चित्र चारोळी स्पर्धेकरिता
1)
माई तू वात्सल्याचा वाहणारा अखंड झरा
माई तू जीवन फुलवणारा सुंदर पिसारा
माई तू सुखदुःखतला एकमेव सहारा
माई तू नवजात शिशुचा संस्काररुपी मनोरा.
2)
डोईवर ओझे तोंडाला मास्क
बाळास घेऊन निघाली कामास
लगबगीने पायी चालत जाती
संसार सुखाचा हीच आस
3)
मायेच्या कुशीत निजले निवांत
प्रेमाचा निर्झर आहेस तू झरा
कधी न भासली कशाचीच भ्रांत
तुझ्याच कुशीतला वात्सल्य खरा.
No comments:
Post a Comment