कविता - सुखाची सावली किती कष्टात जीवन त्यांनी काढले किती श्रमाचे भार त्यांनी सोसले उन्हातान्हाची त्यांनी नाही केली परवा जीवनास त्यांनी दिला आमच्या गारवा आई -वडील माझे सुखाची सावली तेच माझे पंढरीची विठू माऊली आयुष्याचा सार आई -वडील माझे सुखदुःखाचा आधार तेच माझे आई-वडील माझे वात्सल्याचा झरा तप्त उन्हातील माझ्या मंद गार वारा आई -वडील माझे सुखाची सावली तेच माझे पंढरीची विठूमाऊली क्षणोक्षणी येती प्रेमाचीआठवण भाव काळजातले तव फुलविती अंतरंगातील दुःखास मग होती स्पर्शुनी जाती मायेची साठवण आई वडील माझे सुखाची सावली तेच माझे पंढरीची विठूमाउली रानावनात स्वतः जाऊनी मग धडे शिक्षणाचे दिले आम्हास दुःख सोसुनी स्वतः माञ सुखाची सावली दिली आम्हास आई-वडील माझे सुखाची सावली तेच माझे पंढरीची विठू माऊली 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment