सुट्टीउपक्रम - स्वंयअध्ययन
उपक्रम २ -
शब्द वाचूया, क्रमाने लावूया.
साहित्य - वर्णमालेच्या गटानुसार शब्द असलेले शब्द कार्ड.
कृती - विद्यार्थ्याने एक कार्ड घ्यावे.
त्यावरील शब्द वाचावेत आणि लिहावेत. लिहिलेले शब्दवर्णमालेच्या क्रमाने पुन्हा लिहावेत.
जसे - शब्द कार्ड
१. खटारा ,घरटे ,गवत ,कमळ
शब्द वर्णमालाक्रमाणे
कमळ ,खटारा, गवत ,घरटे
कार्ड बदलून सराव द्यावा.
*नमुना कार्डे*
१) चरखा जहाज झगा छत्री
२) टपालपेटी ढग डब्बा ठसा
३) तबक दरवाजा धनुष्य थवा नळ
४) परात भटजी मगर फणस बदक
〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिला सेनकुडे
No comments:
Post a Comment