वेसण
सांग ताई ? सांग दादा ?
वेसण कुठवर घालू मी
अंधश्रद्धेत गुरफटलेल्यांना
आवर कुठवर घालू मी
सांग ताई ? सांग दादा?
वेसण कुठवर घालू मी
अज्ञानाचा कळस चढविणाऱ्याना
ज्ञानाचा प्रवाहात कुठंवर आणू मी
सांग ताई ? सांग दादा ?
वेसण कुठवर घालू मी
रुढी परंपरेने चाललेल्या प्रथेला
सावर कुठंवर घालू मी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment