रेशिमगाठी
डोळ्यातल्या पाण्याला स्वतः पुसून घ्यावे
हृदयातल्या वेदनेला स्वतः साठवून ठेवावे
स्वतः चा स्वतःवर मात्र विश्वास ठेवावा
रेशीमगाठी बांधल्या जरी सुटू न द्यावे
एकटेपणातच मन रमवावे आणि जगावे
सावलीच्या सोबतीने एकट्यानेच चालावे
कुणाच्या मदतीची अपेक्षा का करावी
कुणाच्या आधाराची अपेक्षा का धरावी
जीवन जगताना स्वतःच स्वतः सावरावे
स्वतःचा तोल मात्र ढळू न द्यावे
प्रयत्न आणि आत्मविश्वासाने जगावे
बांधलेल्या रेशीमगाठी सुटू न द्यावे
〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे
No comments:
Post a Comment