कविता - हेळसांड
तुले पाहून आज मले
लय बरं वाटलं, हेळसांड
मह्या जीवाची होत होती
हेच तुले सांगावसं वाटलं
तुले पाहून आज मले
लय बरं वाटलं, मनामंदी
मह्या जे होतं ते आज
तुले सांगावसं वाटलं
तुले पाहून आज मले
लय बरं वाटलं, मनातलं प्रेम
मह्या डोयामधी आटलं
हेच तुले सांगावसं वाटलं
तुले पाहून आज मले
लय बरं वाटलं, आजुबाजू देखता
पोटातलं सार काही मह्या
हेच तुले सांगावसं वाटलं
तुले पाहून आज मले
लय बर वाटलं.........
〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment