*वेडी आशा*
नयन लागता राञीस
स्वप्नी ही हळूच येतात
वेडी आशा ठेवुनी
मनात घर करून जातात
या स्वप्नात रंगवत असते
मी माझ जीवन
ही स्वप्ने नसती तर
भटकले असते वणवण....
स्वप्नांचा आधार घेऊन
मी जगत आहे आयुष्य
वेडी आशा मनी ठेवून
फुलेल का माझे भविष्य
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे
No comments:
Post a Comment