कविता - समानता
स्त्री - पुरुष समानता
फक्त म्हणायलाच आहे
बंधनात बांधून तिला सार
काही सोसण्यासाठी आहे
घरातलं हव-नको ते सारं
काही मग तीनच बघायचं
धाकटयांना प्रेम, आणि
थोरल्यांचा आदर करायचं
सकाळपासून संध्याकाळपर्यंत
तीनच राबराब राबायचं
पै - पाहुण्यांचं स्वागतही मग
माञ तीनच करायचं
घरादाराची मानमर्यादा
तीनच सार सांभाळायच
अगदी जीवावर बेतल तरी
कपाळाच कुंकू जपायचं
पुरुष कितीही पतीत असला
तरी तोच नेहमी वर असतो
समानतेच्या नावाखाली मात्र स्त्रीजन्मअग्निदिव्यासम असतो.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment