जगास या प्रेमाने जिंकुया
ध्येय,चिकाटी,ह्दयी रुजवुया
मायेच्या शांतीने मनास सजवूया
दरवळेल सुगंध जीवनी तुमच्या
जगास या प्रेमाने जिंकुया
एकीची, शांतीची बाग फुलवूया
नेकीची, प्रीतीची भाषा बोलूया
जाळूया अहंकार मनातला
जागवूया माणूस माणसातला
जगास या प्रेमाने जिंकुया..
जीवन जगूया सन्मानाचे
टाळुनी आचरण दहशतीचे
ज्योत समतेची पेटवुया
जगास या प्रेमाने जिंकूया
तुटली इथे नाती जणू
कोसळल्यात वाती जणू
बोल प्रीतीचे बोलूया
जगास या प्रेमाने जिंकू या
ज्योत पेटवुया मानवतेची
समानता आणि बंधूतेची
आनंदाचे जीवन जगूया
जगास या प्रेमाने जिंकू या
देह आपला झिजऊनी
कल्याण मानवाचे साधुया
उच्चनीचतेच्या पाडूनी भिंती
जगास या प्रेमाने जिंकूया..
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
No comments:
Post a Comment