ग्रहण
कधी ओला तर कधी कोरडा
दुष्काळ पडुनी, बळीराजाची होते हानी
ग्रहण हे त्याच्या मागचे सुटणार
का कधी ?कोण जाणी?
मेहनत इतकी करुनी
जगण्यास नसते त्यास अन्नपाणी
जगाच्या या पोशिंद्याची किती? केविलवाणी ही कहानी
घाम गाळूनी ,कष्ट करूनी
शेतात राबराब राबतो
डोंगर कर्जाचा घेऊन
मरण यातनेत तो जगतो
कधी येईल पीक पाणी
मिळेल या पोटास भाकर चटणी
हाती पडेल का पैका नानी
का? होईल
व्यापाऱ्यांची मनमानी
झोपडीपाशी बसुनी, विचार तो
करतो, प्रश्न मनाला भेडसावणारे
डोळ्यात अश्रू आणून , दुःखाने
वर पाहत आकाशास सांगतो
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment