अश्रू
नजर जरी तु लपवलीस
तरीही मज दिसतात
नेत्रातील तुझ्या ते अश्रू
अबोल प्रित तुझीही
सांग कसा मी विसरू
वेदना झाकतेस तू मनातल्या
तरीही त्या समजतात मला
दुःख तुझ्या त्या काळजातले
घाव तुझ्या त्या हृदयातले
सोसुनी सांगतात मला
अबोल तुझ्या ह्या प्रीतीचे
भाव मज मनी उमलतात
विरहाचे तू देऊनी दान
सतत वाहे अश्रू नयनातून
हाच संदर्भ मिळे प्रीतीतून
〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे
No comments:
Post a Comment