:खामुळे सुखाची गोडी समजते. पराभवामुळे विजयाचा खरा आनंद समजतो. माणसाने पराभवही उत्सवासारखा साजरा करावा, कारण पराभवातून माणूस शिकतो. म्हणून पेला अर्धा भरला आहे असही म्हणता येत आणि पेला अर्धा सरला आहे असही म्हणता येत,काय म्हणायचे ते आपल्यावर असते. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पक्षी जेव्हा आकाशाकडे झेप घेतात आणि आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात तेव्हा त्यांची सारी दृष्टी खाली असलेल्या जमिनीकडेच असते. ते कधीच आकाशाकडे पाहत नाहीत. त्याचप्रमाणे कितीही आणि कोणतीही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने उच्च पदावर जाऊन पोहचली तरी त्यांची सारी दृष्टी सर्वसामान्यपणे जीवन जगणा-या माणसाकडेच असते. कारण त्यांच्या जीवनातला असलेला अंधःकार कशापध्दतीने दूर करता येईल याचा ती सतत विचार करत असते.अशीच व्यक्ती समाजाच्या दृष्टीकोनातून महान म्हणून ओळखली जाते.अशाच व्यक्ती उच्च पदावर जातात आणि नावलौकीकास पात्र ठरतात.त्यांना कधीच गर्वाने स्पर्श केलेला नसतो हे मात्र खरे आहे. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.9421839590/ 8087917063. 🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अहंकाराचे बीज* एक गाय गवत चरायला जंगलात जाते. संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की, एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे. ती भीतीने इकडे तिकडे पळू लागली. वाघ सुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला. धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली.. वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला. त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे ,मात्र चिखल जास्त आहे. त्या दोघांमधील अंतर तसे कमी होते परंतु ते दोघेही काही करू शकत नव्हते. गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्यात रुतायला लागला होता. दोघेही अगदी गळ्यापर्यंत रुतलेली होती. दोघेही हलू शकत नव्हते. थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले, तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का ? वाघ घुश्यात म्हणाला , मी तर या जंगलाचा राजा आहे; माझा कोणी मालक नाही; मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली ,परंतु तुझी शक्ती तुला याक्षणी काहीच उपयोगाची नाही. वाघ गायीला म्हणाला की, तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत की . तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही माझा मालक मला संध्याकाळ झाली अजून आली नाही म्हणून शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल. थोड्या वेळाने खरंच एक माणूस आला आणि गायीला चिखलातून बाहेर काढून घरी घेऊन गेला. जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने पहात होते, त्यांच्या मनात असून सुद्धा ते वाघाला बाहेर काढू शकत नाही कारण त्यांच्या जीवाला धोका होता. आता या कथेतून बोध हा आहे की, गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे. वाघ हे आपले अहंकारी मन आहे. मालक हे ईश्वराचे प्रतीक आहे ,तर चिखल हा संसार आहे आणि संघर्ष ही अस्तित्वाची लढाई आहे. कोणावर निर्भर असणे चांगली गोष्ट नाही ,परंतु मीच श्रेष्ठ आहे, मला कोणाची मदतीची गरज नाही, हाच अहंकार विनाशाचे बीज रोवते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/02/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १५६८- सम्राट अकबर बादशहाने रजपुतांचा प्रचंड पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला. ● १९८८- संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी ● २००६ - या दिवशी जगाची लोकसंख्या अंदाजे ६.५ अब्ज झाली. 💥 जन्म :- ● १८९४ - मेहेर बाबा, भारतीय तत्त्वज्ञ. ● १९४८ - डॅनी डेंझोग्पा, हिंदी चित्रपटअभिनेता. ● १९८१ - शाहिद कपूर, हिंदी चित्रपटअभिनेता. 💥 मृत्यू :- ● भगवंत भक्त संत एकनाथानी पैठण येथे आजच्या दिवशी समाधी ● १८८६- गुजराथी कवी नर्मदाशंकर दवे यांचे निधन ● हुतात्मा किसन आहिर व नानकसिंग पुण्यतिथी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, यात 68 गावांतील 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी येत्या एप्रिल अखेर होणार पूर्ण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : राज्यातील खाजगी शिक्षण संस्थामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये व संबधित शिक्षण संस्थामध्ये शाळेच्या शुल्कावरून वारंवार वाद निर्माण होत असतात. त्यासाठी आता राज्यात 8 ठिकाणी शुल्क नियामक समित्या स्थापन करण्यास शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तातडीने दिली मान्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिका कटिबद्ध, डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताला सहकार्य करण्याचं आश्वासन, तर आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचं केलं वक्तव्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दाम्पत्याची ताजमहल व साबरमती आश्रमाला भेट, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून चरखा चालवण्याचे धडे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला वादळी सुरुवात, शेतकरी, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक, सरकारकडूनही विरोधकांवर टीकास्त्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वेलिंग्टन कसोटीत यजमान न्यूझीलंडचा भारतावर दहा गडी राखून दणदणीत विजय, न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधील शंभरावा विजय * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियातल्या महिला टी ट्वेन्टी विश्वचषकात सलग दुसऱ्या विजयाची केली नोंद, या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 18 धावांनी केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बुडती हे जन देखवे न डोळा* http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/35.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सफर जंगलाची.....* - स्नेहलता कुलथे बीड या झाडांच्या फांद्यावरूनी सैर करू या जंगलाची चला काऊनो आज घेऊ या भेट जंगलाच्या राजाची......1 वाघ राजा घेऊन बसले सभा सर्वच प्राण्यांची करतो कोल्हा कुई कुई अन् कोकिळा गोड स्वरांची.....2 पिसारा फुलवून मोर नाचे थुईथुई सोबत लांडोराची डौल हत्तीचा भारी बाबा पाठीवर स्वारी मनीमाऊची......3 उंचच उंच मान बघा ती पट्टेवाले भाऊ जिराफाची चपळ पहा तो किती राजस चाल शिवबाच्या घोड्याची.....4 गाऊ नाचु आनंदाने सफर झाली जंगलाची प्राणी पक्षी एक राहती शिकवण देती समतेची......5 ******************** *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" नियमापेक्षा तत्त्वे ही अतिशय पवित्र असतात."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू कोणता ?* जीभ 2) *भारतीय नाणी शास्त्राचे जनक कोण ?* जेम्स प्रिन्सेप 3) *रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला ?* जॉन गॅरी 4) *अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण ?* जॉर्ज वॉशिंग्टन 5) *संत एकनाथाचे गुरू कोण होते ?* जनार्धनस्वामी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साई डिब्बेवाड, सहशिक्षक 👤 योगेश राजेश पापनवार 👤 बालाजी आगोड 👤 प्रदीप वल्लेमवाड 👤 नईम सय्यद 👤 अनुराग आठवले बारडकर 👤 दिलीप वाघमारे 👤 बालाजी चिंतावार 👤 प्रदीप पद्मावार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याला काही अर्थच उरला नाही. रोज उगवणा-या दिवसाच्या गर्भातून निराशाच निपजते का ? की आम्ही जगण्याच्या आकाक्षांना गोठवून टाकले आहे ? सगळं काही जवळ आहे, तरी ही निरर्थकता कोठून व का येते, याची उकलच होत नाही. खोल..आत..अगदी ह्रदयापाशी काहीतरी रूतुन बसतं आणि वाहात राहतं अश्वत्थाम्याच्या भाळी असणा-या जखमेसारखं. त्याला तर म्हणे शापच आहे अमरत्वाचा. ही भळभळणारी जखम घेऊन जगण्याचा... देहदंडापेक्षाही भयावह.* *पण, आम्ही का बरं निरंतर ठेवतो त्याला प्रवाहित? कदाचित, ही एक अवस्था असेल मानवी जगण्याची. का आहे प्रश्नांची न संपणारी मालिका अनुत्तरित. इथून सुरू होतो आत्मशोधाचा प्रवास. सत्य सापडत नाही...काय होत राहतं? कळत नाही. पण जगात असेही अनेक असतात की जे हा चक्रव्यूह भेदून उभे राहतात समरवीरासारखे....!!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, *अभ्यासात प्राप्यते दृष्टि:* *कर्मसिद्धि प्रकाशिनी।* *रत्नादि-सद्-असद्-ज्ञानाम्* *शास्राद एवं न जायते ।।* माहिती आणि ज्ञान या दोन गोष्टी अतिशय भिन्न आहेत. या दोन्हींमध्ये एक ठराविक अंतर आहे. द्राक्षे गोड असतात. हे विधान आपल्याला द्राक्षाच्या चवीबद्दल माहिती देते. पण ते चवीचे ज्ञान देऊ शकत नाही. त्यासाठी द्राक्ष प्रत्यक्ष चाखावी लागतील. त्यानंतर जी अनुभूती मिळते ती म्हणजेच ज्ञान होय. सरावाने हे ज्ञान पक्व होत असते. व्यवसायाचे पण असेच असते, ते अनुभवातूनच मिळत असते. बुद्धिवान व्यक्ती नवनव्या शोधातून त्याच्या कक्षा रुंदावत असतो. पाठांतर पंडितांना वाटते की ,आपण वाचलेली अथवा पाठ केलेली अक्षरें, म्हणजे ज्ञान होय. या लोकांच्या पोपटपंचीला ही भूललेले लोक त्यांना ग्रेट समजायला लागतात. स्वतःला मागे असल्याची भावना त्यांच्या मनात येते. कोणत्याही कर्मामध्ये सिद्धी प्राप्त करून देणारी दृष्टी ही अभ्यासातून म्हणजेच ते काम पुन्हा पुन्हा करण्यातून येते. रत्नाची पारख करायची असेल तर ती रत्ने अनेकदा हाताळावी लागतात. फक्त पुस्तके वाचून ती सांगता येणार नाही. म्हणूनच जुने लोक कधी कधी त्यागाने शब्द उच्चारतात, की उगीच उन्हाने पांढरे नाहीत झाले. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात घड्याळाकडे पाहून काम करणारे लोक पुष्कळ आहेत. फक्त त्यांना वेळ घालवायचा असतो. मग ते काम कसेही का होईना असा एवढाच विचार त्यांच्या डोळ्यासमोर असतो. असा विचार करणा-या माणसांच्या कामात चांगला दर्जा कसा येईल..? अशी माणसे वेळ कसा घालवावा आणि कसेतरी काम करुन मोकळे व्हावे हाच विचार करतात. अशा माणसाकडून चांगल्या दर्जाची कामे होतील अशी अपेक्षाही करणे चूकीचे आहे. उलट जी माणसे हाती घेतलेल्या कामात पूर्ण लक्ष घालून काम चांगले आणि उत्कृष्टरित्या पार पाडतात. ते कधीच घड्याळाकडे लक्ष देत नाहीत. त्यांचे सारे लक्ष कामातच गुंतलेले असते. त्यांनी हाती घेतलेल्या कामातच त्यांची एकाग्रता असते. माणसाने कोणत्याही हाती घेतलेल्या कामात जीव ओतून काम केले तर त्यात त्यांना चांगल्याप्रकारे यश मिळते. ज्याने घड्याळाकडे पाहून काम करत राहिले तर ते काम निकृष्ट तर होईलच आणि त्या कामातला दर्जाही निकृष्टच राहणार यात शंकाच नाही. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.9421839590. 🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विचारपूर्वक कृती* एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल". मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत." *उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/02/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मध्यवर्ती उत्पादन शुल्क दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● १९३६- क्षयरोग निवारण दिन ● २००६ - फिलिपाईन्समध्ये लश्कर उठाव करणार असल्याची कुणकुण लागल्याने राष्ट्राध्यक्ष ग्लोरिया मॅकापगाल-अरोयोने देशात आणीबाणी लागू केली. 💥 जन्म :- ● १४८३- बाबर यांचा जन्म ● १९५५ - स्टीव जॉब्स, ॲपल कम्प्युटर्सचा संस्थापक. 💥 मृत्यू :- ● १९२५ - ह्यालमार ब्रँटिंग, स्वीडनचा पंतप्रधान. ● १९७५ - निकोलाइ बुल्गॅनिन, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष. ● १९९८- मराठी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, येत्या तीन महिन्यात ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *लोअर परळमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांना म्हाडाकडून घरे मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकासआघाडीची बैठक, तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *धोबी, परीट समाजाचा अनुसूचित जातींमध्ये सहभाग होऊ नये यासाठी मंत्रालयातील काही शासकीय अधिकारी अन् काही माजी मंत्र्यांनी प्रयत्न केला, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, 26 फेब्रुवारीला मुंबईत सुंबराण आंदोलनाची हाक, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यासाठी सहकुटुंब रवाना, डोनाल्ड ट्रम्प हे 36 तासांसाठी भारत दौऱ्यावर येत आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या राज्यातील 63 क्रीडारत्नांचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं गौरव, पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती, पंढरीनाथ पठारे, रिशांक देवाडिगाला शिवछत्रपती पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कागदाची बचत* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/03.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चला जावूया शाळेत* अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२ चला जावूया शाळेत मिळवूया ज्ञानज्योत शाळा आपुली चांगली ज्ञानछंद मला लावली शाळा चांगली दुपारची नसेल घाई उठण्याची चार भिंतीत मिळे ज्ञान तिथे कळतो सर्व विज्ञान लक्ष देवूनी ऐकण्याचा ठेवा आहे हा ज्ञानियेचा करु अभ्यासाचा चंग वाटेल प्रयागाचा संगम तेंव्हा नका राहू घरात चला जावूया शाळेत *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" दोन अपूर्ण माणसांना एकमेकांना पुर्ण करण्याची जी विलक्षण तळमळ लागते तिचेच नाव प्रीती."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *शरीराचे तापमान मोजण्याचे उपकरण कोणते ?* ज्वरमापी 2) *डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते ?* झिप 3) *जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?* जिनिव्हा 4) *कोणत्या प्राण्यांच्या पिलांना जन्मतः च शिंग असतात ?* जिराफ 5) *पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्तर कोणता ?* जिल्हा परिषद *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरेश जे. वाघ, सहशिक्षक, वर्धा *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जिथे काही उगवत नाही, झाडा झुडुपांशिवाय काही असत नाही, तिथे एरंडाचे झाडच वृक्ष मानले जाते. वास्तविक एरंड कधी पिंपळ, वड, औदुंबर अशा वृक्षांची बरोबरी करेल का ? तुकोबांनी म्हटले आहे, 'उंच वाढला एरंड, तरी का होई इक्षुदंड.' कितीही उंच वाढला तरी एरंड कधी उसाची बरोबरी करू शकणार नाही. एरंड हे एक अतिसामान्य झाड, त्याची पाने गाढवही खात नाही म्हणे.* *परंतु अशा झाडालाही कधी कधी आपल्या एखाद दुस-या चकचकीत हिरव्या पानांचा गर्व होतो. क्षुद्र व्यक्तीलाही असा गर्व होतो, की आपण जणू महान आहोत.* *एरंडालाही आपण महावृक्ष असल्याचे वाटते. महावृक्ष केव्हाही थोरच. घनदाट शितल छाया, डेरेदार विस्तार, पशुपक्षी यांचे विसाव्याचे ठिकाण. ऋतुमानाप्रमाणे निरंतर येणारा बहर ही त्यांची श्रीमंती आणि वैभव. वृक्ष कुलातील हे ऋषीमुनी कुठे नि एरंड कुठे?* *"जिथे काही उगवत नाही तिथे 'एरंड'लाच वृक्ष मानावे लागते हे दुर्दैव."* 🌴🌱 *॥ रामकृष्णहरी ॥*🌱🌴 🍂🍂🍂🍂🍂🍂 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, मन पाखरू पाखरू त्याला किती मी आवरू, बहिणाबाई म्हणतात ,मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी देण्यासाठी तळ्यावर आलेला श्रावण, दशरथाच्या बाणाला बळी पडला आणि पुत्रविरहाचा शाप मिळण्यास कारण ठरला. सिकंदर आणि नेपोलियन यांची जग जिंकण्याची 'तहान' अनेक युद्धांना सामोरी गेली आणि कित्येक राजे शरण जाऊन कफल्लक झाले. तहानलेले 'हरिण' वा 'पाडस' ही व्याघ्राची पोटापाण्याची सोय आहे. सत्तेची 'तहान'ही अशीच, त्यात महत्वकांक्षा मिसळली की व्याकूळ होते आणि सत्तापिपासू बनते. म्हणजे तहानेने विकृत रूप धारण केले की ती केवळ तहान न राहता 'जीवो जीवस्य जीवनम्' या तत्वाने तहानलेल्याला समोर दिसेल ते ग्रहण करण्याचे व्यसन लागते. अशावेळी चित्तवृत्ती बेभान होतात, ताळतंत्र सुटतो व विवेक संपून दुष्कृत्य घडते. तृष्णा' म्हणजे 'तहान'च आणि 'तहान' पाण्याशिवाय पूर्ण होत नाही. ही साधी तहान जेव्हा 'तृष्णा' होते तेव्हा तिच्यातले विविध पैलू दिसू लागतात. तहानेत असलेले आसुसलेपण मात्र स्वतंत्र असते, केव्हा एकदाचे 'पाणी' मिळते, अशी अवस्था होते. ही अवस्था 'तृष्णे'मधून येते. तेव्हाही आसुसलेपण येऊन इच्छापूर्ती न झाल्यास बुद्धी किंवा मनाचा आधार घेतला जातो. मनाच्या आहारी गेल्यास महत्वाकांक्षा भरकटते व तृष्णा भीषण रूप धारण करते .म्हणूनच मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मुळात निसर्गतः आपल्याला शारीरिक सौंदर्य जे काही लाभलेले आहे त्यात आपल्याला काही बदल करता येत नाही.कुणाला कसे तर कुणाला कसे शारीरिक सौदर्य दिले आहे.पण ज्यांना काही अप्रतिम,लावण्यरुपी सौंदर्य लाभले आहे त्याने त्याचा गर्वही करु नये आणि इतरांना लाभलेल्या सौंदर्याशी तुलनाही करु नये.त्याने इतरांना लाभलेल्या सौंदर्याची अवहेलनाही करु नये.ज्यांना जे काही कमी जास्त प्रमाणात सौंदर्य मिळाले आहे त्याच्याबद्दलही आपण नाराज होऊ नये.जे आहे ते आपण आनंदाने स्वीकारुन आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी राहावे.इतरांची आपल्यासोबत तुलना करुन स्वतः आपले आपण अपमानीत न होता आपल्या सौंदर्यांचा आदर करावा. आपल्याला जे काही दिले त्यात विधात्याचे आभारच मानायला हवे हे कधीही विसरु नये. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.9421839590. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकतेचे बळ* एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’ पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते. ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’ जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले. ‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’ सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली. हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला. एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’ ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो. शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात. *तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/02/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वातंत्र्य दिन - सेंट लुशिया* 💥 ठळक घडामोडी :- ● २००२ - एम.एच.४७-ई जातीचे हेलिकॉप्टर फिलिपाईन्सजवळ समुद्रात कोसळले. १० ठार. 💥 जन्म :- ● १९६३ - विजय सिंग, फिजीचा गोल्फ खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९२१ - सलीम अल-मुबारक अल-सबाह, कुवैतचा अमीर. ● १९४४ - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी. ● २००९ - डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सोलापूर-वैराग मार्गावरील राळेरास ते शेळगाव दरम्यान एसटी आणि क्रूजर गाडीचा भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू तर, सहा जण जखमी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी महिला डॉक्टरांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, तर तिन्ही आरोपींना हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश देण्यास नायर रूग्णालय प्रशासनाचा नकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हायरल, उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता, आदिवासी विभाग प्रशासन तक्रार करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीसोबत मुलगी इवांका ट्रम्पही पतीसह भारत दौऱ्यावर; इवांका ट्रम्पचा हा दुसरा भारत दौरा, 2017 मध्ये हैदराबादमधील ग्लोबल बिजनेस समिट सहभाग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *काल महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्साह, राज्यातील ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरात भाविकांची गर्दी, हर हर महादेवचा गजर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भोपाळः मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ सरकारने वादग्रस्त नसबंदीचे सर्क्युलर मागे घेतले आहे. आरोग्यमंत्री तुलसी सहलावत आणि मंत्री पी. सी. शर्मा यांनी नसबंदीचा आदेश मागे घेतल्याचं सांगितलं. आदेशाचा अभ्यास केला जाईल, असं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय महिलांची विजयी सलामी, गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी उडवला धुव्वा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दृष्टी तशी सृष्टी* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/30.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माझी शाळा* - शुभांगी विलास पवार, (कंदी पेढा), नागठाणे-ता.जि.सातारा माझी शाळा, खूप भारी, गंमत गाणी, गाती सारी....!! शाळेत माझ्या, सवंगडी खूप, मिळून खातो, साखर-तूप .....!! गुरुजी शिकवती, गिरवायला अक्षरे, मध्येच विचारती, आहे का लक्ष रे.....!! घंटेचा टोला, टणटण करतो, चला लवकर, असे सांगतो.....!! गंमत गोष्टी, अंकांचे पाढे, एका सुरात, आवाज वाढे......!! मधली सुट्टी, मित्राशी गट्टी, चिंचगोळी देऊन, करायची बट्टी.......!! शाळा माझी, अशी मस्त, दिवस पटकन, होतो फस्त.......!! किती किती सांगू, शाळेची गंमत, मित्रांची जोडी, आणते खूप रंगत....!! *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चूक त्यांच्या हातूनच होते जे जबाबदारी घेऊन काम करतात..बिनाकामाच्या लोकांचे जीवन तर दुसऱ्यांच्या चूका काढण्यातच संपून जाते....!* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगातील सर्वात लहान नाव असलेली नदी कोणती ?* डी 2) *ध्वनी मोजण्याचे एकक कोणते ?* डेसीबल 3) *जगातील पहिली तेलविहीर कोणी शोधून काढली ?* ड्रेक,1857 4) *मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यात आहे ?* तामिळनाडू 5) *भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते ?* तारापूर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मिलिंद बोडके 👤 श्री व सौ. दिलीप ठाकूर ( लग्न वाढदिवस ) 👤 शाहरुख शेख 👤 रोहन पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोबाइल, फेसबुकच्या आभासी जगाने एक नवी संस्कृती जन्माला घातली आहे. मे-फ्लाय संस्कृती' तिचं नाव ! मे-फ्लाय ही उडत्या किड्यांची प्रजाती. मे-फ्लाय प्रवर्गातील एक किडा अल्पकालिक असतो म्हणे. त्याला तोंड वा पोट नसते. असते फक्त विलासी इंद्रिय अन् तसलेच मनही ! तो रक्तहीन असला तरी रतिप्रविण असतो म्हणे. त्याचे आयुष्य चोवीस तासांचेही असत नाही. तीन तासांचे तारूण्य घेऊन जन्माला येणारा तो किडा फक्त पुनरूत्पादनासाठीच जन्मतो. संभोग झाला की मरतो. एकदम 'सर्जिकल स्ट्राइक'च म्हणाना. त्यात शृंगारक्रिया असत नाही. जीवनास्वाद नसतो. असते ओरबाडणे, भोगणे,मरणे नि मारणे..जगणे नसतेच.* *माणूस 'मे-फ्लाय' होणे हे आभासी, चंगळवादी, भोगवादी जीवनशैलीचे अपत्य होय. तुम्ही ठरवायचे की, तुम्हाला ATM जन्माला घालायचे आहे की माणूस! माणूस जन्माला घालायचा असेल, घडवायचा असेल तर जरा हवा येऊ द्या. घरी माणसे, पै-पाहुणे आले पाहिजेत. तुम्हींही इतरांच्या घरी जात येत रहा. गतीमान जीवनात उसंत शोधा. उसंत स्वत:साठी वापरू नका. निवांत म्हणजे स्मशान! आयुष्यात पाण्याचा खळखळाट ऐका. नुसते आभासी संदेशन, प्रक्रिया, प्रतिसादांनी मिळणारे सुख, समाधान, शांती हीसुद्धा आभासी असते. स्वत:पलीकडचे जग उघड्या डोळ्यांनी पहा. मुलांचे एकारलेपण उन्हाळी शिबिरांसाठी केवळ पैसे भरून निघणार नाही. त्यासाठी त्यांना वेळ द्या. दिले की संपले, असे पालकपण कारखान्याच्या मालकासारखे असते. आव्हानांना सामोरे जाणारे जीवन प्रत्यक्ष जगा नि पाल्यांना जगू द्या...* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, नक्तचर्या दिवास्वप्नम् आलस्यं पैशुनम् मदम्। अतियोगम् आयोगं च श्रेयसोsर्थी परित्यजेत। अस म्हटलं जातं की "जन्मला आला हेला,अन पाणी वाहून मेला." आयुष्यात येऊन माणसाने कुठलीतरी ध्येय डोळयासमोर ठेवले पाहिजे.केवळ जन्माला आला आणि जगत राहिला, व एक दिवस स्वर्गवासी झाला.हवं जगणं फक्त आणि फक्त पशूंनाच शोभून दिसते. जगायच तर संकटांना धडक देऊन जगल पाहिजे. आलोच आहे या उघड्या नागड्या जगात,जगायचेच आहे, तर कधी दोन देत कधी दोन घेत जगले पाहिजे.आपल्याहातून काहीतरी चांगलं घडलं पाहिजे.नाही काही तर आपल्या स्वतःच जीवन तरी काही जीवनमूल्ये घेऊन जगावं.अस ठरवलं तरी त्याला काहीतरी ध्येय आहे असं तरी म्हणता येईल.तात्पुरते का होईना अशी स्वप्ने माणसाला पडावी ही किमान अपेक्षा.आपले संकल्प कालानुरूप बदलत जाणारी असावीत.त्यासाठी शास्र आणि व्यवहार यांचीही सांगड घातली जावी. लहानपणापासून किंवा तरुणपणी केलेले संकल्प फार थोडे लोक आयुष्याच्या अखेरपर्यंत टिकवितात आणि त्यांनाच जग सलाम करते. हे सगळं करण्यासाठी प्रयत्न, कष्ट,जिद्द ,तळमळ या सगळ्या गोष्टी आल्याच. नाही तर दे रे हरी,खाटल्यावरी। अस कधी घडत नाही. मग हे करत असतांना माणसाने हे निश्चित लक्षात ठेवावे की काय करावे,काय करू नये.काय टाळावे,कुठे जावे,कुठे जाऊ नये.हे सर्व नियम पाळणे मग क्रमप्राप्त ठरते. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दारिद्र्य आणि व्यक्ति* *एकदा एका व्यक्तीवर त्याच सौख्य(भाग्य) रुसल आणि जाता जाता त्याला म्हणाल आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार आहे. परंतु तू एक उत्कृष्ट व्यक्ती असल्याने. मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत आहे. तुझी इच्छा असेल तर कोणतही वरदान तू मागु शकतोस..माणूस खूप समजदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येणारंच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा कायमस्वरूपी राहू दे..* *सौख्य तथास्तु म्हणाल आणि निघून गेल.* *काही दिवसानंतर - धाकटी सून स्वयंपाक बनवत होती, तिनं भाजीला मीठमसाला टाकला आणि दुसऱ्या कामात गुंतली.. त्यानंतर मोठी सून आली, तीनं भाजी न चाखताच मीठ टाकलं, आणि दुसऱ्या कामाला घराबाहेर निघून गेली. त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मीठ टाकलं आणि निघून गेल्या.* *जेव्हा कुटूंबप्रमुख व्यक्ती आला. आणि जेवायला बसला तर भाजी इतकी खारट होती की. त्याला ती जिभेवर ठेऊ वाटेना. परंतु तो समजून गेला की. दारिद्र्याने आपल्या घरात प्रवेश केलेला आहे. त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि निघून गेला.* *त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला, तेव्हा खारट लागल्या नंतर त्याने विचारलं? बाबांनी जेवण केलं का? तेव्हा बायकोनं हो म्हटलं. नंतर त्यानं विचार केला. जेव्हा वडील काही बोलले नाही तर मी कशाला बोलू?* *त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी एकमेकां विषयी विचारलं आणि काही न बोलता सर्वांनी जेवण केलं.* *संध्याकाळी दारिद्र्य त्या व्यक्तीसमोर आलं आणि म्हणालं मी निघून चाललो आहे.* *माणूस म्हणाला कां? तू तर स्वःइच्छेने आलास. अन आता लगेच निघालास अस का. ?* *दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी किलोभर मीठ खाल्लं ... तरीपण भांडणं केले नाहीत....ज्या घरात इतक्या खारटपणानंतरही तुमची गोडी कमी झाली नाही, ज्या घरात भांडणं होत नाही. त्या घरात मला मुळीच* *करमत नाही... मी अशा घरात राहुच शकत नाही. जातो मी आता.* *तात्पर्य:* *भांडण आणि इर्षा यामुळं आपलच नुकसान होतं.* *ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथं भाग्य, सौख्य. आनंद, समाधान. रेलचेल, नेहमी नांदत असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/02/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक सामाजिक न्याय दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● २०१४-आंध्रप्रदेश चे विभाजन होऊन तेलंगणा हे भारताचे २९ वे राज्य अस्तित्वात आले. ● १९८७-मिझोरम हे भारताचे २३वे राज्य बनले. ● १८३५ - तीव्र भूकंपात चिलीतील कन्सेप्शन हे गाव नेस्तनाबूद. 💥 जन्म :- ● १९५१-गार्डन ब्राउन, इंग्लंडचे माजी प्रधानमंत्री 💥 मृत्यू :- ● २००१-इंद्रजित गुप्ता ,माजी केंद्रीय गृहमंत्री व कंम्युनिस्ट पक्षाचे नेते ● १९८५ - क्लॅरेन्स नॅश, अमेरिकन अभिनेता, डोनाल्ड डकचा आवाज. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापना करण्यात आली असून दिल्लीत पार पडलेल्या ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी तर, विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत चष्मे, दहा लाख विद्यार्थ्यांना चष्मा वाटण्याचा निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दृष्टीदोष असलेल्या मुलांना निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादाराकडून त्याच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोहचविण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *चीनमध्ये कोरोना विषाणू बळींची संख्या १८०० वर, एखाद्या रुग्णालयाचे संचालक कोरोना विषाणूचे बळी ठरल्याची ही पहिलीच घटना आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण व दिलासादायक घेतला निर्णय. पंतप्रधान पीक विमा योजनेत दुरुस्ती करण्यास सरकारने मान्यता देत, पीक विमा करायचा की नाही हे आता शेतकऱ्यांनाच ठरवता येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन प्रमुख निर्णय घेण्यात आले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अवघ्या दहा रुपयात उपलब्ध होणाऱ्या शिवभोजन थाळीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन, या थाळींची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. शिवसेनेने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात राज्यातील जनतेला अवघ्या १० रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : जगभरात आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यासह देशभरात साजरी करण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पाकिस्तानचं एक पाऊल मागे, आशिया चषकाचं यजमानपद सोडण्याचे दिले संकेत, पाक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचं सूचक वक्तव्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ठेविले अनंते तैसेचि राहावे* http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/07.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घर वाळूचं - डॉ. दिलीप अर्जुने, नागपूर* आम्ही सगळी मंडळी रविवारची वाट पाहतो सुट्टीचा दिवस येताच मित्रांसोबत नदीवर जातो नदीच्या त्या किनारी वाळूत हात टाकून आनंदी होती आम्ही वाळूचं घर बांधून वाळूत खेळता खेळता दुपारी जातो आम्ही घरी शाळेचा अभ्यास करून सोमवारची प्रतीक्षा करी कसा निघून गेला रविवार कळत नाही येणाऱ्या रविवारची वाट पाहत राही *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• _*एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात. पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो.*_ *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?* तामिळनाडू 2) *भारताच्या पूर्व दिशेला कोणता देश आहे ?* बांगलादेश 3) *महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे ?* पुणे 4) *वानखेडे स्टेडियम कोठे आहे ?* मुंबई 5) *काळे सोने कशास म्हटले जाते ?* खनिज तेल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डुमलवाड शंकर राजेन्ना, स.शि. प्रा.शा.शिरूर ता.उमरी,जि.नांदेड. 👤 अनाम मैनुद्दीन शेख, नांदेड 👤 शिरीष गिरी, सहशिक्षक, धारूर 👤 दिलीप लिंगमपल्ले, धर्माबाद 👤 नागेश पांडे शेवाळकर 👤 उत्तम कानिंदे 👤 संजय रुईकर, नांदेड 👤 सुनील साखरे 👤 शिरीष गिरी 👤 व्यंकटेश रोंटे 👤 शिवाजी पाटील 👤 साहेबराव कदम 👤 संतोष कामगोंडे 👤 विठठल डोनगिरे 👤 बालाजी उगले 👤 नागेश काळे 👤 विशाल खांडरे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. बाबा आमटे, प्रकाश आमटे, अनाथांची माई सिंधूताई सपकाळ हे एक वजह घेऊन जगले. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.* *ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर फिरणा-या चक्राच्या मध्यभागी....जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !* *एक कवी लिहून जातो...* *...सदियाॅ बित गयी टूटी* *हुई डोर को थामे* *शायद कोई वजह मिल* *जाए जिने की....!* *॥ रामकृष्णहरी ॥* 💚💚💚💚💚💚💚💚💚 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुप्रभात* *तुम्हाला जर वाटले की तुम्ही एखाद्या* *घटनेत बरोबर आहात, तर* *समोरून कसलाही वर्षाव* *होऊदया, रागवण्याची गरजच नाही,* *आणि समजा तुम्ही चुकले असे मन* *सांगते तर समोरचे* *स्वीकारण्याची ताकद ठेवा,कारण* *तुम्हाला या ठिकाणी* *रागावण्याचा हक्कच* *नाही.* *प्रयोग करून बघा पुढे जाल.* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात कोणतीही वस्तू किंवा कोणताही जीव कायमस्वरुपी या जगात राहण्यासाठी किंवा टिकण्यासाठी आलेला नाही. एखादी वस्तू चांगली आहे तोपर्यंत त्याचा वापर करतो आणि काम संपले की त्याला खराब झाली म्हणून अडगळीला टाकून देतो कारण त्याची किंमत शून्य होते. तसे मानवी जीवाचे नाही. मानवी जीवाचे वय वाढत जाते त्याबरोबरच मूल्यही (जगण्याचे महत्व) अधिकाधिक वाढत असते.जसजसे वय वाढत जाईल आणि तसे तसे अनुभवाने समृद्ध होत जाईल.जगण्याचे मूल्यही कळायला लागेल.पण त्या मिळालेल्या चांगल्या अनुभवाचे पडसाद मागे राहणा-यावर पडले तर तुमच्या पश्चात ते अजरामरच राहणार आहेत. कारण आपणही कधी ना कधी या जगातून निघूनच जाणार आहोत. मग आपण जाण्याचे दुःख बाळगायचे नाही तर आपण इतरांना काहीतरी चांगले देऊन गेलो याचे समाधान वाटून जीवन समर्पित करावे.यातच खरे जीवन जगण्याचे सार आहे. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद. 9421839590. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सकारत्मकता* एक दिवशी एक बैल विहिरीत पडला. बैल जोराने ओरडत होता. आणि मालक विचार करत होता, याला बाहेर कसे काढायचे .त्याने विचार केला बाहेर काढणे अवघड आहे. नाहीतरी बैल म्हातारा आहे .त्याला वाचवून काही फायदा नाही, त्यापेक्षा त्याला विहिरीतच पूरून टाकू. मालकांने आजूबाजूच्या लोकांना मदतीला बोलावले. सगळेजण विहिरीत माती लोटत होते .बैल आणखीनच हांब्रू लागला. थोडा शांत झाला. थोड्यावेळाने मालकांनी विहिरीत डोकावले, पाहतो तो काय बैलाच्या पाठीवर जशी माती पडत होती तसतसा ती माती झटकून तो मातीतून पाय काढून उभा राहत होता शेवटी विहीर बुजली . बैल विहिरीच्या बाहेर आला व वाट दिसेल तिकडे पळू लागला . तात्पर्यः तुमच्या आयुष्यात अनेकदा तुमच्यावर माती फेकली जाईल, वेगवेगळ्या प्रकारची घाण तुमच्यावर फेकली जाईल, पुढे जाण्यापासून तुम्हाला रोखले जाईल ,तुमच्यावर टीका होईल, तुमचे यश पाहून मत्सराने वाईट बोलतील ,अशावेळी खचून जायचे नाही. निराशेच्या विहिरीत पडून राहायचे नाही. धाडसाने अंगावरील घाण झटकून योग्य तो धडा घेऊन त्याचीच शिडी करून पुढे जायचे. त्यासाठी सकारात्मक विचारकरा सकारात्मक जगा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/02/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● २००१-संगीतकार व गायक भुपेन हजारीका यांना मध्यप्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार' पटदान ● १९९८-माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी सुब्रमण्यम यांना सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान 'भारतरत्न' जाहीर 💥 जन्म :- ● १८२३ - गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी समाजसेवक ● १८८३-क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा 💥 मृत्यू :- ● १९९४-पंडित गोपीकृष्ण,कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात 'नाणार'चा मुद्दा पुन्हा चर्चेत, मुख्यमंत्र्यांनी 'नाणार'वर बोलणं टाळलं; प्रकल्पविरोधक मुंबईत धडकणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सरकार पाच वर्ष टिकवायचं असेल तर समन्वय ठेवा, राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांचा सल्ला, वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्याही मंत्र्यांना सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *एल्गार परिषद प्रकरणी राज्य सरकार एसआयटीमार्फत चौकशी करणार, राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर नवाब मलिक यांची माहिती, सरकार आणि मंत्र्यांच्या कामाबाबतही मंथन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबईतील जीएसटी भवनाची आग तीन तासांनंतर आटोक्यात, सुदैवाने जीवितहानी नाही तर शिपाई कुणाल जाधवनं जीव धोक्यात घालून तिरंगा सुरक्षित उतरवला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तळकोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला सुरुवात, हजारो चाकरमानी कोकणात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भराडी देवीचं दर्शन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लष्करातील महिलांना आता कायमस्वरुपी नियुक्ती मिळणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलांना लष्करात समान संधी देण्याचे केंद्र सरकारला आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत आणि न्यूझीलंड संघांमधली पहिली कसोटी शुक्रवारपासून सुरु होत आहे. न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेसाठी एजाझ पटेल या एकमेव फिरकी गोलंदाजाचा तेरा सदस्यीय संघात समावेश केला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी - आजपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ, राज्यातील नऊ मंडळात 3 हजार 36 केंद्रावर 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचे माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्व परीक्षार्थींना फ्रेश मॉर्निंग बुलेटीनच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा ......Best Of Luck !* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परीक्षेला जाता जाता .....!* फेब्रुवारी - मार्च महीना उजाडला की सर्वत्र परीक्षेचे वारे वाहायला लागते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी - बारावीच्या परीक्षा दिनांक 18 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ........... वरील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे https://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_20.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रानातील शाळा* ©विजय माळी. ९२०९२५३९७८ चला बघुया रानातील शाळा फांदिवरच्या चिमण्या बाळा .. तळ्याकाठी चुकार वासरू माय हरवता लागे बावरू गळ टाकूनी बसला बगळा वरून दिसतो साधा भोळा.. झऱ्यामधले झुळझुळ पाणी त्याच्या भवती चिवचिव वाणी.. उंच फांदीवर मधाचा पोळा अविरत माशा करती गोळा... माळावरती भुणभुण वारा फुलाफुलांचा किती पसारा... रानामधली बघता शाळा किती हरकला चिमण्या बाळा.. ----------------- *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" समाजाचा काैल हा पुष्कळ वेळा भाषणापेक्षा माैन व्रतानेच अधिक प्रभावीपणे व्यक्त केल्या जातो."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मराठी चित्रपटातील पहिली नायिका कोण ?* दुर्गा खोटे 2) *मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार कोण ?* ताराबाई शिंदे 3) *भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान कोणते ?* तिरुपती 4) *तलम रेशीम देणारे किडे कोणत्या वनस्पतीवर वाढतात ?* तुती 5) *भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प कोठे आहे ?* तुर्भे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👥 सौ. रेखा बालाजी सुंकेवार, देगलुर लग्नाचा वाढदिवस 👤 निशांत कसबे 👤 लक्ष्मीकांत डेबेकर 👤 गणेश पाटील 👤 सोमेश्वर तांबोळी 👤 यशवंत कुलकर्णी 👤 चिं. रुद्रा गर्जेपालवे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी देण्यासाठी तळ्यावर आलेला श्रावण, दशरथाच्या बाणाला बळी पडला आणि पुत्रविरहाचा शाप मिळण्यास कारण ठरला. सिकंदर आणि नेपोलियन यांची जग जिंकण्याची 'तहान' अनेक युद्धांना सामोरी गेली आणि कित्येक राजे शरण जाऊन कफल्लक झाले. तहानलेले 'हरिण' वा 'पाडस' ही व्याघ्राची पोटापाण्याची सोय आहे. सत्तेची 'तहान'ही अशीच, त्यात महत्वकांक्षा मिसळली की व्याकूळ होते आणि सत्तापिपासू बनते. म्हणजे तहानेने विकृत रूप धारण केले की ती केवळ तहान न राहता 'जीवो जीवस्य जीवनम्' या तत्वाने तहानलेल्याला समोर दिसेल ते ग्रहण करण्याचे व्यसन लागते. अशावेळी चित्तवृत्ती बेभान होतात, ताळतंत्र सुटतो व विवेक संपून दुष्कृत्य घडते.* *'तृष्णा' म्हणजे 'तहान'च आणि 'तहान' पाण्याशिवाय पूर्ण होत नाही. ही साधी तहान जेव्हा 'तृष्णा' होते तेव्हा तिच्यातले विविध पैलू दिसू लागतात. तहानेत असलेले आसुसलेपण मात्र स्वतंत्र असते, केव्हा एकदाचे 'पाणी' मिळते, अशी अवस्था होते. ही अवस्था 'तृष्णे'मधून येते. तेव्हाही आसुसलेपण येऊन इच्छापूर्ती न झाल्यास बुद्धी किंवा मनाचा आधार घेतला जातो. मनाच्या आहारी गेल्यास महत्वाकांक्षा भरकटते व तृष्णा भीषण रूप धारण करते* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आपल्याला जुन्या अभ्यासात एक* *कविता होती,* *अरे अरे कळसा नको वळून तू पाहू,* *पायरीचा मी दगड ,अरे तुझाच की* *भाऊ।* *खरंय आज क्षणाक्षणाला माणुसकी* *हरवत चालल्याची* *उदाहरणे आपण पावलो पावली* *अनुभवतो आहे.* *माणूस म्हणून जन्मा आलो,माणूस* *म्हणून जगेन मी । ही* *भावना प्रत्येकाच्या ठाई असणं* *आवश्यक आहे.* *यावर कबीरजी खूप छान भाष्य* *करतात* *प्रेमभाव एक चाहिए ,* *भेष अनेक बनाय |* *चाहे घर में वास कर ,* *चाहे बन को जाए |* *मानवाचा धर्म मानवता .* *मानवता जपायची तर मानवाच्या* *अंतरात प्रेमभावनेचे* *अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय* *मानवता व मानव्य कसं* *प्रवाहित होणार ? भौगोलिक व* *भौतिक परिस्थितीशी समायोजन* *साधण्यासाठी भिन्न वेष* *परिधान करा . विभिन्न प्रकारच्या वास्तूत किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप* *स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य व प्रेमभाव हाच खर्या जीवनाचा मुलाधार आहे.* *त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते म्हणून* *माणसाने अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी* *लागून जगण्याला विनाकारणच अंधानुकरणी व भंपक* *बनवू नये . ते मानवतेला* *पूरक असू शकत नाही.* *आणि* *शोभतही नाही.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही जे काही चांगले काम हाती घेतले आहे ते काम पूर्ण होईपर्यंत थांबू नका. जर तुम्ही जे काम थांबवून पुन्हा करु असे म्हणत असाल किंवा मी हे काम पूर्ण करणार होतो पण ते जमले नाही असं म्हणून काम थांबवत असाल तर तुमच्या कामाला थांबविण्याचे काम फक्त ' पण ' हा एक अक्षरी शब्दच कारणीभूत आहे. जर तुम्हाला प्रचिती पाहायची असेल तर तुम्ही पण हा शब्द वापरुन पहा.काय होतं ते.तुमच्या पूर्ण होणा-या कामाला आणि तुमच्यातल्या आत्मविश्वासाला तडा निर्माण करण्याला पण हा शब्दच कारणीभूत आहे.त्यामुळे ' पण ' या शब्दाला तुमच्या जीवनात कधीही थारा न देता आपले काम पूर्ण होईपर्यंत चालू ठेवावे. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संपर्क..9421839590, 8087917063. 💠🍃💠🍃💠🍃💠🍃💠🍃💠🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बढाईखोर इसम एक इसम फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्यापाजार्यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले. तात्पर्यः आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/02/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९९६ - महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत. 💥 जन्म :- ● १८१७ - विल्यम तिसरा, नेदरलँड्सचा राजा. 💥 मृत्यू :- ● १९१९ - विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा पंतप्रधान. ● १९३४ - आल्बर्ट पहिला, बेल्जियमचा राजा. ● १९७८-पुरुषोत्तम शिवराम रेंगे, कादंबरीकार,नाटककार ● १९८६-जे कृष्णमूर्ती,भारतीय तत्त्वज्ञ *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, अरविंद केजरीवाल यांच्यासह सहा मंत्र्यांनीही घेतली शपथ, दिल्लीच्या विकासासाठी मुख्यमंत्री केजरीवालांची नरेंद्र मोदींना साद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *काल रविवारी पाचवी व आठवी वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न, नांदेड जिल्ह्यात 44 हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुणे : तब्बल तीन तासांनंतर खेड-शिवापूर टोलनाक्यावरचं आंदोलन मागे, MH12 आणि MH14 पासिंग असलेल्या गाड्यांना टोलमाफ, केंद्रीय मंत्री गडकरींसोबत बैठक होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दक्षिण कोकणची काशी आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे या यात्रेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नाशिकचा दौरा रद्द करुन शरद पवार मुंबईत, आज राष्ट्रवादीच्या 16 मंत्र्यांची तातडीची बैठक, एल्गार प्रकरणाच्या समांतर तपासासाठी पवार आग्रही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पासष्टाव्या अॅमेझॉन फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये 'गली बॉय'चा डंका; सर्वश्रेष्ठ अभिनेता, अभिनेत्रीसह सर्वोत्कृष्ट चित्रपटाचाही मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर, यंदा 29 मार्चला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना चेन्नईत रंगणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चला, राजे शिवाजी होऊ या ....!* महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलेला काळ म्हणजे छत्रपती राजे शिवाजी महाराजांचा काळ होय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला राजे शिवाजी महाराज यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या नावाचा जयजयकार आज ही घराघरातून केला जातो. सर्वधर्मसमभाव म्हणजे काय असते ? याची शिकवण त्यांनी आम्हांला दिली आहे........ पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे...... https://shopizen.page.link/rvrhZva95nYpy2Np7 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ➖➖➖➖➖➖➖➖ *_स्वप्नातच सहल..!_* *© शशी त्रिभुवन, अस्तगाव(अहमदनगर)* *चलभाष : 8275032897* ➖〰〰〰〰〰〰〰➖ स्वप्नातच काढली सहल ढगांच्या त्या दूर देशात, आमच्यासारखी पोरं पोरी ढगांच्या त्या शूर वेशात! पांढरे करडे घालून झगे पळत सुटत ती गडगडा, ढगोबा आजोबांचा तर आवाज नुस्ता कडकडा! पाणी कसं होतं तयार पाहिली ना मज्जा यार; धार धार धरताना ती गोंधळ नि फज्जा यार! वाफ कोंडून घेते आभाळ पाहिलं तेही यंत्र मोठ्ठं, हॅन्डल फिरवत होतं कोण? कळलं नाही मात्र पोट्टं! गुरुजी म्हणे फारच चौकस इथे तिथे तुझेच सवाल, शिकवलेलं विसरलास ना- उत्तर तर लिहिलेस काल! प्रश्न प्रश्न घोकत मी मग स्वप्नातून झालो जागा, सहलीचा केला हिरमोड अभ्यासावर काढला त्रागा! ➖〰〰〰〰〰〰〰➖ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..! *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कन्याकुमारी भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?* दक्षिण 2) *ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले पहिले भारतीय कोण ?* दादाभाई नवरोजी 3) *कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?* दापोली 4) *जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप कोणता ?* दीक्षाभूमी, नागपूर 5) *आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय कोठे आहे ?* दुबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील सामंत, पुणे 👤 अशोक इंदापूरे, सोलापूर 👤 साईनाथ अवधूतवार, धर्माबाद 👤 रविकिरण एडके 👤 विकास गायकवाड 👤 लक्ष्मण गंगाराम होरके 👤 अजिंक्य गव्हाणे पाटील 👤 अंकुश चव्हाण 👤 माधव संगावार 👤 अरुनी शिंदे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण ईश्वरापाशी 'संकटे येऊ नयेत' अशी प्रार्थना करतो. संकटे माणसाला माणसासारखे वागायला लावतात. माणसे संकटातच परमेश्वराची आठवण काढतात. तेंव्हा अहंकार गळून पडतो. माणसे नम्रतेने, प्रामाणिकपणे वागू लागतात. आपल्या चूका शोधू लागतात. संकटेच सामर्थ्य वाढवीत असतात. प्रगती घडवीत असतात. आपण अडचणीत असताना सभोवतालच्या माणसाची खरी पारख होते. अडचणींमध्ये कुणी साथ दिली, साथ सोडून कोण गेले आणि अडचणीत कोणी आणले हेही कळते. त्यामुळे आपण हुशार बनतो, निर्भय बनतो, अनुभवी बनतो. जीवन यशस्वी करण्यास समर्थ होतो. संकटांमुळेच पाय जमिनीवर राहतात.* *जगात जे नवीन शोध लागले त्यापैकी बहुतेक अडचणींमुळेच लागले. 'गरज ही शोधाची जननी आहे' असे आपण म्हणतो ते खरे आहे. कोणतीही परिस्थिती स्विकारण्याची मानसिक तयारी हवी. प्रतिकूलतेवर मात करून ते बदलण्याचे सामर्थ्य आपल्याकडे हवे. जगताना कोंडी, प्रश्न, अडचणी आणि संकटे आहेत म्हणूनच जीवन जगण्यात मजा आहे. पत्त्यांच्या खेळात हुकूमाची पाने हातात नसताना डाव जिंकणे आधिक आनंददायी असते. अंधारामुळे प्रकाशाचे खरे महत्व कळते. गरिबीमुळेच पैशाचे मूल्य समजते. दु:खामुळे सुखाची गोडी समजते. पराभवामुळे विजयाचा खरा आनंद समजतो. माणसाने पराभवही उत्सवासारखा साजरा करावा, कारण पराभवातून माणूस शिकतो.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो जीवनाच्या बँकेत जेव्हा पुण्याईचा बॅलंस कमी होतो, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात. प्रत्येकाचं आयुष्य शून्यापासून सुरू होतं असतं.. परंतू त्या शून्यापुढे आकडे स्वतःच्या कर्तृत्ववाने लावावे लागतात...! निराशावादी प्रत्येक संधी मध्ये अडचण पाहतो; तर आशावादी प्रत्येक अडचणी मध्ये संधी पाहतो. आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे. अशोक कुमावत राष्ट्रपती पुरस्कार विजेते 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गाढव आणि निर्दय मालक* एक खूप गरीब गाढव होते. त्याचा मालक त्याच्याकडून खूप काम करून घेत असे आणि त्याला पोटभर खायलाही देत नसे. असेच ते गाढव म्हातारे झाले. एके दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर खूप मोठे ओझे लादले. रस्ता अवघड आणि खांचखळग्यांचा होता. त्यामुळे गाढव धडपडून पडले व त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. मालक खूप चिडला आणि दुष्टपणाने त्याला मारू लागला. तेव्हा, गाढव मान वर करून म्हणाले, ''अरे, दुष्ट माणसा, हे सगळे नुकसान तुझ्याचमुळे झाले. तू जर मला नीट खाऊ घातले असतेस तर मी चांगला शक्तिवान झालो असतो आणि हे ओझे मी सहज उचलू शकलो असतो.'' तात्पर्य : काही लोक कृतघ्न आणि दुष्ट असतात की ते प्रामाणिक आणि गरीब माणसांना छळण्यासही कमी करीत नाहीत *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/02/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ध्वज दिन - कॅनडा* *राष्ट्र दिन - सर्बिया* 💥 ठळक घडामोडी :- ● १९४२ - दुसरे महायुद्ध - सिंगापुरमध्ये ब्रिटीश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटीश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी. ● १९६१ - सबिना एर फ्लाइट ५४८ हे विमान बेल्जियममध्ये कोसळले. ७३ ठार. मृतांत अमेरिकेचा संपूर्ण फिगर स्केटिंग संघ व त्यांचे मार्गदर्शक. ● १९६५ - कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला. 💥 जन्म :- ● १९३० - वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक. 💥 मृत्यू :- ● १८६९ - मिर्झा गालिब, उर्दू कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *यवतमाळ : वेगवेगळ्या बंगल्यावर आणि निवासस्थानावर केलेला वारेमाप खर्च सध्या चर्चेचा विषय आहे.परंतु यवतमाळ चे एक शासकीय निवासस्थान हे सर्व गोष्टीला अपवाद ठरत आहे. या शासकीय निवासस्थानी संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून येथे स्वतः जिल्हाधिकारी अजय गुल्हाने शेतात राबून आपल्या 'शाल्मली' या निवासस्थानी हिरवागार मळा फुलवला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्यमंत्री लवकरच सरप्राईज देतील, औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरासंदर्भात खैरेंचं मोठं विधान, मनसेकडून मुद्दा हायजॅक होत असल्याचं समजताच सेना सरसावली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अकोला : गजानन महाराज प्रगटदिनासाठी शेगावला जाणाऱ्या पायदळ वारीतील दोन भक्तांना टिप्परने चिरडले, बाळापूर तालूक्यातील लोहारा गावातील मदरशाजवळची घटना, चार जण जखमी, विशाल पाटेकर, श्याम निवाणे अशी मृतांची नावं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एल्गारचा तपास एनआयएकडे सोपवण्यावरुन ठाकरे आणि पवारांमधले मतभेद चव्हाट्यावर, केंद्राला तपास सोपवल्यानं पवारांची नाराजी, सीएएलाही दर्शवला विरोध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई, ठाण्यातल्या बांग्लादेशी आणि अफगाणी घुसखोरांचा पर्दाफाश, दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 9 जण ताब्यात, अवघ्या 2 हजारात आधार कार्ड बनवल्याची कबुली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अलिबाग रो-रो सेवेसाठी जहाज मुंबई बंदरावर, एक मार्चपासून सेवा होणार सुरू, तर मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इलेक्ट्रिकल बसचा शुभारंभ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : गर्भलिंग निदान चाचणीची निवड आणि पीसीपीएनडीटी कायद्याच्या उल्लंघनावरून सध्या चर्चेत असलेले कीर्तनकार इंदुरीकर महाराज आता शिक्षकांच्या बाबातीत उडवलेल्या खिल्लीमुळे पुन्हा एकदा वादात आले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका हेच उपयोगी* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"थंडी "* सौ. सरोज सुरेश गाजरे, भाईंदर मोबा. नं ९८६७३९४००१ अंग अंग कुडकुडतंय, बघ ना गं आई ! पडली आहे माघातली खूपच"थंडी" लवकर लवकर घाल गं मला ऊबदार असं स्वेटर अन बंडी //१// सकाळी सकाळी मला शाळेत जावेसे ना वाटे मस्त पांघरूणात पहुडावेसे वाटे //२// बघ ना गं अंगणात पेटल्यात शेकोट्या आम्हाला मात्र शाळेच्या खेळाव्या लागती आट्यापाट्या //३// गंधितसा गारवा मोह पडे नीजेला चिंचा, बोरं, गाजरं हुरडा मिळे खायला //४// *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नागार्जुनसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?* कृष्णा नदी,आंध्रप्रदेश 2) *भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता ?* देवदार 3) *रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक कोण होते ?* धीरुभाई अंबानी 4) *सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?* धुपगड 5) *राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या कोणी केली ?* नथुराम गोडसे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक गायकवाड, सहशिक्षक, बिलोली 👤 दत्ता एम. भोसले, शिक्षक, बिलोली 👤 जनाबाई निलपत्रेवार, शिक्षिका, धर्माबाद 👤 बाबूराव बोधनकर, सहशिक्षक, करखेली 👤 किरण गौड, धर्माबाद 👤 घनश्याम नानम, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.* *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, होगा मसीहा सामने तेरे, फिर भी न तू बच पाएगा तेरा अपना खूनही आखिर तुझ को आग लगाएगा आसमान में उडनेवाला मिट्टी में मिल जाएगा कबिरा गर्व न कीजिए, काल गहे कर केस। ना जानौ कित मारिहै, क्या घर क्या परदेस।। जीवन कसे क्षणभंगुर आहे याची वारंवार आठवण करून देतांना कबीर नेहमी सांगतात की बाबांनो हे नश्वर आहे. पुढच्या क्षणी काय होईल हे कुणाला माहीत नाही. यासाठी माणसाने मिळालेल्या जीवनात कुठल्याही गोष्टींचा गर्व करू नये. संत कबीर म्हणतात मृत्यूच्या तावडीतून तुमची सुटका नाही, तुमची शेंडी नेहमी त्याच्या ताब्यात असते.या मृत्यूने किती लोकांना गिळले याची गणती करता येणार नाही. माणूस कुठेही असो हा त्याचा पाठलाग करत असतो.आणि जेव्हा पाहिजे तेव्हा अलगत कवेत घेतो.तो घरात असो वा परदेशात तो शोधूनच काढतो.माणसाला ज्या ज्या गोष्टींची घमेंड आहे त्या सर्व क्षणार्धात नाहीशा करण्याची ताकद मृत्यूत आहे.सगळं येथेच सोडून जावे लागते. माणसाने आपले यौवन,संपत्ती किंवा सौंदर्य यांचा तर अभिमान बिल्कुल बाळगू नये. कारण हे पंचतत्वापासून बनलेले शरीर नश्वर आहे.शेवटी काय तर तुलसीदासाच्या म्हणण्यानुसार, हम हम करि धन धाम सवॉरे,अंत चले उठि रीते। खाली हाथ आया है, खाली हाथ जायेगा। अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अज्ञानाला दूर घालवायचे असेल,दु:खाला दूर करायचे असेल,आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल,इतरांना आपलेसे करावे वाटत असेल,अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा. ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे.ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून.या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान. जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. ©व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बळी तो कान पिळी* एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले. ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, ‘मी फार गरीब कोकरांना ठार मारलं. त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, ‘एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. बकर्या खाणं हा काही मोठा अपराध नाही.’ या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले, ‘एका शेतकर्याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप’ काय पश्चात्ताप ?’ न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले. ‘अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे. यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !’ असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचार्या गाढवाला ठार मारले. *तात्पर्य: बळी तो कान पिळी.समाजात सत्याने वागत असलेल्यांची हेच गत आहे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/02/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *व्हॅलेन्टाईन्स डे* 💥 ठळक घडामोडी :- ● १९२४ - संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एमची स्थापना. ● १९८९ - भोपाळ दुर्घटना - युनियन कार्बाइडने भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले. 💥 जन्म:- ● १९३३ - मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- ● १९८९ - जेम्स बॉन्ड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ. ● १९८९ - जेम्स बॉन्ड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पाच दिवसांच्या आठवड्यावरुन सरकारचे मंत्री आमनेसामने, बच्चू कडूंचा घरचा आहेर, तर निर्णयामुळे सरकारचा एक दिवसाचा खर्च वाचल्याचा गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा, मनसैनिकांची बाईक रॅली, संभाजीनगरचेही बॅनर झळकले, बॅनरवर राज यांचा हिंदूत्व नायक असा उल्लेख* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *चीन सराकरनं 50 हजार कोरोनाग्रस्तांना जाळल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल तर जपानच्या जहाजावरील भारतीयांचे जीव वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पाणी पिण्यासाठी विशेष घंटा वाजवण्याआधी पालिका शाळांमध्ये स्वच्छ पाणी पुरवा : हायकोर्टचे सरकारला निर्देश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबईत अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी परिसरात रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क इमारतीमध्ये मोठी आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 18 गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धस्तरावर सुरु आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *देशातील पहिल्या सामाजिक क्रांतीचे उद्घोषक महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लुसान : भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पटकावणारा मनप्रीत हा भारताचा पहिला हॉकीपटू ठरला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख* *जगाला प्रेम अर्पावे .....!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गाव लळा* - अरुण थोरात ,कन्नड जि. औ. बाद 9373787370 माझ्या गावाच्या घरात सुख गोकुळ भरल काळजा काळजात ब्रम्हकमळ फुलल गावच्या अंगणाला शोभा सडा रांगोळी ची साधु संतां च्या पद स्पर्शान रोज पावन माती माझ्या गावाच्या अळीत जनु गोकुळ नांदते पीठ भाकरी ऊसणवारीत आपुलकी सांधते गावाच्या देऊळात भावभक्ती च्या दिवावाती मंद प्रकाशात उजळती बंधुभाव काळजाची नाती काळजाची नाती माती समता ममतेच दर्शन नाही आल कधी जात पातीत विघण माझा गावाची शाळा पीढ्या पिढ्यांचा मायलळा राष्ठीय सणवारा सारा गाव होतो गोळा माझ्या गावाच गावपण माणुसकीच जिवंतपण येथे घेतला जन्म बांधिन सुवर्ण तोरण *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" अंतरमनात कितीही संघर्ष असला तरी, चेहर्यावर हास्य दाखविणे हाच, जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *चाकाचा शोध कोणत्या युगात लागला ?* नवाश्म 2) *विदर्भातील सर्वात मोठे शहर कोणते ?* नागपूर 3) *भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती ?* नर्मदा 4) *जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या ठिकाणाला काय म्हणतात ?* क्षितिज 5) *'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार शिवाजींनी कोणाबद्दल काढले ?* तानाजी मालुसरे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री. विकास गोविंद बडवे नातेपुते जि. सोलापूर 👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर 👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मान मागावा लागत नाही, तर तो मिळत असतो. त्यासाठी आवश्यकता असते ती पात्रतेची. आता पात्रता नसेल तर मान मिळण्याची इच्छा करून काय उपयोग? अपात्र माणसाला लोक मान कसा देतील? रिकाम्या माणसाला लोक खुर्ची देणार नाहीत. मला स्टेजवर पाहुणा म्हणून बसवा म्हणल्यानं लोक बसवणार तर नाहीतच; उलट 'काय हलकट माणूस आहे?' असं म्हणून अपमान करतील. पात्रतेवाचून मान मिळवण्याची इच्छा करणे म्हणजे अपमान करून घेणे होय. मुळात 'इच्छा' अपमान ओढवते. मानासाठी हापापलेली अनेक माणसं आपल्या अवती-भोवती पाहायला मिळतात. मान मिळाला नाही म्हणून 'बोहल्यावर' रुसून बसणारे नवरदेव आपण पाहिले असतील.* *राजकीयच काय पण सामाजिक, धार्मिक स्टेजवरही मान-पानावरुन लोक हाणामारी करायलाही मागेपुढे पहात नाहीत. मानाची तीव्र इच्छा हे सर्व घडवत असते. तुकोबा म्हणतात, "जो लोकांकडून मान मिळवण्याची इच्छा करतो, तो यामुळं 'हलकट' ठरत असल्याने त्याचा अपमान होतो. असा हा अभागी माणूस जिथं जाईल तिथं त्याच्यासोबत अपयश असते." म्हणून, अपमान करून घ्यायचा नसेल तर मान मिळण्याची इच्छा करू नये. 'निरपेक्ष वृत्तीने' काम करत राहा. लोक स्वतःच तुम्हाला खुर्चीवरच काय डोक्यावर बसवतील.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, काल एका महान कादंबरीकारचा जन्मदिवस होता,त्या निमित्ताने त्याच्या अंतरंगातील काही गोष्टी आपल्या सगळ्यांना वेगळी दिशा देतील असे वाटते. तो महान कादंबरीकार म्हणजे जॉर्ज मेरिडिथ. जगाला आवडेल ते कराल तर एक “product” म्हणून रहाल आणि जर स्वताला आवडेल ते कराल तर, एक “Brand” म्हणून जगाल. असा ब्रँड म्हणून सदैव स्मरणात राहिलेला जॉर्ज मेरिडीथ ,नोबेल पुरस्कार पासून वंचित राहिला,पण लेखनाला आणि जनसामान्यांना त्याने कधी पारख केलं नाही. पोर्ट्समथमध्ये जन्मलेला जॉर्ज मेरिडिथ हा व्हिक्टोरियन काळातला एक महान ब्रिटिश कादंबरीकार आणि कवी म्हणून ओळखला जातो. त्याच्या बऱ्याच कविता निसर्गापासून स्फूर्ती घेतलेल्या असत. त्याच्या कादंबऱ्या उत्कृष्ट संवादशैली आणि शब्दांच्या नेमकेपणासाठी प्रसिद्ध होत्या. त्याच्या कादंबऱ्यांमधून त्या काळच्या जीवनशैलीचं यथार्थ आणि वास्तववादी दर्शन घडतं. मुख्य म्हणजे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं स्थान असावं या मताचा तो पुरस्कर्ता होता. त्याची एक-दोनदा नव्हे तर सातवेळा साहित्याच्या ‘नोबेल’साठी शिफारस होऊनही संधी हुकली होती. लेखनाच्या सुरुवातीच्या काळात तो कविताच लिहायचा; पण त्याला खरी प्रसिद्धी लाभली ती ‘दी शेव्हिंग ऑफ शॅगपत’ या त्याच्या एका सुरस आणि अद्भुत कादंबरीमुळे! शिबली नावाच्या एका पर्शियन न्हाव्याने जुलमी सुलतानाची हजामत केल्याची धमाल कथा सांगणारी ही अरेबियन नाइट्स धर्तीची कादंबरी वाचकांना आवडून गेली होती. त्याच्या पुढच्या ‘दी ऑर्डियल ऑफ रिचर्ड फिव्हरल’ या कादंबरीचंसुद्धा लोकांनी चांगलं स्वागत केलं. मेरिडिथला एव्हाना विनोदप्रचुर लिहिणं जमायला लागलं होतं. त्याची पुढची ‘इव्हान हॅरिंग्टन’ ही एका शिंप्याच्या मुलाच्या प्रेमाची कथा सांगणारी कादंबरीही लोकांना आवडली. एमिला इन इंग्लंड, ऱ्होडा फ्लेमिंग, व्हिट्टोरिया, दी अॅडव्हेंचर्स ऑफ हॅरी रिचमंड, दी हाउस ऑन दी बीच, दी टेल ऑफ क्लो, दी अमेझिंग मॅरेज, दी इगोइस्ट अशा त्याच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. १८ मे १९०९ रोजी सरेमध्ये त्याचा मृत्यू झाला. मेरिडिथ च्या कार्याला सलाम. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकीचे बळ* एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्डय़ात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्याचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्या एका मोठय़ा खड्डय़ात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. *तात्पर्यः एकञितपणे शक्ती दाखवली तर कोणतेही अशक्य कार्य शक्य होते.एकीचे बळ महान असते..* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/02/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● २०१० - पुणे येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. १७ ठार, ६० जखमी. 💥 जन्म :; ● १८७९ - सरोजिनी नायडू, बंगाली कवियत्री. १९६९ - सुब्रोतो बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● २०१२ - अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते उर्दू कवी, गीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा, राज्य सरकारचा मोठा निर्णय पण रोज 45 मिनिटं अधिक काम करावं लागणार, 29 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्प रद्द होणार नाही, मंत्री अमित देशमुख यांची माहिती, टप्प्या-टप्प्यानं योजना राबवणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधींची उधळपट्टी, 31 बंगल्यांसाठी तब्बल 15 कोटी खर्च, विरोधकांचं सरकारवर टीकास्त्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 145 रुपयांची वाढ, दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, महिला कार्यकर्त्यांचं आज देशभरात आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बीडमध्ये पहिल्या वृक्ष संमेलनाची सुरुवात, अभिनेते सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराईचा उपक्रम, झाडे जगवण्यासाठी मोहीम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे: राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये येत्या १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे, महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी, असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय बंधनकारक करण्यात येणार आहे. यासंबंधीचं विधेयक येत्या विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति क्रोध करू नये* http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/14.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाऊस* ... 🍁 *अलका कुलकर्णी* 🍁 पाऊस पाऊस नुसता पाऊस झरझर धारा रे... घमघमते अत्तर मातीचे दरवळ न्यारा रे... पहिला पाऊस आहे ढोंगी दराराच येण्याचा जंगी आई यंदा नवा हवा गं रेनकोट रंगीबेरंगी चिंब भिजूया तू आणिक मी वेचू गारा रे... सोडू कागद होडी या रे कपडे ओले करू नका रे वेचून घेऊ थेंब ओंजकी तळे साचले या ना सारे धूळ वादळे विजा कडाडे पिसाट वारा रे.. सरीसरींचा नाच अंगणी थपथप थपाक पाऊस गाणी न्हाऊ घाला मला ढगांनो शॉवर चालू केला कोणी स्वैर नाचू दे मोर मनाचा फुलव पिसारा रे.. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"यश" हे "सोपे," कारण ते कशाच्यातरी* "तुलनेत" असते, पण "समाधान" हे "महाकठीण", कारण त्याला "मनाचीच परवानगी" लागते..* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार कोणता ?* नोबेल पुरस्कार 2) *अरुणाचल प्रदेशचे जुने नाव काय होते ?* नेफा 3) *जगातील सर्वाधिक कर असलेला देश कोणता ?* नार्वे 4) *मध्यप्रदेशची उन्हाळी राजधानी कोणती ?* पचमढी 5) *भारतातील सर्वात संपन्न राज्य कोणते ?* पंजाब *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 देवीसिंग ठाकूर, धर्माबाद 👤 नागनाथ भद्रे, धर्माबाद 👤 अशोक पाटील, धर्माबाद 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्याच्या मुखात भगवंताचे नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. असे सर्वश्रेष्ठ नाम सर्वांनी घेतले पाहिजे. त्यात असणारे सामर्थ्य अमाप आहे. आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख, आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुंडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरूण जावा.* *ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. येता-जाता, बसता-उठता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा आविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे आज्ञानाचा भेद नामोच्चाराने दूर होतो. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरिता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो रोजच्या वर्तमानपत्रात सध्या हिंगणघाट येथील प्राध्यापिका स्व.अंकिता पिसुड्डे यांच्या वेदनांचा हुंकार प्रत्येक जण आपापल्या परीने मांडतोय,निषेध, मोर्चा,शोकसभा,अशा अनेक प्रकारे समाजातील हे विकृत स्वरूप मांडतोय. पण एव्हढ्याने या रोज घडणाऱ्या घटना संपणार आहेत का? या विषारी विचारांवर जालीम उपाय शोधायचा असेल तर फक्त आणि फक्त संस्कार व पुरुषी मानसिकता बदलणे हेच होय. आज झी टी. व्ही.वरील चला हवा येऊद्या मधील श्रेया बुगडे अनेक वर्षांपासून पुरुषांबरोबरीने एकटी काम करतेय, तिच्यातील प्रगल्भता वाखाणण्याजोगी आहे.तिचा हेवा वाटावा असे काम ती करतेय. दोन फेब्रुवारी १९८८ रोजी श्रेया बुगडेचा जन्म झाला. श्रेया बुगडे हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा. श्रेया मूळची पुण्याची आहे. बालपणापासूनच हुषार असलेली श्रेया कमी वयातच या इंडस्ट्रीत आली. बालनाट्यातून कमी वयातच तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली. आठवीत असताना बाललैंगिक शोषणावर ‘वाटेवरच्या काचा गं’ हे छोटेसे प्रबोधनपर नाटक तिने केले होते. या नाटकाचे प्रयोग करण्याकरिता श्रेया इतरांबरोबर सगळीकडे फिरली. शाळेचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत श्रेयाने अनेक बालनाट्यात काम केलं होतं. कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजसाठी काही तरी करायचं अशा विचारातून तिनं कॉलेजच्या अनेक एकांकिका, नाट्यस्पर्धांत भाग घ्यायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना मराठीतच नाही, तर गुजराती नाटकांमध्येही तिने काम केले आहे. त्यानंतर तिला मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तू तिथे मी, अस्मिता, माझे मन तुझे झाले, फु बाई फू अशा अनेक मालिकांमध्ये श्रेयाने व्हिलन, सेकंड लीड रोल साकारले आहेत; मात्र खलनायिका रंगवणारी श्रेया विनोदी अभिनयसुद्धा तितक्याच ताकदीने साकारू शकते हे ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून लोकांना कळले. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आनंद हा आनंदच असतो. आनंदाला कोणीही सहज स्वीकारतो. त्याचा कोणीही तिरस्कार करत नाही. जेथे सुख, समाधान, शांती आहे तेथे आनंद आनंदाने नांदत असतो. पण जेथे वाद, नैराश्य, दुःख, अस्थिर मन आहे तेथे आनंद संचार करत नाही. आनंदाला जवळ करायचे असेल तर मनातून त्याला हसत मुखाने व कोणत्याही कठीन परिस्थितीत स्थीर मनाने स्वीकारावे. इतरांच्या आनंदात सहभागी होऊन त्यात आनंद मिळवता येतो. त्यासाठी आपणही आनंद प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे. कारण आनंद हा चांगल्या प्रयत्नाने आणि सातत्याने केलेल्या कामात व मनाच्या समाधानात मिळत असतो.तो कुणालाही विकत घेता येत नाही. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.9421839590. 🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समाधानकारक वृत्तीने जगावे....* एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता. त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल ! त्याला कोणीतरी सांगितले तू संताना शरण जा म्हणजे संतचं यातून तुला सोडवतील . श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक साधु महाराज बसले होते त्याना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही, एक विवंचना मला झोप येवु देत नाही त्यामुळे मी सुखी नाही. साधु महाराज म्हणाले आधि विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो , श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल ? कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढिची ! साधु महाराज हसले आणि म्हणाले काळजी करु नकोस मी तुला यातून सोडवतो . साधुनि त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देवून ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो . तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती, तिची भावसमाधी लागली होती, श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली , तिने वर बघितले आणि म्हणाली का आलास बाबा ईथे ? तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो . ती म्हणाली कारे तुला मागीतले होते का ? तुझ्या समोर हात पसरला होता का ? नाही ना ? मग का आणलेस तांदूळ ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधुने पाठवले आहे म्हणून मी आलोय, ती म्हणाली त्या साधुला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत . श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसर्या दिवसाला होतील राहू दे.ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको त्याला सांग माझ्या तिसर्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसलेय त्याला आहे. हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधु समोर पिशवी ठेवून निघाला. साधुने त्याला हाक मारली अरे ! विवंचना घेऊन आला होतास ना ? मी तुला त्यातुन सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे. तात्पर्यःसुख कशात आहे हे ओळखले पाहिजे,व उद्याची चिंता करण्यापेक्षा आजचा दिवस आनंदाने कसा जाईल हेच पाहीले पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/02/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकष्ट चतुर्थी 💥 ठळक घडामोडी :- ● १९७६ - पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण. ● २००३ - आवाजापेक्षा दुप्पट वेगाने स्वनातीत जाणाऱ्या जहाजविरोधी ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ओरिसाच्या किनाऱ्यापासून दूरवर खोल बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी घेण्यात आली. 💥 जन्म :- ● १७४२ - नाना फडणवीस, पेशवाईतील नामवंत मुत्सद्दी. ● १८०९ - अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष. ● १९४९ - गुंडप्पा विश्वनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १७९४ - महादजी शिंदे, पेशवाईतील मुत्सद्दी. ● १९९८ - पद्मा गोळे कवयित्री. ● २००० - विष्णुअण्णा पाटील, सहकार क्षेत्रातील नामवंत नेते. ● २००१ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व ७० जागांचे निकाल जाहीर झालेत. निवडणुकीत 'आप' ६२ जागा जिंकल्या. तर भाजपला फक्त ८ जागा जिंकता आल्या. काँग्रेसने तर भोपळाही फोडला नाही. काँग्रेसने एकही जागा निवडणुकीत जिंकलेली नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कोकण मंडळाची ९,१४० घरांची लॉटरी महिनाभर लांबणीवर, लॉटरीतील घरे ही ठाणे, नवी मुंबई, कल्याण (पलावा) खोणी, शिरढोण अशा विविध ठिकाणी असतील.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका हायकोर्टाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सोलापूर-तुळजापूर महामार्गावर गॅस टाक्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली.. आणि ट्रकमधील गॅस टाक्यांचे एकामागोमाग एक स्फोट होऊ लागले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जगभरात अलर्ट ! चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; आजपर्यंत 1011 जणांचा मृत्यू, कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वेचा ब्लॉक; 25 फेब्रुवारीपर्यंत 11 पॅसेंजर गाड्या रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंडने भारताला तिसऱ्या वनडे सामन्यात ही केले पराभूत, मालिका ३-० अशी सहजपणे खिशात टाकली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाऊलवाट भाग 10 आराम हराम है ।* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/10.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगात नारळ उत्पादनात प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो ?* भारत 2) *अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?* सरयु 3) *अग्निशामक यंत्रामध्ये कोणता वायू असतो ?* कार्बन डॉयऑक्सईड 4) *शुद्ध सोना किती कॅरेटचा असतो ?* 24 कॅरेट 5) *हॉपमॅन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* टेनिस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सौ. एम डी जोशी विषय शिक्षिका कन्या शाळा धर्माबाद 👤 सुनील कवडे, कुपटी, माहूर 👤 रविंद्र दुबिले, नांदेड 👤 विनोदकुमार भोंग, कोल्हापूर 👤 अशोक शिलेवाड, येवती 👤 विजयकुमार पवारे, कुंडलवाडी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत कबीर यांनी मानवी जगण्यातल्या खोटेपणावर प्रहार करीत ख-या भक्तीची जाणीव आपल्या रचनांमधून करून दिली. त्या रचना फारच दिलासा देणा-या आहेत. कुणाचीही वेदना ही आपली सहवेदना झाली पाहिजे यावर भर देत संतानी जो विचार मांडला तो अमूल्य जीवनाचा विचार आहे. गुरूस्वरूप असणा-या संताबद्दल कबीर म्हणतात....* *संगत संतनकी कर ले।* *जनमका सार्थक कछु कर ले।* *उत्तम नरदेह पाया प्राणी इसका* *हित कछु कर ले ॥* *या सांगण्यातून कबीरांनी जीवनाचे सार्थक कशात आहे, हेच सांगितले. त्या सार्थकतेच्या पाठीमागे आपण केव्हा आणि कधी जाणार आहेत, याचा विचार जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करायला हवा. संत हे कृपादृष्टी करणारे असल्याने त्यांच्याकडून कधीही कठोर वागणूक मिळणे अशक्य आहे. त्यांनी दाखविलेला मार्ग ही 'प्रकाशवाट' असते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *देव पहावयासी गेलो देवच होऊनी आलो.* *देव देव्हाऱ्यात नाही,देव नाही देवालयी।* *देव शोधुनी पाहिलं अशी कोणाची पुण्याई।* *देवाचे खरे मंदिर कोणते - जेथे त्याला* *बंद दरवाज्यामागे* *कडी-कुलपात सुरक्षित ठेवले जाते* *ते ? जेथे प्रवेशासाठी तिकीट* *काढावे लागते ते ? जेथे* *आधिक पैसे देऊन लवकर दर्शन घेता येते ते ? की आपल्या घरातलाच तो* *पवित्र राखलेला एक कोपरा, जेथे आरती म्हटली जाते ?* *ज्या परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली तो मानवी हातांनी* *बांधलेल्या मंदिरात रहात नाही. त्याला तशा मंदिरांची गरज* *नाही.** *परमेश्वराचे खरे मंदिर आपणच आहोत; कारण त्याचा पवित्र आत्मा आपल्यात राहतो. आपल्या ह्रदयातील भव्य उपासना- मंदिराच्या परमपवित्र स्थानांत सर्वांना, अगदी अनिर्बंधितपणे जाता यावे ही एक सुंदर कल्पना आहे आणि ती लवकर साकार व्हावी. पण त्याआधी आपल्या अंत:करणावर आपण काय लिहिले आहे तेही बघितले पाहिजे. असे न होवो की, आपल्या अंत:करणावरची 'प्रवेश बंद' ची पाटी वाचुन परमेश्वर बाहेरच उभा राहिला असेल.* *देवाला शोधायचे असेल तर स्वतःमध्ये* *शोधा, नक्की सापडेल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यातील अहंकाराने आपल्या रागावर नियंत्रण कधीच ठेवता येत नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनात अनेक कटू प्रसंग ओढवले जातात.त्या काळात काय होत आहे याचेही भान राहत नाही.जेव्हा आपल्यातील राग संपून जातो तरी अहंकारमात्र तसाच चिटकून राहतो. पुन्हा पुन्हा आपल्यातील अहंकार जागा होऊन तीच ती कृती करण्यासाठी प्रेरणा देतो.त्यामुळे आपल्या जीवनात खूप काही नुकसान सोसावे लागते.म्हणून आपला राग आणि अहंकार नष्ट करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्यातील अहंकाराला तिलांजली द्यायला हवी नंतर आपोआपच आपल्यातील राग नष्ट होईल आणि हे दोन्ही आपल्या जीवनातून गेले की, जीवन सुखावह होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुंगी व कोशातला किडा* एकदा एक मुंगी आपले चिमूकले पोट भरण्यासाठी खाद्य शोधत फिरत असता तिच्या नजरेस कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.’ यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, ‘अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो.’ इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला. तात्पर्यः संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.प्रत्येकाच्या परिस्थितीत वेळेनुसार बदल होतात आणि परिस्थिती बदलते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/02/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १८३० - मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना. ● १९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. ● १९३३ - म. गांधी यांच्या हरिजन वीकली चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. ● १९९९ - मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर. 💥 जन्म :- ● १९४२ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका. 💥 मृत्यू :- ● १९४२ - जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक. ● १९६८ - पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष. ● १९९३ - कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्य सरकारचं 24 फेब्रुवारीपासून 18 दिवसांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 5 मार्चला महिला सुरक्षा कायद्यावर विशेष चर्चा, तर 6 मार्चला अर्थसंकल्प होणार सादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *हिंगणघाट जळीतकांड खटल्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, खटला जलद गतीने चालवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अॅट्रॉसिटी कायद्यात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्त्यांवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब, चौकशीशिवाय गुन्हा दाखल करता येणार, अटकपूर्व जामिनाचा मार्गही बंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यास राज्ये बांधील नाहीत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून नाराजी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पुणे: शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यासंदर्भात पुण्यात राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईकर मुलीनं रचला इतिहास, सर्वात कमी वयात दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच शिखरावर केली चढाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *यंदाच्या ऑस्करमध्ये पॅरासाईटला सर्वाधिक 4 पुरस्कार, जोकरचा वॉकिन फिनिक्स ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ज्युडीसाठी लॉरा डर्नचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शतदा प्रेम करावे* या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ........ लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे https://shopizen.page.link/xzi3G8QQ9svMitc97 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अंकांचे भांडण* - कवी शरद ठाकर सेलू जि परभणी अंक सारे शुन्याला एकदा चिडू लागले किंमत नाही म्हणून शुन्य रडू लागले जो तो आपली किंमत शुन्याला सांगू लागला मीच तुझ्या पेक्षा श्रेष्ठ म्हणत पांगू लागला शुन्याला अंकांनी असे बेजार करून सोडले तु एकदम निरर्थक म्हणून देवाकडे धाडले देव म्हणे शुन्याला तु कुठे आहेस रे छोटा तुझ्या मुळे प्रत्येक अंक होत असतो मोठा मोठं करणारा दुस-याला छोटा कधीचं नसतो शुन्य मग आनंदाने गालातल्या गालात हसतो *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" मनगटातली ताकद संपली की, मनुष्य हातातील भविष्य शोधतो "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *अंतराळ संशोधन करणारी अमेरिकेची संस्था कोणती ?* नासा 2) *ऑलम्पिक ध्वजावरील कड्यांची संख्या किती ?* 5 3) *जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे ?* नेपाळ 4) *वाघा बॉर्डर कोणत्या राज्यात आहे ?* पंजाब 5) *जगातील एकमेव हिंदुराष्ट्र कोणते ?* नेपाळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधव हिमगिरे, उपक्रमशील शिक्षक कन्या शाळा, धर्माबाद 👤 सागर भागवत धामणे 👤 नचिकेत राज धामणे 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कृषिसंस्कृतीत सापाला अनन्य स्थान आहे. वावरात साप दिसला की तो आपला राखणदार आहे, असं लोकमानस मानतं. शेतक-याची संपत्ती म्हणजे त्याचं शेत आणि कुठल्याही संपत्तीचं; विशेषत: गुप्तधनाचं साप राखण करतो, अशी लोकांची भाबडी श्रद्धा असते.* *काया वावरात सरप ताजातुजा* *मारू नको बापा पुरवधीचा राजा* *अशी लोकवाङमयाची शिकवण असते. शेतक-यांच्या आणि सापांच्या कितीतरी लोककथा आहेत. सापाला पुरूषतत्वाचे प्रतिक मानतात. त्यामुळेच वारूळस्थ नागाची पूजा करतात. पृथ्वी स्त्रीरूप आणि साप पुरूषरूप.. त्यांच्या संयोगातून समृद्धी नांदते अशी लोकसमजूत असते. मुळात साप शेतीचा सहाय्यक म्हणून रक्षणकर्ता असतो, पण तो राखणदार असतो ही लोकश्रद्धा. काही का असेना पण वावरातील सापाला सहसा मारत नाहीत. तो शेतीला उपद्रवी उंदरांसारख्या प्राण्यांचा नाश करतो म्हणून शेतक-यांचा मित्र असतोच.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *"चूक झाली की साथ* *सोडणारे बरेच असतात* *पण चुक का झाली* *आणि ती कशी* *सुधारायची हे* *सांगणारे फार* *कमी असतात.* *"समोरच्या व्यक्तीशी नेहमीच* *चांगले वागा ती व्यक्ती* *चांगली आहे म्हणून नव्हे* *तर तुम्ही चांगले* *आहात म्हणून,,,* *जर श्वास हा शरीराला* *जिवंत ठेवत असेल* *तर, विश्वास हा* *नात्याला जिवंत ठेवतो..* *ओढ लावणारी माणसं जिथे आहेत मनाची पावलं नकळत तिथेच* *वळतात. माणसांपासून मुक्या प्राण्यांपर्यंत सगळ्यांना हा* *नियम लागू पडतो. मग अशा वेळी वस्तूंचं नाही तर व्यक्तींचं वैभव* *महत्वाचं ठरतं. साधी , सरळ माणसं कितीही फसवायला सोपी* *असली तरी फसवणूक करणाऱ्याच्या मनात " एका सज्जन माणसाला आपण फसवलं" ही सल* *रहातेच...तुमच्या सोबत अशी मनाने प्रेमळ आणि* *संपन्न माणसं अवतीभवती वावरत असली की तो परिसस्पर्श तुम्हालाही होत जातो.* *दिसायला अतिशय सामान्य पण माणुसकीला प्रचंड जपणारी ही माणसं तुमच्या* *सोबत असणं हेच खरं वैभव मग अशा ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी मन तयार होत* *नाही. शरीराने जरी आपण दूर गेलो तरी* *मनाची ही श्रीमंती खुणावत राहते आणि आठवण* *नावाची ठेव जपली जाते नाही का ?* *मानवी जीवन यशस्वी व्हायचा तडजोड हाही एक मार्ग आहे.....माणसाने ती करायला शिकल पाहिजे;* *जिथं जिथं *तडा* *जाईल,* *तिथं तिथं *जोड* *देता आला की,* *कुठलंच नुकसान होत नाही..!!* *तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,तर ती परिस्थितीवर केलेली* *मात असते..* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वर्तमान स्थितीमध्ये आपण कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी खूप विचार करतो.हे माझ्या हातून पूर्ण होईल का ? पूर्ण होईल का असा जेव्हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा नक्कीच समजून घ्यायचे की,आपला आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.हा आत्मविश्वास जर आपल्याला मजबूत किंवा ठाम ठेवायचा असेल तर आपल्या मनाची कामातली एकाग्रता सातत्याने ठेवायला हवी.सद्यस्थितीत मला हे काम पूर्ण करायचे आहे आणि ते करावेच लागणार त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही अशी मनाची धारणा ठेवली आणि काम केले तर नक्कीच तुमचे काम पूर्ण होईल.त्या कामातून आलेले यश हे तुमच्या पुढच्या कामासाठी आणि पूर्णतेसाठी शुभसंकेत आहेत.त्यामुळे अजून पुन्हा जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.मग ते वर्तमानातील असो की भविष्यातील असो.तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या कामातील सातत्य हेच तुमच्या यशाचे खरे रहस्य आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रामाणिक व चतुर मुलगा* *शेतात बोरं आणण्यासाठी चाललेल्या एका बारा तेरा वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून तो वाटेत लागलेल्या विहिरीत पाणी आहे किंवा काय, हे पाहण्यासाठी त्या विहिरीपाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता, त्याला समोरुन एक उग्र व खुनशी चर्येचा चोर पाठीवर गाठोडं घेऊन, आपल्याच दिशेने येत असलेला दिसला.* *हा चोर एकतर आपल्याला मारील, किंवा पळवून नेऊन चो-या करायला लावील,' असं वाटल्यावरुन तो मुलगा त्या विहिरात पाहून मुद्दाम हमसाहमशी रडू लागला.त्या रडणा-या मुलाजवळ येऊन त्या चोरानं विचारलं, काय रे? तुला रडायला काय झालं?' तो मुलगा आपल्या रडण्यात खंड पडू न देता त्याला खोटच म्हणाला, ‘मी या विहिरीत किती पाणी आहे हे पाहण्यासाठी वाकून पाहू लागलो असता, माझ्या गळ्यातली सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठी शिवाय जर मी घरी गेलो तर आई-बाबा मला मार देतील.'* *तुझी कंठी तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटचं सांगून, आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भरलेली आपली पिशवी त्याला विहिरीबाहेर उभे राहून सांभाळायला सांगून आपण विहिरीत उडी मारावी व कंठी हाती लागताच, आपली पिशवी व याची कंठी घेऊन आपण पसार व्हावं, असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला, ‘बाळा ! तू ही माझी पिशवी सांभाळ; मी तुला तुझी कंठी विहिरीतून काढून देतो.’* *त्या हुशार मुलाला चोराच्या मनातलं कळून आलं तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारुन, तिच्या तळाशी त्या कंठीचा शोध सुरु केला. ही संधी साधून तो मुलगा त्या पिशवीसह तिथून पसार झाला.गावात जाताच त्या मुलाने ती पिशवी पोलिस ठाण्यावर नेऊन दिले. पोलीसांनी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नंतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला बक्षीस दिले.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/02/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● २००५- उत्तर कोरियाने आपण अण्णवस्त्र सज्ज असल्याचे जाहीर केले ● १२५८ - मोंगोल सरदार हुलागु खानने बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००. ● १९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली. ● १९४८ - पुणे विद्यापीठाची स्थापना. ● २०१३ - महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी 💥जन्म :- ● १९४५-राजेश पायलट, माजी केंद्रीय मंत्री ● १८०३- जगन्नाथ उर्फ 'नाना'शंकरशेठ , दानशूर व शिक्षणतज्ञ ● १८९४ - हॅरोल्ड मॅकमिलन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. ● १९५० - मार्क स्पित्झ, अमेरिकन तरणपटू. 💥 मृत्यू :- ● १२४२ - शिजो जपानी सम्राट. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आरक्षणाला विरोध नाही, पण गुणवंतांना डावलू नका, सेव्ह मेरिट सेव्ह नेशनतर्फे राज्यभर अभियान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *यापुढे दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, मनसेच्या मोर्चात राज ठाकरे यांचा घुसखोरांना इशारा, हिंदूंनाही सावध राहण्याचा सल्ला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आशिया खंडातील सर्वात मोठ्या गुफेत 'कचारगड' यात्रा सुरू, 18 राज्यातून भाविक गोंदियात दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जळगाव जिल्ह्यातल्या धरणगावमध्ये जिनिंग प्रेसला लागलेल्या आगीत लाखोंचा कापूस जळून खाक झाला. शासनाच्या कापूस फेडरेशनतर्फे खरेदी करण्यात आलेला कापूस या प्रेसमध्ये ठेवण्यात आला होता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *माघ पौर्णिमेनिमित्त काल पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यंदा विक्रमी यात्रा भरल्याने विठुरायाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिर समितीने विठ्ठल मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवल्यामुळे भाविकही सुखावून गेले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेचे मेकअप आर्टिस्ट आनंद परमान यांचे काल निधन झालं. गेल्या १० वर्षांपासून ते आजारी होते. मात्र तरीही ते सेटवर येऊन जमेल तेवढं काम करत होते. गेल्या १२ वर्षांपासून ते या मालिकेसोबत जोडले गेले होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याचं भारतीय संघाचं स्वप्न अखेरीस भंगलं अंतिम फेरीत बांगलादेशने भारतावर तीन गडी राखून मात करत पहिल्यांदाच 19 वर्षाखालील विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हेडफोन पासून दूर रहा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मसाला भात* गणेश दत्तू लोंढे, कासारी ता बार्शी जि सोलापूर रंगला अमुचा खेळ विटी दांडू चावडीसमोरी ताकतीने मारली विटी बघताच गेली पत्र्यावरी म्हातारी ओरडत आली घेऊन हाती काठी आम्ही भिऊन पळालो घेऊन दांडू विटी दमलो थकलो खेळून गडबडीत आलो घरी आई उभी होती रागाने वाटेत दारी बटाटा, मिरची टाकून आईनं केला होता भात चटकन घेतली चटई मांडी घालून बसलो खात *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" आपले विचार म्हणजे विचार, उच्चार आणि आचार यांचा एकात्म आविष्कार हवा. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण ?* सी. के. नायडू 2) *गौतम बुद्धाने आपले तत्वज्ञान कोणत्या भाषेत सांगितले ?* पाली 3) *एकमेव द्रवरूप धातू कोणता ?* पारा 4) *थर्मामीटरमध्ये चमकणारा पदार्थ कोणता ?* पारा 5) *महाराष्ट्रातील समुद्रकिनारी असलेल्या जिल्ह्यांची संख्या किती ?* 5 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमिन जी. चौहान, सहशिक्षक यवतमाळ 👤 विजय रच्चावार, संपादक, नांदेड 👤 बाबू बनसोडे, सहशिक्षक, बिलोली 👤 राहूल कतूरवार, धर्माबाद 👤 सुधाकर अपुलवाड 👤 राजू गोडगुलवार 👤 जगन्नाथ दिंडे, सहशिक्षक, नांदेड 👤 अशोक श्रीमनवार 👤 डॉ. प्रकाश बोटलावार 👤 प्रशांत यमेवार, पोलीस निरीक्षक 👤 डॉ. पुंडलिक जमदाडे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उत्सवांनंतरची रात्र आवर्जून पहावी. उत्सवाच्या काळात ती पोरकी होती. आपण तिच्याशी प्रतारणा करून स्वैर हिंडत होतो, पण तिच्या अजरतेवर कशाचाही ओरखडा उमटलेला नाही. अंधाराच्या रेशमानं तिच्या तारूण्याला वेढून टाकलेलं आहे. अमावस्येची चाहूल लागल्यानं तिचं रेशीम आधिक गाढं, काळं, होत जाणार आहे. तिच्या अजर तारूण्यात आतुन वाहणारं चैतन्याचं पाणी इतकं प्रबळ आहे की उत्सवातल्या पोरकेपणाचा विषण्ण थर वाहून गेलाय.* *ही उत्सवानंतरची पहिली रात्र. कुठे कुठे तांबूस अभ्र आहेत, पण ती रात्रीशी विसंगत वाटत नाहीत. रस्त्यांवर केवळ दृष्टीला मदत करण्याइतकाच उजेड आहे. ही रात्र आहे, रात्रीसारखी. तिला असं पंधरवाड्याच्या विरामानंतर भेटणं किती विलक्षण. लांबच्या पाणवठ्यावरनं टिटवीचा ओरडा ऐकू येतोय. डोक्याच्या खूप वर, आंब्याच्या गचपणात वाघळाच्या पंखांची फडफड, माडाच्या झावळ्यांमधनं; पावसाचा भास जागवत वारा फिरतोय. एकेक प्रकाशमान खिडकी मालवून; पापण्या जडावलेली घरं अंथरूणाला पाठ टेकतायत. रात्र एखाद्या सखीसारखी माथ्यावरून हात फिरवत म्हणतीये....* *"खूप झालं जगणं, आता झोपायचं..."* *तिच्या स्पर्शानं उर भरून येतं. डोळे डबडबतात. माथ्यावरून रात्रीचा हात आणि अगदी खोलातून झोप येत असते.* ••●⚜‼ *रामकृष्णहरी*‼⚜●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *मनुष्य के पास सबसे बड़ी पूंजी* *अच्छे विचार हैं!* *क्योंकि धन और बल किसी को भी गलत राह पर ले जा सकते हैं* *किन्तु अच्छे विचार सदैव* *अच्छे कार्यो के लिए ही प्रेरित करेंगे!!* *माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो.* *मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.* *राष्ट्रपती पदावर असलेला माणूस किती खोलवर विचार करून देशाचा* *एक एक रुपया वाचवतो.* *आज आपण कोणत्या गोष्टीवर, किती प्रमाणात,कसा खर्च करतो हा त्यांच्या* *मानाने संशोधनाचा विषय होईल.* *स्वतःचा वेळ,पैसा व्यर्थ जाणे म्हणजे देशाचे नुकसानच.* *गोष्ट आहे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांची. राजेंद्रबाबूंची* *राहणी खूपच साधी* *होती. एकदा चालताना* *राष्ट्रपती राजेन्द्रबाबुना त्रास होवू लागला. लक्षात असं आलं कि त्यांच्या* *चपला झिजल्या आहेत आणि त्याला मारलेला खिळा त्यांच्या* *पायाला टोचू लागला आहे. मग राष्ट्रपतींनी आपल्या स्वीय* *सहाय्यकाला नवीन चप्पल आणण्यास सांगितले. त्याने* *सेवकासोबत जावून नवीन चपलांचा जोड आणला. राष्ट्रपतींनी विचारले,"* *या चपलेची* *किंमत किती?" "सोळा* *रुपये" सहाय्यकाने सांगितले. "सोळा* *रुपये? गतवर्षी मी माझ्या* *चपला बारा रुपयांना घेतल्या* *होत्या.तुम्ही खात्री करा."राष्ट्रपती म्हणाले. यावर स्वीय* *सहाय्यक म्हणाले,"साहेब त्या दुकानात बारा रुपयांच्या पण चपला* *आहेत.पण त्यापेक्षा या चपला मऊ आणि चांगल्या आहेत.* *आणि मुख्य म्हणजे मऊ असल्याने टोचणार नाहीत. म्हणून* *सोळा रुपये देवून मीच आणल्या. आपल्या सेवकाचेही या* *चपलाबाबत मत चांगले वाटले.*" *राष्ट्रपती म्हणाले, "अहो* *मऊ चपला आहेत आणि चांगल्या दिसतील म्हणून तुम्ही चार रुपये* *जास्त मोजले कि. नको त्यापेक्षा असे करा कि या चपला* *दुकानात परत करा आणि मला बारा रुपयांच्याच चपला आणून द्या. आणि* *महत्वाचे म्हणजे त्यासाठी वेगळा असा हेलपाटा घालू* *नका. त्या बाजूला येणाऱ्या जाणाऱ्या कोणाकडून तरी हे काम* *करून घ्या. अन्यथा असे व्हायचे कि चपलेत चार रुपये* *वाचविण्यासाठी तुम्ही पाच रुपयांचे पेट्रोल खर्च करून गाडीने जाताल."* *स्वीय सहाय्यक हे सर्व ऐकतच राहिले. देशाच्या सर्वोच्च पदी* *बसणाऱ्या व्यक्तीबद्दल त्यांचा आदर आणखी वाढला.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुख आणि दुःख हे प्रत्येक मानवी जीवनातले दोन वेगवेगळे रंग आहेत.सुखाच्या रंगात सारेच मिसळून जातात.त्यात एवढे रंगून जातात की,दुस-याची आठवणसुद्धा येत नाही.इतरांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नातही नसतात.एवढा अपार आनंद होतो.पण दु:खाचे तसे नाही.दु:खात मात्र त्याला सगळ्यांचीच आठवण येते.आपल्याला अशावेळी आपल्याजवळ कुणीतरी यावं आणि दिलासा द्यावा असं वाटतं.दु:ख पचविण्याची ताकत त्याच्यामध्ये कमी असते.म्हणून अशावेळी आपल्या मदतीला कुणीतरी यावं यासाठी धावा करतो.अशावेळी मात्र आपल्यापासून आपले आणि इतरही लोक दूर जातात.परंतू एक लक्षात ठेवायला हवे, सुखाच्यावेळी आपण कुणाला विचारले नाही मग दु:खाच्यावेळी कसे बरे विचारतील ? म्हणून माणसाने सुख असो वा दु:ख असो दोन्ही समान मानून सदैव पाठीशी रहावे. एकमेकांच्या मदतीला धावून जावे.हाच सुखदु:खाचा मानवी जीवनव्यवहार आहे. हा व्यवहार आपल्या व इतरांच्या जीवनात समानतेने व्हावा एवढेच ज्ञात असावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मदत कुणास करावी? आणि कुणास करू नये!* एकदा एक लाकूडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्याला विचारले, ‘तू का रडतोस ? तुला काय हवं आहे ?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुर्हाडीला दांडा नाही, त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल.’ ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला. लाकूडतोड्याने तो आपल्या कुर्हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, ‘मित्रहो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. तेथे दुसर्याला नावं ठेवायला जागा नाही.’ तात्पर्यः शत्रूची दया करून त्याला साहित्य पुरविले तर शेवटी पश्चात्ताप करण्याची वेळ येते. शत्रूवरही उपकार करण्यात, त्याच्या चुकांबद्दल क्षमा करण्यात मोठेपणा आहे हे जरी खरे असले तरी ज्यामुळे आपला शत्रू बलवान होऊन आपल्यालाच उपद्रव देऊ शकेल. अशा प्रकारचे साह्य त्याला देणे हा मूर्खपणा होय.म्हणून मदत कुणास करावी हे समजायला हवं आणि कुणास करू नये हे समजून घ्याव. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/02/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १८९९ - रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या द्रविड बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून खून केला. ● १९९४ - अष्टपैलू खेळाडू कपिलदेव निखंज यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ४३२ वा बळी नोंदवून न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली यांचा सर्वाधिक बळींचा जागतिक विक्रम मागे टाकला. 💥 जन्म :- ● १९३६ - मनोहर हर्डीकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९४१ - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार. ●१९६३ - मोहम्मद अझहरुद्दीन, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९९४ - गोपाळराव देऊसकर, ख्यातनाम चित्रकार. ● १९९९ - डॉ.इंदुताई पटवर्धन, आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण, दिल्लीत दोन हजार ६८९ मतदान केंद्र आहेत. ४० हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांना १९ हजार होमगार्डची मदत मिळणार आहे, आज होणार मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *वाढत्या वीजनिर्मिती खर्चाचा महानिर्मितीच्या उत्पादनाला फटका, औष्णिक विद्युत केंद्रांच्या क्षमतेच्या तुलनेत ४३ टक्के उत्पादन ठप्प* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई: मुंबईत गुलाबी थंडी परतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर व उपनगरातील तापमानाचा पारा वेगाने घसरत असताना सोबतीला वाराही असल्याने मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे. आज मुंबईचं किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सेलिब्रेटी ब्रँड वॅल्यूमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम आहे. तर अभिनेता अक्षय कुमारने अभिनेत्री दीपिका पादुकोणला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळविला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ठाकरे सरकारचे केजरीवाल सरकारच्या पावलांवर पाऊल, राज्यात दरमहा 100 युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्याना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : करप्रणाली अधिकाधिक सुटसुटीत आणि सहजसोपी व्हावी, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीनेच नवीन कर रचनेचा पर्याय देण्यात आला आहे. प्राप्ती करासंदर्भातील नव्या रचनेत ७० हून अधिक वजावटी रद्दबातल केल्या असल्या, तरी काही सवलती कायम ठेवण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *एफआयएच’ प्रो हॉकी लीगमध्ये यशस्वी पदार्पण केल्यानंतर आता आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय पुरुष संघाला बेल्जियमच्या खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. शनिवारी आणि रविवारी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर रंगणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारताला जगज्जेत्या बेल्जियमशी दोन हात करावे लागतील.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ऑफलाईन होणार ?* शिक्षकांच्या बदल्याचे धोरण याविषयी मत http://nasayeotikar.blogspot.com/2020/02/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" काहीच हाती लागत नाही तेंव्हा मिळतो तो अनुभव "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *सर्वात वेगवान पक्षी कोणता ?* पाकोळी 2) *छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला ?* रायगड 3) *परळी वैजनाथ कशासाठी प्रसिद्ध आहे ?* ज्योतिर्लिंग 4) *भारतातील सर्वात मोठे पदक कोणते ?* परमवीरचक्र 5) *सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव काय होते ?* पाटलीपुत्र *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील ठमके, नांदेड 👤 रविंद्र भापकर, सहशिक्षक अहमदनगर 👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद 👤 दिलीप खोब्रागडे 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देवाचे खरे मंदिर कोणते - जेथे त्याला बंद दरवाज्यामागे कडी-कुलपात सुरक्षित ठेवले जाते ते ? जेथे प्रवेशासाठी तिकीट काढावे लागते ते ? जेथे आधिक पैसे देऊन लवकर दर्शन घेता येते ते ? की आपल्या घरातलाच तो पवित्र राखलेला एक कोपरा, जेथे आरती म्हटली जाते ? ज्या परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली तो मानवी हातांनी बांधलेल्या मंदिरात रहात नाही. त्याला तशा मंदिरांची गरज नाही.* *परमेश्वराचे खरे मंदिर आपणच आहोत; कारण त्याचा पवित्र आत्मा आपल्यात राहतो. आपल्या ह्रदयातील भव्य उपासना- मंदिराच्या परमपवित्र स्थानांत सर्वांना, अगदी अनिर्बंधितपणे जाता यावे ही एक सुंदर कल्पना आहे आणि ती लवकर साकार व्हावी. पण त्याआधी आपल्या अंत:करणावर आपण काय लिहिले आहे तेही बघितले पाहिजे. असे न होवो की, आपल्या अंत:करणावरची 'प्रवेश बंद' ची पाटी वाचुन परमेश्वर बाहेरच उभा राहिला असेल.* •• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *मन ही एक अशी gallery आहे* *जिथे unlimited photos* *आणि old memories* *कितीही save केल्या तरी* *storage full होत नाही।..!* *"मी आहे ना..... नको काळजी करु"* *असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते*. *जेंव्हा मायेची आणि* *प्रेमाची माणसं आपल्या* *जवळ असतात..* *तेव्हा दुःख कितीही* *मोठं असलं तरी त्याच्या * *वेदना जाणवत नाहीत.* *तुम्हीच सांगा ........* *हल्ली आपलं आजारी पडण्याचं प्रमाण थोडं जास्तच वाढलं का नाही ?* *कधी पोटच दुखतं , कधी बी.पी.च वाढतो , कधी शुगर वर खाली होते* *कधी हृदयाचे ठोके वाढून चक्करच येते* *करमत नाही , मन लागत नाही* *छातीत धडधड , मनात* *भीती ....अशा एक ना अनेक तक्रारी .....!* *कारणं काय तर म्हणे ....* *अशुद्ध पाणी , कचरा , रासायनिक खतं , डासांची संख्या वाढणे ....वगैरे , वगैरे ...!* *मग ......* *मग वॉटर प्युरीफायर आलं , रूम फ्रेशनर आलं , डास प्रतिबंधक वड्या , उदबत्त्या , एवढंच काय घरा घरात डास मारण्याच्या बॅटी सुद्धा आल्या .....* *काय परिणाम झाला ?* *डासं मेले पण आजारपण गेलं का ?* *नाही ........* *मग...?* *तुम्ही आम्ही काय केलं आहे...* *जाणते अजाणते पणे सर्वांशी कट्टी धरली आहे !* *हल्ली माणसं एकमेकाला मोकळेपणाने बोलतच नाहीत ......हे खरं कारण आहे आजारी पडण्याचं !* *सख्खे , चुलत , मावस* *आई वडील , बहीण भाऊ* *शेजारी , सहकारी ...या सर्वांशी आपण अबोला धरला आहे !* *ओळख आहे पण संवाद नाही* *नातं आहे पण माया नाही* *अवांतर , मोक्कार विषयावर आपण खूप गप्पा मारतो पण खरं दुःख कुणीही कुणाला सांगत नाही ......हे एक आपल्या वारंवार आजारी पडण्याचं कारण असू शकतं !* *सगे सोयरे , घरकुल , गोकुळ* *नातीगोती , हॅपी फॅमिली , आपली माणसं* *.....अशा गोंडस नावांनी आपण Whats app चे ग्रुप बनवले ....* *पण त्यावर मनमोकळा संवाद होतोय का ?* *मी दुःख सांगितल्यावर मला हसतील का ? अशी जर भीती वाटत असेल ....* *मी Good news सांगितल्यावर आनंदी होतील का नाही ? अशी जर भीती वाटत असेल .....* *तर असे ग्रुप ,अशी नाती काय कामाची ?* *लक्षात ठेवा हिलस्टेशनला , युरोप टूरला जाऊन relax होता येईल ....पण हलकं वाटू शकेल का ?* *टेन्शन कमी होईल का ?* *त्यामुळे वारंवार आजारी पडण्याची कारणे कदाचित ही तर नसतील ......* *मनातल्या भावनांचा निचरा न होणे ...,* *सकारण , विनाकारण प्रत्येक नात्या सोबत झालेली कट्टी ...,* *खूप बोलावं वाटणे ...पण व्यक्त होण्यासाठी जागाच न उरणे ....* *मग आता काय करावं ?* *ज्या वादा मध्ये , अबोल्या मध्ये , फारसं तथ्य नाही असे वाद मिटवण्यासाठी स्वतः होऊन पुढाकार घ्यावा ....* *व्यक्त व्हा , बोला , दो करा* *कदाचित आपलं वारंवार आजारी पडणं थोडं कमी होईल* *लक्षात ठेवा इथून पुढे फक्त त्याच माणसांना दीर्घ आयुष्य मिळेल .....जी माणसं हसण्याच्या आणि रडण्याच्या जास्तीत जास्त जागा निर्माण करू शकतील !* *मग बघा कस जगावं ते.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शेतकरी शेतात बियाणे टाकून येणा-या किंवा उगवणा-या धान्याची वाट पाहणे हे सत्य आशा आहे. कारण त्याला त्याच्या केलेल्या कामावर, मेहनतीवर विश्वास आहे. तो कधीही राशीचक्रावरील राशीनुसार लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवत नाही किंवा त्यानुसार चालतही नाही. जे राशीनुसार चालतात ते मात्र त्यावर विसंबून राहून आपल्याच जीवनात चांगल्याप्रकारे चाललेल्या संसारगाड्याला खीळ बसवतात. त्यामुळे व्हायची ती प्रगती होत नाही आणि करता येत नाही. म्हणून माणसाने कोणत्याही भाकितावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने जीव ओतून केले तर नक्कीच जीवनात यश मिळते तसेच जीवन सुखी व समृद्ध होते यात संशय नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दानशूर राजा आणि संत* एका राज्यात एक दानशूर राजा होता. त्या राजाची ही दानशूराची ख्याती ऐकून एक संत त्याच्या राजवाड्यात आला. तो राजाला भेटायला दरबारात, राजमहालात गेला आणि याचकांच्या रांगेत बसला. राजाने दान देण्यासाठी दोन सेवक ठेवले होते. जेंव्हा संताची वेळ आली तेंव्हा तो सेवकाला म्हणाला,''मित्रा! मी तुझ्या हाताने नाही तर राजाच्या हाताने दान घेईन. नाहीतर मला दान नको." राजाचा सक्त आदेश होता कि कोणीही रिक्त हस्ते जाता कामा नये. शेवटी सेवकांनी राजाची व संताची गाठ घालून दिली. राजाने संतांच्या पायाचे दर्शन घेतले व म्हणाला,"महाराज ! बोला आपली काय इच्छा आहे?" संत म्हणाले," मला इतके धन पाहिजे कि मी त्याद्वारे स्वर्गात जावू शकेन." राजा या उत्तराने हैराण झाला. त्याने विचारले," महाराज, धनाद्वारे आपण कसे काय स्वर्गात जावू शकता?, कृपया स्पष्ट करा!" तेंव्हा संताने सांगितले," राजन! मी आपल्याला हे सांगू इच्छितो कि, केवळ दान देण्याने आपण सुखी व्हाल आणि भिक्षा मागणारयांच्या जीवनात परिवर्तन येईल पण आपण असेच जर दान करीत राहिलात तर मात्र एक दिवस राज्याची तिजोरी मात्र खाली होवून जाईल." त्या क्षणी राजाचे डोळे उघडले, त्याने संताना यावरील उपाय विचारला असता ते म्हणाले, " आपण जे धन दान म्हणून देत आहात तेच रोजगाराच्या स्वरुपात द्या. यातून लोकांना काम मिळेल आणि फुकट खायची यांची सवय कमी होईल. आपल्या या सेवा वृत्तीने ते आयतखाऊ झालेत. आणि आळशी झाले आहेत. त्यांना परिश्रम करायला शिकवा तेच खरे पुण्याचे आणि सत्पात्री दान ठरेल. तात्पर्य- स्वकष्टाने कमवलेल्या धनाचे महत्त्व अधिक असते. स्वावलंबन आत्मविश्वासाची अनिवार्य अट आहे. त्यावरच राष्ट्राचा विकास अवलंबून असतो. राष्ट्रहिताची जोपासना करणे ही सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/02/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वातंत्र्य दिन - ग्रेनेडा* 💥 ठळक घडामोडी :- ● २००३ - महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना जाहीर. 💥 जन्म :- ●१९३८ - एस. रामचंद्रन पिल्ले, भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेता. 💥 मृत्यू :- ● २००३ - जीवनराव सावंत, ज्येष्ठ कामगार नेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : महाराष्ट्रासहपाणीटंचाईचा सहा राज्यांतील प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेसोबत ‘अटल भूजल योजना’ सुरू केली आहे. सहा हजार कोटी रुपयांच्या या योजनेत महाराष्ट्रातील जालना, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यासह१३ जिल्ह्यांचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कलाकारांसाठी 'सांस्कृतिक केंद्र' तयार करण्यासाठी नियोजन करावे- अमित देशमुख* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पेट्रोल खुल्या बाटलीत विकणाऱ्या पेट्रोलपंप मालकांवर कारवाई करा : आमदार प्रतिभाताई धानोरकर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न; विविध नागरी कामांचा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *हिरे उद्योगाला 'कोरोना'चा फटका, 8000 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता, 'दरवर्षी सूरतवरुन 50,000 कोटी रुपयांचे पॉलिश्ड हीरे हाँगकाँगला एक्सपोर्ट होतात'* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बांगलादेशने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला, आता युवा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत थरार रंगणार आहे तो भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : भारताचा सायकलपटू रोजित सिंग याने ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली. या शानदार कामगिरीमुळे आता जगातील अव्वल १८ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचा समावेश होईल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हसा आणि हसवा* जीवनात हसण्याचे महत्व ....! वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/blog-post_29.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक होता सावळा* - सौ. कुंदा विकास झोपे. उल्हासनगर ४.जि ठाणे. एक होता सावळा, भलताच बावळा. झाडावर दिसला, त्याला हो आवळा. उचलूनी दगड, आवळ्याला मारला, दगड सावळ्याच्या, डोक्यात पडला. झाडाने का मला, दगड मारला. सावळ्याला मोठा प्रश्न हा पडला. आईची शिकवण , आठवली त्याला. पेराल ते उगवेल, मनात बोलला. क्षमा मागितली, झाडाची त्याने. पुन्हा नाही मारणार, सांगतो मी खरे . झाड मग लागले, सावळ्याशी हसू. पान पान लागले, त्याच्या मनात ठसू. अलगद आली , वाऱ्याची झुळूक. पडता आवळे, खाल्ले चुटुक चुटुक. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" धैर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *राम गणेश गडकरी यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक कोणते ?* प्रेमसंन्यास 2) *महाराष्ट्रातील कृष्णा व कोयना या नद्यांच्या संगमाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?* प्रीतीसंगम 3) *आयफेल टॉवर कोणत्या शहरात आहे ?* पॅरिस ( फ्रान्स ) 4) *भारतातील पहिली अणुस्फोट चाचणी कोठे झाली ?* पोखरण 5) *सर्वाधिक खोली असणारा महासागर कोणता ?* पॅसिफिक महासागर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंढरीनाथ बोकारे, पत्रकार, नांदेड 👤 भारत भाऊ राखेवार, नांदेड 👤 खंडु यरकलवाड बेळकोणीकर 👤 पवन गट्टूवार, सहशिक्षक, कुंडलवाडी 👤 विजय कुंडलीकर 👤 संतोष कोयलकोंडे, सहशिक्षक, देगलूर 👤 विनायक गोविंदराव पारवे 👤 साईनाथ येनगंटीवार 👤 कवी बी. एल. खान 👤 प्रसन्न करमरकर 👤 पोतन्ना चिंचलोड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, संकटे रडणाऱ्याला भीक घालत नाहीत, तर ती लढणाऱ्याला भिऊन दूर पळून जातात. जीवनाच्या संघर्षात लढणे विसरू नका.प्रत्येक लढा एक नवीन धडा देऊन जातो. जिंकलात तर जग डोक्यावर घेईल,हारलात तर नवा अनुभव देईल.दोघांपासून सुखच ,मग स्वतःवर भरवसा ठेवा.आणि उतारा लढ्यात अगदी महाकाल बनून. जीवन कधी कधी अडथळ्यांची शर्यत बनते. पराभव, अपयश, जिव्हाळ्याच्या व्यक्तीचा दुरावा किंवा मृत्यू, अपमान अशी संकटे एकापाठोपाठ येतात. कधी कधी एकापेक्षा आधिक संकटे एकत्र येऊन डोक्यावर धाडकन् आदळतात. आपण कोलमडून पडतो. निराशेच्या गर्तेत कोसळतो. सुखाचा किरणही कोठे दिसत नाही. भयाण काळोखात चाचपडताना बाहेर पडण्याची वाट सापडत नाही. खरंच, कधी कधी असं होतं पण; ही 'कधी कधी' घडणारी अवस्था तात्पुरती आणि आल्पकाल टिकणारी असते. ती संपून पुन्हा सुखाचा शिडकावा होणार असतो. सुखप्राप्ती ही माणसाची मुलभुत प्रेरणा आहे. त्या प्रेरणेच्या समाधानासाठी संकटाच्या किंवा दु:खाच्या प्रसंगी धीर धरावा लागतो. ओढवलेल्या परिस्थितीचा स्विकार करून, त्याच्यावर मात करण्याचे सामर्थ्य आणि स्वातंत्र्य आपल्याला माणूस म्हणून लाभले आहे, हे स्वत:ला पटवून दिले की दु:खाचा भयंकरपणा निम्म्याने कमी होतो. पुढची वाट दिसू लागते. आपल्याला हवा असलेला बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. त्यासाठी दुस-या कशावर किंवा कोणावर अवलंबून राहायचे नाही असे धोरण ठेवले तर दु:ख वेगाने दूर पळते आणि सुख चोरपावलांनी आत येते. जिंदगी हर कदम एक नई जंग है। जीत जायेंगें हम ,तू अगर संग है। अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुख आणि दुःख हे प्रत्येक मानवी जीवनातले दोन वेगवेगळे रंग आहेत.सुखाच्या रंगात सारेच मिसळून जातात.त्यात एवढे रंगून जातात की,दुस-याची आठवणसुद्धा येत नाही.इतरांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नातही नसतात.एवढा अपार आनंद होतो.पण दु:खाचे तसे नाही.दु:खात मात्र त्याला सगळ्यांचीच आठवण येते.आपल्याला अशावेळी आपल्याजवळ कुणीतरी यावं आणि दिलासा द्यावा असं वाटतं.दु:ख पचविण्याची ताकत त्याच्यामध्ये कमी असते.म्हणून अशावेळी आपल्या मदतीला कुणीतरी यावं यासाठी धावा करतो.अशावेळी मात्र आपल्यापासून आपले आणि इतरही लोक दूर जातात.परंतू एक लक्षात ठेवायला हवे,सुखाच्यावेळी आपण कुणाला विचारले नाही मग दु:खाच्यावेळी कसे बरे विचारतील ? म्हणून माणसाने सुख असो वा दु:ख असो दोन्ही समान मानून सदैव पाठीशी रहावे.एकमेकांच्या मदतीला धावून जावे.हाच सुखदु:खाचा मानवी जीवनव्यवहार आहे.हा व्यवहार आपल्या व इतरांच्या जीवनात समानतेने व्हावा एवढेच ज्ञात असावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रेघ लहान झाली.* अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ मारली आणि बिरबलाला विचारले. “ही रेघ पाहिलीस? ही रेघ लहान करायची, पण पुसायची नाही, जमेल तुला?” बिरबलाने एकवेळ बादशहाकडे व एकवेळ रेघेकडे पाहिले. थोडा विचार केला. पटकन खाली वाकला. रेघेशेजारी दुसरी लांब रेघ मारली आणि म्हणाला, “झाली की नाही महाराज तुमची रेघ लहान?” बादशाह चकित होऊन पाहतच राहिला.! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/02/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- वैतंगी दिन - न्यू झीलँड. बॉब मार्ली दिन - जमैका, इथियोपिया. ● १९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या. ● १९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा (चित्रपट) हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. ● २००१ - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. ● २००१ - पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध. ● २००३ - संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले. 💥 जन्म :- ● १९१२ - एव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण. ● १९३९ - ब्रायन लकहर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ● १९४५ - बॉब मार्ली, जमैकन संगीतकार. 💥 मृत्यू :- ● १९३९ - सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज. ● १९७६ - ऋत्विक घटक, चित्रपट निर्माते. ● १९८९ - चार्ल्स गुफ्फ्रोय, बर्लिनची भिंत ओलांडताना मृत्यु पत्करणारा शेवटचा माणूस. ● २००१ - बॅ.विठ्ठलराव गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या नावाने ट्र्स्टची स्थापना करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेमध्ये केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागपूर महापालिकेच्या आपली बसमध्ये मोठया प्रमाणात तिकीट चोरी केली जाते. गेल्या महिना भरात तिकीट चोरी प्रकरणात २२ कंडक्टर बडतर्फ करण्यात आले असून ८१ कंडक्टरची आय.डी.लॉक करण्यात आल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या; खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कोरोना व्हायरसमुळे झालेला आजार बरा करण्याकरीता समाजमाध्यमांमध्ये सध्या जे संदेश फिरत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबईः उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं तीन मोठे निर्णय घेतले आहेत. कंपनी एकत्रीकरण दस्तांच्या मुद्रांक शुल्कावर कमाल मर्यादा 50 कोटीपर्यंत वाढवण्याला मंजुरी देण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ट्वेंटी-20 मालिकेतील मानहानीकारक पराभव, कर्णधार केन विलियम्सला झालेली दुखापत या दुहेरी संकटातून वाट काढत यजमान न्यूझीलंड संघानं वन डे मालिकेत दणक्यात सुरुवात केली. भारताचा केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसीने भारतीय संघावर सामन्यानंतर दंड ठोठावला आहे. भारतीय संघाने निर्धारीत वेळेनंतर चार षटके टाकली होती. या षटकांसाठी आयसीसीने भारताय संघातील खेळाडूंच्या मानधनावर ८० टक्के दंड ठोठावला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लिहिते व्हा......!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मसाला भात* - गणेश दत्तू लोंढे कासारी ता बार्शी जि सोलापूर रंगला अमुचा खेळ विटी दांडू चावडीसमोरी ताकतीने मारली विटी बघताच गेली पत्र्यावरी म्हातारी ओरडत आली घेऊन हाती काठी आम्ही भिऊन पळालो घेऊन दांडू विटी दमलो थकलो खेळून गडबडीत आलो घरी आई उभी होती रागाने वाटेत दारी आईनं केला होता बटाटा, मिरची टाकून भात मांडी घालून बसलो मी मसाला भात खात *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" आंधळ्या श्रद्धेपेक्षा डोळस बुद्धीने विचार करणे केव्हाही श्रेष्ठ होय. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रक्त शुद्धीकरणाचे काम कोणता अवयव करतो ?* फुफ्फुस 2) *जगातील सर्वात जुना खेळ कोणता ?* पोलो 3) *'सरोवराचा देश' असे कोणत्या देशाला म्हटले जाते ?* फिनलँड 4) *ऑक्सिजन या वायूचा शोध कोणी लावला ?* प्रिस्टले 5) *जगातील सर्वात मोठे महासागर कोणते ?* पॅसिफिक महासागर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुहास सदावर्ते, दै. सकाळ, जालना 👤 कोंडेवार साईनाथ, भैसा *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रचंड थकवा आल्यानंतर, दमल्यानंतर हळूहळू आपण आपला मूळ लयीतला श्वास गवसणं किती विलक्षण असतं. स्वत:चा ठाव लागणं, स्वत:चा थांग लागणं, जणू पुनर्जन्मच. म्हणून जगण्याच्या सुलभीकरणात थकवा गमावून बसू नये. थकव्या थकव्यात फरक करावा. प्राणपणानं जीव लावून खरंखुरं थकावं आणि थकव्याच्या गर्भातून स्वत:चं सर्जन होताना अनुभवावं. अर्थात इतकं सगळं घडलं तरी बाहेरच्या जगाला तुम्ही निव्वळ दमलेले, थकलेले दिसता. त्यांना जाणवतं की, तुमचा श्वास फुललाय, छातीचा भाता वरखाली होतोय. तुमच्या आप्तांना तुमची चिंता वाटते. त्यांना वाटतं की, तुम्ही इतकी दगदग करू नये. सकस, पौष्टिक अन्न खावं. आप्तांची चिंता रास्त असते.* *तरीसुद्धा आपली शक्ती पणाला लावून थकणं-दमणं योग्य असतं. थकण्याला घाबरून, न थकण्याचे उपाय शोधणं हा सर्वथा अलाभाचा व्यवहार आहे. त्यानं थकणं घटेल आणि आपले नवनवे जन्मही घटतील. श्वास फुलल्याशिवाय कसं कळणार श्वास घेतो आपण, छातीचा भाता वरखाली झाल्याशिवाय कसं कळणार की, प्राणवायुचं चलनवलन किती सुखाचं असतं. तो फुफ्फुसांना व्यापतो म्हणजे काय होतं हे कसं समजणार ? श्वासोच्छ्वासानं शरीरावर उठणा-या लाटांचं उठणं-विरणं कसं निरखता येणार? शक्तीपाताच्या अग्रावर जाऊन कोसळण्याच्या क्षणी स्वत:चा थांग सापडण्याची धडधड ऐकू येण्याला तुलना नाही. हेच थकव्यातलं सर्जन आणि हाच सर्जनाचा थकवा..!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, भारतमाते पुत्र शहाणे अमित तुला लाभले, तुझ्या कुशीला परि जन्मली सारी वेडी मुले. ही केशवसुत याची कविता भारत मातेचे पुत्र नक्कीच प्रत्येक क्षेत्रात खरी करून दाखवतात. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला पाकिस्तानविरुद्ध सेंच्युरी मारणे आणि उत्तुंग षटकार ठोकून भारतीय टीमला विजयी करणे हे कोट्यवधी क्रिकेटप्रेमी भारतीयांचं स्वप्न असावं! एकोणीस वर्षांचा यशस्वी जयस्वाल हे स्वप्न आज जगला! १९ वर्षांखालील (U-19) वर्ल्ड-कपमध्ये नाबाद १०५ धावा करून, पाकिस्तानचा धुव्वा उडवून हे स्वप्न जगला. पण ही इतकीच गोष्ट नाहीये त्याची! एके काळी झोपडीत किंवा फुटपाथवर राहून, पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणारा अत्यंत गरीब घरातला मुलगा, भारतीय U19 टीमचं प्रतिनिधित्व करून टीमच्या विजयाचा शिल्पकार बनू शकतो हा ‘भारतीय स्वप्ना’चा उत्तुंग षटकार आहे!! उत्तर प्रदेशातल्या एका अत्यंत छोट्या खेड्यातल्या गरीब घरातला हा मुलगा, वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळण्याच्या वेडापोटी मुंबईत आला. एका डेअरीमध्ये राहायची जागा मिळाली आणि क्रिकेट अॅकॅडमीत प्रवेश मिळाला. डेअरीतली पडेल ती कामं करून हा पोट भरायचा आणि दिवसभर क्रिकेट खेळायचा. क्रिकेटमुळे हा फार कामं करत नाही म्हणून डेअरीवाल्याने ह्याला हाकलून दिलं.मग त्याच्या एका काकांच्या मदतीने मुंबईतल्या मुस्लिम समाजाच्या एका तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी त्याला राहायला जागा मिळाली. तंबू/झोपड्या असं राहायचं ठिकाण. उन्हाळ्यात तिथे राहणं असह्य झालं की उघड्यावर, रस्त्यावर झोपायचं; पण काहीही झालं तरी दिवसभर क्रिकेट खेळायचं!! पोट भरण्यासाठी तो पाणीपुरी विकायचा!!ज्वाला सिंग नावाच्या एका क्रिकेट कोचला त्याचा खेळ आवडला आणि यशस्वीचं आयुष्य बदललं. ज्वाला सिंगने त्याला स्वतःच्या घरी राहायला नेलं. कोचिंग देत घडवलं आणि यशस्वी जोरदार क्रिकेट खेळायला लागला.२०१५च्या Giles Shield interschool च्या एका मॅचमध्ये ३१९ रन्स ठोकून आणि १३ विकेट्स घेऊन तो ‘लाइमलाइट’मध्ये आला आणि गेली पाच वर्षे तो ज्युनियर क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये धडाकेदार विक्रम करत आहे!! यंदाच्या U19 ‘वर्ल्ड कप’ मध्ये तो भारतीय टीमसाठी जोरदार पराक्रम करत आहे अन् २०२०च्या ‘आयपीएल’साठी ‘राजस्थान रॉयल्स’ने दोन का अडीच कोटी रुपयांच्या करारावर त्याला टीममध्ये घेतले आहे!!अमेरिकेत, आपल्या टॅलेंटने झटपट मिलियन डॉलर्स कमावणे ह्याला ‘अमेरिकन ड्रीम’ म्हणतात. तसंच आपल्या टॅलेंट आणि कष्टांच्या जोरावर भरपूर पैसे आणि प्रसिद्धी मिळवणे, तीही क्रिकेट किंवा बॉलिवुडमध्ये, हे कदाचित ‘इंडियन ड्रीम’ म्हटलं पाहिजे!यशस्वी जयस्वाल हे एका अत्यंत यशस्वी इंडियन ड्रीमचं उदाहरण आहे!!त्यानं यशाचे नवनवे उत्तुंग षटकार मारत राहावेत अन् असे अनेक यशस्वी ‘ड्रीमर्स’ भारतात तयार होत राहावेत ही मनोमन सदिच्छा!! अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात एखादे चांगले ध्येय आपल्या मनात नाश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अनेक बिकट प्रसंगाशी सामना करावा लागतो. त्याच्याशिवाय ध्येयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.केवळ ध्येय मनात ठेवले आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तर आपण आपल्या जीवनात अपयशी ठरलो आहोत हे निश्चित समजावे.म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कोणताही खडतर प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खर्या भक्ताला रत्नांचे मूल्य दगडांइतकेच!* एकदा राजा कृष्णदेव यांच्या आमंत्रणानुसार भक्त पुरंदरदास राजवाड्यात गेले होते. परत जातांना राजाने दोन मुठी भरून तांदूळ त्यांच्या झोळीत टाकत म्हटले, महाराज, या लहानशा भेटीचा स्वीकार करून माझ्यावर कृपा करावी. राजाने त्या तांदळात थोडे हिरे मिसळले होते. पुरंदरदासांच्या पत्नीने घरी तांदूळ निवडतांना त्यांत काही मौल्यवान रत्ने असल्याचे पाहिले. तिने ती तांदळातून निवडून काढून कचरापेटीत फेकून दिली. भक्त पुरंदरदास प्रतिदिन राजसभेत जात होते. राजा प्रतिदिन त्यांना हिरे दोन मुठी तांदळात मिसळून द्यायचा; परंतु त्याच्या मनात विचार यायचा, पुरंदरदास धनाच्या लोभापासून मुक्त नाहीत. जर ते मुक्त असते, तर ते पुन्हा भिक्षेसाठी राजसभेत आले नसते.एके दिवशी राजा पुरंदरदासांना म्हणाला, भक्तराज, लोभ मनुष्याला आध्यात्मिक प्राप्तीपासून दूर करतो. आता तुम्ही स्वतःच स्वतःविषयी विचार करावा. राजाच्या तोंडून असे ऐकल्यावर भक्त पुरंदरदासांना अतिशय वाईट वाटले. ते दुसर्या दिवशी राजाला आपले घर दाखवायला घेऊन गेले. त्या वेळी पुरंदरदासाची पत्नी थाळीत तांदूळ घेऊन ते निवडत होती. त्या वेळी राजा आणि पुरंदरदासांची पत्नी यांच्यात पुढील संभाषण झाले. राजा : देवी, तुम्ही काय करत आहात ? ती (पुरंदरदासाची पत्नी) : महाराज, कोणीतरी भिक्षेत तांदळासह काही मौल्यवान रत्नेही मिसळून आम्हाला देतो. मी त्या दगडांना निवडून वेगळे करत आहे. राजा : तुम्ही त्यांचे काय करणार ? ती : घराबाहेरील कचरापेटीत फेकून देईन. आमच्यासाठी या दगडांचे काही मूल्य (किंमत) नाही. राजाने त्यांना दिलेली ती सर्वच मौल्यवान रत्ने कचरापेटीत पडलेली पाहिली. तेव्हा तो आश्चर्यचकीत झाला आणि त्याने त्या भक्त-दांपत्याच्या पायाशी लोटांगण घातले.आणि म्हणाला खरोखरच खरा भक्त कधीच धनाची लालसा करीत नाही.त्यास मौल्यवान रत्नाचे मूल्यही दगडासमान असते. संदर्भ : (ऋषीप्रसाद, एप्रिल २०१०) *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/02/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९९६ - मुंबई येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 'सोना माटी' या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले. ● २००३ - अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा. ● २००४ - पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला. 💥 जन्म :- ● १९०० - अडलाई स्टीवन्सन, अमेरिकन राजकारणी. ● १९७६ - अभिषेक बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ● १९२० - विष्णुबुवा जोग, वारकरी संप्रदायाचे कार्य पुढे नेणारे. ● २००० - वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष. ● २००३ - गणेश गद्रे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! ठाकरेंच्या राज्यात येणार पाच दिवसांचा आठवडा, केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही पाच दिवसांचा आठवडा करण्यात येणार आहे. यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मातृवंदना सप्ताहाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसरा, पंतप्रधान मातृवंदना योजनेंतर्गत प्रथम प्रसव होणाऱ्या महिलांना पौष्टिक आहार मिळावा, मोल मजुरी करणाऱ्या महिलांना कामानिमित्त बाहेर जाताना आराम मिळावा, बाळाची निगा घेता यावी, यासाठी तीन हप्त्यांमध्ये एकूण 5 हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात येते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *वाळूज महानगर : ग्रामीण भागात रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध वाळूज महानगर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आता गावात बोगस डॉक्टर आढळून आल्यास संबंधित गावातील सरपंच व ग्रामसेवकाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अलिबाग, एलिफंटा बेटापर्यंतचा प्रवास सुखकर होणार; कुलाब्यातील जेट्टी, प्रवासी वाहतूक टर्मिनलला सरकारची मान्यता, बंदरविकास मंत्री अस्लम शेख यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबादच्या रफिक झकेरीया महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालय कॅम्पस मोबाईल मुक्त करण्याचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातची सुनावणी आज होणार असल्याची माहिती न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबईकर यशस्वी जैस्वालच्या नाबाद शतकी खेळाच्या जोरावर भारताने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर 10 गडी राखून केली मात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवन सुंदर आहे.* लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *छकुला* © डॉ. पवन कोरडे, नागपूर शोभे गोड गोंडस बाळ रांगता वाजे छुमछुम वाळ मनगटी कडा चांदीचा गाली बाळाच्या काजळतिळ छकुल्याची छकुली नजर भिरभिरते बाहुलीवर बाहुलीही साद देते छकुल्यासवे खेळण्या तत्पर कोण कसे सांगावे काय बाळाच्या मनात 'खाऊ' समजूनी छकुला धरे काहीही मुखात कुणाचा स्वर ऐकूनी दुडदुड धावतो घरी छकुला आधार घेऊनी ऊभा राहतो दारी पाहता हे कुकुलं बाळ लोपते मनातली मरगळ पात्यासम लवते कात निष्प्राण देही संचारते बळ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो ?* फिलिपाईन्स 2) *जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी वनस्पती कोणती ?* बांबू 3) *कस्तुरबा गांधी यांचे टोपण नाव काय होते ?* बा 4) *कुष्ठरोग्यांसाठी वसाहत स्थापन करणारी भारतातील पहिली विभूती कोण ?* बाबा आमटे 5) *भारतात मोघल सत्तेची स्थापना कोणी केली ?* बाबर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अभिषेक बच्चन, सुपरस्टार 👤 सौ. रंजना जोशी, सहशिक्षिका, धर्माबाद 👤 सदाशिव मोकमवार, येताळा 👤 निलेश गोधने, सहशिक्षक, नांदेड 👤 भीमराव वाघमारे 👤 संदीप मुंगले, धर्माबाद 👤 श्याम राजफोडे 👤 विठ्ठल पेंडपवार, नांदेड 👤 बाळासाहेब कदम, सहशिक्षक, धर्माबाद 👤 अच्युत पाटील खानसोळे, सहशिक्षक, नांदेड 👤 उमाकांत म्याकलवार 👤 वैजनाथ जाधव साहेब 👤 डॉ. जितेंद्र डोलारे, पुणे 👤 दत्ता हेलगंड, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवन कधी कधी अडथळ्यांची शर्यत बनते. पराभव, अपयश, जिव्हाळ्याच्या व्यक्तीचा दुरावा किंवा मृत्यू, अपमान अशी संकटे एकापाठोपाठ येतात. कधी कधी एकापेक्षा आधिक संकटे एकत्र येऊन डोक्यावर धाडकन् आदळतात. आपण कोलमडून पडतो. निराशेच्या गर्तेत कोसळतो. सुखाचा किरणही कोठे दिसत नाही. भयाण काळोखात चाचपडताना बाहेर पडण्याची वाट सापडत नाही. खरंच, कधी कधी असं होतं पण; ही 'कधी कधी' घडणारी अवस्था तात्पुरती आणि आल्पकाल टिकणारी असते. ती संपून पुन्हा सुखाचा शिडकावा होणार असतो.* *सुखप्राप्ती ही माणसाची मुलभुत प्रेरणा आहे. त्या प्रेरणेच्या समाधानासाठी संकटाच्या किंवा दु:खाच्या प्रसंगी धीर धरावा लागतो. ओढवलेल्या परिस्थितीचा स्विकार करून, त्याच्यावर मात करण्याचे सामर्थ्य आणि स्वातंत्र्य आपल्याला माणूस म्हणून लाभले आहे, हे स्वत:ला पटवून दिले की दु:खाचा भयंकरपणा निम्म्याने कमी होतो. पुढची वाट दिसू लागते. आपल्याला हवा असलेला बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. त्यासाठी दुस-या कशावर किंवा कोणावर अवलंबून राहायचे नाही असे धोरण ठेवले तर दु:ख वेगाने दूर पळते आणि सुख चोरपावलांनी आत येते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *हिरवा निसर्ग हा भवतीने* *मन सरगम छेडा रे,* *जीवनाचे गीत गा रे,* *धुंद व्हा रे।* *खरय ही देणं स्वर्गाचं दर्शनच घडविते.* *भारताला लागलेला निसर्ग तर जगाला मोहिनी घालतो.* *आणि आपण त्यावर वेगवेगळे पाशवी अत्याचार करतो.* *निसर्गाच्या सानिध्यात घालविलेले क्षण मनाला प्रसन्न करतात.* *उमललेल्या नाजूक फुलांचा बहर, हिरव्यागार रानातून मंद* *शिळ घालणारा प्रसन्न वारा या सर्वांमध्ये निसर्गाचं एक दैवी रूप* *दडलेलं आहे. ही सुंदर कलाकृती पाहून अचंबित व्हायला* *होतं. निसर्गाचं निरीक्षण केल्यावर जाणवतं की, या नाजूक* *फुलांवर सुंदर रंगाची उधळण कोणी* *केली असेल ?* *हिरव्या रंगाने नटलेल्या धरणीवर निळं आकाश पसरलेलं आहे. या अथांग आकाशावर सर्व दिशांना उजळून टाकणारा अलौकिक रंगाचा मनमोहक चित्रण करणारा चित्रकार कोण आहे ? आपल्या आजूबाजूला पसरलेल्या निसर्गाचा चमत्कार व सुंदरता बघायला मानवाकडे फक्त एक नजर आहे. पण तो अनामिक चित्रकार असंख्य नजरेने क्षितिजा पलिकडे पाहात आहे. निसर्गाचे हे सगुण व प्रेरणेने भरलेलं भव्य सृष्टी चित्र सुंदरतेने चित्रित करणा-या चित्रकाराला माझा सलाम !!!* *निसर्गाला प्रणाम* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक मौल्यवान आहे.कारण बाह्यसौंदर्य अधिक दिसण्यासाठी नानाप्रकारचे सौंदर्य प्रसाधने व मूल्य देऊन निर्माण केले तरी ते जास्त काळ टिकत नाही किंवा टिकवता येत नाही.ते अल्पकालीन आहे. आंतरिक सौंदर्य असे आहे की,त्याची किंमतही मोजून आणता येत नाही आणि अन्य माध्यमांतून प्राप्तही करता येत नाही.असे सौंदर्य आपल्या अंतःकरणात उपजतच असते फक्त त्याला योग्यप्रकारे हाताळता आले पाहिजे.ह्या आंतरिक सौंदर्यामुळे अनेक नाती जोडून जीवनातला आनंद उपभोगता येतो न इतरांनाही आपल्या आनंदात व इतरांच्या आनंदात भर पाडता येते तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्य न देता शेवटपर्यंत टिकवता येते.फक्त त्याच्यासाठी आंतरिक तळमळ असायला हवी. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आत्मपरीक्षण* एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो. *तरुण*(अदबीने) : दुकानदार काका, मी एक फोन करू का ? तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खुश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो. (डायलवाला जुन्या काळाचा फोन असल्याने पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज इकडे इतरांना देखील अस्पष्ट ऐकू यायचा !! तसे ते बोलणे दुकानदार हळूच ऐकू लागला) *** *तरुण* : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो. *महिला* : (तिकडून बोलतेय) नको. मी एक महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे. *तरुण*: बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !! *महिला* : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ? *तरुण* : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !! *महिला* : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !! *तरुण*: हसत हसत फोन ठेवून निघाला. दुकानदाराने त्याला थांबवले. आणि विचारले की, "तू प्रयत्न केलास पण नोकरी मिळाली नाही ना ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस" यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, "मला नोकरी नकोय. नक्की नकोय." *दुकानदार* : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ? *तरुण* : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही ? हे चेक करत होतो" असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे *चकित होऊन* पाहत राहतो. *तात्पर्य* : अधूनमधून आपण स्वतःच स्वतःचे *आत्मपरीक्षण* करणे गरजेचे आहे. *तुम्ही नोकर असा की मालक*. ते महत्वाचे नाही तर तुम्ही करत असलेले काम चांगले होतेय का हे महत्वाचे आहे. आणि ते सर्वात जास्त कोण ओळखू शकतो तर *आपण स्वतः* !! *जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/02/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक कर्करोग दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● २००४-मार्क झुकरबर्ग ने फेसबुक ची स्थापना केली. ● १९४८-श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले. ● १९४४-'चलो दिल्ली' चा नारा देत आझाद हिंद सेनेची दिल्लीकडे कूच. 💥 जन्म :- ● १९७४-ऊर्मिला मातोंडकर, अभिनेत्री. ● १९३८-पं बिरजू महाराज,कथ्थक नर्तक व गुरू ● १९२२ - स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी. 💥 मृत्यू :- ● २००१- पंकज रॉय,क्रिकेटपटू ● १९७४-सत्येंद्रनाथ बोस,भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ● १६७०-नरवीर तानाजी मालुसरे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू-काश्मीर - रियासी जिल्ह्यात काल भारतीय लष्कराचं ‘चीता’ हे हेलिकॉप्टर कोसळलं, कसलीही जीवितहानी नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सांगली येथे २७ मार्च ते १४ जून या कालावधीत पार पडणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खा. शरद पवार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सोलापूर विमानतळ परिसरात लागली आग; अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 8 लाख कर्करुग्णांवर उपचार- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 361 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात थंडीचा जोर लवकरच ओसरणार; अनेक शहरांच्या किमान तापमानात वाढ, दक्षिणेकडून उष्ण वारे वाहू लागले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *NZ vs IND : रोहित शर्माची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार; हिटमॅनच्या कसोटी कारकिर्दीला मोठा धक्का* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तंबाखूमुक्त जीवन जगता येईल ?* https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_10.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अक्षरज्ञान* - मीना खोंड, हैद्राबाद शिकावे अक्षर व्हावे साक्षर ज्ञानामृताचा महिमा थोर ... मराठी अमृत करावी आत्मसात शब्द बोलती वेदवेदांत .... कथा सांगती कविता गाती पुस्तक आपुले मित्र असती .... वाचन सातत्य लेखन नित्य जीवनाचे तत्वज्ञान अक्षरा अक्षरात ..... *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" सज्जन लोकांना जबाबदारीने काम करण्यासाठी कायदे सांगायची गरज पडत नाही पण दुर्जन मात्र कायद्याच्या पळवाटा शोधत असतात."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *गाजरमध्ये कोणते जीवनसत्व असते ?* ब 2) *माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?* बचेंद्रि पाल 3) *भारताची सीमारेषा कोणत्या देशासोबत सर्वात जास्त आहे ?* बांग्लादेश 4) *तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?* तानसा नदी ( ठाणे ) 5) *कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो ?* काळा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णा तिम्मापुरे, पत्रकार, धर्माबाद 👤 राजरेड्डी गडमोड, येताळा 👤 संजय गायकवाड, धर्माबाद 👤 डी. एन. पाटील बेंबरेकर, देगलुर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्यातील पहिल्या पंधरा, सोळा वर्षाचा कालावधी कमालीचा संवेदनशील असतो. या कालावधीत मुलांवर होणारे संस्कार महत्वाचे असतात. शारीरिक, भावनिक, बौद्धिक, आणि मानसिक विकासासाठी हा कालावधी महत्वाचा असतो. या दरम्यान मुलांसाठी सकारात्मक वातावरणाची पूर्तता करणे, ही पालकांची आणि समाजाचीही जबाबदारी असते. काही पालक त्यांच्या मुलांशी संवाद साधण्यात कमी पडतात. ए वन शाळा, काॅलेजात व क्लासमध्ये प्रवेश मिळवून देणे, आर्थिक बाबींची पूर्तता करणे, एवढीच जबाबदारी असल्यासारखे वागतात. स्वत: पैसे मिळविण्यासाठी धावत राहतात आणि मुलांवर आपल्या आपेक्षा लादून त्यांनाही आयुष्याच्या स्पर्धेत ढकलून मोकळे होतात.* *कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती किंवा दैनंदिन वाईट सवयी युवकांच्या नैराश्याला कारणीभूत ठरतात. नकारात्मक प्रवृत्तींकडे आकर्षिले जाऊन वाईट सवयींचे शिकार बनतात. परिणामी सहका-यांशी, आई-वडिलांशी वाद होतात, त्याचे रूपांतर एकाकीपणात होते. एकाकीपण नैराश्याला निमंत्रित करते. नवनवीन गोष्टी शिकून घेण्याची उत्सुकता विकसित करायला हवा. निसर्गाशी संवाद साधता यायला हवा. जीवनमूल्यांचा अर्थ समजून घेऊन ती कृतीत उतरविणे जीवनात गरजेचे असते. विचार आणि आचार यांच्यात सुसंगती ठेवायला हवी. त्या त्या वयात सकारात्मक गोष्टी केल्याने व्यक्तिमत्व विकसित होते, आत्मविश्वास वाढतो, विवेकबुद्धी वाढते, निर्णयशक्ती वाढीस लागते. संत तुकाराम महाराज म्हणतात..मन प्रसन्न करू..मोकळेपणाने बोलू आणि सकारात्मक होऊ.!* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, खूप मोठे व्हायचे, मग खूप सारी पुस्तके वाचली पाहिजेत,खूप मोठी डिग्री मिळवली पाहिजे असं काही नाही. आपले काम मनापासून करणे,त्यात जीव ओतणे हे महत्वाचे आहे. मौजे निट्टूर ता चंदगड येथील रामा सुतार या तरुणाने सेफ्टी बॅग तयार केलेली आहे ती बॅग जर कोणी चोरून न्यायच प्लॅन केलं तर त्या बागेतील सायरण मोबाईल aap च्या सहायणे चोर चोर असा आवाज करतो त्या प्रत्यक्षिकाच शूटिंग केलं आहे , रामा कदाचित घरच्या आर्थिक परिस्थिती मुळे दहावीपर्यंत पण शिकला नसेल पण आपल्या कल्पकतेच्या जोरावर सायन्स exibution मधील नवनवीन 100 च्या वर प्रयोग त्यांनी केले आहेत. रामा हा उत्तम कलाकार निर्माता, दिग्दर्शक आहे, उत्तम गायक आहे ,उत्तम फोटोग्राफर आहे,उ तबलावादक ,हार्मोनियम वादक आहे. एवढंच काय बिघडलेला कॉम्पुटर सुद्धा तो सहज करतो, बऱ्याच प्रकारची सॉफ्टवेअर ची निर्मिती सुद्धा त्याने केलेली आहे, त्यांनी तयार केलेली थर्मोकोल कटिंग ची मशीन मी स्वतः बघून थक्क झालो होतो,त्या मशीन ने केलेलं सुंदर नक्षीकाम व पोल कटिंग च कामआजही माझ्या नजरे समोरून जात नाही . अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण पुस्तके वाचायला शिकलो.त्यातून ज्ञान घेऊन जगायला शिकलो. पण माणसे जोडण्याचे काम मात्र शिकलो नाही. माणसे जोडण्यापेक्षा माणसापासून दूर दूर राहायला शिकलो. नातेसंबंध, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आपल्यातला हळुहळू कमी करायला शिकलो .खरे तर ज्ञानाने माणसे जोडली जातात पण माणसे तोडायला शिकलो. आम्ही चार पुस्तके शिकलो की, आमच्यासारखे या जगात कोणीच श्रेष्ठ नाही असे म्हणायला लागलो. अशा माणसांना खरे ज्ञान म्हणजे काय बहुतेक समजले नसावे .उलट अशी माणसे शिकून सवरुनही अज्ञानच आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही.ज्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनातील अज्ञान घालवणे आणि इतरांमधील असलेला अज्ञानपणा घालवून जीवन जगण्याची नवी दिशा दाखवने हा आहे. हा मुख्य उद्देश ठेऊन जगणे म्हणजे ज्ञान होय. अशा वर वर ज्ञान घेतलेल्या माणसांनी खरे ज्ञान म्हणजे काय हे शिकून माणसे जोडण्याचे काम शिकायला हवे. - व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद.9421839590. 📚📖📚📖📚📖📚📖📚📖 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संघटितपणाचे महत्त्व* एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली. वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता नाही आली. पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले. *तात्पर्यः एकीचे बळ फार मोठे असते.कोणतेही कार्य चांगले पार पाडण्यासाठी संघटित असणे फार महत्त्वाचे आहे.* संदर्भ : सनातन निर्मित ग्रंथ, ‘बाेधकथा’.. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/02/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९६६ - सोवियेत संघाचे लुना ९ हे मानवविरहीत अंतराळयान चंद्रावर उतरले. ● १९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले. ● १९२८- 'सायमन गो बॅक' या घोषणांनी मुंबईत सायमन कमिशनचा निषेध करण्यात आला. 💥 जन्म :- ● १९६३ - रघुराम राजन, भारतीय अर्थशास्त्री,रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर 💥 मृत्यू :- ● १११६ - कोलोमान, हंगेरीचा राजा. ● १४५१ - मुराद दुसरा, ऑट्टोमन सम्राट. ● १९६३- सी एन अन्नादुराई, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ● १९२४- वुड्रो विल्सन, अमेरिकेचे २८वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *चीनच्या वुहान शहरात अडकलेल्या 330 लोकांना घेऊन दुसरे विमान भारतात परतले, सर्वांना 14 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात जाहिरांतीवर करण्यात आला 15 कोटी 51 लाख रुपयांचा खर्च, माहिती अधिकार मधून माहिती उघड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे लिखित तुंबारा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यात पार पडला. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान सयाजी शिंदे यांनी बीडमध्ये आयोजित वृक्ष संमेलनाची माहिती दिली. बीड जिल्ह्यातील डोंगरावर १३ आणि १४ डिसेंबरला हे वृक्ष संमेलन होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ओबीसींच्या विकासासाठी जातीयनिहाय जनगणना गरजेची, संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धाच्या वतीने आयोजीत तेली समाज उप वधु-वर व पालक परिचय मेळाव्यात खा. रामदास तडस बोलत होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *दोन वर्षांत 1 लाख 42 हजार बालकांना अतिसार; जगभरात दरवर्षी 15 लाख मुलांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *शुभमन गिलच्या द्विशतकासह (नाबाद २०४) प्रियांक पांचाळ (११५) आणि हनुमा विहारी (१००) यांच्या शतकांच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धची चारदिवसीय पहिली कसोटी अनिर्णित राखली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी, न्यूझीलंडला होमग्राउंडवर दिली क्लीन स्वीप, 5-0 फरकाने जिंकली टी ट्वेन्टीची मालिका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला* http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शाळा आमची छान ....🖊 प्रसाद तुपे नाशिक....9822161037 फुलले जसे अक्षरांचे रान.. धडे गिरवू.. गणिते सोडवू.... सजवू शब्दांची बाग.... शाळा आमची छान... करू गट्टी निसर्गाशी...अन् प्रार्थना देवाची.... सुखी ठेव सर्वांना... राखू भारत भू ची शान.... शाळा आमची छान...छान... *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" संधी येत नसते, आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे कोणी केले ?* बॅरिस्टर अंतुले 2) *महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांनी बनलेले आहे ?* बेसाल्ट 3) *भारतात कोळशाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?* बिहार 4) *राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे ?* भोगावती नदी ( कोल्हापूर ) 5) *उडणारा सस्तन प्राणी कोणता ?* वटवाघूळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हंसिनी उचित, साहित्यिक 👤 गंगाधर धडेकर, पत्रकार, धर्माबाद 👤 अर्शन पल्ली अजय 👤 सुशील कुलकर्णी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...?* *आहे....?...की.....?"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, मला जे काही मिळाले ते सगळ्यात श्रेष्ठ मिळाले हा विचार केला तर आपण जगातील सगळ्यात सुखी आहे असं समजा. कारण अशी अनेक थोर माणस होऊन गेली ज्यांना शरीर झाकायला वस्त्र नव्हते, की दोन वेळचे दोन घास मिळत नव्हते. म्हणजे राहायला घर असणं, घरात सुखसोई असणं, झोपायला अंथरून असणे, पांघरायला पांघरूण असणे, घालायला कपडे असणे, अभ्यासाला पुस्तक वह्या मिळणे, चांगल्या शाळेत शिक्षण मिळणे, चवीपरीने खायला मिळणे. जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अर्थार्जनाची प्रतिष्ठित सोय असणे अशा एक नाही अनेक गोष्टीं निसर्गाचे आभार बाळगण्यासारख्या नाहीत का? . चहा थोडा गार झाला तर चिडतो मी. पण वनवासी पाड्यावर गेलं की लक्षात येतं की मुळात जगण्याची धडपड म्हणजे काय असते. दोन वेळच्या भरपेट जेवणाची किंमत काय? थंडी वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी गरम कपडे सोडाच पण किमान कपडे असणं याची किंमत किती? एका घासासाठी वणवण भटकणारी मुलं, माणस बघितली की भाजी आवडत नाही म्हणून भरल्या ताटावरून उठून जाणाऱ्या मुलांची,माणसांची कीव येते तसेच घृणा पण येते. मला बंगला, गाडी, नोकरी ,सगळ्या सुख सोई मिळूनही मला त्यात सुख शोधता येत नाही.यात दोष कुणाचा? या साऱ्या गोष्टी मला सहज मिळाल्या आहेत तर मी याबाबत कृतज्ञता नको का बाळगायला? निसर्गाचे आभार माना आणि जपणूक करा. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्या आशारुपी पंखांना खूप पसरु द्या.कारण तेच पंख तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी मदत करतात.त्यांना जर संकुचित वृत्तीने तुमच्याच मनामध्ये जवळ करुन ठेवलात तर तुमच्या मनातल्या असलेल्या इच्छा पूर्ण कशा होतील ? त्यापेक्षा त्या पंखामध्ये आत्मविश्वासरुपी बळ निर्माण करुन त्यांना नवे काहीतरी करण्यासाठी पसरु द्या म्हणजे तुम्हाला आनंदाने आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी संधी निर्माण करुन देतील. पक्षी आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात ते पंखाच्या बळावरच ना ! मग पंखच पसरले नसते किंवा एखादी बाजू पंख विरहित असली तर कसे बरे आकाशात विहार करु शकले असते नाही ना ? मग तसेच मानवी जीवनाचे आहे. आशारुपी पंखांचे तसेच आहे त्यांनाही थोडे स्वातंत्र्य द्या आणि जीवनरुपी आकाशात स्वच्छंदपणे विहार करायला प्रेरणा द्या. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तेनालीराम चे वाक्चातुर्य* एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो. आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की, ज्यामुळे सीमेच्या आसपास रहाणारी जनता निर्भय होऊन सुखाने जगेल. महाराजांना या गोष्टीत तथ्य वाटले. त्यांनी लगेच आदेश दिला की, याबाबतीत एक योजना बनवण्यात यावी. मंत्रीमंडळाने त्वरीत योजना बनवली. खर्चासहीत पूर्ण. तपशील महाराजांना प्रस्तुत केला. महाराजांनीही त्याला अनुमती दिली. मंडळाची मजाच झाली. त्यांनी आपल्या परिवारांतील सदस्यांनाच नाही, तर दूर दूरच्या नातेवाईकांनाही चाकरीला (नोकरीवर) ठेवले. पैसा व्यर्थ खर्च होऊ लागला. सम्राट मंत्र्यांना त्याविषयी विचारित, तेव्हा मंत्री एकच उत्तर द्यायचे ‘‘अन्नदाता, पहात रहा. ही योजना पूर्ण होताच विजयनगरच्या शत्रुला ह्या सीमा हिमालय पर्वतासारख्या भासतील.’’ होता-होता दोन मास लोटले. तिसर्या मासात तेनालीराम यात्रेवरुन आला. विजयनगरची सीमा ओलांडताच त्याला सुगावा लागला की, योजने अंतर्गत मंत्री, सेनापती पंडित तसेच अनेक दरबारीही आपआपला स्वार्थ साधत होते. सीमा सुरक्षेच्या नावाखाली अनेक वस्त्या जमीनदोस्त केल्या होत्या. कित्येक शेतमळे उध्वस्त केले होते. अत्याचार आणि अराजकता माजलेली होती आणि सम्राटाच्या जवळ कोणालाही जाऊ दिले जात नव्हते. सीमा क्षेत्रातील जनतेची करुण कहाणी ऐकून तो चिंताग्रस्त झाला; परंतु हे सर्व महाराजांना सांगणार कसे ? बराच विचार केल्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. तीन मासांच्या रजेनंतर ज्या दिवशी तेनालीराम दरबारात हजर झाला, तेव्हा राजा कृष्णदेव रायनी हसून स्वागत केले. मग म्हणाले, ‘‘तेनालीराम तुझ्या अनुपस्थितीत आम्ही पुष्कळ मोठे कार्य केले आहे. आम्ही विजयनगरच्या सर्व सीमा अभेद्य बनवल्या, आता तेथील रहिवाशी निर्भयतेने राहू शकतात.’’ ‘‘खरे आहे महाराज ! ’’ तेनालीराम म्हणाला, ‘‘सीमा क्षेत्रात आपला जयजयकार होत आहे. मंत्रीजीच्या या महत्वपूर्ण कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत.’’ मंत्री तेनालीराम थोडा वेळ थांबून म्हणाला, ‘‘अन्नदाता, शत्रुच्या आक्रमणापासून भयमुक्त होऊन सीमांत गाववाल्यांनी नाट्यमंडळ बनवले आहे. आपण तर कलेचे पारखी आहात म्हणूनच आपल्या पहिल्या नाटकाचे उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.’’ सम्राट कृष्णदेवराय प्रसन्न झाले. त्यांनी लगेच स्वीकृती दिली आणि दुसर्याच दिवशी रंगशाळेत नाटक आयोजित केले गेले. कृष्णदेवराय सहपरिवार उपस्थित झाले. सर्व दरबारी तसेच राज्यातील प्रतिष्ठित नागरिकांनाही आमंत्रित केले गेले. नाटक वेळेवर चालू झाले; पण ते नाटक कसले होते ? तर सीमांत रहीवाशांवर होणार्या अत्याचारांवरची जिवंत प्रतिमा होती. मधे-मधे विदुषक रंगमंचावर येई आणि सम्राट कृष्णदेवरायांकडे पाहून मोठ्या आवाजात म्हणे, ‘‘दया करा महाराज ! आम्हाला वाचवा ! शत्रूच्या आक्रमणापेक्षा अधिक आम्हाला आपल्या माणसांपासून सुरक्षा हवी आहे.’’ मंत्री, सेनापती, पंडीत, राजदरबारी, नागरिक सर्वच हैराण झाले. महाराजांचे डोळे रागाने लाल झाले होते. त्यांनी तेनालीरामला बोलवून विचारले, ‘‘हे सर्व काय आहे ?’’ ‘‘मला काही माहित नाही, महाराज’’ तेनालीराम भोळेपणाचा आव आणून म्हणाला, ‘‘तुम्ही ह्या लोकांनाच विचारा ना’’! महाराजांनी रंगशाळेतच विचारपूस केली. तेव्हा खरी गोष्ट समोर आली. त्याच क्षणी बर्याचशा दरबार्यांना मिळणारी सवलत थांबवली गेली. मंत्री, सेनापती तसेच पंडितजीवर मोठे मोठे खटले भरले गेले आणि तेनालीरामची स्तुती करत सम्राट कृष्णदेव राय म्हणाले, ‘‘राजनीतीमध्ये तुझ्यासारखा चतुर कोणीच नाही, तेनालीराम तू मारतोही आणि आवाजही होऊ देत नाहीस.’’ – (संदर्भ : जय हनुमान साप्ताहिक २ जानेवारी २०१६) *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/02/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले. ● २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी. ● २००४ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार. 💥 जन्म :- ● १८८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार. ● १९०४ - बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी ● १९१० - जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता. ● १९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९९५ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार ● २००३ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर - मायकेल पी. अँडरसन, डेव्हिड ब्राउन, कल्पना चावला, लॉरेल क्लार्क, रिक डी. हसबंड, विली मॅककूल, इलान रमोन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर, आर्थिक वर्षात विकासदर 6 ते 6.5 राहण्याचा अंदाज, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात, केंद्रीय अर्थमंत्री आज 2020-21 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशातील सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप सुरु, वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीसाठी संप, राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं, दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कोरोना व्हायरसचा धोका असलेल्या चीनमध्ये अडकलेल्या रत्नागिरीमधील तीन विद्यार्थिनी सुखरुप, जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती, चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ठाण्याच्या सिग्नलवर शिकणारी मुलं थेट इस्रोला जाणार, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पहिल्या दहामध्ये क्रमांक पटकावल्याने इस्रोमध्ये संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कोरेगाव भीमा चौकशी आयोग कामकाज गुंडाळण्याच्या मनस्थितीत, राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याचा माजी न्यायमूर्ती पटेलांचा आरोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य आणि शिक्षक पुरस्कारांची घोषणा, या पुरस्कारांमध्ये बारा जणांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या वर्धापनदिनी म्हणजे दि. १० फेब्रुवारी रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *टीम इंडियाचा न्यूझीलंडवर सलग चौथा 'सुप्पर' विजय, शार्दुल ठाकूर, लोकेश राहुलची जिगरबाज खेळी, पाच एकदिवसीय मालिकेत 4-0 अशी आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मला शिक्षक का व्हावं असे वाटते ?* बालपणी शाळेत शिकत असतांना मोठी माणसं हमखास एक प्रश्न विचारायचं की, तुला मोठे होऊन काय बनायचं आहे किंवा तुझं स्वप्न काय ? तेंव्हा त्या बाळबोध वयात काही कळायचं नाही. मात्र...... पूर्ण लेख खालील लिंकवर वाचता येईल. https://shopizen.page.link/QNfw49ECPutfUpuX7 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक* कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌴🌳🌲झाडं बोलतात🌲🌳🌴 - प्रा. मीनल येवले , नागपूर मो. नं. 7774003877 झाडं बोलतात वाऱ्याशी आकाशातल्या ताऱ्यांशी झाडे अबोल नसतात कधी बोलत असतात साऱ्यांशी जगण्यासाठी फुलण्यासाठी पुरवून झाडे निकोप श्वास कंद , फळं , दाणे होऊन जीवमात्रांना देतात घास ऊन , वारा , वादळातही पाय रोवून उभी असतात पाखरांची इवली स्वप्ने झाडांच्याही डोळ्यात दिसतात हात पसरून कवेत घेतात मुक्त निळ्या नभाला मौनातून साद घालतात दाटून आल्या मेघांना माणसांसारखे द्वेष मत्सर झाडांमध्ये दिसत नाहीत फांदी तोडली तरी झाड कोणावरही रुसत नाही रंग , गंध सौंदर्याची वैविध्याची असती खाण सन्मानाने जगवू त्यांना टिकवू चांगले जीवनमान 🌾🌾🌾 *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'कोकणचा राजा' असे कोणत्या फळाला म्हटले जाते ?* हापूस आंबा 2) *पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे ?* भीमा 3) *भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?* कर्नाळा ( रायगड ) 4) *'महाराष्ट्राची काशी' असे कोणत्या नदीला म्हटले जाते ?* भीमा 5) *महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग प्रथम कोठे करण्यात आला ?* बारामती ( पुणे ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. प्रा. यशपाल भिंगे मराठी विभागप्रमुख पीपल्स महाविद्यालय नांदेड 👤 शेख एम. बी. केंद्रप्रमुख 👤 नारायण गायकवाड 👤 शिवानंद सूर्यवंशी 👤 कवी गजानन काळे 👤 अतुल भुसारे 👤 शिवम पडोळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दोन्ही हात एकत्र आले की 'नमस्कार' होतो. हा नमस्कार म्हणजे एक सोपस्कारही असतो. कधी कधी तो उजवा हात छातीला लावून स्मित करूनही केला जातो. या नमस्कारामागे एक प्रमुख भावना दडलेली असते, ती म्हणजे ज्येष्ठांचा 'आदर आणि स्वागत.' या नमस्कारामध्ये इतरही भाव दडलेले असतात. कधी चरणस्पर्श तर कधी अगदी गुडघ्यापर्यंत स्पर्श करून हे नमस्कार होतात. छोट्यांचे मोठ्यांना नमस्कार व मोठ्यांचे थोरांना नमस्कार यात फरक असतो. त्यात स्त्रीयांचे नमस्कार वेगळे व बालकांचे नमस्कार वेगळे. शरीराची अष्टांगे जमिनीला लावून साष्टांग नमस्कार केले जातात किंवा सुर्य नमस्कार होतात.* *देवाला केलेल्या नमस्कारात थोडा फरक पडतो. त्यात कृतज्ञतेची भावना येते. दोन्ही हात नम्रतेने जोडले जातात. डोळे अर्धोन्मीलित होतात. मन करूणात्मक याचकाच्या भुमिकेत जाते. हातात ओंजळभर फुले येतात, ओठ पुटपुटू लागतात, कदाचित श्लोक किंवा एखादे स्तोत्र सवयीने ओठांवर येते, एखादी आरती आठवते. कधी नवस बोलले जातात तर कधी ते फेडले जातात. अशा अनेक नमस्कारांची रांग लागते. यात मागण्याच जास्त असतात.* *"भक्त परमेश्वराकडे असंख्य मागण्यांचा ओघ सुरू ठेवतो, हजारो नमस्कार देवाचरणी ठेवून निघून जातो."* 🔶 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🔶 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *अंधारा सारख्या संकटाला* *दोष देत बसण्याऐवजी* *एक ज्योत पेटवणयाचे धाडस दाखवले* *तरच अंधार दूर होईल* *आपल्या नशिबा पेक्षा* *कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा* *कारण उद्या येणारी वेळ* *आपल्या नशिबा मुळे नाही* *तर कर्तृत्वा मुळे येते.* *स्वाभिमानावर आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची ईर्शा उत्पन्न होत नाही* *आणि स्वतःला सिद्ध करायच्या ईर्शेशिवाय कर्तृत्व घडत नाही.* *"महत्वकांक्षा" असल्याशिवाय* *माणूस "मेहनत"* *करित नाही आणि* *"मेहनत" केल्याशिवाय* *"महत्वकांक्षा" पुर्ण होत नाही...!* *ही जिद्द,महत्वकांक्षा पूर्ण केलीय ती* *मधु एनसी यांनी* *माणसाला एकदा ध्येयाने पछाडलं* *की, माणून त्या ध्येयाच्या* *हात धुवून मागे लागतो* *आणि यशस्वी होतो, याचं* *ताजं उदाहरण म्हणजे* *बेंगळुरूतील बस वाहक मधु एनसी.* *या बस कंडक्टरने केंद्रीय* *लोकसेवा आयोगाची* ( *यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली* *असून, त्याचे आयएएस* *होण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.* *केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, ही म्हण मधु यांनी आपल्या कृतीतून अगदी सार्थ ठरवली आहे.* *बेंगळुरूच्या मेट्रोपोलिटीन टान्सपोर्ट सेवेत मधु* *बस वाहकाचे काम करतात. मधु यांची यूपीएसी परीक्षेतील मुलाखत* *२५ मार्च रोजी होणार आहे.* *८ तास नोकरी आणि ५ तास अभ्यास* *आएएस होण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मधु यांनी* *चिकाटी कधी सोडली नाही. दिवसभर ८ तासांची नोकरी* *आणि दैनंदिन कामातून वेळ काढत ते दररोज ५ तास* *यूपीएससीचा अभ्यास करीत होते. कर्नाटक प्रशासकीय सेवेची परीक्षा* *अनुत्तीर्ण झालेल्या मधु यांनी जिद्द सोडली नाही. यानंतर त्यांनी* *यूपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली. गेल्या वर्षीच्या जून* *महिन्यात मधु यांनी यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली* *होती. ही परीक्षा त्यांना कन्नड* या *आपल्या मातृभाषेतून दिली. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर* *त्यांनी मुख्य परीक्षेसाठी जोरदार तयारी केली* *आणि मुख्य परीक्षा इंग्रजी भाषेतून दिली. यूपीएससी परीक्षेसाठी मधु* *यांनी राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, नैतिक मूल्य,* *भाषा, सामान्य ज्ञान, गणित आणि निबंध लेखन या* *विषयांची विशेष तयारी केली. जानेवारी महिन्यात यूपीएससी* *परीक्षेचा निकाल लागला. त्या यादीत आपले नाव* *पाहिल्यावर मधु यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.* *मधु राज्यशास्त्र विषयात पदवीधर* *कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील मालावली या छोट्याश्या खेड्यात मधु* *राहतात. २९ वर्षीय मधु, कुटुंबात सर्वांत मोठे* *असल्याने घरची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन* *पडली. वयाच्या १९ वर्षी ते बस वाहक बनले. गरिबी आणि* *कठीण परिस्थितीशी दोन हात करत मधु यांनी आपले स्वप्न पूर्णत्वास* *आणले आहे. दूरस्थ शिक्षण प्रणालीतून त्यांनी आपले* *पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. मधु यांनी राज्यशास्त्र* *विषयात पदवी संपादन केली आहे.* *मी कोणती परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो, याबाबत माझ्या* *पालकांना काहीच माहिती नाही. मात्र, मला मिळालेल्या यशाचा त्यांना* *आनंद झाला आहे. आमच्या घराण्यात एवढे शिक्षण घेतलेला मी* *एकटाच आहे, असे मधु यांनी सांगितले. परीक्षेचा अभ्यास* *करताना कामात कधीही कसूर केली नाही. कितीही गर्दी* *असली तरी सर्व प्रवाशांना तिकिटे मिळतील, याची खात्री केली.* *मुलाखतीच्या तयारीसाठी दररोज २ तास वेळ देत असून,* *मुलाखतही उत्तीर्ण होणार असल्याचा विश्वास मधु यांनी व्यक्त केला.* *आपणही प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखरावर विराजमान* *होऊ शकतात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सूर्यासारखी तेजस्विता आणि सक्रीयता, चंद्रासारखी शीतलता आणि शांतता, धरतीसारखी संयमता व सहनशिलता हे जसे गुण या तिघांमध्ये आहेत तसेच गुण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपणही त्यांच्यासारखे आपल्या जीवनामध्ये यशस्वी स्थान निर्माण करुन इतरांच्या जीवनात आपले अढळ स्थान निर्माण करु शकतो हे निश्चितपणे सांगता येईल. ह्या गुणांचे अनुकरन करणे म्हणजे आपल्या जीवनासाठी एक ऊर्जाच आहे.ती ऊर्जा आपण आपल्या जीवनात कधीही कमी होऊ देऊ नये. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.9421839590. 🌎🌞🌝🌎🌞🌝🌎🌞🌎🌞 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वार्थीवृत्ती* एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते. त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.' तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुस-याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत. फक्त स्वतःचाच फायदा पाहतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/01/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते. 💥 जन्म :- ◆ १८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी. ◆ १९३१ - गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार ◆ १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- ◆ १९९४ - वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक. ◆ २००० - के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते. ◆ २००४ - सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोकणचा राजा हापूस आंबा नवी मुंबईतल्या एपीएमसीमध्ये दाखल झालाय. यावेळी आंबा दाखल व्हायला तब्बल २ महिने उशीर झाला. व्यापारी वर्गानं आंब्याचं पूजन करून कोकणच्या राजाचं केलंय स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - महाराष्ट्र सरकारने राज्यातील रिक्त असलेली 70 हजार पदे भरण्याचा घेतला निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यात हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात 1 लाख 70 हजार पदे रिक्त आहेत. गेल्या 5 वर्षांपासून यावर भरती करण्यात आलेली नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भारतातील कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण केरळात, खास वॉर्डात उपचार सुरु, हुआन विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याची माहिती तर 'कोरोना'मुळे चीनमधील हुबे विद्यापीठात 27 भारतीय अडकले, 7 विद्यार्थी महाराष्ट्रातील, मदतीसाठी सरकारला विनंती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आर्थिक स्थिती पाहता जिल्ह्यांचं विभाजन शक्य नाही, अर्थमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट, तर देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडलाही ब्रेक लावण्याचे संकेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता रेल्वेच्याच तिकीटदरात मिळणार विमानाचं तिकीट, मुंबईतील तरुणांच स्टार्टअप असलेलं 'रेलोफाय' अॅप लॉन्च* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचं निधन, महिलांना पुरुषांबरोबरच्या समान हक्कांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची विशेष ओळख होती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह, सोहळ्याला राज्यभरातून हजारो भाविकांची पंढरपुरात गर्दी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आरोग्यदायी चांगल्या सवयी* http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_54.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *' आभाळ '* कवी ज्ञानेश्वर बा.शिंदे अंचलगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर. 8308035082 बाप माझा रोज पाही निळ्या आभाळ छताला घाम पेरला शिवारी न्हावु घाल धरणीला. [१] दुःख बापाच्या मनीचं साऱ्या रानात पसरे कोणा गवसेल कसे ? घाव काळीज बोचरे [२] सारं आयुष्यच त्याचं उसवल मातीमधीं सांधायाला त्याला कधी नाही मिळालीच संधी. [३] नको करू हेळसांड तुझा भरवसा त्याला बरस तू मनसोक्त तुच आसरा एकला. [४] *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *अल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजपासून तयार केला जातो ?* बाक्सईट 2) *दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?* ब्राझील 3) *भांगडा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?* पंजाब 4) *आयुर्वेदाचा उगम कोणत्या देशात झाला ?* भारत 5) *जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश कोणता ?* भारत *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विनायक हिरवे, सहशिक्षक, कोल्हापूर 👤 बालाजी पुलकंठवार, सहशिक्षक, धर्माबाद 👤 हिलाल पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निसर्गाच्या सानिध्यात घालविलेले क्षण मनाला प्रसन्न करतात. उमललेल्या नाजूक फुलांचा बहर, हिरव्यागार रानातून मंद शिळ घालणारा प्रसन्न वारा या सर्वांमध्ये निसर्गाचं एक दैवी रूप दडलेलं आहे. ही सुंदर कलाकृती पाहून अचंबित व्हायला होतं. निसर्गाचं निरीक्षण केल्यावर जाणवतं की, या नाजूक फुलांवर सुंदर रंगाची उधळण कोणी केली असेल ?* *हिरव्या रंगाने नटलेल्या धरणीवर निळं आकाश पसरलेलं आहे. या अथांग आकाशावर सर्व दिशांना उजळून टाकणारा अलौकिक रंगाचा मनमोहक चित्रण करणारा चित्रकार कोण आहे ? आपल्या आजूबाजूला पसरलेल्या निसर्गाचा चमत्कार व सुंदरता बघायला मानवाकडे फक्त एक नजर आहे. पण तो अनामिक चित्रकार असंख्य नजरेने क्षितिजा पलिकडे पाहात आहे. निसर्गाचे हे सगुण व प्रेरणेने भरलेलं भव्य सृष्टी चित्र सुंदरतेने चित्रित करणा-या चित्रकाराला माझा सलाम !!!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥* ●•• ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *पोटापुरता पैसा पाहिजे* *नको पिकाया पोळी,* *देणाऱ्याचे हात हजारो* *दुबळी माझी झोळी.* *या दुनियेत देणारे खूप आहेत,त्यांची* *वानवा अजिबात नाही कारण तिरुपती बालाजी,आणि* *शिर्डीचे साईबाबा यांच्या दानपेटीत करोडो रुपयांचे रोज* *पडत असतात.* *या दानाच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही पण निसर्गाचा एक* *नियम आहे आपण जे जे वाटाल,जे जे पेराल, जे जे* *दुसऱ्याला द्याल ते लाख गुणांनी आपल्याला परत* *मिळाल्याशिवाय राहत नाही,हा निसर्गाचा मोठा चमत्कार म्हणावा* *लागेल ना?* *चमत्काराच्या शोधात दुनियेची वाटचाल चालू आहे. _"गिरसप्पाच्या* *धबधब्यापेक्षा आकाशाच्या अथांग उंचीवरून* *कोसळणार्या पावसाच्या धारा हा अधिक मोठा चमत्कार आहे,"_ असे* *महात्मा गांधी म्हणाले. एखादी वस्तू, नसलेल्या जागी निर्माण करणे,* *हा चमत्कार असेल, तर चमत्काराची सुरूवात सृष्टीपासून* *झाली, असे* *म्हणण्याइतपत कोडे विज्ञानालाही पडले आहे. छोट्यातून मोठी गोष्ट* *निर्माण होण्याचा चमत्कार कुठल्याहीपेक्षा* *शेतातच अधिक होतो. तुम्ही एक दाणा शेताला द्या* *आणि त्यावर थेंबथेंब पाणी सोडा.* *थोड्या दिवसात फांदी फांदीला हजार लोंब्या लोंबलेले घड* *अन् मणभर दाणे तुम्हाला शेत परत करते.* *हा चमत्कार, मिळालेले देऊन टाकले, म्हणून 'चमत्काराचा* *धबधबा' पाऊस म्हणून बरसला.* *कुठल्यातरी अज्ञात शक्तीने कुठल्या तरी अज्ञात तर्हेने, हे विश्व साकार* *केले. तुम्ही मातीला दिलेला एक छोटा दाणा लाखो आरशांच्या* *प्रतिबिंबांनी आणि अनेक रसांच्या रूचींनी सृष्टीने* *तुम्हाला परत केला. म्हणजे शक्ती वाढवण्याचा संदेश एकच आहे, "देत* *राहा. मिळत राहील."_* *जे जे आपणासी ठावे* *ते ते दुसऱ्याशी द्यावे* *शहाणे करून सोडावे* *सकलजन।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात कोणताही जीव जन्माला आला की,त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो.त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो.त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो.ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत.मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल.हा जन्म परत येणार नाही हे तर संत्र्याच्या आहेच.यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *युक्तिच सर्वश्रेष्ठ* नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. तात्पर्यः युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढता येतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/01/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुतात्मा दिवस* 💥 ठळक घडामोडी :- ● १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला. ● १९९४ - पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला. ● २००२ - भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- ● १९१० - चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी. 💥 मृत्यू :- ● १९४८ - राष्ट्रपिता महात्मा गांधी. ● १९९६ - गोविंदराव पटवर्धन, हार्मोनियम व ऑर्गन वादक. ● २००० - आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर, मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते. ● २००१ - प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ नाटककार. ● २००४ - रमेश अणावकर, प्रसिद्ध गीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : शैक्षणिक शुल्क वाढल्यामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यासंबंधी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री अल्पसंख्याक राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मध्य रेल्वेच्या पहिल्या लोकलचे आज होणार उद्घाटन. ही लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर चालवली जाणार आहे. त्यामुळे या लोकांची उद्घाटनाची फेरी ही पनवेल पासून सुरू होईल ते ठाण्यापर्यंत येईल. सीएसएमटी स्टेशनवरून रिमोट कंट्रोलद्वारे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जेएनयू आणि अलीगड विद्यापीठातील वादानंतर मुंबई आयआयटीने विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. राष्ट्रविरोधी घोषणा दिल्यास कारवाई होणार, नियमावली पाळणे विद्यार्थ्यांना बंधनकारक * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परंतु हा त्यांचा अखेरचा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं जात आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : माहुल येथे स्थलांतरित केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर आता पालिकेने विविध प्रकल्पांमुळे बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येक परिमंडळामध्ये एक हजार सदनिका उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि पोलीस उपअधीक्षक विजय चौधरी आज आयुष्यभरासाठी लग्नाच्या बेडीत अडकणार. पैलवान विजय चौधरी आणि कोमल भागवत यांचा विवाह आज सायंकाळी पावणेसहाच्या मुहूर्तावर नाशिकच्या गंगापूरमध्ये संपन्न होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा टी-20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे. रोहित शर्माने खेळलेली तुफानी खेळी निर्णायक ठरली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खेड्याकडे चला* https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_25.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🐥 एक पाखरु...* - मनोहर बडवे... ✍ यवतमाळ... 9623728778 एक लहानसं पाखरू🐤... उडुन गेल भुर भुर.... वाट कुठं दिसेना... खुप फिरलं दुर दुर.... वरती खाली झेप घेई... तहान लागली घशाला.... आकाशाकडे चोच करुनी... पाणी विचारी सशाला🐹... मग दिसले एक माकड🐒 झाडावरती झुलत होते.... विचारुन पाहिला घरचा पत्ता... त्यालाही काही कळत नव्हते... आठवन येता मायबाप.... पंखामधी बळ येई..... झेप घेई उंच ऊंच... 🦅 दिसेल का कुठे आई...? पाखराला कळलं आता... घरट्या जवळच खेळावं.. मुळुमुळु रडु लागलं.. आता घरटं कसं शोधावं... 🏠 दुर ऊडन्याच्या हट्टाची... चुक त्याला समजली होती... घरट्याच्या प्रेमाची... किंमत आता कळली होती... आता त्याच्या पंखामधी... मायेचं बळ आलं होत... झेप घेता खुप ऊंच... आता घरटं दिसलं होतं....🏠 *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *केरळ राज्याची बोलीभाषा कोणती ?* मल्याळम 2) *चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे झाला ?* महाड 3) *महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर 4) *पोलीस दलात महिलांची नेमणूक करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?* महाराष्ट्र 5) *फिरते न्यायालय स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?* महाराष्ट्र *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश पटकोटवार, मोबाईल टीचर गटसाधन केंद्र, धर्माबाद 👤 मगदूम अत्तार, सहशिक्षक, 👤 सुरज एडके 👤 सतीश गणलोड 👤 शिवकुमार माचेवार 👤 अंकुश निरावार 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.* *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *ऊबंटू चित्रपटातील प्रार्थना माणसाच्या जगण्यातील खरेखुरे मर्म* *सांगून जाते.* *हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी* *माणसासम वागणे.* *ज्या परिसरात आपण* *राहतो,वागतो,वाढतो तो परिसर त्याग करून चालणार नाही.तेथील प्रत्येक* *गोष्टीबद्दल आपल्या मनात कृतज्ञता असायला हवी.* *माझ्या आयुष्यात आलेल्या इतर माणसांविषयी कृतज्ञता मानणे हा* *संस्कार आहे.* *मला तळमळीने शिकवणारे शिक्षक,माझे मार्गदर्शक, माझे शेजारी* *पाजारी, आपले फॅमिली डॉक्टर,माझा* *दूधवाला,पेपरवाला,सकाळी आठवणीने मेसेज पाठविणारे, कॉल* *करणारे, माझे वर्गमित्र, सहकारी कर्मचारी,नातेवाईक,* *ड्रायव्हर, कामवाली मावशी, कचरा घेऊन जाणारी बाई, बिल्डिंगचा* *वॉचमन अशा एक नाही अनेक व्यक्तींबद्दल जाणीवपूर्वक* *कृतज्ञता बाळगणे महत्वाचं नाही का?* *विचार करू लागलो आणि ही यादी लांबच लांब होऊ लागली. यातून एक* *जाणवलं की ज्या ज्या गोष्टींमुळे माझं जीवन सुसह्य झालं* *आहे, सुरळीत झालं आहे, सुखावह झालं आहे त्या त्या प्रत्येक* *वस्तू, व्यक्ती,* *परिस्थितीबद्दल मनात दररोज जो कृतज्ञताभाव निर्माण होईल त्यावरून* *त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक ठरवायचा. हा कृतज्ञता* *निर्देशांक मला दररोज जागृत ठेवणं इतकाच नाही तर वाढत ठेवायचा* *प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी मी एक उपाय शोधून* *काढला आहे. जी जी व्यक्ती माझ्या संपर्कात येईल त्या व्यक्तीला शक्यतो* *संधी शोधून "धन्यवाद" देण्याचा परिपाठ अमलात* *आणला आहे. सकाळच्या दुधवाल्यापासून ते दररोज रात्रीची* *शिटी वाजविणाऱ्या गुरखा पर्यंत सगळ्यांना* *ते जेव्हा समोर येतील तेव्हा "थँक यू" असं ठरवून* *म्हणण्याची सवय स्वतःला लावून घेतो आहे. अगदी कुठे जात असेन आणि* *रिक्षा केली तर उतरल्यावर पैसे देऊन झाल्यावर रिक्षावाल्याचा* *खांद्यावर हलके थाप मारून आवर्जून "थँक यू" म्हणण्याचा* *जाणीवपूर्वक प्रयत्न असतो.गंमत म्हणून अशा किती* *जणांना मी दिवसभरात "थँक यू" म्हटलं याची माझ्यापुरती नोंद ठेऊन* *त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक दररोज रात्री झोपण्यापूर्वी* मी *काढण्याचा प्रयत्न करतो. इतर कुठल्याही* *निर्देशांकासारखा दररोजचा हा आकडा कमी जास्त होतो खरा पण* *एकूण कृतज्ञता निर्देशांकाचा महिनाभराचा आलेख हा चढता* *असला पाहिजे याचा प्रयत्न मात्र जरूर करतो.* *या सगळ्या खटाटोपानंतर मला स्वतःला एक मोठा फायदा असा* *जाणवला की ज्यांना मी धन्यवाद देतो त्या व्यक्तींना बरं वाटत असेलही* *मनात, पण माझ्या दृष्टिकोनातून पाहता माझं मन एका* *अनामिक समाधानाने भरून जातं. पाय जमिनीवर राहतात, माणसं* *जपली जातात आणि सर्वात महत्वाचं की या सर्व* *व्यक्तीत वसणाऱ्या हृदयस्थ गुरूपर्यंत प्रत्येकवेळी माझं थँक यू* *आपोआपच पोहोचतं ...* *मेसेज वाचल्याबद्दल.* *सगळ्यांना पुन्हा थँक्स,* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही.कामाचा दर्जाही घसरेल,मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वतःचा विवेक जागृत ठेवून वागण्याची शिकवण* एकदा बुद्ध बाजारातून जात होते. त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्याजवळ आली आणि बुद्धाना नमस्कार करून म्हणाली, “भगवान, येथील नगरशेठ तुमची सारखी निंदा-नालस्ती करत आहे. जर तुमची परवानगी असेल तर तो तुमच्याबद्दल काय म्हणाला ते सांगू का?” तेंव्हा बुद्ध म्हणाले, "प्रथम माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं दे आणि मग नगरशेठ माझ्याबद्दल काय बोलला ते ऐकायचं की नाही बघूया!” बुद्धाने त्या व्यक्तीला विचारले, “नगरशेठ माझ्याबद्दल जे बोलला ते सत्य आहे का? तेंव्हा ती व्यक्ती म्हणाली, " नाही भगवंत, मला तर त्या माणसाच्या बोलण्यावर थोडा देखील भरवसा नाहीये. तो बोलला म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय.” बुद्धांनी दुसरा प्रश्न विचारला, "तुला असं वाटतं का, की जी गोष्ट तू मला सांगणार आहेस त्याने मला दु:ख होईल?” तेंव्हा ती व्यक्ती म्हणाली, "हो भगवंत, तो माणूस जे बोलला त्याने तुम्हाला दु:ख होऊ शकतं." त्यानंतर बुद्धांनी शेवटचा प्रश्न विचारला, "तुला असं वाटतं का, की जी गोष्ट तू मला सांगणार आहेस ती माझ्या कामाची आहे किंवा त्यापासून मला काही लाभ होणार आहे?” ती व्यक्ती म्हणाली, "नाही भगवंत, ह्या गोष्टी तुमच्या कामाच्याही नाहीत आणि त्यापासून तुम्हाला कोणताही लाभ होणार नाही." तेंव्हा बुद्ध म्हणाले, " हे बघ माझं हृदय एका शांत सरोवरासारखं आहे ज्यामध्ये मी प्रेम, दया आणि करुणेची फुलं ठेवतो. ज्या गोष्टींवर तुझा स्वतःचा विश्वास नाही, जी गोष्ट ऐकल्यानंतर मला दुःख होईल आणि जी गोष्ट माझ्या कामाची नाही, व्यर्थ आहे अशा गोष्टी ऐकून मी माझं शांत सरोवररुपी हृदय विनाकारण मलीन का करू?" बुद्धाचे हे विचार ऐकून त्या माणसाला धडा मिळाला, की ऐकीव गोष्टींवर नुसताच विश्वास ठेवणं योग्य नाही, तर स्वतःचा विवेक जागृत ठेवून अशा निंदाजनक बोलण्यापासून लांब राहणंच उत्तम आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/01/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात. ● २००६ - शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह कुवैतच्या अमीरपदी. 💥 जन्म :- ● १९७०-राज्यवर्धनसिंग राठोड,ओलीम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज ● १८७१ - चंद्रशेखर शिवराम गोर्हे, बडोदा संस्थानचे राजकवी. 💥 मृत्यू :- ● २००१-राम मेघे ,महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री ● १९५० - अहमद अल-जबर अल-सबाह, कुवैतचा अमीर. ● १५९७-महाराणा प्रताप,मेवाडचे राजे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सर्व महाविद्यालयात यापुढे मराठी सूचना फलक अनिवार्य, सर्व महाविद्यालये विद्यापीठांच्या कार्यक्रमांची सुरुवात यापुढे राष्ट्रगीताने करणार - उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्य शासनाची बहुचर्चित शिवभोजन थाळी योजना मोठ्या उत्साहात सुरु झाली. पुण्यात सलग तिसऱ्या दिवशीही या थाळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं समोर आलंय, मनपा शेजारी असणाऱ्या निशिगंधा व्हेज मध्ये शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली असून लोकांनी 10 रुपयात मिळणाऱ्या थाळीचं भरभरून कौतुक केलंय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : 1 फेब्रुवारी, 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2020-21 या आर्थिक वर्षाचं बजेट देशासमोर सादर करतील. यावेळी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नेहमी आपल्या देशातील प्रतिभा व तंत्रज्ञानावर विश्वास ठेवा. त्यातून आपल्याला बळकट राष्ट्र निर्माण करता येईल पद्मविभूषण सन्मानप्राप्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *यवतमाळ : खासगी बाजारात कापसाचे भाव पडले, प्रती क्विंटल ४५०० चा दर. त्यामुळे यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस गाड्यांची आवक वाढली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सिडनी : युवा विश्वचषक (१९-वर्षांखीलील) स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियावर ७४ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत मारली धडक, भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे कार्तिकला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मध्यप्रदेश संघातील वेगवान गोलंदाज रवी यादवने रणजी सामन्यात उत्तर प्रदेश विरोधात खेळताना सामन्याच्या पहिल्याच षटकात करिअरचे पहिले षटक टाकताना पहिल्या तीन चेंडूंवर तीन विकेट्स घेतल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'अति क्रोध करू नये'* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/14.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कविता - माझी शाळा* स्वप्नील प्रकाश धने (स्वप्नचर) वैजापूर (औरंगाबाद) 8698388096 इवल्या इवल्या फुलांची भरली बघा शाळा नानारंगी फुलांनी हा उजळला छान मळा छान छान शाळा आमची त्याला निसर्गाचे अलिंगन फुलांनी भरले बघा कसे आमच्या शाळेचे हे अंगण इकडून तिकडे उडती फुलपाखरे अन् भ्रमर स्वच्छंद उडतात बघा या फुलांवरून त्या फुलांवर किलबिलाट पक्ष्यांचा अन् वाहे ज्ञानाची ही गंगोत्री करतो ज्ञानार्जन आवडीने बनतो आवडीचा विद्यार्थी *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *”आपलं दु:ख पाहुन कोणी हसले तरी चालेल, पण आपल हसणं बघुन कोणी दु:खी होता कामा नये..”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कोणता असा एकमेव अन्नपदार्थ आहे जो कधीच खराब होत नाही ?* मध 2) *छत्तीसगड हे राज्य कोणत्या राज्यापासून वेगळे झाले आहे ?* मध्यप्रदेश 3) *पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?* ममता बॅनर्जी 4) *डास चावल्याने कोणता रोग होतो ?* मलेरिया 5) *महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी जंगले आढळणारा विभाग कोणता ?* मराठवाडा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•• ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील वानखेडे, 👤 दत्ताहरी कदम 👤 मधुसूदन जाधव 👤 नरेंद्र जोशी 👤 कोंडीराम केशव 👤 वीरभद्र करे 👤 राजेश्वर सुरकूटवार 👤 आनंद जगमारा 👤 कु. आकांक्षा गंगाधर तोटलोड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.* *ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........* *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !* *एक कवी लिहून जातो.....* *......सदियाॅ बित गयी टूटी* *हुई डोर को थामे* *शायद कोई वजह मिल* *जाए जिने की....!* ‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼ 🔶🔶🔶🔶🔶🔶 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *आई हवी,पत्नी हवी,बहीण हवी,* *आजी हवी,मावशी हवी,मैत्रीण हवी,* *पण मुलगी नको.असली तरी आपली आणि परक्याची हा भेद कधी* *संपणार. वरवर दिसलं तरी मनातून काय?* *दोन दिवसांपूर्वी पेपरमध्ये बातमी वाचली आणि पुन्हा ह्या भावना दाटून आल्या.* *गर्भात वंशाची पणती प्रवेशिता* *गर्भलिंगनिदानाचा धाक आहे.* *असलीस तू कळी उमलणारी* *जन्मा आधीच मृत्यूची हाक आहे.* *जन्मदाते आईबापच तुझे भक्षक आहेत .* *सांग सावित्रीच्या लेकी!!* *तू कूठे सूरक्षित आहेस?* *कारणही तसेच घडले आहे गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास* *लासलगाव रेल्वे स्थानकावर एका कोपर्यातील* *बाकड्यावर अज्ञात महिला की पुरुष हे देवाला माहिती यांनी* *आपली पोटची 7 दिवसाची मुलगी सोडून पलायन केले.* *नंदिग्राम एक्सप्रेस मधून उतरलेल्या 2 प्रवासी विद्यार्थ्यांनी या* *मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून* *रेल्वे पोलिसांना याची माहिती* *दिली या पोलिसांनीही तत्परता दाखवत या अवघ्या सात* *दिवसाच्या मुलीला लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले.* *लासलगाव येथील श्री संत जनार्दन स्वामी अनाथ आश्रमाचे संचालक* *दिलीप गुंजाळ व सौ संगीता गुंजाळ यादेखील तातडीने* *ग्रामीण रुग्णालयात हजर झाल्या.* *गोड ,गोंडस, गुटगुटीत, अत्यंत देखणी मुलगी ,पोटचा गोळा लोक टाकून निघून* *कसे जाऊ शकतात ? हा* *प्रश्न खूप* *सतावत होता. सौ संगीता गुंजाळ यांच्या मांडीवर अगदी गुपचूप पडून* *राहिलेली ही गोंडस कन्या खरोखर तिची काय चूक असेल* *का तीला आज रेल्वे स्टेशनवर सोडून तिच्या आई वडिलांना पळून जावे* *लागले असेल......* *फक्त ती एक...... मुलगी....... एवढेच* *ना.........* .. *सरकार यासंदर्भात खुप जनजागृती* *करतय ,मात्र तरीही* *असे प्रकार घडतच आहे याच खूप* *वाईट वाटतंय......अगदी हे* *लिहितानाही.......* *मुलींच्या बाबतीत असे का होते आहे,* *हाच मोठा प्रश्न* *जाणवतोय...... बस.......* *बाळ लडिवाळ, कोमल वाणी* *हास्याचे कारंजे, लेक माझी।।* *मायेचा पाझर,सुखाची झालर* *गोड निरागस, लेक माझी।।* *आईची छाया,बहिणीची माया* *घराची शोभा, लेक माझी।।* *लटके रूसणे,गालात हसणे* *आनंदी बागडे, लेक माझी।।* *मनी एक सपान,खूप मोठी व्हावी* *सूर्यापरी चमकावी,लेक माझी* *या ओळी फक्त बोलण्या, चालण्या* *साठी का?माणूस एव्हढा* *क्रूर कसा होऊ शकतो.* *एकीकडे डोळ्यासमोर येते ती सोडून* *जाणारी माता..... तर दुसरीकडे दिसते मांडीवर घेऊन* *बसलेली ती अनाथाश्रमातील सांभाळ* *करणारी माता.* *कुठे कुठे आर्त हाक मारावी तेच कळत नाही.* *विदयेचे पवित्र मंदीर आज ओंगळ वाटते आहे.* *आॅफीस, कार्यालयात तू गळाला लागते आहे.* *ऑटोरिक्षा, बस ,रेल्वेत जणू लपले तक्षक आहेत.* *सृष्टीची तू निर्माती आहेस* *तूच दुर्गा,तुच लक्ष्मी ,सरस्वती आहेस* *सावध रहा सदा या मायावी दुनियेत* *सावित्रीच्या सुजाण लेकी!!!* *तूच तुझी अंगरक्षक आहेस.* *काल तू होतीस म्हणून आज आम्ही* *आहोत माई..* *नाहीतर आम्हाला* *स्वयंपाकघर-न्हाणीघर-देवघर यापलिकडे अस्तित्वच नव्हतं..* *तू उंबरठा ओलांडला नसता तर आम्ही आजही उंबरठ्याआडच* *राहिलो असतो.. खिडकीतून* *दिसणार्या टीचभर आभाळात* *नशिबातील अमावस्या-पौर्णिमा मोजत बसलो असतो..* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो. जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत, त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत. अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात. त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही. अशा वृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 📲 9421839590 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *💐कर्म सिद्धांत 💐* डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहीला आणि खाण्याची ईच्छा जाग्रुत झाली ,डोळेतर फळ तोडू शकत नाहीत म्हणून पाय गेले फळ तोडायला ,पण जवळ पोहोचूनही पाय आंबा तोडू शकले नाहीत ,मग हात गेले आंबा तोडायला ,हाताने आंबा तोडला पण हात पाय व डोळे तो खाऊ शकले नाहीत .आंबा खाल्ला तोंडाने पण तो तोंडात राहीला नाही ,तो गेला पोटात , आता माळ्याने ते पाहीले आणि त्याने दांड्याने मार दिला पाठीवर, पाठ म्हणाली मला का मारता ? मी कुठे आंबा खाल्ला ? दांड्याने मार मिळाला पण अश्रू आले डोळ्यात कारण पहिला दोष डोळ्यांचा होता ,डोळ्यानी प्रथम आंबा पाहिला होता हाच आहे कर्म सिद्धांत *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/01/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लाला लजपतराय जयंती* 💥 ठळक घडामोडी :- ● २००३ :- मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर 💥 जन्म :- ● १८६५ - लाला लजपतराय यांचा जन्म 💥 मृत्यू :- ● १९८४ - भारतीय चित्रपट दिग्दर्शक साहेबराव मोदी यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *प्रजासत्ताक दिनी पाच किल्ल्यांवर फडकवला तिरंगा रायगड जिल्ह्यातील उरणच्या भेंडखळ इथल्या हर्षितीने इतिहास घडवला, सर्वात कमी वयातील गिर्यारोहक म्हणून तिच्या पराक्रमाकडे पाहिलं जात आहे. म्हणूनच वर्ल्ड बुक, आशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नेरूळ येथे उभे राहत असलेल्या मरिना सेंटर मधून सुटणाऱ्या बोटी अलिबागला फक्त एक तासात आणि मुंबईला अर्धा तासात पोहचणार आहेत. 111 कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून एक वर्षात तो कार्यरत होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिलीए. आगामी दहावी आणि बारावी परीक्षांवर बहिष्कार घालत आहोत, त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा पवित्रा आंदोलक शिक्षकांनी घेतलाय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शिवभोजन केंद्राच्या उदघाटन करण्यात आलं...* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सर्व सुविधांनी युक्त अशा अत्याधुनिक बसस्थानकांचे आराखडा सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सरकारने शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याऐवजी चिंताग्रस्त केलं, गिरीश महाजनांची टीका, महाविकास आघाडी सरकारने अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली. यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी सरकारवर साधला निशाणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई: इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल २०२० स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार असून या स्पर्धेतील अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामासंदर्भात झालेल्या गव्हर्निग काऊसिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कविता - माकडाची शाळा* सौ.सविता जयंतराव धर्माधिकारी जि.प.कें.प्रा.शा.कासारखेडा ता.जि.लातूर मुले आली शाळेला घेऊन पाठीवर दप्तर माकड आले शाळेमध्ये झाडावरून चालत भरभर माकड म्हणाले, आज माझे ऐका तुम्ही मी सांगेन युक्त्या नामी माझ्या सारखी करा नक्कल बघा कशी वाढेल अक्कल दप्तर ठेवा बाजूला उड्या मारू चार मजा करू सारे यारे नाही मिळणार मार माझ्या मागे गाणी म्हणा हुप हुप हुप हुप हुप गाल कसे फुगले बघा आरशात बघा रूप झाडावरही चला सरसर फळे तोडू पटापट वही पेन पुस्तक पाटी कसलीच नव्हती कटकट *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" तुम्ही अपयशी झाले त्यापेक्षाही तुम्ही अपयशी झाल्यानंतर काय करतात याची मला जास्त काळजी वाटते."* ------------------------- अब्राहम लिंकन *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जर्मनीचे चलन कोणते ?* मार्क 2) *'मार्श गॅस' असे कोणत्या वायूला म्हणतात ?* मिथेन 3) *इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय कोण ?* मिहीर सेन 4) *मणिपूर राज्याचे लोकनृत्य कोणते ?* मणिपुरी 5) *श्रीकृष्णाची जन्मभूमी कोणती ?* मथुरा ( उत्तरप्रदेश ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सोपान राव डोंगरे 👤 राम पाटील ढगे 👤 अनिल सोनकांबळे 👤 मोगलाजी मरकटवाड 👤 सलीम शेख 👤 श्रीनिवास सीतावार 👤 राजेश अर्गे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खात्या-पित्या घरातून उठून माणसे रस्त्यावर कशी येतात ? आणि रस्त्यावरची उठून वैभवाच्या शिखरावर कशी पोहचतात ? कोणी ढकलते की आपल्या पायांनी येतात जातात ? प्रश्नाचे उत्तर तसे कठीण असले तरी ढकलण्याचे ब-याचदा निमित्त होते. आर्थिक आघात, व्यसने, नादानी, जीवघेणे आजार, फसवणूक यातून माणसं विपन्नावस्थेत पोहचतात. पैसा यात मोलाची भुमिका बजावतो. त्याचे स्नोत वाहते असतील तर निभावता येते.* *एकदाच मिळणा-या आयुष्याची अशी वाताहत केव्हाही क्लेशदायी, पण ती ज्याची होते तोही ती रोखू शकत नाही. अंथरूण पाहून पाय पसरले, नमते घेतले तर असे प्रसंग टाळताही येतील, पण तशी बुद्धी व्हावी लागते. मग याच्या उलट घडून माणसे रस्त्यावरून वैभवाच्या शिखरावर जातात. "मानवी जीवनात दु:ख ऐसपैस असते तर सुख मुटकुळे करून असते."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥* ●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🙏सुप्रभात🙏* *मित्रांनो* *मैंने पुछ लिया जिन्दगी से, "क्यों* *इतना दर्द दिया ?" वो हंसी और* *बोली, "अरे पगले, मैं तो तुझे जीना* *सीखा रही थी.....!" लेकिन तु* *कल की फिक्र में हमेशा* *दर्द लेता रहा। याद रखना,* *आज से बेहतर कुछ नहीं* *क्योंकि कल कभी आता ही* *नहीं और आज कभी जाता* *नहीं....!* *मायकल जॅक्सनला हे पूर्ण द्यात होते,पण मरणावर विजय* *मिळविण्यासाठी त्याची धडपड चालू होती.* *ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं दु:खाचं अन* *सुखाचं हेच नातं असतं.* *मृत्यू अटळ आहे.हे मान्य करायला तयार असणारा माणूस लढणं सोडत* *नाही.* *आणि मृत्यूला घाबरणारा रडणं सोडत नाही.* *मग दोन्हीपैकी काय निवडायचे ते आपणच ठरवायचे.* *महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करित नाही. आणि मेहनत* *केल्याशिवाय महत्वकांक्षा पुर्ण होत नाही…! मायकल जॅक्सनला १५० वर्षे* *जगायचं होतं. कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात* *मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत* *असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा घालत असे. त्याची काळजी* *घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी १२ डॉक्टर नियुक्त केले* *होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या* *नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत* *असत. त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला* *खायला घातले जायचे. त्याच्याकडून व्यायाम करून* *घेण्यासाठी १५ लोक तैनात असायचे.* *मायकल जॅक्सन गोरा नव्हता. त्याने १९८७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरी करवून* *घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने* *आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं आणि गोर्या* *आईवडिलांना भाड्याने घेतलं. मित्र जवळ केले ते ही त्यांचा गोरा रंग* *बघूनच. लग्न केलं ते ही गोर्या मुलींबरोबर.* *दीडशे वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या* *बिछान्यावर झोपत असे. त्याने स्वतःसाठी शरीराचे* *अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो स्वतः करत असे* *म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुप्फुस, डोळे* *किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील.* *त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही* *चकवा देईल पण हे शक्य झालं नाही आणि २५ जून २००९ या* *दिवशी त्याची हृदयगती बंद पडू लागली. त्यावेळी त्याच्या घरी* *१२ डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं* *नाही. हे बघता शहरातील सगळे* *डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही* *त्याला वाचवू शकलं नाही.* *त्याने २५ वर्षे डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही* *खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तसतशी* *त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला १५० वर्षे* *जगायचं होतं पण त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू* *झाली. आयुर्मान* *वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती, त्याचा काहीही उपयोग* *झाला नाही.* *जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले* *की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. तो* *टकला होता. त्याच्या बरगड्या, खांदा यांची हाडं तुटलेली होती.* *त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशाण होते.* *प्लॅस्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा, त्यावर उपाय* *म्हणून त्याला रोजच्या रोज antibiotics ची अनेक injections* *घ्यावी लागत असे.* *मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा २५० कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात* *पाहिली. ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात* *जास्त पाहिली गेलेली घटना आहे.* *मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच २५ जून २००९ या* *दिवशी दुपारी ३.१५ वाजता विकिपीडिया, ट्विटर आणि AOL चं* *instant messenger हे सगळं क्रॅश झालं होतं. याच्या मृत्यूची बातमी* *येताच ८ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन* *म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू* *झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम झाला आणि मग गुगलही* *क्रॅश झालं. त्यावेळी अडीच तास गुगल बंद राहिलं.* *मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो, त्यांना मृत्यूच चकवतो, हेच* *खरं. चार दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे* *येणारा माज..* *कशाला तो ! स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मूठही रिकामीच* *असणार आहे. हे कधी समजणार लोकांना ! कदाचित कधीच* *नाही.* *जग जिंकणारा सिकंदर सुद्धा मरतेवेळी जमिनीवर मोकळे हात* *करून लोकांना संदेश देऊन गेला.* *खाली हात आया है,खाली हात जायेगा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे एखाद्या गीताला सुमधुर संगीतात संगीतबद्ध करायचे असेल तर त्यासाठी अनेक वाद्यांचे सुर एकत्रित आणावे लागतील आणि त्या वाद्यांना वाजवणारे किंवा चालवणारे अनेक कलाकार एकत्रीत आणून गीताला तालबद्ध आणि स्वरबद्ध करावे लागेल तेव्हा कुठे सुमधुर गीत ऐकण्यासाठी तयार होईल.अर्थात इतरांना त्या गीताचा आस्वाद घेता येईल.त्याचप्रमाणे एखादी चांगली कृती करण्यासाठी किंवा ती कृती सर्वमान्य होण्यासाठी सर्वांच्याच सहभागाची गरज असते आणि त्यात सर्वांचेच सहकार्य असेल तर ते नक्कीच एखाद्या सुमधुर गीतासारखेच सुसंस्कारीत बनेल आणि नक्कीच लोक अनुकरण करायला लागतील.कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी अनेकांचे सहकार्य असणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांनी एकत्रित, एकोप्याने राहणे गरजेचे आहे आणि तसे राहिल्यास सा-यांनाच चांगला फायदा होईल.नाहीतर एकटे राहून एकाकी जीवन जगण्याचा अट्टाहास केला तर त्या जगण्याला मीठविरहित जेवन केल्यासारखेच जीवन चवहिन होईल हे लक्षात असू द्यावे.जीवनात चांगल्या गोष्टींसाठी एकी आणि एकोपा असणे गरजेचे आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड 📲 ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाकोळी आणि कावळा* एक पाकोळी आणि एक कावळा स्वतःच्या सौंदर्यावरून आपआपसात भांडत होते. बोलता बोलता कावळा पाकोळीला म्हणाला, 'तुझं सौंदर्य फक्त उन्हाळ्यातच पहावं, माझं सौंदर्य सदासर्वदा सारखंच असतं त्यामुळे मी नेहमीच सुंदर दिसतो,' तात्पर्य - दोन सुंदर वस्तूंपैकी जिचे सौंदर्य जास्त टिकाऊ तीच अधिक उपयोगी म्हटली पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/01/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महर्षी मार्कंडेय जयंती* 💥 ठळक घडामोडी :- १९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते. 💥 जन्म :- १९०१: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी १९२२: हिन्दी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित १९२६: भारताचे १३ वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य 💥 मृत्यू :- २००९: भारताचे ८ वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *देशाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतल्या राजपथावर भारताच्या सामर्थ्यांचं दर्शन, भारतीय हवाई दलाकडून चित्तथरारक प्रात्याक्षिकं, राज्यांच्या संस्कृतीचंही दर्शन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्यभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, मुंबईत शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, आरमार प्रमुख शूर कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या चित्ररथाचं प्रदर्शन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात नोटबंदी, जीएसटीपासून ते स्वच्छता अभियानाचा उल्लेख केला. देशाच्या विकासासाठी सरकार करत असलेल्या अनेक निर्णयांचा उहापोहही केला. तसेच, नागरिकांनी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे. हिंसा कुठल्याच प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही, असेही मोदींनी म्हटले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यभरात 122 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्राची स्थापना, 10 रुपयांत गरजूंसाठी शिवभोजन थाळी, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी झालं उद्घाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शरद पवारांच्या सुरक्षेत कपात नाही, दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण, दिल्लीतल्या निवासस्थानी पुन्हा सहा सुरक्षारक्षक तैनात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नगरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा, राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार आणि क्रिकेटपटू जहीर खानला पद्मश्री मिळाल्याने अहमदनगर जिल्ह्यात आनंदाला उधाण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडवर सात विकेट्सनी विजय, पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी, केएल राहुलची धमाकेदार खेळी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महर्षी मार्कंडेय : पद्मशाली समाजाचे कुलदैवत* ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. भगवान शंकराचे परमभक्त असलेले मृकंडला एकही पुत्र नव्हते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकर भगवानची कठोर तपस्या केली. त्यांच्या या कठोर तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले. ....... https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_7.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• || लालपरी || - विलास सुर्यवंशी वडाळा , मुंबई . सोनुली छकुली इवली इवली बाहुली माझी छान गाल गोबरे सुंदर डोळे गोरी गोरी पान || लालपरीचे फ्राॅक गुलाबी चिमुकले हे कान कानामध्ये झुलती झुमके डुलु डुलु डोले छान || ओठावरती लालच लाली हसते खुदकन गाली इतकी सुंदर दिसते कोमल लालपरी पाकळी || बोबडी बोले डोलत चाले चाले ठूमकत ठूमकत खेळते माझ्यासंगे मजला येते भरपूर गंमत || *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'सत्यमेव जयते' हे कशातून घेतलेले आहे ?* मुंडक उपनिषदातून 2) *'क्रांतिकारकांचे बायबल' असे कोणत्या कादंबरीला म्हटल्या जाते ?* आनंदमठ 3) *हरिजन संघाची स्थापना कोणी केली ?* महात्मा गांधी 4) *महाराष्ट्रातील पहिले वायफाय शहर कोणते ?* पुणे 5) *स्वामी दयानंद सरस्वती यांचा कोणता वेदावरील ग्रंथ आर्य समाजाचा प्रमाण आहे ?* सत्यार्थ प्रकाश *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दत्तराम बोमले *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.* *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *_मित्रांनो,_* *👍सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे.* *🤝🏻होठोपे सच्चाई रहती है।* *जहाँ दिलमे सफाई होती है।* *हम उस देशके वासीं है,जिस देशमे* *गंगा बहती है।* *अस असलं तरी 😃😁चेहरा न देखो दिलको देखो।* *😃चेहरे ने लाखोंको लुटा।* *दिल सच्चा और चेहरा झुटा।* *हे पण तितकेच महत्वाचे आणि खरे* *आहे.* *🏆मनुष्याचं चारित्र्य कमकुवत करणारे दोन मुख्य अवगुण म्हणजे--लोभ* *आणि असत्य.मोठमोठ्या गोष्टीविषयी* *असणारा लोभ पटकन लक्षात येतो.* *पण सूक्ष्म स्तरावर असणारा लोभ लगेच लक्षात येत नाही.* *या छोट्या आणि सूक्ष्म लालसा म्हणजे,समाजामध्ये,मित्रांमध्ये* *लोकप्रिय होण्याची इच्छा, इतरांच्या तोंडून आपली स्तुती व्हावी ही* *अपेक्षा, आपण जसे आहोत, त्यापेक्षाही अधिक सुंदर* *दिसावं,कष्टाविना सुखसुविधा प्राप्त व्हाव्यात अशा इच्छा.* *या लालसाच माणसाला अपराध करण्यासाठी प्रवृत्त करतात. तसेच* *खोट बोलायला भाग पाडतात. त्यामुळे आपल्या शब्दांची ताकद नाहीशी होते.* *झूठे इंसान की ऊंची आवाज सच्चे इंसान को खामोश कर देती हैं l परंतु* *सच्चे इंसान की खामोशी झूठे इंसान की बुनियाद हिला देती है l* *सत्य परेशान होता है, पराजित नही।* *हे लक्षात ठेवून मार्गक्रमण करावे.* *खरा माणूस पहायला मिळेल.* *अशोक कुमावत, नाशिक* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *यशाचा घडा* वसिष्ठांची पत्नी अरूंधती ज्ञानी, विद्वान, पतिव्रता होती. एकदा सूर्य अग्नी व वरूणासह वसिष्ठांच्या आश्रमात आले. तेंव्हा अरूंधती पाण्याचा घडा घेऊन नदीवर जायला निघाली होती. तिने तिघांना बसायला आसन दिलं आणि म्हणाली, 'थांबा थोडं, आता नदीवरून एवढा घडा भरून आणते.' त्यावर सूर्यदेव म्हणाले, 'आई नदीवर कशाला? मीच मंत्रसामर्थ्याने देतो घडा भरून' एवढे म्हणून त्यांनी मंत्रसामर्थ्याने घडा भरला, पण तो घडा १/२ रिकामाच राहिला. शेवटी तो पूर्ण भरण्याचे काम अरूंधतीने केले. नंतर ती म्हणाली कोणत्याही यशाचा ३/४ वाटा देवदत्त असला तरी १/४ भाग भरण्यासाठी मानवी प्रयत्नच लागतात. निढळाच्या घामाने उरलेला १/४ घडा भरणे भाग आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*माझी शाळा माझे उपक्रम* 📚📚📚📚📚📚 जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांतर्गत आज (दि.२३- ०१-२०२०) रोजी आयोजित *👏मातृपूजन👏* आयोजकः श्रीमती सेनकुडे मॕडम ☘☘☘☘☘☘ *'ठेविला चरणी माथा, फिरे हात तोंडावरूनी, आशीर्वाद देता देता , येतो ऊर तिचा भरूनी, होऊदे बाळ मोठा, हाची धावा देवाचरणी स्वर्गही पडे फिका, माऊलीच्या चरण स्पर्शांनी'* आईचे महान स्थान व आपली आई ही आपल्यासाठी देवच असते. *मातृपूजन* ह्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आईची महती आजच्या विविध उपक्रमातून सांगण्यात आली. आयोजित सर्व कार्यक्रम बघून सर्व मातांना आनंद झाला. काही क्षणचिञे..👇👇👇👇 〰〰〰〰〰〰〰 *✍वृत्तांत लेखन* श्रीमती प्रमिला सेनकुडे.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/01/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय मतदार दिवस* 💥 ठळक घडामोडी :- ● १९७१ - हिमाचल प्रदेशला भारताचे १८वे राज्य म्हणून मान्यता. ● २००१ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर. ● २००४ - लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम.एन. वेंकटचलय्या यांना पद्म विभूषण किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक गुलजार, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी, पत्रकार एम.व्ही. कामत, व्हायोलिनवादक एन. राजम यांना पद्मभूषण किताब जाहीर. 💥 जन्म :- ● १९३१ - डीन जोन्स, अमेरिकन अभिनेता. ● १९३३ - कोराझोन एक्विनो, फिलिपाईन्सची राष्ट्राध्यक्ष. 💥 मृत्यू :- ● २००१ - विजयाराजे शिंदे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या. ● १९८०-लक्ष्मणशास्त्री दाते, सोलापूरचे 'दाते पंचाग कर्ते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्य सरकारकडून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून राज्यात शासकीय-निमशासकीय सेवेतील मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीत आरक्षण लागू करण्यात येण्याचे संकेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *वंचितनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, मुंबई औरंगाबादसह काही ठिकाणी हिंसक वळण, बंद यशस्वी तर दगडफेक करणारे कार्यकर्ते वंचितचे नसल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *केंद्र सरकारने शरद पवारांची सुरक्षा हटवली, केंद्र सरकारवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा घणाघात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पोलीस शिपाई आणि चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी म्हाडाची 10 टक्के घरे आरक्षित ठेवणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *चीनमध्ये मृत्यूतांडवासाठी कारणीभूत कोरोना वायरसचा महाराष्ट्रात शिरकाव, परदेशातून आलेल्या दोन मुंबईकरांना संसर्ग, प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर 31 जानेवारीपसून गारेगार प्रवास, ठाणे-वाशी आणि ठाणे-पनवेल मार्गावर 16 फेऱ्या, एसी लोकलचं सारथ्य महिलांकडे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *टीम इंडियाने पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत न्यूझीलंडचा सहा विकेट्सनी उडवला धुव्वा, श्रेयस अय्यर सामनावीर, राहुल आणि विराटची धडाकेबाज खेळी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय मतदार दिवस निमित्ताने* *मतदार राजा जागा हो .......!* इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालविलेले राज्य. येथे मतदार आपल्या मतदानाव्दारे लोकप्रतिनिधींची निवड करत असतात. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी आपले अमूल्य मत व्यक्त करणे खूप महत्वाचे ठरते. ........... https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_22.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आईचे ऐका* - भारती धुपद-सोळंके औरंगाबाद सखा तुका ऐंका रे जरा पोटभर जेवण घरचे करा वरण भात भाजी पोळी पिझ्झा बर्गरला मारा गोळी शेपू मेथी पालक भाजी खावी रोज ताजी ताजी आईचे भजी लय भारी खाऊ नका रे पाणीपुरी वडापाव खाऊन पोट दुखतं डॉक्टरकडे मग जावं लागतं डॉक्टर देतात औषधांचा डोस पाहून मग होता बेहोश आईचे सर्व काही ऐंकायचे बाहेरचे उघडे नाही खायचे आईच्या हाताला चवच न्यारी कधीच नाही पडणार आजारी *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मुघल सत्तेचा संस्थापक कोण ?* बाबर 2) *वायुसेनेच्या प्रमुखाला काय म्हणतात ?* एअर चीप मार्शल 3) *जलसेनेच्या प्रमुखाला काय म्हणतात ?* एडमिरल जनरल 4) *अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष कोण होते ?* बराक ओबामा 5) *सस्तन प्राण्यांच्या हृदयात किती कप्पे असतात ?* 4 कप्पे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा. वैशाली देशमुख, कुही नागपूर साहित्य स्पंदन समूह, संचालिका 👤 दत्ताहरी पाटील आवरे, धर्माबाद 👤 ललेश पाटील मंगनाळीकर 👤 राजीव सेवेकर 👤 महेबूब पठाण 👤 अंबादास कदम 👤 राहुल आवळे 👤 नरेश दंडवते, पत्रकार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक तरुण आपल्या विधवा आईला सोडून पळून आला आणि एका मठात तंत्र मंत्र साधना करू लागला, अनेक वर्षे लोटली, एके दिवशी त्याने आपले वस्त्र सुकविण्यासाठी टाकले आणि ध्यान करू लागला, डोळे उघडल्यावर पाहतो ते काय! एक कावळा त्याचे वस्त्र ओढत असल्याचे त्याला दिसले, हे पाहून तरुणाने त्या कावळ्याकडे क्रोधाने पाहिले.त्याक्षणी तो कावळा जळून खाक झाला. आपल्या सिद्धीचे यश बघून तो खुश झाला आणि अहंकाराने भिक्षा मागायला गेला. त्याने एका दारावर जावून आवाज दिला. पण कोणीच बाहेर आले नाही. त्याला फार राग आला. त्याने अनेक वेळेला आवाज दिला तेंव्हा एका स्त्रीने म्हटले," महाराज! थोडा वेळ थांबा! मी साधना समाप्त होताच आपल्याला भिक्षा वाढते." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा पारा चढला. त्याने म्हटले,"दुष्टे! तू आम्हाला ओळखत नाहीस. आमची परीक्षा बघतेस काय? याचे किती वाईट परिणाम होतील हे माहित आहे काय?"* *हे ऐकताच घरातील स्त्री म्हणाली," माहित आहे! तुम्ही शाप द्याल. परंतु मी काही कावळा नाही जो आपल्या क्रोधाग्नीत भस्म होईल. मातेला एकटी सोडून मुक्ती मिळवू पाहणाऱ्या अहंकारी संन्याशा! तू माझे काही बिघडवू शकत नाही." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा सगळा गर्व चक्काचूर झाला. त्याने बाहेरूनच क्षमा मागितली तेंव्हा गृहस्वामिनी घराबाहेर आली तेंव्हा त्याने तिला तुम्ही कोणती साधना करता ? असा प्रश्न केला. तेंव्हा ती म्हणाली,"आपली साधना तीच असते , आपण जी कर्मे करतो ती कर्म सोडून मुक्तीच्या मागे धावलं तर मुक्ती मिळणे दुरापास्त होते व यातूनच अहंकार निर्माण होतो. मी गृहस्थ धर्माची उपासना करते आणि त्यात कसूर करत नाही." हे ऐकून त्याने अहंकाराचा त्याग करून व सन्यस्त जीवन सोडून मूळ कर्तव्याचे पालन करण्यासाठी आईकडे परतला. प्रत्येकाने आपले विहित कर्तव्य योग्यपणे करावे याची जाणीव त्याला झाली.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *माणस अपयश का आलं यासाठी वेगवेगळी संरक्षण कवच वापरतांना* *आपण सगळ्यांनी बघितली आहे.* *इंसान जब हथेली की रेखाओं में* *भविष्य ढूंढने लगे,* *तब समझ लेना कि,* *उसकी बाजुओं में ताकत,* *और* *मन में विश्वास खत्म हो गया है..* *कारणं’ देणाऱ्यांना चपखल ’ उत्तर* *जीवनात अपयश येणं चुकीच नाही. पण प्रयत्नच न करणं हे मात्र चुकीचं* *आहे. वेळोवेळी कारणं देवून* *वेळ निभावून नेणारी माणसे आपण पाहिलीच असतील. ती नेहमी* *माझ्याकडे ‘काय कमी’ आणि दुसऱ्याकडे ‘काय जास्त’* *यातच मशगुल असतात.* *अशा विचासरणी त्यांना जीवनात पुढे जावू देत नाही. जीवनात* *अनेक उणीव असताना त्याचा विचार न करता* *यशाचं शिखर सर करणाऱ्या व्यक्ति कोण आहेत? ते जाणून घेऊयात...*_ : *माझ्याकडे असलेल्या छोट्या नोकरीत मी काहीही करु शकत नाही.* : *रिलायन्स उद्योगसमूहाचे जन्मदाते धीरुभाई अंबानी पेट्रोल पंपावर तेल* *भरण्याची लहानशी नोकरीच करायचे. त्यांनी पुढे* *मिळवलेले यश आपल्याला माहिती आहेच.* *मला वर्गात काहीच येत नाही.* *जगाला सापेक्षतावादाचा सिध्दांत देणारे अल्बर्ट आईनस्टाईन यांना तर* *अभ्यासात अजिबात गती नव्हती.* *मी अपंग आहे.* *प्रसिध्द नृत्यांगणा सुध्दा चंद्रन कृत्रिम पायाने नाचून यशस्वी झाल्या.* *जेसिका कॉक्सला हात नव्हते. तिने पायाने विमान उडवले. शरीरात* *हालचाल करण्याची क्षमता नसताना स्टीफन हॉकिंग फार मोठे* *संशोधक झाले. मार्क* *इंग्लिसला पाय नव्हते व अरुनिम्मा सिन्हाला अपघात पाय गमवावे* *लागले होते. ते दोघेही जगातील सर्वात उंच शिखर माऊंट* *एव्हरेस्टवर चढले.* *लहानपणीच माझे वडील वारले.* *ऑस्करविजेते संगीतकार ए. आर. रहमान यांच्या लहानपणीच त्यांचे* *वडील वारले होते.* *लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी त्यांना सांभाळावी लागली.* *गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सुध्दा त्यांच्या बालपणी त्यांच्या* *कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी लागली होती.* *मला इंग्रजी येत नाही.* *प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानी व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी* *इंग्रजीचा फार वापर करत नाही.* *तरीही ते यशस्वी आहेत.* *माझे शरीर खूप मोठे आहे.* *एकेकाळी अदनान सामीची ओळख त्याचे मोठे शरीर होते. आज त्याचा* *फिटनेस पाहून सर्वच अचंबित होतात.* *मी फारच किडकिडित आहे.* *महम्मद अली सुध्दा शरीराने* *किडकिडित होते. तरीही ते सात वेळा* *बॉक्सिंगचे विश्वविजेते झाले.* *मला कुणाचा वरदहस्त (गॉडफादर)* *नाही.* *वरील सर्व उदाहरणातील एकाही व्यक्तीला कोणीही वरदहस्त नव्हते.* *वरील उदाहरणे पाहिली तर कळते की, या लोकांनी आपल्या कमजोरीवर* *मात करुन यश मिळवले आहे. आपल्याकडे जे नाही* *त्याची ते व्यथा करत बसले नाहीत. जे आहे त्यात बेस्ट करण्याचा* *त्यांनी प्रयत्न केला. म्हणून आज त्यांचे नाव घेतले जाते.* *ग्रामीण, गरीब, श्रीमंत अशा* *सर्व प्रकारची माणसे यशस्वी* *होतात. ती शक्ती निसर्गाने* *त्यांना दिलेली आहे. त्या* *शक्तीला साकार करण्यासाठीचे मार्ग सापडले की झालं.* *प्रयत्न करा, यश तुमची वाट बघतय.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात सर्वात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोण असेल तर या प्रश्नांचे उत्तर अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतील.पण माझ्या मते सगळ्यात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोणी असेल तर फक्त मानवी मनच आहे.पहा ह्या मनाची आतापर्यंत कुणीही वेग आणि गती मोजली नाही.बहिणाबाईंच्याच शब्दांत सांगायचे झाले तर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं,किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर......मन पाखरू पाखरू तयाची काय सांगू मात आता व्हतं भूइवर गेलं गेलं आभायात... अशा या मनाची गती एवढी आहे की ती मोजता येणेच अवघड आहे.अशा या मनाला जर का आपण आपल्या जीवनात आपल्या वशमध्ये ठेवले तर तो यशस्वी होतो आणि नाही ठेवले तर जीवन जगण्यात अपयशी ठरतो. अशा सर्वश्रेष्ठ मनाला आपल्या वशमध्ये ठेवण्याचा अधिक प्रयत्न करायला हवा.म्हणजेच आपल्या जीवनाचा खरा अर्थही कळेल आणि सुखही मिळेल. *©व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏹🌸🍃🏹🌸🍃🏹🌸🍃🏹🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महत्वाच्या तीन गोष्टी* एका गावाजवळ एक अरण्य होते. त्या अरण्यात अनेक सुंदर व गोड गळ्याने गाणारे पक्षी येऊन निरनिराळे सुंदर आवाज काढत असत. एके दिवशी एका शेतक-याने एका पक्ष्याला पकडले. तो पक्षी सुरेख असा दिसत असून त्याचा आवाजही छान होता. पक्ष्याला पकडल्यावर तो शेतकरी म्हणाला,’’ मी तुला पिंज-यात ठेवून चांगले चांगले खायला घालेन आणि त्या बदल्यात तू मला गोड आवाजात गाणे म्हणून दाखवित जा.’’ पक्षी म्हणाला,’’ पिंज-यात तर मी जास्त दिवस जगणारच नाही. तर मी तुला कसे काय गाणे ऐकवू?” शेतकरी म्हणाला,’’ तर मग मी तुला मारून खातो.जसा तुझा आवाज गोड आहे तसेच तुझे मांसही अतिशय चवदार असणार याची मला खात्री वाटते.’’ पक्षी म्हणाला,’’ एवढ्याशा मला खाऊन तुझी भूक कशी काय शमणार?, त्या पेक्षा मी तुला महत्वाच्या तीन गोष्टी सांगतो. त्या तू कधीही स्मरणात ठेव. त्याने तुझा अपार फायदा होईल.’’ त्या पक्ष्याच्या गोड बोलण्यावर शेतक-याने विश्वास ठेवला व त्याला सोडून दिले. शेतक-याने सोडताच पक्षी झाडाच्या एका टोकावर जाऊन बसला व म्हणाला,’’ शेतकरीदादा, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे बंदिवासातून सुटण्यासाठी कैदी जी आश्वासने देतो त्यावर कधीही विश्वास ठेवू नकोस, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हाती आलेल्या गोष्टीला विचार केल्याशिवाय कधीही सोडून देऊ नकोस, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हातातून गेलेल्या क्षणाचा, किंवा झालेल्या चुकांबद्दल कधीही शोक करत बसू नकोस यातून तुझा काहीच फायदा होणार नाही.’’ एवढे बोलून पक्षी उडून गेला.. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/01/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९७२ -गुआममध्ये १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते. ◆ १९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले. 💥 जन्म :- ◆ १९१२ - केनेथ वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. ◆ १९१५ - जॉन ट्रिम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. ◆ १९१६ - व्हिक्टर स्टॉलमायर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ १९६६ - होमी भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. ◆ २०११ - पंडित भीमसेन जोशी, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंद, नागरिकत्वासह केंद्र सरकारने अलीकडेच पारित केलेल्या नव्या कायद्याच्या विरोधात हा बंद आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुकारला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूने आातपर्यंत १७ जणांचा बळी घेतला असून दोन शहरं जवळपास सील करण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना घराबाहेर पडण्यापासून बंदी घालण्यात आली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *परभणी : पाथरीच्या साई जन्मस्थळाचा वाद आता उच्च न्यायालयात जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्याने उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पाथरी साई जन्मस्थळ कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ठाकरे घराण्यातील आणखी एक चेहरा राजकारणात! अमित राज ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद- महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देशासाठी पदके जिंकणाऱ्या व उच्च दर्जाच्या खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. मात्र, त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारणी नोकरी मिळत नाही, त्यामुळे येत्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी आपला पुरस्कार शासनाला परत करणार असल्याचे निवेदन महापौर नंदकुमार घोडेले यांना दिले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *रणजीतसिंह देओल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी रुजू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *खेलो इंडियात सर्वसाधरण विजेतेपद मिळवण्याची महाराष्ट्राची ही सलग दुसरी वेळ आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यंदा 78 सुवर्ण, 77 रौप्य आणि 101 कांस्य अशी 256 पदकांची केली कमाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुख्यालय* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_22.html कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शाळा माझे मंदिर ...* - भीमराव मुरलीधर सोनवने मु .पो .वासडी . ता .कन्नड .जि .औरंगाबाद . भ्रमणध्वनी .९४०४५४९७८८. शाळा माझे मंदिर शिक्षक माझे गुरू मी छोटा भाविक विद्धेचा वाटसरू... रोज शिकवी मला जीवनाचा परिपाठ शिक्षक माझे दैवत थोपटे माझी पाठ ... आई देई जन्म मला गुरु करी ज्ञानदान पवित्र वाचा माझी गाता विध्या गुण .... शाळा माझे धाम शाळा माझे तीर्थ शाळा माझी काशी शिकवी जीवन अर्थ ... ह्या ज्ञानपंढरीचा मी एक वारकरी अध्ययन पताका माझ्या खांद्यावरी .... *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *ऊस उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो ?* उत्तरप्रदेश 2) *'पाचूचे बेट' या नावाने कोणत्या बेटास संबोधतात ?* श्रीलंका 3) *जगातील सर्वात कमी तापमानाचे ठिकाण कोणते ?* वोस्टोक ( Antartik ) 4) *जगातील सर्वात उष्ण ठिकाण कोणते ?* डेथव्हॅली ( अमेरिका ) 5) *जगातील विस्ताराने सर्वात मोठे बंदर कोणते ?* न्यूयॉर्क *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राहुल तांबे, मुंबई 👤 सोनू राजेंद्र येरमलवाड 👤 प्रशांत उकिरडे, सहशिक्षक, बार्शी 👤 रेश्मा कासार, पुणे 👤 सिध्दांत मनूरकर, पाथर्डी 👤 योगेश फत्तेपुरे 👤 दीपक पाटील, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *असताना कोणीही दान करील, नसतानाही दान करता आले पाहिजे. स्वत: भुकेला राहून कुणाची भूक भागवाल तर ते उच्चकोटीचे दान. अशा दानात परम संतोष भरलेला असतो. दुस-याचं दु:खं आपलं वाटणं म्हणजे संवेदनशिलता. ती उसनी नाही घेता येत, ती असायला हवी नि असते. ती जाणिवेतून येते. 'चमडी देगा लेकिन दमडी नही,' म्हणणारी माणसं नुसती कंजुष असत नाहीत तर ती निष्ठुरही असतात. ती स्वत:च्या इच्छा, आकांक्षाचे बळी देऊन जे धन जोडतात, त्याचा पायाच मुळी हिंसक असतो मग त्याची परिणतीही हिंसक होते. तुमचे दातृत्व लोक गृहीत धरून काही सामाजिक संकल्प करत असतील, उपक्रम हाती घेत असतील तर दातृत्व तुमची वृत्ती झाली आहे, असे समजायला हरकत नाही. दुस-याचे होणे हे 'स्वविसर्जन' खरे उच्चकोटीचे दान.* *निसर्ग जसा असतो तसे माणसाने असायला हवे. 'देणा-याचे हात' घेण्याची कल्पना ही जगातली सर्वोत्तम कल्पना म्हणायला हवी. मिडास, कुबेर व्हायचं की कर्ण हे ठरवता आले पाहिजे. शत्रूवर हल्ला करताना आपण कदाचित मरू हे माहित असूनही जो सैनिक प्राणाची बाजी लावतो, तो आपल्या जीवनाचा हेतूपुर्वक बळी देतो, म्हणून बलिदान श्रेष्ठ असते. अनाथ, अंध, अपंगाना दान चांगलेच पण.. त्याहीपेक्षा त्यांना सनाथ करणे, प्रज्ञाचक्षु बनविणे लाख मोलाचे. आपणाला दुस-याचं कोणी होता आलं तर समजावं,'त्यांना जीवन कळले हो!' असं जीवनाचं आकलन होणं म्हणजे जीवन सार्थकी लागणं.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937940* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *मृत्यू अटळ आहे.हे मान्य करायला तयार असणारा माणूस लढणं सोडत* *नाही.* *आणि मृत्यूला घाबरणारा रडणं सोडत नाही.* *मग दोन्हीपैकी काय निवडायचे ते आपणच ठरवायचे.* *महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करित नाही. आणि मेहनत* *केल्याशिवाय महत्वकांक्षा पुर्ण होत नाही…! आयुष्यात स्वत:ला* *कधी उध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक* *ढासळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत._* *ज्या दिवशी जबाबदारीचे आोझे खांद्यावर येते, त्या दिवशी थकायचा* *आणि रुसायचा अधिकार संपतो.* *दरवाजे छोटे ही रहने दो अपने दिल के, जो झुक के आ गया समझो वही* *अपना है ।* *आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार सकारात्मक* *पाहिजेत.* *माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह* *करणं, कारण पुस्तकांचा* *संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह* *करण्यासाठी भावनांची.* *माणुस हा बाह्य सौदर्या पेक्षा अंतरंगातील सौदर्याने श्रीमंत असला* *पाहिजे. कारण बाह्यसौदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते* *पण अंतरंगातील सौदर्य मात्र माणसाला अखेरच्या* *श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवते.* *नात्यांच्या बागेत एक नाते कडुलिंबाचे पण लावा, जे अनुभव भले कडवे* *देईल,* *पण अडचणीत तेच उपयोगी येईल.* *आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही, मात्र मनाला स्पर्श करण्याची* *ताकद शब्दात असते.* *आयुष्य सरळ आणि साधं आहे,* *ओझं आहे ते फक्त गरजांचं.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही या जगात आलात आणि तुमची ओळख माणूस म्हणूनच झाली.जन्मानंतर आपल्या जीवनाचा खरा प्रवास सुरू होतो.तिथूनमात्र आपण आपल्यासाठी काहीना काही करायला लागतो आणि कशाच्यातरी मोहात पडतो.हे माझं ते माझं म्हणत म्हणत सारं आयुष्य संपवतो. शेवटी आपण जन्माला येताना सोबत काहीच आणले नव्हते आणि शेवटी जे काही मिळवले ते इथेच सोडून गेले.मग मनुष्य जन्माला येऊन काय केले ? असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा उत्तर काहीच सापडत नाही. याचे जर खरेच काही उत्तर मिळवायचे असेल तर आयुष्यात चांगले जगायचे असेल तर,आपल्या पश्चात इतरांसाठी काही ठेवायचे असेल तर पहिल्यांदा कोणत्याही गोष्टींचा मोह टाळायला शिका, आपल्यातला मीपणा नष्ट करा,एकटेपणात जीवन जगण्यापेक्षा इतरांमध्ये जगायला शिका.पैसा आणि संपत्तीच्या मोहापायी आपले सुंदर जीवन दु:खाच्या खाईत लोटू नका,इतरांमध्ये सामील होऊन सुखदु:खांदा मदतीचा हात पुढे करा, इतरांपेक्षा आपण जन्माला आलो आणि वेगळे काही करून आपला ठसा जनमानसावर उमटवा जेणेकरून तुम्ही मनुष्यजीवनाला येऊन आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. पुन्हा आपल्याला ही संधी कधीच मिळणार नाही हे लक्षात असू द्या.मग तुमच्याच लक्षात येईल की, आपणास काय करायचे आणि काय करावे लागणार याचा नक्कीच उलगडा होईल आणि अनेक मोहापासून आपली सुटका होईल.आपले जीवन अधिक सुसह्य होईल. *©व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लाख मोलाचा देह* एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*आमची शाळा आमचे उपक्रम* 📚📚📚📚📚📚 जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांतर्गत आज (दि.२३- ०१-२०२०) रोजी *🌻हळदीकुंकू कार्यक्रम , मातापालक मेळावा,मातृपूजन* आयोजक👉 सौ.कुंभारे मॕडम,हिवराळे मॕडम,सेनकुडे मॕडम यांनी आयोजित केला होता. *👏मातृपूजन👏* 👉आयोजकः श्रीमती सेनकुडे मॕडम *'ठेविला चरणी माथा, फिरे हात तोंडावरूनी, आशीर्वाद देता देता , येतो ऊर तिचा भरूनी, होऊदे बाळ मोठा, हाची धावा देवाचरणी स्वर्गही पडे फिका, माऊलीच्या चरण स्पर्शांनी'* आईचे महान स्थान व आपली आई ही आपल्यासाठी देवच असते. *मातृपूजन* ह्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आईची महती आजच्या विविध उपक्रमातून सांगण्यात आली. आयोजित सर्व कार्यक्रम बघून सर्व मातांना आनंद झाला. काही क्षणचिञे..👇👇👇👇 〰〰〰〰〰〰〰 *✍वृत्तांत लेखन* श्रीमती प्रमिला सेनकुडे
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/01/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९७३-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हीतनामबरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले ● १८९७ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म भारताच्या ओडिशा राज्यातील कटक शहरात झाला. ● १९९६ - संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन. 💥 जन्म :- ● १८९७ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय क्रांतिकारी. ● १९२६ - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक. 💥 मृत्यू :- ● ११९९ - याकुब, खलिफा. ● १५६७ - ज्याजिंग, चिनी सम्राट. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर, सरकारच्या 100 दिवसपूर्तीला रामललाचं दर्शन घेणार, खासदार संजय राऊत यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भंडारा : जिल्हाच्या तुमसर तालुक्यातील आंबागड आश्रम शाळेचा भोंगळ कारभार परत एकदा चव्हाट्यावर आलाय. शाळेने दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म न भरल्याने 34 विद्यार्थी परिक्षेपासून वंचित, यामुळे पालकांमध्ये संतापची लाट उसळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *27 जानेवारीपासून मुंबई 24 तास सुरु राहणार, नाईट लाईफच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळाची मंजुरी, मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *शिवभोजन थाळीसाठी आधारकार्ड आणि फोटोची गरज, सरकारकडून नवीन नियमावली जारी, मुंबईत केईएम, नायर, कूपर हॉस्पिटलसह 15 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करणार * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *थेट जनतेतून सरपंच निवड रद्द होणार, बाजार समिती निवडणुकीमधील शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार रद्द, तर नगराध्यक्षांची निवड पूर्वीप्रमाणे नगरसेवकच करणार, फडणवीस सरकारच्या निर्णयाला ठाकरे सरकारकडून ब्रेक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ. मंगाराणी अंबुलगेकर तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्माताई सतपलवार यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : राज्यातल्या शाळांमध्ये आता मराठी विषय सक्तीचा होणार असून त्यासाठी सरकार हालचाली सुरू केल्या आहेत. शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी :- महाराष्ट्र केसरी सदगीर नाशिक पालिकेचा सदिच्छादूत, पालिकेकडून सदगीरला 3 लाखांचं बक्षीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बालविवाह कसे रोखता येतील ?* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चांदोमामा चांदोमामा* सौ.आरती डिंगोरे, विषयसाधनव्यक्ती पं. स. दिंडोरी, जिल्हा नाशिक. चांदोमामा चांदोमामा येशील का? ढगांच्या गाडीतून नेशील का? ढगांची मऊ मऊ गाडी रे, हरणांची त्याला जोडी रे…….. ढगांच्या गाडीतून करेन हात, फिरूया आपण सारी रात…… चांदण्याच्या राज्यातून फिरायला, आवडेल तुझ्याशी खेळायला…… दंगा मस्ती धमाल गोष्टी, आकाशातून पाही हिरवी सृष्टी..... करूया गंमती विसरूनी भान, गाऊया गाणी छान छान छान…… सकाळ होताच सोडशील मला, आईच्या कुशीत लपायला….. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'आझाद हिंद फौज'ची स्थापना कोणी केली ?* सुभाषचंद्र बोस 2) *'तुम मुझे खून दो, मै तुमहें आझादी दुगा' हे उद्गार कोणाचे ?* सुभाषचंद्र बोस 3) *'नेताजी' हे टोपणनाव कोणाचे आहे ?* सुभाषचंद्र बोस 4) *नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 'देशभक्तांचा देशभक्त' असे कोणी म्हटले ?* महात्मा गांधी 5) *'जय हिंद' ही घोषणा कोणी केली ?* सुभाषचंद्र बोस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष बोधनकर, नांदेड 👤 भालचंद्र गावडे, सोलापूर 👤 दिनेश चिंतावाड, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या मुलानं डाॅक्टर, इंजिनियर, मोठा उद्योगपती व्हावं, बख्खळ पैसा कमवावा आणि म्हातारपणांत सुखा-समाधानात जगता यावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. पण आपल्या मुलानं 'कवी' व्हाव, असं एकाही पालकाला वाटत नाही. कारण 'कविता' लिहीणं करिअरमध्ये बसत नाही. वकील, डाॅक्टर, इंजिनिअर यांच्यापेक्षाही जास्त समाजाला कवीची गरज असते हे आपण विसरतो.* *संत तुकारामांच्या काळात' सत्ता आणि संपत्ती' उपभोगणारे तेव्हांचे हजारो पाटील आज कुणाला माहीतही नाहीत; पण पाटीलकी सोडून कवितेच्या नादी लागलेले तुकाराम चारशे वर्षानंतरही जगभर सर्वांना अवगत आहेत. तुकारामांना जीवन कळलेलं होतं व पाटलांना व्यवहार. तुकारामांशिवाय आज आपण समाजाचा विचार तरी करू शकतो काय ? म्हणूनच केशवसुत म्हणतात.....* *आम्हाला वगळा गतप्रभ* *झणी होतील तारांगणे* *आम्हाला वगळा विकेल* *कवडीमोलावरी हे जीणे!* *॥ रामकृष्णहरी ॥* 💥💥💥💥💥💥💥💥✨ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *स्ववीर्य य: समाश्रित्य,* *समाह्रयती वै परान,।* *अभीतो युध्यते शत्रून,* *स वै पुरुष उच्चते।।* *ज्या व्यक्तीला स्वतःच्या शक्तीचा, ताकदीचा योग्य अंदाज आहे आणि* *त्यावरच अवलंबून राहून जो इतरांस आव्हान देतो आणि शत्रूशी* *प्राणपणाने लढतो,किंवा संकटे झेलून परतावून लावतो, तोच* *_खरा योद्धा वीरपुरुष म्हणणे योग्य होय!_* *काल अशाच दोन बाल योध्यांची वर्णी देशातील 22 मुलांच्या 2019 च्या* *राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित यादीत लागली.* *महाराष्ट्रात या 2 बाल वीरांना हा सन्मान मिळणार आहे.* *जो स्वतःसाठी जगला तो मेला,* *जो दुसऱ्यासाठी जगला तोच* *खऱ्याअर्थाने जगला असे म्हटले* *जाते. या दोन बहादुरांनी आपल्या* *प्राणाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचविले.* *या मध्ये ऑगष्ट 2018 मघ्ये मुंबईच्या परळ भागात एका 17 मजली* *इमारतीला आग लागली.यात 16 व्या मजल्यावर* *राहणाऱ्या 10 वर्षीय झेन सदावर्ते हिने शाळेत शिकलेल्या गोष्टींचा* *प्रत्यक्ष वापर केला. तिने सर्वांना धीर* *दिला,सुरक्षित स्थळी* *हलविले,विजेचा सप्लाय स्विच ऑफ* *केला,अग्निशमन दलाच्या जवानांना फोन करून पाचारण* *केले.हे सगळे इतक्या साहसाने आणि* *धाडसाने केले म्हणून तिला* *17 लोकांचे प्राण वाचविता* *आले.या धाडसाने तिला* *मुंबई करांनी डोक्यावर घेतले* *आणि भारत सरकारने हा पुरस्कार जाहीर केला.* *दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील हातमाळी या छोट्याशा गावातील* *आकाश खिल्लारे याने महिलेचा आरडाओरडा* *ऐकून तिकडे धाव घेतली. पाण्यात बुडत असलेल्या* *महिलेला आणि तिच्या लहान मुलीला जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी* *घेऊन त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थ केली* *आणि दोघींचा जीव वाचविला.* *या शौर्याची महाराष्ट्रभर चर्चा आणि कौतुक झाले.* *आज काही लोक रस्त्यातील अपघात पाहून मदत न करता कायद्याच्या* *धाकाने तेथून निघून जाणाऱ्या अमानवी वृत्तीसाठी एक* *धडा आहे.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमचे जीवन योग्य दिशेने जाण्यासाठी एका विशिष्ट ध्येयाची किंवा योग्य दिशेची निवड करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा.म्हणजे तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होईल.याचा आनंद तुम्हालाही मिळेल आणि इतरांनाही मिळेल.त्यातून चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणाही मिळेल.नाही तर सागरातल्या भरकटलेल्या जहाजासारखे होईल. जर एखाद्यावेळी जहाजामध्ये दिशादर्शक होकायंत्र अचानक बंद पडले तर त्या जहाज चालविणा-या माणसाला आपले जहाज कुठे चालले आहे याचा अंदाजच लागत नाही.अर्थात भरकटलेल्या जहाजासारखीच आपल्याही जीवनाची दिशाहीन आणि ध्येयहीन वाटचाल होईल. यासाठी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा मग तुमच्या जीवनात कधीच अडथळे येणार नाहीत आणि जर का आलेच तर योग्य प्रकारे हाताळण्यात यश मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भावस्पर्श* सातारा ह्या गावी रहात असलेल्या आपल्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्टाने फुले पाठविण्यासाठी मुंबईत राहणारे शामराव फुले घेण्यास मंडई मध्ये गेले, तिथे गेल्यावर त्यांना एक छोटीशी मुलगी रडत असल्याचे दिसले, त्यावर त्यांनी विचारले, शामराव :- तू का रडत आहेस बाळ ? मुलगी :- मला माझ्या आईसाठी फुल घ्यायचे आहे, फुल १० रुपयाला आहे पण माझ्याकडे ४ च रुपये आहेत ........ शामराव :- एवढेचना चल मी तुला फुल घेऊन देतो ......... ( फुल घेऊन दिल्यावर ) चल मी तुला घरी सोडतो. मुलगी :- हो चालेल मला माझ्या आईजवळ नेऊन पोचवा (त्यावर ती गाडीत बसते ). शामराव :- कुठे सोडू तुला ? मुलगी :- इथून सरळ गेल्यावर उजव्या हाताला स्वर्ग आहे तिथे. शामराव :- पण तिथे तर स्मशानभूमी आहे !!! मुलगी :- काका, " जिथे आई तोच स्वर्ग " ......... नव्हे का ?? शामरावांच्या हृदयाला तिच्या शब्दांनी स्पर्श केला ................ पोस्टाने सातार्याला फुले पाठविण्याच्या ऐवजी शामराव स्वतः सातार्याला आपल्या आईला भेटावयास गेले !!! तात्पर्य :- " हि गोष्ट वाचून तुमच्या हृदयाला जी भावना स्पर्श करते तेच भावस्पर्श आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/01/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● २००७ - बगदादमध्ये दोन कारबॉम्बच्या स्फोटात ८८ ठार. ● २००१-'आय एन एस मुंबई' ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली. 💥 जन्म :- ● १९३४-विजय आनंद,हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक ● १९१५ - टॉम बर्ट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. ● १९२१ - अँड्रु गंतॉम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. ● १९६६ - निशांत रणतुंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १६६६ - शाह जहान, मोगल सम्राट. ● १९९९ - ग्रॅहाम स्टेन्स, भारतातील ख्रिश्चन धर्मप्रसारक. ● १९७२-स्वामी रामानंद तीर्थ,हैद्राबाद संस्थानातील स्वातंत्र चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदासाठी आयोजित करण्यात आलेली 36 वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 28 जून 2020 रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत आणखी आठवड्याने वाढवून ती 29 जानेवारी 2020 अशी करण्यात आली आहे, असे विद्यापीठ प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी घेतला मोठा निर्णय, शाळांमध्ये परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आहे. २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *तुकाराम मुंढे नागपूर महापालिका आयुक्त तर अश्विनी भिडे यांच्याजागी रणजीतसिंह देओल यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *वाडिया ट्रस्टमधील गैरकारभाराला राज्य सरकार आणि मुंबई महापालिकाच जबाबदार, ट्रस्टच्या कारभारावर संशय होता तर वेळीच चौकशी का नाही केली? हायकोर्टानं सुनावलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बाबासाहेबांचं स्मारक दोन वर्षात शक्य होईल, फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मनावर घ्यावं, इंदू मिल येथील कामाची पाहणी केल्यानंतर शरद पवारांचं मत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पहिली ते सातवी वर्गातील सर्व विषयांचं एकच पुस्तक, दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी नवा प्रयोग, पहिली ते सातवीपर्यंत सर्व विषयांचे एकच पुस्तक राहणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *प्रजासत्ताकदिनी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारची घोषणा; महाराष्ट्रातल्या 2 मुलांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार, झेन सदावर्ते आणि आकाश खिलारेची निवड, देशभरातील 10 मुलींचा आणि 12 मुलांचा पुरस्काराने होणार सन्मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चिऊताई* सौ. भारती सावंत, मुंबई चिऊताई चिमणी गातेस गोड गाणी बाळाला खेळवतेस उडतेस दूरच्या रानी घरट्यात पाखरांना भरवतेस चिमणचारा बांधलेस छानसे घरटे पिलांसाठीचा निवारा काडी काडी जमवून आणतेस कापूस मऊ बिछाना हा पिलांसाठी ठेवतेस त्यांतुन खाऊ गोलाकार सुंदर घरटे कशी गं बाई बनवतेस कुणी शिकवलेय तुला चोचीनेच ते विणतेस हल्ली मात्र चिऊताई कुठे सांगा बरं हरवली घरट्याला तिच्या आता कोणी उरला नाही वाली येशील का गं परतून चिऊताई खूप दूरवरून बाळाला माझ्या खेळव गोड चिव चिव तू करून *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'कांगारूची भूमी' असे कोणत्या देशास म्हणतात ?* ऑस्ट्रेलिया 2) *ताग उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा क्रमांक लागतो ?* पश्चिम बंगाल 3) *'जगाचे छप्पर' कोणत्या प्रदेशास म्हणतात ?* पामिरचे पठार 4) *कापूस उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो ?* गुजरात 5) *'काळे खंड' असे कोणत्या खंडाला म्हणतात ?* आफ्रिका खंड *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 स्वप्नील ईबीतवार 👤 हरीश बल्केवाड 👤 महेश मुदलोड 👤 नरेश मुंगा पाटील 👤 हुशन्ना मुदलोड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ग्रंथपारायणात रस नसलेलो आम्ही पुस्तकांची पानं फाडून, होड्या बनवून पावसात सोडायचो. काही दु:ख वाटायचं नाही उलट मौज वाटायची. पुस्तकाची किती पानं फाडलीत हे कुठं कळायचं, आई-बापांना ! अशा पुरात सोडलेल्या होड्या वाहुन समुद्राला गेल्या; पण डोळ्यातील स्वप्नांना मात्र त्यांनी बुडू दिलं नाही. पुस्तकांच्या पानांच्या होड्या, विमानं, पतंग बनवायला मिळतात म्हणून शाळेची वाट गोड. मजबुरीने धरलेल्या वाटेवर याच ग्रंथाच्या होडीने अथांग दर्यावर हुकूमत गाजवणारा नावाडी बघता बघता कधी बनवून टाकले, कळलेच नाही. तेंव्हा वाटले नव्हते, की या कागदी नावेला स्वप्नांची वल्हं आणि स्वप्नांचा अमर्याद धागा जोडला आहे ते.!* *आज ग्रंथांविषयी निराशापूर्ण वातावरण दिसते. ग्रंथांकडे समाज दुर्लक्ष करतोय, पण "किताबों पर धूल जम जाने से, कहानी थोडेही खत्म हो जाती है!" कुठल्याही काळात ही धूळ झटका, पुस्तकं पुन्हा भरभरून बोलतील. प्रत्येकाला ही कागदाची नाव आणि शाईचं इंधन पुरेसं आहे ; हा जीवनाचा अथांग दर्या तरून जायला.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *कसं होईल ह्या चिंतेत राहू नका *💯सगळं ठीक होणारचं* *ह्यावर विश्वास ठेवा* *रानात "तण" ,* *आणी मनात "ताण",* *कधीच ठेवु नये.* *रानातले "तण" पिकाचा "नाश" करते* *आणि* *मनातले "ताण"* *जगण्याचा "सर्वनाश" करते* *भारतातील कुटुंब व्यवस्था एकेकाळी जगातील सर्वश्रेष्ठ व्यवस्था होती.* *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता* *यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी* *प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत* *स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे.* *पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक* *रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे* *गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...?* *आहे....?...की.....?"* *संस्कृतीचा सांभाळ करा,आपली माणस जपा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विशिष्ट ध्येयाकडे जात असताना प्रत्येक पावलागणिक विचार करत असतो.आपले काम यशस्वीपणे पार पडणार का ?जर पार पडत नसेल तर अजून काही करावे लागते का? असे जेव्हा अनेक प्रश्न पडतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे असे वाटायला लागते.असा आत्मविश्वास कमी असल्याचा भास कमी होऊ देऊ नका.कारण तुम्हालाच तुमचे काम पूर्ण करायचे आहे तेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका किंवा डळमळीत होऊ देऊ नका.मी हे काम पूर्ण करणारच आणि पूर्ण झाल्याशिवाय सर्वार्थ बसणार नाही असा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर आणि प्रत्येक पुढे पाऊल टाकताना करा.नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नाते मैत्रीचे* एक खेकडा समुद्र किना-यावर फिरताना स्वत:च्या पायांमुळे होणारी नक्षी पहात होता. तेव्हढ्यात समुद्राच्या लाटेने ती नक्षी पुसली गेली. ते पाहुन खेकडा लाटेस म्हणाला, *"मी तर तुला माझी जवळची मैञिण समजत होतो आणी तरीही तू माझी छान नक्षी पुसून टाकलीस."* त्यावर लाट म्हणाली , *"अरे या नक्षीच्या मागावरच मासेमार तुला शोधुन पकडेल म्हणून मी नक्षी पुसली.."* मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे. नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.. कारण मैत्रीचे नाते हे अनमोल असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
आशा आशेचा किरण किरणांचा प्रकाश प्रकाशाची गती धरावी ही कशी जीवनात राम रामाचे राऊळ राऊळातला राम पावेल का कधी संसाराची परवड परवडीचा संसार संसारातील सार समजेल का कुणाला सगळी कडे पैसा पैशाचा सारा खेळ खेळातले खेळपन मावळले कधीच किरणांची पहाट पहाटेची किरणे नवं किरणांची आशा जागवावी कायमची . 〰〰〰〰〰〰 प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/01/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९७२ - मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. 💥 जन्म :- ● १९६३-गोविंदा,हिंदी चित्रपट अभिनेता ● १९५९-कृष्णम्मचारी श्रीकांत,क्रिकेटपटू भारत ● १८९४ - माधव ज्युलियन, मराठी कवी, कोशकार. ● १८९८ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, अभिनेते, संगीतकार. ● १९२४ - प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते. 💥 मृत्यू :- ● १९४५ - रासबिहारी बोस, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते. ● १९९८ - एस.एन.कोहली, माजी नौदलप्रमुख ॲडमिरल *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद, 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात राज्यातील 104 विद्यार्थी आणि 13 शिक्षक झाले होते सहभागी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशभरात 1 जूनपासून 'एक देश, एक रेशन कार्ड' योजना सुरु होणार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची घोषणा, एकाच रेशनकार्डवर देशात कुठेही खरेदी करता येणार धान्य, जुनंही रेशन कार्ड ग्राह्य धरलं जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शिर्डीकरांचं समाधान, बेमुदत आंदोलनही मागे, तर कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या विकासाला विरोध नाही, भाजप आमदार राधाकृष्ण विखेंकडून स्पष्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रिकल्चर व गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी दुबई इथं महाबीज परिषदेचे आयोजन करण्यात आलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सीएए, एनआरसीविरोधात प्रकाश आंबेडकरांकडून 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक, 35 संघटनांचा बंदला पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *जगत प्रकाश नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, अमित शाहांकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, आगामी निवडणुकांचे जे पी यांच्यासमोर मोठे आव्हान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *U19 World Cup: भारतीय संघाची दमदार सुरूवात; श्रीलंकेवर 90 धावांनी मिळवला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सैनिक : देशाचा संरक्षक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आनंदवन* *-प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त'* नागपूर *📞-९४२१८०३४९८ अंगणवाडी ही छान छान छान खुलून दिसते मुलांचे उद्यान सवंगड्यासंगे नित्य चाले खेळ सहज त्यांच्यात जुळे ताळमेळ खेळीमेळीतून घडे तन मन सात्त्विक घासाने फुलते जीवन *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• " विश्वास म्हणजे माणसाला जीवंत ठेवणारी शक्ती होय " *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *युरोप व आशिया या खंडांना कोणत्या संयुक्त शब्दाने ओळखतात ?* युरेशिया 2) *जपानचे चलन कोणते ?* येन 3) *महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता ?* रत्नागिरी 4) *जगातील प्रथम कादंबरीकार लेखिका कोण ?* मुरासाकी शिकीबु 5) *कॉफी उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो ?* कर्नाटक *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 देवांश हेमंत गवळी 👤 विरभद्र बसापुरे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 संतोष हेंबाडे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 साईनाथ सायन्ना जगदमवार 👤 अनिल मुपडे 👤 ऋषिकेश पवार 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रोजची प्रसन्न सकाळ ही नवी उमेद देणारी देणगी असते. पूर्व दिशेची अद्भूत रंगांची उधळण ही रोजच नवी असते. पक्षांची रोज नवी नादमधूर सूरांची मैफील रंगते. पक्षांच्या सुरेल किलबिलाटानं मन प्रसन्न होतं. चालण्याच्या व्यायामानिमित्त नेहमीच दिसणारी तीच ती झाडं; पण रोजच कशी नवी, टलटवीत, हिरवीकंच दिसतात! नयनरम्य फुलांचे घोस मनाला नवा तजेला देतात. कालच्या सुंदर घोसातील फुलं आज मात्र कोमेजून मातीत गळून पडली होती. झाडावरच्या घोसातील मुग्ध कळ्यांचं हळुवार उमलणं, उमलत्या पाकळ्यांची सुबक लकब मनाला मोहविणारी होती. मातीत गळून पडलेली कोमेजलेली फुलं आपला सुगंध घेऊन मातीत एकजीव होण्याची ही अदिम ओढ तर नसावी ना!* *फुलांचं फुलणं, झाडांचं डवरणं हे जितकं अद्भूत, सुंदर; पानांचं, फुलांचं गळून मातीत एकजीव होणंही तितकंच अदभूत आणि सुंदर. मातीसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा किती विनम्र भाव. सृजनसोहळा मन प्रसन्न करणारा तसाच आणि तितकाच निर्वाण सोहळाही. ही तर निसर्गाचीच अद्भूत किमया. उदय, विकास, अंत या अवस्था अपरिहार्य, अटळ तशा स्विकाराहार्यही असाव्यात. पण माणूस प्राणी हा उदय-विकासाचे टप्पे मनापासून स्वीकारतो. अंताचा टप्पा स्वीकारणं हे मात्र अवघड, असह्य होतं. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला निसर्गाचा हा नियम लागू आहे. बुद्धिमान, विवेकनिष्ठ माणसाला मात्र कळतं, पण वळत नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌸🌸🌸 🌸 🌸 🌸 🌸🌸 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *एक कविमित्र अस म्हणतो की* *काय कुठे संपल्या वेदना ,* *पुन्हा नवा अवतार कशाला।* *जन्म दिला जर एकटीने,* *मग नेणारे हे चार कशाला।* *अतिशय विद्रोही पण समाज जीवनाचे* *वास्तव सत्य टिपायला तो* *घाबरला नाही.* *पण गाड्यांनो समाज तर माणसांनी* *बनला आहे,आणि* *आपल्याला त्यातच मोठे व्हायचे* *आहे, मग एक करा।* *खालील चिंतन करा.👇👇* ॥ *जो फक्त वर्षाचा विचार करतो ,* *तो धान्य पेरतो.* *जो दहा वर्षाचा विचार करतो ,* *तो झाडे लावतो.* *जो आयुष्य भरचा विचार करतो ,* *तो माणुस जोडतो.* *आणी जी माणस माणस जोडतात ,* *तिच आयुष्यात यशस्वी होतात.॥* ॥ *आपला दिवस आनंदात जाओ।।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चांगले विचार करणे,चांगले विचार करायला लावणे आणि चांगल्या विचारांचा योग्य ठिकाणी उपयोग करणे हे आपल्या बुद्धीचे काम आहे.आपली बुद्धी जर क्रियाशील असेल तर ह्या सा-या विचारांचा व्यवहार व्यवस्थितपणे पार पडतो.जर बुद्धीच काही काम करत नसेल तर सारे जीवन व्यवहारच ठप्प होतात. अशा बुद्धीला अधिक चांगले क्रियाशील ठेवायचे असेल तर प्रत्येक चांगल्या गोष्टींचे अवलोकन करणे.जे ज्ञात नाही ते ज्ञात करुन घेणे,जे आपल्या आणि इतरांच्या हिताचे आहे आणि त्याच्यापासून जगाचे कल्याण होणार आहे. या सा-या गोष्टींचे विचार सदैव करणे.अशा चांगल्या कृती करण्यासाठी आपल्या बुद्धीला सदैव चांगल्या विचारांचे खतपाणी घातले पाहिजे.अशा गोष्टी वृद्धींगत करण्यासाठी चांगल्या संस्काराचा स्वीकार करणे,चांगल्या पुस्तकांच्या सहवासात राहणे,सज्जनांच्या सानिध्यात आणि जीवापेक्षाही जास्त प्रेम करणा-या चांगल्या मित्रांच्या संगतीत राहिले की, आपल्या चांगल्या बुद्धीचा विकास अधिक जोमाने होऊ शकतो हे निश्चित. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590. 📖📚📖📚📖📚📖📚📖📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वतःच्या कार्यसिध्दीतुन यश प्राप्त करणे.* *व्यवसायात काहीच प्रगती होत नसल्याने बॉस वैतागला होता,.* *ऑफिसमध्ये स्टाफ भरपुर होता पण काम होत नसे,.* *एके दिवशी त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलावले अन सांगितले की मी तुमच्या सोबत एक खेळ खेळणार आहे,.* *यात जो जिंकेल त्याला फॉरेन टूरला पाठविले जाईल,.* *सर्व स्टाफ खुश झाला अन खेळ काय आहे,.* *हे जाणण्यास उत्सुक झाला..!* *बॉसने सर्वांच्या हातात एक फुगा दिला अन सांगितले की शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल,. त्यालाच विजयी ठरविले जाईल आणि फॉरेन टूरला पाठविले जाईल..!* *एवढं सांगताच एकच कल्ला झाला,.* *जो तो आपल्या शेजारच्याचा फुगा फोडू लागला,.* *काही आपला फुगा कोणी फोडू नये म्हणून,.* *वाचविण्याचा प्रयत्न करू लागली पण कोणी ना कोणी ते फोडत असत,.* *असे करता करता सर्व फुगे फुटले कोणाच्याच हातात फुगा उरला नाही आणि कुणीच विजेता होऊ शकले नाही..!* *सर्व शांत झाल्यावर बॉसने सांगितले की,. शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल,. तोच विजयी ठरेल, असे मी बोललो,. याचा अर्थ प्रत्येकाने दुसऱ्याचा फुगा फोडावा, असा होत नाही..!* *तुम्ही इतरांचा फुगा फोडला नसता तर,.* *प्रत्येकाच्या हातात आता फुगा असता आणि सर्वच विजयी ठरले असते..!* *तात्पर्य* :- *यश मिळविण्यासाठी व जिंकण्यासाठी इतरांना हरविणे गरजेचे नाही,.* *इतरांना हरविण्याच्या नादात आपण सर्वच हरवून बसतो..!* *इतरांना जिंकण्यास मदत करा, आपोआप सर्वजण जिंकू शकाल..!स्वतःच्या कार्यसिद्धीतुन यश प्राप्त करणे म्हणजेच जिंकणे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/01/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● २००९-अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी ● १९९९-गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर 💥 जन्म :- ● १९०६ - ऍरिस्टॉटल ऑनासिस, ग्रीक उद्योगपती. ● १९३० - बझ आल्ड्रिन, अमेरिकन अंतराळवीर. 💥 मृत्यू :- ● २००२-रामेश्वरनाथ काओ, RAW या भारतीय गुप्तचर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ● १९३६ - जॉर्ज पाचवा, युनायटेड किंग्डमचा राजा. भारतात पंचम जॉर्ज नावाने प्रख्यात. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पर चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी साधणार संवाद, या कार्यक्रमात विशेष करून दिव्यांग विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींना भेटण्याची आणि प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबईतील नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, अपुऱ्या पोलीस यंत्रणेमुळे 26 जानेवारीपर्यंत अंमलबजावणी अशक्य, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *बेळगाव प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांशी चर्चा करावी, संजय राऊत यांचा प्रस्ताव, कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचाही पुनरुच्चार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *साईबाबा यांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. शिर्डीच्या ग्रामस्थांकडून ग्रामसभेत याबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार काल मध्यरात्रीपासून हा बंद मागे घेण्यात आले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजा शुल्कात वाढ, मंदिर संस्थानच्या विश्वस्तांचा निर्णय, शुल्क एक हजाराहून दीड हजारावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बेपत्ता गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृतदेह सापडला; कोकण कड्याच्या दरीत पडून दुर्दैवी मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई मॅरेथॉनवर इथिओपियन धावपटूंचं वर्चस्व, डेरारा हरिसा ठरला विजेता तर महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंचा ठसा, ज्येष्ठ नागरिकाचा धावताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *क्रिकेटची बातमी - बंगळुरु येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी केला पराभव. या विजयासह भारतानं ही मालिका 2-1 अशी खिशात घातली.* •••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• विकासात शिक्षकांचे योगदान ( जनशक्ती )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.ejanshakti.com/विकासात-शिक्षकांचेही-योग/ लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *।। मित्र ।।* - कु. साक्षी विलास आंबेवार वर्ग सहावा जि. प. प्रा. कन्या शाळा, धर्माबाद आपण सारे मित्र मिळून काढूया चित्र सकाळी लवकर उठू या दात स्वच्छ घासू या आपण सगळे बहीण भाऊ सगळे मिळून लाडू खाऊ देऊ या सगळ्यांना सुख घेऊ या सगळ्यांचे दुःख सल्ला घेऊनच काम करू पुस्तकांनाच मित्र बनवू बचत करायला शिकू या समाजाची सेवा करू या *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळेच महान गोष्टी आकार घेत असतात."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कर्नाटकातील नृत्यप्रकार कोणता ?* यक्षगाण 2) *चीनचे चलन कोणते ?* युआन 3) *ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे ?* यमुना 4) *शाहू महाराजांचे मूळनाव काय होते ?* यशवंतराव 5) *'श्रीमानयोगी' या कादंबरीचे लेखक कोण ?* रणजित देसाई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किशोर पाटील, यूनिक कंप्यूटर 👤 अहमद लड्डा, क्रीडा शिक्षक 👤 संतोष शेटकर 👤 आदित्य कोंपलवाड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रोजची प्रसन्न सकाळ ही नवी उमेद देणारी देणगी असते. पूर्व दिशेची अद्भूत रंगांची उधळण ही रोजच नवी असते. पक्षांची रोज नवी नादमधूर सूरांची मैफील रंगते. पक्षांच्या सुरेल किलबिलाटानं मन प्रसन्न होतं. चालण्याच्या व्यायामानिमित्त नेहमीच दिसणारी तीच ती झाडं; पण रोजच कशी नवी, टलटवीत, हिरवीकंच दिसतात! नयनरम्य फुलांचे घोस मनाला नवा तजेला देतात. कालच्या सुंदर घोसातील फुलं आज मात्र कोमेजून मातीत गळून पडली होती. झाडावरच्या घोसातील मुग्ध कळ्यांचं हळुवार उमलणं, उमलत्या पाकळ्यांची सुबक लकब मनाला मोहविणारी होती. मातीत गळून पडलेली कोमेजलेली फुलं आपला सुगंध घेऊन मातीत एकजीव होण्याची ही अदिम ओढ तर नसावी ना!* *फुलांचं फुलणं, झाडांचं डवरणं हे जितकं अद्भूत, सुंदर; पानांचं, फुलांचं गळून मातीत एकजीव होणंही तितकंच अदभूत आणि सुंदर. मातीसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा किती विनम्र भाव. सृजनसोहळा मन प्रसन्न करणारा तसाच आणि तितकाच निर्वाण सोहळाही. ही तर निसर्गाचीच अद्भूत किमया. उदय, विकास, अंत या अवस्था अपरिहार्य, अटळ तशा स्विकाराहार्यही असाव्यात. पण माणूस प्राणी हा उदय-विकासाचे टप्पे मनापासून स्वीकारतो. अंताचा टप्पा स्वीकारणं हे मात्र अवघड, असह्य होतं. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला निसर्गाचा हा नियम लागू आहे. बुद्धिमान, विवेकनिष्ठ माणसाला मात्र कळतं, पण वळत नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌸🌸🌸 🌸 🌸 🌸 🌸🌸 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *प्रत्येकाला जीवनात यशस्वी व्हावे असे वाटते.आपलं एक नाव* *असावं,कुठेतरी ,कुणीतरी आपली आठवण काढावी असे वाटते.मग* *यासाठी माणूस जीवापाड मेहनत करून, सुखांना पारखे करून* *मार्गक्रमण करत असतो. मान-अपमान सहन करत,घोर संघर्ष* *करत आपली नौका पार करत असतो.* *पण हे करत असताना प्रमाणामध्ये सर्व काही असावे हे विसरून* *चालणार नाही.धुतराष्ट पुत्रप्रेमाने वेडा होतो,यातून महाभारत घडते.कैकयी याच अट्टाहासाने* *रामायण घडवून आणते.तर गोपिकाबाई या* *अतिमहत्वकांक्षे मुळे अभागी स्त्री म्हणून ओळखल्या जाते.आपल्या* *पती आणि मुलांचे मरण ती डोळ्यादेखत पाहते.* *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज* *आहे.* *उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा;* *परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि* *समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ* *स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल,* *तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा* *नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला* *कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत.* *शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार* *आहे.* *स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव.* *राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या* *अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते.* *आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान* *राजाचा खून करायलाही* *तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• विचारामुळेच माणूस विचारशील बनतो.त्याच्या मनाचे चांगले विचार असतील तर त्याच्या कृतीमध्ये साकारताना दिसतात.मग ती कृती चांगली असेल तर त्याच्या वर्तनातही चांगले दिसायला लागते.ते त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक विचार कृतीतून स्पष्ट होतात.ते त्याच्या स्वतःच्याही भल्यासाठी व इतरांच्याही भल्यासाठी इष्ट असतात.पण तेच विचार जर वाईट असतील तर ते त्याच्या जीवनासाठी व इतरांच्या जीवनासाठीही हानीकारकच ठरतात. त्यामुळे विचार हा नेहमी चांगलाच करायला हवा. त्यात स्वतःबरोबर इतरांचेही कल्याण होण्यास मदत होईल. - व्यंकटेश काटकर, नांदेड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समाधान मानने* एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.' *तात्पर्य:- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.प्राप्त परिस्थितीत समाधानी असणे चांगले .* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/01/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९५६ - संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच काँग्रेस आमदारांचा राजीनामा 💥 जन्म :- ● १८४२ - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, अर्थशास्त्रज्ञ,समाजसुधारक,राजनीतीज्ञ. ● १८८९ - नाट्यछटाकार दिवाकर लेखक. ● १८९५ - विठठ्ल दत्तात्रय घाटे प्रसिद्ध लेखक ● १९७२ - विनोद कांबळी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९८६ - प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक ● २००३ - हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक. ● १९४७ - कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक. ● १९६७ - डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *परीक्षेतला तणाव दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात देणार विद्यार्थ्यांना टिप्स* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबईत 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर 'नाईट लाईफ' सुरु केली जाणार आहे. त्यानुसार मुंबईत अनिवासी भागातील सर्व थिएटर, मॉल्स, रेस्टॉरंटस् 24 तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बहुचर्चित होट्टल महोत्सवाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन, उद्या होईल समारोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई, पुणे: शहर आणि परिसरासह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दोन दिवसांत वाढला असून अनेक ठिकाणी तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले. उत्तर महाराष्ट्राला शनिवारी थंडीच्या लाटांचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तर आणखी दोन दिवस बोचऱ्या थंडीचा मुक्काम राहील असा अंदाज आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना 22 जानेवारी ऐवजी आता 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. निर्भयाच्या आईने मात्र फाशीला उशीर होत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन, 21 ओव्हरमध्ये एकही धाव न देण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आजही बापू नाडकर्णी यांच्या नावावर आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *राजकोट, 17 जानेवारी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियानं दमदार कमबॅक केला. दुसऱ्या सामन्यात भारतानं 36 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1ने बरोबरी केली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एका शेतकऱ्याची आत्मकथा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आनंदवन* *-प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त'* नागपूर *📞-९४२१८०३४९८ अंगणवाडी ही छान छान छान खुलून दिसते मुलांचे उद्यान सवंगड्यासंगे नित्य चाले खेळ सहज त्यांच्यात जुळे ताळमेळ खेळीमेळीतून घडे तन मन सात्त्विक घासाने फुलते जीवन *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जपानमध्ये हिंद स्वातंत्र्य संघाची स्थापना कोणी केली होती ?* रासबिहारी बोस 2) *मानवी उदरातील लहान आतड्याची लांबी किती असते ?* 6 मीटर 3) *बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या ?* राबडी देवी 4) *शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता ?* यकृत 5) *मानवी छातीच्या पिंजऱ्यात किती बरगड्या असतात ?* 24 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती विजया वाड, प्रसिद्ध साहित्यिक 👤 पी. आर. कमटलवार, धर्माबाद जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 👤 रामनाथ खांडरे, करखेली 👤 त्र्यंबक आडे, नांदेड 👤 महेश गोविंदवार, सहशिक्षक, माहूर 👤 कृष्णा कोकुलवार, नांदेड 👤 शैलेश मुखेडकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो , कालच्या दिवसाच्या* *विचारात गुंतून पडू नका,आजच्या* *आनंदावर विरजन* *कशासाठी टाकता, जो* *काही काल होता,त्याची जाणीव स्व* *ला* *देखील करू नका,कारण* *काल विचारांमध्ये राहील *पण आज अस्तित्वात आहे तो* *हातातून जाऊ देऊ नका,* *So be happy* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपले विचार लोकांपर्यंत पोहचवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातला भित्रेपणा नष्ट करुन आत्मविश्वासाने बोलण्यासाठी किंवा विचार व्यक्त करण्यासाठी लोकांसमोर उभे राहिले पाहिजे.दुसरी गोष्ट आपण काय बोलणार आहोत त्यात सत्यता असली पाहिजे कारण लोक सत्य काय आहे आणि किती सत्य आहे ह्याकडे लोकांचे तुमच्याकडे लक्ष असते. आपल्यावर कुणीही आक्षेप घेणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. आपल्यामध्ये स्पष्टपणा आत्मविश्वास,सकारात्मक परिणामकारकता आणि सत्यता असल्यामुळे भ्यायची गरज नाही.मग आपोआपच आपल्यातला भित्रेपणा नष्ट व्हायला लागतो.भीती वाटते केव्हा आपल्या विचारात सत्यता नसेल,स्पष्टपणा नसेल आणि लोकांना आपण काहीतरी म्हणून फसवत आहोत तर भीती आपल्यामध्ये राज्य करते. मग ती कधीही आपल्याला पुढे जाऊ देत नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वृद्ध झालेला कुत्रा* एका कुत्र्याने आपल्या तरुणपणी फार जनावरांची शिकार करून आपल्या मालकाचा लोभ संपादन केला होता. त्यावेळी त्याचा मालक त्याला कुरवाळीत असे व चांगले पदार्थ खाऊ घालीत असे. पुढे त्या कुत्र्याला म्हातारपण आले, तेव्हा पूर्वीसारखे शिकारीचे काम त्याच्याकडून होईनासे झाले. अशा अवस्थेत एके दिवशी इतर सगळ्या कुत्र्यांच्या पुढे जाऊन त्याने एका सशाची तंगडी पकडली, परंतु म्हातारपणामुळे त्याच्या तोंडात दात नव्हते, त्यामुळे ससा धरावा तितक्या बळकटपणे धरता आला नाही व तो ओढाताण करून सुटून गेला. ते पाहून त्या मालकास फार राग आला. हातातील काठीने तो त्याला मारू लागला. तेव्हा तो कुत्रा त्याला म्हणाला, 'अरे कृतघ्न माणसा ! क्षणभर थांब आणि तुझी चाकरी मी किती वर्षे इमाने इतबारे केली आहे, याचा विचार कर. ससा धरण्याच्या कामी मी माझ्याकडून काहीही आळस केला नाही. पण माझे दात पडले त्याला माझा काय इलाज ? म्हातारपणामुळे माझ्याकडून काम होत नाही, यामुळे तुला राग येतो, पण जर तू माझ्या पूर्वीच्या चाकरीकडे लक्ष देशील, तर तुझा माझ्यावरचा राग बराच कमी होईल.' *तात्पर्य :ज्याने तारुण्यात आपली चाकरी इमानाने केली त्या नोकराला त्याच्या म्हातारपणात क्रूरपणे वागविणे हे कृतघ्नतेचे लक्षण आहे..* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सुंदर माझे गाव* नयनरम्य गर्द हिरवी पर्वतावर दाट झाडी तिथे वसलेले गाव छोटे वळणावरून जाती गाडी रस्ते आहेत झाडीतले हिरव्यागच्च पहाडीतले झरे दिसतात पाण्याचे वाहत जाते चोहीकडे कौलारुचे घरे वसली हिरवळ मखमलीची शाल पांघरली धरणी जशी सजून बसली प्रवास करती प्रवाशी लाल एसटी हवीहवीशी दाट झाडीतून पळती गाडी सुंदर दिसती पहाडी 〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. (जिल्हाअध्यक्षा नांदेड)
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/01/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९५६ - बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा. ● २००१ - मध्य प्रदेश सरकारचा शास्त्रीय नृत्यासाठीचा कालिदास सन्मान रोहिणी भाटे यांना जाहीर. अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एम.जी.ताकवले यांना जाहीर. 💥 जन्म :- ● १८९५ - विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ. ● १९०५ - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ. ● १९०६ - शकुंतला परांजपे, भारतीय समाजसेविका. 💥 मृत्यू :- ●२००० - सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच एकाच वेळी २२ अखिल भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, प्रवीण दराडे यांची समाजकल्याण आयुक्तपदी बदली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिली खासगी तत्त्वावरील तेजस एक्स्प्रेस आज धावेल. ही एक्स्प्रेस अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान धावणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने ही दुसरी खासगी एक्स्प्रेस धावणार आहे. तेजस एक्स्प्रेस देशातील पहिली खासगी गाडी ४ आॅक्टोबर २०१९ रोजी दिल्ली ते लखनऊ धावली होती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दहा वर्षांत प्रथमच कमाल तापमान २५ अंश सेल्सियसपर्यंत घसरल्याचे हवामान खात्याने सांगितले, उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे पुढील काही दिवस तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नांदेडमध्ये दोन आयएएस अधिकाऱ्यांसह सहा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर नांदेडच्या जिल्हा परिषदेत खळबळ उडाली असून परिसरात शुकशुकाट पसरला होता.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वाडिया हॉस्पिटलसाठीच्या निधीवरुन हायकोर्टानं मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला धरलं धारेवर, 24 तासांत वाडिया हॉस्पिटलसाठी निधी उपलब्ध न झाल्यास संबंधित सर्व अधिकाऱ्यांची कोर्टात परेड घेऊ, असं हायकोर्टानं सुनावलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI-Reserve Bank of India) ने एटीम कार्ड अर्थात डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डबाबत नवीन नियम जाहीर केले आहे. आरबीआयने सर्व बँकांना आदेश दिले आहे भारतात ग्राहकांना कार्ड देत असताना एटीएम आणि PoS वर फक्त भारतात वापरता येईल असेच डोमेस्टिक कार्डची परवानगी द्यावी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आज राजकोट येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दुसरा एकदिवसीय सामना; मालिकेत कायम राहण्याचे आव्हान कर्णधार विराट कोहली पुन्हा तिसऱ्या स्थानी खेळणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *साहित्यसेवा हेच खरे काम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🐸..बेडुकराव...🐸* © सौ. अनघा पतके. खंडाळा. जि. सातारा. बेडुकराव ...बेडुकराव करताय काय डराव डराव नेहमीच तुमचं अंग ओलं बुळबुळीत असं कशाने झालं डोक्यावर मोठ्ठे डोळे दोन वटारुन असे बघतय कोण.? पाण्यात चिखलात कसे राहता ? पाण्याखाली कसे काय बघता..? जीभेने किडे कसे पकडता? आणखी तुम्ही काय काय खाता..? तोंड तुमचे हसरे छान ..🐸 कोठे गेली तुमची मान..? पुढचे पाय अखूड छोटेसे मागचे पाय मग लांब कसे..? पाण्यात तुम्ही छान छान पोहता जमिनीवर टण टण उड्या मारता.. पावसाळ्यातच तुम्ही कसे दिसता.? उन्हाळ्यात हिवाळ्यात कोठे लपता..? रात्री बे चे म्हणता का पाढे.? दिवसा मग वाचता का धडे..? कोठे असते तुमची शाळा ? शाळेत तुमच्या असतो का फळा..? असतो तुमचा कुठे गाव..? बेडुकराव डराव डराव...🐸🐸 🐸⛱🐸⛱🌿🐸⛱🐸⛱🌿 🌧☔🌧☔🌧☔🌧☔ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *राज्य विधानसभेची कमाल सदस्यसंख्या किती असू शकते ?* 500 2) *राज्य विधानसभेचा सदस्य होण्यासाठी किती वर्षे वय पूर्ण असावे ?* 25 वर्षे 3) *धन विधेयक प्रथम कोठे सादर केले जाते ?* विधानसभा / लोकसभा 4) *राज्य विधानसभेच्या दोन अधिवेशना दरम्यान जास्तीत जास्त किती कालावधी असू शकते ?* 6 महिने 5) *महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?* वर्षा गायकवाड *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जयप्रकाश भैरवाड, धर्माबाद 👤 शेखर घुंगरवार 👤 सचिन पाटील पार्डीकर 👤 धम्मपाल कांबळे 👤 यश चेलमेल 👤 राम घंटे 👤 मन्मथ भुरे 👤 माधव गडमवाड 👤 शरद दळवी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजच्या प्रसारमाध्यमांनी मनातल्या भावनांना बंदीस्त करुन टाकले आहे. मनातले विचार प्रकट करण्यासाठी संधीच उपलब्ध करून देत नसल्यामुळे माणसांच्या विचारांची देवाणघेवाण होत नाही. त्यामुळे चांगल्याही विचारांना मनातून बाहेर येण्यासाठी बांध घातला गेला आहे. त्यामुळे सुखी कोण..? आणि दुःखी कोण..? हे शोधणे अवघड होऊन बसले आहे. या सा-यांतून सुटका करायची असेल तर या प्रसारमाध्यमांपासून थोडे दूर राहून प्रचलित प्रसारमाध्यमांबद्दलचा मोह थोडा दूर ठेवला पाहिजे.* *त्याऐवजी थोडा संवाद, चर्चा, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करुन आपुलकीचे, प्रेमाचे, स्नेहाचे संबंध जोडण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. तरच प्रत्येकाला एकमेकांबद्दलची मनातली असणारी ओढ पूर्वीसारखी कायमची राहील. माणूस माणसाला विचारायला लागेल आणि जीवनव्यवहार सुरळीत चालायला लागतील. हाच माणुसकीचा धर्म जीवंत राहील अन्यथा माणसांपासून माणूस दूर जावून माणसामध्ये दडून बसलेली विकृती जन्मास येऊन सर्वत्र नैराश्याचे वातावरण निर्माण होईल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनहो,* *मंजिले उन्हीको मिलती है,* *जिनके सपनोमे जान होती है।* *पंखोसे उडान नही होती,* *होसले बुलंद होने चाहीए।* *तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.* *जीवनात येणारे प्रत्येक उदाहरण* *सोडवण्याचा प्रयत्न करा* *पण एका ठराविक वळणावर ते* *सोडून पण द्या.* *मात्र* *न थांबता मार्ग बदलून ध्येय साध्य* *करण्यासाठी पुढे चालत* *रहा,भले कितीही अडथळे येवोत.* *नदीचे ध्यान करा ती* *अडथळे अनेक येऊनही* *समुद्राला मिळाल्याशिवाय राहत* *नाही.* *हे सगळं करण्यासाठी स्वतःच्या* *विचारावर, भाषेवर,मनावर विश्वास* *ठेवा.* *प्रगतीचे विचार आणि वैज्ञानिक* *दृष्टिकोन बाळगा.* *अंतिम सत्य तेच आहे, नाहीतर* *मोठमोठाल्या मंदिरात सी.सी.कॅमेरे* *बसवण्याची वेळ* *कधीच आली नसती.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांना आपल्या स्वत:च्या रागावर नियंत्रण करता येते त्यांना जग जिंकणे काही अवघड नाही.जर रागावर नियंत्रण करता येत नसेल तर स्वत:चे जीवन स्वत:च्याच हाताने संपवल्यासारखेच आहे.म्हणून माणसाने कधीही राग आलातरी रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनशांती* एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल . एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले. काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस." तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला. जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली. ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो." एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?" तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले." एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले, "हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/01/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९९६ - भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या. ● १९९८ - ज्येष्ठ उर्दू कवी व लेखक अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. ● २००८ - टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण 💥 जन्म :- ● १९४६ - कबीर बेदी, भारतीय अभिनेता. ● १९२६-ओंकार प्रसाद तथा ओ पी नय्यर ,संगीतकार 💥 मृत्यू :- ● १९०१ - महादेव गोविंद रानडे, भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ. ● १९५४ - बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार. ● १९८८ - लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ. ● २००१ - पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता. ● २००३ - रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपती. ● २००५ - श्रीकृष्ण हरी मेहेंदळे, मराठी संगीतकार. पेटीवाले मेहेंदळे म्हणून ख्याती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *शिवडी-न्हावाशेवा जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, मुंबई-उरण 2 तासांचं अंतर 20 मिनिटांवर येणार, सर्वात मोठा सागरी पूल 2022 पर्यंत पूर्ण होण्याची आशा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची 100 फुटांनी वाढणार, स्मारक दोन वर्षात पूर्ण करणारच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना शिक्षण विभागातील अशासकीय नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *फडणवीस आणि ठाकरे सरकारची शपथविधीच्या सोहळ्यांवर कोट्यवधींची उधळण, ठाकरे सरकारकडून रोषणाईसाठी पावणेतीन कोटींचा खर्च* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा, अवैध दारुविक्री-महसूल नुकसानीमुळे बंदी उठवण्याचा विचार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *शिर्डी साईंच्या जन्मस्थानावरुन नव्या वादाची शक्यता, परभणीतल्या पाथरीला मुख्यमंत्र्यांकडून 100 कोटींचा निधी, पाथरीला मूळ जन्मस्थान दर्जा देण्यास शिर्डीकरांचा मात्र विरोध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसीच्या पुरस्कारांमध्ये भारतीय क्रिकेटपटूंचाच बोलबाला; रोहित शर्मा, विराट कोहली, दीपक चहरचा गौरव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे* प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *थंडी ..* -हेमंत मुसरीफ पुणे 9730306996. मैत्रीण वाटते प्रथम गोड गुलाबी थंडी घालवी सारा थकवा जशी जादूची कांडी थंडीचा होता गारठा उडू लागे घाबरगुंडी अंगात घाला लवकर स्वेटर टोपडी बंडी शेकोटी लागती पेटू जशी थंडी बने चंडी उबदार सर्वात मात्र आई गं तुझीचं मांडी *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताच्या पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार कोण ?* राजा रामन्ना 2) *भारताचे संगणक क्रांतीचे प्रणेते कोण ?* राजीव गांधी 3) *भारतातील पहिली दगडी कोळशाची खाण कोणती ?* राणीगंज 4) *सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?* दादासाहेब फाळके पुरस्कार 5) *राज्य विधानसभेची किमान सदस्यसंख्या किती असू शकते ?* 60 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ सायबलू, सहशिक्षक, धर्माबाद 👤 सचिन होरे, धर्माबाद 👤 किरण शिंदे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.* *याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील, विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली नावाखालीही विश्वासाला नख लावणे सुरू झाले. मॅथ्यू अरनाॅल्ड हा कवी मानवी जीवनातील विश्वासाची व्याप्ती व खोली स्पष्ट करण्यासाठी समुद्राची प्रतिमा वापरतो. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 916793704011 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आज अवतार सिनेमातील गाणे,जिंदगी* *मौज* *उडानेका नाम है,कयाम है।अशी* *स्थिती तरुणांची बघायला मिळतेय.* *जीवन एक संघर्षयात्रा आहे.* *जंग सिनेमात एक गाणं आहे,* *जिंदगी हर कदम एक नई जंग है।* *याचप्रमाणे अगदी* *लहानपणातच एकदा संकट झेलायची* *सवय लागली की* *मोठेपणी कितीही वादळे येवु* *द्या .माणसं टक्कर घ्यायला सज्य* *असतात. स्वतःच्या* *आयुष्याची स्वतः वाट निर्माण* *करणारेच यशश्वी होत असतात.संकट* *आपल्याला* *अडवायला कधीच येत नाहीत तर* *संकट आपली उंची वाढवायला* *येत असतात.* *परंतु* *तरुणाई कुठंतरी* *भटकतेय,दिशाहीन अवस्था काही* *ठिकाणी बघायला* *मिळते.जीवनाची आशा सोडता कामा* *नये.* *आशा नावाची साखळी पायात* *घातली की तिच्या आवजानेच यशाचा* *राजमार्ग सापडतो.* *आणि हो , हा राजमार्ग मिळण्यासाठी* *तिला निराशेचे* *अनेक खडतर डोंगर पार करावे* *लागतात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे पायी जाणा-या माणसाला जर पायात काटा मोडला तर काटा कसा काढावा हे कळायला लागते.नाही काढले तर काटा मोडल्यानंतर वेदना कशा होतात ते कळायला लागतात आणि त्याचे होणारेही दु:ख कळायला लागते.म्हणून काहीही प्रयत्न करुन पायात मोडलेला काटा काढूनच टाकतो. त्याचप्रमाणे जीवनात कितीही आणि कशीही संकटं आली की,त्या संकटाला तोंड कसे द्यायचे हे ज्ञान ज्याला आहे तेव्हा तो आपल्या जीवनमय संकटातून मार्ग काढायला शिकतो.त्यातून बाहेर कसे पडता येईल हे आपोआपच शोधत असतो.जर मार्गच शोधला नाही तर तो अधिक संकटात सापडतो.नाही प्रयत्न केले तर जीवन जगणे असह्य होऊन जाते.म्हणून कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी माणसाने प्रयत्नवादी असायला हवे.या जगात हातपाय हलवल्याशिवाय कुणालाही काही प्राप्त झाले नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🎋🥀🎋🥀🎋🥀🎋🥀🎋🥀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुखाचा शोध* फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एका गावात, मारुतीच्या देवळात एक साधनी, तरुण ब्रह्मचारी असा साधू राहत असतो. एक दिवस त्या देवळापाशी एक सावकार त्याच्या लवाजम्यासहित येतो. त्याचे वैभव, त्याची वरवर करणारी माणसे पाहून या साधूला वाटते की अरे आपण सुख मिळावे म्हणून इतकी साधना करतो, पण हा सावकारच खरा सुखी दिसतो. तो जवळ जाऊन सावकाराला विचारतो,"आपण सुखी दिसता. याचे रहस्य काय?" तो सावकार यावर खिन्न मुद्रेने म्हणतो,"मी कसला सुखी बाबा! अरे, नुसतीच धन दौलत असून काय फायदा ! विद्वत्ता असेल तर समाजात मान असतो. तो शेजारच्या गावी विद्वान राहतो ना, तू त्याला जाऊन भेट." असे पाहता साधू त्या विद्वानाकडे जातो. विद्वान खिन्न वदनाने म्हणतो,"मी कसला सुखी बाबा! हाडाची काडे करून हे ज्ञान मिळवले पण लोक विचारत नाहीत. सांगीतलेले ऐकत नाहीत. अधिकार जोडीला असेल तर विद्वत्तेचा उपयोग. तू असे कर, तो शेजारच्या गावात पुढारी आहे ना, त्याच्याकडे जा. तो विद्वानही आहे. लोक त्याचे ऐकतात. तोच सुखात असणार." असे पाहता साधू त्या पुढाऱ्याकडे जातो. तो पुढारी खिन्न वदनाने म्हणतो,"अरे, मी कसला सुखी बाबा! सत्ता आहे सर्वकाही आहे. पण ज्या लोकांसाठी मी हे काम करतो, ते माझ्याविषयी काय वाट्टेल ते बोलत असतात. ती निंदा सहन होत नाही बघ. तुला खरा सुखी माणूस पाहायचा असेल तर तू शेजारच्या गावात मारुतीच्या देवळात राहणाऱ्या साधूला जाऊन भेट. तो ब्रह्मचारी आहे आणि सदा ईश्वरचिंतनात मग्न असतो. तोच खरा सुखी आहे." हे तर स्वतःचेच वर्णन आहे हे समजल्यावर त्या साधूला स्वतःचीच लाज वाटते, आणि तो परत जातो. (संदर्भ- 'गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय') --लिखाळ. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/01/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकरसंक्रांत* 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९१९ - राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली. ◆ १९४९ - भारताच्या स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्विकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो. ◆ १९९९ - ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- ◆ १९५६ - उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती 💥 मृत्यू :- ◆ १९७१ - दीनानाथ दलाल महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे मुंबईत निधन. ◆ १९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते. ◆ २००२ - विठाबाई भाऊ नारायणगावकर, राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक असून राज्यातील सर्व शाळांमध्ये 'व्हर्च्युअल क्लासरुम' उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या बैठकीत दिले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या (ट्राय) वतीने जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार सॅटेलाईट टीव्ही चॅनेल्सना नवे सुधारित दर जाहीर करण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काम तातडीनं सुरू व्हावं, या उद्देशानं राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी तातडीनं सुनावणी करण्याची मागणी राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दहा रुपये थाळी योजनेचा शुभारंभ 26 जानेवारीला, प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ होणार, गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक व पदार्थाची गुणवत्ता राखून ताजे भोजन दिले जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत वाडिया प्रकरणावर तोडगा निघाल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा, वाडिया व्यवस्थापनाला 46 कोटी रूपये देण्याला संमती शर्मिला ठाकरे यांची माध्यमांना माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *जेपी नडड्डा भाजपाचे नवे अध्यक्ष बनणार, 20 जानेवारी रोजी औपचारिक घोषणा होणार, जेपी नड्डा सध्या भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंचच्या दमदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मुंबईतल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा दहा विकेट्सनी केला पराभव, या विजयासह ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *दुःखद बातमी :- प्रसिद्ध चित्रकार प्रमोद दिवेकर यांचे आज पहाटे झाले निधन, आज दुपारी बारा वाजता नांदेड येथे होणार अंत्यसंस्कार* फ्रेश मॉर्निंग बुलेटीन टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली ........! ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा* https://m.facebook.com/story.php?story_fbid=1848046445322121&id=100003503492582 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकरसंक्रांती* - सौ. रूपाली गोजवडकर जि. प. कें. प्रा. शाळा वाजेगाव ता. जि. नांदेड. तीळाची स्निग्धता नात्यात रुजावी गुळाची गोडी वाणीत पाझरावी. संस्कृतीची महती सर्वांनी स्मरावी भारतभूमी सदैव तेजाने उजळावी. संक्रांतीची संक्रमणे नित्यस्मरणात रहावी फिरुनिया पुन्हा मतमतांतरे न व्हावी. विसरूनी भेदभाव किल्मिषे सारी अंतःकरणी निरंतर प्रेमभावना जपावी. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *शिलाँग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?* मेघालय 2) *अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?* मेडल ऑफ फ्रीडम 3) *भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला ?* मादाम कामा 4) *गोबर गॅस ( बायो गॅस ) मध्ये कोणता वायू असतो ?* मिथेन 5) *'भारताचे पॅरिस' असे कोणत्या शहराला म्हणतात ?* मुंबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ अन्नमवार, नांदेड 👤 नामदेव हिंगणे 👤 सलीम शेख 👤 बौद्धप्रिय धडेकर 👤 व्ही. एम. पाटील 👤 बालाजी ईबीतदार 👤 एकनाथ पावडे 👤 दत्ता बेलूरवाड 👤 कोमल ए. रोटे 👤 पंजाबराव काळे पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची संक्रांत ही काही निराळी नाही. दरवर्षी संक्रांत येते, जाते. पण क्रांती मात्र व्हायची तशीच राहते. ज्यावेळेला तुम्ही काळाची क्रांती मोजता, त्यावेळी फक्त ढोबळ रूपाने क्रांती लक्षात येते. या सापेक्ष जगामध्ये 'क्रांती' काळरूप करून चालणार नाही; तर संज्ञारूप करायला हवी. 'संज्ञा' म्हणजे नुसती व्याख्या नव्हे, तर तुम्हाला चांगलं ज्ञान झालं पाहिजे. संक्रांतीच्या दिवशी, 'तिळगुळ घ्या', याचा अर्थ, तिळा तिळाने माणूस जमवा. माझं ह्रदय दुसर्यासाठी तीळ-तीळ तुटलं पाहिजे. दुसरा चुकतो कसा, आणि मी डंख कसा मारतो... विंचवाच्या जिभा करून आम्ही जर वागलो, तर काय उपयोग आहे सगळ्याचा?* *एका तिळगुळाच्या वडीवर वर्षभर गोड बोलायला सांगत असाल तर काही अर्थ नाही. ते प्रतीक आहे. - गूळ म्हणजे गोडीचं, एकत्र बांधून ठेवण्याचं; आणि तीळ हे स्नेहाचं. प्रतीकात्मक आहे ते. त्याप्रमाणे वर्तन करा. प्रत्येक दोषी माणसाला त्याचे दोष चांगलेच माहीत असतात. दुसर्याने काही दाखवायचंच असेल, तर गुण दाखवायचे असतात. आपण थोडं एकमेकाला सांभाळून घेऊ शकलो, तर काय होईल? 'संक्रांत' याचा अर्थ,'सम+क्रांत' असा सुद्धा आहे. क्रांती केव्हा होते? समतेने होते.* *एका कवीने सांगून ठेवलंय ते लक्षात ठेवा-* *"दुर्दम्य होतील आशा आकांक्षा* *होतील संग्राम गीते पुरी।* *देशार्थ होतील त्यागी विरागी* *होईल संक्रांत तेव्हा खरी ॥"* *नुसत्या तीळगुळाने, हलव्याने होणार नाही. 'स्वत:च्या मनाला हलवा', असं ज्यावेळी मी स्वत:ला सांगेन, त्या दिवशी खरी संक्रांत साजरी होईल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟✨🌟✨🌟✨🌟✨🌟 *मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !!!* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आलोच या उघड्या नागड्या जगात* *जगायचेच आहे,तर जगा बिनधास्त* *कधी दोन देत तर कधी दोन घेत.* *जीवन हे संघर्षाचे मैदान आहे.इथं पदोपदी अपमान तर कधी सन्मान हा* *होतच राहणार.* *मग अपमानीत झाला तर मैदान* *सोडून जायचे का?नाही अपमानाला* *सुद्धा मानात परावर्तित* *करण्याची ताकद ठेवा.* *हार जीत तो बहादूर के किस्मत के दो सीतारे होते है। हे ध्यानात ठेवा.* *आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याला बदलू शकतो.* *नकारात्मक गोष्टींचा सकारात्मक कार्यासाठी वापर करणे, ही खूप मोठी* *ताकद आहे. याचे सुंदर उदाहरण पहा.* *टाटांचा पॅसेंजर कार उद्योग तोट्यात जात होता. तो विकण्याचा निर्णय* *टाटांनी घेतला. कार बिझनेस विकण्याच्या मिटींगसाठी फोर्ड* *कंपनीस भेटण्यासाठी गेले. त्याना विचारले गेले, तुम्हाला कार* *बनविताच येत नाही, तर हा उद्योग तुम्ही का सुरू केला?* *हा अपमान व त्यांचे शब्द रतन टाटांना झोंबले. टाटा कार युनिट न* *विकण्याचा निर्णय घेऊन ते परत आले. बरेच संशोधन व प्रयत्न करून* *टाटांनी स्वतःचा कार ब्रॅंड मोठ्या उंचीवर पोहचविला.* *पुढे काही वर्षांनी आंतरराष्ट्रीय लक्जरी कार ब्रॅंड जग्वार आणि लँन्ड* *रोव्हर विकत घेऊन विदेशी कार कंपन्यांना योग्य उत्तर दिले.* *मग यातून आपण काय धडा घ्यायचा ते ठरवा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता, प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात.पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हे विश्वची माझे घर, प्रेमातील व्यापकता* ‘संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, ‘‘तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ?’’ ते म्हणाले, ‘‘बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तू पण.. हा, तू घे… हा, तू घे.’’ असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते. तो प्रकार पाहून तुकाराम महाराजांची पत्नी आवळी भरपूर रागावली. आपल्याला मिळालेला सर्व ऊस लोकांच्या मुलांना देऊन आपल्या मुलांना काही आणले नाही; म्हणून ती तुकाराम महाराजांना नको नको, ते बोलली आणि रागाच्या झपाट्यात तिने तो उसाचा तुकडा खाली आपटला. त्यावेळी त्याचे तीन तुकडे होऊन एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि दोन तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे तिला म्हणाले, ‘‘आवळे, किती ग धोरणी तू ? आता तू सारखे वाटे केलेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला, तो तुझा आणि खाली जे पडले त्यांतील एक माझा अन् दुसरा मुलांचा !’’ ही त्यांची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्चात्ताप झाला. तात्पर्य :- ‘हे विश्वची माझे घर’, असे वाटत असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली आणि लोकांची मुले असा भेदभाव कधीच केला नाही.’ *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/01/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● भूगोल दिन /अयन दिन /संक्रमण दिन ● मकरसंक्रांत, उत्तरायण - भारत 💥 ठळक घडामोडी :- ● १७६१ - पानिपतची तिसरी लढाई - मराठे व अहमदशाह अब्दाली मध्ये झालेले भीषण युद्ध. ● १९९३ - मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. ● १९९८ - ज्येष्ठ गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान जाहिर. ● २००० - ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत बाबा उर्फ मुरलीधर देविदास आमटे यांना इ.स. १९९९चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्र्पतींच्या हस्ते प्रदान. 💥 जन्म :- ● १८८२ - रघुनाथ धोंडो कर्वे, संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत. ● १८९२ - दिनकर बळवंत देवधर , क्रिकेटमहर्षी ● १८९६ - डॉ. चिंतामणराव देशमुख. , भारताचे अर्थमंत्री ●१९०५ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री. ● १९०८ - द्वा.भ. कर्णिक , ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत. ● १९२६ - महाश्वेतादेवी , ज्ञानपीठ व इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका. 💥 मृत्यू :- ● १९३७ - जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक. ● १७६१-सदाशिवराव भाऊ ,पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *व्हीआयपी सुरक्षेतून NSG कमांडो पूर्णत: हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, मुक्त झालेल्या 450 एनएसजी कमांडोंची नव्या ठिकाणी नियुक्ती * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पालघर स्फोट प्रकरणात तातडीने चौकशी करा, गृहराज्य मंत्री सतेज पाटलांचे आदेश, गुन्हा दाखल करण्याच्याही पोलिसांना सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबईतील टॅक्सींवर प्रवाशांच्या सोयीकरता तीन रंगाचे दिवे, 1 फेब्रवारीपासून होणार अंमलबजावणी, परिवहन आयुक्तांची माहिती * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मध्य रेल्वेने विनातिकीट रेल्वेने प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने तब्बल 155 कोटी दंड म्हणून वसूल केले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विद्यार्थ्यांचा वापर राजकीय विचार पसरवण्यासाठी नको, सीएएच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय, शिक्षण विभागाची शाळांना नोटीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लहान मुलांसाठीचं वाडिया हॉस्पिटल कुठल्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही, मनसेच्या शर्मिला ठाकरेंचं आश्वासन, बचावासाठी कर्मचाऱ्यांसह लाल बावटा कामगार संघटनेचं आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्मा, मोहम्मद शमीचं कमबॅक, येत्या 24 जानेवारीला पहिला सामना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकरसंक्रांत* https://shopizen.page.link/D1SNVNvjpxk6WVJs9 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चला शाळेला जाऊया* - ज्ञानेश्वर गायके खामगावकर मो.९४०३३८४८८९ चला शाळेला जाऊया ज्ञान अमृत घेऊ या विद्येच्या या प्रांगणात आपण सारे खेळूया.. पहाटे उठून आपला अभ्यास पूर्ण करूया नियमित शाळेत जाऊन धडे सारे गिरवूया.. पाटी पेन्सील वही सोबत पोळीभाजी ही नेऊया सुट्टी होता जेवणाची सोबत सारे जेवूया.. वर्गात आपल्या गुरुजीचे बोलणे कान देऊन ऐकूया रामकृष्ण अन अर्जुनासम शिष्य आपण बनूया.. मायबापांच्या आशाआकांक्षा पूर्ण साऱ्या करूया माणूस म्हणुनी आलो जन्माला माणूस पहिले होऊया.. भारतभुचे आम्ही लेकरं उंच भरारी घेवूया प्रिय आमच्या भारतभूला विजयी सलामी देवूया... *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मकरसंक्रांत दरवर्षी केव्हा साजरी केली जाते ?* 14 किंवा 15 जानेवारी 2) *तामिळनाडूला मकरसंक्रांत कोणत्या नावाने साजरा करतात ?* पोंगल 3) *'तिळगुळ घ्या , गोडगोड बोला' असे कोणत्या सणानिमित्त म्हटले जाते ?* मकरसंक्रांत 4) *भारतात कोणत्या राज्यात मकरसंक्रांतीला पतंगोत्सव साजरा केला जातो ?* गुजरात 5) *मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य कोणत्या राशीत प्रवेश करतो ?* मकर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गजानन श्रीरामवार 👤 प्रविण जुन्नरकर 👤 आ. प्रकाश दादा सोळंके 👤 समाधान बदाडे 👤 राहुल शहाणे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *आनंदाचे डोही आनंद तरंग।* *आनंदी आनंद गडे इकडे तिकडे* *चोहीकडे।* *प्रत्येक ठिकाणी आनंद शोधा, म्हणजे आनंद मिळतो.* *आनंदाच्या झाडाचं गणित* *कृष्णानं सत्यभामेच्या अंगणात लावलेल्या प्राजक्ताच्या झाडासारखं असतं...* *झाड सत्यभामेच्या अंगणात आणि फुलं मात्र पडायची रुक्मिणीच्या अंगणात !* *रुक्मिणीला झाडाचं मूळ काही शोधता नाही आलं पण, प्राजक्ताच्या* *सुगंधाचा आनंद मात्र मिळाला.* *सत्यभामेचा चडफडाट झाला तो झालाचं, कारण तिने शोधायचा प्रयत्न* *करुन ते फुलांचं टपटपणं थांबवायचा प्रयत्न केला. त्यामूळे* *अंगणात असणाऱ्या त्या झाडाच्या सहवासाचा तिला आनंद नाही उपभोगता आला.* *रुक्मिणीनं मात्र झाडाच्या मूळाचा शोध घेण्याचा नाद सोडला आणि अंगणात टपटपणाऱ्या फुलांचा आनंद* *घेतच राहिली.* *आनंदाचसुद्धा तसंच असतं. तो कुठून मिळतोय याचा शोध घेत राहिलात तर आनंदच संपून जातो आणि उरते ती* *फक्त बेचैनी !* *आनंद घ्यावा आणि द्यावा... प्रत्येक* *_क्षण महोत्सव करावा... तो_ कुणामुळे, कशामुळे याचा विचार* *शक्य झाल्यास नंतर करावा फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी* *म्हणून आनंद द्या* *आणि आनंद घ्या.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे एखाद्या गीताला सुमधुर संगीतात संगीतबद्ध करायचे असेल तर त्यासाठी अनेक वाद्यांचे सुर एकत्रित आणावे लागतील आणि त्या वाद्यांना वाजवणारे किंवा चालवणारे अनेक कलाकार एकत्रीत आणून गीताला तालबद्ध आणि स्वरबद्ध करावे लागेल तेव्हा कुठे सुमधुर गीत ऐकण्यासाठी तयार होईल.अर्थात इतरांना त्या गीताचा आस्वाद घेता येईल.त्याचप्रमाणे एखादी चांगली कृती करण्यासाठी किंवा ती कृती सर्वमान्य होण्यासाठी सर्वांच्याच सहभागाची गरज असते आणि त्यात सर्वांचेच सहकार्य असेल तर ते नक्कीच एखाद्या सुमधुर गीतासारखेच सुसंस्कारीत बनेल आणि नक्कीच लोक अनुकरण करायला लागतील.कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी अनेकांचे सहकार्य असणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांनी एकत्रित, एकोप्याने राहणे गरजेचे आहे आणि तसे राहिल्यास सा-यांनाच चांगला फायदा होईल.नाहीतर एकटे राहून एकाकी जीवन जगण्याचा अट्टाहास केला तर त्या जगण्याला मीठविरहित जेवन केल्यासारखेच जीवन चवहिन होईल हे लक्षात असू द्यावे.जीवनात चांगल्या गोष्टींसाठी एकी आणि एकोपा असणे गरजेचे आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड 📲 ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वतःच्या ज्ञानाचा गर्व* रेल्वेने प्रवास करीत असताना, एका प्राध्यापकाला आपल्या बाजूला एक अडाणी माणूस बसला असल्याचं आढळून आलं. स्वत:च्या ज्ञानाची घमेंड बाळगणारा तो प्राध्यापक थोडय़ाच वेळात त्या आडाणी माणसाची थट्टा करून आजूबाजूच्या बसलेल्या लोकांची करमणूक करू लागला. थोडा वेळ ती थट्टा निमूटपणे सहन केल्यावर तो माणूस त्या प्राध्यापकाला म्हणाला, साहेब, काही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी. तरीसुद्धा आपला गाडीतला वेळ चांगला जावा, म्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया. मी आडाणी व गरीब असल्याने कोडं सोडवण्यात जर मी हरलो, तर मी तुम्हाला फक्त पाच रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलात, तर तुम्ही मात्र मला पंचवीस रुपये द्यायचे. आहे कबूल? हे ऐकून तो प्राध्यापक आनंदला आणि अवतीभवतीच्या सहप्रवांशावर छाप मारायलाही सुसंधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे असा विचार करून त्या माणसाला म्हणाला, तुझी कल्पना मला मान्य आहे. पहिलं कोड, तू मला घाल. माणसाने विचारलं, ज्याला उडताना तीन पाय, चालताना दोन पाय आणि बसला असता फक्त एक पाय असतो, असा पक्षी कोणता? या कोडय़ाचं उत्तर देता न आल्यानं प्राध्यापक काहीसा ओशाळून म्हणाला, बाबा रे, मी हरलो. हे घे पंचवीस रुपये, आणि या कोडय़ाचं उत्तर तू मला सांग. प्राध्यापकानं दिलेल्या पंचवीस रुपयांपैकी वीस रुपये स्वत:च्या खिशात टाकून, उरलेले पाच रुपये त्या प्राध्यापकाच्या हाती देत तो शेतकरी म्हणाला, मला सुद्धा या कोडय़ाचं उत्तर देता येत नाही, म्हणून मी हरल्याचे पाच रुपये तुम्हाला देत आहे. एका अडाणी व्यक्तीने हातोहात चकविल्यामुळे फजिती पावलेला तो प्राध्यापक पटकन तिथून उठला व रेल्वेचा दुसर्या डब्यात गेला. तात्पर्यः ज्ञान हे वृद्धींगत करण्यासाठी असते.