गुरुमाऊली चित्र चारोळी कट्टा
स्पर्धेसाठी
1)
स्नेहाने तुझ्या नेत्रात पाहतांना
कधी हरवले कळलेच नाही
तुझ्या बासुरीच्या सुराने मग
प्रेमधुंद मी झाले कळलेच नाही
2)
डोळ्यात पाहिले,कौमुदित नाहले
तुझ्या भावस्पर्शाने तृप्त कर कृष्णा
स्वप्नरंग मनीचे स्वरा स्वरात पाहले
अंतरंगातील वलयास तृप्त कर तृष्णा
3)
प्रीतीचे बोल तुझे अबोल राधे
ऐकू येतात काळजात मला
शब्द तुझ्या त्या ओठातले
सूर बासरीचे सांगतात मला
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे*
*ता. हदगाव जि. नांदेड.*
No comments:
Post a Comment