*बेधुंद क्षण*
घाव वेदनेचे सोसून घे आता......
उदासलेल्या वाटेवर चालून घे आता.....
बेधुंद क्षण ते, जपुन ठेव आता......
नाते अपुलेच आपुल्या मनाशी
जोडून घे आता..........
उजाडलेल्या दिसाचा संदेश ऐक आता......
तळपत्या सूर्याचे दाह सोस आता......
संवेदना मनीची जपून ठेव आता......
जगणे ते चकोराचे सोडून दे आता.....
खोल सागराच्या अंतरीस जाण आता.....
निःशब्द किनाऱ्याशी बोलून घे आता......
स्तब्ध तुझ्या मनातील भाव ओळखून जगत रहा, तू आता.....
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment