*दिव्यता*
देशाच्या सन्मानासाठी
समाजाच्या कल्याणासाठी
ज्ञानाचा मंत्र आपण जपू
शिक्षणाची दिव्यता जाणून घेऊ
अज्ञान हाच ओळखून दुर्गुण
नको त्याची पुन्हा गुणगुण
ज्ञान हाच श्रेष्ठ सद्गुण
त्यातच आहे मानवी कल्याण
ज्ञान मिळवून साधूया प्रगती
मिळेल विकासास गती
धरावी कास शिक्षणाची हाती
होईल मग मानवाची उन्नती
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे.*
No comments:
Post a Comment