झुळूक मी
मनी आज भाव माझ्या आले
झुळूक मी व्हावे वाऱ्यासंगे
गडद धुक्यातून जावे अन्
राहावे तृणपात्याचा दवबिंदूसंगे
मनी आज भाव माझ्या आले
रात्रीच्या अंतरंगी डोलावे
स्वप्नरंग मनीचे मनी पहावे
अंधारातही हर्षुन जावे
मनी आज भाव माझ्या आले
हिरव्यागच्च तरुवर जावे
गाणं कोकिळेचे गावे अन्
स्वरास्वरात भावचकोर व्हावे
मनी आज भाव माझ्या आले
मनी आज भाव माझ्या आले
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment