वेसण
जीवापाड जपून आई
बांधते मुलास वेसण
उच्चशिक्षित व्हावी त्याने
हीच प्रार्थना करते मनोमन
स्वतः राहून ती उपाशी
घास मुलास भरविते
लहानपणीपासूनच ती त्यावर
चांगले संस्कार करिते
बाळासाठीची तिची तगमग
वेड जीवास लावते
जीवापल्याड जपुनी त्यास
सुजान नागरिक बनविते
वेसण ठेवून मनास
इच्छा ती सावरते
पोराबाळासाठी मात्र
आयुष्य ती झिजविते.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment