कोनाडा
पोटाच्या भुकेपायी व्याकूळ पिले
पाहती मायची वाट घरट्यात
पंखात कधी आणिन दाना
मग होईल कधी चिवचिवाट
सांजसकाळ चिव चिव होती
घरट्यात गजबज दिसती
उन्ह,पाणी, गारव्यात दिसे
माय पिलास कवेत घेऊन बसे
झाडावरचा हा कोनाडा असे
काडी काडी बांधून घरटा दिसे
येता-जाता न्याहळत ती
पिलांसाठी जीव ओतीत असे
〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
No comments:
Post a Comment