माणसाने स्वतःच्या ज्ञानाचा गर्व कधीच करु नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/01/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● २००७- के जी बालकृष्णन यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. ● १९९६-पुणे-मुंबई दरम्यान 'शताब्दी एक्सप्रेस' सुरू झाली. ● १९३० - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित. 💥 जन्म :- ● १९४८ - गज सिंघ, जोधपूरचा राजा. ● १९४९-राकेश शर्मा ,भारतीय अंतराळवीर ● १९१९- एम चेना रेड्डी,आंध्रप्रदेश चे ११वे मुख्यमंत्री,उत्तरप्रदेश चे माजी राज्यपाल 💥 मृत्यू :- ● १७६६ - फ्रेडरिक पाचवा, डेन्मार्कचा राजा. ● २०११-प्रभाकर पणशीकर,ख्यातनाम अभिनेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं समारोप, विविध 20 ठराव मंजूर, संमेलनाध्यक्षांनी जेएनयुबद्दल घेतलेल्या भूमिकेवर एकही ठराव नाही, वादाचे विषय पूर्णपणे टाळले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कोलकाता पोर्ट ट्रस्टला श्यामाप्रसाद मुखर्जी असं नाव केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कर्नाटक सरकारची मग्रुरी; सीमाभागात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना गावबंदी, महाराष्ट्रातील साहित्यिक निषेध सभा घेणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सोलापूर जिल्हापरिषद निवडणुकीत भाजप समर्थक आघाडीला साथ दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 6 जणांचं निलंबन, अरुण तोडकर, सुनंदा फुले, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील, गणेश पाटील, मंगल पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांची कारवाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ * जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत फिरत असलेल्या पोलीस उपअधीक्षकाला अटक, पोलिसाच्या घरातून स्फोटकांसह हत्यारं जप्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईतल्या परळमधील वाडिया हॉस्पिटल निधीअभावी बंद करण्याची प्रक्रिया सुरू, पालिका-राज्य सरकार आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या वादाचा रुग्णांना फटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषकासाठी महिला क्रिकेट संघात 15 महिला खेळाडूंची झाली घोषणा, टीम इंडियाच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर तर मराठमोळी स्मृती मनधाना उपकर्णधार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तरुण भारत देश* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/PYiBvfDGcdTtuSQg7 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नाद कुणाचे* - डाॅ. शरयू शहा, मुंबई. 9619013330 नाद कुणाचे ..कसे कोणते ? ऐक ..तरी तू .. काय भावते ? खळखळ खळखळ.. नदी वाहते झुळझुळ झुळझुळ जळी वाजते । सळ सळ सळ सळ..पान हालते खळबळ खळबळ ..मनी चालते ॥ सुर सुर सुर सुर ..कशी धावते कुरकुर कुरकुर ..खार चावते । भिरभिर भिरभिर फिरत राहते चुरु चुरु चुरु चुरु ताई बोलते ॥ छुम्..छुम् पैंजण ..छान वाजते हम..हम कपिला ..बघ हंबरते । छन् छन् नाणे, कसे घणघणते तन मन..कसले ..मग मोहरते ॥ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'राष्ट्रीय युवक दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 12 जानेवारी 2) *स्वामी विवेकानंदाचे मूळनाव काय होते ?* नरेंद्रनाथ 3) *11 सप्टेंबर 1893 ला अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले ?* स्वामी विवेकानंद 4) *राजमाता जिजाऊ यांचा जन्म केव्हा झाला ?* 12 जानेवारी 1598 5) *छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचे नाव काय होते ?* राजमाता जिजाऊ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, बिलोली 👤 व्यंकटेश भांगे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 विजयकुमार चिकलोड 👤 बालाजी देशमाने *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या सर्व संत मंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते अध्यात्मविद्येच्या जोरावर सांगितले आहे. 'आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका' असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतानी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते; त्यासाठी अध्यात्म या शब्दाचा व्यंगार्थ लक्षात घ्यावा लागेल.* *ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. मी वर्गात जाऊन शिकवितो, त्यावेळी 'शिकविणे' या क्रियेशी मी किती तादात्य पावतो हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वत:ला विचारला पाहिजे. आसपासच्या सगळ्या गोष्टी विसरून जर शिकविणे या एकाच क्रियेशी मी जोडला गेलो, तर माझ्याकडून होणारे काम पाहून विद्यार्थी तृप्त होतील. तीच तृप्तता मला अध्यात्माचा नवा धडा देणारी असेल. त्यातली अतृप्ती मला ज्या दिशेने घेऊन जाईल त्या स्थळीही मी स्वत:चा शोध घेतला पाहिजे, तरच वैराग्याचा अर्थ आकलनात येईल.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *प्रवाहात वाहून जाण्यापेक्षा प्रवाहाच्या विरोधात वाहण्याची ताकद सुद्धा* *अंगी बाळगा.* *कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असतांना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.* *मग तुमच्यावर आरोप होतात- गैर व्यवस्थापनाचे, गैर कारभाराचे, भ्रष्टाचाराचे ! तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला शब्द वाढतात.... त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते.* *सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते.* *त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतिबिंब ठरू लागतील, तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही.* *तर ही शहाणी, समंजस पणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो.* *यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. ' हेचि फल काय मम तपाला ' ? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.* *कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे? वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.* *आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.* *शेवटी काय तर ''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,, ''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,, ''लोक तर निसर्गाला पण नाव ठेवतात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• घराच्या दुसऱ्या मजल्यावर जेव्हा जातो तेव्हा आपले पहिले पाऊल हे पहिल्या पायरीवरच पडते आणि नंतर क्रमाक्रमाने दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पायरीवर पडते. अशापद्धतीने एक एक पायरी चढत वरचा मजला गाठत आपले वरच्या मजल्यावर जाऊन थांबतो.एकदम दुसऱ्या किंवा तिसऱ्या पायरीवर पाऊल टाकत नाही कारण एखाद्या वेळेस धपकन पडण्याची शक्यता असते.त्याचपध्दतीने एखादे काम पूर्ण करायचे असेल तर क्रमाक्रमानेच काम करावे लागेल.एकाएकी पहिल्याच प्रयत्नात ते अशक्य असते.कोणत्याही क्षेत्रात किंवा कोणत्याही हाती घेतलेल्या कामात एकाएकी किंवा एकाच प्रयत्नात यश मिळेल असे नाही आणि अशी अपेक्षाही करु नये. आपल्याजवळ प्रयत्न, सातत्य,संयम आणि विश्वास ह्या चार गोष्टी असतील तर कोणतेही यश आपल्याला हुलकावणी देऊ शकत नाही किंवा आपल्याकडून कोणी ओढून घेऊ शकत नाही.त्यातून मिळालेले यश हे आपल्याला समाधान देणारे असते हे नक्की. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎋🎍🎋🎍🎋🎍🎋🎍🎋🎍 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेट* *एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने त्याचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली.* *एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले.* *सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.* *राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला "अशी भेट वारंवार भेटत नाही."* *मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते.पण...* *त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.* *मानवी जीवन अनमोल आहे.* *असे जीवन परत मिळणार नाही.* *बोध* *या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह. हा देह ही आपल्या जीवनाची अमूल्य भेट आहे या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे..* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/01/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९२२ - मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला. ● १९४९ - लॉस ऍंजेलसमध्ये पहिल्यांदा हिमवर्षाव झाला. ● १९५५ - नेपानगरमध्ये पहिला भारतीय कागद कारखाना सुरू झाला. ● १९६० - चाडने स्वतःला स्वतंत्र घोषित केले. 💥 जन्म :- ● १८५८ - श्रीधर पाठक, हिंदी साहित्यिक. ● १८९८ - विष्णु सखाराम खांडेकर, मराठी साहित्यिक. ● १९४४ - शिबु सोरेन, भारतीय राजकारणी. ● १९५४ - बोनी कपूर, हिंदी चित्रपट दिग्दर्शक. ● १९७३ - राहुल द्रविड, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९२१ - वासुदेवाचार्य केसर, कन्नड साहित्यिक. ● १९६६ - लाल बहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान. ● १९८३ - घनश्यामदास बिरला, भारतीय उद्योगपती. ● २००८ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *उस्मानाबाद :- प्रसिद्ध कवी पद्मश्री ना. धो. महानोर यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे उद्घघाटन, या प्रसंगी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे, डॉ. नागनाथ कोत्तापले, लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन आदी मान्यवर उपस्थित होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये भव्य नागरी सत्कार, शहरातून शोभायात्रा, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, तर परळीत धनंजय मुंडे यांचाही भव्य सत्कार * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *हैदराबाद : आंध्र प्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 'अम्मा वोडी'ची घोषणा मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केली, या योजनेंतर्गत शाळेतील मुलांच्या आईच्या बँक खात्यात दरवर्षी 15 हजार रुपये जमा करण्यात येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर या काळातील सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच हप्त्यांत देण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर पोटनिवडणुकांमध्येही भाजपला धक्का, मुंबई, नाशिक महापालिकेत महाविकासआघाडीचा डंका, पनवेलमध्ये भाजपला यश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई, मुंबईतल्या घरासह 78 कोटींच्या संपत्तीवर टाच* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *साताऱ्यातील मांढरदेवी गडावर काळुबाईची यात्रा, महाराष्ट्रासह कर्नाटकातून भाविकांची गर्दी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 🚀 *क्रिकेटची बातमी :- तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 78 धावांनी विजय, मालिका 2-0 ने जिंकली, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यात केली आणखी एका विक्रमाची नोंद, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने ११ हजार धावांचा टप्पा केला पूर्ण, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगचा विक्रम काढला मोडीत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षक आनंदी तर मुले आनंदी* देशाला घडविण्याचे सर्वात मोठे कार्य शिक्षकांच्या हातून होत असते. ज्ञान देणारे शिक्षक सर्वगुणसंपन्न असावे म्हणजे त्यांचे विद्यार्थी देखील तसेच सर्वगुणसंपन्न तयार होतील. चिमुकल्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांनी आनंदात राहून ज्ञानदानाचे काम करणे आवश्यक आहे, कारण शिक्षक आनंदी असेल तरच त्यांच्या समोरचे पाच-पन्नास चिमुकले आनंदी होतील.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/g1JPw8pNtqf2Sasr9 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुंगीताई...* ✍🏻 संदिप पाटोळे, नंदुरबार... 9421890770 मुंगीताई मुंगीताई घर किती खोल ? सवड काढ थोडी जरा माझ्याशी बोल घाई किती कामाची लांबच लांब रांग जमा करते अन्न पुरते किती सांग एकजूट तुमची किती असते बाई एवढंस पोट तुझं काही खातेस का नाही? कोणी केलाच हल्ला कडकडून घेते चावा घाबरून जातो हल्लेखोर आईच्या करतो धावा *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" मनुष्याजवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी केव्हा साजरी केली जाते ?* 11 जानेवारी 1966 2) *'जय जवान, जय किसान' हा नारा कोणी दिला ?* लालबहादूर शास्त्री 3) *लालबहादूर शास्त्री यांचे आडनाव काय होते ?* श्रीवास्तव 4) *भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते ?* लालबहादूर शास्त्री 5) *लालबहादूर शास्त्री यांचा जन्म केव्हा झाला ?* 2 ऑक्टोबर 1904 (वाराणसी) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पुलकंठवार, सहशिक्षक, 👤 सिध्देश्वर मोकमपल्ले 👤 हणमंत पांडे 👤 राहूल ढगे, सहशिक्षक 👤 लोकेश येलगंटवार 👤 साई यादव, येवती *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर घरात छोट्या छोट्या गोष्टींची देवाणघेवाण सहज व्हायला हवी, ज्यासाठी पैसे नाही लागत , पण 'नातं' विणलं जातं, गुंफलं जातं त्यामुळे !* *यामुळे देणा-याला वाटतं आपण काहीच दिलं नाही नि घेणा-याला वाटतं आपल्याला किती मिळालं ?* *घर गुंफलं जाण्यासाठी सगळ्यांनीच टिव्हीपासून उठून एकमेकांच्यासमोर काहीवेळ तरी बसू या, दिवसभराबद्दल बोलू या, जरा हसू या, कधी फुंकर मारू या, कसं छान हलकं-फुलकं वाटतं मग !* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌾🌱🌿🌾🌱🌿🌾🌱🌿 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *चोखा डोंगा परि ,ऊस नोव्हे डोंगा* *काय भुललासी वरलिया रंगा।* *हे मानवी संतवचन,* *ऐसें कैसे झाले भोंदू* *कर्म करुनिया म्हणती साधू* *अंगा लाऊनीया राख* *डोळे झाकुनी करती पाप।* *हे वास्तव खऱ्या संतांनी मांडले आहे.* *होय_आम्ही_डावेच_आहोत* *नित्यानंद,ज्योतीगिरी,रामपाल,* *रामरहीम,आसाराम,* *नारायणसाई,चिन्मयानंद,कुलदीप* *सेंगर.* *हे सगळे उजवे क्रांतिकारक आहेत.* *यांनी जे काही चमत्कार आपापल्या मठांमध्ये केले. त्या विरोधात* *थोबाडाला फडक बांधून कुणीही त्यांना जाब विचारायला* *गेलेल नाही.* *परंतु कुणीतरी आपल्यापेक्षा ज्ञानी आहे. ज्ञानाने मोठ होतय.* *जेएनयूसारख्या जगदविख्यात विद्यापीठातून पदवी घेऊन अगदी* *नोबेल पुरस्कारापर्यंत जातय.* *विद्यापीठे म्हणजे विचार आणि ज्ञान या दोन गोष्टींवर चालणारी ज्ञानसंस्था.* *_मग तीच मोडून* *काढा._ अत्यंत धर्मांध आणि लाचार* *लोकांना ज्ञानी लोक नकोच असतात.* *मग ते काय करतात, तर तुकोबाची गाथा बुडवतात. ते तुकोबाला* *धर्मपीठापुढे उभं* *करतात. आणि निर्णय देतात की हा* *शूद्र कुणबट याला ज्ञानाचा* *अधिकार कुणी दिला? तीच गोष्ट* *नामदेवांची. हा शिंपी आहे जातीने. हा* *आमच्या* *अधिकारक्षेत्रात येणाऱ्या देवालयात* *किर्तन कसे काय करू शकतो. म्हणून मग नामदेवाला* *देवळाबाहेर काढलं* *जात. नामदेवांच्या 'नाचू कीर्तनाचे रंगी* | *ज्ञानदीप लावू जगी' ची इतकी* *ख्याती की लोक नामदेवांना* *बाहेर कीर्तन करायला सांगतात. लाखोंचा जनसमुदाय* *जमतो. आणि या* *नामदेवांच्या कृतीला लोक 'नामदेवानं* *देऊळ फिरवलं' असं* *म्हणून एक ऐतिहासिक नोंद करतात.* *तीच गोष्ट चोखोबांची. त्यांना तर* *अतिशूद्र म्हणून निर्दयपणे ठार* *मारल गेलं. तीच गोष्ट* *चक्रधरांचीही. एवढेच कशाला* *शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकालाही एक सर्वसामान्य* *शेतकरी घरातला पोरगा राजा होतो. हेही सनातन्यांना* *रूचत नाही. संभाजी* *महाराजांची तर अजूनही हे* *धर्मांध लोक बदनामीच करत आहेत. फार कशाला ज्ञानदान करते* *म्हणून सावित्रीबाई फुलेंवर शेणाचे गोळे* *फेकणारे हेच. ज्योतिबांवर मारेकरी घालणारे हेच. छत्रपती राजर्षी शाहूंची* *बदनामी करणारे हेच. बाबासाहेब आंबेडकर, म.गांधी,* *पं.नेहरू यांच्याबद्दलची विकृत अथवा खोटी माहिती* *पसरवणारे हेच.* *किती म्हणून सांगायचं यांच्याबद्दल.* *वरील ज्या ज्या आमच्या महापुरूषांची तुम्ही बदनामी* *करत आला आहात.* *ज्यांच्याबद्दल अत्यंत खोटी माहिती प्रसृत करत आला आहात. ते सगळेच* *आमच्यासाठी डावे आहेत. आणि आम्ही या आमच्या* *डाव्यांचे वारसदार.* *तुकोबा म्हणतात,* *आंधळ्यासी जग अवघेची आंधळे ।* *आपणासी डोळे दृष्टी नाही ।।१।।* *रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न ।* *तोंडासी कारण चवी नाही ।।२* ।। *तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण ।* *तया त्रिभुवन अवघे खोटे ।।* *३* ।। *कपाळाला गंधटिळा लावला. भगवी* *वस्रे नेसली. तुळशीमाळ* *गळा घातली म्हणून कुणी वारकरी होत नसतो. माझ्या आजोबांच्या* *गळ्यात कधीच तुळशीची माळ नव्हती की कधीही* *त्यांनी कपाळाला गंध लावला नाही. मंदिरात झोपायला* *असायचे. पण कधी माझ्या ग्रामदैवताचा रोकडोबाचा दिवा विझू* *दिला नाही. पंढरपुरचा विठोबा* *हे त्याच दैवत. तीच गोष्ट* *माझ्या वडिलांची दर पंधरा* *दिवसाला पंढरीत एकादशीला दर्शनासाठी असतात. कालच* *पंढरपुरात पोहोचलेत. त्यांच्याही* *गळ्यात माळ नाही. की कपाळाला गंधटिळा नाही. कुठलही भगवं वस्र* *कधी माहीत नाही. पण हे दोघेही हाडाचे वारकरी.* *तीच गत माझीही आहे.* *आमचा नित्यनेम हा विठ्ठल आहे. आणि तोच आमचा धर्म आहे.* *आणि तुम्ही सांगता तो धर्म आमचा* *नाही. आम्ही सदैव डाव्याच* *बाजूने चालत राहूत.* *आम्हा वारीला निघालेल्यांचा मार्ग सदैव डावाच असणार आहे. रस्त्याने* *चालताना उजवीकडून चाललात तर अपघात होणार. हे* *ठरलेलच आहे. म्हणून त्याही अर्थाने आम्ही डावेच आहोत. आणि राहूत.* *आणि इन्किलाब झिंदाबाद! म्हणत राहूत.* *यात कुणाचा द्वेष नाही,सगळ्या जाती* *धर्मात हे विचारांना गाडून* *टाकणारे कर्मठ आजही आहेत,सावध व्हा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी माणसे पदोपदी खोटे बोलतात ती माणसे मूळातच स्वार्थी असतात. अशा खोटे बोलणा-या व्यक्तीवर कुणीही विश्वास ठेवत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्य वेळी केलेल्या युक्तीचा वापर* एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली.तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले,'' तू स्वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्यावर म्हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे.'' राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले. तात्पर्य : अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी अशा युक्तीचा मार्गाचा अवलंब करावा लागतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 🙏 🙏 ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/01/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९७२ - शेख मुजीबर रेहेमान हे पाकिस्तान च्या कारावासातून ९ महिन्यानंतर सुटून बांगलादेश मध्ये नवीन राष्ट्रपती म्हणून परतले. ● १९८९ - क्युबाने अँगोलातून सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली. ● २००१ - विकिपिडीया न्यूपिडीयाचा एक भाग म्हणून सुरू झाला. पाच दिवसांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण झाले. 💥 जन्म :- ● १८९६ - काकासाहेब तथा नरहर विष्णु गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता. ● १९२७ - शिवाजी गणेशन, तमिळ चित्रपट अभिनेता. ● १९४० - येशु दास, भारतीय पार्श्वगायक. ● १९७४ - ॠतिक रोशन, भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ● १२७६ - पोप ग्रेगोरी दहावा. ● १८६२ - सॅम्युएल कोल्ट, अमेरिकन संशोधक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करणार, राज्यात येऊ घातलेल्या नव्या प्रकल्पात कामगार निर्मितीसाठी कौशल्य विकास केंद्रही उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. औरंगाबादेतल्या महाएक्स्पो प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *निर्भया प्रकरणातील एका दोषीची सुप्रीम कोर्टात सुधारित याचिका, विनय कुमार शर्माने फाशीला स्थगिती देण्याची केली मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *उस्मानाबाद येथे आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत असून या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक ना. धो महानोर यांच्या हस्ते होणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *2022 पर्यंत देशातील 40 कोटी तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षणाचे उद्धिष्ट, केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ.महेंद्रनाथ पांडे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ओबीसी नागरिकांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने आता होणाऱ्या जनगणनामध्ये जातीचा रकाना वाढवावा अशी शिफारस विधानसभा आणि विधान परिषदेतील सदस्यांनी सरकारकडे केली होती, तो प्रस्ताव दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे : पाहुण्या श्रीलंकेविरुद्ध तिसरी व अंतिम टी२० लढत जिंकून तीन सामन्यांची मालिका २-० अशा फरकाने जिंकण्याचा निर्धाराने टीम इंडियाने प्रयत्न करणार तर, श्रीलंका बरोबरी साधण्याच्या निर्धाराने गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भिडतील.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कर्णधार विराट कोहलीच्या टी-20 सामन्यांत जलद हजार धावा पूर्ण, धोनीसह अनेकांना टाकलं मागे, टीम इंडियाचा कर्णधार म्हणून टी-20 सामन्यात 1000 धावा पूर्ण करणारा विराट दुसरा खेळाडू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी :- नांदेड ते मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वेचा नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते आज होणार उदघाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती* शाळेत शिकत असताना गुरुजी मुलांना संगत की, राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीमध्ये स्तब्ध उभे रहावे, कसल्याही प्रकारचे हालचाल करू नये. तसे केल्यास राष्ट्रगीताचा अपमान समाजल्या जातो. या सूचनेचे पालन करीत मुले रांगेत उभे राहून सरळ समोर पाहत ताठ मानेने राष्ट्रगीत एका सुरात आणि तालबध्द पद्धतीने म्हणतात. अश्या या रोजच्या कृतीमुळे मुलांमध्ये........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/61raQmghejBdrfiLA लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दिवा ज्ञानाचा... - उमेश लक्ष्मण परवार, गोवा गुरू हा झरा ज्ञानाचा गुरू हा मार्ग प्रगतीचा... दाखवी अक्षरे फळ्यावर तेच शब्द ही मनावर... प्रतिमा देई आकार विद्यार्थाना गुरू होऊन ज्ञान संकटाना.... गुरू हा वाङमय शब्दाचा अर्थ लावी कवितेला आधाराचा..... दिवा ज्ञानाचा पेटला शाळेत विद्यार्थी खेळे सदैव स्पर्धेत.... *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?* पं जवाहरलाल नेहरू 2) *सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते ?* हिरालाल केनिया 3) *महात्मा गांधींचे समाधीस्थळाचे नाव काय आहे ?* राजघाट 4) *भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?* राजस्थान 5) *'माउंट अबू' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?* राजस्थान *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 👤 श्रीनिवास रेड्डी, धर्माबाद 👤 साईनाथ सोनटक्के 👤 राजेश कुंटोलू 👤 गणेश वाघमारे 👤 शत्रूघन झुरे 👤 स्वरूप खांडरे 👤 आकाश क्षीरसागर, सालेगाव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आज सर्वत्र क्रांतीचे, शांतीचे जयघोष ऐकू येतात. कारण क्रांतीच्या अवस्थेत माणूस जागा होतो नि शांतीचा सूर आळवतो, तेंव्हा तो ख-या अर्थाने माणूस होतो. तसं पाहिलं तर क्रांती आणि शांती मानवी जगण्याचे दोन महत्वपूर्ण पैलू, त्यामुळेच माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळी ओळख मिळते. क्रांती आणि शांती वरकरणी परस्पर भिन्न वाटल्या तरी त्या परस्परावलंबी आहेत. क्रांती क्रोध निर्माण करते तर शांती विवेकाने विचार करायला लावते. अनाचार, अत्याचार, विषमता यांच्या विरूद्धचा एल्गार म्हणजे क्रांती. जी व्यक्तीला जीवनातल्या नितांत सुंदर स्वप्नवास्तवांकडे आकृष्ट करणारी सुप्त क्षमता असते. तर शांती ही सर्वच वैर आणि संघर्षाचा विराम असते.* *तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं आहे, 'शांती ही आपल्या आतुन येते. मनातून क्रोधासारखी नकारात्मक भावना जाऊन करूणेची सकारात्मक भावना उत्पन्न झाली की शांती येते.' समस्या अनंत असतात. त्यावरील समाधान शोथताना क्रोथ आणि शांततेच्या पलीकडे जी घेऊन जाते ती क्रांती. हे क्रांती आणि शांतीचं खरं नातं. एकदा आचार्य रजनीश यांनी शांतीच्या मार्गाचा उपाय विचारणा-या व्यक्तीचं केलेलं समाधान असं होतं,'तू आधी तिथे जा, जिथे तुला अशांती मिळाली तेथूनच तुला शांतीचा मार्ग सापडेल. कारण अशांततेतच शांतता लपलेली असते.' शांती शोधताना अशांतीच्या कारणांच्या मूळापर्यंत न जाता शांतीची अपेक्षा करणं स्वत:ची दिशाभूल करण्यासारखे ठरेल.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *पठतो नास्ति मूर्खत्वं जपतो नास्ति पातकम्।* *मौनिनः कलहो नास्ति न भयं चास्ति जाग्रतः॥* *अभ्यास करणारे मूर्ख* *नसतात,नीटनेटका ,योग्य विचार* *करून काम करणारा असेल तर त्याची हानी होण्याचं काही कारण* *नाही. आणि सर्वात महत्त्वाचे हे की मौन वा शांती बाळगणाऱ्याना तक्रार* *करण्याचे कारण नाही,किंबहुना ते तक्रार करतही* *नाही.त्याशिवाय जागृत किंवा* *सचेतन राहणारा कधी कुणाला घाबरत नाही. त्याला कुठली भीती* *नसते.त्यामुळेच स्वभाव शांत ठेवा.* *लक्षात ठेवा शांतता बाष्फल नसते,वायफळ तर बिलकुल नसते.* *सुसंवादी विनम्र चेहरा हे शांततेचे लाडके अपत्य आहे.ही हवीहवीशी* *वाटणारी शांतता कोण भंग करत,आपणच ना?एकमेकांवर* *कुरघोडी करणं, वर्चस्व प्रस्थापित करणे, मीच शहाणा,मग* *माझंच ऐका या सर्व विकृतीतून वादाला तोंड फुटते आणि* *शांतता तेथून पळ काढते.* *अशा वेळी मन,मनगट,मेंदू सर्व* *विकारी होतात,थकतात. ते आपला* *जाहीर निषेध करतात.मग आपण परिस्थिती समोर हतबल होतो* *आणि तडफड करत शेवटी डोळे मिटून झाल्या* *प्रकाराने अश्रू ढाळत बसतो.* *मस्त सुगंधी संवादाला टाळी द्या,मेंदूला शांतपणे त्याचे काम* *करुदया.हे घडवायचे असेल,मनातील मळभ दूर करायचे* *असतील,झटकायचे असतील तर शांततेच्या मार्गाने जावे* *लागेल.मग खात्रीने मानसिक स्वास्थ्य मनाच्या चौरंगावर स्वार* *होईल.* *जगाला आवडेल ते कराल तर एक “product” म्हणून रहाल आणि जर स्वताला आवडेल ते कराल तर, एक “Brand” म्हणून जगाल* *तुमच्या विचारातून तुमचं व्यक्तिमत्त्व झळकत असत त्याकडे तुमचे नसले तरी इतरांचं लक्ष* *असते.तुमचे विचार समजले की तुम्ही समजलात।* *सुंदर विचार करा आणि सुंदर व्यक्तिमत्त्व घडावा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यातील अहंकाराने आपल्या रागावर नियंत्रण कधीच ठेवता येत नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनात अनेक कटू प्रसंग ओढवले जातात.त्या काळात काय होत आहे याचेही भान राहत नाही.जेव्हा आपल्यातील राग संपून जातो तरी अहंकारमात्र तसाच चिटकून राहतो. पुन्हा पुन्हा आपल्यातील अहंकार जागा होऊन तीच ती कृती करण्यासाठी प्रेरणा देतो.त्यामुळे आपल्या जीवनात खूप काही नुकसान सोसावे लागते.म्हणून आपला राग आणि अहंकार नष्ट करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्यातील अहंकाराला तिलांजली द्यायला हवी नंतर आपोआपच आपल्यातील राग नष्ट होईल आणि हे दोन्ही आपल्या जीवनातून गेले की, जीवन सुखावह होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनातील अहंकार नष्ट करणे* एकदा एक राजा एका चांगल्या सदगुणी, माणसाकडे सत्पुरुषाकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही मागाल ती भेटवस्तू देण्याची माझी इच्छा आहे. बोला, काय पाहिजे ? माझा सारा खजिना, राजवाड्याचे वैभव, का माझे शरीर ? ते सत्पुरुष म्हणाले, खजिना, राजवाडा ह्या गोष्टी तुझ्या प्रजेच्या आहेत. त्यांचा तू केवळ रखवालदार आहेस. तुझ्या शरीरावर तुझ्या पत्नीचा, मुलाबाळांचा हक्क आहे. साधूचे ते बोलणे ऐकून राजा गोंधळला आणि म्हणाला, मग माझी स्वतःची अशी कोणती वस्तू आपणांस मी भेट देऊ ? तुम्हीच सांगा. तो महात्मा उद्गारला, तुझ्या मनातील अहंकार हा सर्वस्वी तुझाच आहे. त्याचे दान तू अवश्य करु शकतोस. अहंकाराचे तण सतत उपटून टाकून मनाची मशागत करावी लागते. माणसाच्या अंगी अहंकार कधीही नसावा. अहंकाराने आपली माणसे आपल्यापासून दूर होण्यास वेळ लागत नाही. तात्पर्यः हे शरीर नश्वर आहे.या नश्वररुपी शरीरातील मनाला कधीही अहंकाराचा वारा लागू देऊ नका. कारण जे आपले नाही त्यावर अहंकार बाळगणे व्यर्थ. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*माझा परिचय* *नावः श्रीमती प्रमिला कुंडलीक सेनकुडे* पदः सहशिक्षिका कार्यरत शाळाः जि.प.प्राथमिक शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. शिक्षणः B.A.(Ded ) छंद व आवडः सामाजिक कार्याची आवड,वाचनाची आवड, संघटणात्मक कार्याची आवड, (काव्यलेखन, चारोळी, लेख) लिखाणाचीआवड,वृक्ष लागवड व जोपासना करणे, शालेय स्तरावर शैक्षणिक विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची आवड व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची आवड. तसेच रोटरी क्लब हदगाव तर्फे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविणे. त्याचप्रमाणे (माझे वैयक्तिक पातळीवरील विविध उपक्रम आहेत यामध्ये *सामाजिक वार्षिक उपक्रम* दरवर्षी.आई-बाबाची पुण्यतिथी (अनाथ आश्रमात व डिजिटलशाळेसाठी मदत म्हणून आर्थिक सहकार्य करणे.) तसेच लेझीम स्पर्धेत विशेष मंडप सहयोग दरवर्षी देणे.तसेच एका विद्यार्थ्यांचा शालेय खर्च करणे. 〰〰〰〰〰〰〰 *तंत्रज्ञानात्मक वाटचाल* *ब्लाॕग निर्मितीतुन , आणि युटुब चॕनल च्या माध्यमातून शैक्षणिक माहिती व उपक्रम राबविणे,फ्रेश शालेय परिपाठ या उपक्रमातून बोधकथा हे सदर* *प्रकाशित साहीत्य* *'वास्तव एक......सत्य' काव्यसंग्रह* दिवाळी अंक,विविध मासिके आणि वृतपञात कविता ,लेख प्रकाशित. *भुषवित असलेले पदे* १) म.रा.प्रा.शिक्षक महिला आघाडी संघ जिल्हासरचिटणीस नांदेड. ३) जिजाऊ ब्रिगेड कार्याध्यक्षा हदगाव २) रोटरी क्लब सदस्या हदगाव. ३) काव्यप्रेमी शिक्षकमंच जिल्हाध्यक्षा नांदेड. 〰〰〰〰〰〰 *आजपर्यंत मिळालेले पुरस्कार व सन्मानः* १) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम शिक्षणाची वारी सन्मानपञ २) 'गुणी' शिक्षक गौरव पुरस्कार ३) आई गौरव पुरस्कार ४)कै.देवराव प्रभुजी पाटील सेवाभावी संस्था तर्फे शिष्यवृत्ती पुरस्कार ५) 'गौरव गुणवंताचा' पुरस्कार (सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेड.) ६) मुलींची १००% पटनोंदणी पुरस्कार ७) कुसुमताई चव्हाण 'महिला भूषण' पुरस्कार ८) म.अॕ.पॕनल(MAP) तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (संमेलन नाशीक) ९) रोटरी क्लब, हदगाव तर्फे (Nation Builder Award) १०) गुरुकुल महाराष्ट्र समूहातर्फे सन्मानपञक व गौरवचिन्ह ११) मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार १२) 'आम्ही सावित्रीचा लेकी' आयोजित राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षिका पुरस्कार १३) स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था हदगाव/हिमायतनगर तर्फे दोनवेळेस सत्कार व सन्मानचिन्ह (२०१७ तसेच २०१८ ला) १४) मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे 'गुरू गौरव' पुरस्कार १५) 'आस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना' तर्फे ' राज्यस्तरीय अध्यापक पुरस्कार' १६) नांदेड भारत स्काऊटस आणि गाईडस सन्मानचिन्ह १७) गुरुगोविंदसिंघजी व राजे छञपती प्रतिष्ठान तर्फे प्रेरणा पुरस्कार नांदेड १८) राज्यस्तरीय हिरकणी साहित्यगौरव पुरस्कार जालना १९) विविध स्पर्धात्मक आॕनलाईन सन्मानपञे व व्हिडीओ निर्मिती प्रमाणपत्र २०) महाराष्ट्र शिक्षक पॕनल (MSP) तर्फे ('राज्यस्तरीय शैक्षणिक व्हाटस्अॕप ग्रूप) राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षिका' सन्मानपञ २१) मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार (सेवाभावी संस्था गुरधाळ ता.देवणी जिल्हा लातूर.) २२)गुरू गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार २३) काव्यरत्न पुरस्कार मराठीचे शिलेदार बहूउद्देशिय संस्था नागपूर २४) (जाहीर झालेला पुरस्कार १३ जानेवारी २०२०) राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार बोधी ट्री एज्युकेशन संस्था औरंगाबाद. 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/01/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● भारतीय प्रवासी दिन ● शहीद दिन - पनामा 💥 ठळक घडामोडी :- ● १८५८ - प्रजासत्ताक टेक्सासच्या पहिल्या अध्यक्ष ऍन्सन जोन्सने आत्महत्या केली. ● १८८० - वासुदेव बळवंत फडके- क्रांतिकारक यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा. 💥 जन्म :- ● १९२२ - हरगोविंद खुराना, नोबेल-पुरस्कृत भारतीयवंशी जैव-रसायनशास्त्रज्ञ. ● १९२७ - रा.भा. पाटणकर- सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक ,समीक्षक. ● १९३४ - महेंद्र कपूर, भारतीय पार्श्वगायक. 💥 मृत्यू :- ● १९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर ● २००३: गीतकार व कवी कमर जलालाबादी ● २००४ - शंकरबापू आपेगावकर- राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केंद्राच्या धोरणांविरोधात देशभरात कामगार संघटनांचा बंद, कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वात आंदोलन, औरंगाबाद, चंद्रपूर, नाशकात कामगारांचा मोर्चा, मुंबईत या बंदचा फारसा परिणाम नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इराणमध्ये युक्रेनचं प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त, विमानातील सर्व 180 प्रवाशांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *वाशिम, नंदुरबार, पालघर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती, राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न झेडपीत राबण्याची शक्यता, अकोल्यात आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नागपूर जिल्हा परिषदेत भाजपला मोठा धक्का, काँग्रेसकडून भाजपची धुळधाण, तर धुळे जिल्हा परिषदेवर काँग्रेसला धूळ चारत भाजपचं निर्विवाद वर्चस्व* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं राजकारणात अधिकृत लाँन्चिग होणार, येत्या 23 तारखेला पक्षाच्या अधिवेशनात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *'छपाक'च्या रिलीजचा मार्ग मोकळा, सिनेमाच्या प्रदर्शनावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांकडून मागे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हानिहाय पालकमंत्र्याची यादी केली जाहीर, आ. अशोक चव्हाण नांदेडचे तर आ. बच्चू कडू हे अकोल्याचे पालकमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करता......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/orX5uTd2bzd8Jt9a9 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चांदणे* - सावित्री गायकवाड/कांबळे उपशिक्षिका -शाळा दापोडी, ता. दौंड , जि . पुणे किती सुंदर चांदणे गोड भासे मज निळ्या नभाची निळाई पांघरून यावी नीज ॥१॥ नभी तारकांनी जणू वसविले नवे गाव वाट असेल कोठूनी त्याचा लागेल का ठाव ॥२॥ सूर्य ढगाआड लपे वर चांदोमामा आला आजी सांगूनीया गोष्ट घास भरवेल मला ॥३॥ ढगा वाऱ्यांच्या कुशीत चंद्र तारका खेळती मनोहर रूप त्यांचे मज खूप आवडती ॥४॥ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?* कलहरी 2) *UNO चे महासचिव कोण आहेत ?* एंटोनिओ गुटेरेस 3) *आशियातील ताज्या पाण्याचा सर्वात मोठा तलाव कोणता ?* वूलर तलाव 4) *भारतातील कोणत्या घटकराज्यास सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे ?* गुजरात ( 1600 km ) 5) *तिन्ही बाजूंनी पाणी व एका बाजूने जमीन असणाऱ्या भूप्रदेशास कोणती संज्ञा वापरतात ?* द्विपकल्प *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुहास अनिल देशमुख 👤 अजित राठोड 👤 भीमाशंकर भालेकर 👤 माधव नरवाडे 👤 राजेश रामगिरवार 👤 गजानन सोनटक्के 👤 माधव नरवाडे 👤 श्रीनिवास रेड्डी बाळापूर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिबिंबांचं देखणेपण आधिक भावतं माणसाला. म्हणूनच बाहेर पडण्याआधी, एखाद्या समारंभाला जाण्याआधी आपण आरशातील आपलं प्रतिबिंब पुन्हा पुन्हा निरखून पाहत असतो. मनाची खात्री झाल्यावर दर्पणाच्या मोहातून मुक्त होत असतो. हे आपण असं का करीत असतो तर स्वत:सह इतर बघ्यांनाही बरं वाटावं म्हणून.* *स्त्रियांप्रमाणे पुरूषांनाही असं नीट-नेटकंपण राखून समूहात मिरवायला आवडत असतं. अशावेळी महिलांना महिलांकडून मिळणा-या दादेपेक्षा एखाद्या नजरेत भरणा-या अनोळखी पुरूषानं नजरेनं वा उदगारानं दिलेली दाद स्त्रियांनी दिलेल्या दादेपेक्षा खूप हुरळून टाकणारी असते. त्यावेळी ती स्त्री धन्यतेने कधी स्वत:कडे तर कधी त्या पुरूषाच्या नजरेकडे नजर सोडवत पाहत असते. अशावेळी स्वत:कडे पुन्हा पुन्हा कौतुकानं निरखून पाहणं हे आरशातील प्रतिबिंबाकडे पाहण्याच्या अनेकपट सुंदर असतं. ज्या उद्देशानं आरशात वारंवार पाहून ती व्यक्ती बाहेर पडलेली असते, त्याची मनभावक फलश्रुती त्या व्यक्तीने अनुभवलेली असते. हेच पुरूषांच्या बाबतीतही घडतं. पण या मनाच्या सहजधर्म व्यवहारात पुरूषाला महिलेनं द्यावयाची दाद जरा संभाळून द्यायची असते. कारण पुरूषी नजर सळसळून तिच्या नजरेवर रेंगाळायला फार काळजी घेत नाही. लवकरच ती नजर 'आपलीशी' वाटायला लागते. कारण स्त्रियांइतका पुरूषी संकोच सावध नसतो.* *मुक्त मनाच्या अशा तरलतरंगी लहरी-लहरा प्रत्येक जण अनुभवत असतो. म्हणून स्त्री-पुरूषानं, त्याहीपेक्षा पती-पत्नीनं परस्परांच्या प्रतिबिंबाला जपावं. ते इतरांच्या नजरेत खुपावं असं काही घडू नये.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 👁👀👁👀👁👀👁👀 *--संजय नलावडे , मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *हे जगणे अवघड झाले आता* *सोन्याचा होता धूर,* *आता नुसत्याच उरल्या बाता।* *चकाकत्या खोट्याला कवटाळीती* *सगळे।* *सत्याला इथे वाली न कुणी आता।* *हे विदारक दृश्य आपल्याला समाजात* *पदोपदी अनुभवायला* *मिळते.* *पण अंतिम सत्य काही वेगळेच* *असते.24 कॅरेट लाच नेहमी कस* *लागतो.* *समाजात जो सरळ व सत्याने वागतो* *त्याला नेहमीच अन्यायाचे* *घाव सोसावे लागतात.* *कारण....* *जंगलात लहान मोठी,* *वाकडी तिकडी* *अशी अनेक प्रकारची झाडे* *वाढलेली असतात.* *परंतु अशी झाडे कोणीच* *तोडत नाही.* *पण जी सरळ वाढलेली असतात* *त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव* *सोसावे लागतात.* *रस्ता जर खड्डयांचा आणि कच्चा असला ना तर त्यावर लोड कमी* *असतो.पण तोच प्लेन आणि सुपर असुद्या सगळ्या गाड्या त्याच* *रोडवरून धावतील, त्याच्यावरच जोरजोराने आदळतील.* *तरीही निवड सत्याचीच करा.* *सगळ्यात महत्वाचे म्हणजे* *सत्य मेव जयते।* *सत्य परेशान होता है,पराजित नही।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रगती ही अधोगतीच्या विरुद्ध प्रवास करत असते आणि अधोगतीला मागे टाकून पुढे जाते.अधोगतीचे तसे नाही,कारण अधोगती ही प्रगतीला मागे खेचण्याचे प्रयत्न करते आणि कधी-कधी ती यशस्वीही होते.याचे कारण असे आहे की,माणसाच्या विकृत मनावर ती प्रथम आघात करुन आपल्याकडे खेचते त्यामुळे अशा विकृत मनाला चांगले करावेसे वाटत नाही त्यामुळे जेवढे काही करायचे ते वाईटच होते हे अधोगतीला माहीत आहे.पण माणसाने एक लक्षात ठेवायला हवे की,अधोगतीने पदोपदी अपमान होते,अपयश मिळते आणि जीवनात यशस्वी होऊ शकत नाही.प्रगतीने यश प्राप्त होते,मन सशक्त होते, मनाला आशावादी आणि प्रयत्नवादी बनवते त्यामुळे माणसांमध्ये नवे काहीतरी करण्याची दिशा प्रगतीतून दिसायला लागते तसेच मान सन्मान मिळवून देते.म्हणून अधोगतीला कधीही आपल्या जीवनात स्थान देऊ नये. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्य कार्यास शक्ती खर्ची घालणे* उपनिषदातील एक प्रसंग आहे. परमेश्वराने देवांवर कृपा केली आणि त्यांनी शक्तिशाली असुरांवर विजय मिळविला. विजयी झाल्यावर प्रत्येक देवतेला अहंकार निर्माण झाला. त्यातील प्रत्येक जण विजयाचे श्रेय स्वत:कडे घेत आणि दुस-याचे योगदान तुच्छ मानत असे. यामुळे देवतांमध्ये विनाकारण वाद चालु झाले. त्यातून कटूता निर्माण होऊ लागली. हे पाहून परमेश्वराने विचार केला की असेच जर होत राहिले तर असुर परत देवांवर चढाई करतील आणि यांच्यातील वैमनस्य यांना पराजित करेल. ही समस्या सोडविण्यासाठी ईश्वर एक विशाल यक्षाच्या रूपात देवतांच्या समोर हजर झाले. देवतांनी आश्चर्याने त्यांना पाहिले आणि त्यांचा परिचय करून घेण्यासाठी सर्वात प्रथम अग्नि देवतेकडे गेले. यक्षाने त्यांना विचारले,''आपण कोण आहात?'' अग्नि देवतेने स्वाभिमानाने उत्तर दिले,'' आपण मला ओळखत नाही? मी तेजस्वी अग्नि आहे. मी ठरवल्यास सारी पृथ्वी जाळून भस्म करून टाकीन.'' यक्षाने त्यांना एक वाळलेली गवताची काडी ती जाळण्यास सांगितले. परंतु अग्नी देवता ती जाळू शकले नाहीत. मग पवन देवता यक्षाचा परिचय जाणून घेण्यासाठी गेले. तेव्हाने यक्षाने त्यांनाही परिचय विचारला मग पवन देव म्हणाले,'' मी पवन आहे, मी ठरवले तर संपूर्ण ब्रह्मांड उडवून देईन.'' यक्षाने तीच वाळलेली काडी त्यांना उडवण्यास सांगितले. पण पूर्ण जोर लावूनसुद्धा पवनराज ती काडी उडवू शकले नाही. त्यानंतर इंद्र या देवतेकडे निघाले, तोपर्यंत यक्ष निघून गेले होते. आता तेथे पार्वती प्रकट झाली आणि इंद्राला यक्षरूपी परमेश्वराचा परिचय दिला. आता देवतांना त्यांच्या शक्तीचा अंदाज दिला होता आणि त्यांचा अहंकार नष्ट झाला. तात्पर्य :- अहंकार आणि अहंका-याचे पतन निश्चितच होते. आपली शक्ती योग्य कार्याला लावल्यास सार्थक होत असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*पतंग* *बालसाहीत्य* (दि.०८-०१-२०२०) उंच नभात उडतो पतंग दोर राही जमीनीवर ध्येय बांधली जसे मनाशी स्वप्ने साकारले जसे उराशी रंगबिरंगी त्याचे अंग उडण्यात असतो दंग झेप घेता आकाशी फडफडतो कसा वार्याशी हवेचे झेलीत हेलकावे इकडूनतिकडे फडकावे वरवर चढीत जातो स्वप्न मनीचे साकारतो पतंगासम ध्येय असावे मधेच ना कुठे कटावे दोर बांधावा घट्ट असा सुटेलना धागा पुर्तीचा.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/01/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना. ● २००५ - अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी. ● २०००- लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन.टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड. 💥 जन्म :- ● १९०९ - आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्या प्रथम लेखिका. ● १९४५ - प्रभा गणोरकर- मराठी लेखिका. ● १९४२- स्टीफन हाकिंग, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व लेखक 💥 मृत्यू :- ● १९६७ - श्रीपाद कृष्ण बेलवलकर- प्राच्यविद्यापंडित. ● १९७३ - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार. ● १९७३ - स.ज. भागवत -तत्त्वज्ञ व विचारवंत. ● १९९२ - द.प्र. सहस्रबुद्धे- 'आनंद' मासिकाचे माजी संपादक. ● १९९५-मधू लिमये, स्वातंत्रसैनिक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *निर्भया प्रकरणातील आरोपींना 22 जानेवारीला फाशी, पटियाला कोर्टाचा महत्वाचा निकाल, 7 वर्षांची प्रतिक्षा संपली * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जलयुक्त शिवारावरुन सरकार आणि भाजपमध्ये जुंपली, कामे थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा भाजप आमदार जयकुमार रावलांचा इशारा, तर निधी न देण्याचे नाशिक विभागीय आयुक्तांचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात, पुणे पोलीस अडचणीत, गृहमंत्र्यांकडून कारवाईचे संकेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्हा परिषदेसाठी मतदान पूर्ण, आज लागणार निकाल, तर परभणीत महाराष्ट्र विकास आघाडी पॅटर्न यशस्वी, अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला विटेकर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यातील तरुणांना सरकारचं न्यू ईयर गिफ्ट, हजारो पदांसाठी भरती, विविध सरकारी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या अंतिम सान्यात नाशिकचा हर्षवर्धन सदगीर याने लातूरच्या शैलेश शेळकेवर मात करत मानाची चांदीची गदा उंचावली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर 7 गडी राखून मात केली आहे. या विजयासह भारताने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सेमी इंग्रजीची समस्या* राज्याचे शिक्षण सचिव मा. नंदकुमार यांनी नुकतेच बीड मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, अजून दोन वर्षे या पदावर राहिलो तर सेमी इंग्रजी बंद करू कारण अर्धे हे अर्धे ते असे नको तर आपणास दोन्ही भाषा चांगल्या प्रकारे अवगत असणे गरजेचे आहे. सचिव साहेबांनी हा सेमी इंग्रजीचा मुद्दा खरोखरच विचारात घेणे आवश्यक आहे. कारण भविष्यात सेमी इंग्रजी ही एक समस्या बनून समोर येऊ नये.............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/VAMMydeaRfpKJi1E7 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गणपती* कवयित्री ©® श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर 9881862530 आले आले गणपती बाप्पा, नाचू गाऊ बागडू या. रोज रोज आनंदाने, आरती आता गाऊया . लाडू , मोदक प्रसादाला, नाही तोटा मौजमजेला. बाप्पा खूप छान झाले, सुट्टी मिळाली शाळेला. दुर्वा ,आघाडा रोज तुला, शोधून आणतो नियमाने. बांधून जुडी एकवीसची, देतो तुला काळजीने. आरास पाहून तुझी, जीव आमचा हरकला. रोज रोज तुझ्यासमोर, आवडते आम्हाला नाचायला. दू:ख एकच बाप्पा मला, पुराने सारे वाहून गेले. पावसाला विचार ना रे जरा, चुकीचे काय असे घडले ? *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *घटकराज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो ?* राज्यपाल 2) *उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो ?* राष्ट्रपती 3) *घटकराज्याच्या आणीबाणीला काय म्हणतात ?* राष्ट्रपती राजवट 4) *राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे ?* हैदराबाद 5) *राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकांचे आयोजन कोण करते ?* निवडणूक आयोग *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पेटेकर, खतगावकर साहित्यिक तथा चित्रकार 👤 शेख आसिफ, धर्माबाद 👤 मंगेश जाधव 👤 आकाश गाडे, येवती 👤 पोतन्ना मुदलोड, येवती 👤 आनंदा कुमारे 👤 मारोती गोडगे 👤 अनिल दिपके *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान* *ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान।* *ज्ञान आणि कर्म यांचा जीवन व्यवहारात अन्योन्य संबंध कसा असावा आणि त्यानं जीवनविकास कसा घडवावा, हा अर्थपूर्ण संदेश या गीतात आहे. ज्ञान आणि कर्म हे दोन वेगवेगळे मार्ग नाहीत, तर ज्ञानानं कर्मशील व्हावं आणि कर्मानं ज्ञानवान व्हावं, असा संदेश या गीतात आहे. सर्व विद्यामंदिरात ज्ञानसाधना कर्ममार्गानंच झाली पाहिजे, कर्ममार्गावर ज्ञानामृताचे झरे असले पाहिजेत, तरच ज्ञानाचा उपयोग जीवन उभारणीसाठी होईल.* *विज्ञानानं कितीही प्रगती केली, तरी जर विनाशाचा मार्ग दाखवला, तर ते विज्ञान आणि ती विज्ञानाची प्रगती नसलेलीच बरी. विज्ञानानं करूणेच्या चरणाशी नत व्हायला हवं; कारण करूणा हा सामाजिक, सामूहिक उत्थानाचा शांतीमार्ग असतो. या शांतीमार्गाने मानवतेच्या मंदिराची उभारणी करायची असेल, तर ' ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान ' हा संदेश सर्वांनी अंगी बाणवला पाहिजे.* ••●🌴‼ *रामकृष्णहरी* ‼🌴●•• 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *हे जीवन सुंदर आहे.प्रत्येक क्षणाला सुंदर करा.यासाठी भारतीय संस्कृतीत* *खूप सारे उत्सव आहेत.प्रत्येक सण ,* *उत्सवामघ्ये नाविन्याचा शोध घ्या व* *जीवन आनंदी करा.प्रत्येक नात्यात नवचैतन्य भरा आणि* *आनंदित रहा.* *कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता.* *परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या* *प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच* *आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि* *भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक* *घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे* *स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे.* *भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून* *सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.* *व्हाट्सएपच्या व फेसबुकच्या गराड्यात सण, उत्सव व नाती यांना* *लांब करू नका,प्रत्येकाशी बोलण्याचा आनंद मनाचा छानसा* *खुराक आहे हे विसरू नका.* *नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.* *मग करूया प्रत्येक क्षणाला सोनेरी आपला दृष्टिकोन बदलून सर्वत्र* *पाहूया.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सुगंधीत असलेल्या फुलांना आम्ही सुगंधीत आहोत म्हणून तुम्ही आमच्याकडे या आणि सुगंध घ्या असं कधीच म्हणावं लागतं नाही.आपोआपच सुगंध असणा-या फुलांकडे लोक आकर्षित होतात. त्याचप्रमाणे सज्जन माणसे कधीच कुणाला म्हणत नाहीत की,तुम्हीआमच्याकडे आमच्या सहवासात या आणि आमचे सद्गुण घ्या. आपोआपच सर्वसामान्य माणसे सज्जनांच्या सहवासात जाऊन आपल्यातील असलेल्या दुर्गुणावर मात करुन सद्गुणी होण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य असा की सद्गुणांचा सहवास हाच दुर्गुणावर मात करु शकतो.त्यासाठी आपली मानसिकता असावी लागते. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वच्छतेची सवय* रामरावचा खानावळीचा व्यवसाय अगदी जोरात सुरु होता पण काही दिवसांनी दिनकररावने त्यांच्याच शेजारी नवीन भोजनालय सुरु केले आणि रामरावची खानावळ पार बसली. त्याला रोज ग्राहकांची वाट पाहावी लागे. एके दिवशी रामरावचा मित्र माधव त्याच्याकडे आला तर रामरव एकदम निराश बसलेला दिसला. त्याने कारण विचारताच रामरावने त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यावर माधव त्याला म्हणाला, अरे, काही सांगतो त्यावरुन तू लक्षात घे, तुझे काय चुकले ते. तुझ्या खानावळीत जो चवीचा स्वयंपाक होतो तो दिनकररावच्या खानावळीत होत नसला तरी त्याच्या खानावळीची स्वच्छता आणि टापटीप ग्राहकाला खेचत आहे. तू देखील बदल केलास तर तुझी खानावळ पुन्हा जोरात चालेल, यात शंका नाही. रामरावला आपली चूक उमगली. तात्पर्य : स्वच्छता ही सर्वत्र असावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*ऊब मायेची* (दि.०८-०१-२०२०) ऊब मायेची असावी अनाथास ती लाभावी घरट्यातला पिलांची माय पिलास दिसावी असा मायेचा ओलावा कुठ नाही फिटणारा त्याचा पाझराने जीव बाळाचा आतुरणारा सानुल्याची ग माय जशी असते दुधाची ग साय असा जीव वेडा सारा मायेचा असतो झरा न्यारा कोणा?कोणा? मी सांगू ऊब माऊलीची कशी? तिची सावलीही असते जगाहुनही न्यारी जशी 〰〰〰〰〰〰〰 *श्रीमती प्रमिला सेनकुडे*
*उपक्रम* *चिञकला स्पर्धा* आज दिनांक ०७-०१-२०२० रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तसेच आनंद मिळण्यासाठी इयत्ता पहिली व दुसरी चा विद्यार्थ्यांची वर्गपातळीवर चिञकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील इयत्ता पहीलीतील प्रथम क्रमांक *ओमकार संतोष चंद्रवंशी* इयत्ता दुसरीतील प्रथम क्रमांक *युवराज बाबुराव चंद्रवंशी* या दोन्ही विजेत्या बालचमूस बक्षिस देण्यात आले. व सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. 🌹🌹🌹🌹🌹🌹 *संदेशः 'छान छान उपक्रम राबवूया,बालकाचा आनंद वाढवूया.'* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 〰〰〰〰〰〰〰 ✍श्रीमती प्रमिला सेनकुडे (वर्गशिक्षिका)
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/01/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● गुरूचे आयो,युरोपा,गॅनिमीड व कॅलिस्टो हे चार चंद्र गॅलिलिओ ने दुर्बिणीद्वारे शोधले ● सर्व्हेअर' हे अमेरिकेचे यान चंद्राच्या 'टायको' या विवराकाठी उतरले ● १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले. ● १९७२- कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे काम पूर्ण झाले* 💥 जन्म :- ● १९२० - सरोजिनी बाबर - लोकसाहित्याच्या अभ्यासक. ●१९२१ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता. ● १९४८ - शोभा डे, भारतीय लेखिका. ● १९५० - जॉनी लिव्हर, भारतीय अभिनेता. ● १९७९ - बिपाशा बासू, भारतीय चित्रपट अभिनेत्री. 💥मृत्यू ● १९८९ - मिचियोमिया हिरोहितो - जपानचे सम्राट. ● २००९-अच्युतराव आपटे,स्वातंत्रसैनिक, *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 8 फेब्रुवारीला मतदान तर 11 फेब्रुवारीला निकाल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा पणाला * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई: पाच दिवसांचा आठवडा करावा या आणि इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी येत्या ८ जानेवारी रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संपाला राज्य राजपत्रित महासंघाने पाठिंबा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदी भाजपची बाजी, जालन्यात मात्र माघार, तर अमरावतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे सातारा महामार्गावरील खेड- शिवापूर टोलनाका बंद करण्याची पुणे जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस, महामार्गाचं काम वर्षानुवर्षे रखडल्यानं निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मातोश्रीबाहेर ताब्यात घेतलेल्या आंदोलक शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडून दखल, महेंद्र देशमुखांना दादा भुसेंचं बोलावणं, तहसीलदारांसह बँक अधिकारीही बैठकीला, सकाळी ही तहसील कार्यालयात आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मराठीच हवी...! इंग्रजीत कागदपत्रे सादर केल्याने मुंबईत शिवसेना आमदार दिलीप लांडे यांचा संताप, अधिकाऱ्यांवर कागदपत्रे फाडून फेकली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *महाराष्ट्र केसरी स्पर्धेत धक्कादायक निकाल, गतविजेत्यासह उपविजेत्याचं आव्हान संपुष्टात, बाला रफिक शेख आणि अभिजीत कटके स्पर्धेबाहेर, सोलापूरच्या माऊली जमदाडेची बालावर मात, तर हर्षवर्धन सदगीरकडून अभिजीत चितपट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकच ध्यास ; वाचन विकास* शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून ........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/CcLgnaoifdooGqG76 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बाप* - श्रीकृष्ण उबाळे छाया असतो राया असतो बाप घराचा पाया असतो कीव असतो निव असतो बाप घराचा जीव असतो नाक असतो चाक असतो बाप घराचा धाक असतो मेवा असतो हेवा असतो बाप घराचा ठेवा असतो आन असतो मान असतो बाप घराची शान असतो बाप खरंच हळवा असतो बाप घराचा तळवा असतो *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाचे नाव काय आहे ?* संसद 2) *घटकराज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो ?* राज्यपाल 3) *भारतात आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला असतो ?* राष्ट्रपती 4) *राष्ट्रपतीला गोपनीयतेची शपथ कोण देतात ?* सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 5) *प्रधानमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात ?* राष्ट्रपती *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कुणाल पवारे, शिक्षक तथा पत्रकार सामना, कुंडलवाडी शहर प्रतिनिधी 👤 सार्थक राजेंद्र बोडखे 👤 दीपक मालूसरे 👤 विश्वनाथ चौधरी 👤 अभय साबळे 👤 महेंद्र शिंदे 👤 विजय गायकवाड 👤 प्रथमेश घाडगे 👤 अशोकरावजी गावडे 👤 अमर नाईकवाडे 👤 वरद गजानन लोहेकर 👤 युवराज ढगे सौजन्य :- facebook Birthday Event *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक पंडित होते. नावेतून रोज पलीकडच्या मंदिरात मंत्रोच्चार करीत देवदर्शनार्थ जात असत. नावाडी अडाणी होता. एक दिवस न राहून त्याने पंडितास विचारले,'तुम्ही रोज काय पुटपुटत असता, ते मला काही कळत नाही. सांगाल का? पंडित म्हणाले,'अरे मी संस्कृत मंत्र म्हणतो. तुला संस्कृत नाही येत? तुझं अर्ध आयुष्य वाया गेलं म्हणायचं.' हे ऐकूण नावाड्याला आपण आडाणी राहिलो याचे शल्य वाटत राहिले.* *असेच काही दिवस गेले. नदीला पूर आलेला. नावाडी नेहमीप्रमाणे पंडिताला पैलतीरी घेऊन निघालेला. नदीपात्राच्या मध्यावर असताना नावेची तळातील जीर्ण झालेली फळी पाण्याच्या जोराने उचकटली नि नाव बुडू लागली. नावाडी पंडित महोदयांना पाण्यात उडी टाका नि पोहायला लागा म्हणून समजावू लागला. पंडिताने विचारले,'पोहायचं म्हणजे काय करायचं?' नावाडी उडी टाकत म्हणाला,'तुम्हाला पोहायला येत नाही? मग तर तुमचं संपूर्ण आयुष्यच वाया गेलयं म्हणून समजा.'* *कोण ज्ञानी नि कोण अज्ञानी याचा आपण तपास करू लागू तर लक्षात येते की, प्रत्येक ज्ञानाचा संबंध जीवन जगण्याशी असतो. ज्ञान आहे, पण उपयोग नाही असे ज्ञान काय कामाचे? जीवनातील छोटी-मोठी कामे करणा-यांचे महत्व कमी झालेले नाही. समाजातील सर्व प्रकारची माणसे तितकीच महत्वाची असतात. ज्ञान हे पैसे मिळवायचे साधन की जगण्याची कला? याची फारकत होणे वर्तमानाची शोकांतिका आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल -- 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आलोच या उघड्या नागड्या जगात* *जगायचेच आहे,तर जगा बिनधास्त* *कधी दोन देत तर कधी दोन घेत.* *जीवन हे संघर्षाचे मैदान आहे.इथं पदोपदी अपमान तर कधी सन्मान हा* *होतच राहणार.* *मग अपमानीत झाला तर मैदान* *सोडून जायचे का?नाही अपमानाला* *सुद्धा मानात परावर्तित* *करण्याची ताकद ठेवा.* *हार जीत तो बहादूर के किस्मत के दो सीतारे होते है। हे ध्यानात ठेवा.* *आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याला बदलू शकतो.* *नकारात्मक गोष्टींचा सकारात्मक कार्यासाठी वापर करणे, ही खूप मोठी* *ताकद आहे. याचे सुंदर उदाहरण पहा.* *टाटांचा पॅसेंजर कार उद्योग तोट्यात जात होता. तो विकण्याचा निर्णय* *टाटांनी घेतला. कार बिझनेस विकण्याच्या मिटींगसाठी फोर्ड* *कंपनीस भेटण्यासाठी गेले. त्याना विचारले गेले, तुम्हाला कार* *बनविताच येत नाही, तर हा उद्योग तुम्ही का सुरू केला?* *हा अपमान व त्यांचे शब्द रतन टाटांना झोंबले. टाटा कार युनिट न* *विकण्याचा निर्णय घेऊन ते परत आले. बरेच संशोधन व प्रयत्न करून* *टाटांनी स्वतःचा कार ब्रॅंड मोठ्या उंचीवर पोहचविला.* *पुढे काही वर्षांनी आंतरराष्ट्रीय लक्जरी कार ब्रॅंड जग्वार आणि लँन्ड* *रोव्हर विकत घेऊन विदेशी कार कंपन्यांना योग्य उत्तर दिले.* *मग यातून आपण काय धडा घ्यायचा ते ठरवा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• साखरेचा आकार आणि रंग कसाही असला तरी त्याची बाहेरुन आणि आतून असणारी चव ही गोडच असते.ती कधी चवीला आंबट,कडू, तुरट,खारट लागत नाही. त्याप्रमाणे माणूस दिसायला कसाही असू द्या.त्याच्या शारीरिक सौंदर्याचा संबंध नाही.परंतू त्याचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे स्वभाव हा आतून सुंदर असायला पाहिजे.तो इतरांशी आणि स्वत:च्या जीवनात कसा वागतो.तो सर्वांशी प्रेमाने, आनंदाने, निरपेक्ष भावनेने,मनात इतरांशी जळावू वृत्तीने न वागणे असा जर स्वभाव असेल तर नक्कीच माणूस साखरेसारखा गोड आहे असे समजेल आणि तसा असेल तरच तो सर्वांना आवडतो.केवळ वरुन गोड आणि आतून कडू असेल तर तो कधीच कुणाच्या हृदयावर राज्य करु शकत नाही.ते तेव्हाच कालबाह्य होऊन जातात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अरण्यातील सिंह* एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.' तात्पर्यः स्वतःचे दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे असा जवळजवळ प्रत्येकाचा स्वभाव असतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*आमची शाळा आमचे उपक्रम* आयोजकः श्री वनसागर सर कार्यवाहकः श्री पतंगे सर,सौ.कुंभारे मॕडम, सेनकुडे मॕडम,हिवराळे मॕडम. *विषयः इंग्रजी(शब्द लेखन)* इयत्ताः (पहिली ते सातवी) *कृतीः* विद्यार्थ्यांना परिपाठाचा अगोदरच दररोज दहा इंग्रजी शब्द लिहिण्यासाठी देणे व त्या शब्दाचे पाठांतर करण्यासाठी सांगणे. एक महिन्यानंतर शब्द लेखनावर स्पर्धा परीक्षा लेखन करून घेणे. *फलितः* शब्दसंपत्ती वाढते, उच्चार ,स्पेलींग सुधारते, इंग्रजी विषयाची आवड निर्माण होते. 〰〰〰〰〰〰 दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त शब्द लिहीलेल्या विद्यार्थ्यांचा तीन क्रमांक व एक उत्तेजनार्थ म्हणून क्रमांक काढले व🏆बक्षिस वितरण सोहळा झाला. ✍ शब्दांकन श्रीमती प्रमिला सेनकुडे जि.प.प्रा.शा.गोजेगाव 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/01/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• = *पत्रकार दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● १९२४ - वि.दा. सावरकर यांची जन्मठेपेतून सुटका. 💥 जन्म :- ● १८१२ - दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ● १९५९ - कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९७१ - जादूगार पी सी सरकार यांचा मृत्यू *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *गृह, अर्थ खातं अखेर राष्ट्रवादीकडेच, शिवसेनेच्या दादा भुसेंकडे कृषी खात्याची धुरा, आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम खातं * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आमदार वर्षा गायकवाड राज्याचे नवे शालेय शिक्षण मंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *एक रुपयात संपूर्ण आरोग्य चाचणी लवकरच सुरु करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एकाचवेळी ८३६ मुलींच्या नामकरणाचा सोहळा बीडमधील कीर्तन महोत्सवात काल रंगला. स्त्री भ्रूण हत्येचा डाग लागलेल्या जिल्ह्यत असे चित्र आशादायी वाटत होते. या अभूतपूर्व नामकरण सोहळ्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मांढरदेव (ता.वाई) येथील यात्रेत करणी करण्याच्या नावाखाली झाडाला खिळे बिबे, लिंबू व काळ्या बाहुल्या फोटोसह ठोकणाऱ्यांवर व जादूटोणा करणाऱ्यांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारत-श्रीलंकेमधील पहिला टी20 सामना पावसाने धुतला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टरने रविवारी क्रिकेटच्या इतिहासात विक्रम केला, एकाच षटकात सहा चेंडूवर सहा षटकार ठोकत लिओ कार्टरने आपलं नाव दिग्गज फलंदाजांच्या यादीत नोंदवलं आहे. अशी कामगिरी करणारा लिओ कार्टर क्रिकेटच्या इतिहासातला सातवा फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडमधील स्थानिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत कार्टरने हा विक्रम केला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आचार्य बाळशास्त्री जांभेकर* बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर अर्थात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. त्यांचा जन्म दिनांक ६ जानेवारी १८१२ रोजी कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभूर्ले या गावी एका गरीब ब्राम्हण घरात झाला. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार, चुणचुणीत व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. म्हणूनच त्यांनी अगदी लहान वयातच अनेक विषयातील शिष्यवृत्ती मिळवली आणि संशोधन सुद्धा केले. त्यांना माहित होते कि, ब्रिटिशांना भारतातून हाकालायचे असेल तर लोकांना जागरूक करणे अत्यंत करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी वर्तमानपत्र हे माध्यम सर्वात चांगले आहे. म्हणून त्यांनी गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांच्या सहकार्याने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण ‘ नावाचे वर्तमानपत्र प्रकाशन करण्यास सुरुवात केली........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/R6jE9oYXT2h1vVdv9 वरील लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मशाल होऊन जग* ........©® सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद असंख्य वेळा होते भावनांची घुसमट लपवून दुःख सारे हसत जगते जीवनपट वर्तमानात नसले अस्तित्व तरी भविष्यात असेल बघ स्वप्न उडण्याची उद्या आकाश तुझे असेल टाळणारे टाळणारच आपण लढावे अस्तित्व आपले आपण कर्तव्य करून सिद्ध करावे ढाल होऊन नाहीतर मशाल होऊन जग सोबती नसेल कुणी आज पण नाव तुझे असेल बघ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *दोन नद्यांच्या दरम्यान असलेल्या भूमीस काय म्हणतात ?* दुआब 2) *भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कोण करते ?* केंद्रीय सांख्यिकी संस्था 3) *भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता ?* लॉर्ड कॅनिंग 4) *महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात ?* 19 5) *लोकसभेत महाराष्ट्रातून किती सदस्य निवडले जातात ?* 48 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अभिषेक अडकटलवार 👤 साईनाथ जगदमवार 👤 भगवान चव्हाण 👤 रितेश जोंधळे 👤 बजरंग माने 👤 सुदर्शन कोंपलवार 👤 श्रीनिवास गंगुलवार 👤 मोहन घोसले 👤 दत्तात्रय बंडावार 👤 अभिषेक नंदकिशोर अडकटलवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समाज ज्या कारणांनी अधोगतीला गेला ती नष्ट करून समाजातल्या घटकांत नवचैतन्य जागे करण्यास मदत होईल याकरीता धरलेला आग्रह, त्यासाठी उचललेलं आंदोलनाचं पाऊल म्हणजे 'क्रांती' संबोधावे लागेल. जे शांतीपथावर घेऊन जाईल. जेंव्हा क्रांती आंदोलनाची लक्षवेधी आरोळी उठते तेंव्हा नक्कीच कुठे न् कुठे काहीतरी दुखतंय हे दुर्लक्षून चालणारं नाही. आज बेरोजगारी, भूक, गरिबी, गुलामी, आत्याचार यामुळे बहुसंख्य समाजघटकांत असंतोष निर्माण झालायं. त्यासाठी क्रांतीचा आवाज उठलाच पाहिजे. पण माणसांना माणसांचीच भिती वाटावी, ही ख-या क्रांतीची अवस्था नसावी.* *अर्थात, स्वार्थाच्या सोंगात क्रांती होत नसते, तर विध्वंसच आधिक होतो. त्याचप्रमाणे आक्रोशांच्या आरोळ्यांनी तथागत बुद्धांला अपेक्षित असलेली शांती नांदत नसते. जर लढा न्यायासाठीचा असेल तर हरएक चांगल्या-वाईट, गोष्टींचा त्याग आणि स्विकाराची सुरूवात स्वत:पासून झाली पाहिजे. अशीच क्रांती शांतीकडे घेऊन जाईल. आज भोवतालच्या ढवळलेल्या पर्यावरणावर भाष्य करताना, न्यायासाठी आंदोलन उभारून आपलं अवघं जीवन खर्ची घातलेल्या नेल्सन मंडेलांचा विचार लागू पडतो. ते म्हणतात,'जर कुठे शांती नाहीये तर याचे कारण हे आहे की, आम्ही विसरून गेलोत की आम्ही एक-दुस-यांचे कुणीतरी आहोत.' जे माणूस म्हणून कधीच विसरता येणार नाही !* *॥ रामकृष्णहरी ॥* ❤❤❤❤❤❤❤❤❤ *श्री. संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *अगुणस्य हतं रूपं दुःशीलस्य हतं कुलम्।* *असिद्धस्य हता विद्या अभोगेन हतं धनम्।।* *अंगात चांगले गुण नसले तर रूपाला काही अर्थ नसतो, माणसाचे शील* *शुद्ध नसले तर त्याच्या कुळाला बट्टा लागतो,* *शिकलेल्या विद्येचा उपयोग केला नाही तर ती कांही कामाची नाही* *आणि संपत्तीचा उपभोग घेतला नाही तर ती तशीच वाया जाते. थोडक्यात* *सांगायचे तर आपल्याकडे जे कांही असेल त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करता* *आला पाहिजे.* *आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप* *नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित* *ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्यकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी* *आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास* *करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते* *आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे* *आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.* *पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.*जिभेची इजा सगळ्यातलवकर बरी *होते असं सायन्स म्हणते...* *पण* *जिभेने झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असं अनुभव म्हणतो...!..* *** *जीभ नरम असते, कोमल असते आणि लवचिक असते. म्हणूनच ती अखेरपर्यत तोंडात सुरक्षित राहाते।* *याउलट दात कठोर असतात, तीक्ष्ण असतात, धारदार असतात म्हणूनच त्यांच्यापैकी एकही अखेरपर्यत तोंडात शिल्लक राहत नाही।।* *म्हणूनच रोजच्या जीवनात सर्वांशी बोलताना कोमल शब्द वापरा. कठोर शब्दांनी माणसं दुरावतात।।।* *नम्र रहा, आणि लवचिक बना...।* *तुम्ही आयुष्यात नेहमीच यशस्वी व्हाल...।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय केले आहे हे आपण जिथे नोंद करुन ठेवलेली असते.त्यात काल,आज आणि उद्या या तिन्ही काळाचा उलगडा केलेला असतो.आपण आपल्या जीवनात कसे वागलो आहोत त्याचीही नोंद केलेली असते.कधी आपल्याला विस्मरण झालेले असेल तर ते स्मरण करुन देण्याचे काम ती करते.आपण किती खरेखोटे जीवनात इतरांशी बोललो किंवा वागलो त्याचाही हिशोब ती आपणच नोंदवलेल्या शब्दांत आपल्यासमोर आरशासारखे काम करते.ती एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली असते.तिला आपण कधीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरु शकत नाही.एवढे प्रेम ती आपल्यावर करते आणि आपण तिच्यावर करतो.ती आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरणा देते आणि आपल्या जीवनाला तिला पाहून, वाचून सावरतो अशी प्राणप्रिय वस्तू म्हणजे डायरी अर्थात आपली रोजनिशी.जी माणसे जीवनात खरे यशस्वी होतात ती आपल्या जीवनात घडलेल्या, घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या घटनांची सत्यतेची नोंद करतात आणि त्यासाठी ती डायरी अत्यंत मोलाचे काम करते.तीच आपल्यासाठी कोणत्याही काळात न बदलणारी,सत्य उलगडून आपल्यातील दोष दूर करण्यासाठी जाणीव करून देणारी खरी मैत्रीण असते ती आपल्या जीवनात असायलाच हवी नाहीतर आपल्या जीवनातले दुसरे कोणीही एवढे काम करणार नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 📚📝📚📝📚📝📚📝📚📝📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *न्याय* लोकांचे धान्य दळून देणार्या एका माणसाने एके दिवशी आपल्या धान्याच्या टोपलीत एक उंदीर पकडला व त्यास आपल्या आवडत्या मांजरास खाऊ घालण्याचा विचार केला. त्यावेळी तो उंदीर दीनवाणें तोंड करून त्याला म्हणाला, 'बाबारे लोकांचं धान्य चोरावं हा माझा धंदा नाही.' लोकांच्या घरातून मी जे अन्न घेतो, ते केवळ पोटापुरतेच घेतो,' ही सबब ऐकून तो माणूस म्हणाला, 'अरे, मी तरी तुला जी शिक्षा करणार आहे, ती सार्वजनिक हितासाठीच करतो आहे. कारण तुझ्यासारख्या चोराला शिक्षा करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे,' हे ऐकून उंदीर म्हणाला, 'बरं तर, तू आणि मी दोघंही एकाच वर्गात मोडतो याचा विचार कर. आपण दोघेही धान्यावरच आपला चरितार्थ चालवतो. अंतर इतकंच की दळायला आलेल्या धान्यातला एक दाणा जर मी चोरला तर त्यातले हजार दाणे तू चोरतोस.' तो माणूस रागावून त्यावर म्हणतो, 'प्रामाणिक माणसाने शांतपणे ऐकून घेण्याजोगे हे तुझे बोलणे नाही.' व लगेच त्याने त्या उंदरास आपल्या मांजरीस देऊन टाकले. तात्पर्य - ज्या व्यंगाबद्दल आपण दुसर्यास नावे ठेवतो, तेच व्यंग आपल्या अंगी आहे असे दाखवून दिले, तर त्याचा आपल्याला राग येतो, पण हा काही न्याय नव्हे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/01/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन* 💥 ठळक घडामोडी :- १८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले. २००४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली. 💥 जन्म :- १९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री १९३७ - सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १८५१ - दुसरे बाजीराव पेशवे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला चार दिवस उलटून गेल्यानंतर अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला आहे. आज सकाळी किंवा दुपारपर्यंत खातेवाटप होईल अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर पाचव्या दिवशी खातेवाटप होणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आमदार आणि आयएएस अधिकाऱ्यांना पगार न देता ते पैसे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावेत, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पनवेल-वसई-विरार असा हा नवीन रेल्वेमार्ग असून यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला आहे. यासाठीच्या 997.88 कोटींच्या खर्चाला नीती आयोगाने मंजुरी दिली असून आता फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पिंपरी चिंचवडमधील सह्याद्री भुजबळ या चिमुकलीने सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेला दिसता क्षणी अंगावर काटा आणणारा तीन हजार फूट उंचीवरचा लिंगाणा किल्ला केला सर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *म्हाडाच्या कोकण मंडळाची ६,१३६ घरांची लॉटरी, जाहिरात लवकरच; माणकोली-भिवंडी, घणसोली, वसईतील घरांचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *शिवभोजन' योजनेची २६ जानेवारीपासून राज्यभर अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिलेत. आज मंत्रिमंडळ बैठकीत 'शिवभोजन' योजनेचा आढावा घेतला. २६ जानेवारीपासून योजनेची राज्यभर अंमलबजावणी सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पुण्यात महाराष्ट्र शासनाच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या 63 व्या पर्वाचं बिगुल आज वाजलं,पहिला दिवस पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पैलवानांचा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी :- कल व अभिक्षमता चाचणी म्हणजे काय याविषयी श्री बालासाहेब कच्छवे विभागीय समुपदेशक, एस एस सी बोर्ड लातूर यांचे मार्गदर्शन आज आकाशवाणी नांदेड केंद्रावरून आज सायंकाळी 06:30 वाजता गंमत जंमत या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नमस्कार, मी नासा येवतीकर माझी डिजिटल साहित्य आणि प्रकाशनविश्वातील स्टोरीमिररच्या (https://storymirror.com) स्टोरीमिरर ऑथर ऑफ द इयर अवार्ड 2019 या सर्वोच्च पुरस्कार आणि मान्यतेसाठी माझे नामांकन झाल्याचे कळविताना खूप आनंद होत आहे. हा पुरस्कार जिंकण्यासाठी मला आपली मदत हवी आहे. कृपया खालील लिंकला भेट द्याः https://awards.storymirror.com/author-of-the-year/marathi/author/abz2baot आणि माझ्या नावाखालील वोट या बटनावर क्लिक करा. मला वोट करण्यासाठी तुम्हाला स्टोरीमिररच्या वेबसाईटवर लॉगीन करावे लागेल. कृपया वोट करा आणि हा पुरस्कार जिंकण्यासाठी मला मदत करा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *!! शाळा आमुची लाडकी !!* शाळा आमुची लाडकी चित्रे भिंतीत बोलकी शिकविति ज्ञान वाढविती मान पुस्तक आमचा दोस्त ज्ञान देतो मस्त पटकन सोडु गणित करुनी पाढे पाठ इतिहास आमुचा छान एकतो आम्ही देऊन कान मराठीची कविता छान सूरात करू गान भूगोलाचा तास भारी ग्रह चक्कर मारी विज्ञानात प्रयोग खरा रसायनांचा मोठा मारा जाऊन रोज शाळेत खेळू हो मजेत करू अभ्यास वर्गात राहू आम्ही मजेत काव्यरचना - संदिप नानासाहेब वाकडे रा. खेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद 📲9766992776 *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री कोण आहेत ?* अमित देशमुख 2) *महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत ?* अनिल देशमुख 3) *महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत ?* अजित पवार 4) *रमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ?* विनोबा भावे 5) *भारतातील सर्वात मोठा लोहपोलाद प्रकल्प कोणता ?* बोकारो ( झारखंड ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी डिगोळे, सहशिक्षक, अहमदपूर 👤 अंकुशराजे जाधव 👤 माधव बोइनवाड, येवती 👤 चंद्रभीम हौजेकर, पत्रकार, धर्माबाद 👤 राजेश कुकूटलवार 👤 निलेश आळंदे 👤 माधव सूर्यवंशी, मुंबई 👤 फरीद शेख 👤 योगेश बलकेवाड 👤 श्रीपती सुरवसे 👤 धनंजय रेड्डी यलगट्टे 👤 साईप्रसाद पुलकंठवार 👤 धीरज चामे, साहित्यिक *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.* *तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *वेळ कुणाची वाट बघत नाही.आलेली संधी आणि वेळ एकदा हातातून गेली की तिला परत मिळविण्यासाठी* *अजून तरी कुठली व्यवस्था नाही.* *आपले व्यक्तिमत्त्व फुलवायचे असेल तर आपल्यातल्या सुप्त शक्तींना ओळखा, त्यांना जागा करून घ्या.* *आणि व्यक्तिमत्त्व प्रसन्न करा.* *बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात.* *आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत* *असते. आणि मग आजच्या ह्या* *स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात.* *वैयक्तिक समुपदेशन करून घेतात,* *धार्मिक प्रवचने ऐकतात,* *योगसाधना करतात, फिट* *रहावे म्हणून जिमखान्यात* *जातात, आकर्षक दिसण्यासाठी* *मेक-ओव्हर करून घेतात.* *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारिरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* *आपले मन,मनगट आणि मेंदू* *विकसित करण्यासाठी या सर्वांना मानसिक,शारीरिक, आणि सामाजिक* *स्वास्थ्याची गरज आहे.त्यांना पोषक ठरेल असे* *वातावरण तुम्ही स्वतःच निर्माण करू* *शकतात.तूच आहे तुझ्या* *जीवनाचा शिल्पकार.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• लेखक म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारा कलाकारच आहे.तो आपल्या बुध्दीने आणि लेखणीने सर्व कलाकारांना कला सादर करण्यासाठी प्रेरणा देतो.वाचक,नट, दिग्दर्शक,संगीतकार अशा कितीतरी लोकांना आपल्या लेखणीतून जसे पाहिजे तसे आविष्कार सादरीकरण करण्यासाठी त्यांना संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करुन देतो.एवढेच नाही तर सर्व नवरसांचे केंद्र जर कुणाकडे असेल तर ते देखील लेखकाकडेच असते.म्हणून लेखक असणे आणि होणे म्हणजे ईश्वराच्या नंतरची जी भूमिका साकारणारी व्यक्ती असेल तर ती लेखन करणारी लेखक मंडळीच आहे.अशा चतुरस्त्र आणि अष्टपैलू लेखकांना समाजामध्ये एक आगळेवेगळे स्थान आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विश्वासघात करणे महापाप* एका लोककथेनुसार राम नावाच्या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्या घोड्याची काळजी घ्यायचा. त्यामुळे त्या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्या एका घोड्याच्या व्यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्याचे कारस्थान रचले. शामने रामच्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्हा शाम जोरजोराने विव्हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला. शाम रामला म्हणाला,’’मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्या गावापर्यंत नेशील का,’’ रामला त्याची दया आली, त्याने त्याला घोड्यावर बसविले, आणि स्वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्हणाला,’’ अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्यावे लागले.’’ यावर राम शांतपणे शामला म्हणाला,’’ मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्ट ऐकल्यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्वासघात करणे महापाप आहे’’ तात्पर्यः- मदत करावी पण खरोखरच गरज असेल तरच.कारण एखाद्या गरजूला मदत करण्यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते. खोटे सोंग घेऊन मदत मागणे चुकीचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/01/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ऑक्युपेशन थेरपी दिन* *सावित्रीबाई फुलेजयंती* *बालिका दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● १९५० - पुणेयेथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन. ● १९५२ - स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका. ● १९५७ - विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात. 💥 जन्म :- ● १८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी. ● १८८८ - कागदी स्ट्रॉचा वापर सुरू. ● १९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक. ● १९२२ - चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक. ● १९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक. 💥 मृत्यू :- ●१९७५ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी. ● १९८२ - अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता. ● १९९४ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक. ● १९९८ - केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी. ● २००१ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी. ● २००२ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती. ● २००२ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ. ● २००५ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पोलिसांना सर्वोत्तम प्रशिक्षण अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिनी आयोजित संचलन समारंभात बोलत होते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही, रोटेशन पद्धत असल्यानं प्रस्ताव नाकारल्याचं स्पष्टीकरण, तर विरोधकांच्या राज्यांना डावलल्याचा सुप्रिया सुळे यांचा आरोप, केंद्र सरकार राजकारण करत असल्याची संजय राऊत यांची टीका * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *14 एप्रिल 2022 पर्यंत इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार, स्मारक स्थळाला भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बीडमध्ये सुरेश धस गटाच्या पाच सदस्यांचा मतदानाचा अधिकार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नाकारला, बीड झेडपीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा सस्पेन्स वाढला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विदर्भ आणि मराठवाड्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा, ज्वारी, गहू, कापसाचं मोठं नुकसान, दुष्काळ, अतिवृष्टीनंतर अवकाळी आणि गारपिटीनं शेतकरी देशोधडीला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ **आज ठाकरे सरकार मंत्रिमंडळाचे खातेवाटप होण्याची शक्यता, तर राष्ट्रवादीत गृहमंत्रिपद नको म्हणणारेच जास्त : शरद पवार यांचे प्रतिपादन** ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच कडून ज्ञानदीप 2020 ई विशेषांकाचे राज्याध्यक्ष श्री नटराज मोरे, साहित्यिक तथा कवी श्री व्यंकटेश चौधरी आणि जिल्हाध्यक्ष श्री रमेश मुनेश्वर यांच्या हस्ते झाले ऑनलाईन प्रकाशन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रासंगिक लेख *मी सावित्री बोलतेय* नमस्कार ..... मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले, माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक नासा येवतीकर 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सावित्रीबाई* पहिल्या शिक्षिका आहेत सावित्रीबाई, त्या आहेत आम्हा सर्वांच्या आई... सावित्रीबाईंनी काढली मुलींसाठी शाळा, मुलींनाही लागला मग शाळेचा लळा.. सावित्रीबाईंना अनेकांनी दुखावले, तरीही त्यांनी मुलींना मात्र शिकवले... सावित्रीबाईंचे आडनाव होते फुले, त्यांना आवडायची शाळेतली मुले... महात्मा जोतिबा फुले होते त्यांचे पती, त्यांना वाटायची नाही कोणती भीती... मी त्यांच्या कार्याला करते सलाम, सावित्रीबाईंना कोटी कोटी प्रणाम.. -● अक्षदा नामदेव उंडे वर्ग-चौथा जि.प.प्रा.शाळा रायपूर ता.सेलू जि.परभणी *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वत:शी प्रामाणिक असलेला माणूस स्वत:च एक खणखणीत नाणं असतो. ~ वपु काळे | इतर *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'बालिका दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 3 जानेवारी 2) *'बालिका दिन' कोणत्या वर्षांपासून साजरा केला जातो ?* 1995 3) *'क्रांतीज्योती' म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ?* सावित्रीबाई फुले 4) *सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला ?* 3 जाने.1831 ( नायगाव, सातारा ) 5) *महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ?* सावित्रीबाई फुले *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ज्ञानेश्वर विजागत, सहशिक्षक, सोलापूर 👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद 👤 रतन बहिर, भीर, महाराष्ट्र 👤 शुभांगी परळकर, नांदेड 👤 माधव पवार, पत्रकार, नायगाव 👤 संदीप जाधव, देगलूर 👤 प्रशांत बोड्डेवाड, येवती 👤 वीरेंद्र डोंगरे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उतारवयात शारिरीक कष्टाची कामं कमी करावीत; परंतु आपला अनुभव, कौशल्य तुम्हाला जिथे वापरता येईल, अशी कामं शोधावी. पैशासाठी, पोटासाठी संसारासाठी करावी लागणारी कामं सोडून अन्य पद्धतीने समाजजीवनात भाग घ्यावा. यामुळं जीवनात काहीतरी नवीन केल्याचं समाधान मिळतं. तोच-तोच पणातुन येणारा कंटाळा कमी वहायला लागतो. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर , दररोज नव्या पाटीवर सुरूवात केली तर दररोजच तुम्ही नव्यानं जन्माला आला आणि जगला असं होईल. माझे अनेक वयानं ज्येष्ठ मित्र आहेत. नोकरीत असेपर्यंत ते साठीपर्यंत ठणठणीत असतात; पण निवृत्त झाल्यावर एक-दोन वर्षातच १५-२० वर्षांनी वृद्ध झाल्यासारखे दिसतात.* *माणसानं स्वत:ला मोडीत काढणं ही मानसिक प्रक्रिया सगळ्यात वाईट आहे. यामुळेच हे असं होतं. मी कुचकामी झालो, हे एकदा मनाला स्वत: सांगितलं की माणूस म्हातारा व्हायला लागतो. त्यामुळे सर्वांना सांगणे आहे की, 'द मोमेंट यू रिटायर, यू मस्ट री-टायर.' म्हणजे तुम्ही तुमचे टायर बदलून पुन्हा नव्या जोमाने नव्या कामाला लागलं पाहिजे. आतापर्यंत जे काम करत होता ते जमत नसेल तर, तुम्हाला जमू शकेल असं काम शोधा आणि काम करत रहा. काम करत राहिल्यानेच माणसं सक्षम रहातात. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने स्वत:च्या अमृत महोत्सवात बोलताना सांगितले की, 'मी ज्येष्ठ झालोय, म्हातारा नाही. आणि तरूण पिढीच्या खांद्याचा आधार घेऊन त्यांच्याशी बौद्धिक स्पर्धा करीतच राहणार आहे. 'माझ्यासाठी हाच 'कर्मसिद्धांत'आहे. आजच्या नवीन वर्षात आपणही कर्मसिद्धांताचा हाच 'संकल्प' करू या.* *॥ रामकृष्णहरी ॥* ⚡💥⚡💥⚡💥⚡💥⚡ *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *आत्महत्येचा कड्यावर ती उभी होती,* *कित्येक स्वप्नांचा अपेक्षाभंग करून तिने प्रत्येक श्वासातून दिनदलितांच्या मुलींना शिक्षणाची कवाडे खुली* *करून दिली.त्यांचे* *जीवन फुलविले.त्या सावित्रीबाई फुले यांना जन्मदिनी* *मानाचा मुजरा करतो.* *पुन्हा या सावित्रीच्या रूपाने एखादा पुरुष या वारश्याला आधुनिक फुलेंच्या रूपाने आज बघितला तर* *नवल वाटणारच.* *हो हा आधुनिक भगीरथ म्हणजे अधिक कदम हो अधिक कदमच.* *आयुष्यात एखादं वादळ आलं की* *सर्वकाही बिघडून जाते असे* *म्हणतात....!* *पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी* *आयुष्यात एखाद्या वादळाचं येण गरजेच असतं....* *आरोग्य, शिक्षण, अनाथांचे पुनर्वसन आणि महिला सक्षमीकरण...हे* *वरकरणी सरकारी* *भासणारे प्रकल्प, परंतु* *प्रत्यक्षात काश्मिरातील काश्मीर व्हॅली येथील एका स्वयंसेवी संस्थेचा हा* *अजेंडा.हा ध्येयवेडा* *हाती झेंडा घेऊन आजही* *मरणाच्या खाईतून* *मार्गक्रमण करत आहे.* *राज्यशास्त्राचा अभ्यास करणारा १९ वर्षांचा पुण्यातला s.p. कॉलेजचा* *एक तरुण* *काश्मीरमधली खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी तिथे जातो काय, तिथल्या* *अनाथ मुलांची परवड पाहून व्यथित होतो काय* *आणि तिथेच राहून या उद्ध्वस्त मुलांचे आयुष्य सावरण्यासाठी 'बसेरा* *ए तबस्सुम' अर्थात आनंद* *निवास उभारतो काय, हे* *सगळेच अनाकलनीय. तेथील* *दहशतवाद्यांचा दररोज सामना करत अनाथ मुलींचा सांभाळ म्हणजे जणू* *मृत्यूशी लपंडाव खेळण्यासारखेच. काश्मीरचा* *निसर्गरम्य प्रदेश भारताला हवा आहे, पण तेथील लोकांचे काय? ते* *देशवासीयांना आपलेसे वाटतात का, या प्रश्नाने अधिक कदमला* *भंडावून सोडले आणि त्याने काश्मिरात राहून अनाथ* *मुलांसाठी काम करण्यास प्रारंभ केला. अधिक हा मूळचा श्रीगोंदा* *येथील एका शेतकरी कुटुंबातला. घरची परिस्थिती बेताची. १९९०च्या* *दशकात* *काश्मीरखोऱ्यात अस्थिरता शिगेला होती. त्याच सुमारास अधिक पुण्यात* *महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याच्या* *मित्रांमध्ये काश्मिरातील पंडित आणि मुस्लिमांचा समावेश* *होता. त्यांच्यातील वादांमुळे अधिकने काश्मीरमध्ये जाऊन वास्तव समजून* *घेण्याचा प्रयत्न केला. दहशतवादाबरोबरच आर्थिक* *प्रगतीची बंद कवाडे, भ्रष्टाचार आणि सरकारी अनास्था* *यामुळे काश्मिरातील अनाथ मुलांचे भवितव्य अंधारमय राहणार याची* *जाणीव त्याला झाली.येथील 14 ते 15 वर्षाचे मूल जेव्हा मानवी* *बॉम्ब बनून जनतेचे चिंधडे उडवीत,हे पाहून त्याचे मन* *हेलावून गेले. ही* *परिस्थिती बदलण्याच्या तळमळीतून 'बॉर्डरलेस र्वल्ड फाउंडेशन'चा जन्म* *झाला.* *जातीभेदाच्या भिंती उखडून अनेक संकटांचा सामना करत 22 वर्षांपासून* *अविरत संघर्ष करीत आज त्याने 250 अनाथ मुलींचा* *आश्रम सजविला. त्या अनेक* *जिल्ह्यात उच्च शिक्षण घेत आहे.* *अतिरेक्यांच्या तावडीतून अनेक वेळा प्राण वाचवुन सुद्धा तो* *मागे फिरला नाही.आज येथील* *लोकांचा शहेनशहा बनलेल्या* *अधिक कदमला मानाचा* *मुजरा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बोलणारी आणि बोलण्याप्रमाणे कृती करणारी व्यक्ती ही अतिशय संवेदनशील आणि कर्तव्यतत्पर समजली जाते. अशा व्यक्ती फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. अशा व्यक्तींच्या सहवासात राहिले तर आपल्यातील आळशीपणा आणि कामामध्ये टाळाटाळ करण्याच्या वृत्तीला लगाम घातल्या जाऊन आपल्यामध्ये सुप्त असलेल्या क्रियाशिलतेला अधिक प्राधान्य मिळते व जीवनात चांगले जीवन जगण्यासाठी योग्य दिशा मिळते. © व्यंकटेश काटकर नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्त्री स्वतःच पूर्णरुप !* ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर आणि पत्नीला सोडले, त्याच रात्री त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याची बातमी जेव्हा तिला समजली तेव्हा ती उध्वस्त झाली. पण तिने कुणाकडे ही तक्रार केली नाही. आणि जग ज्याच्याकडे अभिमानाने पाहिल, अशा पद्धतीने मुलाला वाढविण्याचे तिने ठरवले. सोडून गेलेल्या पतीला विसरून तिने नवे आयुष्य सुरु करावे,असे तिला सर्वांनी सुचवले. दुसरे लग्न करण्याची गळ घातली, तिने त्यास नकार दिला. आणि एका सुंदर सकाळी......... ते परत आले आणि तिच्या समोर उभे राहिले. तिने शांतपणे त्यांना विचारले, "आता तुम्हाला लोक 'बुद्ध 'म्हणून ओळखतात ना?" त्यांनी ही तितक्याच शांत पणे उत्तर दिले, "होय, मी देखील तसे ऐकले आहे. " तिने पुढे विचारले, "त्याचा अर्थ काय?" "जगण्याचा अर्थ कळला आहे, अशी व्यक्ती !"तेम्हणाले. ती किंचितशी हसली आणि मग शांत बसली. काही वेळाने ती म्हणाली, "आपण दोघेही काहीतरी नवे शिकलो आहोत, असे मला वाटते. तुम्ही जे शिकला आहात, त्यातून हे जग सम्रुद्ध होईल पण मी जे शिकले आहे, ते फारसे जगापुढे येणारच नाही." बुद्धांनी तिला विचारले, "तू काय धडा शिकलीस ?" तिचे डोळे चमकले. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. "तो धडा म्हणजे धैर्य! स्त्रीला उभी रहाण्यासाठी कुणाचीही गरज लागत नाही. तिचे स्वतःचे व्यक्तिमत्व हे परिपूर्ण असते. ती न डगमगता कोणत्याही परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते. " यशोधरेतील 'स्त्री'ला मनापासून नमस्कार ! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙍बालिका दिन🙍* 📚📚📚📚📚📚 स्त्री शिक्षणाची दारे फुले सावित्रीमायीने उघडली अनेक दुःख यातना कष्ट सोसूनी धडे तिने गिरवली ज्योतिबाची साथ सावित्रीमायीस लाभली आणि पुण्यात पहिली शाळा मुलींची उघडली अज्ञान अंधःकार नाहीसा तिने केला,अनिष्ट चालीरीती रुढी प्रथांचा प्रतिकार तिने करुन शिक्षणाचा प्रसार केला जाणून घेऊ बालिका दिनाचे महत्त्व, समजून घेऊ सावित्रीमायीचे तत्त्व सदैव ध्यानात ठेवू आपण जीवनात शिक्षणाचे महत्त्व ज्योतिबा सावित्रीचा वसा पुढे पुढे आपण चालवूया आधुनिक सावित्रीला तंञस्नेही माञ बनवूया. 〰〰〰〰〰〰 ✍प्रमिला सेनकुडे तालुका हदगाव जिल्हा नांदेड. 📚📚📚📚📚📚
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/01/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९५५ - पनामाच्या राष्ट्राध्यक्ष होजे अँतोनियो रेमोनची हत्या. ● १९५९ - सोवियेत संघाने लुना १ या अंतराळयानाचे चंद्राकडे प्रक्षेपण केले. ● २०००-संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे हस्ते प्रकाशन. ● १९९८-डॉ सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट.पदवी प्रदान. ● १९५४-भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी 'भारतरत्न'पुरस्काराची स्थापना केली. 💥 जन्म :- ● १९५९ - किर्ती आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९६० - रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९४६ - ज्यो डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. ● १९९५ - सियाद बारे, सोमालियाचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 19 रुपयांची वाढ, मेल आणि एक्स्प्रेसच्या प्रवासी भाड्यात कालपासून वाढ, तर रेल्वेची भाडेवाढ लोकल प्रवासाला लागू नाही * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *खातेवाटपावर चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच, दोन महत्वांच्या खात्यासाठी काँग्रेस आग्रही, तर मतभेद नसल्याचा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा दावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जानेवारी ते डिसेंबर 2019 या वर्षात साईंच्या दक्षिणा पेटीत 156 कोटी 49 लाख 2 हजार 350 रुपयांचे गुप्तदान झाले आहे, गेल्या वर्षभरात साईंच्या झोळीत 290 कोटींचं दान, तीन कोटींची वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत, देवदर्शनानं नववर्षाची सुरुवात करण्याचा नवा ट्रेंड, शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूर, गणपतीपुळे भाविकांनी फुललं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विजय मल्ल्याची जप्त केलेली संपत्ती लिलावाद्वारे विकून कर्जाची रक्कम वसूल करा ; मुंबईतील पीएमएलए कोर्टाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *केंद्र सरकारनं चांद्रयान-3 ला मंजुरी दिली असून यावर काम सुरु असल्याची माहिती के. सिवन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ट्रायने जारी केलेल्या नव्या आदेशांनुसार आता १३० रुपयांमध्ये २०० चॅनेल्स पाहता येणार, आतापर्यंत १३० रुपयांमध्ये १०० चॅनेल्स पाहता येत होती. आता ती दुप्पट होणार आहे. १ मार्चनंतर याची अंमलबजावणी होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बाल कविता - चांदोबा* - राधिका बापट, डोंबिवली चंदेरी पांढरा गोल आकाशामधे असतो चांदोबा रे चांदोबा हा छान छानच दिसतो..१ पौर्णिमेच्या रात्री नभी संपूर्ण रुप साकार रोज तुझा रे बदले असा कसा हा आकार ?..२ चमचमत्या चांदण्या करतात लुकलुक तूच तेजस्वी सर्वात म्हण त्यांना.. टुकटुक..३ मामा..येतो भेटायला मी यानामधे बसून दाखवशील ना नक्की फक्त एकदा हसून..४ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रेवदंडा ( अलिबाग ) येथे होणारे 33 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष कोण ?* डॉ राजू कसंबे 2) *भारताचा पहिला व्हाइसरॉय कोण ?* लॉर्ड कॅनिंग 3) *सर्वाधिक उत्पन्न होणारे भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे पीक कोणते ?* गहू 4) *साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इ. क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त किती सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभेवर करू शकतो ?* 12 5) *'दि कॉल ऑफ स्पॅरो' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?* डॉ सलीम अली *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संदीप ढाकणे, साहित्यिक, औरंगाबाद 👤 मो. विखार, शिक्षक, धर्माबाद 👤 कविता जोशी, शिक्षिका 👤 साईनाथ ईबीतवार पांचाळ, येवती 👤 महेंद्रकुमार पद्मावार 👤 मोगरे शंकर 👤 श्रीकांत काटेलवार 👤 आनंदराव धोंड 👤 गणेश दहिफळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.* *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *समाजाच्या वास्तव परिस्थिती लक्षात घेता काही गोष्टी अर्जंट पाहिजेत.* *एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,* *जो एकमेकांशी न* *बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये पुन्हा* *एकदा कनेक्शन जोडून देईल,* *एक ऑप्टिशियन पाहिजे,* *जो लोकांची दृष्टी आणि* *दृष्टीकोन नीट करून देईल* , *एक कलाकार पाहिजे,* *जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित* *हास्ययाचे रेषा रेखाटू शकेल* , *एक बांधकामगार पाहिजे,* *जो दोन शेजाऱ्यांमध्ये* *उत्तम सेतू उभारू शकेल,* *एक माळी काका पाहजे,* *जो चांगल्या विचारांच* *रोपण करू शकेल,* *एक प्लंम्बर पाहिजे,* *जो तुंबलेल्या मनांना* *मोकळं करू शकेल,* *एक शास्त्रज्ञ पाहिजे,* *जो एकमेकांबद्दलची* *ओढ शोधू शकेल,* *आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,* *एक शिक्षक पाहिजे,* *जो एकमेकांशी संवाद कसा* *साधायचा ते शिकवू शकेल,* *आज सर्वांना* *याचीच नितांत गरज आहे..!!* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परमेश्वराने आपल्याला या जगात इतर जीवापेक्षा वेगळा जीव जन्माला घालून काहीतरी आपल्या हातून चांगले कृत्य घडावे म्हणून पाठवले आहे.मनुष्यजन्म हा इतर जीवजन्मापेक्षा सर्वश्रेष्ठ जन्म आहे हेही आपण नाकारू शकत नाही.कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या हातून काहीतरी सत्कृत्य घडावे,इतर जीवांना आपण आपल्यासारखाच जीव मानावा,त्यांची अवहेलना करु नये, संकटकाळी त्यांच्या मदतीला धावून जावे,आपण जशी सुखासाठी धडपड करत असतो मग इतर जीवांना का दु:ख द्यावे.परमेश्वराने सगळ्याच जीवांना समान जीव देऊन स्वतंत्रपणे जगण्यासाठी स्वातंत्र्य दिले आहे त्यांचे स्वातंत्र्य आपण हिरावून घेऊ नये ही भावना आपल्या अंत:करणात सतत ठेवून जगायला शिकले पाहिजे,केवळ आपल्या स्वार्थासाठी जगणे नाही तर इतरांसाठी जगणे हा सर्वात मोठा उद्देश आपल्या मनुष्यजन्माचा आहे हे आपण लक्षात ठेऊन मनुष्यजन्माचे सार्थक करावे.ही मनुष्यजन्माची संधी पुन्हा प्राप्त होणार नाही.म्हणून मनुष्य जन्माला विशेष महत्त्व आहे.या चांगल्या, सुंदर जन्माला कलंक लागू न देता जीवन जगायला शिकले पाहिजे तरच परमेश्वराने आपल्याला दिलेल्या मनुष्यरुपी प्रतिनिधींचे कार्य पूर्ण झाल्याचे समाधान वाटेल.नाही तर " आला जन्माला आणि गेला वाराला " असेच होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🌹🍃🍂🌹🍂🍃🌹🍃🌹🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सहकार्याची भावना जागृत होणे* एका गावात _एक पोस्टमन_ पत्रवाटप करायचा. एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, *"पोस्टमन ssssss"* आतून एका मुलीचा आवाज आला,. *"जरा थांबा, मी येतेय.."* दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, *"कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे.."* आतून मुलीचा आवाज आला, *"काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा,मी नंतर घेते.."* पोस्टमन, *"तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल."* पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. _दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !! दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती._ काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला. असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली.. तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज _पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय._ ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर _दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले._ नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन _एक सुंदर चप्पल_ जोड खरेदी केली. रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे _"दिवाळी पोस्त" (म्हणजे बक्षिशी)_ मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? _बिचारीवर आधीच अपंगत्वाचे दुःख आहे._ पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा" घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून _त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले._ दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, " मला फंडातून कर्ज हवे आहे" साहेब म्हणाला, "अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ? पोस्टमन म्हणाला, "मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत." साहेब : "पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी? पोस्टमन म्हणाला "साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे "अनवाणी" दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे." _साहेबासह सर्व स्टाफ निशब्द !! सारेच गहिवरलेले!!_ *तात्पर्यः* नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही. तर नात्याची भावना रक्तात असावी लागते. ती ज्याच्या अंगी, (मग भले ही तो कुटुंबातला नसला तरी) तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)