कविता - तारांबळ
बिगी बिगी निघाली ती
उपाशी पोटी घरातूनी
डोईवर गाठोड घेऊनी
चालती माळरानातूनी
बाळ पाठीशी बांधुनी
लगबग चालती ती
तारांबळ तिच्या जीवाची
वेदना असे गरिबीची
पोट भराया निघती ती
ना ऊन ,ना पाऊस बघती
किती कष्ट सोसुनी ती
मुलांचा जीव जपती
ना थकनार कधीही ती
ना हरणार कधीही ती
राब राब राबूनी बाळासाठी
जीव तिचा ओतणार ती
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment