*शूर शिपाई*
भारतभूच्या आदर्शांचा
ठसा मनात ठेवीन
शूर शिपाई बनून
देशाचे रक्षण मी करीन
गुण थोरांचे गाऊन
आशीर्वाद त्यांचा घेऊन
भारतभूच्या समृद्धीसाठी
काया मी झीजवीन
नमन करून मी तयांना
राष्ट्रभक्तीस जपेन
भारतभूच्या आदर्शाचा
ठसा मनी उमटवेन
〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment