*बा तू होतास तेव्हा !*
बा तू होतास तेव्हा !
सुरू झाली माझी शाळा
बा तुझ्यामुळेच मला
लागला शाळेचा लळा
बा तू गेला अन्
संपलं सारं काही
आता कुणापुढे हट्ट करू
मज उरले ना काही
ना राहिली मायची सावली
ना राहिले बा तुझे छत्र
स्पदंनातील वेदनांनी मग
भरून येतात माझे नेत्र
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
No comments:
Post a Comment