*लक्षवेधी*
रूप धरतीचे पाहुनी झुरतो
दूर गगनीचा चंद्र बिचारा
लक्षवेधी चांदण्या पाहतात
सृष्टीचा सुंदर साज सारा
रजनी विखुरले टिपूर चांदणे
आकाशी प्रकाशला मंडप जसा
वसुंधरेचा फुले पिसारा
गगनी दुमदुमला नाद जसा
दूर हिरवळ त्या डोंगरकपारी
वाहत जाते सरिता वळणावरी
जलगंगेचा हा शांत किनारा
सुगंध पसरवितो धुंदीत वारा
जोडूनी कर अधीरतेने
मन हर्षाने फुलत असतं
निसर्गाचे हे सौंदर्य पाहुनी
क्षणोक्षणी सुखावत असत.
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment