आतुरता
दोन नात्यातील संगम असा
मनामनातील साधलेला संवाद जसा
सहवासात झालेली आत्मीयता
तुझ्या येण्याने लागलेली ती आतुरता
हृदयात आहे फुललेली एकता
प्रीतीची अशीच असते सांगता
काही क्षणात जोडलेले प्रेमाचे बंधन
माळेतील फुलात फुल जसे ठेवले गुंफून
सुखदुःखात एकमेका दिलेली ती साथ
अनेक संकटे आली असता करुनी मात
असाच असतो प्रीतीचा या मिलाप
बांधलेल्या दोन जीवांचा संसाररूप
〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
No comments:
Post a Comment