कविता - टिपूस
माझा देह जळून जाऊन
त्या देहाच्या धुराचा आकाशी
ढग तरी व्हावा,अन् त्या ढगातील
पाऊस टिपूस टिपूस तुझ्याच
अंगणात पडावा
बरसलेल्या पावसाचा थेंबाने
अंगणातील मातीतल्या ओलाव्यातून
निस्वार्थी प्रेमाचा गंध यावा, मग
त्या धुराचा मज पश्चाताप न व्हावा
भिजलेल्या तुझ्या या देहाचा
हळुवार स्पर्श मज व्हावा
जळून गेलेल्या चितेचा मग
विसर तुजला पडावा...
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment