कविता - क्षणोक्षणी
देवा तुझा महिमा अगाध आहे
क्षणोक्षणी नाम तुझे मनात आहे
पंढरीचा विठ्ठल उभा तू विटेवरी
तुझ्याच नामस्मरणाने तल्लीन
होतात भक्त वारकरी
देवा तुझे अवतार अनेक आहेत
दृष्ट जनांचा करुनी संहार तू
भक्तासाठी धावून येतोस तू
तुझे या सृष्टीवर उपकार अनंत आहेत
देवा तुझी लीला अपरंपार आहे
तुझ्या अदृश्य शक्तीचा पगडा
आम्हावरी आहे , सारे तुझ्या भक्तीत होतात तल्लीन, करूनि तुझ्या नामाचा गजर
अखंड दीप जळो हृदयी माझ्या
तुझ्याच नामाचा, महिमा तुझी अगाध आहे, शांती रक्षणा नांदो विश्वात, असू दे कृपा आम्हावरी तुझीच देवा
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे.
No comments:
Post a Comment