*आषाढघन*
आषाढघन आषाढघन येती
मनालाही आनंद मिळून
रानीवनी जाती बरसून
तापलेल्या धरतीस सुख देती
आषाढघन आषाढघन येती
मृगाच्या जलधारेने बरसुनी
रानास गारपण देऊनी
इंद्रधनुष्यासही खुणावती
आषाढघन आषाढघन येती
सारेजण शेतकामाची मग
भराभर सुरुवात करती
बळीराजा अंतःकरणी सुखावती
आषाढघन आषाढघन येती
प्रेमपाखरेही बेधुंद होऊन
तुझ्यासमवेत गाणी गाती
मोर पिसारा फुलवूनी नाचती
आषाढघन आषाढघन येती
आषाढघन आषाढघन येती
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे.*
No comments:
Post a Comment