*शाश्वती*
दिलखुलास व्यक्त होऊन
बोलून जगावं माणसानं
जगण्याची शाश्वती नसतानाही
मनमुराद जगावं माणसांन
धुमसणारे दुःख मनातलं
सांगून जगावं माणसानं
अश्रु डोळ्यातले ओघळणारे
पुसून जगाव माणसानं
यश मिळाले नाही तरी
जीत मानुनी जगाव माणसानं
हरुनही जिंकता येतं
जीवनाच हे गमक जाणाव माणसांन
वाट्यास आलेले सुख-दुःख
जाणुनी हसून जगावं माणसांन
शेवटी मृत्यू हे अटळ आहे
हे सत्य जाणून जगावं माणसांन
✍प्रमिलाताई सेनकुडे.
छान
ReplyDelete