कविता - पांढरा परीस (लबाड)
पांढऱ्या परीसापरी खोटी प्रतिष्ठा न जपण्या बरी, आत कोंडीता भावना
द्वेष ,मत्सर , राग ,लोभ प्रेम, हेवा ,माया ,ममता सल पोखरीतो मना
द्वेष मनात साठता, भग्न करी मनास
प्रसन्नता मिळत नाही काळजास
जिवंतपणी नाही मिळत सुख त्यास
चिंता करित संपतो असा माणूस
पांढरा परीस जगणे असे
सोडून द्यावे, करुनी सत्कर्म
जीवन सार्थकी लावावे,
ऐसे जीवन आपुले जगावे
प्रत्येक हृदयात मिळवावी जागा
निर्माण करावा ओलावा मायेचा
गुज मनाचे सांगता
सोडून द्यावा हेवा
ओठी आणावा भाव प्रेमाचा....
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment