भ्रष्टाचाराचा भस्मासुर आजच्या काळात भ्रष्टाचार हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. माणूस भ्रष्टाचारी का होतो? त्याच्या साऱ्या श्रद्धा निष्ठा का हरवतात? स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अमानवी कृत्य का करतो? मंदिराचा सुवर्णकळस घडवणारा कळसातील सोने चोरतो, तेव्हा त्याच्या आचरणाला काय म्हणावे? माणसाच्या या सार्या वृत्तीला एकच कारण आहे आणि ते म्हणजे 'माणसाची उपभोगवादी वृत्ती'! ही उपभोगवादी वृत्ती माणसाच्या अंगात जोपर्यंत आहे तोपर्यंत तो भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेला असेल. आजकाल भ्रष्टाचार हा गरीब-श्रीमंत सगळेच करताना दिसतात. सुव्यवस्था व सुविद्य माणसे आपली विद्वत्ता वापरून भ्रष्टाचार करतात. फार प्राचीन काळी भ्रष्टाचार नावाचा हा शब्द अस्तित्वात नव्हता. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचारी माणसाला अतिशय कमी लेखले जाई. भ्रष्ट आचरण करणाऱ्याला वाव नव्हता. पण आज सार्या नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला आहे. आज एकही असे क्षेत्र नाही तेथे भ्रष्टाचार होत नाही.आज भ्रष्टाचार या शब्दाचा समाजजीवनात सर्रास प्रयोग करण्यात येत आहे.भ्रष्टाचाराचा भस्मासुर सर्वत्र बोकाळला आहे. भ्रष्टाचाराची वाळवी आज समाज मनाला पोखरू लागली आहे. समाजातून मानवीय नीतिमूल्यांचा नाश होत असून आज समाजामध्ये लाच घेणे, खोटे बोलणे, फसगत करणे, चोरटा व्यापार करणे, आयकर चुकवणे, अफरातफर करणे, बळजोरी करणे इत्यादी अनैतिक मार्गाचा अवलंब होऊन या अनेकविधी भ्रष्टाचार भ्रष्टाचाररुपी प्राण्यांने संपूर्ण समाज डोंगर पोखरून काढलेला आहे. आज भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात माणूस अडकत चालला आहे. आता या भ्रष्टाचारातून माणसाची सुटका होणार तरी कधी? हा प्रश्न पुन्हा पुन्हा मनाला भेडसावत आहे. हा भ्रष्टाचाराचा भस्मासुर आपले उघड उघड आकांत तांडव करून समाजाला काळीमा फासण्याचे काम करत आहे. भ्रष्टाचाराचा ओघ अव्याहतपणे सुरूच आहे. या अव्याहतपणे चालणाऱ्या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला कधी पायमल्ली बसते? कधी आळा बसतो? असा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतो? 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment