कविता - सौदामिनी
पृथ्वीच्या अंतरंगात खोलवर
उकळणारा लाव्हा आहे
उष्णतेची लाट पोटात घेऊन
उफाळणारा प्रलयकार आहे
संकटे जशीजशी अग्रेसर होतात
अनेक संकटं निर्माण होतात
सौदामिनी बनून लढत राहतात
त्याच्यांशी दोन हात करावे लागतात
धोका नाहीसा व्हावा म्हणून
लढत जात असतो आम्ही
त्याला संपविण्याच्या नादात
पर्यावरणाचे रक्षण करत नाही आम्ही
जपूया पर्यावरणास, लावून झाडे
भूगर्भातील उष्णता होईल कमी
प्राणीजीवन सर्व सुरक्षित होईल
प्रदूषणमुक्त होण्याची मिळेल हमी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment