चित्रचारोळी - स्पर्धेकरिता
1)
निळ्या निळ्या आभाळात
तारा कसा लुकलुकतो
तुझे पाऊल पडता खाली
जीव माझा झूरझुर झुरतो.
2)
तुला हसतांना पाहतांना
तुझ्या हस्यावर वेडा मी झालो
पाऊल पडता जमिनीवर तुझे
तुझ्या नजरेत कैद मी झालो.
3)
जीवनातील सुखदुःखात तुझीच
साथ ,अशीच मला लाभू दे
पावलोपावली तुझं हे प्रेम
असंच मला आयुष्यभर लाभू दे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे
ता. हदगाव जि.नांदेड.
No comments:
Post a Comment