*रोज एक लेख लिहिण्याचा अनुभव* *"साहित्याच्या भूमिवर मी* *पेरली शब्दांची बिजं,* *रोज एक लेख लिहूनी* *फुलवली शब्दांची बाग”* लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की, त्याचं सोनं होतं असं म्हणतात. तसंच आपल्या जीवनाला शब्दांचा स्पर्श झाला की त्याचेही शब्दरूपी सोन होईल. आणि असा परीस मला साहित्य रूपातून आदरणीय येवतीकर सरांच्या रूपाने मिळाला आहे. साहित्य सेवक असलेले येवतीकर सर त्यांचे अनेक लेख, इ बुक, पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. दुसऱ्यांच्या भल्यासाठी झिजाव कसं? दुसऱ्यांना मोठे कसे करावे ? प्रामाणिकपणे आपण आपले काम कसे करावं. हे सर्व त्यांच्या मध्ये असलेले आदर्श गुण पाहायला मिळतात.असे साहित्याची आवड असणारे नासा सरांचे खूप खूप अभिनंदन. *'नादर साहित्य' लिहीत* असलेले नासा सर. साहित्य सेवक समूह तयार करून नासा सरांनी आमच्यासारख्या नवशिक्यांना लेखनाची संधी उपलब्ध करून दिली. रोज एक नवा लेखाचा विषय देऊन सर्व साहित्यिकांना प्रेरित करून प्रोत्साहन देऊन लिहिण्यास प्रवृत्त करत होते. ते पण दहा ते पाच या वेळेतच. म्हणजे बघा वेळेचेसुद्धा पालन करून वक्तशीरपणा सुट्टीच्या काळातही ठेवला. खरं तर लाॕकडाऊन सुरू होता. आपला वेळ कसा जाईल घरातल्या घरातच राहून किती कंटाळवाणे होऊ ही कल्पनाच न केलेली बरी. परंतु अशा या परिस्थितीत नासा सरांनी लेखणीचे कार्य सुरू ठेवले माझ्यासारख्या सर्वांना प्रवृत्त केले. मी हा समूह जॉईन केला तेव्हा पाच लेख पूर्ण झाले होते. त्यानंतर मी समूहात आले. पहिल्याच आठवड्यात माझा फक्त एकच लेख लिहिला गेला. परंतु त्यानंतरच्या आठवड्यापासून मी सतत आज पर्यंत *(41)* लेख लिहिले. माझ्या लेखनिस बहर मिळाली ते सरां मुळेच.माणसाला आवड असली की सवड मिळते आणि सवड काढून मी रोज (प्रत्येक आठवड्यात) सात लेख लिहायचे आणि आठवड्याचे मानकरी व्हायचे ही पर्वणी माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली. उद्या कोणता विषय मिळेल हे ही मी स्वतःच्या मनाला विचारत असे. मी शब्दांच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचले. माझ्या जीवनाचा हा शब्दकमळांचा मळा फुललेला पाहून माझ्या मनाच्या गाभार्यात शब्दांच्या अंतरंगातील अर्थ सौंदर्याचा सुगंध सुटला आहे. माझं मन त्या शब्द सुगंधाने धुंद झालेलं आहे. आता त्या शब्दांशी माझी मैत्री जमली आहे. ही शब्दांची मैत्री कधीच न तुटावी आणि हा साहित्याचा समूह कधीच न बंद व्हावा .असे मला मनोमन वाटते. शब्दाचे हे दालन कधीच न संपावे, व बहरलेल्या लेखणीचे सामर्थ्य त्यातून फुलावे.व मला साहित्य सेवेची सदैव पुजा करण्यात यावी.हीच आशा मनी ठेवून ह्या फुलवलेल्या शब्दमळ्याचे दालन सर्व वाचकप्रेमींना वाचण्यासाठी मिळावे हीच सदिच्छा. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment