नीरव शांतता
गडद अंधार्या रात्री चमकतो
काजवा लखलखणारा
नीरव शांतता भासे चोहीकडे
उजेड पडे त्याचा न्यारा
रात्र संपता जाईल कुठे?
प्रश्न हा मजला पडे
देह त्याचा चिमुकला
नजरेस माझ्या न पडे
चढुनी डोंगर घ्यावा शोध
अफाट त्या रानीवनी......
रात्र संपता चमकेल का?तो
गडद अंधारातूनी........
लखलखणारे रूप त्याचे
अंधारातही भारी शोभणारे
टिपून घ्यावे प्रसंग सारे
निसर्गसौंदर्य हे रेखाटणारे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
No comments:
Post a Comment