कविता- जांगडगुत्ता
भावनांचा जांगडगुत्ता होतो जेव्हा
बांध सुटता अश्रूंचा तेव्हा तेव्हा
अश्रूंची ही जेव्हा माळ सरकते
नयनातुनी तेव्हा धारा ओघळते
बांध सुटताच नयनातील
मनमुराद त्या उसळतील
जणू टपोरे हे दवबिंदूचे थेंब ओघळते
अलगद गालावरून हळूच थबकते
अश्रूंचे हे माळेतील मोती विरती
पुन्हा परत कधीच न दिसती
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे
No comments:
Post a Comment