*आकर्षण*
किती मौज दिसे पहा तरी
जेव्हा विमान उडते आकाशी
आकर्षण हे त्याचे बघण्याचे
मनास देती हर्ष लहरी
जाऊन विमानातून कधीतरी
डोंगर,राने, ओहळ, तटिनी
आणि खोल खोल दरी
पहावे कुठे सागर लहरी
आकाशातील ग्रह नक्षत्रांच्या
घ्याव्या भेटी मग, अपूर्व शोभा
ही गगनीची जाऊन पहावी
विमानात बसुनी सर्वांनी.
किती मौज दिसे पहा तरी
जेव्हा विमान उडते आकाशी
〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment