हुरहुर
पशु,पक्षी,प्राणी, माणसही
जीवन हे सगळेच जगत असतात
मेल्यावरही पुरतात आणि जळतात
पण मरूनही काही कायम उरतात
निस्वार्थीपणाचा संकल्प मनात ठेवून
जनसेवे जीवन आपुले झिजवितात
मानवी कल्याण जे साधतात
तेची जगी स्मरणात राहतात
चांगली वागणूक, चांगला विचार
सोडून खऱ्या अर्थाने जे जातात
आपण मागे काहीतरी केल्याची
हुरहुर जनास देऊन जातात.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
No comments:
Post a Comment