धोंड्या
धोंड्या तू बोलतोयस खूप काही
पण ते मला समजेलच असे नाही
जरी मी समजलो तरी दुसरच काही
धोंड्या जे तू कधी सांगितलंच नाही
धोंड्या माझ्याकडे ज्याचं उत्तर आहे
असा प्रश्न तुझ्याकडे पडलेला नाही
धोंड्या मला हवे असलेल्या प्रश्नांची
कैफियत तुझ्याकडे असेलच असे नाही
धोंड्या मला तुला काही खूपसं
सांगावसं वाटतं, पण मनातील भाव मनातच राहून जातं .
धोंड्या मी बोलावं म्हणून तुलाही ते
कान लावून ऐकावसं वाटतं...
धोंड्या असं वागणं मला तुझ
उमजलं नाही, तुला काय हवं
ते मला तरी समजलं नाही. पण
माझ्या आवडीनिवडीच तुला
काहीच पडलेलं नाही.
〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
No comments:
Post a Comment