नैराश्य
नैराश्य घेऊन जीवनात कधीच
न जगाव माणसानं
होऊन व्यक्त दिलखुलास, बोलून
मनमोकळे जगून घ्याव माणसानं
प्रश्न आपल्या जीवनातले
असले जरी सोपे अवघड तरी,
देऊनी उत्तर, करुनी संघर्ष
जगून घ्याव माणसानं
अश्रू डोळ्यातुन ओघळणारे
पुसून जगाव माणसानं
धुमसणारे दुःख मनातलं
सांगून जगाव माणसानं
जेव्हा हार होते तेव्हा यशाचं
महत्व जाणून घ्याव माणसानं
जिंकण्यासाठी कधीकधी मग
हारुन जगाव माणसानं
वाट्यास आलेल्या दुःखासही
थोडस हसून घ्यावं माणसानं
मृत्यू जरी अटळ सत्य तरी
मागे चांगले काहीतरी उरून जगाव माणसांन
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे.
No comments:
Post a Comment